तुमच्या ज्या मित्रमंडळींना ही क्लुप्ती माहीत नाही त्यांना sanganak.info वर जाऊन त्याची माहिती घ्यायला सांगा. किंवा तुमच्या फेसबुक पानावर ह्या पोस्टची लिंक तुमच्या मित्र परिवारासाठी अवश्य द्या.
टीप्स आणि ट्रीक्स लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा

१० नोव्हें, २०१२
११ मार्च, २०११
ऑनलाईन फूटपट्टी इथे आहे..
अनेकांना आवडणारा हा मोफत प्रोग्राम आहे. त्याचं नाव PicPick. आपल्याकडे तो नसेल तर आपणही तो जरूर डाऊनलोड करून वापरून पहा.
PicPick ह्या दुव्यावर डाऊनलोडींगसाठी उपलब्ध आहे.
PicPick हा मुख्यत्वे स्क्रीन कॅप्चर प्रोग्राम आहे. पण स्क्रीन कॅप्चरच्या सोयीबरोबर त्यात इतरही अवजारे आहेत. त्यातलं एक अवजार म्हणजे

तुमच्या मॉनिटरचा डिस्प्ले किती DPI चा?
सतत आपल्या डोळ्यासमोर असतो तो मॉनिटर. त्या मॉनिटरवर जे काही दिसतं ते DPI ह्या मापानुसार दिसतं. DPI म्हणजे Dots per inch हे संगणक क्षेत्रात रमलेल्यांना एव्हाना माहीत आहेच. तर, आपल्या मॉनिटरच्या प्रत्येक चौरस इंचात किती dots आहेत हे तुम्हाला माहीत आहे का? जर माहित नसेल, तर ते मोजण्याची सोय ऑनलाईन उपलब्ध आहे.
त्यासाठी http://auctionrepair.com/pixels.html ह्या साईटवर जा. त्या पानावर थोडे खाली या. पहा पुढील आकृती दिसेल.
ह्या साईटवरील ती लाल पट्टी लांबीला किती आहे हे तुमच्या पट्टीने वा टेपने मोजा. जी लांबी असेल, म्हणजे उदाहरणार्थ 3.5 इंच असेल तर तुमचा मॉनिटर 85 DPI सेटींगवर आत्ता आहे. जर लांबी फक्त 3 इंच असेल तर DPI 100 चा म्हणजे अधिक चांगला आहे. पण जर लांबी जास्त म्हणजे 5 इंच असेल तर DPI 60 चा फक्त म्हणजे कमी आहे. थोडक्यात, लाल पट्टीची लांबी जेवढी जास्त तेवढा मॉनिटर कमी DPI चा.
कमी DPI सेटींगचे मॉनिटर तुलनेने अस्पष्ट चित्र दाखवतात. त्यामुळे फोटो वगैरे शार्प दिसत नाहीत. गेम्स खेळतानाही हा फरक जाणवतो.
तुमच्या मॉनिटरचे DPI सेटींग मोजण्याची ही युक्ती तुमच्या मित्रमंडळींना आवर्जुन सांगा. आवश्यक तर तुमच्या मॉनिटरचे DPI सेटींग वाढवता येईल का याचीही चाचपणी करा.
अरे हो, लांबी मोजायला तुम्ही घरात वा ऑफिसात पट्टी किंवा टेप शोधत असाल. मिळाली तर उत्तम. पण जागेवर नाही सापडली तर ऑनलाईन पट्टी तुमच्याक़डे असेल तर ती वापरा. ऑनलाईन पट्टी तुमच्या संगणकावर लावलेली नसेल तर पुढल्या पोस्टमध्ये त्याचीही युक्ती दिली आहे. ती वाचून ती पट्टीही मिळवा. हे सगळंच मोफत आहे. त्यामुळे कसंलच टेंशन नाही. हवं ते फक्त नीट अटेंशन.
७ मार्च, २०११
फारसे वापरात नसलेले दोन शॉर्टकट
कीबोर्ड शॉर्टकटस आपण सगळेच जण वापरतो. त्यातले सगळ्यात कॉमन म्हणजे CTRL+C आणि CTRL+V हे कट पेस्ट करण्यासाठीचे शॉर्टकटस.
पण CTRL+Home आणि CTRL+End हे दोन शॉर्टकट आपल्या फारसे वापरात नसतात. इंटरनेटवर सर्फींग करताना बरेचदा खूप खोलपर्यंत गेलेले एखादे वेबपेज असते. वरून खाली जाण्यासाठी आपण माऊसचं स्क्रोलींग व्हील वापरतो, किंवा चक्क ड्रॅग करून पान खाली वर करतो. एकदम खाली वा एकदम वर जाण्या येण्यासाठी तुम्ही CTRL+Home आणि CTRL+End हे कीबोर्ड शॉर्टकटस वापरून पहा. तुम्हाला ते अतिशय सोयीचे वाटतील. आपल्याला CTRL+C आणि CTRL+V ची जशी सवय आहे, तशीच सवय आता CTRL+Home आणि CTRL+End चीही लावून घ्यायला हवी.
२३ फेब्रु, २०११
डायरी आणि हिशोब
नव्या वर्षाची सुरूवात होताना नवं कॅलेंडर आणि नवी डायरी ह्या दोन वस्तू आपल्या भेटीला आलेल्या असतात. कॅलेंडर भिंतीवर कुठेतरी कायमचं लटकून जातं. पण, डायरी मात्र आपल्याला बर्यापैकी चिकटून राहते. कधी ती आपल्या पर्समध्ये किंवा बॅगेत, किंवा आपल्या टेबलाच्या ड्रॉवरमध्ये आपल्या एकट्याच्या विश्वासातली गोष्ट म्हणून साथ करू लागते. हळूहळू आपण त्यात काहीबाही लिहू लागतो. मग मात्र ती फारच व्यक्तीगत होऊन जाते. ती दुसर्याच्या हाती पडू नये अशी काळजी आपण आवर्जुन घेऊ लागतो. चुकून कधी ती जागेवर दिसली नाही किंवा इतरांच्या हातात क्वचित ती पडली तर आपलं बिनसतच. ही कागदाची डायरी हरवू शकते. दुसर्याच्या हातात पडू शकते. त्यामुळे ती जपावी लागते. ती जपण्यात आपल्या मेंदूच्या काही पेशी दिवस-रात्र बीझी राहतात.
हे झालं कागदाच्या डायरीबद्दल. आजकाल घरी आणि ऑफिसमध्ये संगणक जवळजवळ प्रत्येकाच्या टेबलावर असतो. संगणकावर ब्रॉडबॅंडचं इंटरनेट कनेक्शन हेही आता नेहमीचं होऊन गेलं आहे. संगणक आणि इंटरनेटच्या माध्यमातली डायरी ही कागदाच्या डायरीपेक्षा अधिक सुरक्षित असते. पासवर्ड शिवाय कोणीही ती उघडू शकत नाही. आणि पासवर्ड हा अर्थातच फक्त आपल्यालाच माहीत असतो. इंटरनेटवर अशी डायरी मोफत उपलब्ध आहे. त्यासाठी www.my-diary.org ह्या साईटवर जायला हवं. इंटरनेट साईटसवर मिळणारी सेवा ही तीन प्रकारची असते. आपल्याला एक तर त्यासाठी दमड्या मोजाव्या लागतात, किंवा साईटवरच्या जाहिरातींचा त्रास सहन करत ती सेवा घ्यावी लागते. My-diary.org वरील डायरीची सेवा घेण्यासाठी दमड्याही मोजाव्या लागत नाहीत आणि जाहिरातींची कटकटही तिथे नाही. ही साईट तिसर्या प्रकारची म्हणजे स्वेच्छेने येणार्या देणग्यांवर चालते. मात्र देणगी सक्तीची नाही. ती दिली नाहीत म्हणून तुम्हाला डायरी लिहीता येणार नाही अशी अट बिलकुल नाही.
My-diary.org चं वैशिष्ट्य म्हणजे ती अतिशय युजर-फ्रेंडली आहे. तिथे रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्ही तुमचा ईमेल पत्ता फक्त द्या. तेवढं पुरे असतं. नाव, पत्ता, जन्मतारीख अमुक तमुक असं काहीही तिथे द्यावं लागत नाही. तुम्ही दिलेल्या ईमेल पत्त्यावर तुमच्या डायरीची अक्टीव्हेशन लिंक पाठवली जाते. त्या लिंकवर क्लीक करून आणि स्वतःचा पासवर्ड निवडून तुम्ही इंग्रजीत डायरी लिहायला प्रारंभ करू शकता. तुमच्याकडे मराठीचा युनिकोड फाँट असेल तर तुमची डायरी किंवा रोजनिशी तुम्ही मराठीतही लिहू शकता. मराठी युनिकोड फाँट तुमच्याकडे नसेल तर www.baraha.com वरून तो डाऊनलोड करून घ्या. Baraha वर तो मोफत उपलब्ध आहे. किंवा, तुमच्याकडे Windows XP वा त्यानंतरची विंडोज आवृत्ती असेल तर त्याबरोबर येणारा Mangal हा मराठी युनिकोड फाँटही तुम्हाला वापरता येईल. थोडक्यात काय, तर my-diary.org वर तुम्ही तुमची मराठी किंवा इंग्रजी रोजनिशी सहज आणि कुठेही लिहू शकता. यातला ‘कुठेही’ हा शब्द महत्वाचा आहे. जगात कुठेही तुम्ही गेलात तर इंटरनेटवर तुमची डायरी तुमच्या बरोबर नेहमीच असणार. कुठल्याही सायबरकॅफेत जाऊन तुम्ही ती केव्हाही उघडू शकता, त्यात लिहू शकता.
ह्या डायरीला ‘सर्च’ ची सोय आहे. समजा वर्षभरात तुम्ही शे दोनशे पाने लिहीलीत आणि त्यातला विशिष्ट संदर्भ तुम्हाला नेमका शोधायचा असेल तर तुम्ही तो ‘सर्च’ करू शकाल. मराठी युनिकोड फाँटही ‘सर्च’ ला अनुकूल आहेत. त्यामुळे केवळ इंग्रजीच नाही तर मराठीतही ‘सर्च’ इथे शक्य आहे. डायरीतलं एखादं पान तुम्हाला काढून टाकायचं असेल, किंवा बदलायचं असेल तर Delete आणि Edit ची सोयही my-diary.orgवर उपलब्ध आहे. अनेक सोयी इथे असल्या तरी my-diary.org वर स्पेलचेक ची सोय उपलब्ध नाही. डायरीत एखादा फोटो वा चित्र टाकायचं झालं तर त्याची सोय फक्त देणगीदारांसाठी उपलब्ध आहे. काहींनी केवळ अर्धा डॉलर (म्हणजे आपले जास्तीत जास्त २५ रूपये ) देणगी देऊन ही सोय पदरात पाडून घेतल्याचं देणगीदारांच्या यादीवरून आपल्याला दिसतं. ही देणगी क्रेडिट कार्ड वापरून देता येते. तुम्हाला डायरीत चित्रे वा फोटो टाकायचे नसतील तर देणगीचा प्रश्न अर्थातच उद्भवत नाही.
डायरीबरोबर हिशोब हा भागही आपल्या जीवनात दैनंदिन महत्वाचा आहे. त्यासाठी www.buxfer.com ही मोफत सेवा देणारी वेबसाईट तुमच्या मदतीला येईल. इथे तुम्हाला तुमचा रोजचा जमाखर्च ऑनलाईन लिहीता येईल. तुमचा जीमेल (गुगलमेल), याहूमेल, हॉटमेल यापैकी इमेल पत्ता असेल तर तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन करण्याचीही गरज नसते. तुमचा इमेल लॉगिन आणि पासवर्ड वापरून तुम्ही buxfer.com वर हिशेब लिहू शकता. तुमचं बॅंक अकाउंट, क्रेडिट कार्ड, रोजचा किरकोळ खर्च आणि जमा तुम्हाला इथे नोंदवता येते. बेरीज, वजाबाकी वगैरे गणितं अर्थातच buxfer करतो. त्यामुळे चुकण्याचा प्रश्न इथे नसतो. जमा आणि खर्च याचबरोबर उसने देणे-घेणे याची नोंद ठेवण्याचीही सोय इथे आहे. मित्रांबरोबर वा ग्रुपमध्ये असताना ‘शेअर्ड एक्सपेन्स’ किंवा खर्चातला आपला सहभाग देण्याचा प्रसंग विशेषतः कॉलेज तरूण-तरूणींना नेहमीचाच आहे. अशा ‘शेअर्ड एक्सपेन्स’ चा हिशेब ठेवण्यासाठीही खास व्यवस्था आहे. वेबसाईटस म्हंटलं की बहुधा त्या अमेरिकन वळणाच्या असतात आणि त्यामुळे तिथे हिशेब म्हंटलं की डॉलरची $ ही खूण आपल्याला पहावी लागते. आपल्याला Rs. ओळखीचे असतात आणि $ आपल्याला आपले वाटत नाहीत. पण buxfer ने याची काळजी घेतली आहे. आपले हिशोब रूपयांमध्ये ठेवण्याची सोय इथे आहे. आजकाल भारतातही अनेक बॅंका खातेदाराच्या व्यवहारांची मासिक स्टेटमेंटस इमेलने पाठवते किंवा इंटरनेटवर उपलब्ध करते. ही स्टेटमेंटस सामान्यतः .csv फाईलच्या स्वरूपात असतात. ह्या व्यतिरिक्त Microsoft Money किंवा Quicken च्या फाईल्स देणार्या बॅंकाही अनेक आहेत. आपली क्रेडिट कार्डची स्टेटमेंटसही ह्या फाईलच्या स्वरूपात मिळत असतात. ही संपूर्ण फाईल buxfer वर अपलोड करता येते. थोडक्यात काय, तर आपले स्वतःचे हिशोब अतिशय चोख पद्धतीने ठेवण्याची सेवा इथे उत्तम प्रकारे आणि मोफत उपलब्ध आहे.
वीज, गॅस, इंटरनेट कनेक्शन, सोसायटी मेंटेनन्स किंवा भाडे, विम्याचा हप्ता, कर्जाचा हप्ता अशा अनेक गोष्टी आपल्याला दरमहा लक्षात ठेवाव्या लागतात. घाईगडबडीत आपण विसरतो आणि मग दंड भरण्याची वेळ कधीकधी येते. Buxfer मध्ये यासाठी Reminder ची सोय आहे. आपण सांगू त्या दिवशी (तारखेस), त्यावेळी ती आठवण देणारे Reminder आपल्याला इमेलवर मिळते. अशी हवी तेवढी रिमाईंडर्स आपण वर्षभरासाठी सेट करून ठेवू शकतो.
Buxfer.com ही Buxfer Inc ह्या अमेरिकन कंपनीची वेबसाईट आहे हे खरं असलं तरी ही कंपनी शशांक पंडित आणि अश्विन भारंबे ह्या दोन ऐन विशीतल्या मराठी तरूणांनी तयार केली आहे हे ऐकल्यावर आपल्याला मनोमन समाधान वाटेल. शशांक आणि अश्विन हे दोघेही मुंबई आय.आय.टी. मधून बी.टेक (कॉंप्युटर्स) करून सध्या अमेरिकेतील कार्नेजी मेलन विद्यापीठात पीएच.डी. करण्यासाठी गेले आहेत. कार्नेजी मेलन विद्यापीठात असताना अश्विनच्या खोलीतील रेफ्रीजरेटरवर अनेक बिले वा ती देण्याची स्मरणपत्रे चिकटवलेली असतं. त्या बिलांची व्यवस्था लावण्यासाठी अश्विनने एक प्रोग्राम लिहीला. तो एवढा उपयुक्त होता की इतर मित्रांकडून त्याला मागणी येऊ लागली. प्रत्येकाला त्या प्रोग्रामची कॉपी देता देता अश्विन कंटाळून गेला. त्यातून मार्ग काढण्यासाठी मग त्याने आपला मित्र शशांक पंडित याच्या मदतीने एक वेबसाईट तयार केली. त्यात हा प्रोग्राम ऑनलाईन दिला गेला. त्यातूनच जन्माला आली Buxfer Inc ही कंपनी. Bucks आणि Transfer ह्या दोन इंग्रजी शब्दांतून Buxfer हे नाव जन्माला आले.
आज Buxfer.com बरेच लोकप्रिय होत आहे. Buxfer सारखीच सेवा देणारी www.wesabe.com नावाची वेबसाईट Buxfer च्या स्पर्धेत आहे. दोन्ही वेबसाईटसच्या तुलनेत Buxfer ची सोय वापरायला अधिक सोपी सरळ आहे. 2011 ची नवी नवलाई अजून ऐन जोमात आहे. त्या जोमात असतानाच दोन उपयुक्त सोयी आपल्याला ‘एंटर’ च्या माध्यमातून मिळाल्या आहेत. खरं तर फी घेऊन ऑनलाईन अकाऊंटींगची सुविधा देणार्या कंपन्या आणि वेबसाईटस अनेक आहेत. पण ही सुविधा मोफत आणि दर्जेदार पद्धतीने देणारी कंपनी आपल्या मराठी तरूणांची आहे हे ऐकल्यावर तुम्ही आम्ही आवर्जुन Buxfer वर जाऊन पाहणार यात मला शंका वाटत नाही

२१ फेब्रु, २०११
ड्व्होरॅक (Dvorak) कीबोर्ड
माणूस परंपरेने चालत असतो असं म्हणतात. काँप्युटरचा कीबोर्ड हे एका परंपरेचच प्रतीक आहे. कीबोर्डची ही परंपरा चालत आली आहे १८७२ सालापासून. म्हणजे कीबोर्डच्या परंपरेला आता १३३ वर्षे झाली. संगणकाचा जो कीबोर्ड आज आपण वापरतो त्याला QWERTY कीबोर्ड असं म्हंटलं जातं. कीबोर्डवर अक्षरांची जी सर्वांत वरची बटणं असतात त्यात QWERTY ही ओळीने पहिली सहा अक्षरं. कीबोर्डवरील अक्षरांची ही रचना आणि पहिला टाईपरायटर तयार केला ख्रिस्तोफर शोल्स ह्या अमेरिकन माणसाने. १८७२ साली शोल्सने त्याचे पेटंट रेमिंग्टन ह्या टाईपरायटर कंपनीला १२००० डॉलर्सना र्विकून टाकले. तेव्हापासून शोल्सने तयार केलेली QWERTY कीबोर्डवरील अक्षरांची रचना काहीही बदल न होता जशीच्या तशी चालत आली आहे. काँप्युटरच्या कीबोर्डनेही शोल्सची ही रचना स्वीकारली आणि ती आता जगभर चालू आहे.
ख्रिस्तोफर शोल्स हा मूळचा एक पत्रकार. १८४५ साली तो 'साऊथपोर्ट टेलिग्राफ' नावाच्या एका छोट्या वृत्तपत्राचा संपादक होता. शोल्स पत्रकार असला तरी त्याच्या पिंडात एक संशोधक भिणलेला होता. तंत्रज्ञानविषयक त्याचे काही ना काही उद्योग सतत चाललेले असतं. कागदावर पान क्रमांक छापण्याचे जे छोटे यंत्र होते त्या यंत्राच्या आधारावर क्रमांकांच्या जागी अक्षरे टाकून त्याने एक मिनी टाईपरायटर तयार केला होता. आपल्या ह्या संशोधनाचं पेटंटही शोल्सने १८६४ साली नोंदवलेलं होतं. टाईपरायटरच्या ह्या टप्प्यापर्यंत QWERTY अक्षररचना शोल्सच्या स्वप्नातही नव्हती. पुढे १८६८ साली त्याने टाईपरायटरचं आणखी एक यंत्र तयार केलं आणि त्याचं पेटंटही आपल्या नावावर नोंदवलं. ह्याच दरम्यान कधीतरी QWERTY अक्षररचना तयार झाली.
खरं तर शोल्सने टाईपरायटरचा जो पहिला प्रयत्न केला होता त्यातली अक्षररचना ABCDEFG अशी क्रमाने म्हणजे अकारविल्हेच होती. ह्या पद्धतीने असलेल्या टाईपरायटरमधील अक्षरांचे दांडे टाईप करताना एकमेकात अडकत असतं. हे दांडे एकमेकात अडकले की टायपिस्टचं काम थांबत असे. टायपिस्टला ते अडकलेले दांडे हाताने सोडवावे लागत आणि मग पुन्हा टायपिंग सुरू करावे लागे. ह्या दोषावर मात करण्याचा प्रयत्न शोल्स आणि त्याचा व्यवसायातला भागीदार जेम्स डेन्समोर हे दोघे करीत होते. टायपिंग करताना नेमक्या कोणत्या अक्षरांच्या दांड्या वारंवार अडकतात याचे निरीक्षण डेन्समोरने केले. त्या निरीक्षणातून वारंवार अडकणार्या अक्षरांच्या दांड्यांच्या जागा त्यांनी बदलून पाहिल्या. अशा प्रकारे जागा बदलल्याने मूळची ABCDEFG अशी जी अकारविल्हे अक्षररचना मूळ कीबोर्डवर होती ती बदलली गेली. पण अक्षरांच्या दांड्या अडकण्याचे प्रमाण खूपच कमी झाले. अक्षरांच्या जागा बदलण्याच्या ह्या खटाटोपातूनच QWERTY ह्या अक्षररचनेचा आज वापरात असलेला कीबोर्ड तयार झाला. पुढे रेमिंग्टन टाईपरायटर कंपनीने आपला टाईपरायटर बाजारात आणला तो ह्याच अक्षररचनेला कायम स्वीकारून. पुढे टायपिस्टसच्या कितीतरी पिढ्या हाच कीबोर्ड शिकून आपला टायपिंग स्पीड वाढवत राहिल्या. इतर टाईपरायटर कंपन्यांनीही हीच अक्षररचना कायम ठेवून आपले टाईपरायटर बाजारात आणले.
शोल्सचा हा जो जगभर वापरला जाणारा कीबोर्ड (म्हणजे QWERTY ही अक्षररचना) आहे त्यामागे केवळ टाईपरायटरच्या अक्षरांच्या दांड्या एकमेकात अडकू नयेत इतकाच विचार आहे. आज आपण आपल्या काँप्युटरचा कीबोर्ड वापरतो त्यातही तीच अक्षररचना आली आहे ती केवळ परंपरेतून. ही परंपरा तोडण्याचा अंशतः यशस्वी प्रयत्न केला तो डॉ. ऑगस्ट ड्व्होरॅक ह्या शिक्षणतज्ज्ञाने. ड्व्होरॅक ह्या नावाचा उच्चार करताना सुरूवातीस ड चा अगदी पुसटसा उच्चार केला जातो. तो पुसटसा उच्चार ऐकू न आल्यास डॉ. ऑगस्ट व्होरॅक असेच नाव कानी पडेल. डॉ. ड्व्होरॅक हे वॉशिंग्टन विद्यापीठात सिअॅटल येथे शिक्षणशास्त्र आणि मानसशास्त्राचे प्राध्यापक होते. टायपिस्ट जेव्हा टायपिंग करीत असतो तेव्हा त्याचे काम तणावाचे न होता आरामदायी (Ergonomic) व्हावे आणि टायपिस्टची उत्पादकता वाढावी असा प्रयत्न डॉ. ड्व्होरॅक करीत होते. त्यांनी माणसाच्या बोटांचा शारिरीक व हालचालींच्या दृष्टीकोनातून बारकाईने अभ्यास केला. डॉ. ड्व्होरॅक यांचे हे संशोधन चालू होते १९३० च्या आसपास. १९३२ साली ते पुर्णत्वाला जाऊन त्यांचा नवा कोबोर्ड तयार झाला. १९३६ साली त्यांचे पेटंट अमेरिकन सरकारने नोंदवले. तो काळ दुसर्या महायुद्धाचा होता. महायुद्धाच्या समस्येपुढे डॉ. ड्व्होरॅक यांचे हे नवे संशोधन मागेच राहिले. १९७५ साली डॉ. ड्व्होरॅक यांचे निधन झाले. त्यानंतर सात वर्षांनी म्हणजे १९८२ साली त्यांच्या ह्या कीबोर्डला रितसर मान्यता मिळाली. पुढे आयबीएम कंपनीने आपल्या काँप्युटर कीबोर्डसाठी ड्व्होरॅक कीबोर्डचा पर्यायही उपलब्ध केला. १९८४ साली ड्व्होरॅक कीबोर्ड वापरणारे १००००० टायपिस्ट अमेरिकेत होते. १९९५ ची मायक्रोसॉफ्ट विंडोज ९५ आली तेव्हा त्याबरोबर नेहमीच्या QWERTY कीबोर्डबरोबर डव्होरॅक कीबोर्ड देखील उपलब्ध करण्यांत आला. आजही तुमच्या आमच्या संगणकावर तुम्ही ड्व्होरॅक कीबोर्ड वापरू शकता. एक गंमत म्हणून तो वापरून पहायला काहीच हरकत नाही.
तुम्ही जर Windows 98, Windows XP किंवा Windows Vista वापरत असाल तर तुमच्या संगणकावरचा तोच कीबोर्ड कायम ठेवून तुम्हाला ड्व्होरॅक कीबोर्ड (सॉफ्टवेअरच्या सहाय्याने) पद्धतीने टाईप करता येईल. त्यासाठी Help मध्ये जाऊन Dvorak हा एकच शब्द टाईप करून माहिती शोधा. तुम्हाला आवश्यक ती सर्व माहिती Windows Help मध्ये मिळेल. ड्व्होरॅक कीबोर्डचं वैशिष्ट्य म्हणजे त्यात तुम्हाला एका हाताने टाईप करण्याची सोय आहे. आपला नेहमीचा QWERTY हा कीबोर्ड दोन्ही हातांनी टाईप करावा लागतो. पण खूपदा एखादा हात प्लास्टरमध्ये असेल किंवा काही दुखणे असेल तर एका हाताने (डाव्या आणि उजव्या कोणत्याही) टाईप करण्याची सोय ड्व्होरॅक कीबोर्डमध्ये आहे. अर्थात ज्यांना दोन्ही हातांनी टायपिंग करायचे असेल तर तीही सोय अर्थातच ड्व्होरॅक मध्ये आहे.
आता कोणी म्हणेल की हे काहीतरी काँप्युटर सॉफ्टवेअरवाल्यांचे नवे फॅड आहे. तर मंडळी तसं नाही. ड्व्होरॅक कीबोर्ड हा गीनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस मध्येही गेला आहे. २००५ मध्ये बार्बारा ब्लॅकबर्न ह्या महिलेने ड्व्होरॅक कीबोर्ड वापरून दर मिनिटाला २१२ शब्द ह्या वेगाने टायपिंग करून दाखवले. तिचा हा टायपिंग वेग गीनेस बुकवाल्यांनी जगातील सर्वांत फास्ट टायपिंगचा विक्रम म्हणून नोंदवलेला आहे. ह्या कीबोर्डची माहिती विंडोजच्या हेल्पव्यतिरिक्त इंटरनेटवर सर्वत्र उपलब्ध आहे. http://www.gigliwood.com/abcd/ ह्या साईटवर तर A basic course in Dvorak (त्याला ABCD असं छान नाव दिलं आहे) हा कीबोर्ड शिकण्याचा एक कोर्सच उपलब्ध आहे. http://www.mwbrooks.com/dvorak/di.html ही साईट एका सेवाभावी संस्थेची म्हणजे Dvorak International यांची आहे. ही संस्था ह्या कीबोर्डचा प्रचार जगभरात सर्वत्र व्हावा यासाठी प्रयत्नशील आहे. तुमच्या संगणकावर ड्व्होरॅक कीबोर्ड कसा लावायचा याची माहिती http://www.dvorak-keyboard.com/convert.html ह्या साईटवर उपलब्ध आहे.
जे हा कीबोर्ड वापरतात त्यापैकी अनेकांचं म्हणणं असं आहे की हा कीबोर्ड वापरून तुमचा टायपिंग स्पीड ७० ते १०० टक्केपर्यंत वाढू शकतो. हे म्हणणं खरं असेल तर मग आजपर्यंत ह्या कीबोर्डचा प्रचार का झाला नाही? तो सगळीकडे मोठ्या प्रमाणावर का पसरला नाही? असे प्रश्न तुम्हा-आम्हाला पडणं स्वाभाविक आहे. ड्व्होरॅक कीबोर्डचे जे पाठिराखे आहेत ते त्यावर म्हणतात की परंपरा न सोडण्याची आपली वृत्ती त्याला कारणीभूत आहे. वेगळा मार्ग चोखाळण्याला धाडस लागतं. ते धाडस आपण करीत नाही. आपल्यासारखेच इतर बहुतेक जण असतात. त्यामुळे QWERTY कीबोर्ड पिढ्यान पिढ्या चालत राहिला. परंपरेच्या नाण्याची दुसरी बाजू म्हणजे चाकोरी. चाकोरीबाहेर जाऊन प्रयत्न करणारे कमी असतात. त्यामुळेच ड्व्होरॅक कीबोर्ड तितकासा रूढ झाला नाही. हे ड्व्होरॅकच्या पाठिराख्यांचं म्हणणं खरं की खोटं याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही. तुमचं त्यावरचं मत ठरविण्यापूर्वी मात्र तुम्ही तो वापरून पहायला हवा इतकच मला म्हणायचं आहे.
तुम्हाला वाटतं तितकं ते अवघडही नाही, आणि वेगळ्या दमड्या मोजायच्या नसल्याने खिशाला चाट पाडणाराही हा प्रकार नाही. काहीतरी नवं करून पाहण्याची आवड असणारांनी हा नवा कीबोर्ड अवश्य वापरून पहायला हवा असं मला वाटतं.

घरच्या प्लंबिंगच्या कामाबद्दल माहिती देणारी साईट
घरकामात उपयुक्त साईट म्हणजे www.friendlyplumber.com/plumbing101.html . नावावरून तुमच्या लक्षात आलं असेल की घरच्या प्लंबिंगच्या कामाबद्दल माहिती देणारी ही साईट आहे. पाईप, नळ, वायसर, टॉयलेट वगैरे विषय इथे उत्तम प्रकारे चर्चिले गेले आहेत. 'युएसए टुडे' सारख्या दैनिकाने ह्या साईटला 'हॉट साईट' म्हणून गौरविले होते. त्यावरून त्याच्या उपयुक्ततेची कल्पना तुम्हाला येईल.
काहीही कशालाही चिकटवा.
ही लिंक फार गंमतीदार आहे. तिचं नाव आहे www.thistothat.com . आता हे धीक टू दॅट नेमकं काय आहे हे सांगायला हवं. धीसच्या बाजूला सिरॅमिक, फॅब्रीक, ग्लास, लेदर, मेटल, पेपर, प्लास्टीक, रबर, फोम, विनायल आणि लाकूड एवढ्या गोष्टी आहेत. दॅटच्या बाजूलाही ह्या सर्व गोष्टी आहेत. मग धीक टू दॅट म्हणजे काय? उत्तर सोपं आहे. काहीही कशालाही चिकटवा. Let's glue. म्हणजे काचेला लाकूड चिकटवा, किंवा रबराला धातू चिकटवा, किंवा प्लास्टीकला फॅब्रीक चिकटवा. काहीही कशालाही कसं चिकटवायचं हे thistothat.com आपल्याला सांगते. त्यासाठी कोणते विशिष्ट गोंद किंवा रसायनं वगैरे उपलब्ध आहेत, त्यांना काय म्हणतात वगैरे माहिती तिथे मिळते. मुद्दाम पहावी आणि लक्षात ठेवावी अशी ही साईट.
१७५ प्रकारच्या घरगुती दुरूस्त्या
www.fixitclub.com/ तर चांगलीच कामाची आहे. एकूण १७५ प्रकारच्या घरगुती दुरूस्त्या तिथे शिकवल्या आहेत. त्यात तुमच्या डीव्हीडी प्लेअर रिपेअरपासून ते इलेक्ट्रीक ओव्हन रिपेअरपर्यंत बरंच काही आहे. यात वस्तूची दुरूस्ती करताना नेमकी कशी करावी हे सांगताना अनेक छायाचित्रे देऊन दाखविलेलं असल्याने नेमकी कृती समजण्यास सोपी जाते.
१०१ नवे उपयोग
आपल्या दैनंदिन जीवनातल्या साध्या साध्या गोष्टींचा नवा उपयोग सांगणारी. इंटरनेटवर अनेक ब्लॉग्जनी ह्या लिंकचा उल्लेख केल्याने ही लिंक चांगली लोकप्रिय झाली आहे. http://www.realsimple.com/work-life/101-new-uses-for-everyday-things-10000001030084/index.htmll . हा लिंकचा पत्ता लांबीला थोडा मोठा असला तरी तेथील माहिती फार उपयुक्त आहे. लिंबू, वर्तमानपत्र, कॉफी फिल्टर, ऑलिव्ह ऑईल, बेकींग सोडा, व्हिनेगार, वेलक्रो, खाण्याचं मीठ वगैरेंचे एकूण १०१ नवे उपयोग ह्या साईटने सांगितले आहेत. मूळात realsimple.com ही साईट life made easier ह्या ब्रीदवाक्याने चालत असते. त्यांनी सांगितलेले १०१ नवे उपयोग गंमतीदार आहेत. उदाहरणार्थ भरपूर मीठ घातलेलं गरम पाणी ड्रेनेजमध्ये ओतल्यास चोक-अप झालेले ड्रेनेज मोकळे होते. किंवा, दाढीचे क्रीम संपले असेल तर त्याजागी ऑलिव्ह ऑईल वापरल्यास दाढी उत्तम होते. व्हिनेगारचे दोन तीन चमचे पाण्यात टाकून त्या पाण्यातून स्वेटर वगैरे सारखे कपडे काढल्यास ते अधिक मऊसार होतात. वगैरे वगैरे. ह्या १०१ उपयोगांवर नजर टाकून त्यातले काही आपल्या कामी येतात का हे पहायला हरकत नाही.
www.myproductadvisor.com
www.myproductadvisor.com ही. एखादी वस्तू जेव्हा मला विकत घ्यायची असते तेव्हा दुकानात वा मॉलमध्ये जाण्यापूर्वी माझे ज्ञान वाढवणारी ही साईट आहे. समजा मला मोबाईल फोन विकत घ्यायचा आहे. तर मी Phone वर क्लीक करायचं. ही साईट मग मला वेगवेगळे प्रश्न विचारते. म्हणजे, त्या फोनमध्ये तुला कॅमेरा हवा आहे का? त्यातून ईमेल वगैरे पाठवायची आहे का? इंटरनेट हवं आहे का? किती किंमतीपर्यंत ती वस्तू घ्यायची आहे? एखादा विशिष्ट ब्रॅंड किंवा कंपनी डोळ्यासमोर आहे का? तुमचं वय किती आहे? वगैरे वगैरे. तुम्ही सर्वच प्रश्नांची उत्तरं द्यायला हवीत असं नाही. पण जेवढ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्याल त्यावर आधारित तुम्हाला हव्या त्या बजेटची, किंमतीची, कंपनीची, लाईफस्टाईलची वस्तू ही साईट तुम्हाला सुचवते. यातली किंमत अर्थातच अमेरिकन डॉलरची असते. पण आपण त्याचे रूपांतर रूपयात करून घ्यायचे, आणि नंतर हवा तो बोध त्यातून घ्यायचा. एखादी उपयुक्त टीप ह्या साईटने आपल्याला दिली तरी खूप झालं. शिवाय ही साईट रूपयात हिशोब देत नाही म्हणून एखाद्या भारतीय तरूणाला अशी वेबसाईट उभी करण्याची प्रेरणा मिळाली तर फारच उत्तम. त्यासाठी देखील ह्या साईटकडे लक्ष वेधणं गरजेच होतच.
युजर गाईडसचा संग्रह
सध्याचा काळ असा आहे की आपलं घर असो की आपलं कार्यालय, घरात इलेक्ट्रॉनिक आणि वीजेवर चालणार्या वस्तूंची रेलचेल असते. टीव्हीपासून ते म्युझिक सिस्टमपर्यंत, आणि स्वयंपाकघरातल्या मिक्सर पासून ते वॉशिंग मशीनपर्यंत अनेक गोष्टी असतात. मोबाईल तर प्रत्येकाच्याच खिशात असतो. खेरीज कॅलक्युलेटर्स, आपल्या संगणकाच्या माऊसपासून ते फॅक्स मशीनपर्यंत अनेक गोष्टी असतात. जेव्हा ह्या वस्तू नव्याने आपल्या घरात येतात, तेव्हा आपलं लक्ष त्या वस्तूकडे असतं. चकचकीत नव्या रूपातली ती देखणी वस्तू आपण कधी एकदा हाताळतोय, वापरायला सुरूवात करतोय इकडे सारं ध्यान एकवटलेलं असतं. पुढे कधीतरी ती वस्तू जुनी होते. अचानक बिघडते. ह्या टप्प्यावर मग आपल्याला आठवण होते ती त्या वस्तूच्या मॅन्युअलची किंवा युजर गाईडची. त्या युजर गाईडमध्ये बिघाड कसा दूर करावा याच्या टीप्स दिलेल्या असतात, आणि त्याच आपल्याला हव्या असतात. ट्रबल शुटींग ह्या शीर्षकाखाली ते तंत्र आणि मंत्र कधीतरी पाहिलेले आपल्याला आठवत असतात. पण झालेलं असं असतं, की बाकी सर्व आठवत असून ते मॅन्युअल किंवा युजर गाईड कुठे ठेवलय हे काही आठवत नसतं. कपाटं, ड्रावर्स, बॅगा, फाईल्स वगैरे धुंडाळून आपण शेवटी हरतो. ते मॅन्युअल काही हाती लागत नसतं, आणि त्यावाचून तर सारं अडलेलं असतं. मंडळी, अशा परिस्थितीत हमखास कामी येणारी वेबसाईट म्हणजे www.safemanuals.com . ह्या साईटवर सर्व प्रकारच्या युजर गाईडसचा संग्रह उपलब्ध आहे. एकूण ८८३५४२ एवढी युजर गाईडस तिथे उपलब्ध आहेत असा त्या साईटचा दावा आहे. ही युजर गाईडस पहाण्यासाठी आजपर्यंत ४,५७,००० पेक्षा जास्त जणांनी तिथे मेंबरशीप घेतली आहे. आपली वस्तू ज्या कंपनीची आहे त्या कंपनीनुसार किंवा वस्तूच्या प्रकारानुसार (डिजिटल कॅमेरा, लेझर प्रिंटर वगैरे) किंवा एकूणच हवा तसा सर्च करून युजर गाईड शोधण्याची सोय ह्या साईटवर आहे. ह्या साईटचे नाव आपल्या संग्रहात हवे. कधी तिची गरज लागेल हे सांगणं अवघड.
माध्यम इंटरनेट
पत्रकारिता, जाहिरात आणि जनसंपर्काशी संबंधित चर्चा किंवा अभ्यासक्रम असला की त्याची सुरूवात हमखास उपलब्ध माध्यमांच्या प्रस्तावनेने होते. छापिल माध्यम अर्थात प्रेस वा प्रिंट मिडीया, मग रेडिओ, त्यानंतर दूरदर्शन, आणि पुढे अगदी चित्रपटापर्यंतच्या विविध माध्यमांचा उल्लेख त्या प्रस्तावनेत अपरिहार्यपणे होतो. वृत्तपत्रांचा जनमानसावरील प्रभाव, दूरदर्शनच्या प्रभावातून उद्भवलेले परिणाम वगैरे विषय अगदी शाळकरी प्रश्नपत्रिकेत सुद्धा निबंध लिहीण्याचे विषय म्हणून डोकावताना दिसतात. बातम्यांची माध्यमं म्हणून वृत्तपत्रे आणि दूरदर्शन पटकन आपल्या डोळ्यासमोर येतात. ह्या व अशासारख्या चर्चेच्या ओघात 'मेरा नंबर कब आयेगा' म्हणत हमखास दरवाजाबाहेर ताटकळत असतं ते इंटरनेट.
जो प्रकार वृत्तपत्रांच्या बाबतीत तोच दुरदर्शनच्या बाबतीतही आहेच. आजकल किंवा स्टार माझा वा मी मराठी सारख्या वाहिन्या जगभर दिसत नसल्या तरी इंटरनेटवरून त्यांचे प्रसारण जगाच्या कानाकोपर्यापर्यंत पोहोचू शकते. दुरदर्शन वाहिन्यांना भौगोलिक मर्यादेबरोबर काळाची मर्यादाही असते. कालची बातमी पहायची तर एक दिवस अगोदरचा पेपर आपण रद्दीतून काढून पाहू शकतो. मात्र कालची बातमी आज पाहण्याची सोय दूरदर्शनवर नसते. कालची बातमी रेकॉर्डरवर रेकॉर्ड केलेली नसेल तर ती उपलब्ध होणं दुरापास्त आणि काही वेळा अशक्यच असतं. इंटरनेटवर ह्या उलट परिस्थिती असते. न्युयॉर्क टाईम्सच्या वेबसाईटवर आज १८५१ सालापासून ते आजतागायत म्हणजे २००८ सालापर्यंत प्रकाशित झालेल्या बातम्या तुम्ही पाहू शकता. थोडक्यात, काळ, वेळ आणि प्रदेशाच्या मर्यादा ओलांडून संपूर्ण पृथ्वीतल व्यापून राहिलेले आजचे इंटरनेट हे माध्यम, प्रेस आणि टीव्ही सारखे स्वतंत्र माध्यम मानायलाच हवे.
३१ ऑगस्ट १९२० रोजी अमेरिकेत डेट्रॉइट (मिशिगन) येथे जगातले रेडिओवरचे पहिले बातमीपत्र प्रसारित केले गेले. भारतात रेडिओची खरी सुरूवात १९३६ साली झाली. १९२० ते १९३६ हा काळ १६ वर्षांचा आहे. १९३६ ते १९४७ ह्या काळात भारतात केवळ ८ आकाशवाणी केंद्रे सुरू झाली होती. म्हणजेच रेडिओ माध्यमाचा प्रसार आपल्या देशात कुर्मगतीने झाला. इंटरनेट मात्र आज अतिशय सुसाट वेगाने भारतात पसरत आहे, आणि जगात होणारी प्रत्येक तांत्रिक प्रगती आपल्यामध्ये सामावून घेत आहे. १९२० किंवा त्या लगतचा अगदी कालपर्यंतच्या काळात ग्लोबल व्हिलेज ही संकल्पना कल्पनेतही आलेली नव्हती. आता ती भारतासह सर्वच राष्ट्रांमध्ये कमीअधिक झपाट्याने रूजते आहे. ह्या ग्लोबल व्हिलेजमध्ये एका गल्लीतला विकास दुसर्या गल्लीत व्हायला पूर्वीसारखा दशका दशकांचा वेळ लागत नाही. इंटरनेट हे भारतामध्ये १९९४-९५ मध्ये शहरी लोकांच्या घरात पोहोचले. पुढल्या दहा वर्षांत ते खेड्यापाड्यातही पोहोचले. आपल्याकडील इंटरनेटचा प्रसार हा वायर आणि तारांच्या तांत्रिकतेमध्ये अडलेला नाही. तो आपल्याकडील शिक्षणाच्या धीम्या गतीमुळे व ग्रामीण भागातील इंग्रजी भाषेच्या आकलनाच्या मर्यादांमुळे धीम्या गतीने होतो आहे.
इंटरनेट प्रेस वा टीव्ही माध्यमांच्या दोषांवर उपाय देत पुढे सरसावते म्हणून त्याला कोणी सुपर माध्यम म्हणेल असे मात्र नाही. इंटरनेट उद्याच्या सुपर माध्यमाच्या दिशेने निश्चित वाटचाल करू शकेल असा एक महत्वाचा गुण त्यात आहे, तो गुण म्हणजे त्याची इंटरॅक्टीव्हीटी. वाचकांच्या प्रतिक्रिया वृत्तपत्रे वा दुरदर्शनकडे जाण्यासाठी काही काळ जावा लागतो. वाचक कागदावर काहीतरी लिहील, तो कागद पोस्टाने वा फॅक्सने वृत्तपत्राकडे किंवा दुरदर्शनकडे पाठवील. त्यानंतर त्या वाचकाची ती प्रतिक्रिया जगापुढे येईल. वृत्तपत्र अशी किती पत्रे छापू शकेल, किंवा दुरदर्शन अशा किती पत्रांचा उल्लेख करू शकेल याला अनुक्रमे वृत्तपत्रातील जागा व दुरदर्शनवरील वेळेच्या मर्यादा आहेत. इंटरनेटवर बसलेला वाचक मात्र काही क्षणात कोणताही कागद न घेता, पोस्ट वा फॅक्सच्या नादी न लागता चटकन आपली प्रतिक्रिया (Comment) वेबसाईटवर नोंदवू शकेल. अशा असंख्य प्रतिक्रिया आल्या तरी त्यांना तिथे जागा कमी पडणार नाही, आणि कोणत्याही वेळी, कोणत्याही दिवशी कोणालाही कुठेही त्या प्रतिक्रिया वाचता येतील. वाचकांच्या प्रतिक्रियांना काही क्षणात उत्तर देणे हेही लेखकाला अशक्य नाही. वाचक वा दर्शक आणि इंटरनेटचे माध्यम यातली ही थेट संवादाची सोय इंटरनेटला सुपर माध्यमाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी खूपच उपयुक्त आहे.
इंटरनेटच्या बाबतीत डिजिटल डिव्हाईड च्या मुद्याबद्दल नेहमीच चर्चा होते. १९९५ साली भारतात आलेले इंटरनेट २००८ साली दुरदर्शनसारखे घराघरात गेलेले असेल असा दावा किंवा अपेक्षा कोणीच करणार नाही. त्यातही त्यातील भाषेचा वापर हा आजच्या पेक्षाही अधिक सुलभ होण्याची गरज आहे. भारतीय भाषांच्या युनिकोड तंत्राची प्रगती आजही पुढे सरकते आहे. २०१० सालापर्यंत तिला पुर्णत्व येईल अशी आशा बाळगली जात आहे.
आज हा सारा प्रकार वाचताना स्वप्नवत आणि अशक्यप्राय वाटतोय. ते स्वाभाविक आहे. पण हे स्वप्न सत्याकडे वाटचाल करत हे देखील वास्तव आहे. ह्या दृष्टीने चाललेले अनेक प्रयोग यशस्वी होत आहेत. विज्ञानाची झेप मानवी मेंदूच्या पलिकडची असते. फॅक्स किंवा दुरदर्शनची कल्पना अठराव्या -एकोणीसाव्या शतकात अशक्यप्रायच वाटली होती. पण विसाव्या शतकात ते वास्तवात आलं. आपण माध्यमांची चर्चा आज करतोय ती आजचे संदर्भ डोक्यात घेऊन. उद्याचे प्रगत संदर्भ डोक्यात घेतले की वाटतं आपला ई पेपर उघडला की पहिल्या पानावर आलेली ताजी बातमी त्यावरची व्हिडिओ क्लीप पहात आपल्याला वाचता येईल. अशा वेळी प्रेस मिडीया विरूद्ध टीव्ही मिडीया अशी विसाव्या शतकात झालेली ऐतिहासिक चर्चा ऐकून हंसू आल्याशिवाय राहणार नाही.
एक मात्र नक्की, की माध्यमांचे दृश्य बदलले तरी त्याचा आत्मा बदलणं विज्ञानाच्या ताकदीबाहेरचं आहे. माणसाची चाल पायावरच राहणार आहे. आजचा कागदी पेपर असो की उद्याचा ई पेपर माणसाची चाल पायांनी आणि विचार डोक्यातूनच येत राहणार आहे. ई पेपर आल्याने माध्यमांच्या भूमिकेत मोठा बदल संभवतो अशी चर्चा मात्र जगभर कुठेही चाललेली दिसत नाही.
इंटरनेट हे माध्यम?
खरं तर वृत्तपत्र काय किंवा दुरदर्शनची एखादी वाहिनी म्हणजे चॅनल काय, त्यांच्या प्रसारणाला मूळातच भौगोलिक मर्यादा असते. देशातले अगदी सर्वाधिक खपाचे वृत्तपत्र घेतले तरी ते जगातल्या प्रत्येक कानाकोपर्यात पोहोचू शकत नाही. ही व्यावहारिक मर्यादा जगातले प्रत्येक वृत्तपत्र मान्य करते. ह्याच मर्यादेवरचा एक उपाय म्हणून इंटरनेटवर वृत्तपत्रांच्या वेबसाईटस आपल्याला अपरिहार्यपणे दिसतात. वॉशिंग्टन पोस्ट किंवा न्युयॉर्क टाईम्स सारखं वृत्तपत्र मुंबई, पुणे गोव्यातल्या प्रत्येक इंग्रजी वाचकापर्यंत पोहोचणं जसं शक्य नसतं, तसच भारताचा टाईम्स ऑफ इंडिया किंवा लोकसत्ता वा गोमांतक न्यु जर्सीतल्या प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचणं अशक्य असतं. जगात कुठेही एखादं विशिष्ट वृत्तपत्र हाती पडलं नाही तरी त्या वृत्तपत्राची वेबसाईट त्या वाचकाची वाचनाची भूक भागवू शकते. म्हणजे, खरं तर इंटरनेट भौगोलिक दृष्ट्या वृत्तपत्राच्या एक पाऊल पुढेच असतं. वृत्तपत्राची ती मर्यादा त्याला कधीच अडवत नाही.जो प्रकार वृत्तपत्रांच्या बाबतीत तोच दुरदर्शनच्या बाबतीतही आहेच. आजकल किंवा स्टार माझा वा मी मराठी सारख्या वाहिन्या जगभर दिसत नसल्या तरी इंटरनेटवरून त्यांचे प्रसारण जगाच्या कानाकोपर्यापर्यंत पोहोचू शकते. दुरदर्शन वाहिन्यांना भौगोलिक मर्यादेबरोबर काळाची मर्यादाही असते. कालची बातमी पहायची तर एक दिवस अगोदरचा पेपर आपण रद्दीतून काढून पाहू शकतो. मात्र कालची बातमी आज पाहण्याची सोय दूरदर्शनवर नसते. कालची बातमी रेकॉर्डरवर रेकॉर्ड केलेली नसेल तर ती उपलब्ध होणं दुरापास्त आणि काही वेळा अशक्यच असतं. इंटरनेटवर ह्या उलट परिस्थिती असते. न्युयॉर्क टाईम्सच्या वेबसाईटवर आज १८५१ सालापासून ते आजतागायत म्हणजे २००८ सालापर्यंत प्रकाशित झालेल्या बातम्या तुम्ही पाहू शकता. थोडक्यात, काळ, वेळ आणि प्रदेशाच्या मर्यादा ओलांडून संपूर्ण पृथ्वीतल व्यापून राहिलेले आजचे इंटरनेट हे माध्यम, प्रेस आणि टीव्ही सारखे स्वतंत्र माध्यम मानायलाच हवे.
३१ ऑगस्ट १९२० रोजी अमेरिकेत डेट्रॉइट (मिशिगन) येथे जगातले रेडिओवरचे पहिले बातमीपत्र प्रसारित केले गेले. भारतात रेडिओची खरी सुरूवात १९३६ साली झाली. १९२० ते १९३६ हा काळ १६ वर्षांचा आहे. १९३६ ते १९४७ ह्या काळात भारतात केवळ ८ आकाशवाणी केंद्रे सुरू झाली होती. म्हणजेच रेडिओ माध्यमाचा प्रसार आपल्या देशात कुर्मगतीने झाला. इंटरनेट मात्र आज अतिशय सुसाट वेगाने भारतात पसरत आहे, आणि जगात होणारी प्रत्येक तांत्रिक प्रगती आपल्यामध्ये सामावून घेत आहे. १९२० किंवा त्या लगतचा अगदी कालपर्यंतच्या काळात ग्लोबल व्हिलेज ही संकल्पना कल्पनेतही आलेली नव्हती. आता ती भारतासह सर्वच राष्ट्रांमध्ये कमीअधिक झपाट्याने रूजते आहे. ह्या ग्लोबल व्हिलेजमध्ये एका गल्लीतला विकास दुसर्या गल्लीत व्हायला पूर्वीसारखा दशका दशकांचा वेळ लागत नाही. इंटरनेट हे भारतामध्ये १९९४-९५ मध्ये शहरी लोकांच्या घरात पोहोचले. पुढल्या दहा वर्षांत ते खेड्यापाड्यातही पोहोचले. आपल्याकडील इंटरनेटचा प्रसार हा वायर आणि तारांच्या तांत्रिकतेमध्ये अडलेला नाही. तो आपल्याकडील शिक्षणाच्या धीम्या गतीमुळे व ग्रामीण भागातील इंग्रजी भाषेच्या आकलनाच्या मर्यादांमुळे धीम्या गतीने होतो आहे.
सुपर माध्यमाची बीजे
छापलेले वृत्तपत्र हे कितीही गुळगुळीत आर्टपेपरवर छापलेले असले आणि डोळे दिपवणार्या बहुरंगी छायाचित्रांनी नटलेले असले तरी ते मुके असते. दुसरीकडे दुरदर्शन अगदी जिवंत दृश्य पहात आहोत एवढे प्रेक्षणीय असले तरी ती तशा दृश्यांची एक क्रमवारीने येणारी मालिका असते. न्युज अॅट टेन म्हणून बरोबर दहा वाजता सुरू झालेले दुरदर्शनवरचे वार्तापत्र काही मिनिटांनी पुढे गेले की ते मागे आणता येणे शक्य नसते. चुकलेली बातमी पुन्हा पंधरा मिनिटांनी वा अर्ध्या तासांनी जेव्हा पुन्हा दाखवली जाते तेव्हाच त्या दृश्यांचे दर्शन होते. दुरदर्शन संचावर अग्रलेख वाचता येत नाही, आणि घटना प्रत्यक्ष घडताना वृत्तपत्रात पहाता येत नाही. ह्या दोन्ही माध्यमांच्या त्या मर्यादा इंटरनेटच्या वेबसाईटला अडवू शकत नाहीत. वेबसाईटवर अग्रलेखही वाचता येतो आणि तीन मिनिटांपूर्वी दाखवले गेलेले दृश्य माऊसने एकदा क्लीक केलं की काही क्षणात डाऊनलोड होऊन समोर उलगडू लागते. म्हणजेच छापिल वृत्तपत्र आणि दुरदर्शन दोन्हींचे गुण एकत्र करणारे, व दोन्हींमधील दोषांना मागे सारून पुढे जाणारे माध्यम म्हणून इंटरनेट एकूण शर्यतीत पुढे येताना दिसते.इंटरनेट प्रेस वा टीव्ही माध्यमांच्या दोषांवर उपाय देत पुढे सरसावते म्हणून त्याला कोणी सुपर माध्यम म्हणेल असे मात्र नाही. इंटरनेट उद्याच्या सुपर माध्यमाच्या दिशेने निश्चित वाटचाल करू शकेल असा एक महत्वाचा गुण त्यात आहे, तो गुण म्हणजे त्याची इंटरॅक्टीव्हीटी. वाचकांच्या प्रतिक्रिया वृत्तपत्रे वा दुरदर्शनकडे जाण्यासाठी काही काळ जावा लागतो. वाचक कागदावर काहीतरी लिहील, तो कागद पोस्टाने वा फॅक्सने वृत्तपत्राकडे किंवा दुरदर्शनकडे पाठवील. त्यानंतर त्या वाचकाची ती प्रतिक्रिया जगापुढे येईल. वृत्तपत्र अशी किती पत्रे छापू शकेल, किंवा दुरदर्शन अशा किती पत्रांचा उल्लेख करू शकेल याला अनुक्रमे वृत्तपत्रातील जागा व दुरदर्शनवरील वेळेच्या मर्यादा आहेत. इंटरनेटवर बसलेला वाचक मात्र काही क्षणात कोणताही कागद न घेता, पोस्ट वा फॅक्सच्या नादी न लागता चटकन आपली प्रतिक्रिया (Comment) वेबसाईटवर नोंदवू शकेल. अशा असंख्य प्रतिक्रिया आल्या तरी त्यांना तिथे जागा कमी पडणार नाही, आणि कोणत्याही वेळी, कोणत्याही दिवशी कोणालाही कुठेही त्या प्रतिक्रिया वाचता येतील. वाचकांच्या प्रतिक्रियांना काही क्षणात उत्तर देणे हेही लेखकाला अशक्य नाही. वाचक वा दर्शक आणि इंटरनेटचे माध्यम यातली ही थेट संवादाची सोय इंटरनेटला सुपर माध्यमाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी खूपच उपयुक्त आहे.
भाषेच्या मर्यादाही मागे पडत आहेत..
इंटरनेट म्हंटलं की इंग्रजी अपरिहार्य आहे, आणि त्यामुळेच भारतासारख्या देशात त्यावर मर्यादा पडतील असं काल-परवापर्यंत वाटत होतं. मात्र हिंदी, मराठी किंवा अगदी बंगाली, तामिळ, तेलुगू सारख्या भाषांचे युनिकोड फाँटस उपलब्ध झाल्याने आज अक्षरशः हजारो वेबसाईटस आणि ब्लॉग्ज भारतीय भाषांतून सहजपणे तयार होताना दिसू लागले आहेत. मध्यंतरी जया बच्चन यांनी 'हम युपीवाले है, हम हिंदी में बोलेंगे' हे उदगार काढले आणि त्यावर गदारोळ उठला. ह्या प्रकरणात स्वतः अमिताभ बच्चनला काय म्हणायचय याबद्दल सर्वांनाच कुतूहल होते. अमिताभला जे म्हणायचे होते, ते अमिताभने भारताबाहेर असताना आपल्या ब्लॉगवर लिहीले. हा ब्लॉग अमिताभचा अधिकृत ब्लॉग असल्याने तो विश्वासार्ह होता. अमिताभ वृत्तपत्रांना वा वाहिन्यांना मुलाखतीसाठी उपलब्ध होऊ शकला नाही, तरी ब्लॉगवरील त्याच्या स्वगतावरून सर्व वृत्तपत्रांनी व वाहिन्यांनी सविस्तर बातम्या दिल्या. जगभरात अक्षरशः लाखो लोकांनी तो ब्लॉग वाचला. आपल्या हजारो प्रतिक्रिया त्यावर नोंदवल्या. अमिताभचा हा ब्लॉग इंग्रजीत होता. मात्र ज्यांना चांगले इंग्रजी येत नाही, असे महत्वाचे पुढारी वा तत्सम महत्वाच्या व्यक्तींना आज हिंदी, मराठी वा तत्सम भाषेत आपला ब्लॉग तयार करणे आज शक्य आहे. इंटरनेटने इंग्रजी भाषेचा अडथळा मागे टाकला आहे ही बाब भारतासारख्या बहुभाषी देशाच्या दृष्टीने खरोखरीच क्रांतीकारक आहे.इंटरनेटच्या बाबतीत डिजिटल डिव्हाईड च्या मुद्याबद्दल नेहमीच चर्चा होते. १९९५ साली भारतात आलेले इंटरनेट २००८ साली दुरदर्शनसारखे घराघरात गेलेले असेल असा दावा किंवा अपेक्षा कोणीच करणार नाही. त्यातही त्यातील भाषेचा वापर हा आजच्या पेक्षाही अधिक सुलभ होण्याची गरज आहे. भारतीय भाषांच्या युनिकोड तंत्राची प्रगती आजही पुढे सरकते आहे. २०१० सालापर्यंत तिला पुर्णत्व येईल अशी आशा बाळगली जात आहे.
सर्वसामान्यांची पत्रकारिता
वृत्तपत्रांतील वाचकांची पत्रे हा नेहमीच एक महत्वाचा भाग मानला जातो. कित्येकदा जेथे बातमीदार पोहोचत नाही अशा एखाद्या मुद्यापर्यंत एखादा वाचक पोहोचलेला असतो. तो पत्र लिहून ती बाब वृत्तपत्राला कळवतो तेव्हा आश्चर्याचे धक्के बसतात, आणि चक्रे वेगाने फिरतात. अशी उदाहरणे आपल्याला पहायला मिळतात. आता ह्या वाचकांच्या पत्राच्या पुढे नेणारी सर्वसामान्यांची पत्रकारिता किंवा सिटीझन्स जर्नालिझम जगभरात बहरताना दिसतो आहे. माध्यमांच्या दृष्टीने म्हंटले तर एकीकडे हे आव्हान आहे, तर दुसरीकडे ते एक वरदानही आहे. ज्या वृत्तपत्राकडे सिटीझन जर्नालिझमची जास्तीत जास्त शक्ती असेल, वा ज्या वाहिनीकडे जास्तीत जास्त संख्येने नागरिकांकडून प्रत्यक्ष घेतलेल्या व्हिडिओ क्लीप्स येत असतील अशा वाहिनींची ताकद इतरांपेक्षा अधिक असणार आहे. प्रगत होत चाललेले तंत्रज्ञान एकीकडे सोपे आणि दुसरीकडे किंमतीला अतिशय स्वस्त व परवडण्याजोगे असल्यानेच सिटीझन जर्नालिझमचा प्रवाह दुथडी भरून वाहू लागणार आहे. शे दोनशेला मिळणारा डिजिटल कॅमेरा शेकडो छायाचित्रे घेऊ शकेल व त्यातली अनेक छायाचित्रे इंटरनेटवरून अपलोड होऊन क्षणार्धात वृत्तपत्रे व वाहिन्यांकडे पोहोचू शकतील. हाच प्रकार काही फरकाने व्हिडिओ कॅमेर्यांच्या बाबतीतही होणार आहे.खर्या अर्थाने मल्टीमिडिया
सर्वसामान्यांची पत्रकारिता हे खरं तर उद्याचे एक स्वतंत्र माध्यम म्हणून उभं राहण्याची शक्यता आहे. आजचे ब्लॉग्ज हे त्याच दृष्टीने वाटचाल करीत आहेत. वृत्तपत्रे व वाहिन्या देऊ शकणार नाहीत एवढा मजकूर, चित्रे, छायाचित्रे, विचार असा समृद्ध ज्ञानखजिना ब्लॉगचे माध्यम जगापुढे ठेवत जाणार आहे. इंटरनेटच्या पोटात अशा प्रकारची छोटी मोठी माध्यमं नांदत राहणार आहेत. त्यांचा थेट परिणाम आज ज्यांना आपण माध्यमं म्हणतो त्यावर होत जाणार आहे. प्रगत राष्ट्रांतील कित्येक दैनिक वृत्तपत्रांमध्ये आज दररोज वैशिष्ट्यपूर्ण वेबसाईटस व ब्लॉग्जची माहिती वाचकांना दिली जात असते. भाषिक वृत्तपत्रे त्या दृष्टीने आज मागे दिसतात. पण उद्या त्यांना हा भाग ठळकपणे द्यावाच लागणार आहे.इंटरनेटच्या मर्यादा आणि उद्या
इंटरनेटचं ताकदवान माध्यम कोणत्याही मर्यादांविना उभं आहे असं चित्र मला इथे रंगवायचं नाही. हे मुद्दे निघाले की हमखास समोरून प्रश्न येतो, की आम्ही बसमध्ये वा रेल्वेगाडीत बसून वृत्तपत्र वाचत जातो. इंटरनेटचं तसं कुठे करता येतं? आरामखुर्चीत बसून इंटरनेटवरचा पेपर कुठे वाचता येतो? किंवा प्रकाशमान संगणकी स्क्रीनवरचं एक पान वाचलं की डोळ्यातून पाणी येऊ लागतं. ह्या इंटरनेटच्या आजच्या काही मर्यादा जरूर आहेत. मोबाईल फोनवर इंटरनेट दिसतं, ते कुठेही पहाता येतं असं मी म्हणणार नाही. कारण त्यात तर प्रचंड मर्यादा आहेत. पण एक लक्षात घ्यायला हवं की गरज ही शोधाची जननी असते. शास्त्रज्ञांचे आजचे प्रयत्न ई इंक आणि ई पेपर च्या दिशेने चालले आहेत. झेरॉक्स, मोटोरोला सारख्या कंपन्या गेली काही वर्षे अब्जावधी रूपये खर्च करून संशोधन करीत आहेत. ई पेपर २०१५ च्या आसपास प्रत्यक्षात येईल अशी चर्चा तज्ज्ञ आणि माहीतगार मंडळी करीत आहेत. ई पेपर असेल आपल्या रोजच्या पेपर सारखाच. संपूर्ण आकाराचा. उदबत्तीचा गोल आकाराचा सुरनळीसारखा बॉक्स असेल तशी सुरनळी ह्या पेपरची होईल. ती तुम्ही जवळ ठेवायची. दर पाच दहा मिनिटांनी त्यातला मजकूर व छायाचित्रे बदलत असतील. तुम्हाला वेळ मिळाला की पेपरची ती सुरनळी सरळ करायची. आलेली ताजी बातमी पहायची. सुरनळी परत ठेवून द्यायची. जे दैनिक हवे त्याची वर्गणी भरलेली असली की त्यावर त्या बातम्या आपोआप उमटत राहणार. ई इंक चे अतिसुक्ष्म कण त्या ई पेपरवर आपोआप इकडे तिकडे होऊन नवनवी अक्षरे, मथळे, छायाचित्रे रिमोट पद्धतीने त्यावर उमटणार. बातमीदार तसच काम करत असणार. अग्रलेख तसेच येत राहतील. लेख तसेच असतील. फक्त पेपर आणि इंक बदलेल.आज हा सारा प्रकार वाचताना स्वप्नवत आणि अशक्यप्राय वाटतोय. ते स्वाभाविक आहे. पण हे स्वप्न सत्याकडे वाटचाल करत हे देखील वास्तव आहे. ह्या दृष्टीने चाललेले अनेक प्रयोग यशस्वी होत आहेत. विज्ञानाची झेप मानवी मेंदूच्या पलिकडची असते. फॅक्स किंवा दुरदर्शनची कल्पना अठराव्या -एकोणीसाव्या शतकात अशक्यप्रायच वाटली होती. पण विसाव्या शतकात ते वास्तवात आलं. आपण माध्यमांची चर्चा आज करतोय ती आजचे संदर्भ डोक्यात घेऊन. उद्याचे प्रगत संदर्भ डोक्यात घेतले की वाटतं आपला ई पेपर उघडला की पहिल्या पानावर आलेली ताजी बातमी त्यावरची व्हिडिओ क्लीप पहात आपल्याला वाचता येईल. अशा वेळी प्रेस मिडीया विरूद्ध टीव्ही मिडीया अशी विसाव्या शतकात झालेली ऐतिहासिक चर्चा ऐकून हंसू आल्याशिवाय राहणार नाही.
एक मात्र नक्की, की माध्यमांचे दृश्य बदलले तरी त्याचा आत्मा बदलणं विज्ञानाच्या ताकदीबाहेरचं आहे. माणसाची चाल पायावरच राहणार आहे. आजचा कागदी पेपर असो की उद्याचा ई पेपर माणसाची चाल पायांनी आणि विचार डोक्यातूनच येत राहणार आहे. ई पेपर आल्याने माध्यमांच्या भूमिकेत मोठा बदल संभवतो अशी चर्चा मात्र जगभर कुठेही चाललेली दिसत नाही.
बहुगुणी गुगल कॅलेंडर
गुगल आणि जीमेलच्या सेवेशी आपण एव्हाना चांगले रूळलो आहोत. जीमेलमध्ये युनिकोडचे मराठी फाँट वापरून मराठी ईमेल पाठवता येते याचे प्रयोगही आपण बहुतेकांनी केलेले आहेत. आपण जेव्हा आपलं जीमेल अकाऊंट उघडतो तेव्हा त्या अकाऊंटच्या पोटात इतरही अनेक मोफत सेवा साठलेल्या आहेत याची कल्पना असूनही आपण त्यांच्या वाटेला फारसे गेलेलो नसतो. जीमेल अकाऊंट उघडून आपल्याला आलेल्या ईमेल पाहून झाल्या, किंवा फार तर पाठवायच्या ईमेल पाठवून झाल्या की आपण लॉगआऊट करून बाहेर पडतो. गुगलच्या सेवांपैकी फक्त जीमेल वापरणे आणि इतरांकडे फारसे न पाहणे म्हणजे आपल्या टीव्हीवर फक्त एकच चॅनेल बारा महिने पहात राहण्यासारखं आहे. आपल्या टीव्हीवर इतरही वेगवेगळ्या प्रकारचे चांगले-बरे-सोसो वगैरे वर्गीकरणात जाऊ शकणारे शेकडो चॅनेल्स असतात. ते न पहाता फक्त एकच चॅनेल पाहण्यात ज्या प्रकारचा तोटा आहे तोच तोटा आपण गुगलच्या अन्य सेवांचा लाभ न घेण्यात आहे.
गुगलच्या अनेक सेवांपैकी गुगल कॅलेंडर ह्या मोफत सेवेबद्दल मला आज खास करून बोलायचं आहे. ज्या मंडळींनी हे कॅलेंडर आजपर्यंत वापरलच नाही त्यांनी हा लेख वाचून ते वापरणं सुरू केलं तर एका कायम व उत्तम सुविधेचा अनुभव त्यांना येईल. इतर अनेक सेवांतून मी गुगल कॅलेंडर निवडलं याचं कारण हे कॅलेंडर आणि आपला मोबाईल फोन यांची अतिशय उपयुक्त सांगड आपल्याला घालता येते. उदाहरणार्थ पहा. रामरावांना डॉक्टरांनी त्यांचं दुपारचं आणि रात्रीचं जेवण वेळेवर घेण्याचा सल्ला दिला आहे. प्रकृतीला महत्व असल्याने रामरावांनीही दुपारी ठीक एक वाजता आणि रात्री ठीक आठ वाजता जेवायचच असा निश्चय केला आहे. रामराव तसे दिवसभर कामात गढलेले असतात. व्हिजिटर्स, मिटींग्ज, पत्रलेखन, ऑफिसच्या कामाचं वाचन यात पहिल्या दिवशी दुपारचे दोन कधी वाजले हे रामरावांना कळलच नाही. एक तास उशीर झाल्याने रामराव मनातल्या मनात चरफडले. कुणीतरी आपल्याला ठीक एक वाजता आठवण करायला हवी, आपण निदान मोबाईलवर अलार्म तरी लावायला हवा असं त्यांना वाटलं. पण पुढल्या काही दिवसांतही वेगवेगळ्या तर्हा होत राहिल्या. कधी ते अलार्म लावायलाच विसरायचे, कधी अलार्म लावलेल्या वेळी मोबाईल सायलेंट मोडवर असल्याने अलार्म कधी होऊन गेला हे कळायचं नाही. पुढे रामरावांची ती समस्या सुटली गुगल कॅलेंडरमुळे. रामरावांना ठीक बारा वाजून पंचावन्न मिनिटांनी लंच घेण्याची आठवण करणारा एक एस.एम.एस. गुगल कंपनीतर्फे मिळू लागला. दररोज न चुकता त्या ठरलेल्या वेळेला तो एस.एम. एस. येणार याची रामरावांना सवयच झाली. रामराव एव्हढे बेशिस्त की केवळ एका एस.एम.एस. ला ते दाद देईनात. तो एस.एम.एस. यायचा. ते तो पहायचे. पुन्हा जेवण वेळेवर घेण्याचं विसरून जायचे. यावर त्यांनी रिरिमाईंडरचा उपाय शोधला. त्यानुसार त्यांना पहिला एस.एम.एस. बारा वाजून पंचावन्न मिनिटांनी, दुसरा ठीक एक वाजता आणि तिसरा एक वाजून तीन मिनिटांनी मिळू लागला. हा उपाय मात्र बराचसा लागू पडला. तीन तीन वेळा त्यांच्या मोबाईलवर एस.एम.एस. आल्याने ते वेळेवर जेऊ लागले. ते तिन्ही एस.एम.एस. आता त्यांनी तीन महिन्यांसाठी कायम लावून ठेवून दिले आहेत. दररोज अलार्म लावण्याची कटकटही आता त्यांना नाही.
रामरावांनी हे आठवण करून देणारे एस.एम.एस. लावले ते गुगल कॅलेंडरवर. दिवसभरात ते असेच चहाच्या वेळेचे, ऑफिसमधून बाहेर पडण्याचे, एवढेच कशाला कुणाच्या वाढदिवसाचे, कुठल्या ठरलेल्या कार्यक्रमाचे, भेटीगाठींचे एस.एम.एस. वर्षभरासाठी लावून ठेवत असतात. हे एस.एम.एस. देखील ते तीन तीन वेळा रिरिमाईंडर पद्धतीने लावत असतात. त्यामुळे त्यांचा मोबाईल आता स्वस्थ नसतो. सारखा तो काही ना काही गोष्टींची आठवण करून देतच असतो. रामराव त्याप्रमाणे आपलं आयुष्य शिस्तबद्ध राखण्यात यशस्वीही होत असतात. आज तरी गुगल कॅलेंडरवर ही सेवा मोफत आहे. पुढेही ती मोफतच राहील असा विश्वास अनेकांना वाटतो आहे. रामरावांचं हे उदाहरण ऐकल्यावर काहींना प्रश्न पडेल की हे एस.एम.एस. रिमाईंडर भारतीय मोबाईल फोन्सवर लावता येतात का? ते आल्याबद्दल काही चार्ज आपल्याला द्यावा लागतो का? ह्या दोन प्रश्नांची उत्तरे प्रथम देतो आणि नंतर त्याच्या तंत्राकडे वळतो. पहिली गोष्ट म्हणजे गुगल कॅलेंडरची ही सेवा मोफत आहे. म्हणजे ह्या सेवेबद्दल गुगल कोणताही उघड वा हिडन चार्ज लावत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या मोबाईल कंपन्याही येणार्या एस.एम.एस. साठी कोणताही चार्ज लावत नाही. म्हणजेच आपल्याला गुगल कॅलेंडरवरून कितीही एस.एम.एस. आले तरी आपल्या खिशाला कसलीही चाट पडत नाही.
गुगल कॅलेंडरवरून आठवणींचे मोठे मोठे एस.एम.एस. पाठवणं शक्य असतं. म्हणजे उदाहरणार्थ, समजा २१ नोव्हेंबर २००८ रोजी तुमच्या अमुक तमुक मित्राचे लग्न पुण्यात आहे. तुम्ही आज सप्टेंबर २००८ मध्ये ( किंवा अगदी वर्ष दोन वर्ष अगोदर सुद्धा) तो एस.एम.एस. प्रोग्राम करू शकता. त्या एस.एम.एस. मध्ये त्या लग्नाचा तपशील, वधू-वरांची नावे, लग्नस्थळाचा पत्ता, मित्राचा व लग्नस्थळाचा दूरध्वनी क्रमांक, मुहुर्ताची वेळ असं सारं काही सप्टेंबरमध्ये टाकून ठेवलत आणि तो एस.एम.एस. तुम्हाला २० नोव्हेंबर २००८ रोजी सकाळी ९ वाजता मिळावा असं गुगल कॅलेंडरमध्ये प्रोग्राम करून ठेवलत की तुम्ही सगळं विसरायला मोकळे. बरं, हे सारं करणं अगदी सोपं. आपल्या संगणकावर जीमेल पहात असताना आपल्या कीबोर्डचा वापर करून काय हवा तो आणि हवा तेव्हढा तपशील टाईप करून ठेवायचा. मोबाईलवर अलार्म लावायचा तर आपण किती तपशील की ईन करू शकणार याला मर्यादा असते. शिवाय मोबाईलची बटणं दाबून तो सारा तपशील टाकत बसणं किती जिकीरीचं असेल याचा विचार तुम्हीच करा. त्यापुढे गुगल कॅलेंडरची ही एस.एम.एस. रिमाईंडर्स खूपच सोपी आणि सुलभ वाटतात.
कॅलेंडर म्हंटलं की आपल्याला अपुरी जागा, तो तारखेचा इंचभर चौकोन असं काहीतरी डोळ्यासमोर येतं. गुगल कॅलेंडरचं तसं नाही. तुम्ही आफिसचं कॅलेंडर वेगळं, व्यक्तीगत कॅलेंडर वेगळं, आणखीही इतर काही खात्यांची वा प्रकल्पांची कॅलेंडर्स वेगवेगळी ठेवू शकता. ही वेगवेगळी कॅलेंडर्स वेगवेगळीही पाहू शकता, किंवा हवी तर सगळी एकदमही पाहता येतात. हा मुद्दा थोडा अधिक स्पष्ट करून सांगतो. गुगल वेगवेगळ्या कॅलेंडरसाठी वेगवेगळा रंग तुम्हाला देते. समजा ऑफिस कॅलेंडरचा रंग हिरवा असेल आणि व्यक्तीगत कॅलेंडरचा रंग लाल असेल तर हिरवं आणि लाल कॅलेंडर वेगवेगळं पाहता येणं शक्य असतं. पण समजा एका विशिष्ट तारखेला एकूणच काय स्थिती आहे हे पहायचं असेल तर तेही पहाता येतं. उदाहरण समजा १ ऑक्टोबर २००८ चं घ्या. ह्या दिवशी कोणत्या वेळी ऑफिसच्या कामाची आणि आपल्या व्यक्तीगत कार्यक्रमांची काय स्थिती आहे हे एकदम पाहता येतं. १ ऑक्टोबर २००८ ह्या दिवशी हिरव्या रंगातील आणि लाल रंगातील अपॉइंटमेंटस वा रिमाईंडर्स एकदम दिसत असल्याने नियोजन करणं अगदी सोपं असतं. ह्या सार्या गोष्टी एस.एम.एस. रिमाईंडर्सनी युक्त असल्यास आपण संगणकाच्या समोर नसलो तरी कोणतीही गोष्ट विसरणं शक्य नसतं.
गुगल कॅलेंडरचा पुढला महत्वाचा भाग म्हणजे तुमच्या मोबाईल फोनवर इंटरनेट चालू करून तुमच्या गुगल कॅलेंडरमध्ये तुम्ही भर घालू शकता वा त्यात बदल करू शकता. गुगल कॅलेंडरमध्ये एस.एम.एस. ची सुविधा मिळविण्यासाठी तुम्हाला विशिष्ट सेटींग (आजकाल सेटींग म्हंटलं की लोकांना सरकारी चहापाणी वगैरे वाटतं, इथे ते सेटींग नव्हे) करावं लागतं. त्यासाठी जीमेलच्या स्क्रीनवर सर्वांत वर डावीकडे असलेल्या Calendar ह्या शब्दावर क्लीक करून गुगल कॅलेंडर उघडा. मग सर्वांत वर उजवीकडे Settings ह्या शब्दावर क्लीक करा. तुम्हाला तीन प्रकारची कॅलेंडर सेटींग्ज दिसतील. त्यातील Mobile Setup वर क्लीक करा. ज्या मोबाईल फोनवर तुम्हाला एस.एम.एस. हवे असतील तो मोबाईल नंबर गुगल व्हेरीफाय करते. त्यासाठी तो मोबाईल नंबर टाईप करा. त्यानंतर Send verification code वर क्लीक करा. क्लीक केल्यानंतर काही क्षणातच गुगल तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक एस.एम.एस. पाठवेल. त्या एस.एम.एस. मध्ये एक कोड दिलेला असेल. तो कोड Settings मध्ये टाईप करायचा व नंतर Finish Setup वर क्लीक करायचं. एवढं केलत की तुमचा मोफत एस.एम.एस. मिळण्याचा मार्ग खुला झाला. आता तुमच्या कॅलेंडरमध्ये विशिष्ट तारखेला तुम्ही जे टाईप कराल त्याचा एस.एम.एस. मिळण्यासाठी Option मध्ये Reminder च्या खाली Email,Pop up आणि SMS हे जे तीन पर्याय आहेत त्यातील SMS हा पर्याय निवडा. शेवटी तळाशी असलेल्या Save ह्या बटणावर क्लीक करायला विसरू नका.
तुम्हाला तुमचे हवे तेवढे रिमाईंडर अशा प्रकारे लावता येतील. गुगल कॅलेंडरमधील ही एक महत्वाची सुविधा झाली. पण ही सुविधा म्हणजे गुगल कॅलेंडर नावाच्या मालगाडीचा एक डब्बा झाला. इतर डबे हेही अशाच प्रकारच्या महत्वाच्या सुविधा आहेत. त्यांचा वापर करून पाहिलात तर एक प्रकारचा खजिनाच हातात आल्याचा आभास तुम्हाला होईल. तो अनुभव मी घेतला आहे. तुम्हीही तो घेऊ शकता.

आपापली मास्टर 'की'
"ड्राईव्ह" ह्या इंग्रजी शब्दाचे विविध अर्थ आहेत. "लेफ्ट हँड ड्राईव्ह" पासून ते "ब्लड डोनेशन ड्राईव्ह" पर्यंत अनेक छटा त्यात आहेत. पण आपल्या संगणकातले ड्राईव्हज आणखी वेगळे. ते ड्राईव्हज म्हणजे संगणकाच्या मंत्रीमंडळातले कॅबिनेट मंत्रीच म्हणायला हवेत. हार्ड ड्राईव्ह, फ्लॉपी ड्राईव्ह, सीडी ड्राईव्ह असे वेगवेगळ्या प्रकारचे ड्राईव्हज संगणकाच्या कारभारात फार महत्वाची भूमिका बजावत असतात. हार्ड ड्राईव्ह हा तर संगणकाचा गृहमंत्रीच म्हणायला हवा. फ्लॉपी किंवा सीडी ड्राईव्ह ह्या मंत्रीपदाच्या खुर्च्या कायम असल्या तरी मंत्री मात्र सारखे बदलत असतात. आपल्या विंडोज एक्स्प्लोअररवर नजर टाकलीत तर दिसेल की आपल्या फ्लॉपी ड्राईव्हमध्ये फ्लॉपी असो वा नसो, त्याचा 'ए' किंवा 'बी' ड्राईव्ह कायम दिसत असतो. तीच गोष्ट सीडी वा डिव्हीडी ड्राईव्हची. त्यात सीडी असो वा नसो त्या ड्राईव्हला दिलेले अक्षर फाईल मॅनेजरमध्ये कायम दिसत असते. बहुतेक वेळा ई, एफ, जी, किंवा एच ह्यापैकी कोणते तरी एक अक्षर सीडी ड्राईव्हला बहाल केले गेलेले असते. ह्या ड्राईव्हमध्ये सीडी नसताना आपण त्या ड्राईव्हच्या अक्षरावर क्लीक केले तर 'आत सीडी नाही' असा संदेश संगणक देतो.
फ्लॉपी आणि सीडी ड्राईव्हपेक्षा वेगळी यंत्रणा असणारा ड्राईव्ह म्हणजे पेन ड्राईव्ह. पेन ड्राईव्हला युएसबी ड्राईव्ह, फ्लॅश ड्राईव्ह, युएसबी स्टीक वगैरे टोपण नावेही आहेत. पेनाला टोपण असते तशी पेन ड्राईव्हला ही काही टोपण नावे. पेन ड्राईव्हला अलिप्त ड्राईव्ह असेही नाव खरं तर द्यायला हरकत नाही. कारण पेन ड्राईव्ह कोणाचाही नसतो. तो आपला आपण स्वतंत्र असतो. कुठल्याही संगणकात तो गुंतत नाही. आपले अस्तित्व स्वतंत्र ठेवून कुठेही न गुंतणारी कोरडी माणसे जगात असतात, तसा हा पेन ड्राईव्ह कोरडा असतो. तुम्ही ज्यावेळी एखादा पेन ड्राईव्ह तुमच्या संगणकाला लावता, तेव्हा तो तुमच्या संगणकाचा होतो. त्याचे 'जी', 'एच', किंवा 'आय' वगैरे अक्षर तुमच्या संगणकाच्या फाईल मॅनेजरमध्ये दिसू लागते. मात्र हे अक्षर कायम नसते. जेव्हा तुम्ही तो पेन ड्राईव्ह बाहेर काढता तेव्हा बाहेर जाताना पेन ड्राईव्ह त्या संगणकाशी आपले नाते पूर्णपणे तोडूनच बाहेर पडतो. पुन्हा दुसर्या एखाद्या संगणकात तो गेला की तिथे तो आपले अक्षर तयार करतो आणि बाहेर पडला की पुन्हा पूर्वीचे नाते तोडून स्वतंत्र राहतो. 'पानी तेरा रंग कैसा जिसमे मिलावे वैसा' अशी हिंदी म्हण आहे. त्या आधाराने म्हणायचे तर 'पेन ड्राईव्ह तेरा अक्षर कैसा कंपुटर में जो मिले वैसा' असं म्हणता येईल.

पेन ड्राईव्ह हे आजच्या पीसी युजर्ससाठी म्हणजे तुमच्या आमच्यासाठी एक वरदान आहे. एक तर मुर्ती लहान किर्ती महान ही म्हण त्याला पुरेपूर लागू पडते. आपल्या कीचेनला पेन ड्राईव्ह लावून फिरणारे आज आयटी क्षेत्रामध्ये अक्षरशः हजारो आहेत. काही जण गळ्यात लॉकेट घालून फिरावं तसे पेन ड्राईव्ह गळ्यात घालून वावरताना दिसतात. जेमतेम पंचवीस-तीस ग्रॅम वजनाचा हा पेन ड्राईव्ह ताकदीने मात्र आपल्या सीडी किंवा अगदी डीव्हीडीपेक्षाही भारी असू शकतो. १ जीबी क्षमतेपासून ते अगदी १६ जीबी पर्यंतचे पेन ड्राईव्हज आपल्याकडे आज अडीचशे रूपयांपासून ते पाच हजार रूपयांपर्यंतच्या किंमतींना अगदी सहजपणे उपलब्ध आहेत. साध्या वह्या पुस्तके विकणार्या स्टेशनरी शॉप्समध्येही ते मिळू लागले आहेत यावरून त्यांची वाढती लोकप्रियता आपल्या लक्षात येते.
पेन ड्राईव्ह आणि आजची सीडी किंवा डिव्हीडी यांची उपयुक्ततेच्या दृष्टीने तुलना केली असता पेन ड्राईव्ह शर्यतीत जिंकतो. संगणक चालू होत नसेल तर आपण आपल्याकडील बुट डिस्क किंवा बुटेबल सीडी टाकून तो चालू करण्याचा प्रयत्न करतो. पण बहुतेक वेळा घडतं असं की ती बुटेबल सीडी कधी जागेवर मिळत नाही. अशा वेळी आपल्या खिशात किंवा गळ्यात कायम असणारा पेन ड्रार्ईव्ह उपयोगी पडू शकतो. पेन ड्राईव्हच्या माध्यमातून संगणक बुट करणे शक्य असते. बुटींग व्यतिरिक्त पोर्टेबल प्रोग्राम्स ही पेन ड्राईव्हने करून दिलेली एक फार मोठी सोय आहे. पोर्टेबल प्रोग्राम हा नावाप्रमाणे खरोखरीच पोर्टेबल असतो. पेन ड्राईव्हमध्ये त्याचे इन्स्टॉलेशन झालेले असते. संगणकाला पेन ड्राईव्ह लावताच आपण त्या प्रोग्रामचा वापर सुरू करू शकतो. उदाहरणार्थ, समजा काही कारणाने तुमच्या संगणकातला इंटरनेट एक्स्प्लोअरर करप्ट झाला आहे. तो पुन्हा नव्याने इन्स्टॉल करण्याइतका वेळ तुमच्याकडे नाही. पण चटकन एखादी ईमेल तुम्हाला चेक करायची आहे. अशा वेळी तुमच्याकडे पेन ड्राईव्ह असेल आणि त्यात पोर्टेबल फायरफॉक्स ब्राऊझर असेल तर तुम्ही फायरफॉक्समध्ये इंटरनेट सर्फींग करू शकता किंवा ईमेल चेक करू शकता. मला स्वतःला आवडणारा पोर्टेबल प्रोग्राम म्हणजे मोफत उपलब्ध असणारा अतिशय उपयुक्त असा ओपन ऑफिस सूट. वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंट वगैरेच्या फाईल्स तातडीने उघडण्याची वेळ येते आणि नेमका आपला ऑफिस प्रोग्राम त्यावेळी बिघडलेला असतो. अशा वेळी पेन ड्राईव्हमधला ओपन ऑफिस हा अॅप्लीकेशन सूट खूपच उपयोगी पडतो.
पेन ड्राईव्ह हा प्रायव्हसीच्या दृष्टीने आपल्या मोबाईल फोनसारखा आहे. तो सतत आपल्या खिशात वा पर्समध्ये राहतो. इतरांना तो देण्याची वा इतरांनी तो वापरण्याची गरज नसते. त्यात आपल्या खाजगी फाईल्स, हिशोब, फोटो, व्हिडीओज, आवाजाच्या फाईल्स वगैरे आपण ठेवू शकतो. हा सर्व व्यक्तीगत किंवा गोपनीय स्वरूपाचा डेटा Trucrypt सारखे टूल (www.truecrypt.org) वापरून आपण एन्क्रीप्ट करून ठेवू शकतो. त्यामुळे आपला पेन ड्राईव्ह हरवला वा कोणी चोरला तरी त्याला आपला डेटा वाचता वा वापरता येत नाही. एन्क्रीप्शन करून ठेवलेला डेटा हा आपल्याला माहीत असलेल्या पासवर्डशिवाय उघडला जाऊ शकत नाही. त्यामुळे ज्यांना गोपनीय फाईल्स ठेवायच्या आहेत त्यांचेसाठी पेन ड्राईव्हसारखे दुसरे साधन नाही. पेन ड्राईव्हला सीडी वा डिव्हीडीप्रमाणे चरे येत नसल्याने त्या कारणाने तो बाद होऊन पंचाईत होण्याची वेळ येत नाही. मात्र अतिशय निष्काळजी पद्धतीने पेन ड्राईव्ह वापरल्यास तोही अकाली बाद होण्याची शक्यता असते. खूपदा घाईघाईत पेन ड्राईव्ह व्यवस्थित लॉग आऊट न करता खस्सकन खेचून बाहेर काढण्यामुळे डेटा करप्शन तर होतच होतं पण तो कायमचा बाद होण्याची शक्यताही असते. पेन ड्राईव्हमधील डेटा त्यामुळे बॅकअप करून ठेवणे हे अत्यंत आवश्यक असते. काही जण दोन पेन ड्राईव्ह ठेवतात आणि त्यापैकी एकात बॅकअप असतो. मात्र बॅकअप हा नेहमी वेगवेगळ्या प्रकारातील मिडीयामध्ये म्हणजे पेन ड्राईव्हबरोबरच सीडी वा डिव्हीडी तसेच हार्ड ड्राईव्ह अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये एकाच वेळी ठेवलेला असणे केव्हाही सुरक्षित असते.
तुम्ही पेन ड्राईव्ह वापरत नसाल तर अवश्य तुमच्यासाठी एक खरेदी करा. सुरूवातीस अडीचशे रूपयांचा १ जीबी क्षमतेचा पेन ड्राईव्ह खूप होतो. यात तुम्ही तुमचा सारा आवश्यक व महत्वाचा संगणकीय डेटा सतत जवळ बाळगू शकता. बाहेरगावी गेल्यानंतर तर याचा फारच उपयोग होतो. एखाद्या मित्राकडे वा सायबर कॅफेत हा पेन ड्राईव्ह उघडून त्यातील पत्रांच्या प्रिंटस घेणे खूपच सोपे असते. जे महत्वाचे पोर्टेबल प्रोग्राम्स आपल्याला नेहमी लागत असतात त्यांचा उत्तम संग्रह म्हणजे Lupo Pen Suite. हा सूट http://www.lupopensuite.com ह्या वेबसाईटवरून तुम्हाला मोफत डाऊनलोड करून घेता येईल. त्यात २०० हून अधिक अधिकृतरित्या मोफत असणारे उत्तम प्रोग्राम्स व काही गेम्सही उपलब्ध केलेले आहेत. ह्या Lupo Suite वर एक स्वतंत्र लेख लिहीता येईल एवढा त्याचा अंतरंग भरगच्च आहे. अशाच प्रकारचा एक संग्रह portableApps.com ह्या साईटवरही मोफत उपलब्ध आहे.
पेन ड्राईव्हमध्ये महत्वाची सॉफ्टवेअर व इतर आवश्यक डेटा ठेवल्याने त्याचा उपयोग एखाद्या मास्टर की सारखा होतो. एन्क्रीप्शनची सोय असल्याने तो डेटा चोरीस जाण्याची शक्यता नसते. पेन ड्राईव्हची किंमत खिशाला परवडण्यासारखी असल्याने तो सहज घेता येतो, आणि मोबाईल सांभाळताना आपल्या मनात जो एक तणाव असतो तसा तणाव पेन ड्राईव्हबद्दल नसतो. वजनाने फारच हलका असल्याने तो जड होत नाही. त्याची अडचण वाटत नाही. एकूण हे सारे गुण लक्षात घेतले तर प्रत्येकाकडे त्याची स्वतःची एक मास्टर की म्हणजे पेन ड्राईव्ह असायला हरकत नाही अशी शिफारस कोणीही करू शकेल.

संगणक आणि शब्दकोश
प्रत्येक घरात एक स्वयंपाकघर आणि एक शब्दकोश असतो. जगात असा एकही विद्यार्थी नाही की ज्याने कधी शब्दकोश उघडला नाही. नेपोलियन म्हणत असे की माझ्या शब्दकोशात 'अशक्य' हा शब्दच नाही. नेपोलियनला हे कळले कारण त्याने शब्दकोश नक्कीच उघडून बघितला असणार. असा हा शब्दकोश. आपणा प्रत्येकासाठी ती एक गरज असते. हे पिढ्यानुपिढ्या चालत आलं आहे. शब्दकोश हे एकच पुस्तक असे आहे की जे खर्या अर्थाने अमर असते. कधीतरी आजोबांच्या काळापासून जपलेला शब्दकोशाचा ग्रंथ नातवालाही उपयोगी पडताना दिसतो. कारण शब्दकोशात दिलेले अर्थ कधी बदलत नाहीत. शब्दकोश फाटला म्हणून नवा आणावा लागतो. अन्यथा त्यातले शब्दार्थ तेच असतात. काही नव्या शब्दांची शब्दकोशात भर जरूर पडते. ती भर हाच काय तो बदल.
घरातला शब्दकोश हातात घेऊन पहा. बिचारा आकाराने जाडजूड असतो, पण त्यातला शब्दांचा टाईप मात्र अगदी बारीक असतो. घरातले आजोबा किंवा कुणी ज्येष्ठ नागरिक असले तर त्यांना तो टाईप वाचण्यासाठी नुसता चष्मा पुरत नाही. चष्म्याबरोबर बहिर्गोल भिंगही लागते. मोठ्या टाईपातला शब्दकोश जगात कुठेच उपलब्ध नाही. त्याचे कारण सरळ आहे, शब्दांचा टाईप मोठा केला तर शब्दकोशाची पाने वाढणार म्हणजे तो आणखी जाडजूड होणार. मग तो हाताळायचा कसा? पाने वाढल्याने त्याची किंमतही वाढणार. ती कशी परवडणार? त्यामुळे शब्दकोश म्हंटला की तो बारीक टायपातला हे ओघानंच आलं.
बारीक टाईप हा शब्दकोशाचा एक न टाळता येण्याजोगा भाग जसा आहे, तसा दुसरा भाग म्हणजे शब्दकोशाचं बाईंडिंग. जा़डजूड शब्दकोश सारखा उघड-बंद करता करता त्याचं बाईंडिंग म्हातारं होऊ लागतं आणि कोंबडीची पिसं गळू लागावी तशी शब्दकोशाची पानं गळू लागतात. ती पानं सांभाळणं म्हणजे एक मोठं दिव्य असतं. शिवाय शब्दकोशाची पानं कालांतरानं पिवळी पडू लागतात.
बारीक टाईप, सुटणारं बाईंडिंग आणि पिवळी पडणारी पानं ह्या समस्यांपासून मात्र आता आपल्याला मुक्ती मिळाली आहे. ही मुक्ती आपल्या संगणकाने म्हणजे काँप्युटरने दिली आहे. संगणकावरच्या शब्दकोशातील टाईप आपल्याला मोठा करून पाहण्याची सोय असते. त्याला बाईंडिंग नसल्याने त्याची पाने सुटत नाहीत, किंवा कालांतराने ती पिवळीही पडत नाहीत. अशी ऑक्सफर्ड किंवा वेबस्टर डिक्शनरी आता सीडीवर उपलब्ध आहे. त्यात आपल्याला गुगलच्या पद्धतीने शब्द शोधता येतात. अशी डिक्शनरी सीडीवर उपलब्ध असल्याने ती कुठेही नेता येते. पटकन लॅपटॉपमध्ये घातली की कुठेही ती उघडता येते. संगणकाने हा जो सीडीवरचा शब्दकोश दिला आहे ते खरंच आपणा सर्वांसाठी एक मोठं वरदान आहे.
मला माहीत आहे की ह्या टप्प्यावर तुम्ही मला हमखास एक ठरलेला प्रश्न विचारणार आहात. इंग्रजी शब्दांचा अर्थ इंग्रजीत देणार्या डिक्शनरीज सीडीवर उपलब्ध आहेत. पण मराठी शब्दाचा इंग्रजीत अर्थ देणारी म्हणजे मराठी इन टू इंग्लीश डिक्शनरी सीडीवर उपलब्धच नाही. ज्यांना मराठी - इंग्रजी शब्दकोशाची सीडी हवी आहे, त्यांनी काय करायचं? तुमचा हा प्रश्न अगदी शंभर नंबरी खरा आहे. वाचकहो, आजपर्यंत मूळातच अशी मराठी - इंग्रजी शब्दकोशाची सीडी कुठे उपलब्ध नव्हतीच. पण आता युनिकोड फाँटच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे ते शक्य झाले आहे. नवी मुंबईतील संगणक प्रकाशन ह्या संस्थेने मोल्सवर्थकृत इंग्रजी मराठी शब्दकोश नुकताच सीडीवर आणला आहे. ह्या सीडीची संपूर्ण माहिती www.molesworth.sanganak.in ह्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
हा शब्दकोश अनेक दृष्टींनी उपयुक्त आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. पहिली गोष्ट म्हणजे त्याची किंमत वाजवी म्हणजे फक्त रू.१००/- (टपाल खर्चासह) आहे. त्यात एकूण ६०,००० शब्दांचे अर्थ आहेत. युनिकोड फाँट वापरून त्यात मराठी शब्दांचा सर्च देखील उपलब्ध करण्यांत आला आहे. स्क्रीनवर वाचण्यासाठी टाईप लहान मोठा करण्याची सोय त्यात दिली आहे. मुख्य म्हणजे हा शब्दकोश मोल्सवर्थ यांचा म्हणजे जगप्रसिद्ध असा शब्दकोश आहे. मोल्सवर्थ हे एक ब्रिटीश सैन्याधिकारी. जन्माने ब्रिटीश असले तरी ते मराठी भाषेचे तज्ज्ञ होते. कित्येक वर्षे परिश्रम करून व कित्येक तज्ज्ञ व विद्वानांची मदत घेऊन त्यांनी हा शब्दकोश इंग्रजांच्या काळात तयार केला. १८५७ मध्ये त्याची दुसरी आवृत्ती प्रसिद्ध झाली. ती अतिशय लोकप्रियही झाली. मराठी शब्दांचा इंग्रजीत अर्थ देणारे शब्दकोश हाताच्या बोटावर मोजावे एवढे कमी आहेत. जे आहेत त्यांची तुलना मोल्सवर्थ शब्दकोशाशी केली तर दिसतं की मोल्सवर्थ शब्दकोश हा मराठी - इंग्रजी शब्दकोशांचा राजा आहे. त्याला पर्याय नाही. १८५७ नंतर मोल्सवर्थ शब्दकोशाच्या आवृत्त्या पुस्तक रूपाने प्रकाशित होत राहिल्या. आज मात्र त्या आवृत्त्या दुर्मिळ झाल्या आहेत. सहजासहजी त्या उपलब्ध होत नाहीत. शेवटची आवृत्ती ग्रंथरूपात सुमारे दहा वर्षांपूर्वी प्रकाशित झाली होती. मात्र त्याची किंमत रू.५५०/- असल्याने बहुधा तिचा प्रचार सर्वदूर झाला नाही.
मात्र आता २००९ मध्ये मोल्सवर्थ मराठी - इंग्रजी शब्दकोश सीडी रूपात प्रकाशित झाल्याने वाचक आणि विद्यार्थी दोघांनाही फार मोठा दिलासा मिळाला आहे. संगणक प्रकाशनाकडील ह्या शब्दकोश सीडींचा साठा संपण्या अगोदर आपली स्वतःची एक प्रत नोंदवायलाच हवी. ही सीडी ते पोस्टाने पाठवतात. त्याची माहिती www.molesworth.sanganak.in ह्या साईटवर उपलब्ध आहे. मराठीतला हा पहिला शब्दकोश आहे. शिवाय तो वापरायलाही सोपा आहे. कायम स्वरूपी उपयोगी पडणारा हा शब्दकोश आहे.

हिशोबाची अवजारे
हिशोब आणि आकडेमोडीशी कधीतरी अचानक आपली गाठ पडते तेव्हा कळतं की अरे शाळा-कॉलेजचं शिक्षण संपलं तरी आपण हिशोब आणि आकडेमोडीमध्ये कच्चेच राहिलो आहोत. उदाहरणार्थ परवा बोलता बोलता कोकणातल्या एका गावाचा विषय निघाला. एक मित्र म्हणाला की त्या छोट्याशा गावातही जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत. प्रति एकर भाव दोन लाख रूपयांपर्यंत गेलाय. मित्र जमिनीचा भाव तर बोलून गेला. एका एकराला दोन लाख रूपये भाव हे कळलं. पण एकर म्हणजे नेमकी किती जागा. एक एकर म्हणजे किती स्क्वेअर फीट? हा प्रश्न पडला. एक एकराचे स्क्वेअर फीट कसे काढायचे? ह्या हिशोबाशी येऊन अडायला झालं. असं अडणं पौंड आणि किलोग्रामच्या बाबतीतही होतं. एखादा परदेशी पहिलवान आपल्याकडे कुस्त्यांसाठी येतो तेव्हा त्याचं वजन हमखास ४०० पौंड वगैरे असं काहीतरी सांगितलं जातं. अशावेळी ४०० पौंड म्हणजे किती किलो असा प्रश्न आपल्याला पडतो. काही वेळा जमिनीचं माप हेक्टरमध्ये दिलं जातं. हेक्टरचे स्क्वेअर फीट किंवा एकर किती असा प्रश्न उभा राहतो. अंतर मोजण्याच्या बाबतीतही हा प्रकार घडतो. इकडून ४० मैलावर अमुक तमुक गाव आहे. ४० मैल म्हणजे नेमकं किती किलोमीटरवर ते गाव आहे हे आपल्याला हवं असतं. पण ते मोजण्याचा कॅलक्युलेटर आपल्याकडे तयार नसतो.
अशा प्रकारचे हिशोब करू शकणार्या कॅलक्युलेटरला मी हिशोबाची अवजारे असं म्हणतो. असं एक उत्तम अवजार मी नेहमी वापरतो. त्याचं नाव आहे - ESBUnitConv. हिशोबाचं हे अवजार इंटरनेटवर मोफत उपलब्ध आहे.
ESBUnitConv हे नाव तीन इंग्रजी शब्दांचं मिळून बनलं आहे. पहिली तीन अक्षरे ESB ही ESB Consultancy ह्या कंपनीच्या नावातली अक्षरे आहेत. ESB Consultancy ही मूळ ऑस्ट्रेलियातील कंपनी आहे. गणिताशी संबंधित सॉफ्टवेअर बनविण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. त्या व्यवसायाचा एक भाग म्हणून त्यांनी ESBUnitConv हा प्रोग्राम तयार केला आहे. ESB नंतरचा शब्द Unit आणि त्या नंतरचा Conv म्हणजे Convertor ह्या शब्दातली पहिली तीन अक्षरे. थोडक्यात ESB Unit Convertor असं खरं तर त्या प्रोग्रामचं नाव. पण संक्षेपासाठी म्हणा किंवा नावाची सरकारी नोंदणी करताना शब्दकोशातले शब्द वापरायचे नसतात म्हणून म्हणा ह्या अवजाराचं नाव ESBUnitConv असं झालेलं असावं. पण ते असो. ESBUnitConv हे कमालीचं गुणी अवजार आहे. खरं तर तुमच्याकडे पेन ड्राईव्ह असेल (आता जवळ जवळ प्रत्येकाकडे खिशाखिशातून पेन ड्राईव्ह दिसू लागला आहे) तर त्यात हा ESB Unit Convertor कॉपी करून ठेवायलाच हवा.
ESBUnitConv चे गुण नीट सांगायला हवेत. आपण वर एकर, स्क्वेअर फीट, पौंड, किलो, हेक्टर, मैल, किलोमीटर ह्या सात मापांचा म्हणजे Units चा उल्लेख सुरूवातीच्या परिच्छेदात केला आहे. पण ही फक्त सात मापं झाली. ESBUnitConv मध्ये अशा एकूण ५२५ मापांचे हिशोब होऊ शकतात. यावरून तुम्हाला ह्या अवजाराची उपयुक्तता लक्षात येऊ शकेल. हे जे ५२५ प्रकारचे युनिट किंवा मापं आहेत त्याची विभागणी ESBUnitConv ने वीस प्रकारात केली आहे. ते वीस प्रकार मूळ इंग्रजीतच सांगितलेले बरे. ते प्रकार असेः Temperature, Distance, Mass, Area, Volume, Pressure, Velocity, Acceleration, Force, Energy, Power, Fuel Consumption, Flow, Torque, Angles, Luminous Intensity, Illumination, Time, Radioactivity आणि Flow (Mass). खरं सांगायचं तर हे अवजार मारूतीने रामासाठी उचलून आणलेल्या द्रोणागिरी पर्वतासारखं आहे. आपण सहजपणे उल्लेख केला होता तो फक्त सात मापांचा. ह्या अवजारात ती सात मापं तर आहेतच पण वर आणखी ५१८ मापं आहेत. यातल्या कितीतरी मापांची नावेही आपण ऐकलेली नसण्याची शक्यता आहे.
वर जे वीस प्रकार आपण पाहिले त्यातल्या काही महत्वाच्या प्रकारांकडे आपण इथे एक कटाक्ष टाकू. पहिला प्रकार Temperature चा. यात तुम्ही नेहमीच्या Celsius चे Fahrenheit किंवा Fahrenheit चे Celsius करू शकता. त्या व्यतिरिक्त तपमान Kelvin किंवा Rankine किंवा Re'aumer ह्या मापातही मोजता येते आणि तुम्ही Celsius चे Kelvin मध्ये रूपांतर करू शकता हे जाणल्यावर आपल्या ज्ञानात नवी भर पडल्याचं आपल्याला लक्षात येतं. दुसरा प्रकार Distance किंवा अंतर मोजणीचा आहे, त्याकडे लक्ष टाकू. अंतर मोजायचे म्हंटले की किलोमीटर, मैल, यार्ड, मीटर, हात, फर्लांग, किंवा समुद्र असेल तर Nautical Miles ही मापं आपण ऐकली आहेत. पण ह्या अवजाराच्या सहाय्याने आपण तब्बल ५८ प्रकारच्या मापात अंतर मोजू शकतो. त्यात नॅनोमीटरपासून ते प्रकाश वर्षे इथपर्यंतची वेगवेगळी मापे आली आहेत. एका मीटरचे १,०००,०००,००० इतके नॅनोमीटर होतात हा हिशोब केल्यावर आपली एकीकडे करमणूकही होते आणि दुसरीकडे एका मीटरचे शंभर कोटी भाग पाडण्याची किमया विज्ञानाने साधली आहे हे जाणल्यावर आपण अचंबितही होतो. तिसरा प्रकार Mass किंवा वजन मोजण्याचा. ग्रॅम, किलो, क्विंटल, टन ही आपण नेहमी ऐकतो. सोनं असेल तर तोळे आपल्याला पाठ असतं. पण वजन प्रकारात ह्या अवजाराने एकूण ४३ मापे दिली आहेत. त्यात लॉट नावाचे एक रशियन मापही आहे. १०० किलो किंवा १ क्विंटल = ७०,३२७.६१ लॉट होतात हे ऐकल्यावर Thanks a lot चा खरा अर्थ आपल्याला लक्षात येतो. Area अर्थात क्षेत्रफळ ३० वेगवेगळ्या मापात मोजता येतं. १ एकर = ४३,५६० चौरस फूट होतात म्हंटल्यानंतर आपल्याला एकर ह्या प्रकाराचं कौतुक वाटू लागतं. पण १ हेक्टर = १,०७,६३९.१० हे जाणल्यावर हेक्टर हा एकराच्या दुप्पटीने श्रीमंत आहे याचं घसघशीत ज्ञान होतं. तुम्हाला कदाचित माहीत नसेल पण Townships ह्या नावाचं क्षेत्रफळाचं एक मापच आहे चक्क. १ टाऊनशीप = १,००३,६२२,४०० एवढे चौरस फूट होतात. शंभर कोटी छत्तीस लाख बावीस हजार चारशे चौरस फूट म्हणजे एक टाऊनशीप असल्याने आपले बिल्डर टाऊनशीप प्रकल्पांमध्ये का रस घेत असतात हे आपल्या लक्षात येतं.
ह्यापुढचा प्रकार Volume. स्वयंपाकात Teaspoon आणि Tablespoon ही मापे हमखास ठरलेली. गॅलन, लिटर ही मापे तेल, दूध आणि रॉकेलच्या संदर्भात हमखास ऐकलेली. एका टेबलस्पूनमध्ये तीन टीस्पून साहित्य मावतं हे झालं अमेरिकन मापाचं प्रमाण. पण इंग्लंडच्या मापात मात्र एका टेबलस्पूनमध्ये चार टीस्पून साहित्य मावतं हे तुम्हाला माहीत आहे का? अमेरिका आणि इंग्लंड यांच्यात एका चमच्याचा फरक आहे. त्यामुळे अमेरिकन पदार्थात किती टेबलस्पून मीठ टाकायचं याचं प्रमाण आणि इंग्रजांच्या मीठाचं प्रमाण यात फरक आहेच. पण पुढली गंमत म्हणजे ऑस्ट्रेलियाचा एक टेबलस्पून म्हणजे अमेरिकेचे ४.०६ टीस्पून आणि इंग्लंडचे ५.५२ टीस्पून हे पाहिल्यावर देशोदेशीचे चमचे किती वेगवेगळे असतात हे लक्षात येतं. त्यामुळे ऑफिसात अमेरिकन बॉस जाऊन इंग्रज बॉस आला की चमचे बदलणार हे ओघाने आलंच.
पुढला प्रकार Pressure. आता ह्या टप्प्यावर लेखाची शब्दसंख्या संपत आल्याचं प्रेशर माझ्यावर आल्याने मापाच्या गंमती जंमती आणि ह्या फुकट मिळणार्या अवजाराचं कौतुक मला आवरतं घ्यायला हवं. पाण्याचा किंवा तत्सम घटकाचा दाब मोजण्याची मापेही ३० पेक्षा जास्त आहेत. पुढे Velocity, Acceleration, Force, Energy हे प्रकार तुम्ही प्रत्यक्षच हिशोब करून पहा असं सांगून मी पुढे जातो. Power बद्दल मात्र थोडं बोलू या. सध्याच्या लोडशेडींगमध्ये Watts, Kilowatts, Megawatts वगैरे मापे आपल्याला कुठे कुठे ऐकू येत असतात. ती इथे आहेत. पुढला प्रकार Fuel Consumption. मोटर सायकल म्हंटली की आजकाल ८० किलोमीटर पर लिटर आणि चार चाकी म्हंटली की १५ किलोमीटर पर लिटर ही भाषा ऐकू येते. जी गाडी १५ किलोमीटर पर लिटर अॅव्हरेजने धावते ती एका लिटरमध्ये किती मैल जाईल? उत्तर आहे ९.३२ मैल. लिटर आणि गॅलनचा हिशोबही ह्या इंधनाच्या हिशोबात इथे मिळतो.
पुढले प्रकार Flow, Torque, Angles, Luminous Intensity, Illumination हे तुम्ही ह्या अवजाराचा उपयोग करून तुमच्या संगणकाच्या पडद्यावरच पहा असं सांगून Time ह्या मापाकडे आपण वळू. सेकंद, मिनिटे, तास, दिवस, आठवडे, पंधरवडे, महिने, वर्ष, दशके, शतके ही मापे इथे आहेतच. पण मायक्रोसेकंद आणि मिलीसेकंद देखील आपण इथे मोजू शकतो. १ मिलीसेकंद म्हणजे १००० मायक्रोसेकंद हे नवे माप ऐकल्यावर आपण काही मिनिटे स्तब्ध झाल्याशिवाय रहात नाही. तसंच ३६५०० दिवसांचे एक शतक म्हणजे किती मायक्रोसेकंद असतील याचा हिशोब करताना अंगावर काटा आल्याशिवाय रहात नाही. पुढले Radioactivity आणि Flow (Mass) हे प्रकार तद्दन तांत्रिक प्रकारचे आहेत. ज्यांना ते पहायचे आहेत त्यांनी जरूर पहावे, इतर Radioactivity पासून दूर राहिले तरी फारसं बिघडण्याचं कारण नाही.
जाता जाता आणखी एक महत्वाचं ह्या ESBUnitConv नामक अवजाराबद्दल सांगायचं म्हणजे इथला हिशोब तंतोतंत मिळावा यासाठी तुम्हाला १८ पर्यंत अपूर्णांकात संख्या मिळवता येते. उदाहरणार्थ 1.000000000000000000 मिनीट = 0.016666666666666667 तास होतात. इतकं खोलात जाणं चांगलं की वाईट हे ज्याचं त्याने ठरवायचं असलं तरी ESBUnitConv ने मात्र तेवढ्या खोलात जायचा निर्णय घेतलेला आहे हे आपल्या दृष्टीने चांगलंच म्हणायचं. ह्याच ESB कंपनीचा एक सायंटिफिक कॅलक्युलेटरही तुम्हाला डाऊनलोडींगसाठी उपलब्ध आहे. ज्यांना ESBUnitConv वा ESBCalc डाऊनलोड करायचा आहे त्यांनी इंटरनेटवर http://www.esbconsult.com/esbcalc/esbunitconv.htm ह्या पत्त्यावर जावं आणि ही अवजारे मिळवावीत.
बाय द वे, लिखाणात किती शब्द आत्तापर्यंत झाले हे मोजण्याची सोय आजकालच्या वर्डप्रोसेसर्स मध्ये सर्रास असतेच. बोलण्यातले शब्द मोजण्याइतके मात्र आपले विज्ञान अजून प्रगत व्हायचे आहे. पण लेटस बी होपफूल.

उपयुक्त अल्फाबेटायझर
ज्या घरात टीव्ही आहे त्या घरात इंटरनेटचं कनेक्शनही असणार अशा टप्प्यापर्यंत आपण पोहोचतो आहोत. रेल्वेचं रिझर्व्हेशन असो की नोकरीचा अर्ज इमेलने पाठवायचा असो, किंवा बॅंकेतून पैसे दुसर्या खात्यात ट्रान्सफर करायचे असोत किंवा बॅंकेच्या व्यवहारांचे स्टेटमेंट घ्यायचे असो, इंटरनेटला आता पर्याय राहिलेला नाही. बीएसएनएल किंवा एमटीएनएल सारख्या सरकारी कंपन्यांनी देखील गावागावात, आणि मुख्य म्हणजे स्वस्त दरात वेगवान इंटरनेटचे ब्रॉडबँड कनेक्शन पोहोचवण्यामध्ये आघाडी घेतली आहे. महिन्याला टीव्ही चॅनलसाठी जेवढे पैसे भरावे लागतात त्याहीपेक्षा कमी दराची इंटरनेट कनेक्शन्स मिळू लागल्याने इंटरनेट तळातल्या माणसापर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया अपेक्षेपेक्षा झपाट्याने चालू आहे. महाराष्ट्रातलं कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र किंवा कोणत्याही कानाकोपर्यातलं विकासाच्या टप्प्यात आलेलं गाव घेतलं तर तिथे मोबाईल फोनचा सीग्नल मिळतो. ज्या मोबाईल फोनवर सीग्नल असतो त्यावर इंटरनेटही जोडलं जाऊ शकतं. मोबाईल फोन आणि इंटरनेटच्या ह्या नात्यामुळे इंटरनेटबद्दलची जागरूकता आपल्या खेडेगावांपर्यंतही पोहोचली आहे. गावातल्या एसटी स्टँडच्या शेजारी सहजपणे एखादी सायबर कॅफेची पाटी दिसते हा त्याचाच एक भाग.
गाव म्हंटलं की वीजेचं लोड शेडींग आणि डिजिटल डिव्हाईडचा विषय हे खास चर्चेचे विषय. वीज नसेल तर तुमचं इंटरनेट चालायचं कसं? किंवा, इंटरनेट लाख पोचलं हो, पण आमच्या अंगठाबहादूरांना ते कसं कळायचं आणि त्यांना ते कुणी शिकवायचं? वगैरे प्रश्न स्वाभाविकच उपस्थित होतात. मोबाईल फोनवरचा एसएमएस वाचता यावा म्हणून तरी शिकायला हवं हे नव्या पिढीला कळतं. नोकरीचा कॉल पोस्टापेक्षा ईमेलवरून पटकन मिळतो म्हणून तरी ते तंत्र आपल्याला माहित असायला हवं हे तरूणाईने आता स्वीकारलं आहे. शासकीय कार्यालयापासून ते औषधाच्या साध्या दुकानापर्यंत कुठेही माणूस नेमायचा झाला तर त्याला इंटरनेटचं तंत्र माहीत असायला हवं याला आता महत्व प्राप्त झालं आहे. सात बाराच्या उतार्यापासून ते शासनाचा जीआर शोधण्यासाठीही इंटरनेटची सेवा आता जीवनावश्यक भाग बनते आहे.
एकीकडे अशा इंटरनेटवर आधारलेल्या सुविधा वाढत आहेत आणि दुसरीकडे इंटरनेटवर शेकड्याच्या संख्येने अत्यंत उपयुक्त अशी वेब अॅप्स उपलब्ध होत आहेत. यातली शेकडो वेब अॅप्स किंवा वेब अप्लीकेशन्स मोफत उपलब्ध आहेत. घर असो की एखादी संस्था, खाजगी उद्योग असो की मोठे शासकीय कार्यालय ही वेब अप्लीकेशन्स वेळ वाचवण्यासाठी आणि कार्यक्षमता वाढण्यासाठी उपयुक्त ठरत आहेत. एखादे नाविन्यपूर्ण, फारसे माहित नसलेले व कमालीचे वेब अप्लीकेशन कुठे आढळले की एंटर सदरासाठी मला तो विषय खुणावतो. असंच एक अत्यंत गुणी आणि मोफत उपलब्ध असणारं वेब अप्लीकेशन किंवा वेब अॅप म्हणजे अल्फाबेटायझर. ते उपलब्ध आहे http://alphabetizer.flap.tv/ ह्या पत्त्यावर.
अल्फाबेटायझर ह्या नावातच खरं तर त्याचा उपयोग आलेला आहे. एखादी मोठी यादी आपल्याला अकारविल्हे लावायची असेल तर ते कितीतरी जिकीरीचं काम. कित्येकदा त्यासाठी काही तास खर्ची पडतात, आणि तेवढा वेळ देऊनही त्यात काही चुका राहून जाण्याची शक्यता असते. आपण एक उदाहरण घेऊ. एका शाळेत पाचशे मुले आहेत. ह्या मुलांची नावे हजेरीपटात काही विशिष्ट क्रमाने नाहीत. नावे असोत की आडनावे पण त्यातलं काहीही अकारविल्हे नाही. त्यामुळे एखादा मुलगा शोधायचा झाला तर प्रत्येक नावावरून बोट फिरवत जाऊन आणि पानांमागे पाने उलटून ते विशिष्ट नाव शोधणं हे क्रमप्राप्त होतं. ही सारी पाचशे नावं अकारविल्हे लावायची तर संगणकाची मदत निश्चितच होऊ शकते. सर्वांना माहीत असलेल्या एक्सेल प्रोग्राममध्ये सर्व नावे टाईप केली तर एका क्षणात त्याची अल्फाबेटीकल किंवा अकारविल्हे यादी आपल्याला मिळू शकते. पण त्यासाठी एक्सेलची माहिती असणारी व्यक्ती उपलब्ध हवी. तशी उपलब्धता नसेल तर हे अल्फाबेटायझर नावाचं वेब अप्लीकेशन हमखास मदतीला येतं.
वेब अप्लीकेशनचं वैशिष्ट्य म्हणजे कोणतंही डाऊनलोड करण्याची आवश्यकता नाही. कसलही इन्स्टॉलेशन किंवा किचकट सेटींग/कन्फीगरेशन वगैरेंची गरज नाही. फक्त इंटरनेट चालू करायचं, त्या विशिष्ट वेब साईटवर जायचं आणि आपलं काम सुरू करायचं. आता अल्फाबेटायझरचच पहा. त्या वेब साईटवर गेलात की समोर एक तळहाताएवढा कोरा भाग दिसतो. ह्या कोर्या भागात आपल्याला हवी ती यादी टाईप करीत जायचं. तुम्ही मुद्दाम तो प्रयोग करा. आपल्याच घरातल्या दहा जणांची नावे त्यात टाईप करा. प्रत्येक नाव टाईप झालं की एंटर बटण दाबणं आवश्यक. नावं टाईप झाली की नंतर ALPHABETIZE ह्या बटणावर फक्त क्लीक करायचं. काही क्षणांत ती सर्व नावं अकारविल्हे म्हणजे इंग्रजी ए ते झेड ह्या क्रमाने लावून आपल्या पुढे येतात. आपल्या प्रिंटरवर आपण त्याची प्रिंट देखील घेऊ शकतो. हा झाला अल्फाबेटायझरचा मुलभूत उपयोग. पण त्याच बरोबर अल्फाबेटायझर आणखीही बरीच मदत आपल्याला करू शकतो. उदाहरणार्थ सर्व नावांच्या मागे क्रमांक टाकणं, नावांपुढे स्वल्पविराम किंवा एखादा विशिष्ट शब्द टाकणं वगैरे. अल्फाबेटायझर जशी अकारविल्हे यादी लावतो तशी ती उलट्या क्रमानेही लावू शकतो. उलटा क्रम म्हणजे अर्थातच झेड पासून ते ए पर्यंतची उलट्या क्रमाची यादी.
अल्फाबेटायझर हा खरं तर इंग्रजीसाठी आहे. पण मी सहज त्याची मराठीसाठी चाचणी घेतली. युनिकोड मराठी फाँटमध्ये त्यात मराठी नावे टाईप करून पाहिलं आणि आश्चर्याचा सुखद धक्का बसला. मराठी नावेही अ क ख ग घ ह्या क्रमाने अल्फाबेटाईज म्हणजे अकारविल्हे होऊ शकतात असं आढळलं. अपवाद दिसला तो क्ष आणि ज्ञ चा. क्ष म्हणजे त्याच्या दृष्टीने क+श होतो. ज्ञ म्हणजे ज+न होतो. त्यामुळे त्याचे शब्द एकत्र होऊन अनुक्रमे क आणि ज च्या जागी येतात. हे वेगळे आलेले शब्द आपण मॅन्युअली क्ष आणि ज्ञ च्या ठिकाणी टाकले तर काम चोख होऊ शकतं. त्यामुळे, एखाद्या पुस्तकातल्या किंवा कोशातल्या विविध प्रकरणांची, उपप्रकरणांची वगैरे अकारविल्हे सूची करायची असेल तर अल्फाबेटायझर अतिशय मोलाची मदत त्यासाठी करू शकेल.
अल्फाबेटायझर जसं 'अकारविल्हेवाटी' साठी उपयुक्त आहे, तसंच दुसरं
http://felix-cat.com/tools/wordcount/ ह्या पत्त्यावरील वेब अप्लीकेशन शब्द मोजण्यासाठी उपलब्ध आहे. खरं तर वर्ड किंवा ओपन ऑफिस सारख्या सॉफ्टवेअरमध्ये शब्द मोजण्याची व्यवस्था आहे. पण अचानक वा हे प्रोग्राम्स उपलब्ध नसताना केवळ इंटरनेटच्या उपयोगाने एखाद्या लिखाणातील शब्द मोजायचे झाले तर ह्या वेब अप्लीकेशनचा चांगला उपयोग होतो. ही दोन शब्दांशी संबंधित वेब अॅप्स आपण बुकमार्क करून ठेवायला काहीच हरकत नाही. अडीअडचणीतील त्यांची उपयुक्तता खरचं अपरिमित आहे.

प्रिंट व्हॉट यू लाईक…
२००८ मध्ये मला इंटरनेटवर सापडलेली आणि सर्वाधिक आवडलेली युटीलिटी म्हणजे 'प्रिंट व्हॉट यू लाईक'. खरं तर प्रिंटव्हॉटयूलाईक डॉट कॉम नावाची ही एक स्वतंत्र वेबसाईटच आहे. ही संपूर्ण वेबसाईट ह्या उत्तम युटीलिटीसाठी वाहिलेली आहे. ही युटीलिटी नेमकी काय आहे हे आपण प्रथम नीट समजून घेऊ.
अमेरिकेतील आयोव्हा प्रांतात राहणारे जोनाथन कुमिन आणि कॅसी श्मिट ह्या दोन तरूणांनी ही युटीलिटी आणि प्रिंटव्हॉटयूलाईक डॉट कॉम ही वेबसाईट जन्माला घातली आहे. जोनाथन आणि कॅसी हे दोघेही आयोव्हातील ग्रीनेल कॉलेजचे काँम्प्युटर सायन्सचे विद्यार्थी. जोनाथन २००३ बॅचचा, तर कॅसी २००५ च्या बॅचचा. अभ्यास करता करता इंटरनेटवर भटकंती करणं, नोटस काढणं, महत्वाची वेब पेजेस प्रिंटरवर प्रिंट करून घेणं हा त्यांचा नेहमीचा उद्योग (खरं तर अभ्यासाचाच भाग) होता. विविध वेबसाईटसवरून त्यांना खूप चांगली माहिती मिळत असे. ह्यामुळे जोनाथन आणि कॅसी दोघेही समाधानी असायला हवे होते. पण प्रत्यक्षात तसं नव्हतं. दोघेही एका तांत्रिक कारणामुळे निराश होते. खरं तर त्या तांत्रिक कारणामुळे जगातले सगळेच जण निराश आणि वैतागलेले असतात. ते कारण म्हणजे वेब पेजची प्रिंट घेताना फुकट जाणारे कागद आणि टोनर किंवा प्रिंटरची इंक. एवढं स्पष्ट केल्यानंतर तुम्हालाही एव्हाना जाणवलं असेल की हो हा एक मोठाच प्रॉब्लेम आहे. वेब पेजवर जाहिराती, नको ती ग्राफीक्स म्हणजे चित्रे किंवा फोटोज वगैरे आणि नको त्या माहितीचे त्याच पानावर विखुरलेले मजकूरांचे ठोकळे असं काही बाही नको असलेलं असतं. आपल्याला हवी असते ती दोन परिच्छेदांची माहिती. ती मिळविण्यासाठी वेब पेज प्रिंटरवर प्रिंट करावं तर त्या बरोबर नको असलेलं ते सगळं प्रिंट होतं. त्या पायी कागद जास्त लागतात, प्रिंटरवर वेळही खूप जातो, आणि लेझर प्रिंटर असला तर तो महागडा टोनर किंवा इंकजेटवर ती महागडी इंक उगाचच वाया जाते. हा अनुभव अमेरिकेतल्या जोनाथन आणि कॅसीलाच आहे असं नाही. भारतातल्या राहुल, बंटी आणि नेहालाही ती समस्या भेडसावत असते.
जोनाथन आणि कॅसी यांनी ह्या समस्येवर काही उपाय सापडतो का हे नेटवर शोधण्याचा चंग बांधला. दोघांनीही वेबची दुनिया गुगलून काढली. पण उपाय काही सापडला नाही. इतर मित्र मैत्रिणींना विचारलं तेव्हा ते म्हणाले की त्यांनी एक उपाय शोधला आहे पण तो रोगापेक्ष औषध भयंकर असावं असा काहीसा आहे. जोनाथन आणि कॅसीचे मित्र हवं ते वेबपेज पूर्ण कॉपी करायचे आणि वर्ड प्रोग्राम उघडून त्यात पेस्ट करायचे. एवढं केल्यावर त्यातला नको असलेला भाग म्हणजे जाहिराती वगैरे काढून टाकायचे आणि हवा तेवढाच फक्त भाग राहिल्यावर ते पान प्रिंट करायचे. काही जण ते वेब पेज प्रथम एचटीएमएल फाईल म्हणून सेव्ह करायचे, आणि नंतर ते वर्ड किंवा अन्य प्रोग्राममध्ये उघडून एडिट करून त्याद्वारे नको असलेला भाग काढून टाकायचे. हा उपद्व्याप करावाच लागायचा. तो केला नाही तर कागद आणि टोनर वाया जायचा.
ह्या समस्येवर दुसरा उपाय नाही हे लक्षात आल्यावर जोनाथन आणि कॅसी ह्या दोघांनी निश्चय केला की आपणच आता ह्यावर उपाय काढायचा आणि तो जगाला अर्पण करायचा. दोघेही काँप्युटर सायन्सचे विद्यार्थी असल्याने त्यांच्याकडे तंत्रज्ञान होतं, तारूण्यसुलभ उत्साह होता, आणि मुख्य म्हणजे दृढ निश्चय होता. जोनाथन आणि कॅसी यांनी जे काम केलं त्यातून प्रिंटव्हॉटयूलाईक डॉट कॉम ही वेब साईट तयार झाली. ही वेबसाईट आज डिसेंबर २००८ मध्ये बिटा व्हर्जन म्हणजे चांचणी अवस्थेत आहे. पण तुम्ही ह्या साईटवर जाऊन जोनाथन आणि कॅसीने देऊ केलेल्या युटीलिटीची चांचणी घेतलीत तर तुम्ही खूष व्हाल. प्रिंटव्हॉटयूलाईक डॉट कॉम ह्या साईटने देऊ केलेल्या उपायामुळे कागद, वेळ, टोनर, इंक ह्या सगळ्याच गोष्टींची बचत जगभर दररोज होणार आहे यात खरंच शंका नाही.
प्रिंटव्हॉटयूलाईक डॉट कॉम ला तुम्ही भेट दिलीत तर दर्शनी पानावर सर्वांत वर उजवीकडे तीन ब्रीद वाक्य दिलेली तुम्हाला दिसतील. सेव्ह मनी, सेव्ह द एनव्हायरोन्मेंट आणि प्रिंट व्हॉट यू लाईक ही ती तीन ब्रीद वाक्य किंवा घोषणा. हिरव्यागार पानांच्या पार्श्वभूमीवर ह्या तीन घोषणा आपल्याला दिसतात. खाली ट्राय दि डेमो ची लिंक आहे. त्यावर जाऊन ह्या युटीलिटीची चाचणी आपण घेऊ शकतो. ती चाचणी कशी घ्यायची याचं अतिशय सोप्या शब्दातलं १० पायर्यांचं मार्गदर्शन त्या पानावर आहे. तुम्ही काय काय करू शकता हे त्या दहा पायर्यांतून तुमच्या लक्षात येईल. तुम्हाला हवं ते वेबपेज तुम्ही ह्या साईटमध्ये उघडू शकता. त्यासाठी तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या वेब पेजची लिंक तेथे फक्त पेस्ट करायची. तुमचं वेब पेज उघडलं की तुम्हाला नको असलेला मजकूर/चित्रे/छायाचित्रे/कोरा भाग वगैरे क्लीक करून सिलेक्ट करायचा आणि रिमुव्ह ह्या बटणावर क्लीक करायचं. तुम्हाला हवा असलेला मजकूर मोठ्या अक्षरांत असेल तर अक्षरांचा म्हणजे फाँटचा साईज तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता. त्यासाठीही वेगळी बटणे तिथे आहेत. पानावरची रंगीत पार्श्वभूमीही तुम्ही काढून टाकू शकता. थोडक्यात काही क्लीकनंतर तुम्हाला हवं ते पान प्रिंट करण्यासाठी उपलब्ध होतं. तुमचे कोरे कागद, टोनर वगैरे तर वाचतातच, पण वर्डमध्ये वगैरे पेस्ट करण्याचा त्रासही वाचतो.
ह्यातला सगळ्यात महत्वाचा भाग हा की ही सारी युटीलिटी म्हणजे वेब अप्लीकेशन आहे. तुम्हाला काहीही डाऊनलोड करावं लागत नाही. जे काही करायचं असतं ते प्रिंटव्हॉटयूलाईक डॉट कॉम ह्या साईटवरच. सारं काही इंटरनेट एक्स्प्लोअरर, नेटस्केप किंवा मोझीला फायरफॉक्स सारख्या वेब ब्राऊझरवरच होतं. समजा तुम्हाला आत्ता ताबडतोब प्रिंट करायचं नसेल तर तुम्ही तुमचं ते पान पीडीएफ म्हणून किंवा एचटीएमएल म्हणून सेव्हही करू शकता. ते सेव्ह केलत आणि तुमच्याच ईमेलवर पाठवून ठेवलत की तुम्हाला हवं तेव्हा ते प्रिंट करण्यासाठी उपलब्ध होतं.
आणखी एक वैशिष्ट्यही सांगायला हवं. खूपदा वेबसाईटवरील मजकूर हा अरूंद कॉलममध्ये दिलेला असतो. कॉलम अरूंद आणि मजकूर भरपूर अशी स्थिती असेल तर ते वेब पेज उंचीला खूपच मोठं होतं. असं वेब पेज प्रिंट केलं तर कागद जास्त लागतात. कारण कागदाच्या मधोमध तो अरूंद कॉलम आणि दोन्हीकडे कोरी जागा असा प्रकार होतो. तसं होऊ नये म्हणून प्रिंटव्हॉटयूलाईक डॉट कॉम वर कॉलमची रूंदी वाढवून लागणार्या कागदांची संख्या कमी करण्याची सोय आहे. हे सारं करता करता आपल्या हातून चुका झाल्या तर अन डू आणि रिडू करण्याची सोयही उत्तम रितीने दिलेली आहे. काम भराभर करता यावं यासाठी किबोर्ड शॉर्टकटसही हेल्प सदरात दिले आहेत. एकापेक्षा अधिक संख्येन वेब पेजेस असतील तर ती एकाखाली एक घेण्याची सोयही देण्यांत आली आहे.
थोडक्यात, प्रिंटव्हॉटयूलाईक डॉट कॉम ही खर्या अर्थाने युटीलिटी आहे. ती अर्थातच मोफत आहे. आज बिटा (चाचणी आवृत्ती) व्हर्जन मधील ही युटीलिटी आणि वेबसाईट उद्या पूर्ण आवृत्ती बनून आली की कशी असेल हे पाहण्याची उत्सुकता अनेकांना आहे. बिटा आवृत्तीचा उद्देश हा चाचणीचाच असल्याने काही दोष वा अडचणी तुम्हाला येऊ शकतात. पण तरीही, कितीतरी ब्लॉग्जनी ह्या साईटची वैशिष्ट्यपूर्ण म्हणून दखल घेतली आहे.

पेन ड्राईव्हमधील तिजोरी
पेन ड्राईव्ह उर्फ युएसबी ड्राईव्ह उर्फ युएसबी स्टीक या सदर्भातला हा लेख आहे हे शीर्षकावरून तुमच्या लक्षात आलेलं आहे. जे तुमच्या लक्षात आलय ते अगदी बरोबर आहे. पेन ड्राईव्हच्या संदर्भातलाच हा लेख आहे. ज्या शीर्षकावरून तुम्ही हे ताडलत त्यातले पेन ड्राईव्ह हे शब्द तुम्हाला दिसले आणि तुम्ही तुमचा अंदाज बांधलात. तुमचा तो अंदाज बरोबर जरी असला तरी तो अर्धा अंदाज आहे. कारण शीर्षकात पुढे 'तिजोरी' हा शब्द आहे. पेन ड्राईव्हमधील तिजोरी म्हणजे नेमकं काय याचा अंदाज तुम्हाला आलेला नाही. तो यावा यासाठी मी एक साधं रोजच्या जीवनातलं उदाहरण घेतो.
कल्पना करा, आपण घरातून बाहेर जायला निघालेलो आहोत. घराला कुलूपही लावून झालेलं आहे. आता त्या कुलूपाची चावी आपण आपल्या विश्वासू शेजार्यांकडे देतो, आणि निश्चिंत मनाने बाहेर पडतो. शेजार्यावर आपला विश्वास असतो. पण एक लक्षात घ्यायला हवं की शेजार्यावर कितीही विश्वास असला तरी आपल्या कपाटातील तिजोरीची चावी आपण शेजार्याला देत नाही. आपल्या तिजोरीत नेमकं काय ठेवलय याची माहितीही, शेजारी कितीही विश्वासू असला तरी, आपण त्याला देत नसतो. हे सगळं स्वाभाविक असतं. मुख्य दरवाजाची चावी लावून शेजारी आपलं घर उघडू शकतो याची कल्पना आपल्याला असते. आपल्या अनुपस्थितीत त्याने तशा पद्धतीने घर उघडलं तरी आपली त्याला तशी हरकत नसते. पण आपल्या घराची तिजोरी आणि त्यातल्या चीजवस्तू ही आपली खाजगी आणि अतिशय गुप्त अशी बाब असते. ती चावी आपण कुणालाच देत नसतो.
रोजच्या जीवनातलं हे उदाहरण बाजूला ठेवून आपण आपल्या पेन ड्राईव्हकडे वळू. पेन ड्राईव्ह म्हणजे काय हे 'एंटर' च्या वाचकांना समजावून सांगण्याची आवश्यकता नाही. ह्याच सदरात आपण 'ज्याची त्याची मास्टर की' नावाचा लेख वाचला होता. त्यात मी पेन ड्राईव्हचा वापर किती सोपा झाला आहे, किती परवडण्याजोगा आहे आणि प्रत्येकाला तो किती आवश्यक झाला आहे हे लिहीलं होतं. त्यामुळे तो भाग टाळून आपण आपल्या पेन ड्राईव्हकडे वळू. पेन ड्राईव्ह आणि आपलं घर याची तुलना करून पहा. पेन ड्राईव्ह हा सुद्धा आपल्या घरासारखाच असतो. पूर्णतः आपला स्वतःचा, स्वतःपुरता आणि ज्याच्यात आपल्याला पूर्ण प्रायव्हसी अपेक्षित असते अशी ती जागा (स्पेस) असते. घरातही स्पेस असते, आणि पेन ड्राईव्हमध्येही स्पेस असते. घरात आपलं चालतं. पेन ड्राईव्हमध्ये काय ठेवायचं, काय काढायचं याबद्दलही आपलं चालत असतं. ह्या निकषांवर आपलं घर आणि आपला पेन ड्राईव्ह यांच्यात चांगलच साम्य आहे.
आपल्या पेन ड्राईव्हमध्ये कशाकशाचा म्हणून भरणा नसतो? मित्र-मैत्रिणीच्या पर्सनल फोटोंपासून ते आपल्या वेगवेगळ्या पासवर्डपर्यंत आपण त्यात भरलेलं असतं. आपल्या आठ, दहा ईमेलचे पत्ते, आपल्या दोन चार क्रेडिट कार्डांचे एटीएम पिन नंबर्स, बॅंकेच्या लॉगिनचा तपशील, हिशोब, महत्वाची पत्रे वगैरे वगैरे सगळा जोखमीचा डेटा आपल्या पेन ड्राईव्हमध्ये साठवून ठेवणारी मंडळी मला माहीत आहेत. काही जण तर आपली रोजनिशी लिहून ती पेन ड्राईव्हमधल्या डायरी नावाच्या फोल्डरमध्ये दैनंदिन स्तरावर साठवत असतात. हा सारा डेटा दुसर्या कोणाच्याही हातात पडू नये असं आपल्याला वाटणं हे अगदी स्वाभाविक असतं. अतिशय खाजगी आणि अतिशय व्यक्तीगत असा तो माहिती-ऐवज असतो. असं असताना अचानक आपला पेन ड्राईव्ह दुसर्या कोणाच्या तरी हातात देण्याची वेळ आपल्यावर कधी तरी येते. अशा वेळी आपली गडबड उडते. पेन ड्राईव्हमध्ये तो व्यक्तीगत डेटा असतो. दुसर्याच्या हातात तो द्यावा, तर आपल्याला अडचणीचं वाटत असतं. वेळ तर आणीबाणीची असते. घाईचीही असते. वेळ नसतो. मग अशा वेळी आपण मधला मार्ग शोधतो. आपला पेन ड्राईव्ह आपण दुसर्याच्या हातात देण्यापूर्वी त्यातला तो व्यक्तीगत डेटा प्रथम डिलीट करतो. डिलीट झाल्याची खात्री करतो, मग निर्धास्त मनाने पेन ड्राईव्ह आपल्या मित्राच्या, नातेवाईकाच्या, किंवा सहकार्याच्या किंवा बॉसच्या हातात देतो. साधारणतः हीच मंडळी अशी असतात की ज्यांच्या आग्रहाला बळी पडण्यावाचून आपल्याला गत्यंतर नसतं.
आता पहा, आपलं घर आणि आपला पेन ड्राईव्ह याच्यातला फरक. आपल्या घराची चावी शेजार्याकडे ठेवताना आपण निर्धास्त असतो. कारण आपल्याला माहीत असतं की शेजार्याने घर उघडलं तरी त्याला आपली तिजोरी उघडता येणार नाहीये. त्या तिजोरीत काय आहे हे त्याला कधीच समजणार नाहीये. पण पेन ड्राईव्हमध्ये तशी तिजोरी कुठे असते? सगळच उघडं असतं. ज्याच्या हातात पेन ड्राईव्ह असतो तो त्यातलं काहीही पाहू शकतो. अशा परिस्थितीत काय करायचं? किती वेळा आपला व्यक्तीगत डेटा त्यात कॉपी करायचा, किती वेळा डिलीट करायचा? ह्या परिस्थितीवर काही उपाय नाही का? घरात जशी बंद तिजोरी असते, तशी काहीतरी पण पूर्णतः खात्रीची सोय आपल्या पेन ड्राईव्हमध्ये करता येणार नाही का?
मंडळी, घरातल्या तिजारीइतकीच किंबहुना त्यापेक्षा उत्तम सोय आपल्याला आपल्या पेन ड्राईव्हमध्ये करता येते. आपला व्यक्तीगत डेटा त्यात ठेवून आपण आपला पेन ड्राईव्ह निर्धास्तपणे कुणाच्याही हातात देऊ शकतो. आपला पेन ड्राईव्ह त्याने ' कोना कोना छान मारून ' पाहिला तरी आपल्या तिजोरीत काय आहे हे त्याला दिसूही शकत नाही, आणि कळूही शकत नाही. खरं तर आपली ती तिजोरीच मूळात अदृश्य असते. जर तिजोरीच दिसत नसेल तर त्यात आत काय आहे हे कळण्याची कसलीही सुतराम शक्यता मूळातच नाही. अगदी एखादा काँप्युटर एक्सपर्ट जरी येऊन बसला किंवा एखाद्या हॅकरच्या हातात तुमचा पेन ड्राईव्ह सापडला तरी त्यालाही दुसरा जन्म घेतल्याशिवाय ती तिजोरी फोडून आतला ऐवज पाहता येणार नाही.
पेन ड्राईव्हमध्ये तिजोरीची ही जी संकल्पना मी सांगतो आहे, तिचे नाव आहे ' रोहोस मिनी ड्राईव्ह ' . संकल्पना साधी सोपी आहे. तुमच्या पेन ड्राईव्हमध्येच एक स्वतंत्र ड्राईव्ह गुप्तपणे जन्माला घातला जातो. ह्या ड्राईव्हमध्ये तुम्हाला हव्या त्या पद्धतीने फोल्डर्स व फाईल्स ठेवता येतात. ही सारी फोल्डर्स व फाईल्स AES 256 bit key length पद्धतीने एन्क्रीप्ट करून साठवली जातात. म्हणजेच तुम्ही त्यात फोटो साठवला असला किंवा एखादी व्हिडिओ क्लीप त्यात ठेवली असली तरी ती सांकेतिक भाषेत गोंधळ घालून ठेवलेल्या माहितीसारखी भासते. ती वाचणं हे हॅकर सोडा ब्रम्हदेवालाही शक्य होणारं नसतं. आता बघा, तुमचा पेन ड्राईव्ह जेव्हा तुम्ही तुमच्या किंवा कोणाच्याही संगणकाच्या युएसबी ड्राईव्हमध्ये सरकवता तेव्हा तुम्हाला काहीतरी G किंवा H वगैरे अद्याक्षराचा नवा ड्राईव्ह विंडोज एक्स्प्लोअरर मध्ये दिसू लागतो. माझ्या संगणकात मी माझा पेन ड्राईव्ह लावला की H ड्राईव्ह अवतरतो. ह्याच ड्राईव्हमध्ये आपल्या पेन ड्राईव्हमधील फोल्डर्स आणि फाईल्स असतात. मी माझ्या पेन ड्राईव्हमध्ये रोहोस मिनी ड्राईव्ह ची सोय केली आहे. रोहोस मिनी ड्राईव्ह म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एक प्रकारची तिजोरीच (तीही एन्क्रीप्शनची सोय असलेली) आहे. माझ्या H ड्राईव्हमध्ये इतर सर्व फोल्डर्स व फाईल्स दिसतात. त्या कोणालाही दिसतात. पण रोहोस मिनी ड्राईव्ह मधील फोल्डर्स व फाईल्स मात्र दिसत नाहीत. त्या ऐवजी Rohos नावाची एक Exe फाईल दिसते. ह्या फाईलवर क्लीक केल्यानंतर ती तुमचा पासवर्ड मागते. तो पासवर्ड दिल्याशिवाय माझ्या माहितीची तिजोरी मूळातच उघडत नाही. त्यामुळे तिजोरीतला माझा तो डेटा सुरक्षित राहतो. इतरांच्या हातात पेन ड्राईव्ह देऊनही मला डेटा सेफ्टी ची भिती नसते.
हा रोहोस मिनी ड्राईव्ह लावणं अतिशय सोपं आहे. लहान मुलांनाही तो सहजपणे लावता येईल इतका सोपा. त्याची पद्धत सांगतो. प्रथम http://www.rohos.com/rohos_mini.exe ह्या लिंकवरून रोहोस मिनी ड्राईव्ह डाऊनलोड करून घ्या. तो तुमच्या संगणकावर इन्स्टॉल करा. तुमच्या संगणकावर Windows XP किंवा Windows Vista असणं मात्र आवश्यक आहे. रोहोस मिनी ड्राईव्ह पूर्णपणे मोफत उपलब्ध आहे. त्यात तुम्ही १ जीबीपर्यंतचा डेटा एन्क्रीप्ट करून गुप्त ड्राईव्हमध्ये साठवू शकता. रोहोसचे वैशिष्ट्य हे की एक पेन ड्राईव्ह असून तुमच्या एक्स्प्लोअररमध्ये दोन ड्राईव्हज दिसतात. माझ्या बाबतीत एक ड्राईव्ह H असतो तर दुसरा ड्राईव्ह R असतो. H मधला डेटा सर्वांसाठी खुला असतो. R ड्राईव्ह पासवर्ड टाईप केल्याशिवाय मूळातच दिसत नाही. पासवर्ड टाईप केला की मात्र एक्स्प्लोअरर तो दाखवू लागतो. पासवर्ड आपल्याला हवा तेव्हा बदलता येतो. गुप्त ड्राईव्हमध्ये फोल्डर्स वा फाईल्स घालता येतात, काढता येतात. एन्क्रीप्शनची प्रक्रिया त्यात आपोआप होते, आपल्याला त्यासाठी काहीही करावं लागत नाही. ही सारी माहिती www.rohos.com ह्या साईटवर तुम्हाला पहायला मिळेल.
थोडक्यात काय, तर यापुढे काळजी करू नका. आपलं घर काय, किंवा पेन ड्राईव्ह काय चावी विश्वासू शेजार्याच्या हातात द्यायला हरकत नाही. तिजोरी मात्र नीट बंद करून ठेवा. त्याची चावी कोणाच्याही हातात पडणार नाही याची काळजी घ्या. तिजोरीत हवा तो ऐवज ठेवा. नंतर मग मात्र निर्धास्त राहण्याची सवय करून घ्यायला हवी. निर्धास्त कसं रहायचं हे शिकवणारे ब्लॉग्ज आणि ट्युटोरियल्सही इंटरनेटवर उपलब्ध आहेत. तेव्हा काळजी नसावी.

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)