इंग्रजी लेखन शाळेत जे चिकटतं ते पुढे सुटत नाही. नोकरी व्यवसायातही पत्रं, ईमेल, मेमो, रिमार्कस लिहीणं हे चालतच राहतं. फक्त भर पडते ती आणखी घाईची, आणि त्यातून झालेल्या चुकांची. अशा सर्व स्थितींमध्ये Paper Rater हे उत्तम आणि मोफत असलेलं वेब अॅप आपल्याला एखाद्या आपल्या विश्वासू सहकाऱ्यासारखं कामी येतं..
वेब अॅप्स लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
वेब अॅप्स लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
१५ ऑक्टो, २०११
१० मार्च, २०११
PDFESCAPE: वेब अॅपचा वापर (भाग 2)
![]() |
| PDFESCAPE वेब अॅपचा आतला भाग असा आहे. एक तीन पानी पीडीएफ फाईल तिथे उघडली. त्यातील पहिल्या पानावर एक स्टीकी नोट टाकली. ती वरील चित्रात दिसत आहे. |
PDFESCAPE सध्या वापरण्यासाठी उपलब्ध आहे. मात्र अजुनीही त्याचा विकास चालू आहे. सध्या ते बीटा म्हणजे चांचणी आवृत्ती म्हणून इंटरनेटवर आलं आहे. तुम्हाला अपेक्षित असलेली प्रत्येक गोष्ट ह्या पीडीएफ एडिटर मध्ये आज नाही हे खरं असलं तरी ज्या सोयी आज उपलब्ध आहेत त्या अतिशय उपयुक्त आहेत.
PDFESCAPE मध्ये तुम्ही काय करू शकताः1) तुमच्या पीडीएफ फाईलमधील कोणताही भाग (अक्षरे, शब्द, चित्र वगैरे) तुम्ही पांढरा करू शकता. आपण कागदावर व्हाईट फ्लुईड लावून करेक्शन करतो, तसलाच हा प्रकार.
2) पांढऱ्या केलेल्या भागावर तुम्ही हवा तो शब्द टाईप करू शकता. म्हणजेच तुम्ही अंतिमतः टेक्स्ट एडिटींग करू शकता. मात्र थेट शब्दावर टेक्स्ट कर्सर आणून एडिटींगची सोय अजून आलेली दिसत नाही.
3) तुमच्या पीडीएफ फाईलमध्ये तुमची कॉमेंट म्हणून तुम्ही एखादी यलो स्टीकी नोट लावून त्यावर शेरा देऊ शकता. ही सोय कार्यालयांसाठी फारच चांगली आहे.
4) पीडीएफ पानावर एखादे वा अनेक चित्रे (फोटो वगैरे ग्राफीकही) टाकू शकता.
5) कोणत्याही शब्दाला वा चित्राला हायपरलिंक देऊ शकता.
6) पीडीएफ मधला एखादा फॉर्म भरू शकता. किंवा एखादा फॉर्म तयार करू शकता.
7) हे बदल करता करता ते सेव्हही करू शकता.
8) पीडीएफ पाने उभी आडवी (रोटेट लेफ्ट/राईट) करू शकता. पाने डिलीट करू शकता. पानांची जागा आतल्या आत बदलू शकता.
9) युनिकोड मराठीची सोय आहे. मी मराठी मजकूर जोडाक्षरांसहित टाईप करू शकलो.
10) पीडीएफ रीडर म्हणून म्हणजे केवळ पीडीएफ फाईल वाचनासाठीही PDFESCAPE वापरता येईल.
ह्या साऱ्या सोयी मोफत उपलब्ध आहेत.
काही लक्षात ठेवण्याजोग्या गोष्टी अशाः
1) काही मर्यादा आहेत. उदाहरणार्थ पीडीएफ फाईल 50 पानांच्या पेक्षा अधिक असेल तर ती उघडता येत नाही.
