भारताचा माहिती तंत्रज्ञान कायदा १७ ऑक्टोबर २००० पासून अंमलात आला. मूळ कायद्याच्या मसुद्यात संसदेने काही महत्वाच्या सुधारणा २००८ साली केल्या. सदर सुधारणांसाठी माहिती तंत्रज्ञान सचिव ब्रिजेशकुमार यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती जानेवारी २००५ मध्ये नेमण्यांत आली.त्यात नॅस्कॉमचे तात्कालिन अध्यक्ष किरण कर्णिक यांच्यासारखे ह्या क्षेत्रातील सदस्य होते. ह्या समितीने ज्या सुधारणा सुचवल्या त्या नेमक्या कोणत्या, आणि त्या कशासाठी सुचविण्यांत आल्या याबाबत समितीने ऑगस्ट २००५ मध्ये संपूर्ण अभ्यास अहवाल माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला सुपुर्द केला. तो एकूण ५८ पानांचा आहे. ह्या क्षेत्रातील अभ्यासक तसेच विद्यार्थी यांचेसाठी संदर्भ म्हणून तो अत्यंत उपयुक्त आहे.
२००८ मध्ये संसदेने ह्या दुरूस्त्यांना मान्यता दिल्यानंतर ५ फेब्रुवारी २००९ रोजी राष्ट्रपतींनी सुधारित कायद्याला मान्यता दिली. त्यानंतर २७ ऑक्टोबर २००९ पासून सुधारितमाहिती तंत्रज्ञान कायदा २००८ अंमलात आला. सुधारित कायदा ह्या लिंकवर वाचन व डाऊनलोडींगसाठी उपलब्ध आहे
Khup Mast aahe mahiti Mi Aapala Abhari Aahe
उत्तर द्याहटवा