अनेकांना आवडणारा हा मोफत प्रोग्राम आहे. त्याचं नाव PicPick. आपल्याकडे तो नसेल तर आपणही तो जरूर डाऊनलोड करून वापरून पहा.
PicPick ह्या दुव्यावर डाऊनलोडींगसाठी उपलब्ध आहे.
PicPick हा मुख्यत्वे स्क्रीन कॅप्चर प्रोग्राम आहे. पण स्क्रीन कॅप्चरच्या सोयीबरोबर त्यात इतरही अवजारे आहेत. त्यातलं एक अवजार म्हणजे
खास फ्रीवेअर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा

११ मार्च, २०११
५ मार्च, २०११
टक्स पेंटची सही धम्माल. भाग - 3
(एकूण तीन भागात टक्स पेंटची माहिती आली आहे. ही माहिती आपण भाग 1 ते भाग 3 अशी क्रमाने वाचावी अशी विनंती आहे. हा तिसरा भाग आहे.पहिल्या आणि दुसऱ्या भागाच्या लिंक्स इथे आणि त्या त्या भागाच्या खाली दिल्या आहेत. त्यावर क्लीक करून पुढे जाता येईल. )
- मुलांनो,
तुम्ही छान चित्र काढलीत तर ती सेव्ह करायला विसरू नका.
सेव्ह केलीत की तुमच्या चित्राची फाईल अटॅच करून आपल्या संगणक डॉट इन्फो कडे sanganakinfo@gmail.com ह्या ईमेलवर जरूर पाठवा. सोबत तुमचा एक छान फोटो सुद्धा पाठवा.
छान चित्रे काढणाऱ्या मुलांची नावे आणि त्यांचे फोटोसुद्धा आपण संगणक डॉट इन्फो वर प्रसिद्ध करणार आहोत. आहे ना धम्माल...आणि हो, ही चित्रे तुम्ही केव्हाही पाठवू शकता. पुढल्या महिन्यात किंवा त्याच्या पुढल्या महिन्यात सुद्धा. शिवाय कितीही चित्रे तुम्ही पाठवू शकता. त्यामुळे आता आपली स्कुलची परीक्षा असेल तर घाई करू नका. आता परिक्षेची तयारी करा. परीक्षा संपली की मगच टक्स पेंट उघडा. आता सगळा वेळ अभ्यास करा. सुट्टीत आपला संगणक आणि आपला टक्स पेंट, करा हवा तेवढा एंजॉय.. - सो, सगळं जग तुमचं चित्र आणि तुमचा फोटो पहायला उत्सुक आहे. आहे ना मज्जा!! चला तर, लागा कामाला! हॅप्पी टक्स पेंट टू यू ऑल कीडस..
- आणि, बेस्ट ऑफ लक फॉर युवर एक्झाम्स... बाय
एंजॉय टक्सपेंटः मुलांसाठी धम्माल गेमः भाग - 2
(एकूण तीन भागात टक्स पेंटची माहिती आली आहे. ही माहिती आपण भाग 1 ते भाग 3 अशी क्रमाने वाचावी अशी विनंती आहे. हा दुसरा भाग आहे.पहिल्या आणि तिसऱ्या भागाच्या लिंक्स इथे आणि त्या त्या भागाच्या खाली दिल्या आहेत. त्यावर क्लीक करून पुढे जाता येईल. )
टक्स पेंट उघडताच प्रोग्रामचे चित्र तुमच्या समोर येईल. त्यावर एकदा क्लीक करा. खाली दाखवलेली विंडो तुमच्या समोर हाजिर होईल.
आता ह्या विंडोत तुम्हाला हवं ते करण्याची मुभा आहे. बाकी सारं आपल्या नेहमीच्या पेंट ब्रश सारखंच आहे. फक्त आपल्याकडे असलेले वेगवेगळे रबर स्टॅप्स वापरून वेगवेगळी मजा आपल्याला आणि आपल्या बच्चे कंपनीला करता येते.
वरील Paint टूल वर क्लीक करा आणि रेघोट्या मारा. किंवा, Stamp टूलवर क्लीक करून उजवीकडे कोणकोणती चित्रे उपलब्ध होतात ते पहा. आता त्यातून मुलांच्या डोक्यातून कशा वेगवेगळ्या कल्पना तयार झाल्या ते खालील चित्रांवरून तुमच्या लक्षात येईल.
पूर्ण आकारात ही आणि आणखी शेकडो चित्रे पहायची असतील तर टक्स पेंटच्या साईटवरील गॅलरी पहायला हवी. त्यात वरील चित्र तुम्हाला पूर्ण आकारात पाहता येईल.
आणि, हो, आणखी एक गंमत आहे. ती पाहू टक्स पेंट धम्माल च्या भाग 3 मध्ये.
लहान मुलांसाठी धम्माल 'टक्सपेंट' : भाग -१
(एकूण तीन भागात टक्स पेंटची माहिती आली आहे. ही माहिती आपण भाग 1 ते भाग 3 अशी क्रमाने वाचावी अशी विनंती आहे. हा पहिला भाग आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या भागाच्या लिंक्स त्या भागाच्या खाली दिल्या आहेत. त्यावर क्लीक करून पुढे जाता येईल. )
पेंट ब्रश हे छोटसं पिल्लू मानलं तर टक्स पेंट त्याच्या पुढे हत्तीसारखा आहे. दोघांमध्येही भरपूर रंगपंचमी करता येते. कधी कधी तर मोठी माणसंही टक्स पेंट खेळता खेळता मुल होऊन रमलेली दिसतात.
पुढलं काही सांगण्याअगोदर हा टक्स पेंट प्रथम डाऊनलोड करून घ्या. त्यासाठी ह्या दुव्यावर क्लीक करा. टक्स पेंटचा डाऊनलोड दोन भागात आहे. पहिला भाग म्हणजे टक्स पेंट हे अॅप्लीकेशन अर्थात मूळ प्रोग्राम. तो 11 एम.बी. चा आहे. दुसरा भाग हा टक्स पेंट साठी अॅड ऑन म्हणजे त्यात भर टाकणे आहे. ह्या अॅड ऑनमध्ये वेगवेगळ्या प्राण्यांची, फुलांची, पदार्थांची, पक्षांची वगैरे वगैरे रेलचेल आहे. ती मुलांना खूप आवडते. हा अॅड ऑन मूळ प्रोग्रामच्या तिप्पट मोठा म्हणजे 39 एम.बी. चा आहे. तो डाऊनलोड करण्यासाठी ह्या दुव्यावरच उपलब्ध आहे. याच पानावर मूळ प्रोग्रामच्या उजवीकडे शेजारीच याच्या डाऊनलोडींगचीही लिंक दिलेली आहे.
थोडक्यात, 11 एम.बी. चा मूळ प्रोग्राम आणि 39 एम.बी. चे अॅड ऑन (याला रबर स्टॅंप्स असं म्हणतात) प्रथम डाऊनलोड करून घ्या.
टक्स पेंटचं वैशिष्ट्य म्हणजे तो अधिकृतपणे आणि पूर्णपणे मोफत आहे. दुसरी गोष्ट त्याचे कोड ओपन सोर्स प्रकारचे म्हणजे खुले आहे. जर तुम्ही संगणक व्यावसायिक वा प्रोग्रामर असाल तर टक्स पेंट ला तुम्ही तुम्हाला हवा तसा आकार देऊ शकता. समजा, प्रोग्रामर नसाल, तर टक्स पेंट जसा आहे तसा वापरा. त्यात मुलांसाठी प्रचंड आनंद भरलेला आहे.
टक्स पेंट ची आणखी माहिती घेऊ पुढल्या भागात, म्हणजे भाग - 2 मध्ये.
२१ फेब्रु, २०११
बहुगुणी इरफानव्यू
आपला संगणक सारं जग स्वतःमध्ये सामावून घेतो आहे. इंटरनेटची सुरूवात झाली तेव्हा त्याला फक्त अक्षरे आणि आकडेच तेवढे माहीत होते. नुसतं एकरंगी मजकूराचं इंटरनेट नीरस वाटणं हे साहजिक होतं. माणसाला जन्मतःच रंग आणि विविध आकारांचं आकर्षण असतं. इंटरनेटवर अक्षरं आणि शब्दांबरोबर चित्रे, छायाचित्रे हवीत आणि तीही रंगीत, स्पष्ट व आकर्षक हवीत हा ध्यास माणसाने घेणं हे स्वाभाविक होतं. त्यानुसार अतिशय झपाट्याने काम आणि संशोधन होत गेलं, आणि आपला संगणक रंगीत आणि सचित्र झाला. इंटरनेटही त्या पाठोपाठ चित्रमय झालं. माणूस हा समाधान मानणारा प्राणी नाही. मुकी चित्रे आणि छायाचित्रांवर तो थांबून कसा राहणार? स्टील ग्राफीक्स पाठोपाठ तो व्हिडिओच्या मागे न लागता तरच आश्चर्य होतं. माणसाने तेही साध्य केलं. संगणक आणि इंटरनेटवर आता मल्टीमिडिया पूर्णावस्थेपर्यंत पोहोचला आहे. टीव्हीवरच्या सिरीयल्स आणि नवे-जुने सिनेमे आपण आता इंटरनेटवरही पाहू शकतो.
संगणकाची तुलना आपण माणसाच्या शरीराशी केली तर सीपीयु म्हणजे मेंदू, कीबोर्ड आणि माऊस म्हणजे हात-पाय, मदरबोर्ड म्हणजे अस्थिसंस्था, आणि हार्ड डिस्क म्हणजे त्याचं पोट हे वर्णन एखादा शाळकरी मुलगा सुद्धा आता सांगू शकेल. समोरचा स्क्रीन किंवा मॉनिटर म्हणजे संगणकाचा चेहेरा असतो. असंच पुढे जाऊन विचार केला तर संगणकाच्या अंगात डिरेक्टरी किंवा फोल्डर्स म्हणजे रक्तवाहिन्या आणि असंख्य प्रकारच्या फाईल्स म्हणजे संगणकाच्या अंगातल्या पेशी असं आपल्याला सुचू शकतं. संगणक जेव्हा फक्त अक्षरं आणि शब्दांपुरता मर्यादेत होता तेव्हा त्याला TXT किंवा टेक्स्ट फाईल तेवढी माहित होती. पुढे जेव्हा चित्रे आणि छायाचित्रे आली तेव्हा JPG, TIFF वगैरे प्रकारच्या फाईल्स जन्माला आल्या. जेव्हा व्हिडीओ व चलत्चित्र आली तेव्हा AVI, MOV, MPEG ह्या फाईल्स अवतरल्या. आवाजासाठी mp3, midi, wav ह्या फाईल्सना महत्व आलं.

ही सारी बाळबोध प्रस्तावना इथे केली याचं कारण - इरफानव्यू. वाचकहो, कदाचित तुमच्यापैकी कितीतरी जण हे इरफानव्यू नावाचं सॉफ्टवेअर वापरतही असतील. कारण गेली अनेक वर्षे एक उत्तम फ्रीवेअर म्हणून इंटरनेटवर ते गाजतं आहे. मी स्वतः गेली किमान आठ वर्षे ते समाधानाने वापरतो आहे. मात्र अशी काही मंडळी असण्याची शक्यता आहे की ज्यांची ह्या इरफानव्यूशी गाठभेट किंवा ओळख अजून झालेली नाही. जर तुम्ही त्या पैकी एक असाल तर ह्या नंतरच्या परिच्छेदात येणारी माहिती तुम्हाला उपयोगाची वाटेल यात शंका नाही.
बहुगुणी इरफानव्यू असं शीर्षक ह्या लेखाला दिलं याचं कारण इरफानव्यू खरोखरीच बहुगुणी आहे. वर उल्लेख केलेल्या फाईल्स म्हणजे JPG, TIFF, AVI, MOV, MPEG, MP3, MIDI, WAV ह्या उघडण्याची वा चालविण्याची व्यवस्था इरफानव्यू मध्ये आहे. पण ह्या झाल्या फक्त ८ प्रकारच्या फाईल्स. इरफानव्यू ची ताकद प्रचंड आहे. तो एकूण ११७ प्रकारच्या फाईल्स उघडू शकतो. त्यातली एखादी TXT किंवा TTF प्रकारची फाईल सोडली तर बाकीच्या सर्व चित्रे, छायाचित्रे, चलत्चित्रे, आकृत्या, चित्रपट, आवाज यांचेशी संबंधित आहेत. थोडक्यात, इरफानव्यू हा ग्राफीक आणि मल्टीमिडीया फाईल स्पेशालिस्ट आहे. तुमचा संगणक नुकताच आणलेला वा नव्याने फॉरमॅट केलेला असेल तर इरफानव्यू त्यावर अग्रक्रमाने लावा असं मी सुचवेन. कारण उद्या समजा तुम्हाला तुमच्या मित्राने PSD प्रकारची फाईल पाठवली आणि तुमच्या संगणकावर अजून अडोबी फोटोशॉप हे महागडं सॉफ्टवेअर आलेलं नसेल तर ती PSD तुम्ही उघडणार कशी? PSD फाईल म्हणजे फोटोशॉपने तयार केलेली फाईल. ती उघडणार फोटोशॉपमध्ये, आणि तुमच्या संगणकावर फोटोशॉप अजून लागलेलंच नाही. हा पेचप्रसंग इरफानव्यू सोडवू शकतो. कारण इरफानव्यू मध्ये PSD फाईल उघडण्याची व्यवस्था आहे. आणखी एक उदाहरण घेऊ. समजा तुमच्याकडे एक चित्र BMP फाईलचे आहे. ते तुम्हाला तुमच्या ब्लॉगवर, अर्थात इंटरनेटवर टाकायचे आहे. त्यासाठी तुम्हाला ते चित्र JPG किंवा PNG किंवा GIF ह्यापैकी एका फाईल प्रकारात हवं आहे. तर त्यासाठीही इरफानव्यू तुमच्या मदतीला येतो. BMP, JPG, PNG, GIF ह्यापैकी कोणत्याही प्रकारची फाईल कोणत्याही प्रकारात बदलण्याची व्यवस्था इरफानव्यू मध्ये आहे. फाईल्स हँडलींगच्या बाबतीत इरफानव्यू इतकी बहुगुणी सॉफ्टवेअर्स (आणि त्यातही फ्रीवेअर म्हणजे मोफत असणारं टूल) फारच अपवादात्मक आहेत.
इरफानव्यूचे सारे उपयोग एका लेखात बसवून सांगण अशक्य आहे. इरफानव्यू हा एक चांगला MP3 Player सुद्धा आहे. तुमची MP3 गाणी तुम्ही त्यात ऐकू शकता. इरफानव्यू मध्ये स्लाईड शो तयार करता येतो. तोही अगदी दीड ते दोन मिनिटांत. हा स्लाईड शो तुम्हाला Exe फाईल म्हणून सेव्ह करता येतो. एवढच नव्हे तर तोच स्लाईड शो तुम्ही SCR फाईल म्हणजे Screen Saver म्हणूनही सेव्ह करू शकता. तुमची PDF प्रकारची फाईलही इरफानव्यूमध्ये उघडू शकते. म्हणजे काही कारणाने Acrobat Reader करप्ट झाला असेल तर काळजी नको, इरफानव्यू है ना? अक्षरशः "मै हूँ ना" म्हणत इरफानव्यू तुमच्या मदतीला नेहमीच धावून येतोय असं तुमच्या अनेकदा लक्षात येईल. आणखी एक उदाहरण सांगतो. आपले संगणकावरचे छोटे छोटे आयकॉन घ्या. ते ICO प्रकारच्या फाईलमध्ये साठवलेले असतात. इरफानव्यू मध्ये तुम्ही ते उघडू शकता. एखादा फोटो वा चित्र तुम्हाला आवडलं तर ते Wallpaper म्हणून वापरण्यासाठी इरफानव्यूमध्ये सेटींग उपलब्ध आहे. छायाचित्र शार्प करण्याची, ते ब्लॅक अँड व्हाईट करण्याची, ते अधिक आकर्षक (Enhance) करण्याची सोय देखील त्यात आहे. एखाद्या फोल्डरमध्ये अनेक फोटो असतील तर ते सारे फोटो थंबनेल्स स्वरूपात एकदम पाहण्याची सोय इरफानव्यू मध्ये आहे.
असे अनेक उपयोग. त्यासाठी तुम्ही इरफानव्यू वापरून पहायला हवा. वापरण्यासाठी तो डाऊनलोड करायला हवा. त्यासाठी www.irfanview.com ह्या साईटवर तुम्हाला जावं लागेल. इरफानव्यू तसा छोटासाच प्रोग्राम आहे. जेमतेम १.१० एम.बी. आकाराचा. त्या बरोबरचे प्लगिन्सही तुम्ही घ्यायला हवेत कारण ते खूपच उपयोगी आहेत. ते साधारणतः ७ एम.बी. आकाराचे आहेत. म्हणजे साधारणतः ८ एम.बी. आकाराचा हा इरफानव्यू आहे. इरफानव्यू मधला हा इरफान म्हणजे साधारणतः २३-२४ वर्षांचा तरूण आहे. तो मूळचा बोस्नियाचा. आता ऑस्ट्रिया देशात स्थायिक झालेला. त्याचा फोटो तुम्हाला irfanview.com वर पहायला मिळेल.
आणि हो, एक फार महत्वाची गोष्ट सांगायची राहिली. इरफानव्यू हा युनिकोड काँप्लायंट आहे. म्हणजे तुम्ही इरफानव्यूच्या विंडोत मराठी युनिकोड फाँट वापरून टाईपही करू शकता, किंवा चक्क एखादी फाईल मराठी अक्षरात सेव्हही करू शकता. असा हा बहुगुणी इरफानव्यू. हॅटस ऑफ टू यू इरफान. हा प्रोग्राम तू एखाद्या कंपनीला लाखो डॉलर्सना विकू शकला असतास. त्यासाठी बड्याबड्यांनी रांगही लावली असती. पण तू लाखो करोडोंच्या मागे लागला नाहीस. गेली कित्येक वर्षे तू इरफानव्यू फ्री ठेवला आहेस. रियली हॅटस ऑफ टू यू.

आपापली मास्टर 'की'
"ड्राईव्ह" ह्या इंग्रजी शब्दाचे विविध अर्थ आहेत. "लेफ्ट हँड ड्राईव्ह" पासून ते "ब्लड डोनेशन ड्राईव्ह" पर्यंत अनेक छटा त्यात आहेत. पण आपल्या संगणकातले ड्राईव्हज आणखी वेगळे. ते ड्राईव्हज म्हणजे संगणकाच्या मंत्रीमंडळातले कॅबिनेट मंत्रीच म्हणायला हवेत. हार्ड ड्राईव्ह, फ्लॉपी ड्राईव्ह, सीडी ड्राईव्ह असे वेगवेगळ्या प्रकारचे ड्राईव्हज संगणकाच्या कारभारात फार महत्वाची भूमिका बजावत असतात. हार्ड ड्राईव्ह हा तर संगणकाचा गृहमंत्रीच म्हणायला हवा. फ्लॉपी किंवा सीडी ड्राईव्ह ह्या मंत्रीपदाच्या खुर्च्या कायम असल्या तरी मंत्री मात्र सारखे बदलत असतात. आपल्या विंडोज एक्स्प्लोअररवर नजर टाकलीत तर दिसेल की आपल्या फ्लॉपी ड्राईव्हमध्ये फ्लॉपी असो वा नसो, त्याचा 'ए' किंवा 'बी' ड्राईव्ह कायम दिसत असतो. तीच गोष्ट सीडी वा डिव्हीडी ड्राईव्हची. त्यात सीडी असो वा नसो त्या ड्राईव्हला दिलेले अक्षर फाईल मॅनेजरमध्ये कायम दिसत असते. बहुतेक वेळा ई, एफ, जी, किंवा एच ह्यापैकी कोणते तरी एक अक्षर सीडी ड्राईव्हला बहाल केले गेलेले असते. ह्या ड्राईव्हमध्ये सीडी नसताना आपण त्या ड्राईव्हच्या अक्षरावर क्लीक केले तर 'आत सीडी नाही' असा संदेश संगणक देतो.
फ्लॉपी आणि सीडी ड्राईव्हपेक्षा वेगळी यंत्रणा असणारा ड्राईव्ह म्हणजे पेन ड्राईव्ह. पेन ड्राईव्हला युएसबी ड्राईव्ह, फ्लॅश ड्राईव्ह, युएसबी स्टीक वगैरे टोपण नावेही आहेत. पेनाला टोपण असते तशी पेन ड्राईव्हला ही काही टोपण नावे. पेन ड्राईव्हला अलिप्त ड्राईव्ह असेही नाव खरं तर द्यायला हरकत नाही. कारण पेन ड्राईव्ह कोणाचाही नसतो. तो आपला आपण स्वतंत्र असतो. कुठल्याही संगणकात तो गुंतत नाही. आपले अस्तित्व स्वतंत्र ठेवून कुठेही न गुंतणारी कोरडी माणसे जगात असतात, तसा हा पेन ड्राईव्ह कोरडा असतो. तुम्ही ज्यावेळी एखादा पेन ड्राईव्ह तुमच्या संगणकाला लावता, तेव्हा तो तुमच्या संगणकाचा होतो. त्याचे 'जी', 'एच', किंवा 'आय' वगैरे अक्षर तुमच्या संगणकाच्या फाईल मॅनेजरमध्ये दिसू लागते. मात्र हे अक्षर कायम नसते. जेव्हा तुम्ही तो पेन ड्राईव्ह बाहेर काढता तेव्हा बाहेर जाताना पेन ड्राईव्ह त्या संगणकाशी आपले नाते पूर्णपणे तोडूनच बाहेर पडतो. पुन्हा दुसर्या एखाद्या संगणकात तो गेला की तिथे तो आपले अक्षर तयार करतो आणि बाहेर पडला की पुन्हा पूर्वीचे नाते तोडून स्वतंत्र राहतो. 'पानी तेरा रंग कैसा जिसमे मिलावे वैसा' अशी हिंदी म्हण आहे. त्या आधाराने म्हणायचे तर 'पेन ड्राईव्ह तेरा अक्षर कैसा कंपुटर में जो मिले वैसा' असं म्हणता येईल.