2) क्रोम ब्राऊझर मध्ये हे वेब अॅप वापरू नका. ते फक्त इंटरनेट एक्स्प्लोअरर वा फायरफॉक्स मध्ये वापरा. क्रोममध्ये अनेक बग्ज दिसून येतात.
3) असा अन्य पीडीएफ एडिटर (वेब अॅप) इंटरनेटवर उपलब्ध असल्याचे माझ्या माहितीत नाही. आपणास माहित असल्यास वाचकांनी कृपया कॉमेंटद्वारा ती माहिती द्यावी.
राहुलने गावातल्या सायबरकॅफेत बसून PDFESCAPE वापरून ऑफिसची पीडीएफ फाईल एडिट करून पाठवली. एक चांगलं वेब अॅप म्हणून त्याची माहिती मला ईमेल करून कळवली. मी ती तुमच्याशी शेअर केली. तुम्हीही PDFESCAPE वापरून पहा. अनुभव मला कॉमेंटस देऊन जरूर कळवा.
९ मार्च, २०११
PDFESCAPE एक जबरदस्त वेब अॅप
ही गोष्ट आहे राहुलची. राहुल एका कंपनीत एक्झेक्युटीव्ह आहे. एका घरगुती कामासाठी तो गावी गेला होता. तिथे कंपनीतून तातडीचा फोन आला की तुम्हाला एक पीडीएफ फाईल ईमेलने पाठवली आहे. ती पाहून लगेच तुमच्या कॉमेंटस पाठवा. इटस अर्जंट.
राहुलने गावी लॅपटॉप नेला नव्हता. गावातल्या सायबर कॅफेत जाणं भाग होतं. राहुल तिथल्या एका सायबर कॅफेत गेला, संगणकावर बसला. ईमेल पाहिली, ती पीडीएफ फाईल त्याने डाऊनलोड सुद्धा केली. पण पुढे गाडं अडलं. राहुलला ती पीडीएफ फाईल एडिट करायची होती. गावातल्या त्या सायबर कॅफेत पीडीएफ एडिटर किंवा अॅडोबी अॅक्रोबॅट नव्हता. कुठून तरी तो डाऊनलोड करायचा, मग तो त्या सायबर कॅफेच्या संगणकावर लावायचा एवढा वेळ राहुलकडे नव्हता. शिवाय गावातलं इंटरनेट कनेक्शनही काहीसं स्लो होतं. राहुलची घाईघाईने फोनाफोनी सुरू झाली. पीडीएफ एडिटर इंटरनेटवर कुठे मिळेल? हा प्रश्न तो वेगवेगळ्या मित्रांना विचारत होता. शिवाय गुगलवरही शोधाशोध चालू होती. पण गुगलच्या त्या हिमालयाएवढ्या राशीतून हाती काही लागत नव्हतं.
शेवटी एका मित्राने त्याच्या एका अमेरिकन मित्राकडून माहिती मिळवली. त्याने प्रश्न सुटला.
इंटरनेटवर एक चांगला पीडीएफ एडिटर उपलब्ध झाला www.pdfescape.com ह्या साईटवर. PDFEscape हे एक वेब अॅप्लीकेशन आहे. म्हणजे हा प्रोग्राम तुम्हाला डाऊनलोड करण्याची, वा इन्स्टॉल करण्याची गरज ऩाही. इंटरनेटवर लगेच वापरण्यासाठी तो तयार आहे. तुम्ही फक्त इंटरनेट चालू करून त्या साईटवर जायचं, तेथेच तुमच्या हार्ड डिस्क मधली पीडीएफ फाईल उघडायची आणि एडिट करायला सुरूवात करायची. एडिट करून झालं की ती सेव्ह करायची. अतिशय सुलभ, सोपं आणि वेळ वाचवणारं...
PDFEscape ची वैशिष्ट्ये काय आहेत, त्यावर काय काय करता येतं वगैरे माहिती आपण पुढल्या भागात पाहू....

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)