इतरांचे फोटो काढणं, काढलेले फोटो पहात बसणं, आपले फोटोही इतरांकडून काढून घेणं आणि ते आणखी इतरांना पहायला लावणं ही एकविसाव्या शतकातल्या माणसाची भूक आहे. ही भूक पूर्वी नव्हती असं नाही. पण फोटो ही चीज सामान्यतः लग्ना-मुंजीत आणि पुढे वाढदिवसांपुरती साधारणतः मर्यादित असायची. कॅमेरा ही घरोघर असणारी चीज तेव्हा नव्हती. फोटो काढायचे म्हणजे महागडा रोल आणायचा, फोटो काढायचे, फिल्म धुवायची (धुलाईच सगळी!), मग पोस्टकार्ड साईज प्रिंट मारून घ्यायच्या असा सारा व्याप. हौसेची बॅटरी फुल्ल चार्ज असल्याशिवाय आणि खिशाला चांगली ऊब असल्याशिवाय हे फोटो प्रकरण जमणं पूर्वी एकूण अवघड असायचं. साधा क्लीक कॅमेरा खरेदीला स्वस्त असला तरी मनासारखे स्वच्छ फोटो येत नसल्याने कोणी तो गळ्यात बांधून सर्रास फिरायचे नाहीत. महागड्या कॅमेर्यात फोटो छान येत असले तरी तेवढी गुंतवणूक हौसेसाठी केवळ करणारे अगदी थोडेच असायचे.
आता काळ बदलला आहे. ह्या एकविसाव्या शतकात अगदी गावागावात सुद्धा बर्याच घराघरातून डिजिटल कॅमेरा दिसू लागला आहे. शहरात तर तो जवळजवळ घराघरात आला आहे. शिवाय मोबाईल फोनच्या कॅमेर्यातूनही रोजच्या रोज शेकडो डिजिटल फोटो संगणकात जाताहेत आणि ईमेलने ते जगभर कुठेही पोहोचत आहेत. एकीकडे डिजिटल कॅमेरा अक्षरशः आश्चर्य वाटावं एवढ्या कमी किंमतीला उपलब्ध झाला आहे. तर, दुसरीकडे ब्रॉडबँड इंटरनेट गल्लीगल्लीत पोहोचतं आहे. हा तांत्रिक विकास होत असताना दुसरीकडे घरातली हुशार मुलं शिकून सवरून अमेरिका, इंग्लंड, जपान आणि कुठेकुठे जाऊ लागली आहेत. मग, परदेशात गेलेल्या मुलांशी भारतातल्या आई-बाबांनी, आजी-आजोबांनी इंटरनेटवर शब्दांचा चॅट, वॉईस चॅट करत विरंगुळा साधणं रोजचं होऊन गेलं आहे. आजोबांच्या सहस्त्रचंद्र दर्शन कार्यक्रमाला, कॅलिफोर्नियात नोकरीसाठी गेलेला राहुल येणं तसं शक्यच नव्हतं. मग घरच्यांनी अतिशय हौसेनं त्याला त्या कार्यक्रमाचे फोटो मेल केले. असे प्रकार हे आता दैनंदिन जीवनातला एक भाग बनू लागला आहे.
पोस्टकार्डाच्या आकाराच्या फोटोंचा गुळगुळीत गठ्ठा गच्च पाकिटांतून आला की बावन पत्ते पिसून हातात आल्यासारखं वाटतं. तेच फोटो झकास अशा अल्बममधून आले की ते पाहताना मात्र छान वाटतं. ईमेलला फोटोंची मालिका अॅटॅच करून पाठवणं हे पाकिटातून फोटो आल्यासारखं आहे. पण तेच अल्बमच्या सॉफ्टवेअरमधून सुंदर व रंगीत पार्श्वभूमीच्या कोंदणात बसून आले की बघावेसे वाटतात. आपल्यापैकी बरेच जण इंटरनेट आणि डिजिटल कॅमेर्याशी चांगले परिचित असतात. पण ते सुंदर व आकर्षक अल्बमचं सॉफ्टवेअर कुठून आणायचं, संगणकावर ते कसं लावायचं याचं गणित काही त्यांना जमण्यासारखं नसतं. अशांसाठी इंटरनेटवर एक खूप चांगली सोय आहे. ही सोय आपल्याला www.jalbum.net वर पहायला आणि सहजपणे अनुभवायला मिळते. तुम्ही ती आजपर्यंत अनुभवली नसेल तर jalbum.net वर जरूर जा.
Jalbum.net वर तुम्हाला तुमच्या डिजिटल फोटोंचा अल्बम करून देणारं सॉफ्टवेअर मोफत उपलब्ध आहे. मुख्य म्हणजे हे सॉफ्टवेअर वापरणं हे अक्षरशः बाये हाथका खेल आहे. मोफत आणि अगदी सोप असं हे जाल्बम सॉफ्टवेअर jalbum.net वरून डाऊनलोड करून घ्या. काही क्षणात पटकन ते संगणकावर चढवा. तुमच्या डिजिटल कॅमेर्यातील फोटो जाल्बमच्या स्क्रीनवर फक्त आणून टाका (म्हणजे ड्रॅग अँड ड्रॉप), तयार अल्बमचं एक डिझाईन निवडा आणि Make Album ह्या बटणावर फक्त क्लीक करा. झाला तुमचा अल्बम तयार. हा अल्बम तुम्हाला ईमेलने पाठवता येतोच, पण त्याही पलिकडे म्हणजे तो तुम्हाला इंटरनेटवर ठेवता येतो. अर्थातच मोफत. खरं तर गुगलचं पिकासा किंवा याहू चं Flickr सारख्या फोटो शेअरींगच्या सोयी देणार्या इतर साईटस एव्हाना चांगल्या लोकप्रिय झालेल्या आहेत. पण तरीही मला jalbum.net चं अप्रुप वाटतं याचं कारण त्यातला साधेपणा आणि सोपेपणा. जगभरातल्या चाळीस लाख लोकांनी हे जाल्बम सॉफ्टवेअर डाऊनलोड केलं आहे आणि आपले हजारो अल्बम जाल्बमच्या साईटवर मोफत ठेवले आहेत.
इंटरनेटवर तुमचा अल्बम ठराविक मंडळींनाच पाहता यावा यासाठी जाल्बमवर पासवर्ड लावण्याची सोयही उपलब्ध आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे मराठी युनिकोड फाँटस असतील तर तुमच्या प्रत्येक फोटोला मराठी कॅप्शन देखील तुम्हाला देता येते. एखादा फोटो चुकून अंधुक आला असेल तर तो सुधारण्याची सोयही जाल्बमच्या सॉफ्टवेअरमध्ये आहे. एखाद्या फोटोतला कडेचा किंवा वरचा वा खालचा नको असलेला भाग काढण्याची सोय (cropping) देखील जाल्बमने दिली आहे. फोटोवर संस्कार करणार्या Red eye, Levels, Gamma, Sharpen, Blur, Invert सारख्या सोयींसाठी आपल्याला फोटोशॉप सारखं महाग आणि वापरायला कठीण असं सॉफ्टवेअर वापरावं लागतं. पण जाल्बमने ह्या सोयी तयार दिल्या आहेत. जाल्बमने तुम्हाला काय काय दिलय हे लक्षात घ्या. एक - तुमच्या फोटोंचा आकर्षक व रंगीत अल्बम तयार करून देणारं सॉफ्टवेअर तुम्हाला दिलं आहे. तुमच्या फोटोंवर संस्कार करण्याची तांत्रिक सोय त्यांनी दिली आहे. एखादा रंगीत फोटो कृष्ण-धवल करून हवा असेल तर ती सोयही जाल्बमने उपलब्ध केली आहे.
सामान्यतः इंटरनेटवर मोफत म्हंटलं की तिथे आपल्याला नको त्या जाहिराती हमखास टाकलेल्या असतात. पण जाल्बम त्याला अपवाद आहे. आपला अल्बम स्वच्छ व कोणत्याही जाहिरातींचं ठिगळ न लावता पाहण्याची सोय जाल्बम देतो. आता हे सगळं वाचल्यानंतर एक प्रश्न सर्वांनाच स्वाभाविकपणे पडतो की हे सारं मोफत मोफत कोणी कसं देऊ शकतं? ह्या मागचं अर्थशास्त्र नेमकं कसं असतं? जाल्बमचे आर्थिक व्यवस्थापन दोन प्रकारे होताना दिसतं. एक म्हणजे जाल्बम देणग्या स्वीकारतं. आपला सुंदर अल्बम आपल्याला वेबसाईटचा कसलाही खर्च न पडता इंटरनेटवर प्रकाशित झाला याच्या समाधानापोटी जाल्बमला हजारो डॉलर्सच्या देणग्या देणारे लोक जगभर आहेत. ज्या चाळीस लाख लोकांनी जाल्बम डाऊनलोड केला आहे त्यापैकी दहा टक्के लोकांनी जरी कृतज्ञतेपोटी देणग्या दिल्या असतील तरी ती रक्कम उल्लेखनीय असू शकते. जाल्बम जरी आपल्या अल्बमवर जाहिराती टाकत नसला तरी त्यांच्या वेबसाईटवर इतरत्र जाहिराती स्वीकारण्याची सोय आहे. तो भागही जाल्बमची आर्थिक बाजू सांभाळणारा आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे आपल्या फोटो अल्बमसाठी जाल्बम आपल्याला कमाल ३० एम.बी. जागा देतो. खरं तर ही जागा एका छोट्या फोटो अल्बमसाठी पुरेशी होते. खेरीज आपण वेगवेगळ्या नावाने अनेक अल्बम्स देखील उघडू शकतो. पण ज्यांना शेकडो फोटोंसाठी ३० एम.बी. पेक्षा अधिक जागा लागणार आहे त्यांना ती जाल्बमकडून विकत घेता येते. ह्या तीन चाकांवर जाल्बमची आर्थिक गाडी चालत असते. जाल्बम आज जगातल्या एकूण ३२ भाषांमध्ये उपलब्ध आहे. बत्तीसचा हा आकडाही आपल्याला त्याची लोकप्रियता लक्षात येण्यासाठी पुरेसा आहे.
जाल्बम तयार करून जगाला मोफत देणारी ही कंपनी आणि त्यामागची माणसं कोणं हे जाणण्याची उत्सुकता तुम्हा आम्हाला असणं स्वाभाविक आहे. जाल्बमच्या मागची बहुतेक मंडळी ही स्वीडनमधील स्टॉकहोम शहरातली आहेत. त्यातले अनेक जण वेगवेगळ्या व्यवसायात आहेत. डेव्हिड एखोम हा जाल्बमचा संस्थापक. बर्फाळ प्रदेशात स्काईंग करणं हा त्याचा छंद. स्काईंगची एक सहल संपवून आणि भरपूर फोटो काढून डेव्हिड घरी परत आला. काढलेले फोटो त्याला इंटरनेटवर टाकायचे होते. त्यासाठी तो फोटो अल्बम तयार देणारी वेब साईट शोधत होता. ही गोष्ट २००२ सालची, म्हणजे साडेपाच-सहा वर्षांपूर्वीची. डेव्हिडला फोटो अल्बम तयार देणारी वेब साईट शोधूनही सापडली नाही, तेव्हा त्यानेच तशी वेबसाईट तयार करण्याचा संकल्प केला, आणि तो तडीस नेला. त्यातूनच जाल्बम डॉट नेट तयार झाली. ज्यांना संगणकाची फक्त वरवर माहिती आहे व ज्यांना फार कष्ट न घेता आणि जास्त वेळ न घालवता स्वतःच्या फोटोंचा अप्रतिम अल्बम इंटरनेटवर प्रकाशित करायचा आहे त्यांचेसाठी जाल्बम म्हणजे एक उत्तम सोय आहे यात शंका नाही.
२० फेब्रु, २०११
डिजिटल प्रतिबिंब तयार करण्याची सोय
कोणत्याही छायाचित्राचे प्रतिबिंब (पाण्यात पडणारे वगैरे) मोफत तयार करून देणारी वेबसाईट म्हणजे
http://picreflect.com/
ह्या वेबसाईटवर आपण हव्या त्या छायाचित्राची jpg किंवा तत्सम फाईल अपलोड करायची. नंतर Generate ह्या बटणावर क्लीक करायचं आणि picreflect.com ने तयार करून दिलेली प्रतिबिंबाच्या फोटोची फाईल डाऊनलोड करून घ्यायची. इतका सारा सोपा मामला. वाघाच्या फोटोच्या प्रतिबिंबाची picreflect.com ने तयार करून दिलेली फाईल खाली पहाः

प्रतिबिंब ज्या रंगात हवे तो रंग निवडण्याची संधी picreflect आपल्याला देतो. त्या खेरीज प्रतिबिंब आकाराने मोठे हवे की छोटे हवे हेही आपण ठरवू शकतो. नेमके कोणत्या प्रकारचे सेटींग्ज ह्या संदर्भात picreflect देऊ करतो ते त्यांच्या वेबसाईटच्या दर्शनी पानावर दाखविलेले आहेत. त्या पानाचे छायाचित्र खाली दिले आहे.
वर दाखविलेल्या वेब पानावर लाल बाणांनी प्रतिबिंबांचे सेटींग्ज दाखविले आहेत. सर्वांत तळाशी लाल बाणाने Generate बटण दाखविले आहे.
महत्वाचा भाग हा की हे आपण हे थेट picreflect.com ह्या साईटवरच करून पाहू शकता. कोणतेही सॉफ्टवेअर त्यासाठी डाऊनलोड करण्याची आवश्यकता नाही. इंटरनेटचे माध्यम भविष्यकाळात कशा प्रकारची सेवा देऊ लागतील याची ही केवळ एक झलक आहे

व्हिडिओंनी बनलेला ज्ञानकोश
वाचायला बुवा कंटाळा येतो. त्यात आणखी काँप्युटरच्या स्क्रीनवर वाचायचं म्हणजे तर बघायलाच नको. डोळ्याला त्रास वगैरे होतो. घरात पीसी किंवा लॅपटॉप वगैरे आलेला असतो. हौसेने इंटरनेटची व्यवस्थाही झालेली असते. ब्रॉडबँडच्या प्रसारामुळे इंटरनेटचा स्पीडही चांगला मिळत असतो. म्हणजे थोडक्यात सगळं असतं. पण वाचायला कंटाळा येत असतो. म्हणजे ज्ञान नको असतं असं नाही. ज्ञान, मीन्स नॉलेज, तर हवंच. त्याचं महत्व चांगलच कळत असतं. ज्ञानपिपासू वृत्तीही असते.वाचनातून ज्ञान मिळतं याबद्दल दुमत वगैरे नसतच. वाचन हवं हे कळत असतं पण वळत नसतं. जी मंडळी ह्या अशा काहीशा पेचातून चालली असतील (आणि एवढं असूनही सौजन्यपूर्वक हा लेख वाचायची तसदी घेत असतील) अशांसाठी इंटरनेटवरची एक वंडरफूल सोय सांगतो. इंटरनेटवरची सोय म्हणजे अर्थातच कुठली तरी साईट असणार हे तुम्ही एव्हाना ओळखलेलं आहे. तुमचा अंदाज बरोबर आहे. मी एका वेब साईटबद्दलच सांगतो आहे. त्या साईटचं नाव आहे - 'वंडर हाऊ टू डॉट कॉम'.
लक्षात घ्या की साईटच्या नावातच 'हाऊ टू' आहे. म्हणजे एखादी गोष्ट कशी करावी याचं ज्ञान देणारी ही वेब साईट आहे. पण साईटच्या नावात नुसतं 'हाऊ टू' नाही,तर त्या बरोबर 'वंडर' पण आहे. म्हणजे आश्चर्यकारकपणे शिकवणारी ही वेब साईट आहे. आता तुम्ही विचाराल की हा काय फंडा आहे? तर, त्याचं साधं सोपं उत्तर म्हणजे तुम्हाला काहीही वाचायला न लावता प्रत्यक्ष 'आंखो देखा हाल' पद्धतीने शिकवण्याची व्यवस्था ह्या साईटवर आहे. आता एवढी प्रस्तावना झाल्यानंतरही लक्षात न येण्याइतका तुमचा आयक्यू साधासुधा नाही हे सरळ आहे. तुमच्या लक्षात आलेली गोष्ट बरोबर आहे. ह्या साईटने 'हाऊ टू' हा प्रकार व्हिडीओच्या माध्यमातून तुम्हाला देऊ केला आहे. मुख्य म्हणजे तो मोफत आहे.

उदाहरणार्थ पहा - गणितातले अपूर्णांक तुम्हाला शिकता येतील ते ह्या साईटवरचा व्हिडीओ पाहून. किंवा आणखी इंटरेस्टींग सांगायचं तर डोकेदुखी घालवण्यासाठी मालीश कसं करायचं हे प्रत्यक्ष व्हिडीओ क्लीपमध्ये दिसलं तर वाचण्यापेक्षा सोपं आणि पक्क यात शंका नाही. ह्या खेरीज कॉंप्युटरशी संबंधित म्हणाल तर तुमच्या किबोर्डवरची विंडोज की कशी वापरायची किंवा विंडोज एक्सपी मध्ये एका कॉंप्युटरवर दोन मॉनिटर्स कसे लावायचे वगैरे. अशा प्रकारच्या विविध विषयावरच्या ९०,००० (नव्वद हजार फक्त) व्हिडिओ क्लीप्स http://www.wonderhowto.com/ वर आहेत.
महिलांसाठीचे विषय
इंटरनेटवरचं मल्टीमिडीयाचं तंत्र हा ह्या साईटचा आत्मा आहे. आपल्याला शिकायची ती गोष्ट किंवा ते तंत्र चित्रपट माध्यमातून प्रत्यक्ष दिसणं ही बाब वाचनातून शिकण्यापेक्षा अधिक प्रभावी आहे. उदाहरणार्थ ह्या साईटवरचे खास महिलांसाठीचे हे काही मुख्य विषय पहाः १) सौंदर्य कला २) घर आणि बगीचा ३) अन्नपदार्थ अर्थात स्वयंपाकघरातील टीप्स ४) कौटुंबिक आणि व्यक्तीगत बाबी वगैरे.
तुम्ही ब्युटी किंवा सौंदर्य कलेच्या विषयात शिरलात तर तेथे अनेक म्हणजे एकूण ८४८ उपयुक्त व्हिडीओज तुम्हाला दिसतील. त्यातले उदाहरणादाखल हे काही पहाः कोरड्या त्वचेची काळजी कशी घ्यावी, कुरळ्या केसांची हाताळणी कशी करावी, कोरड्या ओठांसाठी काय करावे, परफेक्ट पोनी टेल कशी बांधावी, स्वतःचा स्वतःच फेस मसाज कसा करावा, लिपस्टीक जास्त टिकण्यासाठी काय करावे असे एक ना अनेक विषय त्यात आहेत. प्रत्यक्ष दिसत असल्याने ते समजण्यात वा शिकण्यात काहीही अडचण येत नाही.
आता दुसरा विषय घर आणि बगीचा हा घ्या. यात एकूण ३२८५ व्हिडीओ क्लीप्स आहेत. हा विषय इतर अनेक उपविषयांमध्ये विभागला आहे. त्यातले काही उपविषय पहा - स्वच्छता टापटीप, इंटिरियर डेकोरेशन, बागकाम, फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक साधने वगैरे. यात इनडोअर गार्डन कसे करावे, तुमच्या एलसीडी स्क्रीनवर किंवा सीडीवर किंवा प्लास्टीकवर कुठेही चरे आले असतील तर ते काढण्यासाठी साधे अंडे कसे वापरता येते, टॉवेल्सची घडी उत्तम प्रकारे कशी घालावी, उत्तम फर्निचर कसं ओळखावं वगैरे अक्षरशः शेकड्यांनी टीप्स आणि ट्रीक्स शिकवणारी तंत्रे आपल्याला प्रत्यक्ष पहायला मिळतात.
पुढला विषय अन्नपदार्थ आणि स्वयंपाकघराचा. यात एकूण ५०७० व्हिडीओ आहेत. यामध्ये एकूण २३ उपविषय आहेत. त्यात भाजणं (बेकींग) पासून ते अंड्यापर्यंत आणि चिकन पासून ते मांसापर्यंत विभागणी आहे. अंडी ह्या एका उपविषयावर १३० तर भाज्यांवर ५७६ व्हिडीओ आपण पाहू शकतो. एग करी असो की एग भुर्जी असो, उकडलेलं अंडं असो की आम्लेट असो ते कुणी ना कुणी प्रत्यक्ष केलं आहे, ते करतानाचं छान शुटींग केलं आहे, आणि ती व्हिडीओ क्लीप आपल्याला इंटरनेटवर मोफत दिली आहे. भाज्या आणि अंडी वगळता वेगवेगळ्या प्रकारची सॉसेस, मसाले, पिझा, पास्ता, फळं, ज्युसेस, फिश, सुप्स वगैरे रेलचेल ह्या प्रकारात दिसून येते.
कौटुंबिक विषयातही ही साईट मागे नाही. एकूण ७१७ व्हिडीओज तिथे आहेत. त्यात नुकत्याच जन्मलेल्या बाळाच्या काळजीपासून ते ज्येष्ठ नागरिकांच्या शुश्रुषेपर्यंत अनेक गोष्टी आहेत. बाळंतपणापासून ते पालकत्वापर्यंतचे अनेक मुद्दे स्वतंत्र चित्रफितींतून आले आहेत.
वर मी फक्त महिलांशी संबंधित विषयांची झलक दिली आहे. पण महिलांबरोबरच पुरूषांसाठीही ते सारखेच महत्वाचे आहेत. स्वयंपाकघर आणि सौंदर्य हे आणि तत्सम विषय आता दोघांसाठीही सारखेच महत्वाचे आहेत.
इतर अनेक विषय
ह्या साईटवर सॉफ्टवेअर विषयक २६३२ व्हिडीओ आहेत. एमएस ऑफिस पासून ते फोटोशॉपपर्यंत आणि फ्लॅशपासून ते फाईलमेकर पर्यंत अनेकांची हाताळणी त्यात झालेली आहे. केवळ हार्डवेअर व तत्सम विषयक ८७० व्हिडीओंचा संग्रह इथे पहायला मिळतो. त्याखेरीज इलेक्ट्रॉनिक विषयाला वाहिलेल्या वेगळ्या ७३१ क्लीप्सही त्यात आहेत. यातील अनेक व्हिडीओ क्लीप्स विद्यार्थ्यांसाठीही खूप उपयुक्त आहेत.
डाएट आणि आरोग्य ह्या विषयावरील ११७०, नृत्यविषयक ४५१, विविध कलाविषयक ११०३, एक हजारांहून अधिक जादूचे प्रयोग, पाळीव प्राणी विषयक ६४२ वगैरे विषयांची यादी खरच न संपणारी आहे. ही साईट सापडल्यानंतर पुढले कितीतरी आठवडे यातले अनेक दर्जेदार व्हिडीओ पाहण्यात मी घालवले. इथे ९०००० व्हिडीओ आहेत असा ह्या साईटचा दावा आहे. तो खरा असेलही किंवा नसेलही. पण एक मात्र नक्की की विविध विषयांवरच्या उपयुक्त अशा व्हिडीओ क्लीप्सचा खजिना तिथे आहे. तुम्हाला यांतून एखादा विशिष्ट विषय शोधायचा असेल तर 'सर्च' ची सोय त्यात आहे. पण त्याही पलिकडे एकूण ५०० व्हिडीओ ह्या साईटने टॉप म्हणून निवडूनही दिले आहेत. त्यावर नजर टाकली तरी आपले डोळे दिपून जातात.
ही साईट अमेरिकन ढंगाची आहे. तेथील संस्कृतीचे प्रतिबिंब त्यात पुरेपूर पडलेले दिसते यात शंकाच नाही. म्हणूनच डिशवॉशर कसे वापरावेत, कसे मेंटेन करावेत वगैरे आपल्याला कदाचित अपरिचित वाटणारे व्हिडीओ त्यात दिसतात. मात्र आपल्याला उपयुक्त अशा शेकडो क्लीप्स त्यात असल्यानेच ह्या साईटला 'एंटर' मध्ये स्थान दिले.
कुठून येतात हे व्हिडीओ?
हा प्रश्न आपल्यापुढे येणं हे स्वाभाविक आहे. हे सारं प्रचंड काम कुणा एका माणसाचं खचितच नाही. खरं तर हे सारं हजारो माणसांचं मिळून झालेलं श्रमदान आहे.तुम्हीही त्यात सामील होऊ शकता. इंटरनेटवर मुशाफिरी करताना उद्या तुम्हाला एखादा हाऊ टू प्रकारातला व्हिडीओ दिसला (आणि तो मोफत असला) तर तुम्हीही तो ह्या साईटवर सबमिट करू शकता. मात्र तुम्ही कोणताही व्हिडीओ सबमिट करून चालणार नाही. तो हाऊ टू ह्या प्रकारातला असणं आवश्यक आहे.
जसजसे आपण ह्या वेबसाईटच्या अंतरंगात घुसत जातो तसतशी ही वेबसाईट एखाद्या ज्ञानकोशासारखी भासू लागते. हा ज्ञानकोश अनेक चित्रफित निर्मात्यांनी मिळून तयार केलेला आहे. अशा प्रकारचे काम हे इंटरनेटच्या माध्यमातूनच होऊ शकते. हे माध्यम अशा साईटस तयार करून वापरण्यासाठीचा प्रचंड आवाका इंग्रजीप्रमाणे आता मराठीसाठीही खुला आहे. आपण त्याचा लाभ कसा घेतो यावरच मराठीचे इंटरनेटवरील भवितव्य काय असेल हे ठरेल.
ताजमहालची माहिती देणारी उत्तम साईट
http://www.pbs.org/treasuresoftheworld/taj_mahal/tmain.html
ताजमहालची माहिती देणारी उत्तम साईट. अमेरिकेच्या सुप्रसिद्ध पब्लीक ब्रॉडकास्टींग सर्व्हीसच्या साईटमधील हा एक भाग. माहिती विश्वासार्ह आणि मांडणी उत्तम.ताजमहालच्या सर्व बाजू पुढे आणणारी ही साईट.

जगातल्या वृत्तपत्रांचा इतिहास
http://newspapers.bl.uk/blcs/start.do
हा जगातल्या वृत्तपत्रांचा इतिहास. ही साईट ब्रिटीश लायब्ररीची. म्हणजे विश्वासार्ह. त्यांनी परिश्रमपूर्वक जमवलेल्या ज्ञानातून हा इतिहास मांडला गेला आहे. त्यामुळेत्याला अनन्यसाधारण महत्व आहे.

इतिहास सॅंडविचचा
http://whatscookingamerica.net/History/SandwichHistory.htm
हा इतिहास सॅंडविचचा. मूळात सॅंडविच हा शब्द नव्हता तेव्हाही सॅंडविच होतेच म्हणे. मग नेमका हा शब्द कधी आला. पहिले सॅंडविच कुठे बनले, कोणी बनवले वगैरे रंजक माहिती इथे आहे.

रशियन दारू व्होडकाचा माहिती कोश
http://www.vodkamuseum.ru/english/home/
व्होडका ही रशियन दारू. व्होडा ह्या शब्दाचा अर्थ पाणी. त्यावरून व्होडका आला असावा असा अंदाज मांडला जातो. ह्या व्होडकाचा गेल्या चार शतकांचा रंजक आणि सचित्र इतिहास इथे वाचायला मिळतो.

जगातल्या टेलिफोन डिरेक्टरीज इथे एकत्र उपलब्ध
http://www.argali.com/
Time मॅगझीनने २००६ सालातल्या ज्या ५० उत्तम वेबसाईटस निवडल्या, त्यातली ही एक. जगातल्या टेलिफोन डिरेक्टरीज त्यात आहेत. एकाच वेळी अनेक डिरेक्टरीजचा शोध घेण्यासाठी एक सॉफ्टवेअर इथे मोफत उपलब्ध आहे. Time Magazine ची निवड अचूक आहे यात शंका नाही

बातम्यांचं सर्च इंजिन
http://www.topix.net/
बातम्या पटापट शोधून देणारं हेही एक सर्च इंजिनच. बातम्यांना वाहिलेलं आणि भौगोलिक दृष्ट्या बातम्यांचा शोध उत्तमरित्या घेण्याची सोय इथे आहे. मी Indiaअसं टाईप करून शोध घेतला. जे पान पुढे आलं त्यावर सर्वांत वर वाक्य होतं -
India News
News on India continually updated from thousands of sources around the net.
ह्या वाक्याला जागून मिनीटा मिनीटाला इथे बातम्या येऊन पडत असतात. खरोखरीच ही एक उपयुक्त साईट आहे. ज्यांना बातम्यांमध्ये रस आहे, त्यांनी अवश्य बुकमार्क करावी.

वैशिष्ट्यपूर्ण सर्च इंजिन
http://www.kosmix.com/
हे खरं तर एक वैशिष्ट्यपूर्ण सर्च इंजिन आहे. अत्यंत उपयुक्तही आहे. गुगलच्या प्रचंड ढिगार्यातून टाचणी शोधत बसण्यापेक्षा इथे जावं. हवी ती टाचणी पटकन मिळण्याची शक्यता इथे जास्त. Auto, Travel, Health, Finance, Politics आणि Video Games हे विभाग इथे आहेत. ह्या विभागाच्या अंतर्गत माहितीची मांडणी नेटकेपणाने करण्यांत आली असल्याने हे त्या विशिष्ट विषयांचे अत्यंत सोयीस्कर असे सर्च इंजिन बनले आहे.

इंटरनेटचा समाजावरील परिणामाचा अभ्यास
http://www.pewinternet.org/
एक अप्रतिम साईट. इंटरनेटचा अमेरिकन समाजावर काय परिणाम होतो याचा नियमित अभ्यास करून शेकडो अहवाल (भरपूर आंकडेवारीसह) इथे उपलब्ध करण्यांत आले आहेत. येथील माहिती अत्यंत विश्वासार्ह आहे. जुलै २००६ साली अमेरिकेतील ब्लॉगर्स जगताचे चित्र रंगवणारा अत्यंत रंजक पण प्रत्यक्ष संशोधनांती तयार झालेला अहवाल वाचण्यासारखा आहे. बुकमार्क करावी अशी ही साईट आहे.

दुर्मिळ पुस्तकांचे भांडार..
http://www.rarebookroom.org/
एक शैक्षणिक साईट. ओक्टाव्हो ह्या कंपनीने जगभरातील दुर्मिळ पुस्तकांचा मागोवा घेतला आणि त्या पुस्तकातील प्रत्येक पानाचे छायाचित्र घेतले. ही छायाचित्रे अत्यंत हाय रिझोल्युशनची आहेत. एका पानाचा आकार २०० एम.बी. पर्यंत गेल्याची माहिती ही साईट पुरवते. १४५५ साली गटेनबर्गने छापलेलं बायबल आपल्याला इथे पहायला मिळतं. गॅलिलीओ, केप्लर, आईनस्टाईन, न्युटन, कोपर्निकस, डार्विन वगैरे शास्त्रज्ञांची पुस्तके इथे आहेत. लक्षात घ्या की ही प्रत्यक्ष पुस्तकाची (पानापानांची) छायाचित्रे आहेत. दुर्मिळ पुस्तक प्रत्यक्ष पाहिल्याचा आनंद इथे मिळतो.

जुनी सॉफ्टवेअर्स इथे मिळतात...
http://www.oldapps.com/
साईटच्या नावाप्रमाणेच इथे जुने प्रोग्राम्स आहेत. एकूण १८९ प्रोग्राम्सची २२६८ जुन्या आवृत्त्या इथे उपलब्ध आहेत. ह्या साईटचा समावेश इथे अशासाठी केला की ही चाकोरीबाहेरची साईट आहे. काही वेळा विद्यार्थ्यांना वा अभ्यासकांना जुने प्रोग्राम्स लागतात. ते इथे मिळण्याची शक्यता आहे.

संस्कृत ग्रंथांचे संदर्भ भांडार
http://sanskritdocuments.org/marathi/
एका मोठ्या साईटचा हा महत्वपूर्ण विभाग. मराठी भाषेतील पुस्तके आणि इतर साहित्याचा. संपूर्ण ज्ञानेश्वरी, संपूर्ण दासबोध, हरिपाठ, मनाचे श्लोक ह्या धार्मिकग्रंथांव्यतिरिक्त मराठीशी संबंधित अनेक उपयुक्त लिंक्स इथे आहेत. मूळ sanskritdocuments.org ही साईट तर प्रचंड संदर्भ साहित्याने भरलेली आहे. आपल्यायादीत ह्या साईटस हव्यातच.

पौराणिक बाबींचा प्रचंड ज्ञानकोश
http://www.pantheon.org/
पौराणिक बाबींचा प्रचंड ज्ञानकोश. Encyclopedia Mythica म्हणून त्याचे इंटरनेटवरील स्थान अद्वितीय आहे. ७००० हून अधिक लेख ह्या ज्ञानकोशात असल्याचा ह्या साईटचा दावा आहे. हिंदू पौराणिक विभागात ३३० लेख आहेत. त्याची लिंक http://www.pantheon.org/areas/mythology/asia/hindu/articles.html ही आहे. कायम बुकमार्क करावी अशी ही साईट आहे.

विविध प्रकारचे ग्राफपेपर्स प्रिंट करण्यासाठी येथे उपलब्ध
http://incompetech.com/graphpaper/
विविध प्रकारचे ग्राफपेपर्स प्रिंट करण्यासाठी येथे उपलब्ध आहेत. एक वैशिष्ट्यपूर्ण सेवा म्हणून ह्या साईटला इथे स्थान दिले आहे. तुम्हाला हवा त्या प्रकारचा ग्राफ पेपर हव्या त्या रंगात, हव्या त्या आकारात (ए-४, ए-३ वगैरे) इथे मिळू शकतो.

