११ मार्च, २०११

ऑनलाईन फूटपट्टी इथे आहे..

अनेकांना आवडणारा हा मोफत प्रोग्राम आहे. त्याचं नाव PicPick. आपल्याकडे तो नसेल तर आपणही तो जरूर डाऊनलोड करून वापरून पहा.
PicPick ह्या दुव्यावर डाऊनलोडींगसाठी उपलब्ध आहे.
PicPick हा मुख्यत्वे स्क्रीन कॅप्चर प्रोग्राम आहे. पण स्क्रीन कॅप्चरच्या सोयीबरोबर त्यात इतरही अवजारे आहेत. त्यातलं एक अवजार म्हणजे

तुमच्या मॉनिटरचा डिस्प्ले किती DPI चा?

सतत आपल्या डोळ्यासमोर असतो तो मॉनिटर. त्या मॉनिटरवर जे काही दिसतं ते DPI ह्या मापानुसार दिसतं. DPI म्हणजे Dots per inch हे संगणक क्षेत्रात रमलेल्यांना एव्हाना माहीत आहेच. तर, आपल्या मॉनिटरच्या प्रत्येक चौरस इंचात किती dots आहेत हे तुम्हाला माहीत आहे का? जर माहित नसेल, तर ते मोजण्याची सोय ऑनलाईन उपलब्ध आहे.
त्यासाठी http://auctionrepair.com/pixels.html ह्या साईटवर जा. त्या पानावर थोडे खाली या. पहा पुढील आकृती दिसेल. 
ह्या साईटवरील ती लाल पट्टी लांबीला किती आहे हे तुमच्या पट्टीने वा टेपने मोजा. जी लांबी असेल, म्हणजे उदाहरणार्थ 3.5 इंच असेल तर तुमचा मॉनिटर 85 DPI सेटींगवर आत्ता आहे. जर लांबी फक्त 3 इंच असेल तर DPI 100 चा म्हणजे अधिक चांगला आहे. पण जर लांबी जास्त म्हणजे 5 इंच असेल तर DPI 60 चा फक्त म्हणजे कमी आहे. थोडक्यात, लाल पट्टीची लांबी जेवढी जास्त तेवढा मॉनिटर कमी DPI चा. 
कमी DPI सेटींगचे मॉनिटर तुलनेने अस्पष्ट चित्र दाखवतात. त्यामुळे फोटो वगैरे शार्प दिसत नाहीत. गेम्स खेळतानाही हा फरक जाणवतो. 
तुमच्या मॉनिटरचे DPI सेटींग मोजण्याची ही युक्ती तुमच्या मित्रमंडळींना आवर्जुन सांगा. आवश्यक तर तुमच्या मॉनिटरचे DPI सेटींग वाढवता येईल का याचीही चाचपणी करा. 
अरे हो, लांबी मोजायला तुम्ही घरात वा ऑफिसात पट्टी किंवा टेप शोधत असाल. मिळाली तर उत्तम. पण जागेवर नाही सापडली तर ऑनलाईन पट्टी तुमच्याक़डे असेल तर ती वापरा. ऑनलाईन पट्टी तुमच्या संगणकावर लावलेली नसेल तर पुढल्या पोस्टमध्ये त्याचीही युक्ती दिली आहे. ती वाचून ती पट्टीही मिळवा. हे सगळंच मोफत आहे. त्यामुळे कसंलच टेंशन नाही. हवं ते फक्त नीट अटेंशन. 

गोंधळात टाकणारे 200 इंग्रजी शब्द

इंग्रजी ही भाषा सरळ आहे. पण सरळ चालताना मध्येच निसरडं यावं, आणि घसरून पडण्याचा धोका वाटावा असे काही शब्द इंग्रजीत आहेत. ते कोड्यात टाकतात, आणि गोंधळवूनही टाकतात.
उदाहरणार्थ हे पहाः
LATER आणि LATTER
किंवा
MATERIAL आणि MATERIEL
आणखी एक पहा,
RIFFLE आणि RIFLE
आता नेहमीचे काही शब्द - PRINCIPAL आणि PRINCIPLE, किंवा QUIET आणि QUITE वगैरे आपण काळजी घेऊन लिहीत असतो. पण एवढ्या वर्षांच्या इंग्रजी वाचन, लेखन, संभाषण केल्यानंतरही त्यातले काही सटकलेले असतातच.
अशा शब्दांच्या 200 हून अधिक जोड्या ह्या संकेतस्थळावर दिल्या आहेत. त्यांचे अर्थ कसे वेगळे आहेत, आणि वाक्यात त्यांचा उपयोग कसा होत असतो हे नीट दाखवले आहे.
इंग्रजीची काळजी घेणाऱ्या मंडळींना ह्या लिंकवर निश्चितच जावसं वाटेल. त्या 200 जोड्यांपैकी किती आपल्याला माहीत होत्या, आणि किती माहीत नव्हत्या हे पहाणं म्हणजेही स्वतःची स्वतःच परीक्षा घेतल्यासारखंही आहे.
हे पाहता पाहता एकीकडे ज्ञानही मिळतं, आणि मनोरंजनही होतं.