आपल्या मुलासह सलमान खान |
दुसरी गोष्ट सलमानने आपल्या वेबसाईटवर स्वतःशीच एक संवाद साधला आहे. त्याला म्हणताना FAQ म्हंटलं असलं तरी एखादी मुलाखत वाचावी असा तो संवाद आहे. एका मूळ इंग्रजी प्रश्नाचे हे भाषांतर पहाः
तुम्हाला ह्या उपक्रमाचे रूपांतर व्यवसायात करण्याची इच्छा आहे का? समजा एखाद्या व्हेंचर कॅपिटल कंपनीने तुम्हाला तशी ऑफर दिली वगैरे तर...?
सलमान खानः तशा ऑफर्स मला खूप आल्या. पण मलाच ते रूचत नाही. ज्यावेळी मी 80 वर्षांचा होईन, तेव्हा मला हे समाधान मिळालं की जगातील अब्जावधी विद्यार्थ्यांना मी उत्तम दर्जाचं शिक्षण उपलब्ध करून दिलं, तर ते मला अधिक आवडेल. शिक्षणाचा धंदा सुरू करण्यापेक्षा मला ते अधिक महत्त्वाचं वाटतं. जगातला असा वर्ग की जो अगोदरच पुढारलेला आहे, त्याच्याकडून दरमहा 19.99 डॉलर फी घ्यायची, धन कमवायचं, आणि मग शेवटी आपली कंपनी कुठल्या तरी मोठ्या कंपनीला प्रचंड किंमतीला विकून टाकायची यात ते समाधान नाही. मला काय कमी आहे, सुंदर बायको, ज्याच्या बरोबर रमून जावं असा मुलगा, दोन होंडा गाड्या, एक सुंदर घर माझ्याकडे आहे. आणखी काय हवं?
खान अॅकॅडमीचं भविष्यातील ध्येय्य काय आहे?
सलमान खानः माझी खान अॅकॅडमी हे जगातील पहिलं मोफत शिक्षण देणारं वर्ल्ड क्लास व्हर्च्युअल स्कुल व्हावं हे माझं स्वप्न आहे. म्हणजे अशी शाळा की जिथे जगातील कोणालाही उत्तम दर्जाचं शिक्षण मोफत मिळेल. माझं ध्येय्य म्हणाल तर मरेपर्यंत असे शिक्षणासाठीचे व्हिडिओ तयार करत रहावं हे माझं ध्येय्य आहे. मी पुढली किमान 50-60 वर्षे तरी मरणार नाही असा माझा अंदाज आहे. इयत्ता पहिली ते बारावी साठीच्या प्रत्येक शाळकरी विषयावरचा व्हिडिओ मला तयार करायचा आहे.
सलमानची ही मूळ प्रश्नोत्तरे इंग्रजीत वाचायची असतील तर ह्या दुव्यावर जरूर जा.
तर असा हा सलमान खान. भविष्यातलं जग तरूणांचं आहे, म्हणजे नेमकं काय आहे हे तुमच्या मित्रमैत्रिणींना समजवायचं असेल तर, त्यांना असाही एक सलमान खान चे भाग एक ते तीन वाचायला सांगा. पुढे आणखी कोणताही प्रश्न शिल्लक राहणार नाही.
- (वाचकहो, आपल्याला सलमान खानच्या ह्या प्रयोगाबद्दल काय वाटले ते ह्या लेखाखालील कॉमेंटसच्या जागेचा उपयोग करून जरूर कळवा. कॉमेंटसविना कोणताही ब्लॉग हा पाण्याविना झा़डानं सुकावं तसा सुकत असतो. कॉमेंटसचे खत-पाणी संगणक डॉट इन्फो ला हवं आहे. - माधव शिरवळकर)
Its Amazing.....
उत्तर द्याहटवाMadhav Sir....Its really amazing and unbelievable.
1)When we see in country like India millions of poor rural children struggling for quality education that will give them knowledge and a way for earnings. And contradictory part institutions and lot much of private colleges making "DHANADA" and use eduacation like a prostitutes by Politicians.
2)And in USA one person working for a cause without any profit..wow..
means where social work is profitable business and selling it in "NGO".
And where legally education is business there it is happening.
3)Really it ensures that there are some people who think for Humanity and for evil prosperity.
4)Last Mr. Khan Should be nominated for Nobel
And I really congratulate him and thankful to him.
आपण खरंच नेमका मुद्दा पकडला आहे. आपल्या देशात असे सलमानखान हवेत, तर तिथे शिक्षण तोळ्याच्या भावात गेले आहे. पण, निराश कशाला व्हा. हळू हळू आपल्यालाही हे जाणवू लागलंच आहे की. तुमचीच कॉमेंट किती उत्स्फूर्तपणे आली आहे! तुमच्यासारखे अनेक आहेत, ते सगळेच कॉमेंट लिहीत नाहीत, किंवा लिहू शकत नाहीत. पण त्यांचा मनोप्रवास तुमची कॉमेंट ज्या दिशेने विचार करीत आहे, त्याच दिशेने चालला असेल यात शंका नाही...
उत्तर द्याहटवातुमच्या कॉमेंटबद्दल आभार.
वाचून अवाकच झालो. ग्रेट!! आपल्या देशात तर शिक्षणाचा बाजारच मांडला गेला आहे आणि शाळाही पालकांना ह्या ना त्या कारणांने नाडत आहेत. सगळ्यात बेकार म्हणजे अलीकडे टी व्ही वर so called मनोरंजनाचे खेळ पाहून पालकांना ही आपला मुलगा "सलमान खान" (दबंग वाला) व्हावा असे वाटते. ह्या आगळ्यावेगळ्या सलमान खान ची माहिती जास्तीत जास्त लोकां पर्यंत पोहोचली पाहिजे. प्रथमता तुमचे आभार. आणि हे सर्व जास्तीत जास्त लोकां पर्यंत पोहोचविण्याचा श्री गणेशा आत्ताच करतो.
उत्तर द्याहटवा--शैलेश खोत
Great.......
उत्तर द्याहटवाSalman Khan is very great man as well as teacher. Shirvalkar sir, I am very thankful to You. You give us information about really HERO.
abhinadan! v aabhar!!
उत्तर द्याहटवाKhoopach sundar, ase kalandar aapalya deshat vhavet v ya matrubhumiche pang phedavet ashi prarthan tya parameshwarala...
sir, te video marathit upalabdh zale ki blog var post kara. Mi shikshak aahe. Mala tyancha upyog hoil.
उत्तर द्याहटवाThis is a glory of behind the moon to reach every student of this way. iqbal sir.
उत्तर द्याहटवाFantastic Information...thanks a lot.....I have seen 15 vdos(Maths) on the spot.What an information sir...I am a pricipal of Gujarati medium School and Maths teacher too.The way u write is the key of attraction.Wish u good luck and guide me further....thanx a LOT
उत्तर द्याहटवाशिरवाळकर सर,
उत्तर द्याहटवाआपण खुपच उत्तम माहिती दिली आहे. भारतातल्या आपल्या भावी पिढीला याचा नक्कीच उपयोग होईल. आभारी आहे.
रामदास पवार
उत्तम माहिती आहे. धन्यवाद !
उत्तर द्याहटवा