पेन ड्राईव्ह हे आजच्या पीसी युजर्ससाठी म्हणजे तुमच्या आमच्यासाठी एक वरदान आहे. एक तर मुर्ती लहान किर्ती महान ही म्हण त्याला पुरेपूर लागू पडते. आपल्या कीचेनला पेन ड्राईव्ह लावून फिरणारे आज आयटी क्षेत्रामध्ये अक्षरशः हजारो आहेत. काही जण गळ्यात लॉकेट घालून फिरावं तसे पेन ड्राईव्ह गळ्यात घालून वावरताना दिसतात. जेमतेम पंचवीस-तीस ग्रॅम वजनाचा हा पेन ड्राईव्ह ताकदीने मात्र आपल्या सीडी किंवा अगदी डीव्हीडीपेक्षाही भारी असू शकतो. १ जीबी क्षमतेपासून ते अगदी १६ जीबी पर्यंतचे पेन ड्राईव्हज आपल्याकडे आज अडीचशे रूपयांपासून ते पाच हजार रूपयांपर्यंतच्या किंमतींना अगदी सहजपणे उपलब्ध आहेत. साध्या वह्या पुस्तके विकणार्या स्टेशनरी शॉप्समध्येही ते मिळू लागले आहेत यावरून त्यांची वाढती लोकप्रियता आपल्या लक्षात येते.
पेन ड्राईव्ह आणि आजची सीडी किंवा डिव्हीडी यांची उपयुक्ततेच्या दृष्टीने तुलना केली असता पेन ड्राईव्ह शर्यतीत जिंकतो. संगणक चालू होत नसेल तर आपण आपल्याकडील बुट डिस्क किंवा बुटेबल सीडी टाकून तो चालू करण्याचा प्रयत्न करतो. पण बहुतेक वेळा घडतं असं की ती बुटेबल सीडी कधी जागेवर मिळत नाही. अशा वेळी आपल्या खिशात किंवा गळ्यात कायम असणारा पेन ड्रार्ईव्ह उपयोगी पडू शकतो. पेन ड्राईव्हच्या माध्यमातून संगणक बुट करणे शक्य असते. बुटींग व्यतिरिक्त पोर्टेबल प्रोग्राम्स ही पेन ड्राईव्हने करून दिलेली एक फार मोठी सोय आहे. पोर्टेबल प्रोग्राम हा नावाप्रमाणे खरोखरीच पोर्टेबल असतो. पेन ड्राईव्हमध्ये त्याचे इन्स्टॉलेशन झालेले असते. संगणकाला पेन ड्राईव्ह लावताच आपण त्या प्रोग्रामचा वापर सुरू करू शकतो. उदाहरणार्थ, समजा काही कारणाने तुमच्या संगणकातला इंटरनेट एक्स्प्लोअरर करप्ट झाला आहे. तो पुन्हा नव्याने इन्स्टॉल करण्याइतका वेळ तुमच्याकडे नाही. पण चटकन एखादी ईमेल तुम्हाला चेक करायची आहे. अशा वेळी तुमच्याकडे पेन ड्राईव्ह असेल आणि त्यात पोर्टेबल फायरफॉक्स ब्राऊझर असेल तर तुम्ही फायरफॉक्समध्ये इंटरनेट सर्फींग करू शकता किंवा ईमेल चेक करू शकता. मला स्वतःला आवडणारा पोर्टेबल प्रोग्राम म्हणजे मोफत उपलब्ध असणारा अतिशय उपयुक्त असा ओपन ऑफिस सूट. वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंट वगैरेच्या फाईल्स तातडीने उघडण्याची वेळ येते आणि नेमका आपला ऑफिस प्रोग्राम त्यावेळी बिघडलेला असतो. अशा वेळी पेन ड्राईव्हमधला ओपन ऑफिस हा अॅप्लीकेशन सूट खूपच उपयोगी पडतो.
पेन ड्राईव्ह हा प्रायव्हसीच्या दृष्टीने आपल्या मोबाईल फोनसारखा आहे. तो सतत आपल्या खिशात वा पर्समध्ये राहतो. इतरांना तो देण्याची वा इतरांनी तो वापरण्याची गरज नसते. त्यात आपल्या खाजगी फाईल्स, हिशोब, फोटो, व्हिडीओज, आवाजाच्या फाईल्स वगैरे आपण ठेवू शकतो. हा सर्व व्यक्तीगत किंवा गोपनीय स्वरूपाचा डेटा Trucrypt सारखे टूल (www.truecrypt.org) वापरून आपण एन्क्रीप्ट करून ठेवू शकतो. त्यामुळे आपला पेन ड्राईव्ह हरवला वा कोणी चोरला तरी त्याला आपला डेटा वाचता वा वापरता येत नाही. एन्क्रीप्शन करून ठेवलेला डेटा हा आपल्याला माहीत असलेल्या पासवर्डशिवाय उघडला जाऊ शकत नाही. त्यामुळे ज्यांना गोपनीय फाईल्स ठेवायच्या आहेत त्यांचेसाठी पेन ड्राईव्हसारखे दुसरे साधन नाही. पेन ड्राईव्हला सीडी वा डिव्हीडीप्रमाणे चरे येत नसल्याने त्या कारणाने तो बाद होऊन पंचाईत होण्याची वेळ येत नाही. मात्र अतिशय निष्काळजी पद्धतीने पेन ड्राईव्ह वापरल्यास तोही अकाली बाद होण्याची शक्यता असते. खूपदा घाईघाईत पेन ड्राईव्ह व्यवस्थित लॉग आऊट न करता खस्सकन खेचून बाहेर काढण्यामुळे डेटा करप्शन तर होतच होतं पण तो कायमचा बाद होण्याची शक्यताही असते. पेन ड्राईव्हमधील डेटा त्यामुळे बॅकअप करून ठेवणे हे अत्यंत आवश्यक असते. काही जण दोन पेन ड्राईव्ह ठेवतात आणि त्यापैकी एकात बॅकअप असतो. मात्र बॅकअप हा नेहमी वेगवेगळ्या प्रकारातील मिडीयामध्ये म्हणजे पेन ड्राईव्हबरोबरच सीडी वा डिव्हीडी तसेच हार्ड ड्राईव्ह अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये एकाच वेळी ठेवलेला असणे केव्हाही सुरक्षित असते.
तुम्ही पेन ड्राईव्ह वापरत नसाल तर अवश्य तुमच्यासाठी एक खरेदी करा. सुरूवातीस अडीचशे रूपयांचा १ जीबी क्षमतेचा पेन ड्राईव्ह खूप होतो. यात तुम्ही तुमचा सारा आवश्यक व महत्वाचा संगणकीय डेटा सतत जवळ बाळगू शकता. बाहेरगावी गेल्यानंतर तर याचा फारच उपयोग होतो. एखाद्या मित्राकडे वा सायबर कॅफेत हा पेन ड्राईव्ह उघडून त्यातील पत्रांच्या प्रिंटस घेणे खूपच सोपे असते. जे महत्वाचे पोर्टेबल प्रोग्राम्स आपल्याला नेहमी लागत असतात त्यांचा उत्तम संग्रह म्हणजे Lupo Pen Suite. हा सूट http://www.lupopensuite.com ह्या वेबसाईटवरून तुम्हाला मोफत डाऊनलोड करून घेता येईल. त्यात २०० हून अधिक अधिकृतरित्या मोफत असणारे उत्तम प्रोग्राम्स व काही गेम्सही उपलब्ध केलेले आहेत. ह्या Lupo Suite वर एक स्वतंत्र लेख लिहीता येईल एवढा त्याचा अंतरंग भरगच्च आहे. अशाच प्रकारचा एक संग्रह portableApps.com ह्या साईटवरही मोफत उपलब्ध आहे.
पेन ड्राईव्हमध्ये महत्वाची सॉफ्टवेअर व इतर आवश्यक डेटा ठेवल्याने त्याचा उपयोग एखाद्या मास्टर की सारखा होतो. एन्क्रीप्शनची सोय असल्याने तो डेटा चोरीस जाण्याची शक्यता नसते. पेन ड्राईव्हची किंमत खिशाला परवडण्यासारखी असल्याने तो सहज घेता येतो, आणि मोबाईल सांभाळताना आपल्या मनात जो एक तणाव असतो तसा तणाव पेन ड्राईव्हबद्दल नसतो. वजनाने फारच हलका असल्याने तो जड होत नाही. त्याची अडचण वाटत नाही. एकूण हे सारे गुण लक्षात घेतले तर प्रत्येकाकडे त्याची स्वतःची एक मास्टर की म्हणजे पेन ड्राईव्ह असायला हरकत नाही अशी शिफारस कोणीही करू शकेल.

हिशोबाची अवजारे
हिशोब आणि आकडेमोडीशी कधीतरी अचानक आपली गाठ पडते तेव्हा कळतं की अरे शाळा-कॉलेजचं शिक्षण संपलं तरी आपण हिशोब आणि आकडेमोडीमध्ये कच्चेच राहिलो आहोत. उदाहरणार्थ परवा बोलता बोलता कोकणातल्या एका गावाचा विषय निघाला. एक मित्र म्हणाला की त्या छोट्याशा गावातही जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत. प्रति एकर भाव दोन लाख रूपयांपर्यंत गेलाय. मित्र जमिनीचा भाव तर बोलून गेला. एका एकराला दोन लाख रूपये भाव हे कळलं. पण एकर म्हणजे नेमकी किती जागा. एक एकर म्हणजे किती स्क्वेअर फीट? हा प्रश्न पडला. एक एकराचे स्क्वेअर फीट कसे काढायचे? ह्या हिशोबाशी येऊन अडायला झालं. असं अडणं पौंड आणि किलोग्रामच्या बाबतीतही होतं. एखादा परदेशी पहिलवान आपल्याकडे कुस्त्यांसाठी येतो तेव्हा त्याचं वजन हमखास ४०० पौंड वगैरे असं काहीतरी सांगितलं जातं. अशावेळी ४०० पौंड म्हणजे किती किलो असा प्रश्न आपल्याला पडतो. काही वेळा जमिनीचं माप हेक्टरमध्ये दिलं जातं. हेक्टरचे स्क्वेअर फीट किंवा एकर किती असा प्रश्न उभा राहतो. अंतर मोजण्याच्या बाबतीतही हा प्रकार घडतो. इकडून ४० मैलावर अमुक तमुक गाव आहे. ४० मैल म्हणजे नेमकं किती किलोमीटरवर ते गाव आहे हे आपल्याला हवं असतं. पण ते मोजण्याचा कॅलक्युलेटर आपल्याकडे तयार नसतो.
अशा प्रकारचे हिशोब करू शकणार्या कॅलक्युलेटरला मी हिशोबाची अवजारे असं म्हणतो. असं एक उत्तम अवजार मी नेहमी वापरतो. त्याचं नाव आहे - ESBUnitConv. हिशोबाचं हे अवजार इंटरनेटवर मोफत उपलब्ध आहे.
ESBUnitConv हे नाव तीन इंग्रजी शब्दांचं मिळून बनलं आहे. पहिली तीन अक्षरे ESB ही ESB Consultancy ह्या कंपनीच्या नावातली अक्षरे आहेत. ESB Consultancy ही मूळ ऑस्ट्रेलियातील कंपनी आहे. गणिताशी संबंधित सॉफ्टवेअर बनविण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. त्या व्यवसायाचा एक भाग म्हणून त्यांनी ESBUnitConv हा प्रोग्राम तयार केला आहे. ESB नंतरचा शब्द Unit आणि त्या नंतरचा Conv म्हणजे Convertor ह्या शब्दातली पहिली तीन अक्षरे. थोडक्यात ESB Unit Convertor असं खरं तर त्या प्रोग्रामचं नाव. पण संक्षेपासाठी म्हणा किंवा नावाची सरकारी नोंदणी करताना शब्दकोशातले शब्द वापरायचे नसतात म्हणून म्हणा ह्या अवजाराचं नाव ESBUnitConv असं झालेलं असावं. पण ते असो. ESBUnitConv हे कमालीचं गुणी अवजार आहे. खरं तर तुमच्याकडे पेन ड्राईव्ह असेल (आता जवळ जवळ प्रत्येकाकडे खिशाखिशातून पेन ड्राईव्ह दिसू लागला आहे) तर त्यात हा ESB Unit Convertor कॉपी करून ठेवायलाच हवा.
ESBUnitConv चे गुण नीट सांगायला हवेत. आपण वर एकर, स्क्वेअर फीट, पौंड, किलो, हेक्टर, मैल, किलोमीटर ह्या सात मापांचा म्हणजे Units चा उल्लेख सुरूवातीच्या परिच्छेदात केला आहे. पण ही फक्त सात मापं झाली. ESBUnitConv मध्ये अशा एकूण ५२५ मापांचे हिशोब होऊ शकतात. यावरून तुम्हाला ह्या अवजाराची उपयुक्तता लक्षात येऊ शकेल. हे जे ५२५ प्रकारचे युनिट किंवा मापं आहेत त्याची विभागणी ESBUnitConv ने वीस प्रकारात केली आहे. ते वीस प्रकार मूळ इंग्रजीतच सांगितलेले बरे. ते प्रकार असेः Temperature, Distance, Mass, Area, Volume, Pressure, Velocity, Acceleration, Force, Energy, Power, Fuel Consumption, Flow, Torque, Angles, Luminous Intensity, Illumination, Time, Radioactivity आणि Flow (Mass). खरं सांगायचं तर हे अवजार मारूतीने रामासाठी उचलून आणलेल्या द्रोणागिरी पर्वतासारखं आहे. आपण सहजपणे उल्लेख केला होता तो फक्त सात मापांचा. ह्या अवजारात ती सात मापं तर आहेतच पण वर आणखी ५१८ मापं आहेत. यातल्या कितीतरी मापांची नावेही आपण ऐकलेली नसण्याची शक्यता आहे.
वर जे वीस प्रकार आपण पाहिले त्यातल्या काही महत्वाच्या प्रकारांकडे आपण इथे एक कटाक्ष टाकू. पहिला प्रकार Temperature चा. यात तुम्ही नेहमीच्या Celsius चे Fahrenheit किंवा Fahrenheit चे Celsius करू शकता. त्या व्यतिरिक्त तपमान Kelvin किंवा Rankine किंवा Re'aumer ह्या मापातही मोजता येते आणि तुम्ही Celsius चे Kelvin मध्ये रूपांतर करू शकता हे जाणल्यावर आपल्या ज्ञानात नवी भर पडल्याचं आपल्याला लक्षात येतं. दुसरा प्रकार Distance किंवा अंतर मोजणीचा आहे, त्याकडे लक्ष टाकू. अंतर मोजायचे म्हंटले की किलोमीटर, मैल, यार्ड, मीटर, हात, फर्लांग, किंवा समुद्र असेल तर Nautical Miles ही मापं आपण ऐकली आहेत. पण ह्या अवजाराच्या सहाय्याने आपण तब्बल ५८ प्रकारच्या मापात अंतर मोजू शकतो. त्यात नॅनोमीटरपासून ते प्रकाश वर्षे इथपर्यंतची वेगवेगळी मापे आली आहेत. एका मीटरचे १,०००,०००,००० इतके नॅनोमीटर होतात हा हिशोब केल्यावर आपली एकीकडे करमणूकही होते आणि दुसरीकडे एका मीटरचे शंभर कोटी भाग पाडण्याची किमया विज्ञानाने साधली आहे हे जाणल्यावर आपण अचंबितही होतो. तिसरा प्रकार Mass किंवा वजन मोजण्याचा. ग्रॅम, किलो, क्विंटल, टन ही आपण नेहमी ऐकतो. सोनं असेल तर तोळे आपल्याला पाठ असतं. पण वजन प्रकारात ह्या अवजाराने एकूण ४३ मापे दिली आहेत. त्यात लॉट नावाचे एक रशियन मापही आहे. १०० किलो किंवा १ क्विंटल = ७०,३२७.६१ लॉट होतात हे ऐकल्यावर Thanks a lot चा खरा अर्थ आपल्याला लक्षात येतो. Area अर्थात क्षेत्रफळ ३० वेगवेगळ्या मापात मोजता येतं. १ एकर = ४३,५६० चौरस फूट होतात म्हंटल्यानंतर आपल्याला एकर ह्या प्रकाराचं कौतुक वाटू लागतं. पण १ हेक्टर = १,०७,६३९.१० हे जाणल्यावर हेक्टर हा एकराच्या दुप्पटीने श्रीमंत आहे याचं घसघशीत ज्ञान होतं. तुम्हाला कदाचित माहीत नसेल पण Townships ह्या नावाचं क्षेत्रफळाचं एक मापच आहे चक्क. १ टाऊनशीप = १,००३,६२२,४०० एवढे चौरस फूट होतात. शंभर कोटी छत्तीस लाख बावीस हजार चारशे चौरस फूट म्हणजे एक टाऊनशीप असल्याने आपले बिल्डर टाऊनशीप प्रकल्पांमध्ये का रस घेत असतात हे आपल्या लक्षात येतं.