तुमच्या पुस्तकांचा डेटाबेस इंटरनेटवर ठेवण्याची सोय..
http://www.goodreads.com/
गेल्या आठवड्यात librarything.com ही उत्तम साईट दिली होती. त्यावर तुमच्या पुस्तकांचा डेटाबेस ठेवण्याची सोय आहे. पण त्याला २०० पुस्तकांची मर्यादा आहे. त्यापुढे ही साईट फी आकारते. ज्यांना २०० हून अधिक पुस्तकांचा डेटाबेस ठेवायचा आहे त्यांचेसाठी ही साईट आहे

बीबीसी ची इंग्रजी शिकण्यासाठीची उत्तम साईट
इंग्रजी सुधारलं पाहिजे ही आपली गरज निश्चितच असते.
अशा स्थितीत आपल्या सर्वांच्या मोफत आणि उत्तम मदतीला येते बीबीसीची इंग्रजी शिकविणारी वेबसाईट.
तिचा पत्ता आहेः
. साईटचा हा एवढा मोठा पत्ता लक्षात ठेवायला अवघड जात असेल तर त्यासाठी एक युक्ती आहे. तीन शब्द फक्त लक्षात ठेवा - बीबीसी, लर्निंग आणि इंग्लीश हे ते तीन शब्द. म्हणजेच - www.bbclearningenglish.com ही साईट फक्त लक्षात ठेवलीत तरी चालेल.
बीबीसीची ही सेवा संपूर्ण जगासाठी आहे. पण भारतातल्या आपल्या सारख्यांना, अगदी विशेषतः आपणा मराठी जनांसाठी तर ती खूपच उपयुक्त आहे.
ह्या वेबसाईटवर ऑडिओ, व्हिडिओ आणि ताज्या बातम्यांचा वाचनीय मजकूर अशा तिन्ही माध्यमांचा इंग्रजी शिकण्याच्या दृष्टीने अप्रतिम उपयोग केला आहे.तुमच्यापुढे एक एक ताजी बातमी वाचण्यासाठी दिसते. त्या बातमीच्या मजकूरात जे इंग्रजी शब्द असतात त्यांचे नेमके अर्थ, त्यांचे उच्चार वेगळे काढून समजावून दिलेले असतात. बातमी संपूर्ण वाचून दाखविली जाते. त्यामुळे उच्चार कसे असावेत हे आपल्या लक्षात येतं. बातमीचा संदर्भ लक्षात असल्याने आपल्याला अर्थ आणि उच्चार दोन्ही आपोआपच लक्षात राहण्यासाठी मदत होते. हे सगळं आपण संगणकावर बसून कोणतीही वही किंवा पुस्तक न घेता शिकतो. व्याकरणाचा एक स्वतंत्र विभाग ह्या साईटवर आहे. पण तो विभाग नेहमीच्या पुस्तकात जसा कंटाळवाणा वाटतो, तसं इथे होत नाही. ताजी बातमी वाचल्याने आपल्या ज्ञानातही एकीकडे भर पडत असते. थोडक्यात इंग्रजीत व्हॅल्यू फॉर मनी म्हंटलं जातं तसं इथे व्हॅल्यू फॉर अवर टाईम असं नक्कीच म्हणता येईल.
यातली कोडी सोपी आहेत. योग्य त्या उत्तरावर क्लीक करा. नंतर उत्तर बरोबर की चुकलं ते पहाण्याची सोय आहे तिथे पहा. उत्तर बरोबर असेल तर हिरव्या रंगात स्पष्टीकरण दिसेल. चुकलं तर ती चूक लाल रंगात दिसली तरी ती समजावून दिली जाईल. यामुळे जे चुकलं तेच समजावलं जातं. याचा खूपच उपयोग होतो.शब्दकोडी नेहमीच्या आपल्या शब्दकोड्यांसारखीच असतात. पण शब्द मिळत नसेल तर एखाद-दुसर्या अक्षराचा क्लू देण्याची सोय असल्याने आपण त्यात रमतो,आणि मनोरंजन होत होत इंग्रजी शिकतो.
ह्यात सहा मिनिटांची एक चर्चा आपल्याला ऐकायला मिळते. चर्चेत अर्थात शिकायलाही मिळतं. उदाहरणार्थ मोबाईल फोन ह्या विषयावरची चर्चा घ्या. चर्चा सुरू होण्यापूर्वी आपल्याला एक प्रश्न वाचायला मिळतो. ब्रिटनमध्ये (आणि भारतात सुद्धा) मोबाईल फोन असं म्हंटलं जातं. तर कॅनडा आणि अमेरिकेत त्याला वेगळे नाव सर्रास दिले जाते. ते नेमके कोणते. तीन पर्याय आहेतः एक सेल फोन. दुसरा सेल्युलर फोन. तिसरा सी फोन. आता ह्या तीन पर्यायातलं नेमकं उत्तर कोणतं, तर ते आपल्याला सहा मिनिटांची चर्चा ऐकताना त्या चर्चेतच मिळेल. ही चर्चा करणारेही वेगवेगळ्या देशांतील इंग्रजी शिकणारेच असतात. स्त्री पुरूष दोघेही. त्यांचे बरोबर एक शिक्षक असतो. तो त्यांना समजावून सांगत असतो. चर्चा चालू असते. विद्यार्थी चुकतात. शिक्षक त्यांची चूक सुधारून सांगतो. म्हणजे ही चर्चा कानावर पडता पडता आपण एकीकडे उच्चार पक्के करतो. दुसरीकडे त्या सहा मिनिटांत काही नवंही शिकतो. ही चर्चा साऊंड फाईल म्हणून किंवा वाचायला पीडीएफ फाईल म्हणून डाऊनलोडही करता येते. किंवा डाऊनलोड न करता थेट वेबसाईटवरच स्ट्रीमिंग ऑडिओ म्हणून लगेच ऐकताही येते.
विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकविण्यासाठी वेगवेगळे लेसन प्लॅन्सही ह्या साईटवर उपलब्ध करण्यांत आले आहेत. त्या बरोबर लागणारं ऑडिओ-व्हिज्युअल साहित्यही त्या सोबत देण्यांत आलं आहे. बीबीसीसारख्या संस्थेने ते उपलब्ध केलेले असल्याने त्यांचा किमान दर्जा हा विशिष्ट उंचीचा असणार हे गृहित धरता येतं. शाळा किंवा सेवाभावी संस्थांतील शिक्षकांना हे लेसन प्लॅन्स निश्चितच उपयोगी पडतील.
आजही इंटरनेटवर उत्तम दर्जाचं आणि विश्वासार्ह शैक्षणिक साहित्य मोफत उपलब्ध आहे का, अशा प्रश्नाला होकारार्थी उत्तर देता येतं ते ह्या अशा वेबसाईटच्या अस्तित्वामुळेच.
बीबीसीची ही सेवा संपूर्ण जगासाठी आहे. पण भारतातल्या आपल्या सारख्यांना, अगदी विशेषतः आपणा मराठी जनांसाठी तर ती खूपच उपयुक्त आहे.
व्याकरण, उच्चार आणि शब्दसंपत्तीवर खास पण सोपा फोकस
इंग्रजीची कोडी आणि शब्दकोडी - मनोरंजनातून इंग्रजी
सिक्स मिनीट इंग्लीश नावाचे सदर
शिक्षकांसाठीही लेसन प्लान्स
आजही इंटरनेटवर उत्तम दर्जाचं आणि विश्वासार्ह शैक्षणिक साहित्य मोफत उपलब्ध आहे का, अशा प्रश्नाला होकारार्थी उत्तर देता येतं ते ह्या अशा वेबसाईटच्या अस्तित्वामुळेच.
जगातील सर्व देशांच्या सत्ताधीशांचे तयार (आणि अद्ययावत) संदर्भ
rulers.org ही वेबसाईट म्हणजे राजकीय संदर्भांच्या दृष्टीने एक खजिना आहे. rulers.org ही सातत्याने आणि त्वरेने अपडेट होणारी वेबसाईट आहे. सातत्य आणि त्वरा यांच्या जोडीला विश्वासार्हता असणं आवश्यक असतं. मी गेली सात आठ वर्षे ही साईट वारंवार पाहतो आहे. भारताच्या संदर्भातल्या यातल्या नोंदींमध्ये मला क्वचित एखादी स्पेलींगची चूक वगळता कसलीही गल्लत आढळली नाही. थोडक्यात rulers.org ला आपण एक विश्वासार्ह वेबसाईट असं लेबल चिकटवू शकतो. महाराष्ट्राच्या दृष्टीने उपयुक्त असलेली खाली दिलेली माहिती पहा. अमराठींनाही ह्या संदर्भांचा उपयोग व्हावा या हेतूने ती इंग्रजीत दिली आहे.
Maharashtra
15 Aug 1947 Bombay province 26 Jan 1950 state (until 1956: Part A) 1 May 1960 divided into Maharashtra and Gujarat Governors 15 Aug 1947 - 6 Jan 1948 David John Colville, Baron Clydesmuir (b. 1894 - d. 1954) Jan 1948 - 30 May 1952 Raja Maharaj Singh (b. 1878 - d. 1959) 30 May 1952 - 5 Dec 1954 Sir Girja Shankar Bajpai (b. 1891 - d. 1954) 5 Dec 1954 - 1 Mar 1955 Mangaldas Mancharam Pakvasa (1st time) (b. 1882 - d. 19...) 1 Mar 1955 - 14 Oct 1956 Harekrushna Mahatab (b. 1899 - d. 1987) 14 Oct 1956 - 10 Dec 1956 Mohomedali Currim Chagla (b. 1900 - d. 1981) 10 Dec 1956 - 16 Apr 1962 Sri Prakasa (b. 1890 - d. 1971) 16 Apr 1962 - 6 Oct 1962 P. Subbarayan (b. 1889 - d. 1963) 6 Oct 1962 - 5 Dec 1962 H.K. Chainani (1st time) (b. 1904 - d. ...) 5 Dec 1962 - 5 Sep 1963 Vijaya Lakshmi Pandit (f) (1st time) (b. 1900 - d. 1990) 5 Sep 1963 - 18 Dec 1963 H.K. Chainani (2nd time) (s.a.) 18 Dec 1963 - 8 Oct 1964 Vijaya Lakshmi Pandit (f) (2nd time) (s.a.) 8 Oct 1964 - 14 Nov 1964 Mangaldas Mancharam Pakvasa (2nd time) (s.a.) 14 Nov 1964 - 9 Nov 1969 P.V. Cherian (b. 1893 - d. 1969) 9 Nov 1969 - 26 Feb 1970 S.P. Kotval 26 Feb 1970 - 11 Dec 1976 Ali Yavar Jung Bahadur (b. 1905 - d. 1976) 12 Dec 1976 - 30 Apr 1977 R.M. Kantawala (b. 1916) 30 Apr 1977 - 3 Nov 1980 Sadiq Ali (b. 1910 - d. 2001) 3 Nov 1980 - 5 Feb 1982 Om Prakash Mehra (b. 1919) 6 Mar 1982 - 18 Apr 1985 Idris Hasan Latif (b. 1923) 18 Apr 1985 - 30 May 1985 K. Madhava Reddy (b. 1923 - d. 199...) 30 May 1985 - 3 Apr 1986 Kona Prabhakara Rao (b. 1916 - d. 19...) 3 Apr 1986 - 3 Sep 1987 Shankar Dayal Sharma (b. 1918 - d. 1999) 3 Sep 1987 - 6 Nov 1987 S.K. Desai 6 Nov 1987 - 20 Feb 1988 Chittatosh Mookerjee (b. 1929) 20 Feb 1988 - 15 Feb 1989 Kasu Brahmananda Reddy (b. 1909 - d. 1994) 15 Feb 1989 - 12 Jan 1993 Chidambaram Subramaniam (b. 1910 - d. 2000) 12 Jan 1993 - 13 Jul 2002 P.C. Alexander (b. 1921) 13 Jul 2002 - 10 Oct 2002 C.K. Thakkar (acting) (b. 1943) 10 Oct 2002 - 6 Dec 2004 Mohammed Fazal (b. 1922) 6 Dec 2004 - 9 Mar 2008 S.M. Krishna (b. 1932) 9 Mar 2008 - 22 Jan 2010 S.C. Jamir (b. 1931) 22 Jan 2010 - K. Sankaranarayanan (b. 1932)
Chief ministers 15 Aug 1947 - 21 Apr 1952 Bal Gangadhar Kher (b. 1888 - d. 1957) 21 Apr 1952 - 1 Nov 1956 Morarji Desai (b. 1896 - d. 1995) 1 Nov 1956 - 19 Nov 1962 Yashwantrao Balwantrao Chavan (b. 1913 - d. 1984) 19 Nov 1962 - 25 Nov 1963 Marotrao Sambashio Kannamwar (b. ... - d. 1963) 5 Dec 1963 - 20 Feb 1975 Vasantrao Phulsing Naik (b. 1913 - d. ...) 20 Feb 1975 - 1 Apr 1977 Shankarrao Chavan (1st time) (b. 1920 - d. 2004) 1 Apr 1977 - 18 Jul 1978 Vasantrao Patil (1st time) (b. 1917 - d. 1989) 18 Jul 1978 - 9 Jun 1980 Sharad Pawar (1st time) (b. 1940) 9 Jun 1980 - 20 Jan 1982 A.R. Antulay (b. 1929) 20 Jan 1982 - 2 Feb 1983 Babasaheb Bhosale (b. 1921 - d. 2007) 2 Feb 1983 - 2 Jun 1985 Vasantrao Patil (2nd time) (s.a.) 2 Jun 1985 - 13 Mar 1986 Shivajirao Patil Nilangekar (b. 1931) 13 Mar 1986 - 24 Jun 1988 Shankarrao Chavan (2nd time) (s.a.) 25 Jun 1988 - 25 Jun 1991 Sharad Pawar (2nd time) (s.a.) 25 Jun 1991 - 6 Mar 1993 Sudhakarrao Naik (b. 1934 - d. 2001) 6 Mar 1993 - 14 Mar 1995 Sharad Pawar (3rd time) (s.a.) 14 Mar 1995 - 1 Feb 1999 Manohar Joshi (b. 1937) 1 Feb 1999 - 18 Oct 1999 Narayan Rane (b. 1952) 18 Oct 1999 - 18 Jan 2003 Vilasrao Deshmukh (1st time) (b. 1945) 18 Jan 2003 - 1 Nov 2004 Sushil Kumar Shinde (b. 1941) 1 Nov 2004 - 8 Dec 2008 Vilasrao Deshmukh (2nd time) (s.a.) 8 Dec 2008 - 11 Nov 2010 Ashok Chavan (b. 1958) 11 Nov 2010 - Prithviraj Chavan (b. 1946)
वैद्यकीय माहितीचा खजिना, रूग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी
http://www.webmd.com/
रूग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना उपयोगी पडेल अशी माहिती देणारी ही साईट. विविध प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या (A ते Z याप्रमाणे अक्षरशः शेकड्याच्या संख्येने), अलर्जीपासून ते योगा आणि एक्स-रे पर्यंत माहितीचा खजिना इथे आहे.

MIT (USA) चे विविध विषयांवरचे मोफत कोर्सेस
http://ocw.mit.edu/index.html
अमेरिकेतील सुप्रसिद्ध Massachusetts Institute of Technology ची Open Courseware ची विद्यार्थीवर्गासाठी अतिशय उपयुक्त अशी साईट. किती विषयांवरचे मोफत कोर्सेस (आणि त्या संदर्भातील नोटस, लेसन्स वगैरे) इथे उपलब्ध आहेत पहाः
Aeronautics and Astronautics
Anthropology
Architecture
Athletics, Physical Education and Recreation
Biological Engineering
Biology
Brain and Cognitive Sciences
Chemical Engineering
Chemistry
Civil and Environmental Engineering
Comparative Media Studies
Earth, Atmospheric, and Planetary Sciences
Economics
Electrical Engineering and Computer Science
Engineering Systems Division
Experimental Study Group
Foreign Languages and Literatures
Health Sciences and Technology
History
Linguistics and Philosophy
Literature
Materials Science and Engineering
Mathematics
Mechanical Engineering
Media Arts and Sciences
Music and Theater Arts
Nuclear Science and Engineering
Physics
Political Science
Science, Technology, and Society
Sloan School of Management
Special Programs
Urban Studies and Planning
Women's Studies
Writing and Humanistic Studies
मला वाटतं एवढी प्रस्तावना ह्या साईटची महती कळायला पुरेशी आहे.

उपुयुक्त सर्च इंजिन
http://www.g2p.org/
गुगलवर आधारित हे सर्च इंजिन आहे. गाणी (MP3), म्युझिक अल्बम्स, Ebooks, Ringtones, Software वगैरे नेमकं शोधण्याची वैशिष्ट्यपूर्ण सोय इथे आहे.

अडीच लाख छायाचित्रे (हंगेरी देशातील साईट)
http://www.sxc.hu/
हंगेरी देशातली साईट. २,५०,००० हून अधिक मोफत (आणि उत्तम दर्जाची) छायाचित्रे डाऊनलोडींग साठी देणारी. अतिशय High Resolution असलेली ही छायाचित्रे खरोखरीच प्रेक्षणीय आहेत. विविध विषयांवरील छायाचित्रांचे वर्गीकरण करण्यांत आले आहे. मोफत रजिस्ट्रेशन करणे आवश्यक असले तरी त्याचे चीज करणारी ही साईट आहे.

प्रचंड फाँटस..
http://www.urbanfonts.com/
अप्रतिम आणि विविध विषयांवरचे Dingbat Fonts (मोफत अर्थातच) हे ह्या साईटचे वैशिष्ट्य. इतर उत्तम फॉंटसचा खजिनाही सोबत आहेच. फॉंटप्रेमींना प्रभावित करेल अशी साईट

नवोदित वेब डिझायनर्स साठी विशेष उपयुक्त साईट
http://www.webdesignfromscratch.com/
वेब डिझायनर्ससाठी कायम संदर्भाची साईट. तसेच ज्यांना वेब डिझायनिंग अगदी पहिल्यापासून शिकायचं आहे त्यांच्यासाठीही ही उत्तम सोय आहे. Web 2.0 सह खूपच महत्वाची आणि अद्यावत माहिती देणारी ही साईट अतिशय विश्वासार्ह मानली जाते.

शेकडो उपयुक्त ट्युटोरियल्स, प्रॅक्टीकल्स, व्हिडिओ सहित..
http://www.instructables.com/
स्वतःचे केस कसे कापावेत पासून ते आपल्या LCD मॉनिटरचा उपयोग टीव्ही सेट म्हणून कसा करावा इथपर्यंत अक्षरशः शेकडो कृतींचा ज्ञानकोश म्हणजे ही साईट. प्रत्यक्ष पाहणं ही एक कृती आपण केली की ही साईट आपल्यापुढे घरगुती कृतींपासून ते कॉंप्युटर टेक्नॉलॉजीपर्यंत सारं काही 'प्रॅक्टीकली' पेश करते.

तुमच्या पुस्तकांची यादी इथे ठेवा...
http://www.librarything.com/
एक जबरदस्त उपयुक्त साईट. Web 2.0 ची झलक दाखवणारी. Catalogue your books online असे ब्रीदवाक्य आपल्या पहिल्या पानावर मिरवणारी. आपल्या घरातील पुस्तकांची यादी ह्या साईटवर ठेवता येते. लेखक, नाव, प्रकार वगैरे निकषांवरून पुस्तकांचा त्वरित शोध घेण्याची सोय अर्थातच आहे. युनिकोड कॉंप्लायंट असल्याने मराठी पुस्तकांची यादी आणि त्यांचा शोधही इथे शक्य होतो. महत्वाची गोष्ट म्हणजे भाषांच्या यादीत 'मराठी' चा समावेशही आहे.

जगभरातील ५००० कंपन्यांचे लोगो (रशियन वेबसाईट)
http://www.logotypes.ru/
विविध (सुमारे ५०००) उत्पादनांचे, कंपन्यांचे, संस्थांचे लोगो (ब्रॅंडस) दाखवणारी ही रशियन साईट. वरील साईटप्रमाणेच इथे 'सर्च' ची सोय आहे.

जगभरातले ब्रँड नेम्स
http://www.brandsoftheworld.com/
टाटा पासून ते रिलायन्स पर्यंत, दूरदर्शन पासून ते जीवनबिमा पर्यंत देशातले आणि अमेरिकेतल्या कम्युनिस्ट पार्टीपासून ते ग्रीक फुटबॉल टीम पर्यंत परदेशातले सारे लोगो इथे मिळू शकतील. ते डाऊनलोड करण्याची सोयही इथे आहे. भारत सरकारचा 'थ्री लायन' (खरे तर ते चार सिंह आहेत) लोगो सुद्धा तेथे उपलब्ध आहे. जवळ जवळ, मनात आणाल तो लोगो इथे उपलब्ध असल्याने एक उत्तम संदर्भाची साईट म्हणून तिचा उल्लेख केला जातो. A पासून Z पर्यंत नावांप्रमाणे शोध घेता येईल किंवा 'सर्च इंजिन' ची सोयही लोगो शोधण्यासाठी करण्यांत आली आहे.

लायब्ररी ऑफ काँग्रेस मधील ज्ञान खजिना
http://lcweb2.loc.gov/frd/cs/intoc.html
ब्रिटीशांच्या बाबतीत असं म्हंटलं जातं की ते एकवेळ इंग्लंड देतील पण शेक्सपियर देणार नाहीत. तसं अमेरिकनांच्या बाबतीत आपल्याला असं म्हणता येईल की ते त्यांच्या लायब्ररी ऑफ कॉंग्रेसला कसलाही धक्का लागू देणार नाहीत. जगातील सर्वांत मोठे असलेले हे ग्रंथालय. अमेरिकन सरकार त्याला आपल्या लष्कराइतकच महत्व देते. ह्या ग्रंथालयाची www.loc.gov ही साईट म्हणजे अनेक वेगवेगळ्या विषयांच्या साईटसचं एक पोळंच आहे. इथे मी सुचवत असलेली साईट म्हणजे त्या पोळ्यातला एक छोटासा कप्पा. यात भारताची माहिती एकूण १० प्रकरणांमध्ये दिलेली आहे. अत्यंत विश्वासार्ह, मुद्देसूद आणि परिपूर्ण असं त्या प्रकरणांचं वर्णन करता येईल. खरं तर हा एक उत्तम संदर्भ ग्रंथ आहे. भारताचा इतिहास, यात सुरूवात हडप्पा आर्य संस्कृतीपासून होते आणि पुढे मौर्य, गुप्त, हर्ष होत होत मुघल,मराठा, शीख, ब्रिटीश, १८५७ चं बंड, स्वातंत्र्य संग्राम, स्वतंत्र भारत, नेहरू, इंदिरा गांधी ते राजीव गांधी इथपर्यंत सारं एकत्र वाचायला मिळतं.

पुढे दुसरं प्रकरण भारताच्या भूगोलाचं आहे. तिसरं धर्मासंबंधी तर चौथं भाषा, प्रदेश आणि वंशाच्या संदर्भातलं आहे. पाचव्यात जाती व ग्रामीण व्यवस्थेसह समाजशास्त्राचा भाग आहे.सहाव्यात अर्थव्यवस्था आहे. त्यात अर्थातच कामगार, आयात निर्यात, सरकारी धोरणं, उद्योग,जागतिकीकरण, खनिजे, पर्यटन, वाहतूक व संपर्क व्यवस्था असं सारं आहे. सातवं प्रकरण शेतीला वाहिलेलं आहे. जमिनी, बियाणं, खतं, हरित क्रांती, जंगलं, मासेमारी, शेतकी कर्जे वगैरेंचा तपशील आहे. आठव्या प्रकरणात सरकार आणि राजकारण आहे. त्यात, देशाची राज्यघटना,लोकसभा, राज्यसभा, सर्वोच्च न्यायालय, राजकीय पक्ष, हिंदू-मुस्लीम तणाव, पत्रकारिता व माध्यमांचे योगदान असे मुद्दे आहेत. नवव्या प्रकरणात, परराष्ट्र धोरण आणि परराष्ट्रांशी असलेले संबंध यांचा उहापोह आहे. दहावे प्रकरण अंतर्गत सुरक्षेला वाहिले आहे. त्यात पाकिस्तान, चीन, पंजाब, काश्मीर वगैरे मुद्दे तपशीलाने आलेले आहेत.
मूळातच अतिशय समृद्ध अशा माहितीचा हा खजिना आहे.

अफाट माहिती. आपल्या पृथ्वीबद्दलची.
http://www.space.com/scienceastronomy/101_earth_facts_030722-1.html
अफाट माहिती. आपल्या पृथ्वीबद्दलची. फक्त १०१ प्रश्नांच्या उत्तरातून अफाट ब्रम्हांड उलगडून दाखवलय. काही प्रश्नांची उत्तरे डोकं चक्रावून टाकणारी आहेत. हे काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे पहा-
जगातील सर्वांत कोरडी जागा कोणती?
- चिली देशातील अरिका प्रांतात दरवर्षी ०.०३ इंच पाऊस पडतो. ह्या पावसाच्या पाण्याने कॉफीचा कप भरायला ठेवला तर शंभर वर्षे लागतील.
जगातील सर्वांत ओली जागा कोणती?
-कोलंबियातील लोरो प्रांतात ५२३.६ इंच पाऊस दरवर्षी पडतो. २६ जुलै रोजी मुंबईत जो प्रचंड पाऊस झाला त्यावेळी सांताक्रुझ वेधशाळेने २४ तासात प्रचंड म्हणजे ३७ इंच पाऊस झाल्याची नोंद केली होती.
हे आणि असे आणखी ९९ प्रश्न व त्यांची उत्तरे ह्या साईटवर वाचा

नवोदित ब्लॉगर्ससाठी उत्तम साईट
http://www.problogger.net/archives/2006/02/14/blogging-for-beginners-2/
ब्लॉग म्हणजे नेमकं काय? ब्लॉगचा इतिहास वगैरे चांगली माहिती इथे आहे. ही साईट कदाचित तुम्हाला बुकमार्क करावीशी वाटेल.

गुगल पेजरँक म्हणजे काय?
http://www.smashingmagazine.com/2007/06/05/google-pagerank-what-do-we-really-know-about-it/
गुगल पेजरॅंक. एक महत्वाचा मुद्दा. पण गुगल पेजरॅंक म्हणजे नेमकं काय? बर्याच जणांना किंवा खरं तर बहुतेकांना ते माहीत नसतं. तुम्ही त्यापैकी एक आहात असं वाटत असेल तर हे पान वाचाच.

मोफत ईबुक्स इथे शोधा..
http://www.2020ok.com
ह्या साईटचं वर्णन Directory of FREE Online Books and FREE eBooks असं केलेलं आहे. आज हजारो ईबुक्स वेबवर सर्वत्र विखुरलेली आहेत. त्यांचे वर्गीकरण आणि त्यावर आधारित डिरेक्टरी 2020ok.com ने केली आहे. विस्तीर्ण साईट आहे. त्यात मुशाफिरी केल्याशिवाय त्याचे महत्व लक्षात येणार नाही.

पीडीएफ एडिट करायचीय? ही घ्या वेब ट्रीक.
परिस्थिती आणि पीडीएफ सांगून येत नाहीत म्हणतात. होतं असं की कुणीतरी पीडीएफ पाठवतं. आपल्याला ती वाचायची असते. वाचता वाचता त्यात दिसतात स्पेलींगच्या घोडचुका. आपल्याला मोह होतो. त्या तिथल्या तिथे सुधारण्याचा. पण पीडीएफ फाईल ती. एडिट करायची कशी? त्याला पीडीएफ एडिटर हवा. अक्रोबॅट हवा. आपल्याकडे पीडीएफ एडिटर नसेल किंवा काही कारणाने तो चालत नसेल तर?. करायचं काय? अशा परिस्थितीता उपयोगी पडणारी एक वेब साईट आहे. तिचं नाव आहे -
तिथे जाऊन आपली पीडीएफ फाईल अपलोड करायची. आपला ईमेल पत्ता द्यायचा. .doc मध्ये किंवा rtf मध्ये रूपांतरीत झालेली आपली पीडीएफ फाईल आपल्याला ईमेलने पाठविली जाते. मग रूपांतरीत झालेल्या त्या doc/rtf फाईलला आपल्या वर्डमध्ये किंवा ओपन ऑफिस मध्ये किंवा कोणत्याही वर्ड प्रोसेसरमध्ये उघडायचं आणि ती एडिट करायची. खटकलेली स्पेलींग्ज वगैरे सुधारायची आणि पुन्हा त्या वर्डची पीडीएफ करून घ्यायची.
सुप्रसिद्ध NITRO PDF ची ही सेवा आहे. पीडीएफ चं doc किंवा rtf रूपांतर अतिशय तंतोतंत होतं असा त्यांचा दावा आहे. आपल्याला अनुभव घ्यायला काहीच हरकत नाही. कारण ही सेवा मोफत आहे.

जीमेलच्या करामती
गेल्या वेळी आपण गुगलमध्ये माहिती शोधण्याचे काही तंत्र आणि मंत्र पाहिले. गुगलने जगाला उपलब्ध करून दिलेला 'सर्च' हा गुगलचे पायदळ किंवा आर्मी आहे असं म्हंटलं तर जीमेल ही गुगलने सर्वांना दिलेली ईमेल म्हणजे त्यांचा एअर फोर्स म्हणावा लागेल. गुगलचा सर्च आणि जीमेल ह्यात तुमच्या आमच्या बाबतीतलं साम्य हे की आपण ह्या दोन्हींचा उपयोग पारंपारिक पद्धतीने व मर्यादित चौकटीत करीत असतो. म्हणजे, जी माहिती पाहिजे त्या विषयीचे शब्द टाईप करून ढोबळ पद्धतीने माहिती शोधणे हा गुगल सर्चचा उपयोग; आणि ईमेल पाठवणे व आलेली ईमेल उघडून वाचणे हा जीमेलचा उपयोग. खरं तर ह्या मर्यादित चौकटीत आपली बरीचशी कामं होतही असतात. त्यामुळे आणखी खोलात जाण्याची आपल्याला तशी गरज नसते. गेल्या लेखात गुगल इमेज सर्च करताना त्याच्या अॅडव्हान्स्ड सर्च सुविधेचा उपयोग करून कृष्ण-धवल लाईन ड्रॉईंग्ज कशी शोधायची याची टीप अनेकांना आवडल्याच्या ईमेल मला भरपूर आल्या. गुगलने दिलेल्या सोयी वरकरणी दिसतात त्यापेक्षा आत खोलात जाऊन पाहिल्या तर त्याचे आणखी शेकडो उपयोग आहेत असं आपल्याला आढळतं. जीमेलची सोयही ह्या वस्तुस्थितीला अपवाद नाही.
गुगलची जीमेल आज आपल्याला जवळ जवळ ६ जीबी जागा मोफत देते. आपण जेव्हा जीमेलसाठी रजिस्टर करतो तेव्हा आपल्याला जीमेल डॉट कॉम ने शेवट होणारा ईमेल पत्ता मिळतो. xyz@gmail.com किंवा abc@gmail.com अशा प्रकारचे ईमेल पत्ते आपल्यापैकी हजारोंचे आहेत. पण त्या हजारोंपैकी फार कमी लोकांना हे माहीत आहे की ज्यावेळी आपल्याला gmail.com चा पत्ता मिळतो, त्याच वेळी गुगल आपल्याला आणखी एक ईमेल पत्ता देते. तो पत्ता असतोgooglemail.com चा. हे थोडं अधिक स्पष्ट करून सांगतो. समजा, तुमचा ईमेल पत्ता arun@gmail.com असा आहे. तर, त्याचा अर्थ गुगलने तुम्हालाarun@googlemail.com हा पत्ता तुम्ही न मागता gmail च्या जोडीने बहाल केलेला आहे. म्हणजे तुमच्याकडे गुगलच्या gmail.com आणि googlemail.com अशा दोन ईमेलच्या चाव्या आहेत. पण, तुम्ही वापरत असता तो फक्त gmail.com चा पत्ता. दुसरा googlemail.com चा पत्ता तुम्ही कधीच वापरत नाही. आपल्या उदाहरणाला चिकटून आपण थोडं आणखी पुढे जाऊ. समजा, तुमच्या arun@gmail.com ह्या ईमेल पत्त्याऐवजी तुमच्या मित्राने तुम्हाला arun@googlemail.comह्या पत्त्यावर ईमेल पाठवली, तर ती तुम्हाला कुठे मिळेल? ह्या प्रश्नाचं उत्तर सोपं आहे. पत्ते gmail.com आणि googlemail.com असे दोन वेगवेगळे दिलेले असले तरी तुमचं अकाउंट एकच असतं. म्हणजे दोन्ही पैकी कोणत्याही पत्त्यावर तुम्हाला ईमेल पाठवली तरी ती येऊन पडते तुमच्या नेहमीच्याच gmail.com च्या अकाऊंट मध्ये.
गुगलने दिलेल्या ईमेल जोडीचा हा मुद्दा आपल्या लक्षात आला. त्यानंतर मग दोन नवे प्रश्न आपल्या मनात डोकावू लागलेले असतात. जर अकाऊंट एकच आहे, तर मग गुगलने दोन ईमेल पत्ते का दिले? दुसरा प्रश्न, जर दोन्ही पत्त्यांच्या ईमेल एकाच अकाऊंटमध्ये येऊन पडणार आहेत, तर मग त्याचा नेमका उपयोग काय?
पहिल्या प्रश्नाचं उत्तर हे की एकाच ईमेल अकाऊंटसाठी दोन पत्ते देण्यामागे गुगलची एक तांत्रिक सोय आहे. जर्मनी आणि ब्रिटन (यु.के.) मध्ये जीमेल ह्या नावाची नोंदणी गुगलची जीमेल येण्यापूर्वी झाली असल्याच्या दाव्यामुळे ह्या दोन देशांमध्ये कायद्याच्या अडचणीमुळे gmail.com चे पत्ते गुगलला देता आले नव्हते. तेथे त्यांनी googlemail.com चे पत्ते वाटले आणि समस्या सोडवून टाकली. ह्या दुहेरी डावपेचातून मग gmail=googlemail आणि googlemail म्हणजेच gmail ही समीकरणे कायमची बनून गेली.
आता दुसर्या प्रश्नाचं उत्तर पाहू. एकच अकाऊंट आहे, पत्ते वेगवेगळे आहेत याचा उपयोग युक्तीने करणारी मंडळी काय करतात, पहा. हे लोक आपले कुटुंबिय आणि अगदी निवडक मंडळी यांना googlemail.com चा पत्ता देतात. इतर सर्वांना ते gmail.com चा पत्ता देतात. अशा Googlemail वरून आलेल्या मेल आणि gmailवरून आलेल्या मेल वेगळ्या काढणे वा वेगळ्या शोधणे त्यांना सहज शक्य होते. स्पॅम म्हणजे नको त्या लोकांच्या मेलला आळा घालण्यासाठीही काही जण ह्या युक्तीचा उपयोग करतात.
जीमेल पत्त्यात डॉट (.) चा उपयोगही फार खुबीने करता येतो. म्हणजे उदाहरणार्थ समजा तुमचा ईमेल पत्ता manmohansingh@gmail.com असा आहे. तर तुम्ही काही ठिकाणी तुमचा ईमेल पत्ता man.mohansingh@gmail.com असा देऊ शकता. किंवा आणखी काही जणांना तो manmohan.singh@gmail.com असाही देऊ शकता. किंवा अगदी पुढे जाऊन ma.n.mohansingh@gmail.com असाही किंवा m.a.n.mo.hansingh@gmail.com असाही आडवा तिडवा वाकवून देऊ शकता.तुमच्या नावात कुठेही आणि कितीही वेळा डॉट टाकला तरी ती मेल तुमच्या त्याच ईमेल अकाऊंटमध्ये येऊन पडत असते. काही जण अशा डॉटयुक्त ईमेल पत्त्यांचा उपयोग इंटरनेटवर मोफत रजिस्ट्रेशनसाठी वगैरे देण्यासाठी करतात.
दुसरी करामत + ह्या चिन्हाची. ही करामत समजून घेण्यासाठी आपण पूर्वीचा arun@gmail.com ह्या पत्त्याचा उपयोग करू. समजा ह्या अरूणसाहेबांना fun-karu.com नावाच्या अविश्वासार्ह वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर ते arun+ fun-karu@gmail.com असा पत्ता त्या साईटला देऊ शकतात. त्या साईटने त्या पत्त्यावर पाठवलेली मेल अरूणसाहेबांना मिळते ती arun@gmail.com ह्याच पत्त्यावर. तुम्हीही तुमच्या जीमेल पत्त्याच्या बाबतीत ह्या करामती करून पहा.अगदीच काही नाही तर टाईमपास किंवा करमणूक म्हणून हे करायला काहीच हरकत नाही.
ज्यांनी जीमेल पत्ते घेतले आहेत ती मंडळी जवळ जवळ रोजच जीमेलवर जातात आणि आपल्याला कोणत्या मेल आल्या आहेत हे पाहतात. आलेल्या मेलना उत्तर पाठवणं हेही तसं रोजचच काम असतं. ही कामं रोज करताना आपण आपल्या माऊसला प्रचंड फिरवतो. क्लीक वर क्लीक करकरून माऊसक्लीकचा पाऊस पाडतो. जीमेल वापरणारांनी जर माऊस वापरण्याऐवजी कीबोर्ड शॉर्टकटसचा उपयोग केला तर भरपूर वेळेची बचत साधता येईल. उदाहरणार्थ तुम्ही नुसतं C हे कीबोर्डवरचं बटण दाबा, तुमच्यासमोर मेल कंपोज करण्याची विंडो हात जोडून उभी राहील. एरवी तुम्ही माऊसवर हात नेणार, मग त्याला Compose Message वर नेणार, तेथे कर्सर टेकवून तुम्ही क्लीक करणार. मग तुमच्यापुढे ती मेल कंपोजची विंडो येणार. नुसतं C दाबून तुम्ही झपाझप कंपोज विंडोशी पोहोचू शकता. समजा तु्म्हाला त्वरित इन बॉक्स मध्ये जायचं आहे, तर तुम्ही फक्त g i म्हणजे प्रथम जी आणि नंतर आय दाबा. तुम्ही क्षणात इन बॉक्समध्ये पोहोचता. असे जीमेलचे बरेच आणि खूपच उपयुक्त कीबोर्ड शॉर्टकटस आहेत. त्यांची प्रिंटेबल लीस्ट http://r.evhead.com/hodgepodge/gmail-shortcuts.html इथे उपलब्ध आहे.
कीबोर्ड शॉर्टकटस बद्दल मी अगदी उत्साहाने सांगितलं म्हणून तुम्ही पटकन आपल्या जीमेल अकाऊंटवर जाऊन ते वापरू पहाल, आणि नेमकं होईल असं की C हे बटण चार वेळा दाबलं तरी जीमेलवर त्याचा काही ढिम्म परिणाम दिसत नाही. असं होण्याची दाट शक्यता आहे. कारण जीमेलचे कीबोर्ड शॉर्टकटस हे अॅक्टीव्हेट करावे लागतात. जर ते अॅक्टीव्हेट केले नाहीत तर ते अर्थातच उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे जर ते अॅक्टीव्हेट नसले तर प्रथम तुमच्या जीमेलच्या Settings मध्ये जाऊन ते अॅक्टीव्हेट करा, आणि नंतरच C दाबून Compose Message ला जाता येतय का हे तपासून पहा.
http://www.autohotkey.com/download/ ह्या पत्त्यावर जाऊन Autohotkey हे मोफत आणि आकाराने फारच छोटे असलेले सॉफ्टवेअर डाऊनलोड करून घ्या.समजा तुम्हाला दररोज तीन मेल अशी टाईप करावी लागतात की ज्यात Thank you for your mail हे शब्द हटकून असतात. तेच तेच शब्द तीन तीन चार चार वेळा टाईप करण्यापेक्षा तुम्ही फक्त TYFM इतकच टाईप केलत आणि तुम्हाला ते Thank you for your mail हे शब्द आपोआप टाईप करून मिळाले तर किती बहार येईल. Autohotkey हा प्रोग्राम त्यासाठीच आहे. याची सविस्तर माहिती http://lifehacker.com/software/keyboard-shortcuts/
hack-attack-knock-down-repetitive-email-with-autohotkey-159785.php ह्या पत्त्यावर जाऊन अवश्य घ्या. Autohotkey कशी वापरायची याचं मार्गदर्शन तिथे आहे.
ह्या Autohotkey सारख्या जीमेलच्या बाबतीतल्या तयार आणि मोफत प्रोग्राम्सच्या अनेक युक्त्या आज उपलब्ध आहेत. तो एक स्वतंत्र विषयच आहे. त्याबाबत पुन्हा केव्हातरी सविस्तर बोलू. आपल्याला आलेल्या जीमेलवरच्या मेलमधून नेमकी आपल्याला हवी ती मेल कशी शोधायची, याच्या टीप्स खुद्द गुगलनेच आपल्याला दिल्या आहेत. ज्यांचे लक्ष अजून त्याकडे गेलेले नाही त्यांचेसाठी त्यातल्या काही टीप्स इथे देतो.
अरूणरावांना आपल्या जीमेलच्या ढिगार्यातून रमेशरावांकडून आलेल्या मेल शोधायच्या आहेत. त्यांनी नुसतं रमेश म्हणून शोध घ्यायचा प्रयत्न केला तर त्यांचेकडून आलेल्या आणि त्यांना पाठवलेल्या दोन्ही ईमेलचं मिश्रण समोर येऊन गोंधळ होईल. त्यासाठी त्यांनी From: Ramesh असं करून शोध घ्यायला हवा. रमेशना पाठवलेल्या मेल शोधायच्या तर To: Ramesh असं देऊन शोधायला हवं. ज्या मेलना अटॅचमेंट आहेत अशा मेल शोधायच्या तर has:attachment असं म्हणून शोध घ्यायला हवा. विशिष्ट काळातील मेल शोधण्यासाठी after: किंवा before: असं म्हणून त्या हुडकायला हव्यात.
जीमेलची सोय मोफत असली तरी खूपच बहुगुणी आहे. त्या संदर्भातील खूपच माहिती अक्षरशः शेक़ड्याने इंटरनेटवर सगळीकडे विखुरलेली आहे. त्यातल्या फक्त चार-दोन मुद्यांकडेच फक्त मी तुमचं लक्ष इथे वेधलं आहे. ह्या लेखाचे प्रयोजन फक्त तुमचं लक्ष त्याकडे वेधणं इतकच आहे.
ईमेल जोडी

आणखी काही करामती

कीबोर्ड शॉर्टकटस्

तयार युक्त्या

मेलच्या ढिगार्यातून टाचणी शोधायची?
अरूणरावांना आपल्या जीमेलच्या ढिगार्यातून रमेशरावांकडून आलेल्या मेल शोधायच्या आहेत. त्यांनी नुसतं रमेश म्हणून शोध घ्यायचा प्रयत्न केला तर त्यांचेकडून आलेल्या आणि त्यांना पाठवलेल्या दोन्ही ईमेलचं मिश्रण समोर येऊन गोंधळ होईल. त्यासाठी त्यांनी From: Ramesh असं करून शोध घ्यायला हवा. रमेशना पाठवलेल्या मेल शोधायच्या तर To: Ramesh असं देऊन शोधायला हवं. ज्या मेलना अटॅचमेंट आहेत अशा मेल शोधायच्या तर has:attachment असं म्हणून शोध घ्यायला हवा. विशिष्ट काळातील मेल शोधण्यासाठी after: किंवा before: असं म्हणून त्या हुडकायला हव्यात.
जीमेलची सोय मोफत असली तरी खूपच बहुगुणी आहे. त्या संदर्भातील खूपच माहिती अक्षरशः शेक़ड्याने इंटरनेटवर सगळीकडे विखुरलेली आहे. त्यातल्या फक्त चार-दोन मुद्यांकडेच फक्त मी तुमचं लक्ष इथे वेधलं आहे. ह्या लेखाचे प्रयोजन फक्त तुमचं लक्ष त्याकडे वेधणं इतकच आहे.
गुगलः काही तंत्र, काही मंत्र
'गुगल' हा शब्द शब्दकोशात येऊन आता पावणे दोन वर्षे होत आली. अगदी पक्कं सांगायचं तर १५ जून २००६ रोजी ''ऑक्सफर्ड इंग्लीश डिक्शनरी'' ने to google हे नवे क्रियापद आपल्या शब्दकोशात सामावले.त्यानंतर पुढे महिन्याभरातच म्हणजे जुलै २००६ ह्या महिन्यात वेबस्टर डिक्शनरीनेही गुगल नावाच्या क्रियापदाची भर आपल्या शब्दकोशात टाकली. To google चा अर्थ वेबस्टरने दिला - ' to use the Google search engine to obtain information about (as a person) on the World Wide Web'. एका खाजगी कंपनीचे नाव दोन दांडग्या आणि जगन्मान्य शब्दकोशांनी व्यवहारातले एक क्रियापद म्हणून जेव्हा जगाला बहाल केले तेव्हा जगाने त्या बातमीकडे आ वासून पाहिले. एका कंपनीचे नाव जेव्हा इंग्रजीसारख्या भाषेतले एक क्रियापद बनते तेव्हा त्या कंपनीची लोकप्रियता काय असेल हे वेगळे सांगावे लागत नाही.
खरं तर 'गुगल' हा शब्द त्या कंपनीच्या नावापेक्षा लोकांना अधिक माहीत आहे तो महाजालावरचे एक 'सर्च इंजिन' म्हणून. इंटरनेटवर मुशाफिरी करणारी आपण मंडळी दिवसभरात 'गुगल' वर गेलो नाही असं फार क्वचित होत असेल. 'गुगल' वर जाऊन आपल्याला काय हवं ते शोधायचं ही सवय नेटकरांच्या अंगी इतकी भिणली आहे की त्या क्रियेवर क्रियापद म्हणूनच भाषेने शिक्का मारून टाकला आहे. खरं तर १९९८ साली म्हणजे फक्त १० वर्षांपूर्वी केवळ तीन माणसांनी एका गॅरेजमध्ये ह्या कंपनीची स्थापना केली. आज तीच कंपनी एक क्रियापद बनली यामागे फार मोठे कर्तृत्व अर्थातच आहे. कर्तृत्व म्हंटले की आपल्याला व्यक्तीचे कर्तृत्व दिसते. गुगलचे संस्थापक लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन यांचे कर्तृत्व कंपनीच्या यशामागे आहे याबद्दल कोणीही शंका घेणार नाही. पण 'गुगल' च्या यशामागे खरे कर्तृत्व म्हणायचे तर ते वेब तंत्रज्ञानाचे आहे.
वेबचे तंत्रज्ञान हे तुम्हा आम्हा सामान्यांसाठी एखाद्या मानस सरोवरासारखे आहे. त्याचा आवाका प्रचंड आहे आणि खोली अफाट आहे. 'गुगल' सारखे 'सर्च इंजिन'घ्या. आपण सामान्यपणे त्याचा वापर करतो तो असतो केवळ वर वरचा. आपण नजर टाकतो ती 'गुगल' च्या पहिल्या पानावर. तेथे जे शोधायचे ते टाईप करून आपण गुगल नेईल तिथे प्रवास करीत राहतो. हरवून जातो. तशा प्रकारे हरवता हरवता बहुधा आपल्याला हवे ते गवसलेलेही असते. गुगल सर्च इंजिनचा हा उपयोग पृथ्वीवरच्या जमिनीवर फक्त एखादी झोपडी बांधण्याइतका मर्यादित आहे असं म्हंटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. माहितीचा शोध हा गुगल नावाच्या अथांग महासागराचा फक्त एक किनारा तेवढा आहे. हा किनारा तुम्हा आम्हा पामरांसाठी अगदी पुरेसा असला तरी जगात आपल्यापेक्षा अधिक चतुर असे जे पामर आहेत ते ह्या महासागराचा उपयोग कसा करतात हे आपण निदान पहायला तरी हवं. त्या पाहण्यासाठीच किंवा त्या उपयोगावर केवळ एक दृष्टीक्षेप टाकण्यासाठीच हा लेख आहे.
आता उदाहरणार्थ गुगलच्या वेब हिस्टरीचा उपयोग घ्या. गुगलवर आपला शोध बाराही महिने चालू असतो. आपल्या ह्या शोधाचा मागोवा आपल्या मागे गुगल घेत असतो आणि त्याची अतिशय पद्धतशीर अशी नोंद वेब हिस्टरी ह्या सदरात होत असते. समजा गेल्या नोव्हेंबर २००७ ह्या महिन्यात आपण पाब्लो पिकासो ह्या जगप्रसिद्ध चित्रकाराबद्दलच्या माहितीचा शोध घेतला होता. त्याला आता चार महिने उलटून गेले आहेत. आता आपण आहोत मार्च २००८ मध्ये. चार महिन्यापूर्वीचा आपला तो शोध नेमका काय होता हे जाणण्याची सोय गुगलने वेब हिस्टरीमध्ये केलेली आहे. त्यासाठी काय करायचं. अतिशय सोपं आहे. तुमचं जीमेलचं जे लॉगिन नेम आहे त्याचा पासवर्ड वापरून प्रथम लॉगिन करायचं. तुमचं जीमेल लॉगिन नसेल तर
https://www.google.com/accounts/NewAccount
ह्या लिंकवर जाऊन तुमचं गुगल अकाऊंट तुम्हाला मोफत उघडता येईल. ह्या नव्या अकाऊंटचा लॉगिन आणि पासवर्ड वापरून तुमच्या स्वतःच्या गुगल विश्वात तुम्हाला प्रवेश करता येईल. आता ह्या पुढे तुम्ही गुगलवर जो जो शोध घ्याल त्याची नोंद सतत आणि तारीखवार पद्धतीने गुगल घेत राहील. पुढे अगदी वर्षभरांनी सुद्धा तुम्हाला त्याचा लेखा जोखा कधीही आणि जगात कुठेही पाहता येईल. ह्यातली मुख्य गोम अशी की कोणत्या तारखेला, नेमक्या किती वाजून किती मिनीटे आणि किती सेकंदाचा वेळ असताना तुम्ही कोणत्या शब्दांचा शोध घेतला होतात याची नोंद तर तुम्हाला पहायला मिळतेच, पण अधिक महत्वाचं म्हणजे तुम्हाला जे सर्च रिझल्टस मिळाले होते त्यातल्या नेमक्या कोणत्या सर्च रिझल्टवर तुम्ही क्लीक केले होतेत हेही गुगलची वेब हिस्टरी तुम्हाला अचूक सांगते. अर्थात वेब हिस्टरीचा उपयोग हा इतकाच नाही. तुम्ही जो सर्च करता त्याचा अभ्यासही गुगल तुमच्या नकळत करीत असते. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही व्यवसायाने डॉक्टर असलात तर तुमचे शोध हे एका विशिष्ट चौकटीतले असतात. किंवा, तुमच्या स्वभाव आणि आवडीप्रमाणे वा तुमच्या विषयाप्रमाणे तुमचे शोध काय असणार हे ठरत असते. तुमच्या नेमक्या ह्या व्यक्तीगत चौकटीचा अभ्यास गुगल करते आणि तुम्हाला कोणते शोध अभिप्रेत आहेत हे जाणण्याचा प्रयासही ते करते. ह्यामुळे तुम्हाला हवा तो शोध अधिक वेगाने आणि कमीत कमी सेकंदात मिळायला निश्चितपणे मदत होते. आता ह्या वेब हिस्टरी नामक अगदी साध्या पण अतिशय गुणवान अशा सोयीचा उपयोग आपण आतापर्यंत किती वेळा केला? उत्तर येते, कधीच केला नाही. किंवा फारच क्वचित केला असेल. तुमच्या आमच्यापैकी जी मंडळी ह्या प्रकारात येतात त्यांच्यासाठीच हा वेब हिस्टरीचा मंत्र ह्या लेखात दिला आहे. ह्या संदर्भात आणखी एक महत्वाची गोष्ट जाता जाता सांगतो की वेब हिस्टरीची सोय तुम्हाला Enable करावी लागते. ती करण्यासाठी Enable Web History च्या लिंकवर केवळ एक माऊसक्लीक करायची असते. आपल्या शोधाची नोंद गुगलने आपोआप करू नये असे वाटत असेल तर तुम्ही ही सोय केव्हाही Disable करू शकता.
गुगलच्या संदर्भात असे फारसे माहीत नसलेले अक्षरशः शेकडो तंत्र आणि मंत्र आहेत. इंग्रजीत तर गुगलच्या टीप्स आणि ट्रीक्स वर पुस्तकेच्या पुस्तके लिहीली गेली आहेत. त्यावरून गुगलवर शोध घेणे हा प्रकारही किती व्यावसायिकपणे जगात पाहिला जातो हे आपल्या लक्षात येईल. आता आणखी एक, सर्वांना माहीत असलेलीGoogle Image Search ची नेहमीची सोय थोडी तपशीलात जाऊन पाहू. गुगलवर चित्रे किंवा छायाचित्रे आपण नेहमीच शोधतो. पण आपल्यापैकी बरेच जणांना हे माहीत नाही की आपल्याला काही विशिष्ट निकषावरची चित्रे वगैरे शोधण्याची सोय गुगलने केली आहे. उदाहरणार्थ, समजा तुम्हाला फक्त कृष्ण-धवल प्रकारातली लाईन ड्रॉईंग्ज तेवढी शोधायची आहेत. तर, त्यासाठी तुम्ही Advanced Image Search चा उपयोग करायला हवा. त्याचा वापर करून तुम्हाला हव्या त्या रंगातील चित्रे वगैरे मिळू शकतात. कृष्ण-धवल लाईन ड्रॉइंग्ज जशी वेगळी काढून शोधता येतात तसाच शोध कृष्ण-धवल ग्रे स्केल इमेजेसचाही करता येतो. यात तुम्हाला ब्लॅक अॅन्ड व्हाईट फोटोग्राफ्स मिळतील. तुम्हाला विशिष्ट प्रकारच्या इमेज फाईल्स, म्हणजे JPG, GIF, BMP, PNG वगैरे, तर त्याही वेगळ्या मिळू शकतील. तुम्हाला आकाराने मोठी चित्रे वा इमेजेस हव्या असतील तर तो ऑप्शनही आपल्याला एकाच वेळी निवडता येतो. म्हणजे आपल्याला GIF प्रकारातील कृष्ण-धवल लाईन ड्रॉईंग्ज पण त्यातली आकाराने मोठी अशी चित्रे निवडण्याची सोय गुगलच्या ADVANCED IMAGE SEARCH ने उपलब्ध करून दिलेली आहे. आपण त्याचा उपयोग कितपत करतो ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
आता हे आणखी काही साधे सोपे मंत्र पहाः ~ ह्या खुणेचा उपयोग करून तुम्ही एखादा शब्द गुगल सर्च केलात तर त्याचेशी संबंधित रिझल्टस तुम्हाला मिळतात.उदाहरणार्थ ~ nutrition असं टाईप करून तुम्ही शोध घेतलात तर nutrition शी संबंधित Food, Calories, Health अशा सर्व अंगांनी तुम्हाला माहिती देणारे सर्च रिझल्टस तुम्हाला गुगल देईल. Temp Mumbai म्हणून सर्च केलात तर ह्या क्षणाचे मुंबईतले तपमान तुम्हाला मिळेल. Time Pune म्हणून सर्च कराल तर पुण्यात आत्ता किती वाजलेत, कोणता वार आहे याचे घड्याळ तुमच्यापुढे येईल. अनेक हिशोब किंवा रूपांतराची गणिते गुगलवर करता येतात. उदाहरणार्थ 122 ft=?inchesअसं टाईप करून सर्च केलात तर 122 feet = 1 464 inches असं उत्तर तुम्हाला क्षणार्धात मिळेल. 2 000 Indian rupees = ? U.S. dollars असा सर्च प्रश्न केलात तर 2 000 Indian rupees = 49.20200 U.S. dollars असं उत्तर गुगलकडे तयार असेल.

तुमचा अँटी व्हायरस तपासून पहायचाय?
माझ्या संगणकावर अँटी व्हायरस प्रोग्राम असूनही व्हायरस लागला होता. त्यामुळे मी पीसी पूर्ण फॉर्म्याट केला, आणि सर्व प्रोग्राम पुन्हा लावले. आता अँटी व्हायरस देखील मी नव्याने लावला आहे. पण तो नीट काम करतो आहे की नाही हे कसं टेस्ट करायचं?
- ह्यासाठी एक खास पद्धत आहे.
तिला EICAR test असं म्हणतात.EICAR म्हणजे European Institute for Computer Antivirus Research. ह्या संस्थेने खालील कोड तयार केले आहे.
X5O!P%@AP[4\PZX54(P^)7CC)7}$EICAR-STANDARD-ANTIVIRUS-TEST-FILE!$H+H*
तुम्ही इतकच करायचं. Notepad किंवा Wordpad किंवा कोणताही Text Editor उघडा. त्यात वरील कोड टाईप करा (किंवा इथून कट - पेस्ट करा). नंतर Save as.. वर क्लीक करून ही फाईल EICAR.COM ह्या नावाने सेव्ह करा. (EICAR.COM फाईल सेव्ह करण्यासाठी All files हा पर्याय Notepad किंवा Wordpad मध्ये निवडावा लागेल.) हीफाईल सेव्ह केल्या केल्या तुमचा अँटी व्हायरस लगेच अलार्म देईल की तो EICAR TEST SIGNATURE व्हायरस आहे. पण काळजी करू नका. तो व्हायरस नाही. त्या फाईलने तुमच्या संगणकाला काहीही होणार नाही. ही फाईल ज्या अर्थी तुमच्या अँटी व्हायरसने ओळखली त्या अर्थी तुमचा अँटी व्हायरस नीट काम करतो आहे असं मानायला हरकत नाही.
ह्या संदर्भात अधिक माहिती तुम्हाला www.eicar.com. ह्या वेबसाईटवर मिळेल. ज्यांना वरील कोड टाईप करणे किंवा फाईल सेव्ह करणे नको असेल अशांसाठी EICAR.COM ही फाईल देखील ह्या वेबसाईटवर डाऊनलोडींगसाठी ठेवली आहे.

गुगलमधलं I am feeling lucky म्हणजे नेमकं काय?
गुगल सर्चचं Home Page म्हणजे साधेपणाचा कळस आहे. शुभ्र पांढरी पार्श्वभूमी आणि त्यावर दररोज बदलती गुगल नावाची छबी ह्याच दोन गोष्टी त्यावर ठळकपणे दिसतात. इतर बाकी साध्या टायपातले काही बाही, पण आवश्यक शब्द. सर्च करण्यासाठी टाईप करायच्या शब्दांसाठी एक लांबलचक पट्टी आणि त्याखाली Google Search आणि I am feeling lucky ह्या नावाची दोन बटणं. त्यातलं Google Search हे बटण कशासाठी आहे हा प्रश्न कोणालाही पडत नाही. पण दुसरं बटण I am feeling lucky म्हणजे नेमकं काय, आणि ते बटण नेमकं करतं काय हा प्रश्न दहातल्या आठ जणांना पडतो.
गुगल सर्च करताना I am feeling lucky असं स्वतःबद्दल म्हणण्यासारखं काय आहे, असा सरळ आणि भाबडा प्रश्न येणं स्वाभाविक आहे.
ह्या प्रश्नाचं उत्तर समजावून घेण्यासाठी आपण एक साधी कृती करू, म्हणजे हा Lucky प्रकार काय आहे हे आपल्या लक्षात येईल. गुगलच्या सर्च टेक्स्ट फिल्डमध्ये (म्हणजे त्या लांबलचक पट्टीमध्ये Stanford हा शब्द टाईप करा. आता Google Search ह्या बटणावर क्लीक न करता, I am feeling lucky वर क्लीक करा. बघा काय झालं! कोणताही सर्च रिझल्ट समोर आला नाही. एरवी अमुक तमुक क्षुल्लक सेकंदात लाखो सर्च रिझल्ट देणार्या गुगलने काय केल? सर्च रिझल्ट न देता त्याने थेट stanford.edu ही वेबसाईट उघडली. याचाच अर्थ तुम्ही लक्की ठरलात. तुम्हाला सर्च रिझल्टमध्ये डोळे घुसवून हवं ते शोधावं लागलं नाही. तुम्हाला स्टॅनफोर्ड विद्यापीठाची वेबसाईट हवी होती, हे गुगलने जाणलं आणि तुम्हाला कोणताही त्रास होऊ न देता सुखाने हवी ती वेबसाईट तुमच्यापुढे उघडली.
आयुष्यात जे हवं ते कोणतीही तोशिस न पडता समोर येण्याचं भाग्य गुगलमध्येही असू शकतं ते हे असं. मराठीत म्हणूनच I am feeling lucky चं भाषांतर 'मी भाग्यवान' असं गुगलनेच केलं आहे. मराठी गुगलमध्ये जसं 'मी भाग्यवान' नावाचं बटण असतं तसं हिंदीत 'आज मेरी किस्मत अच्छी है' नावाचं बटण असतं. गुजरातीत "મારું નસીબ જોર કરે છે" नावाचं बटण आहे.
Stanford प्रमाणेच BBC, White House, Maharashtra हे शब्द टाकून Feeling Lucky दाबून काय होतं ते पहा. बीबीसीची, ओबामांच्या व्हाईट हाऊसची आणि महाराष्ट्र सरकारची वेबसाईट थेट उघडते. एवढं समजून घेतल्यानंतर आपण आजपर्यंत का लक्की ठरत नव्हतो हे आपल्या कायम लक्षात आल्याशिवाय राहणार नाही.

Tiff, JPG, GIF फाईल्सच्या अद्याक्षरांचा अर्थ नेमका काय?
Tiff म्हणजे Tagged Image File Format. JPG म्हणजे Joint Photographers Group. GIF म्हणजे Graphical Interchange Format. ह्यातील प्रत्येक प्रकाराचे आपले म्हणून असे एक किंवा अनेक वैशिष्ट्ये आहेत. ग्राफीक वापरणारांना किंवा ग्राफीकशी संबंधित विद्यार्थ्यांना ती माहीत हवीत. ते ज्ञान मिळविण्यासाठी खालील तीन लिंक्स उपयुक्त आहेत.
http://kb.iu.edu/data/adpn.html (इथे GIF बाबतची माहिती आहे)
http://kb.iu.edu/data/afjn.html (इथे TIFF ची माहिती मिळेल)
http://kb.iu.edu/data/adqe.html (इथे JPG बद्दलची माहिती मिळेल)

वेबसाईटचे नाव नेहमी lowercase मध्येच लिहीले पाहिजे का?
मूळ वेबसाईटचे नाव, जसे www.google.com हे तुम्ही lowercase मध्ये लिहीता की UPPERCASE मध्ये लिहीता याने काहीही फरक पडत नाही. तुम्ही जरी ते पूर्ण कॅपिटल लेटरमध्ये WWW.GOOGLE.COM असं लिहीलत तरी शेवटी ते www.google.comअसंच होणार. वेबसाईटच्या नावात मोकळी जागा किंवा space ला स्थान नसते. वेब अड्रेस हा सलगच असावा लागतो.
वेबसाईटच्या मूळ Domain Name (जसे www.google.com) नंतर येणारा भाग मात्र case sensitive असतो. वेबसर्व्हरवरील एखादी डिरेक्टरी Google किंवा gooGle अशी असेल तर ती तशीच टाईप करावी लागेल. तसे न केल्यास ते विशिष्ट पान दिसणार नाही व Page cannot be displayed असा किंवा तत्सम संदेश समोर येईल

ब्लू रे डिस्क बाजारात आल्या आहेत, त्या संदर्भात सविस्तर माहिती कुठे मिळेल?
Blu (Blue नव्हे) Ray Disk ह्या DVD च्या पुढलं पाऊल म्हणून ओळखल्या जातात. दोघांचा वापर, आकार आणि दिसणं सारख्याच पद्धतीचं असल तरी क्षमता आणि इतर काही मुद्दे यात खूप फरक आहे. आजच्या Singe sided DVD वर ४.७ जी.बी. चा डेटा राहू शकतो, किंवा साधारणतः दोन तासाचा चित्रपट त्यात मावू शकतो. Single sided Blu Ray Disk त्या तुलनेत एखाद्याडायनॉसोरससारखी आहे. त्यावर २७ जी.बी.चा डेटा किंवा तेरा तासांचा व्हिडीओ त्यात मावू शकतो.
डीव्हीडी १९९७ साली, तर ब्लू रे डिस्क २००६ साली बाजारात आली.
डीव्हीडी मध्ये लाल (Red) रंगाचे लेसर किरण डिस्क वाचण्यासाठी वापरले जातात. ब्लू रे डिस्कमध्ये मात्र निळ्या रंगाचे लेसर किरण वापरले जातात. त्यावरूनचत्याला Blu हे नाव मिळाले. वस्तुतः Blue Ray चे ट्रेड मार्क म्हणून रजिस्ट्रेशन करावयाचे होते. पण नियमाप्रमाणे शब्दकोशातील शब्दाचे ट्रेड मार्क म्हणून रजिस्ट्रेशन होऊ शकत नसल्याने Blue मधील e काढून टाकण्यात आला. Blu ह्या स्पेलींगमागील गोम ही अशी आहे.
अधिक माहिती http://www.blu-ray.com/ ह्या साईटवर उपलब्ध आहे.

Windows चे व्हर्जन कोणते हे कसे ओळखावे?
Start - Run याप्रमाणे क्लीक करून Run च्या बॉक्समध्ये खालील दाखविल्याप्रमाणे winver शब्द टाईप करा आणि Enter दाबा (किंवा चित्रात दाखवल्याप्रमाणे OKवर क्लीक करा.).
OK वर क्लीक करताच तुमच्यासमोर Windows चे नेमके व्हर्जन कोणते आहे हे दाखविणारी विंडो (खाली दाखवल्याप्रमाणे) अवतरेल.
LCD Monitors हे गेम्ससाठी योग्य नसतात असं का म्हणतात?
आज हा एक गैरसमज मानायला हवा. तो गैरसमज पसरला याला LCD मॉनिटर्सचा भूतकाळ कारणीभूत आहे. पूर्वीच्या LCDमॉनिटर्सचा Response Time (त्याला आता Refresh Rate म्हणतात) खूपच जास्त होता. म्हणजे स्क्रीनवर ग्राफीक्स (चित्रे, फोटो,चलत्चित्र आदि) अवतरायला अधिक वेळ लागत असे, व मध्ये मध्ये चित्रेही blur होत असत. जास्त Response Time ने शब्द,अक्षरं किंवा स्थिर चित्रांना अडचण येत नसे. मात्र, गेम्समधील चित्रे खूपच वेगाने येणे-जाणे आवश्यक असल्याने तिथे अडचण येई.त्यामुळे सुरूवातीच्या विकासाच्या टप्प्यात असताना गेम्स खेळणारे LCD मॉनिटर्सपेक्षा साधे मॉनिटर्स निवडत असत.
पण आता परिस्थिती बदलली आहे. आजचे LCD मॉनिटर्स चांगले प्रगत आहेत. त्यांचा Refresh Rate खूपच चांगला आहे. त्यामुळे आज LCD मॉनिटर्सवरही गेम्स उत्तम रितीने खेळता येतात.
Response Time हा मिलीसेकंदांमध्ये मोजला जातो. तो जेवढा कमी तेवढे तुमच्या मॉनिटरवर ग्राफीक्स त्वरेने येतात आणि जातात. त्यामुळे मॉनिटर विकत घेताना त्याचा Response Time अवश्य लक्षात घ्यावा. ३५ मिलीसेकंदाच्या मॉनिटरपेक्षा ८ मिलीसेकंद Response Time असलेला मॉनिटर गेम्ससाठी अधिक चांगला असणार हे ओघानेच आलं.

मॅक काँप्युटर्सना व्हायरस लागू शकत नाही असं म्हणतात, ते खरं आहे काय?
Mac काँप्युटर्सनाही व्हायरस लागू शकतो. मॅक ला व्हायरस लागत नाही अशी दंतकथा पसरली यामागे काही कारणं आहेत. Appleकंपनीचा मॅक हा काँप्युटर पीसीपेक्षा अधिक बुद्धीमान म्हणून ओळखला जातो. पण व्हायरस न लागण्याची दंतकथा पसरण्यामागचं कारण ते नव्हे. मॅक ज्या ऑपरेटींग सिस्टमवर चालतो (Mac OS X वगैरे) ती जुन्या Unix ह्या ऑपरेटींग सिस्टमवर आधारलेली आहे. युनिक्स ही सुरक्षिततेच्या दृष्टीने जगातील सर्वांत कार्यक्षम ऑपरेटींग सिस्टम आहे. त्याचा लाभ मॅकला मिळतो.
Windows ही IBM वर आधारलेली ऑपरेटींग सिस्टम आहे. व्हायरस तयार करणारी बहुसंख्य मंडळी ह्या ऑपरेटींग सिस्टमशी परिचित असणारे आहेत. तसेच मॅक आणि पीसी वापरणारांमध्ये विंडोजवर आधारित पीसी वापरणारांची संख्या कितीतरी पटीने अधिक म्हणजे लाखोंच्या संख्येत आहे. पीसींची संख्या एवढी प्रचंड असल्याने व्हायरस पसरवण्याचे काम वेगाने व परिणामकारकपणे होऊ शकते. मॅकची संख्या लहान असल्याने त्यातून व्हायरस पसरवण्यावर खूपच मर्यादा पडतात. त्यामुळे व्हायरस तयार करणारे नेहमीच पीसी ची निवड करतात.
ह्या कारणांमुळेच मॅकला व्हायरसची भिती पीसीच्या तुलनेत खूपच कमी असते. त्यामुळे मॅक युजर्स व्हायरसच्या बाबतीत बिनधास्त असतात. कित्येक मॅक युजर्स हे अन्टी व्हायरस वापरतही नाहीत. ह्या सर्व कारणांमुळेच मॅकला व्हायरस लागत नाही अशी वदंता पसरलेली दिसते. नॉर्टन,सोफोस वगैरे अन्टी व्हायरस प्रोग्राम्स पीसी व मॅक अशा दोन्हींसाठी आज उपलब्ध आहेत

Recycle Bin मधून डिलीट झालेल्या फाईल्स परत मिळू शकतात का?
Recycle Bin मधून फाईल्स डिलीट झाल्या तर त्या परत मिळवता येत नाहीत अशी बर्याच जणांची समजूत असते. Recycle Binही Windows ची एक डिरेक्टरी आहे. डिलीट केलेल्या फाईल्स इथे आणल्या जातात. जेव्हा आपण Recycle Bin मोकळी म्हणजेEmpty करतो तेव्हा त्या Windows मधून काढून टाकल्या जातात. मात्र त्यांची मुळे संगणकावर अस्तित्वात असतात. ज्यावेळी ह्या मुळांवर दुसर्या फाईल्स चढतात तेव्हा ती मुळे नाहीशी होतात. त्यानंतर मात्र फाईल्स परत मिळू शकणं अतिशय दुरापास्त किंवा जवळजवळ अशक्य असतं.Recycle Bin मधूनही गेलेल्या तुमच्या फाईल्स परत मिळविण्यासाठी Undelete Plus नावाचा मोफत उपलब्ध असणारा प्रोग्राम तुम्ही वापरायला हवा. http://www.undelete-plus.com/ ह्या साईटवरून तुम्ही तो डिलीट करू शकता.
RSS Feed म्हणजे नेमके काय?
RSS म्हणजे Really Simple Syndication. त्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी अर्थातच काही संबंध नाही. तो केवळ संगणक तंत्रज्ञानाचा एक प्रकार आहे. यातला Syndication हा शब्द बोलका आहे. त्याचा अर्थ (व्याख्या) शब्दकोशामध्ये - "selling (an article or cartoon) for publication in many magazines or newspapers at the same time" असा सापडतो. म्हणजे एखादा लेख एकाच वेळी वेगवेगळ्या नियतकालिकांमध्ये वा वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्धीस देण्याची पद्धत.
एखाद्या वेबसाईटसवरील नवे लेख वा नव्याने भर पडलेल्या बाबी (लेख चित्र वा तत्सम) याबाबत इतर ठिकाणी (मुख्यत्वे इतरवेबसाईटसवर किंवा थेट तुमच्या काँप्युटरवर) एकाच वेळी कळवणे ही RSS ची प्रक्रिया आहे. एक काल्पनिक उदाहरण घेऊ, म्हणजे RSS मागील संकल्पना स्पष्ट होईल. समजा xyz.com ह्या वेबसाईटवर मुंबईच्या विकासाबद्दलचा एक लेख नुकताच नव्याने आला आहे. अशा वेळी त्या लेखाची लिंक एखादा बातमीचा मथळा असावा अशा पद्धतीने xyz.com वर प्रकाशित केली जाते. xyz.com वर जे काही नवे येईल त्यात अनेकांना रस असतो. तसेच, दुसरीकडे खुद्द xyz.com ला आपल्या लेखांचा प्रचार होण्यात रस असतो. xyz.com ने नव्या लेखाच्या लिंकचा फीड दिला की त्याची RSS file वेबसाईट (आपल्या उदाहरणात xyz.com) तयार करते. हा फीड इतर अनेक वेबसाईटना वा युजर्सना एकाच वेळी व त्वरीत मिळतो. आपल्याला Subscribe to RSS feed वगैरे शब्दप्रयोग अनेक साईटसवर दिसतात. त्यामागे ही Syndication ची कल्पना आहे.
RSS ची संकल्पना XML (Extensible Mark-up Language) ह्या संगणकी भाषेवर आधारलेली आहे. RSS हे उपयुक्त आहे याबद्दल सर्वांचे एकमत असले तरी त्या संदर्भातील अनेक मुद्यांवर मत-मतांतरे आहेत. खुद्द RSS ला Really Simple Syndication म्हणायचे की Rich Site Summary म्हणायचे? त्यापेक्षा Rich Site Syndication किंवा Rich Syndication Standard का म्हणू नये याबद्दल मतभेद व्यक्त करणारे आहेत. पण RSS ला सर्व जण RSS च म्हणतात हे मात्र नक्की. तसच RSS चा सर्वांना अभिप्रेत असलेला अर्थ आणि तंत्रज्ञानही तेच आहे हेही नक्की.
XML, RSS Readers वगैरेंबद्दल पूर्ण आणि सर्वांगीण माहिती एका प्रश्नाच्या उत्तरात सामावणे अशक्य आहे. ह्या उत्तरात केवळ वरवरची माहिती RSS संकल्पनेचाथोडक्यात परिचय व्हावा इतपतच आली आहे याची नोंद वाचकांनी घ्यावी. ज्यांना ह्या विषयासंबंधी सविस्तर वा सखोल माहिती हवी आहे त्यांनीhttp://www.voidstar.com/module.php?mod=book&op=feed&id=129 ह्या लिंकवरचा RSS FAQ (Frequently Asked Questions) अवश्य वाचावा.

Windows मधील Start Menu A to Z अकारविल्हे प्रमाणे कसा करायचा?
Start - Programs या प्रमाणे क्लीक करून तुमचा Start Menu उघडा.
आता कोणत्याही एका Menu Item वर राईट क्लीक करा. त्यातून निघणार्या Dropdown Menu मधून Sort by name वर क्लीक करा.
झाला तुमचा अस्ताव्यस्त झालेला Start Menu अकारविल्हे
फाईल डिलीट करताना File is in use by some application असा संदेश येतो तेव्हा काय करावे?
व्हायरस, स्पायवेअर वा अन्य कारणामुळे हे होऊ शकतं. सर्वांना ही समस्या कधी ना कधी भेडसावलेली असते. प्रथंम त्यामागे स्पायवेअर वा व्हायरसचे कर्तृत्व तर नाही ना हे अगोदर तपासून पहा. ते नाही याची खात्री झाली तर http://www.dr-hoiby.com/WhoLockMe/ ह्या लिंकवर जा. तेथे Who lock me नावाचे २३ के साईजचे एक टूल (Freeware) आहे. ते वापरून तुम्हाला तुमची समस्या सोडवता येईल.
काँप्युटर योग्य पद्धतीने शटडाऊन होत नसेल तर काय करावे?
तुमचा काँप्युटर योग्य पद्धतीने शटडाऊन होत नाही यामागे अनेक कारणांपैकी कोणतेही वा कोणतीही असू शकतात. त्यातलं नेमकंकोणतं हे काँप्युटर न पाहता सांगणं अवघड आहे. Spybot सारखा Anti Spyware प्रोग्राम वापरून एखादे स्पायवेअर तर त्यामागे नाही ना याची खात्री करून घ्या. Spybot पूर्ण अपडेट असेल याची काळजी घ्या. त्याच प्रमाणे Anti Virus Scan देखील पूर्ण करून घ्या. CCleaner सारखा प्रोग्राम वापरून संगणकातील Temp Files वगैरे कचरा काढून घ्या. तसेच Registry cleaning देखील करून घ्या. Registry तील Errors मुळे देखील शटडाऊनच्या समस्या उद्भवू शकतात. हे सारं करूनही जर शटडाऊनची समस्या कायम असेल तर तुमच्या संगणकातले एखादे सॉफ्टवेअर तर याला कारणीभूत नाही ना हे तपासावे लागेल. वारंवार Not responding चा संदेश देणारे सॉफ्टवेअर काढून पहा. यानेही समस्या सुटली नाही तर मायक्रोसॉफ्टच्या
http://www.microsoft.com/downloads/details.aspx?familyid=1B286E6D-8912-4E18-B570-42470E2F3582&displaylang=en
ह्या लिंकवर जा. तेथे A service to help with slow log off and unreconciled profile problems. साठी एक डाऊनलोड दिले आहे. ते वापरून पहा.
फोर्स शटडाऊन कसे करावे हे शिकवणारे एक ट्युटोरियल http://www.leeindy.com/forcedshutdown.shtml
ह्या लींकवर आहे. त्याचा काही उपयोग होतोय का ते पहा.
संगणकावर फाईल्स वा फोल्डर पासवर्ड प्रोटेक्ट कसे करावे?
तुम्हाला तुमच्या संगणकावरील डेटा पासवर्ड प्रोटेक्ट करता येईल. पण पासवर्ड विसरलात तर अवघड होईल. त्यामुळे पासवर्ड लक्षातठेवण्याचं तेवढं लक्षात ठेवा.
तुम्ही जर Windows XP वापरत असाल (आणि तुमची फायलींग सिस्टम NTFS प्रकारची असेल) तर खुद्द विंडोजमध्ये तुम्ही तुमच्या फाईल्स पासवर्ड प्रोटेक्ट करू शकता. त्यासाठी खालील कृती कराः
- जो फोल्डर पासवर्ड प्रोटेक्ट करायचा त्यावर राईट क्लीक करा.
- राईट क्लीक केल्यानंतर येणार्या ड्रॉप डाऊन मेनूतील Properties वर क्लीक करा. तुमच्यापुढे खालील विंडो येईल. ह्या विंडोमधीलSharing ह्या टॅबवर क्लीक करा.

त्यानंतर Local Sharing and Security च्या खालील Make this folder private च्या छोट्या बॉक्समध्ये क्लीक करून तो सिलेक्ट करा.
- त्यानंतर Apply वर क्लीक करून OK करा.
टीपः Make this folder private हे शब्द आणि त्याचा बॉक्स वरील विंडोत दिसत असल्याप्रमाणे ग्रेआऊट झालेला दिसतो आहे का? म्हणजे, त्यावर क्लीक होऊ शकत नसेल तर तुमची फायलींग सिस्टम Fat 32 प्रकारची आहे. NTFS प्रकारची नाही. तसं असल्यास तुम्हाला ह्या पद्धतीने फोल्डर्स पासवर्ड प्रोटेक्ट करता येणार नाहीत.
तसं असल्यास, MaxCrypt हे सॉफ्टवेअर वापरून फोल्डर वा फाईल्स पासवर्ड प्रोटेक्ट करता येतील.
http://www.kinocode.com/download/MSS_v2_Setup.exe
वरील लींकवर क्लीक करा म्हणजे MaxCrypt 2.0 डाऊनलोड होईल. ते इन्स्टॉल करा. त्यानंतर राईट क्लीक करून तुम्हाला फाईल्स व/वा फोल्डर्स पासवर्ड प्रोटेक्ट करता येतील. ३.८ एम.बी. आकाराचं हे सॉफ्टवेअर फाईल्स व फोल्डर्स Encrypt करतं. पासवर्ड दिल्याशिवाय ते Decrypt होऊ शकत नाही. ह्या संदर्भातील अधिक माहिती http://www.kinocode.com वर मिळू शकेल.

वेब २.० ची संकल्पना
Web 2.0 बद्दल जी चर्चा आज ऐकायला मिळते ती उंबरठ्यावर उभ्या असलेल्या उद्याच्या Web जगताबद्दलची चर्चा आहे. गुगलने वेब २.० ची व्याख्या दिली आहे. ती अशीः
Web 2.0 is a term often applied to a perceived ongoing transition of the World Wide Web from a collection of websites to a full-fledged computing platform serving web applications to end users. Ultimately Web 2.0 services are expected to replace desktop computing applications for many purposes.
ही व्याख्या भविष्याचा वेध घेते. एके काळी Web म्हंटलं की हजारो वेब साईटसचं/वेब पानांचं एक प्रचंड आणि जगद्व्यापी पोळं किंवा जाळं इतकच अभिप्रेत होतं. त्या स्थितीपासून पुढे विकसित होत होत Web हे संगणक वापरणारांसाठी एक परिपूर्ण व्यासपीठ बनेल अशी विचारधारणा Web 2.0 च्या मागे आहे. आज आपल्याला संगणकावर वेगवेगळी सॉफ्टवेअर (applications) लावावी लागतात. पुढचा काळ (म्हणजे Web 2.0 चा काळ) असा असेल की ही सॉफ्टवेअर आपल्याला इंटरनेटवरच वापरायला मिळतील. गुगलने त्याची थोडी झलक दाखवायला सुरूवातही केली आहे. Google Docs आणि Spreadsheetsम्हणजे Word आणि Excel सारखे Programmes इंटरनेटवर उपलब्ध झाल्यासारखे आहेत. थोडक्यात, उद्याचा तुमचा संगणक तुमच्या घरातल्या हार्ड डिस्क पेक्षा इंटरनेटच्या सर्व्हरवर अधिक असणार आहे. याला इंटरनेटची दुसरी पिढी असे म्हंटले जाते.
२००३ साली O'Reilly Media ह्या प्रकाशन संस्थेच्या अधिवेशनात प्रथम Web 2.0 ची संकल्पना मांडली गेली. ह्या अधिवेशनात O'Reilly Media चे प्रमुख टीम ओरीली यांनी त्याचा प्रथमोच्चार केला. टीम ओरीलीच्या शब्दातली वेब २.० ची व्याख्या अशीः
"Web 2.0 is the business revolution in the computer industry caused by the move to the internet as platform, and an attempt to understand the rules for success on that new platform."
त्याच्या पुढल्या वर्षी म्हणजे २००४ साली झालेल्या त्यांच्या अधिवेशनानंतर ही संकल्पना बरीच रूढ झाली. आज Web 2.0 बद्दल उलट सुलट चर्चा आहे. अनेक तज्ज्ञांनी त्यावर टीकेचा माराही केला आहे. सर्वसाधारणतः Blogs, social bookmarking, wikis, podcasts, RSS feeds, social software, Web APIs, वगैरे घटकWeb 2.0 चा भाग मानले गेले आहेत.
ह्या संदर्भात विकीपेडियाच्या http://en.wikipedia.org/wiki/Web_2.0 ह्या लींकवर अधिक माहिती जिज्ञासूंसाठी उपलब्ध आहे

Parental software - एक कौटुंबिक गरज
Parental Filter ह्या नावाचं मोफत आणि माझ्या मते उत्तम असं सॉफ्टवेअर तुमच्यासाठी इंटरनेटवर उपलब्ध आहे.http://www.ecommsec.com/pf/PfSetup30.exeह्या लिंकवर क्लीक केलत की Parental Filter चा डाऊनलोड सुरू होईल. केवळ २.१ एम.बी. आकाराचं हे डाऊनलोड आहे. त्यामुळे ते पटकन डाऊनलोड होतं. डाऊनलोड पूर्ण झाल्यानंतर इन्स्टॉल करा. इन्स्टॉलेशन नंतर तुमच्या पुढे खालील स्क्रीन येईल.
त्यातील वरच्या बाजूस असलेल्या उजवीकडील लाल आयतावर (Banlist Off) वर क्लीक करा. म्हणजे तो चौकोन हिरवा होईल आणि Banlist On होईल. याचा अर्थ तुमचं Parental Filter चालू झालं. Pornography किंवा अश्लील प्रकारच्या वेबसाईटस उघडायचा प्रयत्न झाल्यास त्या उघडणार नाहीत. Page can not be displayedअसा संदेश मिळेल.
Parental Filter ने हजारो पोर्न व तत्सम साईटसची यादी केली आहे, आणि त्यांचा समावेश Banlist मध्ये केला आहे. दरमहा त्यात नवनव्या साईटसची भर पडत असते. त्यामुळे तुम्ही Banlist महिन्यातून एकदा जरूर अपडेट करा.
आता, शेवटची पण सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे पासवर्डची. तुम्ही लावलेलं Parental Filter कुणीही काढू नये यासाठी पासवर्डची व्यवस्था आहे. पासवर्ड लावण्यासाठी खाली दाखवलेल्या खुणेवर क्लीक करा.

आता समोर आलेल्या खालील विंडोमध्ये तुमचा पासवर्ड द्या.
हा प्रोग्राम बर्यापैकी लोकप्रिय आहे. पण तो फार मोठ्या प्रमाणावर साईटस बॅन करतो अशी टीका काही जण करतात. ज्या अर्थी तो लोकप्रिय आहे, त्याअर्थी आपण टीकाकारांकडे दुर्लक्ष करावे हेच बरे.
जीमेल आणि ऑनलाईन सिक्युरिटी
जीमेल वापरून ईमेल पाठवणारे आजकाल दहापैकी आठ इतके बहुसंख्येने दिसतात. जीमेलवर आपले अनेक पासवर्डस येऊन पडत असतात. कितीतरी गोपनीय किंवा व्यक्तीगत माहिती वा डेटा आपल्या ईमेलमधून जात-येत असतो. असा हा महत्वाचा जीमेल पत्ता कितपत सुरक्षित असतो? कुणी एखादा हॅकर आपली जीमेल हॅक करू शकतो का? आपल्या ईमेल जेव्हा जीमेलवरून जात येत असतात त्या ऑनलाईन प्रवासात मध्येच कुणी त्या टॅप करू शकेल का? हे प्रश्न आपण फारसे विचारात घेत नसतो.
ह्या पार्श्वभूमीवर आपण बॅंकांचं उदाहरण घेऊ. आजकाल बँकांच्या वेबसाईट आणि ऑनलाईन बँकींग सेवा सर्वत्र उपलब्ध झाली आहे.आपल्या अकाऊंटमधून पैसे काढणे, ट्रान्सफर करणे, अकाऊंटमधले पैसे वापरून ऑनलाईन खरेदी करणे हे आता दैनंदिन जीवनाचा भाग होऊन गेलय. अशा वेळी आपल्या बँक अकाऊंटचा पासवर्ड आणि एकूणच व्यवहार सुरक्षित रहावा यासाठी बँकांच्या वेबसाईटस विशेष ऑनलाईन सुरक्षा आपल्या अकाऊंटला देत असतात. हे नीट समजण्यासाठी आपण ICICI Bank च्या वेबसाईटचं उदाहरण घेऊ. तुम्ही तुमच्या इंटरनेट ब्राऊझरमध्ये http://icicibank.com असं टाईप करून एंटर बटण दाबलत तर तुम्ही बँकेच्या वेबसाईटवर जाता. तुमच्या ब्राऊझरमध्ये त्यावेळी खालीलप्रमाणे साईटचा पत्ता दिसत असतो.
आता तुम्ही बँकेच्या वेबसाईटवर लॉगिन करण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी सर्वात वर डावीकडे दिसणार्या लॉगिन विभागाकडे या.
तुम्ही जेव्हा लॉगिनच्या Personal किंवा Corporate वा तत्सम लिंकवर क्लीक करता तेव्हा तुमच्यासमोर लॉगिन नेम व पासवर्ड टाईप करावयाचे पान येते. इथून तुम्ही तुमचं अकाऊंट उघडणार असता. हे पान अतिशय सुरक्षित ठेवण्याची काळजी सर्वच बँकांप्रमाणे ICICI Bank ने देखील घेतली आहे. ह्या पानाचा तुमच्या ब्राऊझरवर असलेला पत्ता पहा. खालीलप्रमाणे दिसत आहे.
जेव्हा तुम्ही साधी साईट उघडलीत तेव्हा त्या पत्त्यात केवळ http अशी सुरूवात होती. जेव्हा तुम्ही लॉगिन व पासवर्डच्या पानावर गेलात त्यावेळी त्या पानाचा पत्ताhttp ऐवजी https ने सुरू होणारा होता. म्हणजेच लॉगिन-पासवर्डचे पान येताच http मध्ये s ची भर पडली आहे. हा s असतो विशेष सिक्युरिटीचा. ह्या पानावर जे टाईप होईल व जे व्यवहार होतील ते सारे विशेष सुरक्षित राहतील असा त्याचा अर्थ. आजकाल व्हीआयपींना झेड सिक्युरिटी दिली जाते. Https चा अर्थ तुमच्या पानाला अशी एक प्रकारची ऑनलाईन झेड सिक्युरिटी मिळालेली आहे.
आता आपल्या जीमेलकडे वळू. तुमच्या जीमेलवर लॉगिन करा. लॉगिन केल्यावर तुमच्या ब्राऊझरच्या पत्त्यात काय दिसते आहे? जर http असेल तर तुमचा लॉगिन आणि तुमच्या मेलना https ची विशेष सिक्युरिटी उपलब्ध नाही. त्यातही जर तुम्ही wi-fi झोन मध्ये असाल वा wi-fi इंटरनेट वापरत असाल तर तुमच्या झोनमधला इतर कोणी तुमचा ईमेल पत्ता तुमच्या नकळत पाहू शकतो. पॅरालल टेलिफोन लाईनवर टेलिफोनवरचं बोलणं ऐकणं असतं ना तसाच काहीसा हा प्रकार असतो. मात्र तुमचा लॉगिन https प्रकाराने युक्त असेल तर तुम्ही काळजी करण्याची गरज नसते. कारण तुमच्या ईमेलला वा त्या पानावरच्या ऑनलाईन व्यवहाराला विशेष सुरक्षा असते.
तुम्ही तुमची जीमेल उघडलीत. पत्ता पाहिलात. तो http प्रकारचा आहे का? असेल तर तो बदलून तुम्ही https करून तुमची ईमेल विशेष सुरक्षा कवचाच्या आत ठेवायल हवी. आता जीमेलने अशा सुरक्षेची सोय तुमच्या-आमच्यासाठी केली आहे. पण ती तुम्ही अक्टीव्हेट करायला हवी. जोपर्यंत तुम्ही ती अक्टीव्हेट करीत नाही,तोपर्यंत तुमचा पत्ता http चाच राहणार. अक्टीव्हेट करणं हे अगदी सोपं आहे. त्यासाठी प्रथम तुमच्या जीमेलवर लॉगिन करा. मग Settings वर क्लीक करा. सेटींग पानाच्या तळाशी पहा दोन पर्याय दिलेले आहेत. एक आहे - Always use https. दुसरा आहे - Don't always use https. खालील चित्रात दाखविल्याप्रमाणे तुमच्या जीमेलवर कोणताही पर्याय निवडलेला नाही.
जीमेलने खरं तर स्वतःच न विचारता https पर्याय निवडायला (by Default) हवा होता. पण त्यांनी तसे केलेले नाही. त्यामुळे आपण तो निवडणे भाग आहे. माऊसने क्लीक करून तो पर्याय निवडून घ्या. मग खालीलप्रमाणे चित्र दिसेल.
आता हे सेटींग सेव्ह करा आणि त्या पानावरून बाहेर पडा. आता पुन्हा लॉगिन करून पहा. तुम्हाला https चा लॉगिन पत्ता मिळालेला दिसेल. याचा अर्थ आता तुमची जीमेल विशेष सुरक्षा कवचाखाली आली आहे. इतरांना ती पासवर्डशिवाय ऑनलाईन हॅक करणं आता अगदी अशक्यप्राय आहे.
ही सुविधा जीमेलने अगदी अलिकडे देऊ केली आहे. त्यामुळे आपल्यापैकी १० तल्या ९ जणांना त्याची माहिती नसण्याची शक्यता आहे. तुमच्या सर्व मित्रांना आपण याची माहिती त्वरित द्या. आपली आणि आपल्या सर्वांची जीमेल सुरक्षित करणं महत्वाचं आहे. त्यासाठी इथे दिलेली टीप प्रत्येकाला सांगणं हे आपण कर्तव्य म्हणून करायला हवं.

उपयुक्त Unlocker..
आपल्याला संगणकावरील एखादी फाईल काढून टाकायची असते. आपण ती Delete करण्याचा प्रयत्न करीत असतो आणि आपल्याला यश येत नसतं. खाली दाखवल्याप्रमाणे काहीतरी विचित्र संदेश संगणक देत असतो आणि ती फाईल पुन्हा पुन्हा प्रयत्न करूनही डिलीट होत नसते. ते संदेश साधारणतः असेः
ह्यापैकी एखादा वा तत्सम संदेश पाहून आपल्याला आश्चर्य वाटत असतं की मला जी फाईल डिलीट करायची आहे ती ना मी कुठे उघडली आहे, ना ती कोणत्याही प्रोग्रामसाठी वापरात आहे. असं असूनही ' The file is in use by another program or user' हा संदेश का येतोय. चक्रावल्यामुळे पुढे आपल्याला यामागे एखाद्या व्हायरसचा किंवा स्पायवेअरचा तर हात नसेल ना असा संशयही येऊ लागतो.
ह्या परिस्थितीतून सुटण्यासाठी अत्यंत उपयुक्त सॉफ्टवेअर म्हणजे Unlocker. सध्या त्याचे १.८. ८ हे व्हर्जन उपलब्ध आहे. हा प्रोग्राम अधिकृतरित्या मोफत म्हणजेFreeware आहे. तो डाऊनलोड करण्यासाठी हा घ्या पत्ताः
http://www.filehippo.com/download_unlocker/
आपला पेन ड्राईव्ह बाहेर काढतानाही बरेच वेळा पेन ड्राईव्ह मधल्या काही फाईल्स वापरात असल्याने तो काढणं Safe नाही
अशा प्रकारचे संदेशही वारंवार येत असतात. त्यातला एक संदेश खालील विंडोत दाखवला आहे.
अशा वेळी पेन ड्राईव्हच्या रूट फोल्डरवर वा ड्राईव्ह लेटरवर राईट क्लीक करून Unlocker ला त्या फाईल्स मोकळ्या करायला सांगितल्यास आपली समस्या सुटते.राईटक्लीक करण्याचा Unlocker चा नेमका मेनू आयटेम खाली दाखवला आहे.
वर जो Unlocker डाऊनलोडचा पत्ता दिला आहे तो पाहिल्यावर ही साईट फ्रान्समधील आहे हे तुमच्या लक्षात येईल. आपल्या मदतीसाठी सारं संगणकीय जग कसं प्रयत्नशील असतं त्याचच हे एक उदाहरण.
Cannot delete file: Access is denied
There has been a sharing violation.
The source or destination file may be in use.
The file is in use by another program or user.
Make sure the disk is not full or write-protected and that the file is not currently in use.
ह्यापैकी एखादा वा तत्सम संदेश पाहून आपल्याला आश्चर्य वाटत असतं की मला जी फाईल डिलीट करायची आहे ती ना मी कुठे उघडली आहे, ना ती कोणत्याही प्रोग्रामसाठी वापरात आहे. असं असूनही ' The file is in use by another program or user' हा संदेश का येतोय. चक्रावल्यामुळे पुढे आपल्याला यामागे एखाद्या व्हायरसचा किंवा स्पायवेअरचा तर हात नसेल ना असा संशयही येऊ लागतो.
ह्या परिस्थितीतून सुटण्यासाठी अत्यंत उपयुक्त सॉफ्टवेअर म्हणजे Unlocker. सध्या त्याचे १.८. ८ हे व्हर्जन उपलब्ध आहे. हा प्रोग्राम अधिकृतरित्या मोफत म्हणजेFreeware आहे. तो डाऊनलोड करण्यासाठी हा घ्या पत्ताः
http://www.filehippo.com/download_unlocker/
खूप जणांना ती सापडत नाही. त्यामुळे खालील चित्रात ती नेमकी बाणाने दाखवली आहे.)
आपला पेन ड्राईव्ह बाहेर काढतानाही बरेच वेळा पेन ड्राईव्ह मधल्या काही फाईल्स वापरात असल्याने तो काढणं Safe नाही
अशा प्रकारचे संदेशही वारंवार येत असतात. त्यातला एक संदेश खालील विंडोत दाखवला आहे.
अशा वेळी पेन ड्राईव्हच्या रूट फोल्डरवर वा ड्राईव्ह लेटरवर राईट क्लीक करून Unlocker ला त्या फाईल्स मोकळ्या करायला सांगितल्यास आपली समस्या सुटते.राईटक्लीक करण्याचा Unlocker चा नेमका मेनू आयटेम खाली दाखवला आहे.
वर जो Unlocker डाऊनलोडचा पत्ता दिला आहे तो पाहिल्यावर ही साईट फ्रान्समधील आहे हे तुमच्या लक्षात येईल. आपल्या मदतीसाठी सारं संगणकीय जग कसं प्रयत्नशील असतं त्याचच हे एक उदाहरण.
मजेदार फोटोस्केचर
वर दिला आहे तो आहे वाघाचा मूळ फोटो.
फोटोस्केचर हे मोफत उपलब्ध असलेले सॉफ्टवेअर (फ्रीवेअर) वापरून
काही क्षणांत तयार केलेली दोन कृष्ण-धवल रेखाचित्रे खाली दिली आहेत.

हे फोटोस्केचर डाऊनलोडींगसाठी उपलब्ध आहे http://www.fotosketcher.com/ ह्या वेबसाईटवर. यात पेन्सिल स्केच, पेन व इन्क स्केच, कलर स्केचेस अशा एकूण चार प्रकारात स्केचेस करता येतात. वापरायला आणि समजायला खूप सोपं, आणि त्या मानाने सुंदर स्केचेस अगदी कमी वेळात तयार करणारं
हे फ्रीवेअर अनेक ठिकाणी ५ स्टार मिळून लोकप्रिय झालं आहे.
ज्यांच्याकडे फोटोशॉपसारखे कमर्शियल सॉफ्टवेअर नाही,
किंवा ते वापरणं अवघड जातं अशांना हे छोटेखानी स्केच टूल नक्कीच आवडेल.
फोटोस्केचरची ही खालील विंडो पहा.

त्यावरून हे सॉफ्टवेअर काय आहे हे तुमच्या सहज लक्षात येईल.
तुम्हाला हवा तो फोटो उघडा, मग फक्त त्या विंडोतले स्लायडर मागे पुढे करा
की झालं तुमचं स्केच तयार. फारच सोपं,
म्हंटलं तर लहान मुलांसाठी,
म्हंटलं तर नुकतेच संगणकावर बसू लागलेल्या मोठ्यांसाठी.

न फुटणारं भिंग..
बारीक टाईप वाचणं हा काही वेळा कामाचा तर काही वेळा नेहमीच्या वाचनाचा भाग असतो. बरेच ज्येष्ठ नागरिक अशा वेळी बहिर्गोल भिंग घेऊन वाचन करताना दिसतात. संगणकाच्या स्क्रीनवरचं बारीक अक्षरही असं बहिर्गोल भिंग घेऊन वाचणं शक्य आहे का? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे, 'होय शक्य आहे. त्यासाठी एक डिजिटल बहिर्गोल भिंग तुम्हाला मिळू शकतं.
वरील चित्रात दाखविल्याप्रमाणे हे भिंग तुमच्या स्क्रीनवर अशा स्टाईलमध्ये येतं. डिजिटल असल्याने ते अर्थातच हाताने फिरवावं लागत नाही. माऊसच्या क्लीकमध्ये धरून ते हवं तिथे सरकवता येतं. बारीक टाईप वाचण्यासाठी बरीच मंडळी त्याचा उपयोग सध्या करीत आहेत. तुम्हालाही प्रयत्न करून पहायला हरकत नाही. हे भिंग म्हणजे एक मोफत प्रोग्राम किंवा फ्रीवेअर आहे. http://www.4neurons.com/other/Magnifying_Glass/ ह्या साईटवरून तुम्ही हे भिंग डाऊनलोड करून घेऊ शकता. हे भिंग वापरणं हा सवयीचा भाग आहे. सुरूवातीस ते वापरणं किचकट वाटू शकतं. नंतर मग ते वापरण्याचीच सवय होऊन बसणही अशक्य नाही.
हे भिंग मोफत मिळतं. ते फुटत नाही. हरवत नाही. कोणी ते आपल्याकडे मागू शकत नाही. एक गंमत म्हणून ते (म्हणजे माऊस) लहान मुलांच्या हातात द्यायलाही हरकत नाही. उपयुक्तता आणि मनोरंजन एकाच वेळी साधणारं हे भिंग आहे

१९४६ सालचा ENIAC संगणक
जगप्रसिद्ध ENIAC संगणक १९४६ च्या फेब्रुवारी महिन्यात तयार झाला. त्याने १००० चौरस फूटांची जागा व्यापली होती. आजच्या नॅनो तंत्रज्ञानाच्या काळात एवढ्या प्रचंड आकाराचा संगणक ऐकल्यावर कुणाला हंसूही येईल. १९४३ ते १९४६ असं सुमारे तीन वर्ष हा संगणक उभारण्याचं आणि बांधण्याचं काम चाललं होतं. एका सेकंदाला ५००० OPERATIONS करण्याची क्षमता ENIAC मध्ये होती. आज हा ५००० चा आकडा ऐकला तरी हंसू फुटतं. पण त्या काळात तो आकडा फार मोठा वाटणाराच होता. खरं तर १९४५ च्या सुमारास जे संगणक वा त्या सदृश्य यंत्रे उपलब्ध होती त्यापेक्षा ENIAC ची क्षमता १००० पटींनी (अबब..) जास्त होती. त्यामुळेच ENIAC चं मोठच कौतुक होतं.
ENIAC उभारण्याचं काम जॉन मॉक्ली (John Mouchley) आणि जे प्रेस्पर इकर्ट यांनी केलं. ते दोघेही ENIAC प्रकल्पाचे प्रमुख (Director) होते.

भारतातील शहरांचे वा विविध ठिकाणांचे अक्षांश व रेखांश कुठे मिळतील?
ह्या साठी http://www.indiapress.org/horoscope/ ह्या साईटवर जा. ह्या पानावर तळाशी पहा खालील चित्रात दाखविल्याप्रमाणे A to Z पर्यंत लिंक्स आहेत. तुम्हाला मिरज शहराचे अक्षांश रेखांश हवे आहेत. ते M अद्याक्षरावर क्लीक केल्यानंतर मिळतील. तसेच तुमच्या बोरिवलीचे अक्षांश रेखांश अर्थातच B वर क्लीक केल्यावर उपलब्ध होतील.
भारताबाहेरील स्थळांचे अक्षांश रेखांश दाखविणार्या वेबसाईटस तर फारच मोठ्या प्रमाणावर आहेत. त्याची माहिती www.earthtools.org ह्या लिंकवर मिळू शकेल.

संपूर्ण सीडी (७०० एम. बी.डेटा) पाठवायचीय ऑनलाईन?
याहू असो की जीमेल, आणि हॉटमेल असो की आणखी कुठली वेबमेल असो, तुम्ही तुमच्या ईमेलला जास्तीत जास्त किती एम.बी. ची फाईलAttach करणार याला मर्यादा असते. ही मर्यादा सर्वत्र १० एम.बी. पर्यंतचीच असते. ज्यावेळी ह्या मर्यादेपेक्षा मोठी फाईल पाठवण्याची वेळ येते तेव्हा मार्ग खुंटलेला असतो. आजकाल लग्ना-मुंजीला व्हिडीओ शुटींग करण्याची पद्धत रूढ आहे. अगदी साधे फोटो घेतले तरी त्यांनी एक आख्खी सीडी भरलेली असते. अशी एखादी संपूर्ण सीडी समजा ईमेलला अटॅच करून पाठवायची आहे, तर काय करायचं? ते शक्य आहे का? शक्य असेल तर त्याला काही खर्च येईल का? खर्च येणार असेल तर तो किती? असे वेगवेगळे प्रश्न ही चर्चा उपस्थित झाल्याने तुमच्या मनात डोकावले असणार.
तुमच्या प्रश्नांची ही घ्या उत्तरं.
१) संपूर्ण सीडीचा म्हणजे अदमासे ६५० ते ७०० एम.बी. चे व्हिडीओ शुटींग वा फोटोग्राफ्स वा कोणताही डेटा तुम्ही ऑनलाईन म्हणजे इंटरनेटचा वापर करून पाठवू शकता. होय, ते सहज शक्य आहे. मी स्वतः अनेकदा असा डेटा पाठवला आहे. अजुनीही पाठवत असतो.
२) असा १००० एम.बी. (होय, 1000 MB) पर्यंतचा डेटा पाठवायला शुन्य खर्च येतो. म्हणजेच, ही सुविधा इंटरनेटवर विनामूल्य उपलब्ध आहे. तुम्हीही त्याचा लाभ घेऊ शकता. तुमची आख्खी सीडी कोणत्याही ईमेल पत्त्यावर अटॅच करून पाठवू शकता.
आता तुमचा पुढला प्रश्न आहे- हे कसं करायचं?त्याचं उत्तरही सोपं आहे. हे काम पांडोकडून करून घ्यायचं.
तुमचा परत प्रश्न येणार की हा पांडो कोण?पांडो हे नाव आपल्या पांडू हवालदारसारखं भारतीय वाटत असलं तरी हा पांडो भारतीय नाही. तो अमेरिकन आहे. तुम्हाला जास्त कोड्यात न टाकता सांगून टाकतो की पांडो हा अमेरिकन माणूस नसून ते एक सॉफ्टवेअर आहे. हे सॉफ्टवेअर किंवा हा प्रोग्राम सर्वांसाठी मोफत आहे. तो उपलब्ध आहे http://www.pando.com/ ह्या साईटवर.
पांडो ची सध्याची आवृत्ती (Version) आहे २.३ ह्या २.३ आकड्यावरून तुमच्या लक्षात येईल की पांडो हा काही फार जुना प्रोग्राम नाही. तुमचा अंदाज बरोबर आहे. पांडो नेटवर्कस ही न्युयॉर्क येथील कंपनी मूळातच २००४ साली स्थापन झाली आहे. त्यामुळे हा प्रोग्राम जेमतेम ५ वर्षे वयाचाच आहे. पण त्या पहिल्या दोन वर्षांत त्याने चांगलं बाळसं धरलेलं आहे. pando.com वर जाऊन तुम्ही हा प्रोग्राम डाऊनलोड करून घ्या. तो केवळ ३ एम.बी. चा असल्याने काही मिनिटांत डाऊनलोड होतो आणि तेवढ्याच झपाट्याने आणि सहजपणे तो इंन्स्टॉलही होतो. हे इंन्स्टॉलेशन झाल्यानंतर तुमच्या कॉंप्युटरच्या तळाशी उजव्या बाजूला जेथे वेळ (time)दाखवलेला असतो तेथे लागून असलेल्या आयकॉन्समध्ये पांडोचा आयकॉनही आल्याचं तुम्हाला दिसेल. ह्या आयकॉनवर डबल क्लीक करा. पांडो उघडेल. तुम्हाला मेल पाठवायची असेल तर Share New वर क्लीक करा. पुढे तुमची फाईल अटॅच करा, मेल मध्ये जो संदेश लिहायचा तो लिहा, ज्याला ईमेल पाठवायची त्याचा ईमेल अड्रेस लिहा आणि Send वर क्लीक करा. पांडो अवजड फाईल्सही अतिशय झपाट्याने पाठवतो.
ज्याला तुम्ही फाईल पाठवलीत त्याला .pando ह्या प्रत्ययाची (extension) फाईल त्याच्या ईमेल पत्त्यावर मिळते. त्यानेही आपला पांडो उघडावा आणि फाईल डाऊनलोड करून घ्यावी. त्याच्याकडे पांडो नसला तर त्यानेही वर सांगितल्याप्रमाणे तो डाऊनलोड करून घ्यावा. पांडो कसा वापरायचा याचे उत्तम मार्गदर्शन पांडोच्या साईटवर आहे. वाटल्यास त्याची मदत घ्या. पण माझा अनुभव असा आहे की अगदी शाळकरी मुलं सुद्धा पांडोचा उपयोग पटकन समजून घेतात.
पांडो का खरच जबाब नही..

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)