२० फेब्रु, २०११

गजराचं घड्याळ ऑनलाईन आणि ऑफलाईन

http://www.kukuklok.com/ ही म्हंटलं तर एक वेबसाईट आहेपण खर्‍या अर्थाने ती फक्त एक गजराचं घड्याळ आहे. हे गजराचं घड्याळ तुमची इंटरनेट लाईन चालू असताना आणि मुख्य म्हणजे चालू नसतानाही चालतं. रात्री झोपताना तुम्ही गजर लावलात आणि मध्यरात्री कधीतरी इंटरनेट कनेक्शन बंद झालं तरीkukuklok चा गजर वेळच्या वेळी होतो. 
हे गजराचं घड्याळ वापरायला सोपं आहे. आपल्याला हवा तो वेळ सेट करायचा आणि नंतर SET ALARM वर क्लीक करायचं. हे डिजिटल घड्याळ असल्याने कोणत्याही मिनिटापर्यंत आपल्याला गजर लावता येतो. गजराचे एकूण चार आवाज कूकूक्लॉक ने दिले आहेत. पहिला आहे कोंबड्याची भली मोठी बांग. दुसराघड्याळाचा नेहमीचा कीर्रर्रर्र करून वाजणारा आवाजतिसरा इलेक्ट्रॉनिक गजराचा आवाज आणि चौथा गिटार ह्या वाद्याचा आवाज. आपल्याला हवा तो आवाज निवडून आपण गजर लावू शकतो. ह्या घड्याळाला साईटवाल्यांनी Swiss Made असं म्हंटलं आहे. ते काहे समजायला त्यांनी मार्ग ठेवलेला नाही. पण त्याने काही बिघडत नाही कारण अपनेको आम खाने से मतलब आहे. गजर बरोबर होणं महत्वाचं. 
खास टीपः ही साईट केवळ एका पानाची आहे. हे पान तुमच्या ब्राऊझरच्या File मेनूमध्ये जाऊन आणि नंतर Save as.. वर क्लीक करून html (Complete) फाईल म्हणून सेव्ह करा. हे पान सेव्ह करताना त्याबरोबर Online Alarm Clock_files नावाचं एक फोल्डर आपोआप सेव्ह होतं. त्या फोल्डरमध्ये जा. तिथे klok नावाची फ्लॅश फाईल मिळेल. ही फाईल फक्त ७८ के.बी. इतकी छोटी आहे. ही फाईल म्हणजेच ते अलार्म क्लॉक आहे. त्या फाईलवर डबलक्लीक केलं की ते गजराचं घड्याळ उघडतं. इंटरनेट असो वा नसो. गजर लावता येतोझालेला गजर थांबवता येतो. हवी ती वेळ आणि हवा तो आवाज अर्थातच निवडता येतो. फक्त ७८ के.बी. च्या एका फाईलमध्ये एवढं सगळं साठू शकलं याचं श्रेय आजच्या प्रगत फ्लॅश टेक्नॉलॉजीला. त्या फोल्डरमधल्या इतर (जावास्क्रीप्ट वगैरे) फाईल्सचा त्या घड्याळाला तसा काहीच उपयोग नाही. हव्या तर त्या डिलीट करून टाका. हे गजराचं घड्याळ कोणालाही ईमेलने पाठवता येणं शक्य आहे. प्रत्यक्ष प्रयोग करून पहा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा