१४ जून, २०११

जगातील पत्रकारांच्या हत्यांचा डेटाबेस ठेवणारे संकेतस्थळ

मुंबईच्या गुन्हेगारी जगताची बातमी गेले अडीच दशके देणारे ज्योतिर्मय डे या पत्रकाराची हत्या झाल्याची बातमी आपण सर्वांनीच वाचली आहे. आपल्याला त्याचा धक्का बसला कारण केवळ बातम्या देतो आहे म्हणून पत्रकाराचा जीव घेतल्याची उदाहरणे आपल्याकडे विरळा आहेत. हल्ले होणं, धमक्या दिल्या जाणं अशा बाबींची सवय आपल्या पत्रकारांना झालेली होती. पण डे यांच्या हत्त्येमुळे हल्ले आणि धमक्या यांच्या पुढले पाऊल आता पडले आहे की काय हे तपासून पाहण्याची वेळ सर्वच संबंधितांवर आली आहे.
खरं तर ही समस्या आज जगभर आहे, आणि जगभरच्या पत्रकारांच्या हत्त्या आणि त्यांचेवरील अन्याय यांचा लेखाजोखा ठेवणारी एक सामाजिक संस्था अमेरिकेत आहे. त्या संस्थेचे नाव आहे ‘कमिटी टू प्रोटेक्ट जर्नालिस्टस’ (CPJ). सीपीजे ‘ना नफा’ तत्त्वावर कार्य करीत असते. येणाऱ्या देणग्यांवर तिचा कारभार चालतो. कोणतीही सरकारी मदत वा अनुदान ही संस्था जाणीवपूर्वक घेत नाही. ही संस्था आपल्याकडल्या सरासरी पत्रकार संघांपेक्षा मोठी आहे. तिथे पूर्णवेळ काम करणारा 23 जणांचा स्टाफ आहे. सीपीजेने डे यांच्या हत्त्येचीही दखल घेतली आहे. ह्या संस्थेचे www.cpj.org हे संकेतस्थळ आपण अवश्य पहा. तेथील माहिती आणि वृत्ते वाचली की डोकं चक्रावून जातं. ही काही मासलेवाईक उदाहरणे पहाः 

काय फरक पडतो?

  यातला ज्ञानाचा मुद्दा सोडा, मनोरंजनासाठी जरी ह्या संकेतस्थळावर जाऊन मुशाफिरी केलीत तरी फरक पडेल. अनुभव घेऊन पहा.

“मला वाटलं..” आणि “काय फरक पडतो?” हे दोन शब्दप्रयोग आपल्या बोलण्यात नेहमीच येतात. “मला वाटलं..” मध्ये हमखास काहीतरी चूक वा गैरसमज झालेला असतो. आयुष्यात आपण इतक्या चुका ह्या “मला वाटलं …” नावाच्या खात्यात टाकलेल्या असतात की त्याचा हिशोब अशक्य असतो. आता हेच पहा नं की एव्हाना तुम्हाला वाटलं असेल की मी “काय वाटलं” किंवा “मला वाटलं” हा विषय आजच्या पोस्टसाठी घेतोय बहुधा. आपल्या वाटण्याचा स्पीड बघा किती असतो!
तर मंडळी, तुम्हाला वाटलं तसं नाही. आज मी बोलतोय ते ‘फरक’ पडण्याबद्दल. हा फरक आपल्याला काय फरक पडतो याबद्दलचा नसून आपल्या रोजच्या आयुष्यातल्या अनेक गोष्टींबद्दलचा आहे. उदाहरणार्थ, आपण एससीडी टीव्ही आणि एलईडी टीव्ही बद्दल आजकाल बोलतो, ऐकतो. काय फरक आहे LCD आणि LED मध्ये?