२० फेब्रु, २०११
डोमेन नेमचा आणखी एक गंमतीदार किस्सा..
डोमेन नेम अर्थात वेबसाईटचे नाव. जसे ednyan.com किंवा google.com वगैरे वगैरे.गेल्या वीस वर्षात लाखो डोमेन्स नोंदले गेल्याने, क्वचित एखादा अपवाद वगळता आता एका शब्दाचे डोमेन नेम उपलब्धच नाही. त्यामुळे दोन वा तीन शब्द जोडून आपल्याला हवं तसं डोमेन नेम नोंदविण्याची स्पर्धा सध्या चालू आहे. त्यातून पोट धरधरून हंसविणारे किस्से घडतात. तसाच हा एक घडलेला किस्सा...
डॉक्टर.कॉम बुक आहे. कॉलडॉक्टर.कॉम पण बुक आहे. डॉक्टरकॉल.कॉम सुद्धा उपलब्ध नाही. मग मंडळी आणखी एक शब्द जोडू पाहतात.दिडॉक्टरकॉल.कॉम करून ते डोमेन नेम मिळतय का ते बघतात. ह्या पद्धतीत कुठेही कॉमा म्हणजे स्वल्पविराम वापरता येत नाही. त्यामुळे शब्द एकमेकांना जोडून येतात आणि वाचताना ते कोणीही कुठेही तोडू शकतो. समजा thedoctorcall.com असेल तर th edoctor call किंवा thedoc torc all असंही कोणी वाचू शकतो.
आता गंमत कशी होते पहा. वैद्यक क्षेत्रातील वेगवेगळे थेरॅपिस्ट शोधून देणारी एक साईट आहे. पण त्यांना हवं असलेलं Therapist.com हे डोमेन नेम उपलब्ध नाही. म्हणून शेवटीtherapist finder असं सोपं नाव दोन शब्द जोडून त्यांनी घेतलं. therapistfinder.com अशी वेबसाईट आजही इंटरनेटवर उपलब्ध आहे. पण डोमेन नेम वाचणारांनी ते the rapist finder असं वाचलं की बोंब. अर्थाचा अनर्थ आणि लाखाचे बारा हजार.
आता खरोखरीच therapistfinder.com ही साईट उघडा. पहा त्यावरची ही हेडींग्जः
Tis The Season to Be Stressed - TherapistFinder.com Offers Tips to Holiday Happiness. (???)
Depression Screening Now Recommended for All Teens, Not Just Those Who Appear at Risk. (!!!)
Do You or a Friend Need Help Urgently?
Family Problems Come in All Shapes and Sizes (अबब, काय हे...)
अहो, हा काल्पनिक विनोद नाही. खरंच therapistfinder.com उघडून वाचून बघा. खात्री केल्याशिवाय हंसू नका. वुई आर सिरीयस..ओके?
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा