पूर्वी ह्या वेळा सामान्यतः पंचांगांमध्ये पाहिल्या जायच्या. आता आपल्याला इंटरनेट सहज उपलब्ध झाले आहे व त्या मानाने पंचांग दुर्मिळ झाले आहे. यातून हा प्रश्न आला आहे. ह्या वेळा पाहण्यासाठी अनेक वेबसाईटस असल्या तरी मीwww.timeanddate.com वरील http://timeanddate.com/worldclock/sunrise.html ही लिंक नेहमी वापरतो. भारतातील अनेक महत्वाच्या शहरांतील सुर्योदय, सुर्यास्त, चंद्रोदय व चंद्रास्ताच्या वेळा इथे पहायला मिळतात. महाराष्ट्रातील मुंबई व पुणे, ह्या शहरांचे हे तपशील इथे उपलब्ध करण्यांत आले आहेत. त्यात कोणत्याही दिवशीचे सुर्योदय, सुर्यास्त, चंद्रोदय व चंद्रास्ताच्या वेळा आपल्याला मोफत पहायला मिळतात. आपल्याला साधे रजिस्ट्रेशन देखील करायला सांगितले जात नाही हा भाग महत्वाचा आहे. इतर साईटसवर जेथे हा तपशील मिळू शकतो तेथे हमखास आपल्याला रजिस्ट्रेशनची कटकट सहन करावीलागते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा