रूथ रेमिरेझ उर्फ टुटी, शिकागो शहरात राहणारी 26 वर्षीय तरूणी. डोकं गरम. रात्री लेग रूम नावाच्या क्लबात गेली. तिथं तिचा दुसऱ्या एकीशी राडा झाला. रूथ एकदम रूथलेस झाली. तिनं हात उचलला. तो उचललेला हात त्या दुसरीनं झटकून खाली केला. रूथच ती. डबल रूथलेस झाली. गेली आणि कुठून तरी एक काच उचलून आणली. घातली ती काच त्या दुसरीच्या डोक्यात. दुसरीची हालत खराब. 32 टाके पडले तिच्या डोक्यात. मग रूथ कशाला तिथे थांबते. ती सटकली. . पुढे?
मनोरंजन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा

६ मे, २०११
अशीही एक WTO - World Toilet Organisation
![]() |
| हा WTO चा ऑफिशियल मोनोग्राम आहे. |
स्वतःचा उल्लेख WTO असा करणारी ही वर्ल्ड टॉयलेट ऑर्गनायझेशन आहे सिंगापूरमध्ये. ना नफा तत्त्वावर चालणारी ही संस्था 2001 मध्ये स्थापन झाली, तेव्हा तिचे सदस्य होते फक्त 15. आज 2011 मध्ये जगभरच्या 58 देशांत मिळून त्यांचे 235 सदस्य आहेत..ह्या WTO चे कार्यही लक्षणीय आहे. 19 नोव्हेंबर हा दिवस ते जागतिक टॉयलेट दिवस म्हणून साजरा करतात. (भन्नाट माहिती..)
१८ मार्च, २०११
एक गंमतः थंड डोक्याचा Search..
तुम्ही Google Images वर जा, आणि सर्च करा 241543903.
हो, फक्त तेवढा तो नऊ आकडी आकडा सर्च करा. थंड डोक्यानी..
बघा, तुम्हाला पाव सेकंदात किती रिझल्टस मिळतात ते. एकूण 15500 रिझल्टस मिळतात.
पण तुम्ही विचाराल की ह्या आकड्यात आहेत कसल्या इमेजेस?

११ मार्च, २०११
गोंधळात टाकणारे 200 इंग्रजी शब्द
इंग्रजी ही भाषा सरळ आहे. पण सरळ चालताना मध्येच निसरडं यावं, आणि घसरून पडण्याचा धोका वाटावा असे काही शब्द इंग्रजीत आहेत. ते कोड्यात टाकतात, आणि गोंधळवूनही टाकतात.
उदाहरणार्थ हे पहाः
LATER आणि LATTER
किंवा
MATERIAL आणि MATERIEL
आणखी एक पहा,
RIFFLE आणि RIFLE
आता नेहमीचे काही शब्द - PRINCIPAL आणि PRINCIPLE, किंवा QUIET आणि QUITE वगैरे आपण काळजी घेऊन लिहीत असतो. पण एवढ्या वर्षांच्या इंग्रजी वाचन, लेखन, संभाषण केल्यानंतरही त्यातले काही सटकलेले असतातच.
अशा शब्दांच्या 200 हून अधिक जोड्या ह्या संकेतस्थळावर दिल्या आहेत. त्यांचे अर्थ कसे वेगळे आहेत, आणि वाक्यात त्यांचा उपयोग कसा होत असतो हे नीट दाखवले आहे.
इंग्रजीची काळजी घेणाऱ्या मंडळींना ह्या लिंकवर निश्चितच जावसं वाटेल. त्या 200 जोड्यांपैकी किती आपल्याला माहीत होत्या, आणि किती माहीत नव्हत्या हे पहाणं म्हणजेही स्वतःची स्वतःच परीक्षा घेतल्यासारखंही आहे.
हे पाहता पाहता एकीकडे ज्ञानही मिळतं, आणि मनोरंजनही होतं.

७ मार्च, २०११
हिंदी गाण्यांची माहीत असलेली वेबसाईट.. माहीत नसणाऱ्यांसाठी
हिंदी गाणी. नवी जुनी.
क्लीक केल्यावर गाणं दिसतं आणि ऐकताही येतं.
होय, इंटरनेट वरचं छायागीतच जवळ जवळ.
लता, आशा, सुमन कल्याणपूर, अनुराधा पौडवाल, कविता कृष्णमुर्ती, गीता दत्त, सुरैय्य़ा, शमशाद बेगम पासून ते श्रेया घोषाल, सुनिधी चौहान, अलका याज्ञिक, साधना सरगम वगैरे गायिकांची विविध चित्रपटांतील छान छान गाणी.
दुसरीकडे, किशोर, रफी, मन्ना डे, गुलाम अली, हेमंत कुमार, महेंद्र कपूर, कुंदनलाल सैगल, सुरेश वाडकर, तलत महमूद, मुकेश ही नावं, तर त्यांच्याच जोडीला उदित नारायण, कुमार सानू, अभिजित, केके, सुखविंदर सिंग, कुणाल गांजावाला, शंकर महादेवन, अदनान सामी, महंमद अझीज, अमित कुमार ही सुद्धा. एस.पी. बालसुब्रमण्यम, जगजित सिंग, हरीहरन, पंकज उधास ही नावं देखील.
संगणकावर बसून काम करताना एका बाजूला गाणी ऐकत रहावं, स्वतःला सुखवावं आणि एकाग्रताही राखावी यासाठी एक छान साईट.
ही घ्या लिंकः
http://www.hindigeetmala.com/singer/
गंमतीचे क्षण..
![]() |
| आभारः माझा वर्गमित्र प्रविण कुलकर्णी अशा गंमतीदार लिंक्स वर्षभर पाठवत असतो. त्यातलीच ही एक लिंक. |
इंटरनेटवर काही गंमतीचे क्षण शोधता येतात.
आता उदाहरणार्थ मला एक वेब पेज माहीत आहे. हे पान तुमच्या स्क्रीनवर अवतरू लागलं की तुम्हाला जे दृश्य दिसतं त्याने तुमच्या गालावरची खळी हलते. तुमचा शीणलेला मेंदू मनापासून हंसू लागतो. हे कसं घडतं? कोणताही विनोद नाही. शब्द नाहीत. कोणाचाही चेहेरा नाही. कसलही कार्टून नाही. तरी पण तुम्ही हंसता, गंमत वाटते म्हणून सुखावता.
असं काय घडतं?
ते पान अवतरताच तुमच्या स्क्रीनवर सर्वात वरच्या डावीकडील कोपऱ्यातून शे दीडशे माणसं धावत येतात. ह्या माणसांना चेहेरे नाहीत. नुसत्या सावलीवजा चिमुकल्या नग्न आकृत्या. जिवंत माणसांच्या. ही माणसं तुमच्या स्क्रीनवर धावत येऊन काय करतात?
भरपूर प्रशिक्षण घेतल्याप्रमाणे ते आपापल्या जागी जाऊन गोल करतात. काही जण त्या गोलात थांबतात आणि घड्याळाचे काटे होतात. काही जण मिळून तास काटा बनवतात. काही मिनिट आणि काही सेकंद काटा असल्याने धावत राहतात. हो आणि ते असं बनलेलं माणसांचं घड्याळ वेळ मात्र बरोबर दाखवतं.
तुम्ही त्या घड्याळाकडे पहात राहिलात तर सेकंद काटा तुमच्यासमोर फिरत राहतो. एक मिनिट संपून साठ सेकंदांची पळापळीची राऊंड संपली की आतली माणसं गॅसचे रंगबिरंगी फुगे सोडून एक मिनिट गेल्याचा आनंद सुद्धा व्यक्त करतात.
असं हे घड्याळ काही क्षण पाहिलं आणि एक दोनदा ते रंगीत फुगे सुटून आभाळात निघून गेले की आपण सुखावतो, आणि आपल्या पुढल्या कामाला लागतो.
बघा प्रयोग करून.. ते वेब पेज, आय मीन ती लिंक हवीय ना, ही घ्याः
http://lovedbdb.com/nudemenClock/index2.html
५ मार्च, २०११
टक्स पेंटची सही धम्माल. भाग - 3
(एकूण तीन भागात टक्स पेंटची माहिती आली आहे. ही माहिती आपण भाग 1 ते भाग 3 अशी क्रमाने वाचावी अशी विनंती आहे. हा तिसरा भाग आहे.पहिल्या आणि दुसऱ्या भागाच्या लिंक्स इथे आणि त्या त्या भागाच्या खाली दिल्या आहेत. त्यावर क्लीक करून पुढे जाता येईल. )
- मुलांनो,
तुम्ही छान चित्र काढलीत तर ती सेव्ह करायला विसरू नका.
सेव्ह केलीत की तुमच्या चित्राची फाईल अटॅच करून आपल्या संगणक डॉट इन्फो कडे sanganakinfo@gmail.com ह्या ईमेलवर जरूर पाठवा. सोबत तुमचा एक छान फोटो सुद्धा पाठवा.
छान चित्रे काढणाऱ्या मुलांची नावे आणि त्यांचे फोटोसुद्धा आपण संगणक डॉट इन्फो वर प्रसिद्ध करणार आहोत. आहे ना धम्माल...आणि हो, ही चित्रे तुम्ही केव्हाही पाठवू शकता. पुढल्या महिन्यात किंवा त्याच्या पुढल्या महिन्यात सुद्धा. शिवाय कितीही चित्रे तुम्ही पाठवू शकता. त्यामुळे आता आपली स्कुलची परीक्षा असेल तर घाई करू नका. आता परिक्षेची तयारी करा. परीक्षा संपली की मगच टक्स पेंट उघडा. आता सगळा वेळ अभ्यास करा. सुट्टीत आपला संगणक आणि आपला टक्स पेंट, करा हवा तेवढा एंजॉय.. - सो, सगळं जग तुमचं चित्र आणि तुमचा फोटो पहायला उत्सुक आहे. आहे ना मज्जा!! चला तर, लागा कामाला! हॅप्पी टक्स पेंट टू यू ऑल कीडस..
- आणि, बेस्ट ऑफ लक फॉर युवर एक्झाम्स... बाय
एंजॉय टक्सपेंटः मुलांसाठी धम्माल गेमः भाग - 2
(एकूण तीन भागात टक्स पेंटची माहिती आली आहे. ही माहिती आपण भाग 1 ते भाग 3 अशी क्रमाने वाचावी अशी विनंती आहे. हा दुसरा भाग आहे.पहिल्या आणि तिसऱ्या भागाच्या लिंक्स इथे आणि त्या त्या भागाच्या खाली दिल्या आहेत. त्यावर क्लीक करून पुढे जाता येईल. )
टक्स पेंट उघडताच प्रोग्रामचे चित्र तुमच्या समोर येईल. त्यावर एकदा क्लीक करा. खाली दाखवलेली विंडो तुमच्या समोर हाजिर होईल.
आता ह्या विंडोत तुम्हाला हवं ते करण्याची मुभा आहे. बाकी सारं आपल्या नेहमीच्या पेंट ब्रश सारखंच आहे. फक्त आपल्याकडे असलेले वेगवेगळे रबर स्टॅप्स वापरून वेगवेगळी मजा आपल्याला आणि आपल्या बच्चे कंपनीला करता येते.
वरील Paint टूल वर क्लीक करा आणि रेघोट्या मारा. किंवा, Stamp टूलवर क्लीक करून उजवीकडे कोणकोणती चित्रे उपलब्ध होतात ते पहा. आता त्यातून मुलांच्या डोक्यातून कशा वेगवेगळ्या कल्पना तयार झाल्या ते खालील चित्रांवरून तुमच्या लक्षात येईल.
पूर्ण आकारात ही आणि आणखी शेकडो चित्रे पहायची असतील तर टक्स पेंटच्या साईटवरील गॅलरी पहायला हवी. त्यात वरील चित्र तुम्हाला पूर्ण आकारात पाहता येईल.
आणि, हो, आणखी एक गंमत आहे. ती पाहू टक्स पेंट धम्माल च्या भाग 3 मध्ये.
लहान मुलांसाठी धम्माल 'टक्सपेंट' : भाग -१
(एकूण तीन भागात टक्स पेंटची माहिती आली आहे. ही माहिती आपण भाग 1 ते भाग 3 अशी क्रमाने वाचावी अशी विनंती आहे. हा पहिला भाग आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या भागाच्या लिंक्स त्या भागाच्या खाली दिल्या आहेत. त्यावर क्लीक करून पुढे जाता येईल. )
पेंट ब्रश हे छोटसं पिल्लू मानलं तर टक्स पेंट त्याच्या पुढे हत्तीसारखा आहे. दोघांमध्येही भरपूर रंगपंचमी करता येते. कधी कधी तर मोठी माणसंही टक्स पेंट खेळता खेळता मुल होऊन रमलेली दिसतात.
पुढलं काही सांगण्याअगोदर हा टक्स पेंट प्रथम डाऊनलोड करून घ्या. त्यासाठी ह्या दुव्यावर क्लीक करा. टक्स पेंटचा डाऊनलोड दोन भागात आहे. पहिला भाग म्हणजे टक्स पेंट हे अॅप्लीकेशन अर्थात मूळ प्रोग्राम. तो 11 एम.बी. चा आहे. दुसरा भाग हा टक्स पेंट साठी अॅड ऑन म्हणजे त्यात भर टाकणे आहे. ह्या अॅड ऑनमध्ये वेगवेगळ्या प्राण्यांची, फुलांची, पदार्थांची, पक्षांची वगैरे वगैरे रेलचेल आहे. ती मुलांना खूप आवडते. हा अॅड ऑन मूळ प्रोग्रामच्या तिप्पट मोठा म्हणजे 39 एम.बी. चा आहे. तो डाऊनलोड करण्यासाठी ह्या दुव्यावरच उपलब्ध आहे. याच पानावर मूळ प्रोग्रामच्या उजवीकडे शेजारीच याच्या डाऊनलोडींगचीही लिंक दिलेली आहे.
थोडक्यात, 11 एम.बी. चा मूळ प्रोग्राम आणि 39 एम.बी. चे अॅड ऑन (याला रबर स्टॅंप्स असं म्हणतात) प्रथम डाऊनलोड करून घ्या.
टक्स पेंटचं वैशिष्ट्य म्हणजे तो अधिकृतपणे आणि पूर्णपणे मोफत आहे. दुसरी गोष्ट त्याचे कोड ओपन सोर्स प्रकारचे म्हणजे खुले आहे. जर तुम्ही संगणक व्यावसायिक वा प्रोग्रामर असाल तर टक्स पेंट ला तुम्ही तुम्हाला हवा तसा आकार देऊ शकता. समजा, प्रोग्रामर नसाल, तर टक्स पेंट जसा आहे तसा वापरा. त्यात मुलांसाठी प्रचंड आनंद भरलेला आहे.
टक्स पेंट ची आणखी माहिती घेऊ पुढल्या भागात, म्हणजे भाग - 2 मध्ये.
३ मार्च, २०११
राष्ट्रपतींची खास गाडी
![]() |
| आपल्या राष्ट्रपतींचा आलिशान प्रवास. प्रेसिडेन्शियल सलून मधील एक कोपरा. |
राजधानी एक्सप्रेसपासून ते पॅलेस ऑन व्हील्सपर्यंत आणि फ्लाईंग राणीपासून ते डेक्कन क्वीनपर्यंत अनेक रेल्वे गाड्या आपण ऐकल्या आहेत. त्यांना इतिहास वगैरे असू शकतो असं कधी आपल्या मनात आलेलं नसतं. पण एक खास ऐतिहासिक म्हणावी अशी गाडी मात्र आपण फारशी ऐकलेली नाही. ती गाडी म्हणजे 'प्रेसिडेन्शियल सलून' अर्थात फक्त भारताच्या राष्ट्रपतींची आणि फक्त त्यांच्यासाठीच सदैव राखीव असलेली गाडी. ही गाडी फक्त दोन डब्यांची आहे. १९५६ साली बांधण्यात आलेले हे आलिशान डबे नवी दिल्ली स्टेशनात कायम उभे असतात. ह्या दोन डब्यांमध्ये राष्ट्रपतींची बेडरूम, लाँजरूम, व्हिजिटर्स रूम, कॉन्फरन्स रूम असा लवाजमा एकीकडे आहे. दुसरीकडे राष्ट्रपतींचे सचिव व इतर कर्मचारी यांचेसाठी काही केबीन्स आहेत. हे दोन्ही डबे सागाच्या फर्निचरने तसेच रेशमी पडद्यांनी सजवण्यांत आले आहेत. 'प्रेसिडेन्शियल सलून' ची परंपरा फार जुनी आहे. १९ व्या व २० व्या शतकात भारताच्या इंग्रज व्हाईसरॉयने त्याचा उपयोग केला होता. १९२७ पर्यंत इंग्रजांची भारतीय राजधानी कलकत्ता येथे असल्याने हा 'प्रेसिडेन्शियल सलून' कलकत्त्यात उभा असे. १९२७ मध्ये इंग्रजांनी राजधानी दिल्लीत हलवल्यानंतर तो दिल्ली येथे आणण्यात आला. अत्यंत आलिशान अशा ह्या गाडीत पर्शियन गालिचे वगैरे वैभवी सजावट होती. ही गाडी वातानुकूलित नव्हती, पण आत गारवा कायम रहावा यासाठी त्यात खास पद्धतीचे पडदे लावण्यांत आले होते. गाडीत चोवीस तास गरम व थंड पाण्याची सोय करण्यांत आली होती. ही गाडी स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी १९५० साली प्रथमच वापरली. त्यानंतर आलेल्या राष्ट्रपतींनीही त्याचा वापर केला. राष्ट्रपतींची मुदत संपल्यानंतर त्या गाडीतून त्यांना त्यांच्या गावापर्यंत सोडण्याचा एक प्रघात त्यानंतर पडला. ह्या प्रघातानुसार गाडी वापरणारे शेवटचे राष्ट्रपती म्हणजे डॉ. संजीव रेड्डी. त्यांनी १९७७ साली राष्ट्रपती भवनाचा निरोप घेताना ही गाडी वापरली. त्यानंतरच्या काळात सुरक्षेच्या कारणास्तव ही गाडी राष्ट्रपतींनी वापरली नाही. १९७७ ते २००३ ह्या २६ वर्षांच्या काळात ही गाडी नुसती उभी होती. नुसती उभी असली तरी तिची निगा उत्तम प्रकारे सांभाळण्याची पद्धत आहे. आपले मागील राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनी ही गाडी हरनौत ते पटणा ह्या ६० किलोमीटरच्या प्रवासासाठी वापरली. त्यासाठी ह्या गाडीच्या सजावटीचे खास नूतनीकरण करण्यांत आले होते. त्याचाच एक भाग म्हणून गाडीत प्रगत तंत्रज्ञानाने व उपग्रह यंत्रणेने युक्त अशी आधुनिक संपर्क साधनेही डॉ. कलाम यांच्यासाठी बसविण्यांत आली होती. त्यानंतर मात्र आता गेली सुमारे ५ वर्षे 'प्रेसिडेन्शियल सलून' नवी दिल्लीत शांतपणे उभे आहे. नव्या राष्ट्रपती महाराष्ट्राच्या प्रतिभाताई पाटील ह्या 'प्रेसिडेन्शियल सलून' मध्ये कधी बसतील का हे पहायचं.
(अधिक माहितीसाठी ह्याच ब्लॉगवरील हा दुवा पहा)
२१ फेब्रु, २०११
ड्व्होरॅक (Dvorak) कीबोर्ड
माणूस परंपरेने चालत असतो असं म्हणतात. काँप्युटरचा कीबोर्ड हे एका परंपरेचच प्रतीक आहे. कीबोर्डची ही परंपरा चालत आली आहे १८७२ सालापासून. म्हणजे कीबोर्डच्या परंपरेला आता १३३ वर्षे झाली. संगणकाचा जो कीबोर्ड आज आपण वापरतो त्याला QWERTY कीबोर्ड असं म्हंटलं जातं. कीबोर्डवर अक्षरांची जी सर्वांत वरची बटणं असतात त्यात QWERTY ही ओळीने पहिली सहा अक्षरं. कीबोर्डवरील अक्षरांची ही रचना आणि पहिला टाईपरायटर तयार केला ख्रिस्तोफर शोल्स ह्या अमेरिकन माणसाने. १८७२ साली शोल्सने त्याचे पेटंट रेमिंग्टन ह्या टाईपरायटर कंपनीला १२००० डॉलर्सना र्विकून टाकले. तेव्हापासून शोल्सने तयार केलेली QWERTY कीबोर्डवरील अक्षरांची रचना काहीही बदल न होता जशीच्या तशी चालत आली आहे. काँप्युटरच्या कीबोर्डनेही शोल्सची ही रचना स्वीकारली आणि ती आता जगभर चालू आहे.
ख्रिस्तोफर शोल्स हा मूळचा एक पत्रकार. १८४५ साली तो 'साऊथपोर्ट टेलिग्राफ' नावाच्या एका छोट्या वृत्तपत्राचा संपादक होता. शोल्स पत्रकार असला तरी त्याच्या पिंडात एक संशोधक भिणलेला होता. तंत्रज्ञानविषयक त्याचे काही ना काही उद्योग सतत चाललेले असतं. कागदावर पान क्रमांक छापण्याचे जे छोटे यंत्र होते त्या यंत्राच्या आधारावर क्रमांकांच्या जागी अक्षरे टाकून त्याने एक मिनी टाईपरायटर तयार केला होता. आपल्या ह्या संशोधनाचं पेटंटही शोल्सने १८६४ साली नोंदवलेलं होतं. टाईपरायटरच्या ह्या टप्प्यापर्यंत QWERTY अक्षररचना शोल्सच्या स्वप्नातही नव्हती. पुढे १८६८ साली त्याने टाईपरायटरचं आणखी एक यंत्र तयार केलं आणि त्याचं पेटंटही आपल्या नावावर नोंदवलं. ह्याच दरम्यान कधीतरी QWERTY अक्षररचना तयार झाली.
खरं तर शोल्सने टाईपरायटरचा जो पहिला प्रयत्न केला होता त्यातली अक्षररचना ABCDEFG अशी क्रमाने म्हणजे अकारविल्हेच होती. ह्या पद्धतीने असलेल्या टाईपरायटरमधील अक्षरांचे दांडे टाईप करताना एकमेकात अडकत असतं. हे दांडे एकमेकात अडकले की टायपिस्टचं काम थांबत असे. टायपिस्टला ते अडकलेले दांडे हाताने सोडवावे लागत आणि मग पुन्हा टायपिंग सुरू करावे लागे. ह्या दोषावर मात करण्याचा प्रयत्न शोल्स आणि त्याचा व्यवसायातला भागीदार जेम्स डेन्समोर हे दोघे करीत होते. टायपिंग करताना नेमक्या कोणत्या अक्षरांच्या दांड्या वारंवार अडकतात याचे निरीक्षण डेन्समोरने केले. त्या निरीक्षणातून वारंवार अडकणार्या अक्षरांच्या दांड्यांच्या जागा त्यांनी बदलून पाहिल्या. अशा प्रकारे जागा बदलल्याने मूळची ABCDEFG अशी जी अकारविल्हे अक्षररचना मूळ कीबोर्डवर होती ती बदलली गेली. पण अक्षरांच्या दांड्या अडकण्याचे प्रमाण खूपच कमी झाले. अक्षरांच्या जागा बदलण्याच्या ह्या खटाटोपातूनच QWERTY ह्या अक्षररचनेचा आज वापरात असलेला कीबोर्ड तयार झाला. पुढे रेमिंग्टन टाईपरायटर कंपनीने आपला टाईपरायटर बाजारात आणला तो ह्याच अक्षररचनेला कायम स्वीकारून. पुढे टायपिस्टसच्या कितीतरी पिढ्या हाच कीबोर्ड शिकून आपला टायपिंग स्पीड वाढवत राहिल्या. इतर टाईपरायटर कंपन्यांनीही हीच अक्षररचना कायम ठेवून आपले टाईपरायटर बाजारात आणले.
शोल्सचा हा जो जगभर वापरला जाणारा कीबोर्ड (म्हणजे QWERTY ही अक्षररचना) आहे त्यामागे केवळ टाईपरायटरच्या अक्षरांच्या दांड्या एकमेकात अडकू नयेत इतकाच विचार आहे. आज आपण आपल्या काँप्युटरचा कीबोर्ड वापरतो त्यातही तीच अक्षररचना आली आहे ती केवळ परंपरेतून. ही परंपरा तोडण्याचा अंशतः यशस्वी प्रयत्न केला तो डॉ. ऑगस्ट ड्व्होरॅक ह्या शिक्षणतज्ज्ञाने. ड्व्होरॅक ह्या नावाचा उच्चार करताना सुरूवातीस ड चा अगदी पुसटसा उच्चार केला जातो. तो पुसटसा उच्चार ऐकू न आल्यास डॉ. ऑगस्ट व्होरॅक असेच नाव कानी पडेल. डॉ. ड्व्होरॅक हे वॉशिंग्टन विद्यापीठात सिअॅटल येथे शिक्षणशास्त्र आणि मानसशास्त्राचे प्राध्यापक होते. टायपिस्ट जेव्हा टायपिंग करीत असतो तेव्हा त्याचे काम तणावाचे न होता आरामदायी (Ergonomic) व्हावे आणि टायपिस्टची उत्पादकता वाढावी असा प्रयत्न डॉ. ड्व्होरॅक करीत होते. त्यांनी माणसाच्या बोटांचा शारिरीक व हालचालींच्या दृष्टीकोनातून बारकाईने अभ्यास केला. डॉ. ड्व्होरॅक यांचे हे संशोधन चालू होते १९३० च्या आसपास. १९३२ साली ते पुर्णत्वाला जाऊन त्यांचा नवा कोबोर्ड तयार झाला. १९३६ साली त्यांचे पेटंट अमेरिकन सरकारने नोंदवले. तो काळ दुसर्या महायुद्धाचा होता. महायुद्धाच्या समस्येपुढे डॉ. ड्व्होरॅक यांचे हे नवे संशोधन मागेच राहिले. १९७५ साली डॉ. ड्व्होरॅक यांचे निधन झाले. त्यानंतर सात वर्षांनी म्हणजे १९८२ साली त्यांच्या ह्या कीबोर्डला रितसर मान्यता मिळाली. पुढे आयबीएम कंपनीने आपल्या काँप्युटर कीबोर्डसाठी ड्व्होरॅक कीबोर्डचा पर्यायही उपलब्ध केला. १९८४ साली ड्व्होरॅक कीबोर्ड वापरणारे १००००० टायपिस्ट अमेरिकेत होते. १९९५ ची मायक्रोसॉफ्ट विंडोज ९५ आली तेव्हा त्याबरोबर नेहमीच्या QWERTY कीबोर्डबरोबर डव्होरॅक कीबोर्ड देखील उपलब्ध करण्यांत आला. आजही तुमच्या आमच्या संगणकावर तुम्ही ड्व्होरॅक कीबोर्ड वापरू शकता. एक गंमत म्हणून तो वापरून पहायला काहीच हरकत नाही.
तुम्ही जर Windows 98, Windows XP किंवा Windows Vista वापरत असाल तर तुमच्या संगणकावरचा तोच कीबोर्ड कायम ठेवून तुम्हाला ड्व्होरॅक कीबोर्ड (सॉफ्टवेअरच्या सहाय्याने) पद्धतीने टाईप करता येईल. त्यासाठी Help मध्ये जाऊन Dvorak हा एकच शब्द टाईप करून माहिती शोधा. तुम्हाला आवश्यक ती सर्व माहिती Windows Help मध्ये मिळेल. ड्व्होरॅक कीबोर्डचं वैशिष्ट्य म्हणजे त्यात तुम्हाला एका हाताने टाईप करण्याची सोय आहे. आपला नेहमीचा QWERTY हा कीबोर्ड दोन्ही हातांनी टाईप करावा लागतो. पण खूपदा एखादा हात प्लास्टरमध्ये असेल किंवा काही दुखणे असेल तर एका हाताने (डाव्या आणि उजव्या कोणत्याही) टाईप करण्याची सोय ड्व्होरॅक कीबोर्डमध्ये आहे. अर्थात ज्यांना दोन्ही हातांनी टायपिंग करायचे असेल तर तीही सोय अर्थातच ड्व्होरॅक मध्ये आहे.
आता कोणी म्हणेल की हे काहीतरी काँप्युटर सॉफ्टवेअरवाल्यांचे नवे फॅड आहे. तर मंडळी तसं नाही. ड्व्होरॅक कीबोर्ड हा गीनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस मध्येही गेला आहे. २००५ मध्ये बार्बारा ब्लॅकबर्न ह्या महिलेने ड्व्होरॅक कीबोर्ड वापरून दर मिनिटाला २१२ शब्द ह्या वेगाने टायपिंग करून दाखवले. तिचा हा टायपिंग वेग गीनेस बुकवाल्यांनी जगातील सर्वांत फास्ट टायपिंगचा विक्रम म्हणून नोंदवलेला आहे. ह्या कीबोर्डची माहिती विंडोजच्या हेल्पव्यतिरिक्त इंटरनेटवर सर्वत्र उपलब्ध आहे. http://www.gigliwood.com/abcd/ ह्या साईटवर तर A basic course in Dvorak (त्याला ABCD असं छान नाव दिलं आहे) हा कीबोर्ड शिकण्याचा एक कोर्सच उपलब्ध आहे. http://www.mwbrooks.com/dvorak/di.html ही साईट एका सेवाभावी संस्थेची म्हणजे Dvorak International यांची आहे. ही संस्था ह्या कीबोर्डचा प्रचार जगभरात सर्वत्र व्हावा यासाठी प्रयत्नशील आहे. तुमच्या संगणकावर ड्व्होरॅक कीबोर्ड कसा लावायचा याची माहिती http://www.dvorak-keyboard.com/convert.html ह्या साईटवर उपलब्ध आहे.
जे हा कीबोर्ड वापरतात त्यापैकी अनेकांचं म्हणणं असं आहे की हा कीबोर्ड वापरून तुमचा टायपिंग स्पीड ७० ते १०० टक्केपर्यंत वाढू शकतो. हे म्हणणं खरं असेल तर मग आजपर्यंत ह्या कीबोर्डचा प्रचार का झाला नाही? तो सगळीकडे मोठ्या प्रमाणावर का पसरला नाही? असे प्रश्न तुम्हा-आम्हाला पडणं स्वाभाविक आहे. ड्व्होरॅक कीबोर्डचे जे पाठिराखे आहेत ते त्यावर म्हणतात की परंपरा न सोडण्याची आपली वृत्ती त्याला कारणीभूत आहे. वेगळा मार्ग चोखाळण्याला धाडस लागतं. ते धाडस आपण करीत नाही. आपल्यासारखेच इतर बहुतेक जण असतात. त्यामुळे QWERTY कीबोर्ड पिढ्यान पिढ्या चालत राहिला. परंपरेच्या नाण्याची दुसरी बाजू म्हणजे चाकोरी. चाकोरीबाहेर जाऊन प्रयत्न करणारे कमी असतात. त्यामुळेच ड्व्होरॅक कीबोर्ड तितकासा रूढ झाला नाही. हे ड्व्होरॅकच्या पाठिराख्यांचं म्हणणं खरं की खोटं याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही. तुमचं त्यावरचं मत ठरविण्यापूर्वी मात्र तुम्ही तो वापरून पहायला हवा इतकच मला म्हणायचं आहे.
तुम्हाला वाटतं तितकं ते अवघडही नाही, आणि वेगळ्या दमड्या मोजायच्या नसल्याने खिशाला चाट पाडणाराही हा प्रकार नाही. काहीतरी नवं करून पाहण्याची आवड असणारांनी हा नवा कीबोर्ड अवश्य वापरून पहायला हवा असं मला वाटतं.

शब्दांचे खेळ
मराठीत "ती होडी जाडी होती" हे वाक्य शेवटाकडून वाचलं तरी तेच रहातं. ह्या प्रकाराला इंग्रजीत Palindrome असं म्हणतात. "चिमा काय कामाची" हा मराठीतला आणखी एक पॅलिनड्रोम. पण मराठीत असे पॅलिनड्रोम्स खूपच कमी आढळतात. इंग्रजीत मात्र त्यांची रेलचेल आहे. http://thinks.com/words/palindromes/x-y-z.htm ह्या साईट लिंकवर गेलात तर तेथे अक्षरशः ए टू झेड अद्याक्षरांनी विभागून शेकडो इंग्रजी पॅलिनड्रोम्स वाचायला मिळतात. त्यातल्या काहींचा उल्लेख येथे करावासा वाटतो.
But Anita sat in a tub.
किंवा हा धुम्रपानविरोधी पॅलिनड्रोम पहा. Cigar? Toss it in a can, it is so tragic!
किंवा Devil never even lived. हे साध्य वाक्य हाही एक पॅलिनड्रोम.
Do go to God हे वाक्य मागून पुढून कसंही वाचलत तरी तोच संदेश मिळतो, 'देवाकडे जा.'
Gate-man sees name, garage-man sees name-tag.
Live not on evil, madam, live not on evil.
No, it never propagates if I set a gap or prevention.
Red roses run no risk, sir, on nurse's order.
असे शब्दांचे खेळ छोट्यांना तर आवडतातच पण मोठ्यांनाही ते भावतात. नेहमीच्या त्याच त्या कामातून थोडं वेगळं म्हणून, किंवा मुलांना अभ्यासातून डोकं वर काढून मनोरंजन म्हणून असे शब्दांचे गंमतीदार खेळ वाचणं म्हणजे एक रिलीफच असतो.
आता ते gry ने शेवट होणारे शब्द इंग्रजीत दोनच आहेत. एक Angry आणि दुसरा Hungry. पण तुम्ही http://www.fun-with-words.com/word_gry_angry_hungry.html ह्या लिंकवर गेलात तर gry ने शेवट होणारे एकूण १२४ शब्द दिलेले तुम्हाला दिसतील. ह्या १२४ शब्दातले बरेचसे म्हणे १९३३ सालच्या ऑक्सफर्ड इंग्लीश डिक्शनरीमध्ये आलेले होते. नंतर इतरही काही शब्दकोशांनी त्यातले काही (पुन्हा म्हणे) आपल्यात सामावून घेतले होते. ती १२४ शब्दांची यादी एक गंमत म्हणून तुम्ही अवश्य पहा. मला मात्र शोधूनही Oxford किंवा Webster शब्दकोशांच्या वेबसाईटसवर त्यातले काहीच आढळले नाहीत. Angry आणि Hungry ला gry चे पर्याय नाहीत हेच खरं असावं बहुतेक.
पुन्हा ते shion ने शेवट होणारे शब्दही इंग्रजीत पुन्हा दोनच. Fashion आणि Cushion. पण गंमत म्हणजे dictionary.com ह्या साईटवर kishion नावाचा एक शब्द सापडला.
हे शब्द शोधणं जे असतं त्यासाठी आपल्या कागदी डिक्शनरीपेक्षा इंटरनेटवरची (किंवा वरच्या) डिक्शनरीज फार उपयुक्त असतात. अशी इंटरनेटवरची onelook.com ही माझी आवडती डिक्शनरी आहे. मी जो शब्द तिथे शोधतो तो एकाच वेळी १०६५ शब्दकोशांमध्ये शोधला जातो असा onelook.com चा दावा आहे. तो दावा खरा असो वा नसो. पण onelook मला चांगलीच कामाला येते. तुम्ही साधा आपला what हा शब्द तिथे शोधलात तर तो एकूण ३३ डिक्शनरीजमध्ये शोधला गेलेला तुम्ही दिसेल. त्यात Merrium Webster, Oxford, Cambridge, Encarta, American Heritage पासून ते Wiktionery पर्यंत अनेक डिक्शनरीज आहेत. इंटरनेटवरच्या onelook काय किंवा अन्य इतर Webster वा Oxford सारखी डिक्शनरी काय, तिथे wild card उपयोग आपल्याला करता येतो. ज्यांना wild card म्हणजे नेमके काय हे माहित नाही त्यांच्यासाठी एक दोन शब्दांचे खेळ करून दाखवणं गरजेचं आहे. हे खेळ अगदी सोपे आहेत. Onelook.com वर जा. तिथे *phere असं टाईप करून शब्द शोधा (म्हणजे Search वर क्लीक करा). तुम्हाला phere ने शेवट होणारे एकूण ६७ शब्द तिथे मिळतील. त्यात aerosphere पासून ते atmosphere पर्यंत आणि blogosphere पासून ते ozonosphere पर्यंत सारे आहेत. तुम्ही जे *phere असं टाईप केलत त्यातली * ही खूण (इंग्रजीत asterisk ) म्हणजे वाईल्ड कार्ड होतं. * च्या जागी आवश्यक ते शब्द टाकून phere ने शेवट होणारे सर्व डिक्शनरीजमधील शब्दांची यादी onelook.com ने तुमच्या समोर हजर केली. * सारखं दुसरं वाईल्ड कार्ड म्हणजे आपलं प्रश्नचिन्ह (?). हे समजून घेण्यासाठी तुम्ही b??F असं टाईप करून onelook.com मध्ये शब्द शोधा. तुम्हाला b ने सुरू होणारे आणि f ने शेवट होणारे एकूण १५ शब्द onelook शोधून देईल. ते असे-
1. baff, 2. bamf, 3. barf, 4. basf, 5. batf, 6. bcdf, 7. bcnf, 8. bdnf, 9. beef, 10. biff, 11. boff, 12. brdf, 13. bsrf, 14. buff, 15. bumf तुम्ही एकाच वेळी * आणि ? चा वापर करून देखील शब्द शोधू शकता. b??f* असं टाईप करून शब्द शोधून पहा. तुम्हाला असे शेकडो शब्द मिळतील की जे b ने सुरू होतात, त्यांचे चौथे अक्षर f असते आणि नंतर काही अक्षरे असतात. आपल्या कागदी डिक्शनरीत अशा प्रकारे शब्द शोधण्याची सोय नसते. त्यामुळे संगणक वा इंटरनेटवर उपलब्ध असणार्या डिक्शनरीज अशा वेळी खूपच उपयुक्त ठरतात. Onelook वर रिव्हर्स डिक्शनरीचीही सोय आहे. म्हणजे आपल्याला माहित असलेल्या अर्थाशी जवळीक साधणारे शब्द त्यात शोधता येतात. उदाहरणार्थ मला Java ह्या प्रोग्रामिंग लॅंग्वेजचं नाव आठवत नाहीये. तर अशा वेळी मी रिव्हर्स डिक्शनरीमध्ये जाऊन Programming Language असं टाईप करून शब्द शोधला असता माझ्या समोर Cobol पासून ते Pascal पर्यत आणि Java पासून lisp आणि Fortran पर्यंत सर्व शब्द हजर होतात. रिव्हर्स डिक्शनरीचा वापर वक्ते, लेखक, पत्रकार, प्राध्यापक वगैरे मंडळीं नेहमीच करीत असतात. कारण नेमका हवा तो, पूर्वी कधी तरी माहीत असलेला, पण आता ह्या क्षणाला आठवत नसलेला शब्द शोधण्यासाठी त्याचा कमालीचा उपयोग होतो.
Onelook बद्दल हे वाचत असताना अनेकांची ट्युब पेटली असेल की वाईल्ड कार्डचा आणि रिव्हर्स डिक्शनरीचा वापर करून सुटता सुटत नसलेलं शब्दकोडं चुटकीसरशी सोडवता येईल. मंडळी, तुमचा अंदाज बरोबर आहे. इंग्रजी शब्दकोडं सोडविण्यासाठी onelook.com चा किंवा वाईल्ड कार्डची सोय असणार्या डिक्शनरीजचा चांगला उपयोग होतो. Onelook.com चे परिक्षण देताना अमेरिकेचे सुप्रसिद्ध दैनिक न्युयॉर्क टाई्म्सने लिहीले होते - "A superb way to cheat at crossword puzzles" . ही साईट अनेक वर्षांपासून इंटरनेटवर आहे. आठ वर्षांपूर्वी म्हणजे २००० साली याहूने "10 Supremely Useful Sites" असं लिहून जगातील पहिल्या दहा साईटसमध्ये onelook ची गणना केली होती.
शब्दांचे खेळ उच्चारांशिवाय कधी पूर्ण होणार नाहीत. आजकाल इंटरनेटवरच्या किंवा सीडीतून येणार्या बहुतेक डिजिटल इंग्रजी डि्कशनरींमध्ये शब्दाचा उच्चार ऐकण्याची सोय असते. पण त्या शब्दाचा उपयोग करून वेगवेगळी बोली भाषेतील वाक्ये किंवा वाकप्रचार ऐकण्याची सोय करणारी howjsay.com ही साईट onelook च्या बरोबरीने वापरणं मी पसंत करतो. Howjsay हे नाव थोडं विचित्र आहे. यातला J मात्र अर्थपूर्ण आहे. तो त्या साईटवर आपल्याला गुलाबी रंगात दिसतो. ह्या साईटवर जाऊन आपण शब्द शोधायचा. शोधलेला शब्द पुढे येणार्या पानावर आपल्याला गुलाबी रंगात दिसतो. त्या गुलाबी शब्दावर आपला माऊस नुसता न्यायचा (क्लीक सुद्धा करायचं नाही) की त्याचा उच्चार आपल्याला ऐकायला मिळतो. तुम्ही उदाहरणार्थ what हा इंग्रजी शब्द howjsay.com वर शोधलात तर what चा उच्चार तर तुम्हाला ऐकायला मिळतोच पण त्याच बरोबर what a pity, किंवा what did you expect किंवा what do you mean वगैरेंसारखी काही इंग्रजी वाक्ये कशी उच्चारायची हेही ती साईट तुम्हाला दाखवायला तयार असते.
शब्दांचे खेळ करायचे म्हंटले आणि यमक साधायची धमक दाखवली नाही असं कसं होईल. इंग्रजीत कविता लिहायची धमक करायची असेल आणि इंग्रजी शब्दांचं यमक साधायचं असेल तर rhymer.com सारखी साईट तुम्हाला माहीत असायला हवीच. Fear हा तुमच्या कवितेच्या ओळीचा शेवटचा शब्द असेल तर यमक जुळविण्यासाठी तु्म्हाला dear, clear, cheer, year, hear, sheer वगैरे यमकांची गरज लागेल. ते आठवत बसायचे नसेल तर rhymer.com वर जायचं. यमक तयार घ्यायचं. कविता फिनिश करायची.
आणखी एक शब्दांचा खेळ म्हणजे जगातले सर्वांत मोठे शब्द शोधणं. त्यासाठी तुम्हाला एक वेबसाईट सांगतो. तिचं नाव आहे - http://thelongestlistofthelongeststuffatthelongestdomainnameatlonglast.com आता ही जी the longest list of the longest stuff at the longest domain name at long last.com नावाची साईट आहे ती खरंच आज अस्तित्वात आहे. तुम्ही अवश्य तिथे जाऊन पहा. विशेषतः त्या साईटवरील http://thelongestlistofthelongeststuffatthelongestdomainnameatlonglast.com/long1.html ही सर्वांत मोठ्या शब्दाची जी लिंक आहे, त्याला तर तुम्ही भेट द्याच. त्यात
Pneumonoultramicroscopicsilicovolcanoconiosis हा सर्वांत मोठा शब्द (४५ अक्षरे) दिला आहे. त्या शब्दाचा अर्थ आहे, फुफ्फुसातील एक प्रकारचा रोग. हा शब्द उच्चारताना आपली दमछाक होऊन फुस फुस व्हायला लागतं तो भाग निराळा. काही लबाड मंडळी ह्या टप्प्यावर howjsay.com वर जातील आणि त्या बिचार्या गुणी साईटला हा शब्द उच्चारायला भाग पाडतील याची कल्पना मला आहे. पण सध्या तिथे जाऊ नका. एवढा मोठा शब्द उच्चारण्याची त्यांची प्रॅक्टीस अजून चालू असावी. त्यामुळे तो उच्चार तिथे अजून आलेला नसावा.
मंडळी, इंग्रजी भाषेला वाघिणीचं दूध असं म्हंटलं जातं. संगणक आणि इंटरनेटने हे दूध चांगलं पचवलं आहे. आता इंटरनेट इतर भाषा पचविण्याच्या बेतात आहे. गुगलने आपली राष्ट्रभाषा हिंदी पचवायला सुरूवातही केली आहे. इंग्रजीतून हिंदीत आणि हिंदीतून इंग्रजीत भाषांतराची सोय गुगलने आपल्या http://www.google.com/translate_t ह्या लिंकवर केली आहे. तिथे इंग्रजी-हिंदी शब्दकोश उपलब्ध आहे, आणि तो खरोखरच उपयुक्त आहे. पण अजूनही भाषांतराची कला संगणक काय किंवा इंटरनेट काय, त्यांना जमलेली नाही. Google ला मी I am going. ह्या वाक्याचं भाषांतर तिथे करायला सांगितलं तर त्याने "मुझे इस बात की जा रही है " असं काहीतरी भांग प्यायल्यासारखं केलं. असो. इंटरनेट इतर भाषा कवेत घे्ण्यासाठी धडपडते आहे हे मात्र नक्की. मराठी-इंग्रजी शब्दकोश गुगलवाले कधी आणताहेत याची वाट तुम्ही नक्कीच पहात असाल. मीही पहातोय. तुमच्यासारखे मलाही त्यात wild cards वापरून शब्दांचे खेळ करता येतात का हे पहायचय.

२० फेब्रु, २०११
ताजमहालची माहिती देणारी उत्तम साईट
http://www.pbs.org/treasuresoftheworld/taj_mahal/tmain.html
ताजमहालची माहिती देणारी उत्तम साईट. अमेरिकेच्या सुप्रसिद्ध पब्लीक ब्रॉडकास्टींग सर्व्हीसच्या साईटमधील हा एक भाग. माहिती विश्वासार्ह आणि मांडणी उत्तम.ताजमहालच्या सर्व बाजू पुढे आणणारी ही साईट.

जगातल्या वृत्तपत्रांचा इतिहास
http://newspapers.bl.uk/blcs/start.do
हा जगातल्या वृत्तपत्रांचा इतिहास. ही साईट ब्रिटीश लायब्ररीची. म्हणजे विश्वासार्ह. त्यांनी परिश्रमपूर्वक जमवलेल्या ज्ञानातून हा इतिहास मांडला गेला आहे. त्यामुळेत्याला अनन्यसाधारण महत्व आहे.

इतिहास सॅंडविचचा
http://whatscookingamerica.net/History/SandwichHistory.htm
हा इतिहास सॅंडविचचा. मूळात सॅंडविच हा शब्द नव्हता तेव्हाही सॅंडविच होतेच म्हणे. मग नेमका हा शब्द कधी आला. पहिले सॅंडविच कुठे बनले, कोणी बनवले वगैरे रंजक माहिती इथे आहे.

रशियन दारू व्होडकाचा माहिती कोश
http://www.vodkamuseum.ru/english/home/
व्होडका ही रशियन दारू. व्होडा ह्या शब्दाचा अर्थ पाणी. त्यावरून व्होडका आला असावा असा अंदाज मांडला जातो. ह्या व्होडकाचा गेल्या चार शतकांचा रंजक आणि सचित्र इतिहास इथे वाचायला मिळतो.

अफाट माहिती. आपल्या पृथ्वीबद्दलची.
http://www.space.com/scienceastronomy/101_earth_facts_030722-1.html
अफाट माहिती. आपल्या पृथ्वीबद्दलची. फक्त १०१ प्रश्नांच्या उत्तरातून अफाट ब्रम्हांड उलगडून दाखवलय. काही प्रश्नांची उत्तरे डोकं चक्रावून टाकणारी आहेत. हे काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे पहा-
जगातील सर्वांत कोरडी जागा कोणती?
- चिली देशातील अरिका प्रांतात दरवर्षी ०.०३ इंच पाऊस पडतो. ह्या पावसाच्या पाण्याने कॉफीचा कप भरायला ठेवला तर शंभर वर्षे लागतील.
जगातील सर्वांत ओली जागा कोणती?
-कोलंबियातील लोरो प्रांतात ५२३.६ इंच पाऊस दरवर्षी पडतो. २६ जुलै रोजी मुंबईत जो प्रचंड पाऊस झाला त्यावेळी सांताक्रुझ वेधशाळेने २४ तासात प्रचंड म्हणजे ३७ इंच पाऊस झाल्याची नोंद केली होती.
हे आणि असे आणखी ९९ प्रश्न व त्यांची उत्तरे ह्या साईटवर वाचा

डोमेन नेमचा आणखी एक गंमतीदार किस्सा..

डोमेन नेम अर्थात वेबसाईटचे नाव. जसे ednyan.com किंवा google.com वगैरे वगैरे.गेल्या वीस वर्षात लाखो डोमेन्स नोंदले गेल्याने, क्वचित एखादा अपवाद वगळता आता एका शब्दाचे डोमेन नेम उपलब्धच नाही. त्यामुळे दोन वा तीन शब्द जोडून आपल्याला हवं तसं डोमेन नेम नोंदविण्याची स्पर्धा सध्या चालू आहे. त्यातून पोट धरधरून हंसविणारे किस्से घडतात. तसाच हा एक घडलेला किस्सा...
डॉक्टर.कॉम बुक आहे. कॉलडॉक्टर.कॉम पण बुक आहे. डॉक्टरकॉल.कॉम सुद्धा उपलब्ध नाही. मग मंडळी आणखी एक शब्द जोडू पाहतात.दिडॉक्टरकॉल.कॉम करून ते डोमेन नेम मिळतय का ते बघतात. ह्या पद्धतीत कुठेही कॉमा म्हणजे स्वल्पविराम वापरता येत नाही. त्यामुळे शब्द एकमेकांना जोडून येतात आणि वाचताना ते कोणीही कुठेही तोडू शकतो. समजा thedoctorcall.com असेल तर th edoctor call किंवा thedoc torc all असंही कोणी वाचू शकतो.
आता गंमत कशी होते पहा. वैद्यक क्षेत्रातील वेगवेगळे थेरॅपिस्ट शोधून देणारी एक साईट आहे. पण त्यांना हवं असलेलं Therapist.com हे डोमेन नेम उपलब्ध नाही. म्हणून शेवटीtherapist finder असं सोपं नाव दोन शब्द जोडून त्यांनी घेतलं. therapistfinder.com अशी वेबसाईट आजही इंटरनेटवर उपलब्ध आहे. पण डोमेन नेम वाचणारांनी ते the rapist finder असं वाचलं की बोंब. अर्थाचा अनर्थ आणि लाखाचे बारा हजार.
आता खरोखरीच therapistfinder.com ही साईट उघडा. पहा त्यावरची ही हेडींग्जः
Tis The Season to Be Stressed - TherapistFinder.com Offers Tips to Holiday Happiness. (???)
Depression Screening Now Recommended for All Teens, Not Just Those Who Appear at Risk. (!!!)
Do You or a Friend Need Help Urgently?
Family Problems Come in All Shapes and Sizes (अबब, काय हे...)
अहो, हा काल्पनिक विनोद नाही. खरंच therapistfinder.com उघडून वाचून बघा. खात्री केल्याशिवाय हंसू नका. वुई आर सिरीयस..ओके?
डोमेन नेम आणि धमाल...
एक एक धमाल...
गेम्स एकमेकांना पाठवणं हे काही नवं नाही. एखादा मित्र एखादा गेम डाऊनलोड करतो आणि तो आपल्या मित्राला पाठवतो. तो मित्र त्या बदल्यात त्याला दुसरा गेम पाठवतो. गेम्स अशा प्रकारे एक्सचेंज करणारे मित्र खूप असतात. त्यामुळे त्यांनी ठरवलं की अशा प्रकारे गेम्स एक्सचेंज करणार्या मित्रांना एकत्र आणणारी वेबसाईट तयार करायची. त्यासाठी त्यांनी www.gamesexchange.com हे डोमेन नेम बुक करायचं ठरवलं. त्यातून भयानक धमाल झाली. ती अशीः वाचणारे सरळ वाचत नाहीत. डोमेन नेम्स मध्ये स्वल्पविराम टाकण्याची सोय नसल्याने शब्द कुठे तोडावेत याला काही ताळ तंत्रच नाही. आता ही गेम्स एक्स्चेंज करणारी साईट. लोकांना वाटू लागलं game sex change डॉट कॉम. लोकांचा काही नेम नाही हेच ह्या डोमेन नेम वरून दिसून येतं. बाकी काही नाही..
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)