२१ फेब्रु, २०११
युजर गाईडसचा संग्रह
सध्याचा काळ असा आहे की आपलं घर असो की आपलं कार्यालय, घरात इलेक्ट्रॉनिक आणि वीजेवर चालणार्या वस्तूंची रेलचेल असते. टीव्हीपासून ते म्युझिक सिस्टमपर्यंत, आणि स्वयंपाकघरातल्या मिक्सर पासून ते वॉशिंग मशीनपर्यंत अनेक गोष्टी असतात. मोबाईल तर प्रत्येकाच्याच खिशात असतो. खेरीज कॅलक्युलेटर्स, आपल्या संगणकाच्या माऊसपासून ते फॅक्स मशीनपर्यंत अनेक गोष्टी असतात. जेव्हा ह्या वस्तू नव्याने आपल्या घरात येतात, तेव्हा आपलं लक्ष त्या वस्तूकडे असतं. चकचकीत नव्या रूपातली ती देखणी वस्तू आपण कधी एकदा हाताळतोय, वापरायला सुरूवात करतोय इकडे सारं ध्यान एकवटलेलं असतं. पुढे कधीतरी ती वस्तू जुनी होते. अचानक बिघडते. ह्या टप्प्यावर मग आपल्याला आठवण होते ती त्या वस्तूच्या मॅन्युअलची किंवा युजर गाईडची. त्या युजर गाईडमध्ये बिघाड कसा दूर करावा याच्या टीप्स दिलेल्या असतात, आणि त्याच आपल्याला हव्या असतात. ट्रबल शुटींग ह्या शीर्षकाखाली ते तंत्र आणि मंत्र कधीतरी पाहिलेले आपल्याला आठवत असतात. पण झालेलं असं असतं, की बाकी सर्व आठवत असून ते मॅन्युअल किंवा युजर गाईड कुठे ठेवलय हे काही आठवत नसतं. कपाटं, ड्रावर्स, बॅगा, फाईल्स वगैरे धुंडाळून आपण शेवटी हरतो. ते मॅन्युअल काही हाती लागत नसतं, आणि त्यावाचून तर सारं अडलेलं असतं. मंडळी, अशा परिस्थितीत हमखास कामी येणारी वेबसाईट म्हणजे www.safemanuals.com . ह्या साईटवर सर्व प्रकारच्या युजर गाईडसचा संग्रह उपलब्ध आहे. एकूण ८८३५४२ एवढी युजर गाईडस तिथे उपलब्ध आहेत असा त्या साईटचा दावा आहे. ही युजर गाईडस पहाण्यासाठी आजपर्यंत ४,५७,००० पेक्षा जास्त जणांनी तिथे मेंबरशीप घेतली आहे. आपली वस्तू ज्या कंपनीची आहे त्या कंपनीनुसार किंवा वस्तूच्या प्रकारानुसार (डिजिटल कॅमेरा, लेझर प्रिंटर वगैरे) किंवा एकूणच हवा तसा सर्च करून युजर गाईड शोधण्याची सोय ह्या साईटवर आहे. ह्या साईटचे नाव आपल्या संग्रहात हवे. कधी तिची गरज लागेल हे सांगणं अवघड.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा