राम गणेश गडकरी यांना मराठीचे शेक्सपियर असं म्हंटलं जातं.
त्यांचं एक स्वप्न होतं, पण खिशाला परवडत नसल्याने ते पूर्ण होणं अवघड होतं.
आता ते पूर्ण झालं आहे, शंभर वर्षांनी..
गडकरी स्वर्गातून इंटरनेट पहात असतील तर
संकीर्ण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा

१३ मार्च, २०११
सन 1955, महिना मार्च, तारीख 13. पं. नेहरूंवर नागपूरमध्ये चाकूहल्ला
आज 13 मार्च 2011. बरोब्बर 65 वर्षांपूर्वी म्हणजे 13 मार्च 1955 रोजी नागपूर शहरात भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आले होते. सोनेगाव विमानतळावरून ते मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री रविशंकर शुक्ल यांच्या घरी निघाले होते. नागपूर तेव्हा मध्य प्रदेशचा भाग होते. तो काळ आजच्या सारखा झेड सिक्युरिटीचा नव्हता. नेहरू उघड्या मोटारीतून नागपूरच्या रस्त्यावरून प्रवास करीत होते. लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱ्या जवाहरलाल नेहरूंवर हल्ला होईल असं कोणाच्या स्वप्नातही नव्हतं. पण, अचानक एक 32 वर्षांचा तरूण नेहरूंच्या त्या गाडीच्या दिशेने गेला. त्याच्या हातात चाकू होता.
१२ मार्च, २०११
इंटरनेटने श्रीमंत केलेल्या व्यक्ती
संदर्भः फोर्बस मासिकातील श्रीमंतांची यादी.
ह्या सर्व कर्तृत्ववान व्यक्ती व त्यांच्या कामाचा तपशील तसेच त्यांच्या आयुष्यातील चढउताराच्या रोमांचक कथा लवकरच संगणक डॉट इन्फो वर क्रमशः वाचा. मराठीत हा तपशील प्रथमच येणार आहे.
१० मार्च, २०११
वेगवेगळे संगणकः नामे आणि कारनामे
![]() |
| एक वर्क स्टेशन, पीसी, डेस्क टॉप वगैरे... |
पीसी, वर्क स्टेशन, डेस्क टॉप, सर्व्हर, मेनफ्रेम, सुपर काँप्युटर ही आणि आणखीही काही संगणकाचीच नावे. इथून तिथून ती सारखी कानावर पडत असतात. एकाच संगणकाची ही सारी नावे आहेत, की प्रत्येक नाव हे वेगळ्या संगणकाचे आहे? हा प्रश्न बरेचदा आपल्या मनात रेंगाळत असतो. त्याचं उत्तर मिळवावसं वाटतं, पण ह्या ना त्या कारणाने ते राहून गेलेलं असतं. संगणकइन्फो मध्ये आज त्या उत्तरावर कटाक्ष टाकूः
1) पीसीः अर्थात पर्सनल काँप्युटर. फार पूर्वी खोलीएवढे अवाढव्य संगणक होते. असे संगणक वापरण्यासाठी अनेक माणसे असत. पुढे प्रगती होत गेली आणि संगणक आकाराने लहान झाले. लहान संगणकांना मग मायक्रो-काँप्युटर्स म्हणण्याची पद्धत पडली. हे लहान म्हणजे मायक्रो-काँप्युटर्स मोठ्या संगणकाप्रमाणेच सर्व कामे करू शकत असत. मात्र त्यांना फार थोडी जागा लागे, आणि त्यावर काम करण्यासाठी फारच कमी माणसे लागत. मायक्रो-काँप्युटर्समधूनच नंतर पर्सनल काँप्युटर उदयाला आला. टेबलावर राहू शकेल इतक्या लहान आकाराचा, आणि एका माणसाला सहजपणे वापरता येण्याजोगा. हा पीसी. व्यक्तीगत संगणक. तो लॅप टॉप प्रकारचाही असू शकेल, किंवा टेबलावर कायम असलेला, सहजी हलविता न येणारा डेस्कटॉपही असू शकेल.
2) वर्क स्टेशनः हाही टेबलावरचाच संगणक. एका माणसाने वापरण्याचाच. म्हणजे खरं तर पी.सी.च. पण त्याला पी.सी. म्हणायच्या ऐवजी वर्क स्टेशन म्हंटलं जातं, याचं कारण त्याची क्षमता आणि तुलनेने मोठा आकार. अधिक क्षमतेचा प्रोसेसर त्यात असणार हे ओघानच आलं. मेमरीही घसघशीत असणारच. गेम्स तयार करण्यासाठी, थ्रीडी ग्राफीक्ससाठी किंवा अॅनीमेशनसाठी असे तगडे संगणक लागतात. खूपदा त्यांचे मॉनिटर्स देखील चांगलेच मोठे असतात. तुमच्या घरच्या संगणकात प्रोसेसर, मेमरी वगैरे प्रचंड क्षमतेची असेल आणि तुम्ही त्यावर मोठ्या आकाराच्या फाईल्सचे काम करीत असाल तर तुमचा संगणकही वर्क स्टेशन प्रकारातच येईल.
3) डेस्क टॉपः तुमच्या टेबलावर कायम विसावलेला संगणक. डेस्क हा शब्द टेबल ह्या अर्थाचाच. डेस्क टॉप संगणक हा मोठ्या क्षमतेचा असेल किंवा मध्यम वा कमी क्षमतेचाही असेल. पी.सी. हा एकाच वेळी डेस्क टॉप आणि वर्क स्टेशनही असू शकेल. मात्र लॅपटॉप टेबलावर कायम ठेवून वापरलात तरी त्याला डेस्क टॉप म्हणता येणार नाही.
4) मेन फ्रेमः जुन्या काळात मोठ्या कंपन्यांमध्ये असलेले प्रचंड आकाराचे संगणक. हे एकेका खोलीइतकेही असत. किंवा, चक्क एखादा मजलाच्या मजला त्यांनी व्यापलेला असे. पुढे संगणक आकाराने लहान आणि क्षमतेने मात्र कितीतरी अफाट होत गेले. पण सवयीने आजही कितीतरी कंपन्यांमध्ये मेन फ्रेम हे शब्द वापरले जाताना दिसतात. लाखो उलाढाली करणारा संगणक, बहुधा तो एखाद्या टेबलावरच स्थानापन्न असतो. पण त्याच्या राक्षसी क्षमतेमुळे त्याला आपलं मेनफ्रेम म्हणायचं, इतकच. बाकी जुन्या काळातली आकाराची अवाढव्यता केव्हाच इतिहासात जमा झालीय.
5) सुपर काँप्युटरः भारताचा 'परम' हा सुपर काँप्युटर घ्या. आपल्या डॉ. विजय भटकरांच्या नेतृत्वाखाली तो तयार झाला हे आपण नेहमीच वाचतो आणि ऐकतो. सुपर काँप्युटर हा संख्येने एक असेल किंवा एकाच वेळी तो अनेक संगणकांचा पुंजकाही असेल. सामान्यतः सुपर काँप्युटर प्रकारातील संगणक हा मोठ्या गुंतवणूकीने तयार झालेला असतो. पीसी हा एका पेठेएवढा असला तर सुपर काँप्युटर हा खंडप्राय वा एखाद्या ग्रहाएवढा असल्यासारखा आहे.
सर्व्हरः असा संगणक की जो त्याच्याशी जोडलेल्या इतर संगणकांना काही तरी सेवा पुरवतो. जोडलेले जे संगणक सर्व्हरची सेवा घेतात त्यांना क्लायंट असं म्हणण्याचीही पद्धत आहे. इतर संगणकांशी जोडलेला असल्याने सर्व्हर हा नेहमी नेटवर्कमध्येच असतो. थोडक्यात, एकमेकांशी जोडलेल्या अनेक संगणकांमधील जो मायबाप दाता संगणक असतो त्याला सर्व्हर असं म्हणतात.
![]() |
| 1980 सालचा एक मेनफ्रेम संगणक |
३ मार्च, २०११
अहो, चिमुकली इसापनीती 100 वर्षांची झाली...
राम गणेश गडकरी यांची एकच प्याला पासून राजसन्यास पर्यंतची नाटके माहित नाहीत असा मराठी माणूस मिळणे नाही. गडकरी ऐन तारूण्यात वयाच्या 34 व्या वर्षी गेले. पण तेवढ्या अल्पायुष्यातही त्यांनी महाराष्ट्रासाठी प्रचंड साहित्य संपदा निर्माण केली.
मंगल देशा ! पवित्र देशा ! महाराष्ट्र देशा ।
प्रणाम घ्यावा माझा हा, श्रीमहाराष्ट्र देशा ॥
हे त्यांचे गीत महाराष्ट्राला आजही स्फुर्ती देत असते..
पण, गडकऱ्यांनी खास लहान मुलांसाठी लिखाण केले, आणि त्याचे एक पुस्तकही प्रकाशित झाले होते ही गोष्ट आज अनेकांना (अगदी मराठीच्या कितीतरी प्राध्यापकांनाही) ठाऊक नाही. ह्या पुस्तकाचे नाव, चिमुकली इसापनीती. गडकऱ्यांनी, परवडत नसतानाही, स्वखर्चाने ती प्रकाशित केली. हे पुस्तक फक्त 10 पानांचे आहे. त्यात इसापच्या जोडाक्षरविरहित लिहीलेल्या दहा गोष्टी आहेत.
ह्या दहा पानी पुस्तकाला गडकऱ्यांनी आवर्जुन प्रस्तावना लिहीली आहे. प्रस्तावनेच्या खाली तारीख आहेः 29/12/1910. म्हणजे 29 डिसेंबर 2010 रोजी चिमुकली इसापनीती ह्या पुस्तकाला 100 वर्षे पुर्ण झाली.
चिमुकली इसापनीतीच्या प्रस्तावनेत गडकरी काय लिहीतात पहाः

"... कोणाच्याही मदतीवाचून मुलांस हे पुस्तक वाचता येईल असा तर्क आहे. साध्या अक्षर ओळखीचा काळ तुलनात्मक दृष्टया थोडाच असल्यामुळे फक्त दहाच गोष्टी घेतल्या आहेत. वाचन सुलभ होण्यासाठी मुद्दाम मोठया टाईपाचा उपयोग केला आहे. चित्रेसुध्दा हवी होती; पण ते पडले जरा खर्चाचे काम. सुदैवाने पुढे मागे या पुस्तकाची दुसरी आवृत्ती निघण्याचा सुयोग आलाच तर पाहता येईल..."
वरील लाल अक्षरांत दिलेले गडकऱ्यांचे 1910 सालचे शब्द नीट वाचा. गडकऱ्यांना चिमुकली इसापनीती मध्ये चित्रेसुध्दा हवी होती; पण चित्रे देणे त्यावेळी गडकऱ्यांना परवडणारे नव्हते. गडकरी म्हणतात, ते पडले जरा खर्चाचे काम. सुदैवाने पुढे मागे या पुस्तकाची दुसरी आवृत्ती निघण्याचा सुयोग आलाच तर पाहता येईल.
गडकऱ्यांच्या दुर्दैवाने दुसऱ्या आवृत्तीचा सुयोग कधीच आला नाही. त्यामुळे चिमुकली इसापनीती पुढली 100 वर्षे चित्रांविनाच राहिली. पण गडकऱ्यांचे चित्रांचे ते स्वप्न चिमुकली इसापनीती 100 वर्षांची होता होता पूर्ण झाले. तो दिवस म्हणजे 25 डिसेंबर 2010. ह्या दिवशी ठाणे येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रकाशन कट्ट्यावर प्रा. उषा तांबे यांच्या हस्ते www.ramganeshgadkari.com ह्या संकेतस्थळाचे प्रकाशन झाले. ह्या संकेतस्थळावर गडकऱ्यांचे समग्र साहित्य मोफत उपलब्ध आहे. समग्र साहित्यामध्ये अर्थातच ती चिमुकली इसापनीतीही उपलब्ध आहे. संकेतस्थळावर चिमुकली इसापनीती प्रकाशित करताना प्रकाशक संगणक प्रकाशन यांनी त्या दहा गोष्टींना रंगीत चित्रांची जोड दिली. महाराष्ट्राच्या शेक्सपियरचे 100 वर्षांपूर्वीचे स्वप्न अशा प्रकारे पूर्ण झाले. मराठी साहित्य संमेलनाच्या प्रकाशन कट्ट्यावर हे स्वप्न पूर्ण झाले ही वृत्तपत्रांसाठी फार मोठी बातमी होती. पण दुर्दैवाने ही बातमी मराठी वृत्तपत्रांनीही दिली नाही. आज संगणक डॉट इन्फो वरून ती बातमी जगापुढे येत आहे.
दुसरे दुर्दैव म्हणजे 2010 हे वर्ष जसे महाराष्ट्र राज्याचे सुवर्णमहोत्सवी वर्ष होते तसे ते गडकऱ्यांचे 125 वे जयंती वर्षही होते. गडकऱ्यांचा जन्म 24 मे 1885 चा. पण ज्या महाराष्ट्राला गडकऱ्यांनी गीतातून वंदन केले त्याला त्याची आठवण त्या सुवर्ण महोत्सवी वर्षभरात कधीच आली नाही. त्या वर्षात ramganeshgadkari.com इंटरनेटवर आले एवढेच एक समाधान.
ज्यांना चिमुकली इसापनीती आणि ती प्रस्तावना पूर्ण वाचायची आहे त्यांचेसाठी ती ह्या दुव्यावर उपलब्ध आहे.
राष्ट्रपतींची खास गाडी
![]() |
| आपल्या राष्ट्रपतींचा आलिशान प्रवास. प्रेसिडेन्शियल सलून मधील एक कोपरा. |
राजधानी एक्सप्रेसपासून ते पॅलेस ऑन व्हील्सपर्यंत आणि फ्लाईंग राणीपासून ते डेक्कन क्वीनपर्यंत अनेक रेल्वे गाड्या आपण ऐकल्या आहेत. त्यांना इतिहास वगैरे असू शकतो असं कधी आपल्या मनात आलेलं नसतं. पण एक खास ऐतिहासिक म्हणावी अशी गाडी मात्र आपण फारशी ऐकलेली नाही. ती गाडी म्हणजे 'प्रेसिडेन्शियल सलून' अर्थात फक्त भारताच्या राष्ट्रपतींची आणि फक्त त्यांच्यासाठीच सदैव राखीव असलेली गाडी. ही गाडी फक्त दोन डब्यांची आहे. १९५६ साली बांधण्यात आलेले हे आलिशान डबे नवी दिल्ली स्टेशनात कायम उभे असतात. ह्या दोन डब्यांमध्ये राष्ट्रपतींची बेडरूम, लाँजरूम, व्हिजिटर्स रूम, कॉन्फरन्स रूम असा लवाजमा एकीकडे आहे. दुसरीकडे राष्ट्रपतींचे सचिव व इतर कर्मचारी यांचेसाठी काही केबीन्स आहेत. हे दोन्ही डबे सागाच्या फर्निचरने तसेच रेशमी पडद्यांनी सजवण्यांत आले आहेत. 'प्रेसिडेन्शियल सलून' ची परंपरा फार जुनी आहे. १९ व्या व २० व्या शतकात भारताच्या इंग्रज व्हाईसरॉयने त्याचा उपयोग केला होता. १९२७ पर्यंत इंग्रजांची भारतीय राजधानी कलकत्ता येथे असल्याने हा 'प्रेसिडेन्शियल सलून' कलकत्त्यात उभा असे. १९२७ मध्ये इंग्रजांनी राजधानी दिल्लीत हलवल्यानंतर तो दिल्ली येथे आणण्यात आला. अत्यंत आलिशान अशा ह्या गाडीत पर्शियन गालिचे वगैरे वैभवी सजावट होती. ही गाडी वातानुकूलित नव्हती, पण आत गारवा कायम रहावा यासाठी त्यात खास पद्धतीचे पडदे लावण्यांत आले होते. गाडीत चोवीस तास गरम व थंड पाण्याची सोय करण्यांत आली होती. ही गाडी स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी १९५० साली प्रथमच वापरली. त्यानंतर आलेल्या राष्ट्रपतींनीही त्याचा वापर केला. राष्ट्रपतींची मुदत संपल्यानंतर त्या गाडीतून त्यांना त्यांच्या गावापर्यंत सोडण्याचा एक प्रघात त्यानंतर पडला. ह्या प्रघातानुसार गाडी वापरणारे शेवटचे राष्ट्रपती म्हणजे डॉ. संजीव रेड्डी. त्यांनी १९७७ साली राष्ट्रपती भवनाचा निरोप घेताना ही गाडी वापरली. त्यानंतरच्या काळात सुरक्षेच्या कारणास्तव ही गाडी राष्ट्रपतींनी वापरली नाही. १९७७ ते २००३ ह्या २६ वर्षांच्या काळात ही गाडी नुसती उभी होती. नुसती उभी असली तरी तिची निगा उत्तम प्रकारे सांभाळण्याची पद्धत आहे. आपले मागील राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनी ही गाडी हरनौत ते पटणा ह्या ६० किलोमीटरच्या प्रवासासाठी वापरली. त्यासाठी ह्या गाडीच्या सजावटीचे खास नूतनीकरण करण्यांत आले होते. त्याचाच एक भाग म्हणून गाडीत प्रगत तंत्रज्ञानाने व उपग्रह यंत्रणेने युक्त अशी आधुनिक संपर्क साधनेही डॉ. कलाम यांच्यासाठी बसविण्यांत आली होती. त्यानंतर मात्र आता गेली सुमारे ५ वर्षे 'प्रेसिडेन्शियल सलून' नवी दिल्लीत शांतपणे उभे आहे. नव्या राष्ट्रपती महाराष्ट्राच्या प्रतिभाताई पाटील ह्या 'प्रेसिडेन्शियल सलून' मध्ये कधी बसतील का हे पहायचं.
(अधिक माहितीसाठी ह्याच ब्लॉगवरील हा दुवा पहा)
२ मार्च, २०११
मराठी ब्लॉगः एक रांगतं माध्यम (लोकसत्ता, लोकरंग पुरवणीतील लेख)
आज आपल्याला जे मराठी ब्लॉग्ज ऐकायला, वाचायला आणि पाहायला मिळतात, त्यातले बहुसंख्य एक तर गुगल कंपनीच्या Blogger.com (blogspot.com) वर किंवा Wordpress.com ने देऊ केलेल्या सेवेचा लाभ घेणारे आहेत. इंटरनेटवर सहज उपलब्ध असलेल्या या दोन्ही सेवा पूर्ण मोफत आहेत आणि आता चांगल्या स्थिरावल्या आहेत. इ’Blogger आणि Wordpress या दोन्हींची सुरुवात २००३ सालातली. अमेरिकेबाहेर इतर भाषांमध्ये ब्लॉगलेखनाचा प्रसार झाला, तो मुख्यत्वे २००३ नंतरच. म्हणजेच आपले मराठी ब्लॉग्ज हे काळाचं वय पाहता केवळ सात-आठ वर्षांचे आहेत. मराठी ब्लॉग्ज हे केवळ ‘युनिकोड’ प्रकारचे फाँट्स वापरूनच होऊ शकतात, हे आता सर्वानाच माहीत झालं आहे. अनेक कारणांमुळे २००७ पर्यंत मराठीसाठी ‘युनिकोड’चा वापर फारच थोडय़ा प्रमाणात झाला आणि त्यामुळे २००७ पर्यंत फारच नगण्य म्हणता येतील, इतकेच मराठी ब्लॉग्ज झाले. म्हणजेच मराठी ब्लॉग्ज रूजण्याचा खरा काळ हा २००७ ते २०१० असा केवळ चार वर्षांचाच आहे.
आजच्या मराठी ब्लॉग्जमध्ये चाकोरीबाहेरचे विषय हाताळणारे काही लेखक निश्चितच आहेत. केवळ विनोद, कविता, प्रवास वर्णनं, स्वतचे अनुभव व वरवरची मते यांनी भरलेल्या ब्लॉग्जची गर्दी ही सर्वच भाषांत दिसते, तशी मराठीतही आहे, आणि ती राहणारच. ती राहणं हे अंतिमत: उपकारकही आहे. प्रश्न सुमारांच्या गर्दीचा नाही. कारण ब्लॉगोस्फिअरमध्ये लाखो करोडो कोरी पाने उपलब्ध होऊ शकतात. ती कमी पडणार नाहीत. फक्त त्यातून वाचायलाच हवीत, अशी चमकदार पानं तयार व्हायला हवीत. त्या दृष्टीने नाटक सिनेमांचं होतं, तसं ब्लॉग्जचं परीक्षण किंवा त्यांना एक ते पाचच्या श्रेणीत बसवणं अशी व्यवस्था नाही. वृत्तपत्रं सिनेमांना एक ते पाच स्टार्स देऊन परीक्षणं करत असतात. कारण ती पठडी आता पक्की झाली आहे. ब्लॉग्जनाही तसा न्याय लावावा, एवढय़ा दर्जाचे ते नसावेत, असं वृत्तपत्रांना कदाचित आज वाटत असावं. त्यासाठी एकूण मराठी ब्लॉग्जची संख्या आज वाढायला हवी. मराठी नाटकांचा जोमाने प्रसार होण्यामागे वृत्तपत्रांनी त्यांना देऊ केलेले सवलतीचे जाहिरातदर हे देखील एक कारण होते. मराठी ब्लॉग्जसाठीदेखील तशा प्रकारच्या ‘दे धक्क्या’ची गरज आज आहे.
आज अनेक मराठी पत्रकारांचे स्वतचे ब्लॉग्ज आहेत. पण इंग्रजीत ज्या नियमितपणाने ब्लॉग्ज चालतात, तेवढा नियमितपणा आणि सातत्य आपल्यात दिसत नाही. त्याचं एक कारण अजून ब्लॉग या प्रकाराला मराठीत जे ग्लॅमर प्राप्त व्हायला हवं, तेवढं मिळालेलं नाही. ब्लॉग हा प्रकार आपणदेखील जेवढा गांभीर्यानं घ्यायला हवा, तेवढा घेतलेला नाहीय. आपल्या हातातला मोबाइल फोन आपण आज गांभीर्यानं घेतला आहे, कारण आपल्याला त्याचा उपयोग नीट कळला आहे. आपल्या हातातला किंवा लेखणीतला ब्लॉग आपल्याला त्या दृष्टीने अजून नीट कळायचा आहे. ही बाब ब्लॉग्जना (अगदी पत्रकारांच्या गंभीर ब्लॉग्जनाही) ज्या प्रकारच्या सवंग कॉमेंटस् येतात, ते पाहिलं की ते जाणवतं. ब्लॉग्जवरील कॉमेंटस्चा दर्जा वाढण्यासाठी उत्कृष्ट कॉमेंटस्चाही गौरव व्हायला हवा. जर ब्लॉग्जची स्पर्धा आयोजित केली जात असेल तर त्यात एक पुरस्कार उत्कृष्ट कॉमेंटलाही देण्यात आला पाहिजे. ब्लॉग ही गांभीर्याने घेण्याचीच गोष्ट आहे. भले तो ब्लॉग विनोदासाठी वाहिलेला का असेना! उदाहरण देऊनच सांगायचं तर राजकीय पक्षाचं खुलं अधिवेशन, विधानसभा किंवा लोकसभा यांच्यात जो फरक आहे वा असावा, तो ब्लॉग आणि आपल्या नेहमीच्या ऑनलाइन भंकस यामध्ये रहायला हवा. तसं झालं नाही तर ब्लॉग हा प्रकार वेगळा असण्याची गरज राहणार नाही. फेसबुक वा तत्सम माध्यम ती गरज भागवू शकेल. आगामी २०१२ आणि २०१३ ही वर्षे टॅबची, आयपॅडची किंवा गॅलक्सी वगरेंची आहेत. त्यावर ब्लॉग्जना आपले स्वतचे स्वयंभू स्थान असणार आहे. मात्र त्यात चमक व दर्जा नसेल, आणि नुसतीच भंकस चालणार असेल तर कोणीही त्यासाठी वेळ देणार नाही, हेही तेवढच खरं.
मराठीतले काही ब्लॉग्ज लक्ष वेधून घेणारे आहेत. ते सगळं वाचलं जाणं, वा प्रत्येकातली प्रत्येक पोस्ट वाचली जाणं, हे अशक्य कोटीतलं आहे. काही उत्तम ब्लॉग्ज नजरेतून सुटलेले असण्याची दाट शक्यता आहे. माझ्या वाचनात आलेल्या ब्लॉग्जपकी काहींनी विशेष लक्ष वेधून घेतलं. त्यातले काही ब्लॉग्ज असे :
१) गणेश मतकरी यांचा http://apalacinemascope.blogspot.com
२) परेश प्रभू यांचा http://pareshprabhu.blogspot.com
३) नितीन पोतदार यांचा http://www.myniti.com
४)http://sujaanpalaktva.blogspot.com
५)http://chakali.blogspot.com
६)http://sahajach.wordpress.com
७)http://restiscrime.blogspot.com
८)http://mazisahyabhramanti.blogspot.com
९)http://dhondopant.blogspot.com
१०)http://aadityawrites.blogspot.com
११)http://www.2know.in
१२)http://chehare.blogspot.com
१३)http://sahajsuchalamhanun.blogspot.com
१४)http://kayvatelte.com
१५) http://vinayak-pandit.blogspot.com
(लोकसत्ता - लोकरंग पुरवणी दिनांक 27 फेब्रुवारी 2011)
लोकसत्ता लिंकः
http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=138966:-blog---&catid=104:2009-08-05-07-53-42&Itemid=117#JOSC_TOP
मराठी ब्लॉगलेखन
इंटरनेट आणि त्यासंबंधीचं सर्व तंत्रज्ञान आपल्याकडे अमेरिकेतून इंग्रजी वेष्टनात बांधून आलं. ते वेष्टन उघडल्या-उघडल्या जमेल तसं त्यावर मराठी प्रतिशब्दांचे शिक्के मारायला आपण सुरुवात केली. त्यातून मग ‘ब्लॉग’ या शब्दाचं बारसं ‘अनुदिनी’ हा अस्सल मराठी शब्द त्यासाठी योजून झालं. १८५७ साली (सुमारे दीडशे वर्षांपूर्वी) प्रसिद्ध झालेल्या मोल्सवर्थ मराठी-इंग्रजी शब्दकोशाने ‘अनुदिनी’ या शब्दाचा अर्थ इंग्रजीत 'Every day' असा दिला आहे. त्यामुळे आपले मराठी ब्लॉग लिहिणारे बांधव दररोज ब्लॉग (अनुदिनी) लिहिणारे असावेत, असा समज होणं स्वाभाविक आहे. पण प्रत्यक्षात आपले किती ‘अनुदिनी लेखक’ त्यांचे मराठी ब्लॉग्ज दररोज लिहितात, हा संशोधनाचा विषय आहे. मराठीत जगभरात आज सुमारे तीन हजार ते साडेतीन हजार ब्लॉग्ज असावेत व त्यातले जेमतेम २५० किंवा त्यापेक्षाही कमी हे दररोज लिहिले जाणारे असावेत, असा अंदाज व्यक्त केला जातो. मराठी ब्लॉग्जची नेमकी स्थिती, संख्या व दिशा यांची नोंद घेणारी वा त्यांचे प्रोत्साहनार्थ नियमन करणारी कोणतीही यंत्रणा आज उपलब्ध नाही. राज्य सरकारच्या नव्या मराठी विभागाने त्यात लक्ष घातल्यास महाराष्ट्रात एक वेगळे चित्र पुढल्या काही वर्षांत दिसू शकेल.आजचे मराठी ब्लॉग्ज
महाराष्ट्रात आज फेसबुकचा वापर तरूणाई फार मोठय़ा प्रमाणात करत आहे. अगदी गाव, तालुका आणि जिल्हा पातळ्यांवर सायंकाळी सायबर कॅफेच्या दारावर नजर टाकली की, चपला-बुटांचा ढीग दिसतो. आत जाऊन पाहावं तर मंडळी फेसबुकात डोकं घातलेली दिसतात. मध्यंतरी नांदेडमध्ये गेलो असताना तेथील सायबर कॅफेत आलेल्या काही तरूण मित्रांशी याबाबत संवाद साधला. ते म्हणाले, ‘आम्ही फेसबुकवर भेटतो, गप्पा मारतो, पण मराठी टायपिंग करता येत नाही. कसंतरी इंग्रजी कम मराठीतच मॅनेज करतो. फेसबुकचं मराठी सेटिंग अजून जमत नाही.’ इंग्रजी कच्चं आणि मराठी पक्कं नाही, अशा स्थितीतही फेसबुकवर बसणारे तरूण हजारोंच्या संख्येने आहेत. हे तरूण मठ्ठ आहेत, असं मात्र अजिबात नाही. उघडय़ा डोळ्यांनी ते आज जे घडतं आहे, ते पाहत आहेत, ऐकत आहेत, कदाचित कमी वाचत असतील, पण त्यांना जगात काय चाललं आहे, हे कळतंय आणि त्यांची त्यावरची आपली स्वतची मतं आहेत. ही मतं विस्ताराने लिहावीत, यासाठी त्यांचे मराठी सेटिंगचे म्हणजे ‘युनिकोड’ तंत्राबद्दलचे अज्ञान किंवा अपुरे ज्ञान यासाठी काहीतरी करायला हवे. तसे झाल्यास आज दिसणाऱ्या मराठी ब्लॉग्जचा दर्जा अनेक पटींनी वाढण्यास मदत होईल.आजच्या मराठी ब्लॉग्जमध्ये चाकोरीबाहेरचे विषय हाताळणारे काही लेखक निश्चितच आहेत. केवळ विनोद, कविता, प्रवास वर्णनं, स्वतचे अनुभव व वरवरची मते यांनी भरलेल्या ब्लॉग्जची गर्दी ही सर्वच भाषांत दिसते, तशी मराठीतही आहे, आणि ती राहणारच. ती राहणं हे अंतिमत: उपकारकही आहे. प्रश्न सुमारांच्या गर्दीचा नाही. कारण ब्लॉगोस्फिअरमध्ये लाखो करोडो कोरी पाने उपलब्ध होऊ शकतात. ती कमी पडणार नाहीत. फक्त त्यातून वाचायलाच हवीत, अशी चमकदार पानं तयार व्हायला हवीत. त्या दृष्टीने नाटक सिनेमांचं होतं, तसं ब्लॉग्जचं परीक्षण किंवा त्यांना एक ते पाचच्या श्रेणीत बसवणं अशी व्यवस्था नाही. वृत्तपत्रं सिनेमांना एक ते पाच स्टार्स देऊन परीक्षणं करत असतात. कारण ती पठडी आता पक्की झाली आहे. ब्लॉग्जनाही तसा न्याय लावावा, एवढय़ा दर्जाचे ते नसावेत, असं वृत्तपत्रांना कदाचित आज वाटत असावं. त्यासाठी एकूण मराठी ब्लॉग्जची संख्या आज वाढायला हवी. मराठी नाटकांचा जोमाने प्रसार होण्यामागे वृत्तपत्रांनी त्यांना देऊ केलेले सवलतीचे जाहिरातदर हे देखील एक कारण होते. मराठी ब्लॉग्जसाठीदेखील तशा प्रकारच्या ‘दे धक्क्या’ची गरज आज आहे.
आज अनेक मराठी पत्रकारांचे स्वतचे ब्लॉग्ज आहेत. पण इंग्रजीत ज्या नियमितपणाने ब्लॉग्ज चालतात, तेवढा नियमितपणा आणि सातत्य आपल्यात दिसत नाही. त्याचं एक कारण अजून ब्लॉग या प्रकाराला मराठीत जे ग्लॅमर प्राप्त व्हायला हवं, तेवढं मिळालेलं नाही. ब्लॉग हा प्रकार आपणदेखील जेवढा गांभीर्यानं घ्यायला हवा, तेवढा घेतलेला नाहीय. आपल्या हातातला मोबाइल फोन आपण आज गांभीर्यानं घेतला आहे, कारण आपल्याला त्याचा उपयोग नीट कळला आहे. आपल्या हातातला किंवा लेखणीतला ब्लॉग आपल्याला त्या दृष्टीने अजून नीट कळायचा आहे. ही बाब ब्लॉग्जना (अगदी पत्रकारांच्या गंभीर ब्लॉग्जनाही) ज्या प्रकारच्या सवंग कॉमेंटस् येतात, ते पाहिलं की ते जाणवतं. ब्लॉग्जवरील कॉमेंटस्चा दर्जा वाढण्यासाठी उत्कृष्ट कॉमेंटस्चाही गौरव व्हायला हवा. जर ब्लॉग्जची स्पर्धा आयोजित केली जात असेल तर त्यात एक पुरस्कार उत्कृष्ट कॉमेंटलाही देण्यात आला पाहिजे. ब्लॉग ही गांभीर्याने घेण्याचीच गोष्ट आहे. भले तो ब्लॉग विनोदासाठी वाहिलेला का असेना! उदाहरण देऊनच सांगायचं तर राजकीय पक्षाचं खुलं अधिवेशन, विधानसभा किंवा लोकसभा यांच्यात जो फरक आहे वा असावा, तो ब्लॉग आणि आपल्या नेहमीच्या ऑनलाइन भंकस यामध्ये रहायला हवा. तसं झालं नाही तर ब्लॉग हा प्रकार वेगळा असण्याची गरज राहणार नाही. फेसबुक वा तत्सम माध्यम ती गरज भागवू शकेल. आगामी २०१२ आणि २०१३ ही वर्षे टॅबची, आयपॅडची किंवा गॅलक्सी वगरेंची आहेत. त्यावर ब्लॉग्जना आपले स्वतचे स्वयंभू स्थान असणार आहे. मात्र त्यात चमक व दर्जा नसेल, आणि नुसतीच भंकस चालणार असेल तर कोणीही त्यासाठी वेळ देणार नाही, हेही तेवढच खरं.
काही वैशिष्टय़पूर्ण ब्लॉग्ज
ब्लॉग सजवणं, तो रंगबिरंगी, हलता-डुलता करणं हे आज फार सोपं झालं आहे. शाळेत मुलाच्या हातात सुशोभित पाटी किंवा वही द्यावी, अशा ब्लॉगच्या देखण्या टेम्पलेटस् शेकडय़ाच्या संख्येने समोर हात जोडून मोफत डाऊनलोडसाठी उभ्या आहेत. लहान-लहान मुले त्यांचा उपयोग करताना दिसतात. प्रश्न ब्लॉग कसा दिसतो हा नाहीच, तर त्यात काय आहे, हा आहे. सगळीकडे ‘कंटेंट विल बी दि किंग’ असं म्हटलं जातं. मराठी ब्लॉग आज चाकोरीबाहेरच्या कंटेटसाठी आसुसलाय. चाकोरीबाहेरचे ब्लॉग आले की, ते वाचण्यासाठी वाचक हजारोंच्या संख्येने या महाराष्ट्रातल्या जिल्ह्या-जिल्ह्यांत वाट पाहत आहेत. जोडीला वादळी प्रचारासाठी फेसबुक आणि ट्विटरसारखी अवजारे आहेत. लक्षात हे घ्यायला हवं की, फेसबुक हे कॉलेजच्या कॅन्टिनसारखे, तर ब्लॉगोस्फिअर हे सभागृहात उत्साहानं चाललेल्या चर्चासत्रासारखं आहे. दोन्हींची आपली दालनं वेगळी आहेत. ती एकमेकांना उपकारक ठरत राहतील आणि आपापलं वेगळंपणही जपत राहतील. अमेरिकेत आज ब्लॉगवर लिहून उपजिविका करणारे, पगारापेक्षा अधिक रक्कम त्यातून नियमित मिळवणारे आहेत. ते भाग्य मराठी ब्लॉग लिहिणारांच्या वाटय़ाला कधी येईल का, या प्रश्नाचं उत्तर अनेक संबंधित घटकांच्या एकत्रित परिणामात लपलेलं आहे. प्रत्येकाच्या हातात क्षणाक्षणाला मोबाइलचा कॅमेरा आहे. त्यात पकडलेल्या छायाचित्राचे किंवा चलत्चित्राचे क्षण तिथल्या तिथे मोबाइलमधूनच ब्लॉगवर प्रकाशित होऊ शकतात. घडल्या क्षणापासून काही सेकंदात ते चित्र जगाला दिसू शकतं. ‘सिटीझन जर्नालिझम’चं फार मोठं बीज नजिकच्या काळात मराठी ब्लॉग्जमध्ये रूजू शकतं. ‘सिटीझन जर्नालिझम’ या शक्तीचा अंदाज आपल्याला अजून यायचा आहे. ब्लॉग हे त्यासाठीचं जबरदस्त व्यासपीठ आहे.मराठीतले काही ब्लॉग्ज लक्ष वेधून घेणारे आहेत. ते सगळं वाचलं जाणं, वा प्रत्येकातली प्रत्येक पोस्ट वाचली जाणं, हे अशक्य कोटीतलं आहे. काही उत्तम ब्लॉग्ज नजरेतून सुटलेले असण्याची दाट शक्यता आहे. माझ्या वाचनात आलेल्या ब्लॉग्जपकी काहींनी विशेष लक्ष वेधून घेतलं. त्यातले काही ब्लॉग्ज असे :
१) गणेश मतकरी यांचा http://apalacinemascope.blogspot.com
२) परेश प्रभू यांचा http://pareshprabhu.blogspot.com
३) नितीन पोतदार यांचा http://www.myniti.com
४)http://sujaanpalaktva.blogspot.com
५)http://chakali.blogspot.com
६)http://sahajach.wordpress.com
७)http://restiscrime.blogspot.com
८)http://mazisahyabhramanti.blogspot.com
९)http://dhondopant.blogspot.com
१०)http://aadityawrites.blogspot.com
११)http://www.2know.in
१२)http://chehare.blogspot.com
१३)http://sahajsuchalamhanun.blogspot.com
१४)http://kayvatelte.com
१५) http://vinayak-pandit.blogspot.com
पारंपरिक ज्ञानकोशापेक्षा अधिक क्षमतेचं माध्यम
ब्लॉग हा एकटय़ाला लिहिता येतो, दोघांना लिहिता येतो आणि अनेकांना मिळूनही लिहिता येतो. एकाचवेळी जगातल्या चार कोपऱ्यात हजारो मल दूर असताना ब्लॉगच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात राहून ब्लॉग लिहिला जाऊ शकतो. जगातील कोणालाही कुठेही आणि केव्हाही तो वाचता येतो. एका ब्लॉगमधील किंवा एकाचवेळी लाखो ब्लॉग्जमधील विशिष्ट विषयाचे संदर्भ क्षणार्धात गुगल (क्रियापद) करून शोधता येतात. व्यक्तीबरोबर संस्था आणि सरकारी ब्लॉग्जही असतात. चित्रपट, ध्वनिप्रसारण, छायाचित्रे आणि त्याला तात्काळ परस्परसंपर्काच्या (इंटेरॅक्टिव्हिटी) क्षमतेची जोड या वैशिष्टय़ांमुळे ब्लॉग हे माध्यम ज्ञानप्रसारणाच्या क्षमतेत पारंपारिक ज्ञानकोशाला मागे टाकू शकतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अगदी सामान्यातल्या सामान्य माणसाच्या आवाक्यातलं हे माध्यम आहे. स्वतंत्र संकेतस्थळ आणि ब्लॉग यांच्यातला फरक स्वतंत्र बंगला आणि टू बेडरूम किचन फ्लॅट असा आहे. ब्लॉगच्या माध्यमात देवकीला झालेल्या आठव्या पुत्राची ताकद आहे. फक्त हे बाळ आज रांगतं आहे. किशोरवयात एखाद्या कालियाचं मर्दन त्याने केलं की, ते लक्ष वेधून घेईल. या जगाच्या तोंडून गीता वदवण्याची कुवतही त्याच्यात उद्या असेल. हे आपण आजच ओळखलेलं बरं..(लोकसत्ता - लोकरंग पुरवणी दिनांक 27 फेब्रुवारी 2011)
लोकसत्ता लिंकः
http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=138966:-blog---&catid=104:2009-08-05-07-53-42&Itemid=117#JOSC_TOP
२५ फेब्रु, २०११
माधव शिरवळकर यांची ध्वनीमुद्रित मुलाखत (पॉडकास्टींग)
महाराष्ट्र मंडळ, लॉस अँजेलिस, अमेरिका, यांनी घेतलेली मुलाखत खालील दुव्यावर ऐकता येईल. सदर मुलाखत ही पॉडकास्टींग प्रकारची म्हणजे ध्वनीमुद्रित आहे.
http://www.mmla.org/mmla/June2010
http://www.mmla.org/mmla/June2010
संगणक जगत वरील अभिप्राय -1
आजही हा अभिप्राय खालील दुव्यावर उपलब्ध आहेः
http://marathi.webdunia.com/newsworld/currentaffairs/blogscorner/0709/28/1070928004_1.htm

अथांग 'संगणक जगत'
- अभिनय कुलकर्णी
माधव शिरवळकर हे नाव मराठी वाचकाला विशेषतः तंत्रज्ञानविषयक वाचकाला नवे नाही. गेल्या अनेक वर्षांपासून विविध वर्तमानपत्रात त्यांचे लिखाण येते आहे. लोकसत्तात गाजलेल्या संगणक जगत या सदराचे लेखक ते हेच. याशिवाय समग्र राम गणेश गडकरी हे मराठीतील पहिले ई- बुकही त्यांनी प्रकाशित केले. त्यानंतर केशवसुत, लक्ष्मीबाई टिळकांचे आत्मचरित्र स्मृतिचित्रे यासह सुमारे पन्नास मराठी, इंग्रजी ई बुक्सची निर्मिती केली आहे.
तर अशा या शिरवळकरांचा ब्लॉग म्हणजे संगणकावर काम करणार्यांचा मार्गदर्शक आणि जालावर भटकंती करणार्यांसाठीचा पथदर्शक आहे. हे मार्गदर्शक आणि पथदर्शक वगैरे जड शब्द का वापरले असा प्रश्न तुम्हाला कदाचित पडला असेल. पण या ब्लॉगला तुम्ही भेट दिली तर याचा अनुभव तुम्हालाही आल्याशिवाय रहाणार नाही. हा ब्लॉग म्हणजे संगणकाविषयीचा एनसायक्लोपिडीया किंवा आन्सर.कॉम आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
संगणकविषयक कोणताही प्रश्न तुम्हाला पडलेला असो या ब्लॉगद्वारे शिरवळकरांना तो विचारल्यास तुम्हाला त्याचे उत्तर मिळेल. Tiff, JPG, GIF यांचा लॉंगफॉर्म म्हणजे काय पासून ते Blue Ray Disk म्हणजे नेमकं काय किंवा तुमच्या संगणकात येणारा प्रॉब्लेम असो किंवा एखाद्या संगणकीय जगतातील संज्ञेविषयी तुमच्या मनात दाटलेलं कुतूहल असो,अशा कोणत्याही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला येथे मिळू शकतात. या प्रश्नांची उत्तरे देऊनच शिरवळकर थांबत नाही तर उत्तरासंदर्भात अधिक माहिती देणार्या संकेतस्थळांचा दुवाही ते देतात. त्यामुळे तेथे जाऊनही आपल्याला ती माहिती मिळू शकते. शिवाय आगामी काळासाठी आपल्याकडे अशा संकेतस्थळांची बॅंकही तयार होते. माहिती शेअर करण्याचा हा त्यांचा दृष्टिकोन अतिशय चांगला आहे.
शिरवळकरांच्या ब्लॉगचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते जालावरचे अस्सल भटके आहेत. त्यांच्या या भटकंतीत त्यांना अनेक माहितीपूर्ण संकेतस्थळं सापडतात. आठवड्याची सात संकेतस्थळं म्हणून ते त्याची संक्षिप्त माहिती देतात. ते शिफारस करतात त्या संकेतस्थळांचे विषयही वैविध्यपूर्ण असतात. त्यामुळे आपल्या माहितीच्या कक्षाही चांगल्याच रूंदावरतात. उदाहरणेच सांगायची झाली तर व्होडका कसा बनवावा, त्याचा इतिहास, सॅंडविच शब्द कसा आला, त्याचा इतिहासा, वृत्तपत्रांचा इतिहास दर्शविणारी साईट,मोफत छायाचित्रे डाऊनलोड करण्याची सुविधा कुठे आहे, रूग्ण व त्याच्या नातेवाईकांना विविध चाचण्यांबद्दल माहिती कुठून मिळेल अशा अक्षरशः शेकडो संकेतस्थळांविषयीची माहिती त्यांनी दिली आहे. माहितीचा हा पूर उर धपापून टाकणारा आहे.
याशिवाय कुठे काय आहे आणि कुणासाठी ते उपयुक्त आहे याची शिफारसही ते करतात. त्यामुळे आपल्या आवडीच्या विषयांसंदर्भात किंवा आपल्याशी संबंधित विषयाचे संकेतस्थळ पाहता येते. त्याचे दुवेही ते देतात. अनेक संकेतस्थळांवर मोफत सॉफ्टवेअर असतात. त्याविषयीही ते माहिती पुरवतात. किंवा एखादी फॉंट पुरविणार्या संकेतस्थळाचीही ते शिफारस करतात. थोडक्यात जालावर भटकंती करताना कवडीही न खर्चता मोफत अनेक बाबी मिळतात तेही या ब्लॉगवर गेल्यानंतर कळते.
शिरवळकरांच्या ब्लॉगचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते संगणकविषयक अनेक युक्त्या आणि क्लृप्त्या सांगतात. रोजचे काम करताना त्या अतिशय उपयुक्त ठरतात. उदाहरणार्थ तुम्हाला ई मेलमधून मोठी फाईल पाठवायची आहे. पण सामान्यपणे ई मेलमधून फाईल पाठविण्याची क्षमता दहा एमबी असते. पण त्यापेक्षा मोठी फाईल पाठवायची तर काय करावे लागेल?शिरवळकरांच्या ब्लॉगवर त्याचे उत्तर आहे.
असा हा माहितीच्या कक्षा रूंदावणारा ब्लॉग. जालावर भटकंती करताना या ब्लॉगवर भेट दिल्यानंतर बाहेर पडताना नक्कीच समृद्ध झाल्याचा अनुभव येतो. त्यामुळे अस्सल नेटकर या ब्लॉगला टाळून पुढे जात नाहीत. मग शिरवळकरांना भेटताय ना?

२३ फेब्रु, २०११
' ऑनलाईन प्रेमा ' तुझा रंग कसा ?
कविवर्य मंगेश पाडगावकरांचे प्रेमाबद्दलचे काव्यबद्ध शब्द माहीत नाहीत असा मराठी रसिक सापडणं अवघड. ' प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सेम असतं ' ह्या शब्दांमध्ये पाडगावकरांनी विशुद्ध आणि प्रामाणिक प्रेम गृहित धरलं आहे. प्रेम हे इंटरनेटवरही सगळीकडे असंच ' सेम ' असतं असं गृहित धरून दिवस-रात्र माऊस पकडून बसलेली मुलं-मुली आपल्याला सायबर कॅफेत हमखास भेटतात. घरोघरी आलेल्या पीसीवर चिकटून असलेल्या तरूणाईचा माऊस कर्सर बहुधा ऑर्कुटसारख्या वेबसाईटवर बेभान होऊन भटकत असतो. ' ऑर्कुट ' सारख्या वेबसाईटवर किंवा इंटरनेटवर चॅट करता करता भेटलेला वा भेटलेली कुणीतरी साध्या टायपिंगयुक्त गप्पा मारता मारता एकाएकी आवडू लागते. ऑनलाईन गप्पा मारण्यासाठी ती पु्न्हा पुन्हा भेटावी असं कधी वाटू लागलं हे कळण्याच्या आत ऑनलाईन प्रेमाचा अंकुरही बरेचदा रूजू लागलेला असतो. ' भेट तुझी माझी स्मरते ' किंवा ' प्रथम तुज पाहता ' ह्या प्रकारातलं ते प्रेम नसतं. कारण समक्ष भेट कधी झालेलीच नसते आणि प्रथम सोडा, एकमेकांना त्यांनी प्रत्यक्ष कधी पाहिलेलंच नसतं. एकमेकांना पहावं असं जेव्हा फारच वाटू लागतं तेव्हा एकमेकांचे फोटो एकमेकांना ऑनलाईन पाठवले जातात, किंवा वेब कॅमेर्याच्या सहाय्याने एकमेकांचं दूरदर्शन त्यांनी इलेक्ट्रॉनिक चौकटीत स्वीकारलेलं असतं. ऑनलाईन प्रियकर आणि प्रेयसीचं प्रोफाईल हे साधारणतः इतपतच असतं.
प्रोफाईल ह्या शब्दात 'फाईल' आहे. संगणकाचं किंवा इंटरनेटचं जग हे इलेक्ट्रॉनिक फाईलच्या नियमाने चालत असतं. जोपर्यंत ही फाईल निर्मळ आहे तोपर्यंत समस्या नसते. संगणकाच्या आणि इंटरनेटच्या जगात आपली निर्मळ फाईल जपावी लागते. छुपे व्हायरस, वॉर्मस, स्पायवेअर, मालवेअर आणि आणखी कितीतरी प्रकारचे धोके असतात हे पावलोपावली ध्यानात घेणं क्रमप्राप्त असतं. जे फाईलचं तेच प्रोफाईलचं. जेव्हा दोन निर्मळ फाईल्सची किंवा प्रोफाईलची भेट होते तेव्हा समस्या येत नसते. पण जेव्हा दोनपैकी एक फाईल किंवा प्रोफाईल लबाडीने वा धोक्याने भरलेला असतो, तेव्हा त्यातून उद्भवणार्या समस्या जीवघेण्या असल्याचं आढळून येतं. ऑर्कुटवर प्रथम कुणीतरी कोणाचा फॅन होतो (किंवा होते) आणि नंतर तो फॅन ' फन अॅन्ड फ्रॉलिक ' करता करता ' फ्रेंड ' बनून त्याच्या वा तिच्या ऑनलाईन आयुष्याचा भाग बनून जातो. सायबर जगातला हा ' फन ' नावाचा शब्द मस्करीच्या अंगाने जात जात कुस्करीच्या परिणतीपर्यंत गेलेला अनेकदा दिसतो. ' ए मॅन, आय वॉज जस्ट कीडींग, आय वॉज नॉट सिरीयस ' असं म्हणून एखादा वा एखादी आपला मूळातच खोटा असलेला प्रोफाईल डिलीट करून मोकळा/ळी होऊन जाते. सायबर जगतात नाहीसं होण्यासाठी आपला गाव सोडून जावं लागत नाही. एकाच गावात एकाच संगणकावर राहून एकाच वेळी अनेक नावांनी, अनेक वयांनी, आणि एकाच वेळी स्त्री म्हणून व पुरूष म्हणूनही वावरता येतं. हे सारं ' फन ' म्हंटलं की झालं, इतकं सोपं असतं.
आजकाल ' ऑर्कुट 'ची चर्चा घराघरात आहे. ' ज्योत से ज्योत जगाते चलो ' एवढ्या सहजपणे भारतात ' ऑर्कुट ' पसरला आहे आणि आणखी पसरतो आहे. ' गुगल ' कंपनीची ही वेबसाईट. सोशल नेटवर्कींग साधणारी आणि जुने हरवलेले मित्र शोधून देणारी, किंवा नवे मित्र जोडण्यासाठी आवश्यक असलेला ऑनलाईन नुक्कड तयार देणारी 'ऑर्कुट ' ही वेबसाईट खरं तर एक वरदान आहे. कधीतरी शाळेत किंवा कॉलेजात असताना रोज भेटणार्या मित्र-मैत्रिणींना 'ऑर्कुट ' च्या माध्यमातून शोधणं सोपं आणि आनंददायकही असतं. एका वेगळ्या जिव्हाळ्याचा अंकूर त्या माध्यमातून रूजू शकतो हे अगदी खरं आहे. आपला एक मित्र लांब कुठेतरी गेलेला असतो. बरेचदा लांब म्हणजे तो साता समुद्रापार परदेशातही गेलेला वा स्थिरावलेला असतो. तिथे त्याचे नवे मित्र बनलेले असतात. तिथले त्याचे म्हणजे आपल्या मित्राचे मित्र ऑर्कुटच्या कट्ट्यावर आपलेही मित्र बनू लागलेले असतात. मित्रमंडळाचं असं सामाजिक मधाचं पोळं बनण्याची ही प्रक्रिया सर्वच अंगांनी तशी पोषकच आहे. पण समाज म्हंटलं की त्यात नकारात्मक तत्वंही आलीच. संगणक आला ही बाब सकारात्मक होती. पण त्याला लगेचच आव्हान मिळालं ते व्हायरसचं. इंटरनेटची संपर्क व्यवस्था अनेक अंगांनी खूपच सकारात्मक. पण त्याला आव्हान आलं ते वॉर्मस, स्पायवेअर, हॅकर्स वगैरेंकडून. ह्याच धर्तीवर सोशल नेटवर्कींगच्या साईटसना २००८ मध्ये नकारात्मक तत्वांकडून विविध प्रकारची आव्हानं येतील असा अंदाज आणि चर्चा आज जगभर ऐकू येते आहे.
थोडं मागे जाऊन पाहिलं तर 2011 येऊ घातलेल्या ह्या नकारात्मक किंवा घातक अशा आव्हानांचं स्वरूप नीट लक्षात येईल. ' ऑर्कुट ' ला नुकतीच सात वर्ष पूर्ण झाली. पण भारतात इंटरनेट नांदू लागलं त्याला आता पंधरा वर्षे पूर्ण झाली आहेत. पूर्वी जगात 'ऑर्कुट ' नव्हतं. पण त्या काळातही काही ना काही घातक आव्हानं ही होतीच. ईमेल बरोबर येणाऱ्या फाईलला चिकटून येणारे व्हायरस हे त्या काळात मोठ्या प्रमाणावर आणि सर्रास होते. त्यांनी जगात धूमाकूळ घातला आणि अब्जावधींचे नुकसान केले. मग त्या संदर्भात जागरूकतेचा प्रचार होऊ लागला. अनोळखी ईमेल आली असेल आणि त्याला चिकटून एखादी अटॅच फाईल आली असेल तर ती स्कॅन करून घ्या. त्याशिवाय उघडू नका वगैरे सावधानतेचा सूर एवढा लागला की आता ते ईमेलला चिकटून येणारे व्हायरस कालबाह्य आहेत. व्हायरसचा एक प्रकार कालबाह्य झाला असला तरी जी प्रवृत्ती तसे व्हायरस तयार करत होती ती आजही कुठेना कुठे वावरतेच आहे. अनोळखी दिसणारी ईमेल तुम्ही उघडत नाही म्हंटल्यावर तुम्हाला ओळखीची अशी ईमेल तयार करण्याचा प्रयत्न ही प्रवृत्ती करणारच. तुमचे मित्र कोण, ते काय बोलतात, तुमचं त्यांचं नुकतच काय बोलणं झालं आहे हे कळण्यासाठी 'ऑर्कुट ' इतका चांगला माहितीचा स्त्रोत दुसरा कोणता असणार? आपण एक उदाहरण घेऊ. समजा पिंकी आणि अॅश ह्या ऑर्कुटवरच्या दोन मैत्रिणींच्या स्क्रॅपच्या माध्यमातून चाललेल्या ह्या गप्पा पहा ः
" अगं मी आज मामाकडे पुण्याला आलेय. इथे जाम थंडी आहे." - इति पिंकी.
" आयला (चालतं ऑर्कुटवर), स्वेटर नेलास की नाही ? कुठे राहतो तुझा मामा पुण्यात ?" - अॅशची चौकशी.
"अगं, तो डेक्कन जिमखान्यावर ती एक्स-वाय-झेड सोसायटी आहे नं तिथे राहतो. मस्त आहे ती सोसायटी"
"अगं बरी आठवण झाली. तुला पुण्यात ती म्युझिक सीडी मिळाली तर ट्राय कर नं. प्लीज"
"ओके, बघते, ट्राय करते, बसं?"
एवढा संवाद झाल्यावर दोन तासांनी पिंकीची एक ईमेल अॅशला मिळाली. त्याचा विषय होता Got your Music Cd.
हा विषय अॅशला माहीत असल्याने तिने ती ईमेल पिंकीचीच आहे असं समजून वाचायला घेतली. त्यात लिहीलं होतं की " त्या म्युझिक सीडीचे सगळे डिटेल्स अॅटॅच्ड फाईलमध्ये आहेत. ते बघ, आणि मला रिप्लाय कर. "
एवढा मजकूर पाहिल्यावर ती ईमेल पिंकीची नसेल असं वाटण्याचं काही कारणच नाही. अॅशने ती अॅटॅच्ड फाईल उघडली आणि नंतर एका व्हायरसने हैदोस घातला. अॅश बिथरली. पिंकीने व्हायरस कसा पाठवला. तोही एवढा डेडली!
सत्य परिस्थिती अशी होती की ती ईमेल मूळात पिंकीने पाठवलीच नव्हती. कुणीतरी पिंकी आणि अॅशचं 'ऑर्कुट' वरचं संभाषण पाहिलं होतं, आणि त्याचा संदर्भ देऊन अॅशला तो व्हायरस खोडसाळपणाने पाठवला होता. खरं तर पिंकी आणि अॅशचं संभाषण तसं अगदी साधच होतं. पण त्याचा कसा वापर केला जाऊ शकतो हे वर आलेल्या उदाहरणावरून आपल्या लक्षात आलं.
चार वर्षांपूर्वी ऑर्कुट नव्हतं, पण तेव्हा ICQ ( I seek you) नावाचा चॅट प्रोग्राम चांगला बहरला होता. तिथेही जुने मित्र भेटत होते, नवे मित्र मैत्रिणी होत होत्या, प्रेमाच्या आणाभाकाही घेतल्या जात होत्या, फोटोही पाठवले जात होते. सगळं जवळजवळ ऑर्कुटसारखंच होतं. त्या प्रेमामध्येही अनेकजण फसल्याची उदाहरणे होती. ICQ बरोबर इतरही चॅट प्रोग्राम्स होते. ईमेलची देवाणघेवाण होता होताही प्रीतीचे अंकूर फुटत होते. ते ' फुटणं ' दोन्ही प्रकारचं होतं. रूजणं ह्या अर्थीही होतं आणि फुटणं ह्या अर्थीही होतं. थोडक्यात, ज्याला पाहिलं नाही, ज्याच्या खरे-खोटेपणाची खात्री नाही त्याच्यात गूंतलात तर त्यातून फक्त गुंताच होणार हा धोका नीट लक्षात घ्या. हा मुद्दा लक्षात यावा यासाठी खालील लिंक वर जाऊन पहा ः
http://answers.yahoo.com/question/index?qid=20071129115049AACjiNo
ह्या पानावर ऑर्कुटवर फसलेल्या एका मुलीने विचारलं आहे -
I was duped by an unknown person in Orkut, whose photo was someone else. I need justice. what should be done? This person promised to marry me.where as the person is already married. I have spent lots of money.Please suggest what should be done.
कुणा तिसर्याच माणसाचा फोटो दाखवून त्या मुलीला लग्नाचं वचन देण्यात आलं होतं. प्रत्यक्षात तो माणूस दुसराच होता, आणि विवाहितही होता. पण दरम्यानच्या काळात त्या मुलीने त्या माणसावर भरपूर पैसा खर्च केला होता. हा पैसा अर्थातच तिने भेटवस्तू पाठवणे वगैरे मार्गाने खर्च केला असणार हे उघड आहे. पुरती फसल्यानंतर आता ह्या मुलीला काय करायचं हा प्रश्न पडला आहे. हे घडू नये यासाठी काही दक्षता पाळण्याची गरज आहे. उदाहरणार्थ, आपला स्वतःचा आणि दुसर्या कुणाचाही मोबाईल नंबर वा फोन नंबर ऑर्कुटवर गप्पा मारताना स्क्रॅपवर देऊ नका. कामाशी संबंधित गप्पा स्क्रॅपच्या माध्यमातून मारू नका. मित्रांची संख्या वाढवण्याच्या मोहात कोणालाही मित्र म्हणून मान्यता देऊन टाकू नका. विशेषतः मुलींनी आपले फोटो देणं टाळलेलच बरं. फोटो गॅलरीतही आपले वा इतरांचे फोटो देताना ते शक्यतो क्लोजअप न देता लाँग शॉटचे देणंच अधिक बरं. ऑर्कुट काय किंवा तत्सम अन्य साईट काय, त्याचे व्यसन लागणार नाही, बेभान होऊन तास न तास त्यामागे जाणार नाहीत याची काळजी सर्वांनीच आवर्जुन घ्यावी. इंटरनेटवर भेटणारं प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेमच असेल, आणि त्याचं आणि तुमचं सेमच असेल याची कसलीच खात्री कुणीच देऊ शकत नाही. त्यामुळे व्हॅलेंटाईन डे चा संदेश हाच की ऑनलाईन प्रेमा, तुझा रंग कसा असेल हे परमेश्वरही सांगू शकणार नाही. थोडं सबुरीनेच घेतलेलं बरं. …

२२ फेब्रु, २०११
संगणक डॉट इन्फो संबंधी प्रश्नोत्तरे, अर्थात FAQ.
ह्या ब्लॉगसाठी वापरलेला टाईप अतिशय बारीक वाटतो. त्यामुळे वाचताना त्रास होतो. तो थोडा मोठा का करीत नाही?
- ब्लॉगचे डिझाईन समतोल करण्याच्या दृष्टीने तज्ज्ञांच्या सल्ल्याने घेतलेला हा टाईप आहे. काहींना, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना स्क्रीनवर वाचताना तो छोटा वाटणं हे अगदी स्वाभाविक आहे. मात्र एक युक्ती वापरल्यास आपल्याला हा टाईप मोठा करून स्क्रीनवर वाचता येईल. युक्ती फारच सोपी आहे. आपण आपल्या कीबोर्डवरील Control म्हणजेच Ctrl हे बटण दाबून ठेवून अगदी उजवीकडील + (अधिक चिन्हाचे बटण) दाबा. आपल्या स्क्रीनवरील अक्षराचा आकार क्षणार्धात मोठा झालेला दिसेल. त्याही पेक्षा मोठी अक्षरे हवी असतील तर पुन्हा तेच करा, म्हणजे Ctrl दाबून ठेवून + हे बटण दाबा. अक्षरे आणखी मोठी होतील.
वाचून झाल्यानंतर अक्षरे पूर्वीसारखी करण्यासाठी Ctrl बटण दाबून ठेवून अगदी उजवीकडील - हे (वजाबाकी चिन्हाचे) बटण दाबा. अक्षरांचा आकार कमी झालेला दिसेल.
मी पूर्वी sanganaktoday.blogspot.com हा आपला जुना ब्लॉग वाचत असे. तो नंतर फक्त निमंत्रितांसाठी खुला होता. त्यावरील मजकूर ह्या ब्लॉगवर आहे काय?
- जुन्या ब्लॉगवरील सर्व मजकूर (सर्व पोस्टस) आता ह्या ब्लॉगवर उपलब्ध करण्यांत आल्या आहेत. हा ब्लॉग आता सर्वांना खुला राहणार आहे.
पूर्वीच्या ब्लॉगवर प्रश्न विचारण्याची सोय होती. ह्या ब्लॉगवर प्रश्न विचारता येतील काय?
- हो, आपले प्रश्न आपण sanganakinfo@gmail.com व mshirvalkar@gmail.com वर पाठवू शकता.
आपले लेख विविध वृत्तपत्रांमध्ये येत असतात. ते लेख ह्या ब्लॉगवर वाचण्यासाठी उपलब्ध होतील काय?
- होय. ते लेख किंवा त्या लेखांची त्या त्या वृत्तपत्राच्या संकेतस्थळावरील लिंक ह्या ब्लॉगवर उपलब्ध करण्यांत येणार आहे.
आपल्याशी संपर्क साधावयाचा असल्यास कुठे साधावा?
- mshirvalkar@gmail.com ह्या पत्त्यावर ईमेल करून संपर्क साधता येईल.
धन्यवाद.

२१ फेब्रु, २०११
ड्व्होरॅक (Dvorak) कीबोर्ड
माणूस परंपरेने चालत असतो असं म्हणतात. काँप्युटरचा कीबोर्ड हे एका परंपरेचच प्रतीक आहे. कीबोर्डची ही परंपरा चालत आली आहे १८७२ सालापासून. म्हणजे कीबोर्डच्या परंपरेला आता १३३ वर्षे झाली. संगणकाचा जो कीबोर्ड आज आपण वापरतो त्याला QWERTY कीबोर्ड असं म्हंटलं जातं. कीबोर्डवर अक्षरांची जी सर्वांत वरची बटणं असतात त्यात QWERTY ही ओळीने पहिली सहा अक्षरं. कीबोर्डवरील अक्षरांची ही रचना आणि पहिला टाईपरायटर तयार केला ख्रिस्तोफर शोल्स ह्या अमेरिकन माणसाने. १८७२ साली शोल्सने त्याचे पेटंट रेमिंग्टन ह्या टाईपरायटर कंपनीला १२००० डॉलर्सना र्विकून टाकले. तेव्हापासून शोल्सने तयार केलेली QWERTY कीबोर्डवरील अक्षरांची रचना काहीही बदल न होता जशीच्या तशी चालत आली आहे. काँप्युटरच्या कीबोर्डनेही शोल्सची ही रचना स्वीकारली आणि ती आता जगभर चालू आहे.
ख्रिस्तोफर शोल्स हा मूळचा एक पत्रकार. १८४५ साली तो 'साऊथपोर्ट टेलिग्राफ' नावाच्या एका छोट्या वृत्तपत्राचा संपादक होता. शोल्स पत्रकार असला तरी त्याच्या पिंडात एक संशोधक भिणलेला होता. तंत्रज्ञानविषयक त्याचे काही ना काही उद्योग सतत चाललेले असतं. कागदावर पान क्रमांक छापण्याचे जे छोटे यंत्र होते त्या यंत्राच्या आधारावर क्रमांकांच्या जागी अक्षरे टाकून त्याने एक मिनी टाईपरायटर तयार केला होता. आपल्या ह्या संशोधनाचं पेटंटही शोल्सने १८६४ साली नोंदवलेलं होतं. टाईपरायटरच्या ह्या टप्प्यापर्यंत QWERTY अक्षररचना शोल्सच्या स्वप्नातही नव्हती. पुढे १८६८ साली त्याने टाईपरायटरचं आणखी एक यंत्र तयार केलं आणि त्याचं पेटंटही आपल्या नावावर नोंदवलं. ह्याच दरम्यान कधीतरी QWERTY अक्षररचना तयार झाली.
खरं तर शोल्सने टाईपरायटरचा जो पहिला प्रयत्न केला होता त्यातली अक्षररचना ABCDEFG अशी क्रमाने म्हणजे अकारविल्हेच होती. ह्या पद्धतीने असलेल्या टाईपरायटरमधील अक्षरांचे दांडे टाईप करताना एकमेकात अडकत असतं. हे दांडे एकमेकात अडकले की टायपिस्टचं काम थांबत असे. टायपिस्टला ते अडकलेले दांडे हाताने सोडवावे लागत आणि मग पुन्हा टायपिंग सुरू करावे लागे. ह्या दोषावर मात करण्याचा प्रयत्न शोल्स आणि त्याचा व्यवसायातला भागीदार जेम्स डेन्समोर हे दोघे करीत होते. टायपिंग करताना नेमक्या कोणत्या अक्षरांच्या दांड्या वारंवार अडकतात याचे निरीक्षण डेन्समोरने केले. त्या निरीक्षणातून वारंवार अडकणार्या अक्षरांच्या दांड्यांच्या जागा त्यांनी बदलून पाहिल्या. अशा प्रकारे जागा बदलल्याने मूळची ABCDEFG अशी जी अकारविल्हे अक्षररचना मूळ कीबोर्डवर होती ती बदलली गेली. पण अक्षरांच्या दांड्या अडकण्याचे प्रमाण खूपच कमी झाले. अक्षरांच्या जागा बदलण्याच्या ह्या खटाटोपातूनच QWERTY ह्या अक्षररचनेचा आज वापरात असलेला कीबोर्ड तयार झाला. पुढे रेमिंग्टन टाईपरायटर कंपनीने आपला टाईपरायटर बाजारात आणला तो ह्याच अक्षररचनेला कायम स्वीकारून. पुढे टायपिस्टसच्या कितीतरी पिढ्या हाच कीबोर्ड शिकून आपला टायपिंग स्पीड वाढवत राहिल्या. इतर टाईपरायटर कंपन्यांनीही हीच अक्षररचना कायम ठेवून आपले टाईपरायटर बाजारात आणले.
शोल्सचा हा जो जगभर वापरला जाणारा कीबोर्ड (म्हणजे QWERTY ही अक्षररचना) आहे त्यामागे केवळ टाईपरायटरच्या अक्षरांच्या दांड्या एकमेकात अडकू नयेत इतकाच विचार आहे. आज आपण आपल्या काँप्युटरचा कीबोर्ड वापरतो त्यातही तीच अक्षररचना आली आहे ती केवळ परंपरेतून. ही परंपरा तोडण्याचा अंशतः यशस्वी प्रयत्न केला तो डॉ. ऑगस्ट ड्व्होरॅक ह्या शिक्षणतज्ज्ञाने. ड्व्होरॅक ह्या नावाचा उच्चार करताना सुरूवातीस ड चा अगदी पुसटसा उच्चार केला जातो. तो पुसटसा उच्चार ऐकू न आल्यास डॉ. ऑगस्ट व्होरॅक असेच नाव कानी पडेल. डॉ. ड्व्होरॅक हे वॉशिंग्टन विद्यापीठात सिअॅटल येथे शिक्षणशास्त्र आणि मानसशास्त्राचे प्राध्यापक होते. टायपिस्ट जेव्हा टायपिंग करीत असतो तेव्हा त्याचे काम तणावाचे न होता आरामदायी (Ergonomic) व्हावे आणि टायपिस्टची उत्पादकता वाढावी असा प्रयत्न डॉ. ड्व्होरॅक करीत होते. त्यांनी माणसाच्या बोटांचा शारिरीक व हालचालींच्या दृष्टीकोनातून बारकाईने अभ्यास केला. डॉ. ड्व्होरॅक यांचे हे संशोधन चालू होते १९३० च्या आसपास. १९३२ साली ते पुर्णत्वाला जाऊन त्यांचा नवा कोबोर्ड तयार झाला. १९३६ साली त्यांचे पेटंट अमेरिकन सरकारने नोंदवले. तो काळ दुसर्या महायुद्धाचा होता. महायुद्धाच्या समस्येपुढे डॉ. ड्व्होरॅक यांचे हे नवे संशोधन मागेच राहिले. १९७५ साली डॉ. ड्व्होरॅक यांचे निधन झाले. त्यानंतर सात वर्षांनी म्हणजे १९८२ साली त्यांच्या ह्या कीबोर्डला रितसर मान्यता मिळाली. पुढे आयबीएम कंपनीने आपल्या काँप्युटर कीबोर्डसाठी ड्व्होरॅक कीबोर्डचा पर्यायही उपलब्ध केला. १९८४ साली ड्व्होरॅक कीबोर्ड वापरणारे १००००० टायपिस्ट अमेरिकेत होते. १९९५ ची मायक्रोसॉफ्ट विंडोज ९५ आली तेव्हा त्याबरोबर नेहमीच्या QWERTY कीबोर्डबरोबर डव्होरॅक कीबोर्ड देखील उपलब्ध करण्यांत आला. आजही तुमच्या आमच्या संगणकावर तुम्ही ड्व्होरॅक कीबोर्ड वापरू शकता. एक गंमत म्हणून तो वापरून पहायला काहीच हरकत नाही.
तुम्ही जर Windows 98, Windows XP किंवा Windows Vista वापरत असाल तर तुमच्या संगणकावरचा तोच कीबोर्ड कायम ठेवून तुम्हाला ड्व्होरॅक कीबोर्ड (सॉफ्टवेअरच्या सहाय्याने) पद्धतीने टाईप करता येईल. त्यासाठी Help मध्ये जाऊन Dvorak हा एकच शब्द टाईप करून माहिती शोधा. तुम्हाला आवश्यक ती सर्व माहिती Windows Help मध्ये मिळेल. ड्व्होरॅक कीबोर्डचं वैशिष्ट्य म्हणजे त्यात तुम्हाला एका हाताने टाईप करण्याची सोय आहे. आपला नेहमीचा QWERTY हा कीबोर्ड दोन्ही हातांनी टाईप करावा लागतो. पण खूपदा एखादा हात प्लास्टरमध्ये असेल किंवा काही दुखणे असेल तर एका हाताने (डाव्या आणि उजव्या कोणत्याही) टाईप करण्याची सोय ड्व्होरॅक कीबोर्डमध्ये आहे. अर्थात ज्यांना दोन्ही हातांनी टायपिंग करायचे असेल तर तीही सोय अर्थातच ड्व्होरॅक मध्ये आहे.
आता कोणी म्हणेल की हे काहीतरी काँप्युटर सॉफ्टवेअरवाल्यांचे नवे फॅड आहे. तर मंडळी तसं नाही. ड्व्होरॅक कीबोर्ड हा गीनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस मध्येही गेला आहे. २००५ मध्ये बार्बारा ब्लॅकबर्न ह्या महिलेने ड्व्होरॅक कीबोर्ड वापरून दर मिनिटाला २१२ शब्द ह्या वेगाने टायपिंग करून दाखवले. तिचा हा टायपिंग वेग गीनेस बुकवाल्यांनी जगातील सर्वांत फास्ट टायपिंगचा विक्रम म्हणून नोंदवलेला आहे. ह्या कीबोर्डची माहिती विंडोजच्या हेल्पव्यतिरिक्त इंटरनेटवर सर्वत्र उपलब्ध आहे. http://www.gigliwood.com/abcd/ ह्या साईटवर तर A basic course in Dvorak (त्याला ABCD असं छान नाव दिलं आहे) हा कीबोर्ड शिकण्याचा एक कोर्सच उपलब्ध आहे. http://www.mwbrooks.com/dvorak/di.html ही साईट एका सेवाभावी संस्थेची म्हणजे Dvorak International यांची आहे. ही संस्था ह्या कीबोर्डचा प्रचार जगभरात सर्वत्र व्हावा यासाठी प्रयत्नशील आहे. तुमच्या संगणकावर ड्व्होरॅक कीबोर्ड कसा लावायचा याची माहिती http://www.dvorak-keyboard.com/convert.html ह्या साईटवर उपलब्ध आहे.
जे हा कीबोर्ड वापरतात त्यापैकी अनेकांचं म्हणणं असं आहे की हा कीबोर्ड वापरून तुमचा टायपिंग स्पीड ७० ते १०० टक्केपर्यंत वाढू शकतो. हे म्हणणं खरं असेल तर मग आजपर्यंत ह्या कीबोर्डचा प्रचार का झाला नाही? तो सगळीकडे मोठ्या प्रमाणावर का पसरला नाही? असे प्रश्न तुम्हा-आम्हाला पडणं स्वाभाविक आहे. ड्व्होरॅक कीबोर्डचे जे पाठिराखे आहेत ते त्यावर म्हणतात की परंपरा न सोडण्याची आपली वृत्ती त्याला कारणीभूत आहे. वेगळा मार्ग चोखाळण्याला धाडस लागतं. ते धाडस आपण करीत नाही. आपल्यासारखेच इतर बहुतेक जण असतात. त्यामुळे QWERTY कीबोर्ड पिढ्यान पिढ्या चालत राहिला. परंपरेच्या नाण्याची दुसरी बाजू म्हणजे चाकोरी. चाकोरीबाहेर जाऊन प्रयत्न करणारे कमी असतात. त्यामुळेच ड्व्होरॅक कीबोर्ड तितकासा रूढ झाला नाही. हे ड्व्होरॅकच्या पाठिराख्यांचं म्हणणं खरं की खोटं याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही. तुमचं त्यावरचं मत ठरविण्यापूर्वी मात्र तुम्ही तो वापरून पहायला हवा इतकच मला म्हणायचं आहे.
तुम्हाला वाटतं तितकं ते अवघडही नाही, आणि वेगळ्या दमड्या मोजायच्या नसल्याने खिशाला चाट पाडणाराही हा प्रकार नाही. काहीतरी नवं करून पाहण्याची आवड असणारांनी हा नवा कीबोर्ड अवश्य वापरून पहायला हवा असं मला वाटतं.

वेबचे संदर्भशास्त्र
ग्रंथालय आणि तेथील ग्रंथ व तत्सम सामग्री ह्या परंपरेने चालत आलेल्या संदर्भांच्या मुख्य खाणी.एखाद्या विषयाचा नव्याने अभ्यास सुरू केलेला कोवळा विद्यार्थी असो की संशोधनात गुंतलेला एखादा पीएच.डी. किंवा एम.फील. चा विद्वत्तेची झालर प्राप्त झालेला अध्यापक असो, संदर्भाच्या खाणीत गेल्याशिवाय विषयाला खोली आणि समृद्धी लाभणं अवघडच. संदर्भासाठी 'पावले चालती ग्रंथालयाची वाट' आणि 'बोटे चाळिती पुस्तकांची पानं' हे नेहमीचच. एरवी महाविद्यालय प्रशासनात व्यस्त झालेल्या प्राचार्यांचीही अध्यापन आणि संशोधनाशी असलेली नाळ कायम असते. मग संदर्भांसाठी केबिनमध्ये ग्रंथ मागवणं, किंवा काही वेळा चक्क केबिन सोडून ग्रंथालयात जाऊन बसणं ज्यांना चुकलं असे प्राचार्य असणं दुर्मिळच. संदर्भ हे पुस्तकाच्या किंवा माणसाच्या माध्यमातून उपलब्ध होणं ही विसाव्या शतकापर्यंतची परंपरा आज एकविसाव्या शतकातही तशीच, तेवढच महत्व असलेली दिसून येते. जेव्हा एखादा संदर्भ पुस्तकात सापडत नाही तेव्हा हमखास एखाद्या अनुभवी ज्ञानवंताला दुरध्वनी करायचा, किंवा अगदी भेटायला जाऊन त्यांचा सल्ला घ्यायचा हे नेहमीच घडतं. असं न घडता डॉक्टरेट पदरात पडलेला संशोधक सापडणार नाही. पुस्तक आणि माणसं ह्या संदर्भाच्या दोन आद्य स्त्रोतांमध्ये आता भर पडली आहे ती वेबची अर्थात इंटरनेटची. पुस्तकं ही साधी सरळ, गरीब स्वभावाची, गंभीर, काहीशी पोक्त आणि आज्ञाधारक विद्यार्थ्यांसारखी असतात. संदर्भ देऊन ती पळून जात नाहीत. किंवा, संदर्भ देताना थट्टामस्करी करून अवसानघात करत नाहीत. त्यांची ही अशी खात्री देता येत असल्याने पुस्तकांतल्या संदर्भांवर अवलंबून राहता येतं.
पण वेब उर्फ इंटरनेट नामक संदर्भस्त्रोत हा पुस्तकाच्या अगदी उलटा वाटतो. वेब म्हणजे खट्याळ स्वभावाचा, काहीतरी संदर्भ दिला आणि तो संदर्भासहित वेबसाईटच गायब झाली हा अनुभव अशक्य नसतो. चुकीचे संदर्भ छातीठोकपणे देऊन नंतर पुढे त्यात परस्पर दुरूस्ती अपलोड करून टाकणं हे पुस्तकांत घडणं अशक्य, पण वेबमध्ये सर्रास घडू शकतं. कुणातरी तिसर्याच्या नावे चौथ्याने काहीतरी संदर्भ सांगून टाकून वेबवर थरार निर्माण करून थट्टामस्करी करणार्या साईटस् आणि ब्लॉगची तर रेलचेलच असते. अशा ह्या वेबच्या संदर्भांवर किती अवलंबून रहायचं. हा मोठाच प्रश्न संदर्भाच्या ग्राहकांपुढे असतो.
संदर्भ ही एक वस्तू (कमोडिटी) मानून ह्या प्रश्नाचा विचार केला तर त्यातून थोडा मार्ग सापडतो. संदर्भाची मग एक बाजारपेठ कल्पनेत तयार होते. बाजारपेठ म्हंटलं की मग निरनिराळे प्रवाह असणार हे ग्राहकाला गृहित धरायचच असतं. पुस्तकांतील संदर्भ ही एक बाजारपेठ आणि वेबवरील संदर्भ ही दुसरी वेगळी बाजारपेठ धरून विचार करीत थो़डं आणखी पुढे गेलं की काही मुद्दे स्पष्ट होऊ लागतात. पुस्तकांच्या बाजारपेठेतही काही उत्पादने दर्जाच्या दृष्टीने निकृष्ट मानून त्यातून संदर्भ उचलणं आपण टाळत असतो. हे इतकं अंगवळणी पडून गेलेलं असतं की त्या बाबतीत हंसाचं नीरक्षीरविवेकाचं तंत्र आपण नकळत अवलंबत असतो. त्यात आपली सहसा चूक होत नाही. वेबच्या बाबतीत मात्र चूक होते. याचं कारण पुस्तकांची आणि आपली ओळख पिढ्या न पिढ्यांची आहे, आणि वेबचं कार्ट आपल्या टेबलावर काल-परवाचं आलय. त्याची आपली तेवढी घसट नाही. त्यात पुन्हा त्याची वरवर दिसणारी लक्षणं काही ठीक नाहीत. त्यामुळे त्याच्याकडून काही संदर्भ उचलायचे तर आपल्यापुढे भरपूर प्रश्नचिन्ह असतात. काही वेळा ती प्रश्नचिन्ह इतकी नको वाटतात की वेबच्या संदर्भांवर नकळत अघोषित बहिष्कार टाकून आपण केवळ पुस्तकांतील संदर्भांवर गुजराण करतो. ते सोयीचही असतं आणि खात्रीचंही असतं.
पण वेबला संदर्भांच्या बाबतीत असं वाळीत टाकणं एकविसाव्या शतकात परवडणारं राहिलेलं नाही. वेब लायब्ररीयनची संकल्पना आता रूजली आहे. लायब्ररी म्हणजे फक्त पुस्तकं ही पारंपारिक संकल्पनाही आता नदीचं पात्र विशाल व्हावं तशी प्रचंड रूंदावलेली आहे. लायब्ररीत आता ईबुक्स, सीडीज, डीव्हीडीज स्थिरावल्या आहेत. त्यांची उपयुक्तता स्वीकारली गेली आहे. त्या ईबुक्स, सीडीज आणि एकूणच ईसंदर्भांचं मूळ बीज आपल्याला वेबवर कुठेतरी सापडतं. लायब्ररीतली एकूणच ईसामग्री वेबच्या ऐरणीवर ठाकून ठोकून पाहून तपासणं शक्य असतं. वेब हे द्वाड कार्ट असलं तरी ते फार हुशार, प्रचंड स्मरणशक्तीची क्षमता असलेलं, रोजच्या रोज येऊन पडणारी नवनवी माहिती आत्मसात करून ती ज्ञानदूताच्या भूमिकेतून उपलब्ध करणारं असं गुणी पोरंही आहे. प्रश्न इतकाच की त्यातला द्वाडपणा पारखून आणि ज्ञानाची शक्तीस्थळे ओळखून त्याला संदर्भाच्या कामाला नेमकं कसं लावायचं?
प्रिंट बुक आणि ईबुकचा विषय नेहमी निघतो. तो निघाला की पहिला मुद्दा मी तरी मांडतो तो हा की प्रिंट बुक्स म्हणजे मुक बधिर विद्वानासारखी आहेत. तुमचं काही ऐकून घ्यावं किंवा तुमच्याशी काही संवाद साधावा यासाठीची इंटरॅक्टीव्ह क्षमता त्यांच्याकडे नाही. छापिल पुस्तकांतील पानं ही जुन्या तोफा आणि रणगाड्यांसारखी. ईबुक्समधील ऑडिओ, व्हिडिओ आणि सर्चची क्षमता आजच्या अत्याधुनिक दूर पल्ल्याच्या अचूक क्षेपणास्त्रांसारखी. त्यांना जोड रोजच्या रोज अपडेट होणार्या वेबची. अशा ह्या अफाट शक्तीमान तंत्रज्ञानाच्या मुसक्या बांधून त्याला आपल्या संदर्भाच्या कामासाठी लावणं, आणि ते काम त्याच्याकडून पूर्ण विश्वासार्हतेनं करून घेणं हे आजचं आव्हान आहे. वेबचं संदर्भशास्त्र Referology किंवा Science of Web Referencingहा त्यामुळेच आजचा एक स्वतंत्र आणि आव्हानात्मक विषय आहे. हे काम केवळ वेब लायब्ररीयनवर सोपवून मोकळं होणं ही चूक ठरेल. कारण वेब लायब्ररीनच्या कामाचा आवाकाही काही कमी नाही. वेबवर येणारं सारं केवळ गुगल सारख्या सर्च इंजिनवरूनच शोधून मिळेल हा भोळा समज आहे हे आता आपल्या लक्षात येतय. गुगलला मानवी मेंदूचे म्हणजे वेब लायब्ररीयनचे हात लागणं आवश्यकच आहे. त्यातून सुटका नाही. गुगल सारखी सर्च इंजिन्स ही ज्ञानप्रलयाचे लोंढे आपल्यावर आणून आदळत असतात. आपण त्या पाण्यातून विशिष्ट शिंपले आणि मोती शोधू पहात असतो, पण होतं असं की ज्ञानप्रलयाचा लोंढा इतका भीषण असतो की त्यात आपणच वाहून जातो. शिंपले, मोती तर कुठल्या कुठे जातात. ह्या लोंढ्यातून आपल्याला सावरण्याचं काम वेब लायब्ररीयन बरच करू शकेल. पण त्याच्या शक्तीलाही मर्यादा पडणारच. कुठे काय आहे, हे तो सांगेल. पण कुठलं विश्वासार्ह आहे, ते तपासण्याचे मार्ग कोणते, संदर्भाचे शोध घेण्याच्या नवनव्या क्लृप्त्या कोणत्या, तंत्रज्ञान कोणतं हे संदर्भशास्त्रज्ञ सांगू शकेल.
माझ्यापुढे lii.org नावाची वेबसाईट आहे. Librarians Index to Internet म्हणजे L I I. ही साईट संदर्भशास्त्राच्या दिशेने काम करणारी एक नमुना वेबसाईट आहे असं मला वाटतं. संदर्भाची खाण म्हणून तर ती काम करतेच. पण जगातले अनेक क्रियाशील वेब लायब्ररीयन्स मिळून वेबवरील विश्वासार्ह संदर्भस्थळे जोखतात आणि ती आपल्यापुढे पेश करतात, अशी ह्या साईटची भूमिका आहे. उद्याच्या वेब संदर्भशास्त्राच्या सुरूवातीच्या धड्यांची ही केवळ सुरूवातीची पाने आहेत. त्यात अनेक बदल होत जातील. नवनवी तंत्रे त्यात येऊन मिळतील. वेबवरील 'पॉझिटीव्ह ग्लोबल ग्रुपिझम' केवळ लिनक्ससारखी ऑपरेटींग सिस्टमच तयार करू शकेल असं नाही, तर तो विश्वासार्ह संदर्भस्थळांची मांदियाळीही निर्माण करू शकेल. उद्या असं होऊ शकतं याची जाणीव आज ठेवणं हे आपल्याला क्रमप्राप्त आहे. महाविद्यालयातले अध्यापक आणि ग्रंथपाल काही विद्यार्थी हाताशी धरून आणि वेबसारखे जगव्यापक माध्यम कामाला लावून ह्या दृष्टीने लहान मोठे प्रकल्प आपल्या स्तरावर हातात घेऊ शकतात. वेबचे संदर्भशास्त्र आकार घेण्यासाठी असे प्रकल्प फार उपयुक्त ठरतील यात शंका नाही. वेबचे संदर्भशास्त्र जेवढे आणि जेवढ्या त्वरेने आकार घेईल तेवढे तेथील संदर्भ मानवाच्या कामी येऊ लागतील. वेबच्या आजच्या ज्ञानप्रलयात हिरे-माणकंही वहात आहेत, आणि गटारगंगेचे प्रवाहही उसळ्या घेत आहेत. संदर्भाच्या बाजारपेठेत आज मंदीचे नाही खरे आव्हान तेजीचे आहे.

महाविद्यालय आणि मास कम्युनिकेशन
महाराष्ट्रातलं महाविद्यालय म्हंटलं की एक विशिष्ट चित्रफीत डोळ्यासमोरून सरकते. अगदी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून ते आतल्या आवारानंतर कॉरीडॉर आणि वर्गांपर्यंत एक निश्चित सरासरी दृश्य आपण नकळत गृहित धरतो. महाविद्यालयाचा परिसर, वास्तू आणि वातावरण हा महाविद्यालयीन जीवनातल्या अनेक घटकांपैकी एक घटक झाला. मात्र सामाजिक घटकांमध्ये व्यवस्थापनातील पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि त्यांचे पालक हे ओघाने येतात. ह्या सार्या सामाजिक घटकांचं क्षणिक प्रतिबिंब दोन ठिकाणी आवर्जुन दिसतं. एक महाविद्यालयाची वेबसाईट आणि दुसरं म्हणजे वर्षातून एकदा प्रकाशित होणारा स्मरणिकासदृश व बहुभाषिक निवेदन तसंच तत्सम साहित्याने नटलेला साधारणतः शंभर पानांचा छापिल अंक. आजकाल महाविद्यालयाची वेबसाईट ही युजीसीची देखील एक मागणी असते. खेरीज नॅकची वरची श्रेणी कायम राखण्यासाठी किंवा उंचावण्यासाठी तर ती नितांत आवश्यक असते. त्यामुळे सामान्यतः अगदी तुरळक अपवाद वगळता बहुसंख्य महाविद्यालयांचे स्वतंत्र व अधिकृत संकेतस्थळ आजकाल वेबवर दिसते.
वर उल्लेख केल्याप्रमाणे वार्षिक अंक व सतत स्थिर असलेले वेबवरील संकेतस्थळ हे दोन खांब महाविद्यालयाच्या संपूर्ण मास कम्युनिकेशनची गरज भागवण्याचा प्रयत्न करीत असतात. याला जोड असते महाविद्यालयाच्या भिंतीवर सर्वत्र दिसणार्या सूचनाफलकांची.. त्यावर मुख्यत्वे विद्यार्थीवर्गासाठी तात्कालिक माहिती देणार्या सुचनांचा नियमित ओघ चालू असतो. मास कम्युनिकेशन प्रक्रियेतील आपली माफक भूमिका त्या सुचना तशा समाधानकारकपणे बजावत असतात. महाविद्यालयीन अध्यापनाचे वेळापत्रक एवढे बांधीव असते की वर्षभरात वर उल्लेखलेले सर्वच सामाजिक घटक आपल्या शैक्षणिक उद्योगात गर्क असतात. त्यांचं गर्क असणं हे स्वाभाविकही असतं आणि खरं तर आवश्यकही असतं. मात्र ह्या एकूण वास्तवात महाविद्यालयाच्या मास कम्युनिकेशची गरज (खरं तर तहान) ही पूर्णपणे भागत नाही. एक अनामिक बॅकलॉग किंवा उणीव त्यात राहून जात असते. अर्थात त्याची सवय वर्षोनुवर्षे झाल्याने त्यात काही वावगं असं जाणवतही नाही.
मास कम्युनिकेशन आणि बजेट यांचं नातंही विचारात घेतल्यावाचून सुटका नसते. अगदी चार पानांचं छापिल नियतकालिक नियमित काढायचं म्हंटलं तरी त्यात अडचणी असतात. त्या अडचणी रास्तही असतात. बजेटचं सोंग आणणं शक्य नसतं. दुसरीकडे चार पानं नियमित काढायची म्हणजे व्यापही असतोच. त्यासाठी कोण किती वेळ देऊ शकेल हा प्रश्नच असतो. छापिल माध्यमाखेरीज इतर माध्यमं महाविद्यालयाच्या दिमतीला नसतात. जे अधिकृत स्थिर संकेतस्थळ असतं त्यात वेळोवेळी किरकोळ बदल वा भर घालणं व ते शक्य तेवढं ताजं ठेवणं हे आव्हान कुणीतरी एकीकडे पेलत असतं. त्यामुळे त्यात आणखी भर घालून नवं काही सदर सुरू करणं ही कल्पना रूजण्यासारखी नसते.
हे वातावरण एकीकडे असताना दुसरीकडे विद्यार्थी (जवळजवळ प्रत्येक विद्यार्थी व विद्यार्थिनी) आपल्या २४ तासांपैकी काही तास किंवा बर्यापैकी वेळ दररोज आणि नियमितपणे ऑर्कुट सारख्या सोशलनेटवर्कींग
संकेतस्थळाला अतिशय आवडीने देत असतात. फेसबुक, माय स्पेस, ट्विटर, वर्डप्रेस सारख्या साईटसवर देखील विद्यार्थ्यांची चांगली गर्दी असते. अनेकजण आपले स्वतःचे ब्लॉग्ज लिहीत असतात. काही जण ते स्वतःची रोजनिशी असावी अशा प्रकारे ब्लॉगवरचं आपलं लिखाण स्वतःपुरतंच ठेवत असतात. विद्यार्थ्यांमधली ही संगणक सक्रियता ढोबळ मानाने एकूण विद्यार्थ्यांच्या ७० टक्क्यांहून कमी नसते. अगदी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये ती यापेक्षा कमी दिसली तरी त्यांना त्याबद्दल कमालीचं औत्सुक्य असतं. अशा वातावरणात कॉलेजचा अधिकृत ब्लॉग प्रस्थापित होणं आणि त्यातून मास कम्युनिकेशनची तूट अर्थात डेफिसिट भरता येणं सहज शक्य आहे. ईमेलप्रमाणेच ब्लॉग्ज इंटरनेटवर मोफत आहेत हे आता सर्वांनाच माहीत आहे. ब्लॉग्जवर सर्व भाषांतील लिखाण शक्य आहे. रंगीत छायाचित्रेच केवळ नव्हेत तर आता व्हिडिओ क्लीप्स देखील ब्लॉग्जवर सहज शक्य आहेत. यात बजेटचा प्रश्न नाही. ह्या माध्यमाची आवड आणि तंत्रज्ञान विद्यार्थ्यांमध्ये मूळातच रूजलेलं आहे. कोणीही घरून वा सायबर कॅफेतून त्या संदर्भातलं काम कुठेही व कधीही करू शकतो, आणि त्यावर प्रसिद्ध झालेलं लिखाण, छायाचित्रे, व्हिडिओज कोणीही केव्हाही कुठेही पाहू वा वाचू शकतो. यात बजेट वा तत्सम अन्य अडचणी येण्याची शक्यता जवळ जवळ नसतेच. खेरीज परिक्षा वा तत्सम दिवसांमध्ये ब्लॉगवर फारसं काही येणार नाही, व त्यावेळी फारसं कोणी वाचणारही नाही याची कल्पना सर्वांना असते.
ब्लॉगचं माध्यम असं अनेक प्रकारे महाविद्यालयाला मास कम्युनिकेशनचं टूल म्हणून वापरता येणं सहज शक्य आहे. आजकाल अनेक विद्यार्थी इंटरनेटवरील फोरमवर किंवा ऑर्कुटसारख्या कम्युनिटीजवर मॉडरेटर किंवा सुपर मॉडरेटर म्हणून काम करीत असतात. कॉलेजच्या ब्लॉगवर अशा पद्धतीने विविध विद्यार्थ्यांचच मॉडरेशन असल्यावर त्यात गैरप्रकार होण्याची शक्यता जवळजवळ शुन्य आहे. वार्षिक अंकात पानांची संख्या मर्यादित असते. मात्र ब्लॉगवर कोणतीही मर्यादा नसल्याने सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे साहित्य त्यावर जाऊ शकते. उत्तम साहित्यासाठी वार्षिक किंवा अगदी तिमाही वा सहामाही पारितोषिके देणेही अशक्य नाही. हा ब्लॉग महाविद्यालयाचा अधिकृत असल्याने तसेच विद्यार्थी व त्याचे पालक तो फार मोठ्या प्रमाणावर पाहणार असल्याने एकूण वाचकांची संख्या फारच मोठी असणार यात शंका नाही. अशा ब्लॉगला जाहिराती वा देणग्या मिळणं देखील अशक्य नाही. म्हणजेच महाविद्यालयावर कोणताही बोजा न पडता त्याची मास कम्युनिकेशनची गरज पूर्णपणे भागविण्याची क्षमता ह्या माध्यमात आहे.
खरं तर शासन दरवर्षी ज्याप्रमाणे सर्वोत्कृष्ट पुस्तकांना पारितोषिके देते त्याप्रमाणे शासनातर्फे सर्वोत्कृष्ट महाविद्यालयीन ब्लॉग्जना पारितोषिके दिली जायला हवीत. त्यात काहीच अशक्य नाही. तसे झाल्यास सर्जनशील विद्यार्थ्यांच्या साहित्यासाठी ते एक फार मोठे व्यासपीठ ठरेल. मात्र यासाठी प्राचार्यांनी पहिले पाऊल टाकून सर्व संबंधितांना साद देणे ही पहिली गरज आहे. ते पाऊल ही केवळ त्या त्या महाविद्यालयाची नाही तर आजच्या काळाची गरज आहे.

ओसीआर तंत्राच्या प्रतिक्षेत मराठी
तंत्रज्ञानाचे संदर्भ येतात तेव्हा इंग्रजी भाषा ही इंजिनाच्या ठिकाणी असते, आणि जगातल्या इतर भाषांचे डबे इंग्रजी इंजिनाच्या मागे किंवा त्याचे अनुकरण करीत धावत असतात. ओसीआर अर्थात 'ऑप्टीकल कॅरॅक्टर रेकग्नीशन' हे असंच एक संगणकीय तंत्रज्ञान. जगात आज Abby आणि Nuance ह्या दोन कंपन्या ह्या तंत्रज्ञानाशी संबंधित सॉफ्टवेअर पुरविणार्या आघाडीच्या कंपन्या आहेत. ह्या कंपन्यांनी आपल्या कामाचा भाग म्हणून जगभरातील विविध भाषांचा संगणकीय अभ्यास केला आहे. त्यात कोरियन, जपानी. चिनी भाषेपासून ते रशियन आणि सोमाली भाषेपर्यंत एकूण १८६ भाषा आहेत. ह्या १८६ भाषांमध्ये आज तरी आपल्या मराठी भाषेचा समावेश नाही. ओसीआरचे तंत्र आणि मराठीच्या नात्याची अधिक माहिती घेण्यापूर्वी हे ओसीआर प्रकरण नेमकं काय आहे हे प्रथम समजून घेऊ.
'ओसीआर ' म्हणजे 'ऑप्टीकल कॅरॅक्टर रेकग्नीशन'. हे तिन्ही शब्द महत्वाचे आणि तेवढेच अर्थपूर्णही. आपल्याकडे चष्म्याच्या दुकानांच्या नावात 'ऑप्टीशियन्स ' हा शब्द सर्रास दिसतो. त्याच अर्थाची छटा पहिल्या 'ऑप्टीकल' ह्या शब्दात आहे. इंग्रजीत Optic ह्या शब्दाचा अर्थ शब्दकोशाने relating to eye or vision असा दिला आहे. भाषेमध्ये eye or vision हे शब्द लिपी अथवा अक्षरांच्या संदर्भात येणार हे उघड आहे. ओसीआर मधला पुढला शब्द कॅरॅक्टर (अक्षर) हाही त्याला पुष्टी देतो. भाषेतले अक्षर डोळ्याला दिसणे (वा भासणे) याच्याशी Optical Character हे दोन शब्द थेट संबंधित आहेत. त्याच्या पुढे 'रेकग्नीशन' हा शब्द आहे. अक्षर डोळ्याला भासणं आणि त्याचे रेकग्नीशन म्हणजे ओळखणं हे सारं इथे संगणकीय तंत्राच्या संदर्भात आलं आहे. माणसाच्या डोळ्याशी वा त्याला दिसण्याशी त्याचा संबंध नाही.
आजकाल स्कॅनर्स घरोघर येऊ लागलेत. स्कॅनरमध्ये पुस्तकाचे एखादे पान घातले की स्कॅनरचे डोळे ते पान पाहतात व त्याची प्रतिमा आपल्या संगणकाच्या पडद्यावर आणून ठेवतात. एक प्रकारे स्कॅनर त्या पुस्तकाच्या पानाचे छायाचित्रच घेत असतो. हे छायाचित्र घेताना त्या पुस्तकाच्या पानावरील मजकूर कोणत्या भाषेत आहे याच्याशी स्कॅनरला देणे-घेणे नसते. स्कॅनरच्या दृष्टीने मजकूर किंवा त्यातले प्रत्येक अक्षर हा चित्राचा एक भाग असतो. स्कॅनरने पुस्तकाच्या पानाची व त्यावरच्या मजकूराची जी प्रतिमा घेतली त्यातला एखादा शब्द वेगळा काढण्याची वा बदलण्याची सोय नसते. कारण सारा मजकूर मिळून एक संपूर्ण चित्र आपल्या स्क्रीनवर आलेले असते. ओसीआर तंत्रज्ञानाची एन्ट्री ह्या टप्प्यावर होते.
स्कॅन केलेल्या पानावर केवळ चित्र म्हणून दिसणारा जो मजकूर असतो त्यातले प्रत्येक अक्षर ओळखून त्याचे रूपांतर अक्षरात (टायपात किंवा फाँटमध्ये) करण्याचे काम ओसीआर तंत्रज्ञान करते. म्हणूनच त्याला ऑप्टीकल कॅरॅक्टर रेकग्नीशन असे म्हंटले जाते. हे अधिक स्पष्ट करण्यासाठी आपण एक साधे उदाहरण घेऊ. समजा राम गणेश गडकरी यांच्या एकच प्याला ह्या नाटकाचे एक पान आहे. त्यावर सिंधू आणि सुधाकर यांचे मराठी लिपीतील संवाद छापलेले आहेत. नाटकाच्या पुस्तकाची छपाई तीस वर्षांपूर्वी झाल्याने संगणकाच्या फाँटमध्ये ते संवाद उपलब्ध नाहीत. मराठी भाषेत जर ओसीआर तंत्राची सोय असती तर काय होऊ शकले असते पहाः एकच प्याला चे ते पान प्रथम स्कॅन करण्यांत आले असते. स्कॅनिंग केल्यानंतर जी प्रतिमा मिळाली असती त्या प्रतिमेतील शब्द व अक्षरांचे रूपांतर मराठी टायपात (फाँटमध्ये) केले गेले असते. तीस वर्षांपूर्वी राहून गेलेली एखादी प्रुफरिडींगची चूक दुरूस्त करून त्या पानावरचा तो शब्द पुन्हा बिनचूक टाईप करता आला असता. त्या पानावरचा एखादा परिच्छेद वेगळा काढणं शक्य झालं असतं. पानावरील मांडणी बदलता आली असती. मूळ पानावरचा टाईप वाचायला लहान आहे असं वाटल्यानंतर तो मोठा करता आला असता. त्याही पेक्षा नाटकातला एखादा संदर्भ शोधण्यासाठी अभ्यासकांना आणि विद्यार्थ्यांना 'सर्च ' ची सुविधा उपलब्ध झाली असती.
इंग्रजीसाठी उपलब्ध असलेलं ओसीआर तंत्र आज अतिशय प्रगत आहे. स्कॅन करून ओसीआर केलेल्या इंग्रजी मजकूरातील अचूकता आज ९५ टक्क्यांहून अधिक असते. संगणक जेव्हा मजकूर ओसीआर करतो आणि अक्षर ओळखतो तेव्हा इंग्रजीत अनेक ठिकाणी संगणकाची कसोटी लागते. इंग्रजीतला लोअर केस मधलं एल (l) हे अक्षर आकड्यातल्या एक (1) सारखं आहे. शब्दातलं अक्षर हे एल आहे की एक आकडा आहे हे ओळखण्याइतका आजचा संगणक बुद्धीमान आहे. अगदी बारीक अक्षर ओसीआर करताना इंग्रजी h च्या जागी n येण्याने चूक होऊ शकते. ओसीआर मधील अशा चुकांचे प्रमाण आज १ किंवा २ टक्के इतकेच उरले आहे. इंग्रजी ओसीआर मध्ये इतकी प्रगती झाल्याने जुने इंग्रजी ग्रंथ अतिशय झपाट्याने ओसीआर होत आहेत व इंटरनेटवरही सर्च सुविधेसह येत आहेत. ज्या १ किंवा २ टक्के चुका इंग्रजी ओसीआर मधून सुटतात त्या सुधारण्यासाठी इंग्रजीचे प्रगत शब्दकोश व दुरूस्त्या कोश उपलब्ध असल्याने इंग्रजीत गेली काही वर्षे ओसीआर तंत्र चांगले स्थिरावले आहे. आपल्या मराठीच्या नशिबात मात्र आज २०१० मध्येही अजून ते स्थिरावणं आलेलं नाही.
संस्कृत, मराठी आणि हिंदी ह्या भाषांतील सर्व अक्षरे (काही अपवाद वगळता) बहुतांशी सारखी आहेत. एखादं 'ळ' अक्षर वेगळं काढून तिन्ही भाषांसाठी देवनागरी ही एकच लिपी सामायिक ठेवणं तांत्रिक दृष्ट्या सामान्यतः सोयीचं जातं. मराठीतला ओसीआर अडकून पडला आणि हिंदीसाठी किंवा देवनागरी साठी मात्र तो तयार झाला तरी तांत्रिक उसनवारी करून मराठीतलं ओसीआरचं काम होणं शक्य आहे. मात्र मराठी आणि हिंदी दोन्हींसाठी किंवा एकूण देवनागरीसाठी वापरण्यास सोयीचे व स्वीकारार्ह असे ओसीआर सॉफ्टवेअर आज तरी शोधूनही सापडत नाही. जगात आणि भारतातल्या विविध विद्यापीठांमध्ये अनेक संशोधक आणि तंत्रज्ञ त्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. भारत सरकारच्या अधिपत्याखालील सीडॅकनेही त्यासाठी महत्वपूर्ण काम केले आहे. मराठीसाठी सीडॅकने चित्रांकन नावाचे एक ओसीआर सॉफ्टवेअर आणले आहे. मात्र आजही त्यातल्या बिनचूकपणाच्या मर्यादांमुळे त्याचा वापर वाढलेला दिसत नाही.
मराठीतली जोडाक्षरे, काना-मात्रा, रफार-वेलांट्या, पाय मोडणे, अनुस्वार-चंद्र, र्हस्व-दीर्घ वगैरे ओसीआर तंत्रज्ञानापुढील अवघड आव्हाने आहेत. मूळात आत्ता आत्ता कुठे आपण फाँटच्या गोंधळाचा दोन दशकांचा प्रवास करून युनिकोडच्या स्थानकात उतरत आहोत. युनिकोडच्या नव्या गावाचं पाणी आपल्या दैनिक वृत्तपत्रांना अगदी अलिकडे पचू लागलय. काही जण तर अजून त्यासाठी धडपडताहेत. अशा स्थितीत, ओसीआर आणि युनिकोड यांचा मेळ बसून ते इंग्रजीप्रमाणे ९५ टक्क्यांपर्यंत प्रगत होण्यासाठी कदाचित आणखी काही महिने वाट पहावी लागण्याची शक्यता आहे.
ओसीआर चे तंत्र मुख्यत्वे जुने मराठी ग्रंथ व कागदपत्रांच्या डिजिटायझेशनसाठी वापरले जाणार आहे. असं समजूया की येत्या काही महिन्यांत मराठी ओसीआरचे एक उत्तम सॉफ्टवेअर आपल्या हाती आले व त्यातील बिनचूकपणा हा ९० टक्क्यांच्या आसपास साध्य झाला आहे. तरीही, इतर काही अडचणी मराठी ओसीआर च्या मार्गात येण्याची शक्यता आहे. त्यातली एक महत्वाची अडचण म्हणजे पूर्वी मुद्रणासाठी विशेषतः हँड कंपोजिंगमध्ये वापरला गेलेला टाईप. मराठी मुद्रणात पूर्वी वापरून वापरून झिजलेला टाईप पुन्हा पुन्हा वापरणे हे नेहमीचे होते. वाचकांनाही तेव्हा तसा झिजलेला टाईप वाचताना अडचण येत नसे. पण तशा टाईपात छापली गेलेली पुस्तके वा कागदपत्रे ही ओसीआर तंत्रासमोर एक मोठे आव्हान ठरणार आहेत. इंग्रजीत जोडाक्षरे नाहीत. प्रत्येक अक्षर हे स्वतंत्र आहे. त्यामुळे ओसीआर साठी ते खूपच सुकर ठरले. एच (h) आणि एन (n) किंवा e,o, Q, c सारखी इंग्रजी अक्षरे आकारांनी एकमेकांशी साधर्म्य राखणारी असली तरी ती एकमेकांत जोडलेली वा अर्धी नाहीत. तसेच इंग्रजीत अक्षराच्या वर रेघ नाही. मराठीत ही गुंतागुंत एकीकडे आहे, तर दुसरीकडे झिजलेला टाईप. यामुळे मराठीत ओसीआरमध्ये अनेक प्रमाद दिसून येतील व बिनचूकपणाचे प्रमाण खाली येईल. 'र' सारख्या अक्षराची खाली येणारी शेपटी झिजलेली असेल तर तो अर्धा 'ग' होईल. किंवा ध, भ किंवा थ मधील वरचे गोळे झिजले असतील तर अनुक्रमे ते घ, म आणि य होतील. स अक्षराच्या पोटातील आडवी रेघ झिजली असेल तर स चा रा होईल. झिजलेल्या टाईपात छापला गेलेला मजकूर हा ओसीआरसाठी एक आव्हान ठरेल यात शंका नाही.
मराठी ओसीआर साठी चांगले सॉफ्टवेअर उपलब्ध होणे ही राज्य सरकारचीही गरज असणार यात शंका नाही. कारण १९६० किंवा तत्पूर्वीपासूनची गॅझेटसची पाने जर सर्चेबल करावयाची असतील तर ओसीआरला पर्याय नाही. ओसीआर उपलब्ध झाल्यास कितीतरी कागदपत्रे पुन्हा टाईप करावी न लागता केवळ स्कॅन करून उपलब्ध होऊ शकतील. ओसीआरसाठीचे संशोधन आय.आय.टी. तसेच केंद्र सरकारच्या सीडॅक व तत्सम संस्थांमध्ये चाललेले असले तरी तेथे सर्व भारतीय भाषांचा विचार केला जात असतो. मराठी ही त्यातील एक भाषा असते. राज्य सरकारने मराठी ओसीआर साठी तातडीने एक अभ्यास गट नेमणे व त्या अभ्यास गटाला संशोधनासाठी व ओसीआर विकासासाठी साधनसामुग्री उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे. महाराष्ट्रात आज अनेक ठिकाणी संगणकविषयक उच्च शिक्षण देणार्या संस्था आहेत. त्यांनीही मराठी युनिकोड व ओसीआर चा अभ्यास करणारे सेल स्थापन करावयास हवेत. मराठी हस्ताक्षराचे ओसीआर करण्याच्या विषयात मराठी कॅलिग्राफीसाठी प्रसिद्ध असलेले कै. र.कृ. जोशी यांचेही महत्वाचे योगदान आहे. आजच्या घडीला अमेरिकेत न्युयॉर्कच्या बफेलो विद्यापीठात देवनागरी ओसीआर साठी सातत्याने संशोधन करणारे एक स्वतंत्र केंद्र (Center of Excellence for Document Analysis and Recognition (CEDAR) आहे. त्याची माहिती जिज्ञासूंना http://www.cedar.buffalo.edu/script/Doverview.html ह्या संकेतस्थळावरून घेता येईल. भारताबाहेर देवनागरी ओसीआरसाठी काम करणार्या बफेलो विद्यापीठासारख्या इतरही काही संस्था व व्यक्ती आहेत. महाराष्ट्र सरकारने व मराठीशी संबंधित महामंडळांनी ह्या सर्वांशी सतत संपर्कात असायला हवे.
आजमितीस हिंदी, मराठी, संस्कृत ह्या तीन मुख्य भाषांशी संबंधित जगातले ३० कोटी लोक देवनागरी ओसीआरची प्रतिक्षा करीत आहेत. हिंदी हा त्यातला सर्वांत मोठा घटक असला तरी मराठी ही जगातील १५ व्या क्रमांकाची भाषा आहे. महाराष्ट्र हा जगातल्या कितीतरी देशांच्या तोडीचा आहे. सुवर्ण महोत्सवी वर्षांत पदार्पण करणार्या महाराष्ट्राकडूनही जगातले हे ३० कोटी लोक अपेक्षा ठेवून आहेत. मराठी व देवनागरी ओसीआर साठी आपले योगदान देणे हे महाराष्ट्रानेही आपले एक कर्तव्य मानायला हवे.
'ओसीआर ' म्हणजे 'ऑप्टीकल कॅरॅक्टर रेकग्नीशन'. हे तिन्ही शब्द महत्वाचे आणि तेवढेच अर्थपूर्णही. आपल्याकडे चष्म्याच्या दुकानांच्या नावात 'ऑप्टीशियन्स ' हा शब्द सर्रास दिसतो. त्याच अर्थाची छटा पहिल्या 'ऑप्टीकल' ह्या शब्दात आहे. इंग्रजीत Optic ह्या शब्दाचा अर्थ शब्दकोशाने relating to eye or vision असा दिला आहे. भाषेमध्ये eye or vision हे शब्द लिपी अथवा अक्षरांच्या संदर्भात येणार हे उघड आहे. ओसीआर मधला पुढला शब्द कॅरॅक्टर (अक्षर) हाही त्याला पुष्टी देतो. भाषेतले अक्षर डोळ्याला दिसणे (वा भासणे) याच्याशी Optical Character हे दोन शब्द थेट संबंधित आहेत. त्याच्या पुढे 'रेकग्नीशन' हा शब्द आहे. अक्षर डोळ्याला भासणं आणि त्याचे रेकग्नीशन म्हणजे ओळखणं हे सारं इथे संगणकीय तंत्राच्या संदर्भात आलं आहे. माणसाच्या डोळ्याशी वा त्याला दिसण्याशी त्याचा संबंध नाही.
आजकाल स्कॅनर्स घरोघर येऊ लागलेत. स्कॅनरमध्ये पुस्तकाचे एखादे पान घातले की स्कॅनरचे डोळे ते पान पाहतात व त्याची प्रतिमा आपल्या संगणकाच्या पडद्यावर आणून ठेवतात. एक प्रकारे स्कॅनर त्या पुस्तकाच्या पानाचे छायाचित्रच घेत असतो. हे छायाचित्र घेताना त्या पुस्तकाच्या पानावरील मजकूर कोणत्या भाषेत आहे याच्याशी स्कॅनरला देणे-घेणे नसते. स्कॅनरच्या दृष्टीने मजकूर किंवा त्यातले प्रत्येक अक्षर हा चित्राचा एक भाग असतो. स्कॅनरने पुस्तकाच्या पानाची व त्यावरच्या मजकूराची जी प्रतिमा घेतली त्यातला एखादा शब्द वेगळा काढण्याची वा बदलण्याची सोय नसते. कारण सारा मजकूर मिळून एक संपूर्ण चित्र आपल्या स्क्रीनवर आलेले असते. ओसीआर तंत्रज्ञानाची एन्ट्री ह्या टप्प्यावर होते.
स्कॅन केलेल्या पानावर केवळ चित्र म्हणून दिसणारा जो मजकूर असतो त्यातले प्रत्येक अक्षर ओळखून त्याचे रूपांतर अक्षरात (टायपात किंवा फाँटमध्ये) करण्याचे काम ओसीआर तंत्रज्ञान करते. म्हणूनच त्याला ऑप्टीकल कॅरॅक्टर रेकग्नीशन असे म्हंटले जाते. हे अधिक स्पष्ट करण्यासाठी आपण एक साधे उदाहरण घेऊ. समजा राम गणेश गडकरी यांच्या एकच प्याला ह्या नाटकाचे एक पान आहे. त्यावर सिंधू आणि सुधाकर यांचे मराठी लिपीतील संवाद छापलेले आहेत. नाटकाच्या पुस्तकाची छपाई तीस वर्षांपूर्वी झाल्याने संगणकाच्या फाँटमध्ये ते संवाद उपलब्ध नाहीत. मराठी भाषेत जर ओसीआर तंत्राची सोय असती तर काय होऊ शकले असते पहाः एकच प्याला चे ते पान प्रथम स्कॅन करण्यांत आले असते. स्कॅनिंग केल्यानंतर जी प्रतिमा मिळाली असती त्या प्रतिमेतील शब्द व अक्षरांचे रूपांतर मराठी टायपात (फाँटमध्ये) केले गेले असते. तीस वर्षांपूर्वी राहून गेलेली एखादी प्रुफरिडींगची चूक दुरूस्त करून त्या पानावरचा तो शब्द पुन्हा बिनचूक टाईप करता आला असता. त्या पानावरचा एखादा परिच्छेद वेगळा काढणं शक्य झालं असतं. पानावरील मांडणी बदलता आली असती. मूळ पानावरचा टाईप वाचायला लहान आहे असं वाटल्यानंतर तो मोठा करता आला असता. त्याही पेक्षा नाटकातला एखादा संदर्भ शोधण्यासाठी अभ्यासकांना आणि विद्यार्थ्यांना 'सर्च ' ची सुविधा उपलब्ध झाली असती.
इंग्रजीसाठीचं प्रगत ओसीआर तंत्र
मराठी ओसीआर ची स्थिती
मराठीतली जोडाक्षरे, काना-मात्रा, रफार-वेलांट्या, पाय मोडणे, अनुस्वार-चंद्र, र्हस्व-दीर्घ वगैरे ओसीआर तंत्रज्ञानापुढील अवघड आव्हाने आहेत. मूळात आत्ता आत्ता कुठे आपण फाँटच्या गोंधळाचा दोन दशकांचा प्रवास करून युनिकोडच्या स्थानकात उतरत आहोत. युनिकोडच्या नव्या गावाचं पाणी आपल्या दैनिक वृत्तपत्रांना अगदी अलिकडे पचू लागलय. काही जण तर अजून त्यासाठी धडपडताहेत. अशा स्थितीत, ओसीआर आणि युनिकोड यांचा मेळ बसून ते इंग्रजीप्रमाणे ९५ टक्क्यांपर्यंत प्रगत होण्यासाठी कदाचित आणखी काही महिने वाट पहावी लागण्याची शक्यता आहे.
मराठी ओसीआर च्या मार्गातील संभाव्य अडचणी
मराठी ओसीआर आणि राज्य सरकार
जगात ३० कोटी लोकांना ओसीआरची प्रतिक्षा
महाविद्यालय पातळीवरील ' युनिकोड '
पाणी ही जीवनावश्यक गोष्ट आहे तशी संगणक ही शिक्षणावश्यक गोष्ट आहे. शाळेत, महाविद्यालयात किंवा कोणत्याही शैक्षणिक संस्थेत ग्रंथालयाइतकेच तेथील संगणक आवश्यक बनले आहेत. संगणक म्हंटला की तो एकटा येत नाही. इंटरनेटच्या हातात हात घालूनच आजकाल तो येतो. संगणकाबरोबर इंटरनेटही आता अधिकाधिक जीवनावश्यक होते आहे. आताशा विद्यार्थ्यांची संगणकाशी गाठ पडते ती अगदी कोवळ्या वयात. इयत्ता तिसरी वा चौथीचा विद्यार्थीही आपलं ओर्कुट अकाऊंट किंवा इमेल पत्ता उघडून बसलेला दिसतो. पुढे दहावी-बारावी होताना तो संगणकाला पूर्ण सरावलेला असतो. तो त्याच्या आयुष्याचा भाग बनून गेलेला असतो. काही कारणाने एखादा दिवस जर इंटरनेट कनेक्शन नसले तर तो कासावीस होतो. आपल्याला लिहायचं असावं आणि आपलं पेन सापडत नसेल तर जी अस्वस्थता असते त्यापेक्षा ती अस्वस्थता वेगळी नसते. पेनाइतकंच संगणक आणि इंटरनेट हे विद्यार्थ्याचं अतिशय महत्त्वाचं असं शैक्षणिक अवजार आहे.
एका बाजूला संगणक आणि इंटरनेट शिक्षणावश्यक बनत असताना दुसर्या बाजूला 'युनिकोड' तंत्राची चर्चा सतत कानावर पडते आहे. ' हे तंत्र आपल्या मराठी, हिंदी वगैरे भारतीय लिप्यांशी संबंधित आहे, आणि त्याची आवश्यकता व वापर अतिशय महत्त्वाचा आहे' एवढा संदेश महाराष्ट्राच्या शैक्षणिक जगतात आज बर्यापैकी पसरलेला आहे. हा संदेश कानावर पडलेला असला तरी त्या संदर्भात नेमकी कृती काय करायला हवी, त्या संदर्भातले तंत्र आणि ज्ञान यांचा नेमका अवलंब आपल्या संगणकीय जीवनात कसा करावा याची माहिती नसलेली मंडळी आज शेकड्याने दिसतात. नुकताच एका महाविद्यालयात जाण्याचा योग आला. तेथील प्राचार्यांच्या चेंबरमध्ये बसलेलो असताना त्यांचा पत्रव्यवहार पाहणारा सहकारी तिथे आला. प्राचार्यांकडे पहात त्या सहकार्याने मला विचारलं की "आम्हाला तुम्ही पाठवलेल्या मराठी ईमेल मिळाल्या. त्या वाचता आल्या. पण आम्ही मराठी ईमेल पाठवल्या की पलिकडल्याला त्या वाचता येत नाहीत. असं का होतं?”
प्रश्न साधा आणि नेहमीचा होता. त्याचं उत्तर अर्थातच 'युनिकोड' तंत्रात दडलेलं होतं. मी त्या सहकार्याला विचारलं की "तुम्ही मराठी फाँट कोणते वापरता?” तो म्हणाला "आम्ही पुर्वी एपीएस आणि आकृती फाँट वापरायचो. पण आता 'युनिकोड' वापरतो. तरी असं का होतं?”
त्या प्रश्नाचं उत्तरही सरळ होतं. ईमेल पाठवताना ती UTF-8 एनकोडींगने पाठवायला हवी होती. तसं न केल्याने, म्हणजे फाँट 'युनिकोड' चा आणि एनकोडींग इंग्रजीसाठीचं असल्याने ती समस्या येत होती. त्या सहकार्याला 'युनिकोड' माहीत होतं, पण UTF-8 म्हणजे '8 Bit Unicode Transformation Format' ची माहिती नव्हती. ही माहिती घेण्यासाठी फक्त जिज्ञासेची गरज आहे. कोणतंही विशेष संगणकीय ज्ञान त्यासाठी लागत नाही. पण प्राचार्यांचा सहकारी 'युनिकोड' चा पहिला थर ओलांडून पुढे गेलेला नसल्याने त्याला UTF-8 माहीत नव्हते. परिणामी त्याची मराठी ईमेल पलिकडल्याला नीट दिसत नव्हती. मराठी भाषेतून संपर्क साधताना अडचण येत होती. त्या अडचणीवर उपाय शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्या सहकार्याने निश्चितच केला असावा. पण इंटरनेटवर मोठी मुशाफिरी केल्यानंतरही त्याला निश्चित उपाय मिळालेला नव्हता. मराठी ईमेलसाठी प्राचार्य आपल्या सहकार्यावरच मुख्यत्वे अवलंबून होते. 'मराठीत जात नसेल तर इंग्रजीतून ईमेल पाठव' ही परवानगी देऊन प्राचार्यांनी तात्पुरती ती समस्या बाजूस सारली होती. मराठी संपर्काची जागा इंग्रजी संपर्काला घ्यावी लागली याचं कारण मराठी 'युनिकोड' तंत्राचा पद्धतशीर प्रसार महाराष्ट्रात अद्यापि सुरू झालेला नाही. ग्रामीण भागात, तालुक्यांमध्ये आणि खरं तर मागास जिल्ह्यामध्येही संगणक पोहोचले आहेत हे खरे आहे. पण संगणक वापरणारी मंडळी इंग्रजीपेक्षा मराठीशी अधिक जवळीक असलेली आहेत. त्यांना इंग्रजी भाषेतून संपर्क अवघड वाटतो. मराठीतून ते कितीतरी अधिक चांगल्या प्रकारे संपर्क साधू शकतात. पत्रव्यवहार करू शकतात. पण त्यांना संगणकावर मराठी वापरणं अतिशय कटकटीचं वाटतं. इंग्रजीची स्पेलींग्ज आणि व्याकरण अवघड आणि दुसरीकडे संगणकावर मराठी टायपिंग अवघड. अशा स्थितीत ते शेवटी आपल्या बेताच्या इंग्रजीचा आधार घेतात, आणि मराठी बाजूस सारून इंग्रजीतून वेळ मारून नेतात. 'युनिकोड' तंत्राने खरं तर मराठी टायपिंगची आणि संगणकावरच्या मराठीची समस्या चांगल्या प्रकारे सोडवली आहे. पण आपल्याकडे 'युनिकोड' च्या वापराचे ज्ञान देणारी ज्ञानपोई सहजपणे उपलब्ध नाही. तहान आहे पण पिण्याचे स्वच्छ पाणी देणारी पाणपोई नसेल तर वाटसरूची जी अवस्था होईल तशी 'युनिकोड' तंत्राची आजची अवस्था आहे.
'युनिकोड' ची ज्ञानपोई उपलब्ध करणं ही फार मोठी किंवा फार अवघड अशी बाबच नाही. साधारणतः तासा-दोन तासात हे सारं आवश्यक ज्ञान संगणक वापरणारा कोणीही विद्यार्थी वा व्यक्ती आत्मसात करू शकते. त्यापेक्षा अधिक वेळ देण्याची खरंच गरज नाही. बरं, दोन तासात एकदा हे ज्ञान घेतलं की त्याचा उपयोग आपल्याला आयुष्यभरासाठी होतो. इंटरनेटवर जगातील अनेकांनी ह्या संदर्भातील सचित्र ट्युटोरियल्स उपलब्ध केली आहेत. त्यातील काही मराठीत देखील आहेत. पण स्क्रीनवर वाचून ते ज्ञान आत्मसात करणं अनेकांना जमत नाही हे मात्र खरं. आपल्या महाविद्यालयाच्या पातळीवर सर्वप्रथम प्राचार्यांनी 'युनिकोड' तंत्राची माहिती घेण्याची आवश्यकता आहे. प्राचार्यांना किंवा प्राध्यापकांना मराठी टायपिंग करण्याची गरज कधी लागत नाही, हे खरं आहे. पण गुगलमध्ये एखादा मराठी संदर्भ शोधायची वेळ आली तर केवळ तेवढ्यासाठी त्यांना सहकार्याला बोलवावं लागू नये, हेही तेवढच खरं आहे. मराठी टायपिंगसाठी Transliteration ची पद्धत उपलब्ध आहे. tatwadnyan असं इंग्रजीत टाईप केलं की मराठीत 'तत्त्वज्ञान' हा शब्द आपोआप टाईप होऊ शकतो अशी ती सोय आहे. रात्री किंवा वेळी अवेळी आपल्या संगणकावर अभ्यास वा संशोधनाचे काम करण्याची वेळ प्राध्यापकांवर नेहमीच येते. त्यावेळी तेथे सहकारी उपलब्ध नसतो. मराठी शब्द टाईप करून संदर्भ तर तातडीने शोधायचा असतो. अशा वेळी 'युनिकोड' चे ज्ञान उपयोगी पडते. टायपिंगचा स्पीड असण्याची गरज नाही. मराठी टायपिंग येण्याचीही आवश्यकता नाही. दोन तासात घेता येणारे 'युनिकोड' संबंधीचे आवश्यक ज्ञान घेतलेले असले की आपण संगणकावरच्या मराठी टायपिंगसाठी स्वावलंबी झालेलो असतो. एखादी खाजगी वा गोपनीय मराठी ईमेल पाठवायची तर ती आपली आपण पाठवू शकतो. त्यासाठी सहकार्याला पाचारण करून गोपनीयता घालवण्याची आवश्यकता नसते.
आपल्या महाविद्यालयातील प्राध्यापक मंडळींपर्यंत 'युनिकोड' चे हे पुरेसे ज्ञान पोहोचलेले आहे काय याची खात्री सर्व प्राचार्यांनी करून घ्यायला हवी असं मला वाटतं. जर ते ज्ञान पुरेसे पोहोचलेले असेल तर उत्तमच, पण काही कारणाने तसे नसेल तर मात्र त्यांचेसाठी दोन तासांचे 'युनिकोड' प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यासाठी प्राचार्यांनी पुढाकार घ्यायला हवा. ती एक राष्ट्रीय गरज आहे यात शंका नाही. भारतातील हिंदी, मराठी, गुजराती, कानडी, तेलुगू, मल्याळी, तामिळ, बंगाली, गुरूमुखी (पंजाबी), उडिया ह्या भाषांच्या संगणकीय टायपिंगची समस्या सोडवणं, आणि त्यासाठी उत्तम प्रमाणिकरणाचं काम करण्याचं काम जागतिक स्तरावरील 'युनिकोड' कन्सोर्शियमने केलं आहे. हा कन्सोर्शियम म्हणजे 'ना नफा' तत्त्वावर चालणारी संस्था आहे. त्याची अतिशय सविस्तर माहिती माझ्या 'युनिकोड' तंत्र आणि मंत्र ह्या मराठी पुस्तकात आली आहे. जिज्ञासूंनी ती पहावी असा सल्ला आत्मस्तुतीचा दोष पत्करून मला ह्या लेखात द्यावासा वाटतो. ते दोन तासांचे ज्ञान त्या पुस्तकाच्या २०० पानांत देण्याचा प्रयत्न मी केला आहे. असो. महाराष्ट्रात 'युनिकोड' मराठी रूजणं आज संपर्कासाठी अत्यंत आवश्यक आहे. काही चळवळी रस्त्यावरच्या असतात, पण 'युनिकोड' सारखी चळवळ त्यासाठीच्या ज्ञानपोया ठिकठिकाणी उघडून करण्याची आहे. प्राचार्यांना त्यासाठी फार मोलाचे योगदान देता येईल. ह्या संदर्भात व्यक्तिशः माझी मदत लागल्यास त्या देण्याची माझी तयारी आहे. त्याचा उपयोग प्राचार्यांना झाल्यास मला आनंद वाटेल. संपर्कासाठी माझा ईमेल पत्ता ms@pujasoft.net असा आहे. धन्यवाद.

महिमा २०११ चा
हे नवे वर्ष मागील नऊ नव्या वर्षांपेक्षा वेगळे आहे. २००२, २००३, २००४ करत २०१० पर्यंतची वर्षे त्यांच्या त्यांच्या एक जानेवारीला नवी वर्षे होती. पण त्यांच्या पेक्षा हे २०११ साल वेगळे आहे. ह्या वर्षी भारताची लोकसंख्या मोजली जाणार आहे. महाराष्ट्रात १ मे २०११ रोजी जी लोकसंख्या असेल ती राज्याची लोकसंख्या म्हणून धरली जाणार आहे. लोकसंख्या मोजणीला शिरगणती, जनगणना वगैरे शब्दही आहेत. इंग्रजीत त्याला सेंसस म्हणतात. भारताची लोकसंख्या ऐकली की माणसाचा सेंस जागेवर रहात नाही, म्हणून त्याला इंग्रजीत सेंसस म्हणत असावेत असा पीजे चिमणराव काऊसमोर पूर्वी करत असत. जाऊ द्या, तो पीजे सोडा. मुद्दा हा की दर दहा वर्षांनी हे भलं मोठं गणित सरकारतर्फे होत असतं. ह्यापूर्वी २००१ साली आणि त्यापूर्वी १९९१ साली जनगणना झाली होती.
जनगणनेनंतर त्याचा तपशील आणि आकडेवारी असलेली पुस्तके सरकार प्रकाशित करतं. त्या पुस्तकांची जाडी आणि आतील आकड्यांच्या मुंग्या पाहिल्यावर तुम्ही आम्ही सामान्यजन ती वारूळं घरी आणत नाहीत. पण त्यामुळे खूप महत्त्वाच्या माहितीला आपण मुकतो आहोत हे आपल्या गावीही नसतं.
गावावरून आठवलं, जनगणनेत गावांची गणनाही होते. आपला गाव वगळता इतर गावे आपल्याला सामान्यतः भेंड्यांच्या वेळी लागतात. साधारणतः गणपतीत, दिवाळीच्या सुट्टीत, भरपूर वेळ असल्यावर आणि सगळे जमल्यावर हमखास पत्ते, इतर खेळ सुरू होतात. त्या खेळात गावाच्या भेंड्या आणि र वरून गावांच्या नावाचा रतीब पडतो. भेंड्या चढतात त्या र वरच्या गावांमुळे. जनगणनेत गावे आणि त्यांची नावे नोंदली जातात. संपूर्ण भारतातील सर्व गावांची नावे त्यात येत असल्याने त्यांची यादी त्यात असते. त्यात र वरून सुरू होणारी पण आजपर्यंत न ऐकलेली गावे शेकड्याने मिळतात. शिवाय असं गाव नाहीच असा चॅलेंज (आव्हानपेक्षा चॅलेंज हा शब्द अधिक आव्हानात्मक वाटतो, है नं?) कोणी दिला तर त्याला भारत सरकारची ही यादी दाखवून गावाच्या नावाचा पुरावा दाखवून समोरच्याला भेंड्याची भाजी भरवता येते. पण त्यासाठी जनगणनेचा तो ग्रंथ विकत घ्यावा लागेल का? तर नाही. आता घरोघर इंटरनेट आहे. तुम्हाला ही गावांची यादी इंटरनेटवर तयार मिळते. तीही भारत सरकारच्या सेंससच्या अधिकृत संकेतस्थळावर. त्या संकेतस्थळाचा पत्ता आहे www.censusindia.gov.in. त्यातल्या http://www.censusindia.gov.in/2011-VillageDirectory/Directory/short_code_rural_27.pdf ह्या संकेतस्थळ पत्त्यावर महाराष्ट्रातील गावांची यादी तुम्हाला पाहता येईल, किंवा डाऊनलोडही करता येईल. डाऊनलोड केलीत तर एक पीडीएफ फाईल मिळेल. त्यात एकूण ८०२ पाने आहेत. प्रत्येक पानावर ५० वा त्यापेक्षा अधिक गावांची नावे आहेत. म्हणजेच एकूण ८०२ पानांमध्ये किमान ४०,००० गावे आहेत. हा झाला फक्त महाराष्ट्र. अशी भारतातील सर्व गावे. म्हणजे मिळून किती गावे होतील याचा अंदाज घ्या. तो घेतलात की मग तुम्हाला कळेल की भारताला गावांचा देश का म्हणतात.
यंदा एका बाजूला जनगणना होत असताना त्याची सांगड Unique ID शी घातली जाणार आहे. इन्फोसिस कंपनीचे पूर्वीचे प्रमुख आणि ह्या UID राष्ट्रीय प्रकल्पाचा नंदन नीलेकणींच्या नेतृत्वाखालील सरकारी विभाग हे २०११ मध्ये हातात हात घालून काम करणार आहेत. २०११ ह्या नव्या वर्षांत आपल्याला भारताचे नागरिक म्हणून एक कायमचा क्रमांक आणि ओळखपत्र मिळण्याची शक्यता आहे. तुमचे गाव समुद्र किनाऱ्यालगत असेल तर हे ओळखपत्र लवकर मिळण्याची शक्यता आहे. किनाऱ्यापासून लांब असाल तर मात्र काही महिने आणखी किंवा कदाचित पुढल्या वर्षापर्यंत त्यासाठी थांबावं लागेल.
२०११ चा विशेष महिमा आहे तो हा असा...

ब्लुक वर एक लूक
बुकर पुरस्कार जगभर प्रसिद्ध आहेत. १९९७ चा बुकर पुरस्कार भारतीय लेखिका अरूंधती रॉय यांच्या 'दि गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज' ह्या कादंबरीला मिळाला, किंवा अगदी अलिकडचा २००६ बुकर पुरस्कार आपल्या किरण देसाईंना त्यांच्या 'दि इनहेरीटन्स ऑफ लॉस' ह्या कादंबरीला मिळाला. खेरीज व्ही.एस. नायपॉल किंवा सलमान रश्दी यांच्या कादंबर्यांना मिळालेले बुकर पुरस्कार आपण कुठे ना कुठे वाचले, ऐकले वा टीव्हीवर पाहिले आहेत. बुकर पुरस्कारांना ३८ वर्षांची परंपरा आहे. पन्नास हजार ब्रिटीश पौंडाचा (सुमारे ४१ लाख रूपये) हा पुरस्कार जगभर प्रचंड प्रतिष्ठेचा मानला जातो.
बुकर पुरस्कार जेवढे परिचयाचे आहेत तेवढेच ब्लुकर पुरस्कार अपरिचित आहेत. आपल्यापैकी बर्याच जणांना ब्लुकर पुरस्कार म्हणजे बुकर पुरस्काराची काहीतरी नक्कल असावी असं वाटण्याची शक्यता आहे. ते स्वाभाविकही आहे. कारण बुकर आणि ब्लुकर ह्या दोन शब्दांमध्ये चांगलच साधर्म्य आहे. शब्दांमधील अक्षरांमध्ये बराचसा सारखेपणा असला तरी बुकर आणि ब्लुकर यांच्यात माध्यमाचा मोठाच फरक आहे. बुकर पुरस्कार लिखित वा पुस्तकरूपाने प्रसिद्ध झालेल्या कादंबर्या वा साहित्याला दिला जातो. ब्लुकर हा शब्द ब्लॉग ह्या शब्दाशी साधर्म्य दाखवणारा आहे. इंटरनेटच्या महाजालात दररोज हजारो ब्लॉग्जची भर पडते आहे. ह्या ब्लॉग्जमधून ज्या कादंबर्या किंवा अन्य साहित्य (नंतर पुस्तकरूपाने तयार होण्याजोगे) निर्माण होते त्यांना 'ब्लुक' असे नाव दिले गेले आहे. बुक हे छापिल पुस्तक, आणि ब्लुक हे इंटरनेटवरील ब्लॉग (वा एखादे संकेत स्थळ) वर तयार झालेले पुस्तक. बुक साठी बुकर पुरस्कार आणि ब्लुक साठी ब्लुकर पुरस्कार असा एकूण प्रकार आहे.
ब्लुकर पुरस्काराची सुरूवात २००६ साली झाली. त्याची एकूण रक्कम फक्त ८१७५ ब्रिटीश पौंडांची (सुमारे ७ लाख रूपये) आहे. बुकर आणि ब्लुकर मध्ये एकूण सात पटींचा फरक आहे. २००६ आणि २००७ अशी एकूण दोनच वर्षे ब्लुकर पुरस्कार दिले गेले आहेत. तिसर्या वर्षीचे म्हणजे यंदाच्या २००८ ब्लुकर पुरस्काराची तयारी व घोषणा मात्र अद्यापि व्हायची आहे. ब्लुकर पुरस्कार तीन प्रकारात दिले जातात. पहिला काल्पनिक साहित्य किंवा फिक्शन. दुसरा काल्पनिक नसलेले लेखन अर्थात नॉन फिक्शन, आणि तिसरा वेब कॉमिक. पुरस्काराची एकूण सात लाखाची रक्कम ह्या तीन प्रकारातील पुरस्कारांसाठी विभागली जाते.
२००७ मधील ब्लुकर पुरस्कारात नॉन फिक्शन विभागातील पुरस्कार विजेता एक तरूण अमेरिकन सैनिक आहे. त्याचे नाव कोर्बी बझैल. २००४ साली तो इराकमध्ये सैनिकी ड्युटीवर होता. मशिनगन चालवणं आणि शेकड्यांनी गोळ्या झाडणं हे त्याचं काम होतं. बझैलला जेव्हा वेळ मिळे तेव्हा तो आपल्या टेंटमध्ये असलेल्या इंटरनेट कॅफेमध्ये न चुकता जात असे. इतर सैनिकही तिथे जात. पण त्यांचे लक्ष गेम खेळणे, सिनेतारकांची छायाचित्रे पाहणे वगैरेंकडे असे. बझैल इंटरनेट कॅफेत संगणकावर बसून आपल्या ब्लॉगमध्ये रोजचे अनुभव लिहून ठेवत असे. त्याचं हे लिखाण सतत आठ आठवडे चाललं. आठ आठवड्यांत त्याच्या ह्या ब्लॉगने चांगला आकारही घेतला होता. ह्या ब्लॉगमधून एक ब्लुक किंवा पुस्तक तयार होईल हे त्याच्या ध्यानीमनीही नव्हतं. आठ आठवड्यानंतर बझैलचा हा उद्योग त्याच्या अधिकार्यांच्या लक्षात आला. त्यांनी अर्थातच त्याचं पुढलं लिखाण थांबवलं. दरम्यानच्या काळात त्याचा ब्लॉग पत्रकारांमध्ये चांगलाच माहितीचा झाला होता. इराकमध्ये प्रत्यक्ष मशिनगन चालवणारा एक सैनिक खुद्द युद्धस्थळावर अनुभवलेला हाल कथन करत असल्याने कित्येक वृत्तपत्रांनी त्याच्या ब्लॉगचा उल्लेख आपल्या वृत्तांतून केला. साहजिकच प्रकाशकांचं लक्ष त्या ब्लॉगकडे गेलं. त्यातून My War: Killing Time in Iraq हे ब्लुक जन्माला आलं. ह्या पुस्तकाची रॉयल्टी बझैलला जी काही मिळाली असेल ती असेल. पण २००७ च्या ब्लुक पुरस्कारांचा तो मानकरी ठरला. बझैल म्हणतो, की मी ब्लॉग लिहीला नसता तर हे कधीच शक्य झालं नसतं.
ब्लुकर पुरस्कारांच्या निमित्ताने ब्लॉग ह्या माध्यमाचे साहित्य जगतातील योगदान किती महत्वाचे आहे हे लक्षात आल्यावाचून रहात नाही. बझैल सारखा शेकडो शत्रूसैनिक ठार मारणारा माणूस ब्लॉग लिहीतो तो केवळ आपल्या समाधानासाठी. पण त्यातून एक पुस्तक जन्माला येतं आणि पेनग्विनसारखा प्रकाशक ते प्रकाशित करतो ह्या उदाहरणावरून बरच काही घेण्यासारखं आहे. मराठीमध्ये आज हजाराहून अधिक ब्लॉग्ज दिसतात. युनिकोड फाँटस सहज उपलब्ध झाल्याने अगदी सामान्यातला सामान्य माणूस आपले विचार व अनुभव मराठीतील आपल्या ब्लॉगवर नोंदवू शकतो. गावोगावी पसरलेले सायबर कॅफे, ब्रॉडबँडचा झपाट्याने होत चाललेला प्रचार आणि अन्न, वस्त्र, निवार्याबरोबर आवश्यक बनू पहाणारं इंटरनेट यांतून अनपेक्षितपणे कितीतरी ब्लुक्स आपल्यासमोर येऊ शकतात.
तळागाळांतून उभं राहिलेलं दलित साहित्य हे मराठी साहित्यातील एक अतिशय महत्वाचं दालन आहे. पण लिहीलं गेलेलं सर्वच दलित साहित्य पुस्तक रूपाने छापलं गेलं असेल असं नाही. असं साहित्य सहजपणे ब्लॉगवर जाऊ शकतं. त्यातून ब्लुग्ज जन्माला येऊ शकतात. बुक आणि ब्लुक यात फरक हा की बुकसाठी प्रकाशक शोधावा लागतो, आणि तो सहजासहजी मिळत नाही. मी लिहीलं तर कोण प्रकाशित करणार, मग लिहा कशाला उगाच? असा प्रश्न करणारांना ब्लॉग आणि ब्लुक हे दोन शब्द म्हणजे वरदानच आहेत. कोणी प्रकाशित केलं नाही तरी तुमचा ब्लॉग प्रकाशित होऊ शकतो. त्यासाठी एक दमडीही खर्च येत नाही. संगणक व इंटरनेटचं जुजबी ज्ञान त्यासाठी पुरेसं असतं हा संदेश बझैलच्या उदाहरणावरून आपल्यापर्यंत पोहोचतो आहे.
मध्यंतरी एक मराठी ब्लॉग चालवणारा किशोरवयीन मुलगा भेटला. तो स्वतःच्या कवितांचा ब्लॉग चालवतो. तो म्हणाला "मला ब्लॉग हा प्रकार फारच आवडतो. कारण तो माझी एकही कविता 'साभार' पाठवत नाही. माझ्या सर्व कविता त्यावर प्रकाशित होतात. त्यावर कॉमेंटस आल्या की मला धमाल वाटते. कविता मी कुठेही पोस्टाने पाठवत बसत नाही."
मला वाटतं की आपल्या प्रकाशकांनी ह्या ब्लुक प्रकाराकडे लक्ष ठेवून असायला हवं. मराठीतला एखादा बझैल त्यातून त्यांना केव्हा मिळेल हे सांगता येणार नाही. मराठी ब्लॉग्जमधून जर ब्लुक्स जन्माला येऊ लागली तर शासनानेही त्याकडे स्वागताचा कटाक्ष टाकायला हवा. ब्लुक्ससाठी शासनाचा पुरस्कार जाहीर झाला तर मराठीच्या मुकुटातील ते एक नवे पिस ठरल्याशिवाय राहणार नाही.

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)