२१ फेब्रु, २०११
१०१ नवे उपयोग
आपल्या दैनंदिन जीवनातल्या साध्या साध्या गोष्टींचा नवा उपयोग सांगणारी. इंटरनेटवर अनेक ब्लॉग्जनी ह्या लिंकचा उल्लेख केल्याने ही लिंक चांगली लोकप्रिय झाली आहे. http://www.realsimple.com/work-life/101-new-uses-for-everyday-things-10000001030084/index.htmll . हा लिंकचा पत्ता लांबीला थोडा मोठा असला तरी तेथील माहिती फार उपयुक्त आहे. लिंबू, वर्तमानपत्र, कॉफी फिल्टर, ऑलिव्ह ऑईल, बेकींग सोडा, व्हिनेगार, वेलक्रो, खाण्याचं मीठ वगैरेंचे एकूण १०१ नवे उपयोग ह्या साईटने सांगितले आहेत. मूळात realsimple.com ही साईट life made easier ह्या ब्रीदवाक्याने चालत असते. त्यांनी सांगितलेले १०१ नवे उपयोग गंमतीदार आहेत. उदाहरणार्थ भरपूर मीठ घातलेलं गरम पाणी ड्रेनेजमध्ये ओतल्यास चोक-अप झालेले ड्रेनेज मोकळे होते. किंवा, दाढीचे क्रीम संपले असेल तर त्याजागी ऑलिव्ह ऑईल वापरल्यास दाढी उत्तम होते. व्हिनेगारचे दोन तीन चमचे पाण्यात टाकून त्या पाण्यातून स्वेटर वगैरे सारखे कपडे काढल्यास ते अधिक मऊसार होतात. वगैरे वगैरे. ह्या १०१ उपयोगांवर नजर टाकून त्यातले काही आपल्या कामी येतात का हे पहायला हरकत नाही.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा