आपण ब्लॉग लिहीतो. त्यावरील लेखनाबरोबर छायाचित्रे, चित्रे वगैरे टाकली की आपल्या पोस्टस चांगल्या दिसतात. पण गुगल इमेजेसमध्ये सर्च केल्यावर उपलब्ध होणारी सगळीच चित्रे आपल्याला वापरता येत नाहीत. याचं कारण सरळ की ती चित्रे कॉपीरायटेड किंवा संबंधित कलावंताचा स्वामित्वहक्क राखलेली असतात. अशी हक्क राखून ठेवलेली चित्रे ब्लॉग वा संकेतस्थळावर वापरणं हे बेकायदेशीर ठरतं. त्यामुळे आपण शोधात असतो ते पब्लीक डोमेनमधील चित्रांच्या.
हा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ. समजा तुम्ही
छायाचित्रे / चित्रे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा

१८ मार्च, २०११
२३ फेब्रु, २०११
फोटोच्या दुनियेतील अलिबाबाची गुहा
एक दिवस असा येईल की तुमच्या संगणकावर एकही प्रोग्राम नसेल. असेल ती फक्त एकच सोय, इंटरनेट पाहण्याची. आता तुम्ही ह्यावर विचाराल की मला दररोज वर्ड प्रोग्राम वापरावा लागतो. त्यात मी दररोज काही ना काही पत्रे टाईप करतो. वर्ड प्रोग्रामच जर माझ्या संगणकावर नसेल तर माझे हे पत्रव्यवहाराचे काम मी करणार कसं? दुसरं कोणी म्हणेल मला दररोज एखादं पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन तयार करावं लागतं. ते कसं होणार. कोणी म्हणेल मी एक्सेलमध्ये दररोज हिशोबाचं काम फीड करतो, त्याचं काय होणार? त्यावरचं उत्तर आहे की हे सारे प्रोग्राम्स तुम्हाला इंटरनेटवर लाईव्ह वापरता येतील. म्हणजे तुम्ही एखाद्या विशिष्ट साईटवर जाल. तिकडे वर्डच्या लिंकवर क्लीक कराल. काही क्षणात मग तुमच्यासमोर वर्डप्रोसेसरचं कोरं पान येईल. तुम्ही त्या पानावर पत्र टाईप करायचं. हवा तो टाईप किंवा फाँट वापरायचा. बोल्ड, ईटालिक जसा हवा तसा त्याला आकार द्यायचा. परिच्छेद पाडायचे. सारं झालं की स्पेलींग चेकसुद्धा करायचं. मग तो तुमच्या अकाउंटमध्ये असलेल्या जागेत सेव्ह सुद्धा करून ठेवायचा. ही सारी सोय जर इंटरनेट देत असेल तर मग हवी कशाला तुमच्या संगणकात हार्ड डिस्क, आणि हवेत कशाला ते ऑफिस नामक अगडबंब प्रोग्राम्स? पॉवरपॉईंट असो की एक्सेल असो, तुम्ही क्लीक केलत की तो प्रोग्राम इंटरनेटच्या त्या एखाद्या साईटमध्येच उघडणार. एक्सेल असेल तर कोर्या कागदाच्या ऐवजी तुमची वर्कशीट समोर येऊन उघडणार. त्यात हवे ते आकडे फीड करा. मग फाईल सेव्ह करा.
आता ह्यावर कोणी म्हणेल की हे कसं शक्य आहे. किंवा हे शक्य होण्यासाठी अजून खूप वर्ष जावी लागतील. तर मंडळी, तसं नाहीये. ह्या सोयी अगदी आज म्हणाल तर आजच, नव्हे आता ह्या क्षणालाही उपलब्ध आहेत. आपलं गुगल सर्च इंजिन आहे त्याच्या वरच्या बाजूस डावीकडे पहा. खाली दिलेल्या वेगवेगळ्या लिंक्स दिसतात.
Web Images News Orkut Groups Gmail more ▼
त्यातली शेवटची लिंक आहे more . ह्या more वर क्लीक केलंत तर आणखी काही लिंक उघडतात. त्यातल्या Documents ह्या लिंकवर क्लीक करा. त्यानंतर येणार्या पानावर Take a tour of Google Docs नावाची लिंक तुम्हाला दिसेल. त्यावर क्लीक करा. आता पहा Create documents, spreadsheets and presentations online असं ठळठळीत शीर्षक मधोमध दिसेल. तुमच्याकडे गुगलची ईमेल किंवा गुगल अकाऊंट असेल तर Start Now ह्या खालील बाजूस दिसणार्या लिंकवर क्लीक करून लॉगिन करा. एक वर्डप्रोसेसर प्रोग्राम तुमच्यापुढे उभा असेल. त्यात तुम्ही वर्ड स्टाईलने पत्र टाईप करू शकता. एक्सेल स्टाईलने स्प्रेडशीट तयार करू शकता किंवा चक्क एखादे पॉवरपाईंट प्रेझेंटेशन सुद्धा त्यात तयार होऊ शकते. ह्यातून तयार होणारी तुमची फाईल सुद्धा गुगलच्या सर्व्हरवर सेव्ह करता येते. हवी तेव्हा जगात कुठूनही ती उघडता येते. प्रिंट करता येते वगैरे. २००८ च्या मे महिन्यात ही सोय इंटरनेटवर उपलब्ध आहे. सहजपणे. तुम्हाला चोरीचं म्हणजे पायरेटेड सॉफ्टवेअर वापरण्याची आवश्यकताच नाही. हे सारं शक्य झालं ते वेब अॅप्स किंवा वेब अॅप्लीकेशन्स ह्या संकल्पनेमुळे. तुम्हाला जो प्रोग्राम किंवा अॅप्लीकेशन लागतं ते वेबसाईटवरच उपलब्ध करून देणं ही वेब अॅप्सच्या मागची भूमिका.
आता हे वेब अॅप्सबद्दलचं प्रास्ताविक ऐकल्यानंतर कुणीतरी नक्कीच हात वर करून उभा राहणार आणि त्याची शंका विचारणार, हे मला अपेक्षित आहे. तो मला विचारणार की मी (म्हणजे तो) दररोज फोटोशॉप नावाचा प्रोग्राम वापरतो. त्यात त्याचे रंगीत फोटो उघडतो. त्याचे कृष्ण- धवल म्हणजे ब्लॅक अॅन्ड व्हाईट करतो. किंवा, त्या फोटोंवर निरनिराळ्या प्रक्रिया करतो. फोटोशॉप ह्या अवाढव्य आणि पॉवरफुल म्हणता येईल असा प्रोग्राम ते सारं शक्य करतो. ह्या त्याच्या कामासाठी तरी संगणकावर प्रोग्राम हवा की नको? की ते सारं कामही इंटरनेटवर करता येईल? तर मंडळी, ह्या प्रश्नाचं उत्तर आहे - होय, फोटोवरचं ते बहुतेक सारं कामही इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या वेबअॅपवर करणं शक्य आहे. आता हे उत्तर ऐकल्यानंतर लगेचच पुढला प्रश्न किंवा शंका ही की हे शक्य होण्यासाठी किती काळ वाट पहावी लागेल. आज वर्ड, एक्सेल, पॉवरपाईंटसारख्या प्रोग्रामचं काम वेबअॅप करीत आहेत. फोटोशॉपसारख्या प्रोग्रामचं काम करणारं वेबअॅप केव्हा उपलब्ध होणार? ह्या प्रश्नाचं उत्तरही खूप आशादायक आहे. मंडळी, फोटोशॉपसारखं काम करणारं वेबअॅप आज ह्या क्षणाला इंटरनेटवर उपलब्ध आहे. ज्या साईटवर ते उपलब्ध आहे त्या साईटचं नाव आहे picnik.com.
हे पिकनीक डॉट कॉम नाव ऐकलं की आपल्या डोळ्यापुढे काहीतरी वेगळच चित्र उभं राहील. काहीतरी सहली किंवा पिकनीकच्या मजेसंबंधीची ही साईट असेल असा अंदाज आपण पटकन करूनही टाकू. पण नाव छोटं लक्षण मोठं अशा प्रकारची ही picnik.com आहे. त्यावर गेल्याशिवाय मी काय म्हणतोय याचा अंदाज येणार नाही. पिकनीक डॉट कॉम ला मी फोटोच्या दुनियेतली अलिबाबाची गुहा असं म्हणतो. त्याचं कारण सरळ आहे. ह्या साईटवर फोटोशॉपसारखं वेबअॅप उपलब्ध आहे, आणि त्यात फोटोवर काम करण्यासाठी लागणार्या शेकडो सोयी आणि टूल्स उपलब्ध आहेत. ह्या सोयी कोणकोणत्या याची ही एक वरवरची यादी पहाः १) रंगीत फोटोंचे ब्लॅक अँड व्हाईट फोटो तयार करणे. २) समजा एखाद्या फोटोत कॅमेरा तिरका धरल्याने माणूस वा दृश्य तिरकं आलं असेल तर ते सरळ (Rotate) करणं. ३) एखाद्या फोटोतला विशिष्ट भाग कापून टाकणं (Crop करणं). ४) एखाद्या फोटोत Exposure चा दोष आल्याने फोटोत अनावश्यक सावली वा अंधुकता असेल तर त्याची दुरूस्ती करणं. ५) फोटोतले रंग कमीअधिक गडद वा फिकट वाटत असतील तर ते सुधारणं. ६) फोटोतला शार्पनेस वाढवणं. ७) फोटोत रेडआय नावाचा दोष काही वेळा दिसतो. डोळे अधिक लाल वगैरे वाटतात. तो रेडआय चा दोष दूर करणं. ८) एखाद्या फोटोतल्या माणसाचे पानामुळे लाल लाल झालेले दात पांढरे शुभ्र करणं ९) फोटोला सुंदरशी फ्रेम किंवा चौकट देणं. १०) फोटोचे कोपरे गोलाकार करणं. ११) फोटोखाली छान अक्षरांत टीपा किंवा नावे वेगवेगळ्या रंगात देणं. (पिकनीक फॉंट फार सुंदर आहेत. ते पहाच. १२) फोटोचं रेखाचित्र तयार करणं. १३) फोटो नाईटव्हिजन (हिरव्या प्रकाशात) मध्ये काढल्याप्रमाणे परिणाम तयार करणं. वगैरै वगैरे वगैरे.
ह्या सुट्टीच्या दिवसात छोट्या दोस्तांसाठी ही picnik.com एकदम मस्त टाईम पास साईट आहे. टाईम पास तर आहेच पण आपले उद्योग आणि उपदव्याप चाललेले असताना आपण नकळत फोटोचं तंत्रही शिकत असतो. आजकाल घराघरातून टीव्ही जसे आलेले आहेत, तसे डिजिटल कॅमेरेही आले आहेत. त्यातले फोटो आपण आपल्या संगणकात साठवत असतो. त्या फोटोंवर सुद्धा आपल्याला हे सारे इफेक्ट आणि युक्त्या वापरून पाहता येतील. मात्र, मूळ फोटो शाबूत ठेवून त्याच्या कॉपीवरच हे उद्योग करून पहा. नाहीतर चांगलेच फटकेच प़डतील. पण समजा तुमच्याकडे डिजिटल कॅमेरा नसेल तर इंटरनेटवरचे कोणतेही फोटो तुम्हाला घेता येतील. तुमच्या संगणकातले इतर काही निरूपयोगी फोटो किंवा चित्रे सुद्धा त्यासाठी उपयोगात येतील. सगळे उद्योग झाल्यानंतर आलेल्या इफेक्टचा फोटो तुम्हाला तुमच्या संगणकावर सेव्ह करता येतो. किंवा flickr.com, पिकासा वेब अल्बम वगैरेमध्येही ठेवता येतो.
पिकनीक डॉट कॉमचं कौतुक जगातल्या अनेक काँप्युटर मॅगझीन्सनी तोंड भरून केलं आहे. पीसी मॅगझीन पासून ते सीनेट पर्यंत, आणि वॉल स्ट्रीट जर्नल पासून ते बीबीसी व टाईम मॅगझीनपर्यंत अनेकांनी पिकनीक डॉट कॉमचं परिक्षण छापलं आहे. पिकनीक सारखी फोटोचं अॅप देणारी वेबसाईट आज तरी विरळा आहे. पण मंडळी, अतिशय झपाट्याने आपलं इंटरनेट विकसित होतय. पूर्वीसारख्या नुसत्या मुक्या साईटस आता जुनाट गणल्या जाऊ लागल्या आहेत. वेबअॅप आणि डायनॅमिक कंटेंटचे आता दिवस आहेत. पिकनीक डॉट कॉम ही सध्याच्या दिवसांचीच एक प्रतिनिधी आहे.
फोटोग्राफीमध्ये रस असणार्या प्रत्येकाने पिकनीक ला भेट द्यायला हवी.

२१ फेब्रु, २०११
सुमोपेंटः ऑनलाईन फोटोशॉप काऊंटर
अॅडोबी फोटोशॉप हे अजस्त्र ताकद असलेलं सॉफ्टवेअर आहे. त्याच्या भजनी तुम्ही एकदा लागलात की शिकता भुई थोडी होते. किंवा, फोटोशॉप शिकता शिकता पुरेवाट होते. ज्यांनी फोटोशॉप ह्या विषयावर हजारभर पानांची पुस्तके इंग्रजीत लिहीली आहेत असे अमेरिकन लेखकही आम्ही अजूनही फोटोशॉपचे विद्यार्थी आहोत, असं प्रस्तावनेत आवर्जुन लिहीतात. फोटोशी संबंधित काहीही काम निघालं की संबंधिताला आवर्जुन आठवण होते ती फोटोशॉप नामक सॉफ्टवेअरचीच. खरं तर फोटोशॉप मधला 'शॉप' हा शब्द कमालीच्या विनयाने आलेला आहे. ते शॉप म्हणजे दुकान नव्हेच, ते एक अतिप्रचंड सुपर मार्केट किंवा खरं तर तो फोटो मेगा मॉलचा प्रचंड असा कॉम्प्लेक्स आहे. आज तुम्ही फोटोशॉपची नवीन आवृत्ती म्हणजे सीएस-४ विकत घ्यायला गेलात तर त्याची अधिकृत किंमत आहे ६९९ डॉलर्स म्हणजे अदमासे ३४,००० रूपये. एवढी मोठी रक्कम टाकून फोटोशॉपची लायसन्स्ड कॉपी विकत घेणारे हे फोटो क्षेत्रातले पक्के व्यावसायिक किंवा मोठ्या संस्थाच असू शकतात. थोडक्यात, फोटो सॉफ्टवेअरच्या जगतातलं फोटोशॉप हे एक फाईव्ह स्टार हॉटेल आहे. फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जाऊन साधा चहा घ्यायचा म्हंटला तरी दीड-दोनशे रूपये मोजायची तयारी असावी लागते. ज्यांची अशी तयारी नसते ते फाईव्ह स्टार हॉटेलच्या नादी न लागता एखाद्या फास्ट फूड काऊंटरवर जाऊन आठ-दहा रूपयांत आपली चहाची तलफ भागवतात. असच एक फोटोशॉपसदृश्य फास्ट टूल काऊंटर म्हणजे इंटरनेटवरचं सुमोपेंट.
सुमोपेंट ह्या आपल्या मुख्य विषयाकडे वळण्यापूर्वी आपण नजर टाकूया अॅडोबी फोटोशॉपच्या गेल्या १८ वर्षांच्या वाटचालीकडे.. १९९० च्या फेब्रुवारीमध्ये फोटोशॉपची पहिली आवृत्ती म्हणजे व्हर्जन १.० आलं होतं. पुढे लगेचच काही महिन्यांनी २.० ही आवृत्ती आली. १९९४ साली ३.०, १९९६ साली ४.०, १९९८ साली ५.०, १९९९ मध्ये सुधारित ५.५, २००० मध्ये ६.०, २००१ मध्ये ७.० अशा वेगाने फोटोशॉप घोडदौड करत राहिलं. त्याची लोकप्रियता वाढत गेली. पुढे २००३ साली फोटोशॉप सीएस (म्हणजे ८.०), २००५ मध्ये सीएस२ (म्हणजे ९.०), २००७ मध्ये सीएस३ (म्हणजे १०.०) आणि २००८ सप्टेंबरमध्ये म्हणजे दोन महिन्यांपूर्वी सीएस४ (म्हणजे ११.०) ही सध्या ताजी असलेली फोटोशॉपची आवृत्ती आली. ज्यांनी २००७ साली म्हणजे सुमारे वर्षभरापूर्वी फोटोशॉपची सीएस३ ही तेव्हा नवीकोरी असणारी आवृत्ती अदमासे २०,००० रूपयांना अधिकृतपणे विकत घेतली होती, त्यांना आता सीएस४ चा अपग्रेड घेण्यासाठी सुमारे ९००० रूपये आणखी मोजावे लागतील.
वरच्या परिच्छेदात फोटोशॉपचा इतिहास भूगोल अशासाठी सांगितला की फोटोशॉपचा विकसित होण्याचा वेग प्रचंड आहे. जवळ जवळ दरवर्षी एक नवी आवृत्ती फोटोशॉपवाले आपल्यासमोर ठेवतायत. नवी आवृत्ती म्हणजे काहीतरी नवं त्यात असणार हे ओघानच आलं. ते नवं हवं असेल तर त्याची किंमत मोजणं हेही ओघानच आलं. ज्यांना ही किंमत मोजणं अवघड किंवा अशक्य आहे त्यांचेसाठी फोटोशॉपसारखं अधिकृतपणे मोफत उपलब्ध असणारं सॉफ्टवेअर म्हणजे गिंप. त्याची ताजी आवृत्ती म्हणजे २.६. फोटोशॉपच्या अकरा आवृत्त्यांपुढे गिंपच्या तीन आवृत्त्या हा वेग धीमा आहे हे खरच. गिंपला काही जण गरिबाचं फोटोशॉप असंही म्हणतात. ओपन सोर्स व अधिकृतपणे मोफत उपलब्ध असलेलं गिंप www.gimp.org ह्या साईटवरून तुम्हाला डाऊनलोड करता येईल. गिंप फोटोशॉपच्या जवळ येण्याचा आणि स्पर्धा करण्याचा प्रयत्न करतय हेही खरं, पण फोटोशॉपचा वेग महाप्रचंड आहे. तो मान्य करायलाच हवा.
आपला आजचा मुख्य विषय म्हणजे सुमोपेंट. त्या विषयाच्या नमनाला फोटोशॉपसंबंधी घडाभर तेल ओतावं लागलं याला तसच कारण आहे. एक म्हणजे सुमोपेंट हे इंटरनेटवर अगदी अलिकडे उपलब्ध झालेलं मिनी फोटोशॉप म्हणता येईल असं ऑनलाईन टूल आहे. सुमोपेंट हे तुमच्या संगणकावर इन्स्टॉल करावं लागत नाही. ते इंटरनेटवर तयारच उपलब्ध असतं. तुम्ही इंटरनेटवर www.sumopaint.com/app ह्या साईटवर गेलात की तुमच्या पुढे हे मिनी फोटोशॉप दत्त म्हणून उभं राहतं. ते अधिकृतरित्या मोफत आहे. त्यामुळे किंमत किती आणि दरवर्षी ती किती वाढणार याची कसलीच चर्चा उद्भवत नाही. भविष्यकाळातही सुमोपेंट विनामूल्यच राहणार असल्याची अधिकृत घोषणा त्यांनी केली आहे. त्यामुळे सुमोपेंट अतिशय वेगाने लोकप्रिय होत चाललं आहे. सुमोपेंट इंटरनेटवर थेट उघडत असलं तरी बर्यापैकी फास्ट आहे. त्यात तुम्ही तुमच्या हार्ड डिस्कवरील इमेज किंवा फोटो उघडू शकता. तुमचा फोटो क्रॉप करणं, तो लहान-मोठा, उभा-आडवा (रोटेट), उलटा सुलटा (फ्लीप) करणं, लेयर्समध्ये काम करणं, शार्पन, ब्लर, एम्बॉस, ग्लो करणं हे सारं त्यात आहेच. पण अनेकविध फिल्टर्सही त्यात उपलब्ध आहेत. फोटोशॉपसारखी तीस पेक्षा अधिक टूल्स त्यात दिली आहेत. विविध ब्रशेस, इफेक्टसची जोड त्यांना आहे. बेव्हेल, ग्रॅडीयंट, शॅडोजची व्यवस्था त्यात आहे. सिलेक्शन टेक्नीक्स, फेदर इफेक्ट, अल्फा लेयर, ब्राईटनेस, काँट्रास्ट, ह्यू, सॅच्युरेशन हे सगळंही त्यात आहे. मुख्य म्हणजे वर म्हंटल्याप्रमाणे हे सगळं मिळविण्यासाठी तुम्हाला करायचं काहीच नसतं. तुम्ही फक्त सुमोपेंट डॉट कॉम /अॅप ह्या साईटवर जायचं. इतकच.
ज्या देशात लिनक्स ही ऑपरेटींग सिस्टम तयार झाली त्या फिनलंड ह्या देशात हा सुमोपेंट तयार झाला आहे. सध्या त्याची ०.८ ही बाल्यावस्थेतील आवृत्ती नेटवर आहे. डिसेंबर २००८ अखेरीपर्यंत १.० ह्या पूर्ण आवृत्तीत तो प्रवेश करील अशी अपेक्षा आहे. फोटोशॉपमध्ये असलेल्या अनेक गोष्टी आज सुमोपेंट मध्ये नाहीत हे खरं आहे. पण ज्या पद्धतीने सुमोपेंट विकसित होतो आहे, तो पाहता त्याच्या पुढल्या आवृत्त्या फोटोशॉपच्या जवळ जवळ जात राहतील असं निश्चितपणे वाटतं. सुमोपेंट मध्ये तुमच्या फोटोवर काम करून झालं की त्या कामासकट तुमचा फोटो तुमच्या हार्ड डिस्कवर तुम्हाला सेव्हही करता येतो. किंवा, हवं तर सुमोपेंटच्या साईटवरच तो सेव्ह करून ठेवण्याची सोयही आहे. एवढं सारं असून फोटोशॉपच्या तुलनेत सुमोपेंट वापरायला फार सोपा आहे. लहान मुलांना ह्या साईटवर सोडलत तर काही काळात ती त्यात एवढी रमून जातात की निरर्थक गेम्सकडे त्यांचे लक्षही जात नाही असा अनुभव आहे.
सुमोपेंटसारख्या दुसर्या साईटस म्हणजे www.picnik.com आणि www.fotoflexer.com. ह्यातील पिकनिक डॉट कॉम गेली काही वर्षे नेटवर आहे. त्यामुळे ती चांगली विकसितही आहे आणि सुमोपेंटच्या तुलनेत थोरल्या भावासारखी आहे. पण तरीही ह्या मोफत उपलब्ध असणार्या तिन्ही साईटसमध्ये मला प्रभावित करते ती सुमोपेंट.
मुद्दा अगदी सरळ आहे. सुमोपेंट विनामूल्य आहे. तो इन्स्टॉल करावा लागत नाही. असं असूनही तो खूप काही देतो. तो मनोरंजनही करतो. तुमच्या फोटोवर काम करण्याचं कामही तो करतो. तुमची हार्ड डिस्कची जागाही तो मागत नाही. तुमची मेमरीही तो खात नाही. वेगाने चालतो. इंटरनेट अॅप्स आता वयात येत चालली आहेत याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे सुमोपेंट. भविष्यकाळात विंडोज किंवा लिनक्ससारखी संपूर्ण ऑपरेटींग सिस्टम, संपूर्ण एम.एस. ऑफिससारखा सूट आणि आपल्याला संगणकावर लागणारं सगळच इंटरनेटवर तयार मिळणार आहे असे संकेत ह्या सार्यातून मिळत आहेत. एकूणच संगणक जगतातील तंत्रज्ञानाचा वेग क्षणाक्षणाला वाढत चालला आहे, यात शंका नाही.

२० फेब्रु, २०११
डिजिटल प्रतिबिंब तयार करण्याची सोय
कोणत्याही छायाचित्राचे प्रतिबिंब (पाण्यात पडणारे वगैरे) मोफत तयार करून देणारी वेबसाईट म्हणजे
http://picreflect.com/
ह्या वेबसाईटवर आपण हव्या त्या छायाचित्राची jpg किंवा तत्सम फाईल अपलोड करायची. नंतर Generate ह्या बटणावर क्लीक करायचं आणि picreflect.com ने तयार करून दिलेली प्रतिबिंबाच्या फोटोची फाईल डाऊनलोड करून घ्यायची. इतका सारा सोपा मामला. वाघाच्या फोटोच्या प्रतिबिंबाची picreflect.com ने तयार करून दिलेली फाईल खाली पहाः

प्रतिबिंब ज्या रंगात हवे तो रंग निवडण्याची संधी picreflect आपल्याला देतो. त्या खेरीज प्रतिबिंब आकाराने मोठे हवे की छोटे हवे हेही आपण ठरवू शकतो. नेमके कोणत्या प्रकारचे सेटींग्ज ह्या संदर्भात picreflect देऊ करतो ते त्यांच्या वेबसाईटच्या दर्शनी पानावर दाखविलेले आहेत. त्या पानाचे छायाचित्र खाली दिले आहे.

वर दाखविलेल्या वेब पानावर लाल बाणांनी प्रतिबिंबांचे सेटींग्ज दाखविले आहेत. सर्वांत तळाशी लाल बाणाने Generate बटण दाखविले आहे.
महत्वाचा भाग हा की हे आपण हे थेट picreflect.com ह्या साईटवरच करून पाहू शकता. कोणतेही सॉफ्टवेअर त्यासाठी डाऊनलोड करण्याची आवश्यकता नाही. इंटरनेटचे माध्यम भविष्यकाळात कशा प्रकारची सेवा देऊ लागतील याची ही केवळ एक झलक आहे

अडीच लाख छायाचित्रे (हंगेरी देशातील साईट)
http://www.sxc.hu/
हंगेरी देशातली साईट. २,५०,००० हून अधिक मोफत (आणि उत्तम दर्जाची) छायाचित्रे डाऊनलोडींग साठी देणारी. अतिशय High Resolution असलेली ही छायाचित्रे खरोखरीच प्रेक्षणीय आहेत. विविध विषयांवरील छायाचित्रांचे वर्गीकरण करण्यांत आले आहे. मोफत रजिस्ट्रेशन करणे आवश्यक असले तरी त्याचे चीज करणारी ही साईट आहे.

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)