ह्यापुढचा प्रकार Volume. स्वयंपाकात Teaspoon आणि Tablespoon ही मापे हमखास ठरलेली. गॅलन, लिटर ही मापे तेल, दूध आणि रॉकेलच्या संदर्भात हमखास ऐकलेली. एका टेबलस्पूनमध्ये तीन टीस्पून साहित्य मावतं हे झालं अमेरिकन मापाचं प्रमाण. पण इंग्लंडच्या मापात मात्र एका टेबलस्पूनमध्ये चार टीस्पून साहित्य मावतं हे तुम्हाला माहीत आहे का? अमेरिका आणि इंग्लंड यांच्यात एका चमच्याचा फरक आहे. त्यामुळे अमेरिकन पदार्थात किती टेबलस्पून मीठ टाकायचं याचं प्रमाण आणि इंग्रजांच्या मीठाचं प्रमाण यात फरक आहेच. पण पुढली गंमत म्हणजे ऑस्ट्रेलियाचा एक टेबलस्पून म्हणजे अमेरिकेचे ४.०६ टीस्पून आणि इंग्लंडचे ५.५२ टीस्पून हे पाहिल्यावर देशोदेशीचे चमचे किती वेगवेगळे असतात हे लक्षात येतं. त्यामुळे ऑफिसात अमेरिकन बॉस जाऊन इंग्रज बॉस आला की चमचे बदलणार हे ओघाने आलंच.
पुढला प्रकार Pressure. आता ह्या टप्प्यावर लेखाची शब्दसंख्या संपत आल्याचं प्रेशर माझ्यावर आल्याने मापाच्या गंमती जंमती आणि ह्या फुकट मिळणार्या अवजाराचं कौतुक मला आवरतं घ्यायला हवं. पाण्याचा किंवा तत्सम घटकाचा दाब मोजण्याची मापेही ३० पेक्षा जास्त आहेत. पुढे Velocity, Acceleration, Force, Energy हे प्रकार तुम्ही प्रत्यक्षच हिशोब करून पहा असं सांगून मी पुढे जातो. Power बद्दल मात्र थोडं बोलू या. सध्याच्या लोडशेडींगमध्ये Watts, Kilowatts, Megawatts वगैरे मापे आपल्याला कुठे कुठे ऐकू येत असतात. ती इथे आहेत. पुढला प्रकार Fuel Consumption. मोटर सायकल म्हंटली की आजकाल ८० किलोमीटर पर लिटर आणि चार चाकी म्हंटली की १५ किलोमीटर पर लिटर ही भाषा ऐकू येते. जी गाडी १५ किलोमीटर पर लिटर अॅव्हरेजने धावते ती एका लिटरमध्ये किती मैल जाईल? उत्तर आहे ९.३२ मैल. लिटर आणि गॅलनचा हिशोबही ह्या इंधनाच्या हिशोबात इथे मिळतो.
पुढले प्रकार Flow, Torque, Angles, Luminous Intensity, Illumination हे तुम्ही ह्या अवजाराचा उपयोग करून तुमच्या संगणकाच्या पडद्यावरच पहा असं सांगून Time ह्या मापाकडे आपण वळू. सेकंद, मिनिटे, तास, दिवस, आठवडे, पंधरवडे, महिने, वर्ष, दशके, शतके ही मापे इथे आहेतच. पण मायक्रोसेकंद आणि मिलीसेकंद देखील आपण इथे मोजू शकतो. १ मिलीसेकंद म्हणजे १००० मायक्रोसेकंद हे नवे माप ऐकल्यावर आपण काही मिनिटे स्तब्ध झाल्याशिवाय रहात नाही. तसंच ३६५०० दिवसांचे एक शतक म्हणजे किती मायक्रोसेकंद असतील याचा हिशोब करताना अंगावर काटा आल्याशिवाय रहात नाही. पुढले Radioactivity आणि Flow (Mass) हे प्रकार तद्दन तांत्रिक प्रकारचे आहेत. ज्यांना ते पहायचे आहेत त्यांनी जरूर पहावे, इतर Radioactivity पासून दूर राहिले तरी फारसं बिघडण्याचं कारण नाही.
जाता जाता आणखी एक महत्वाचं ह्या ESBUnitConv नामक अवजाराबद्दल सांगायचं म्हणजे इथला हिशोब तंतोतंत मिळावा यासाठी तुम्हाला १८ पर्यंत अपूर्णांकात संख्या मिळवता येते. उदाहरणार्थ 1.000000000000000000 मिनीट = 0.016666666666666667 तास होतात. इतकं खोलात जाणं चांगलं की वाईट हे ज्याचं त्याने ठरवायचं असलं तरी ESBUnitConv ने मात्र तेवढ्या खोलात जायचा निर्णय घेतलेला आहे हे आपल्या दृष्टीने चांगलंच म्हणायचं. ह्याच ESB कंपनीचा एक सायंटिफिक कॅलक्युलेटरही तुम्हाला डाऊनलोडींगसाठी उपलब्ध आहे. ज्यांना ESBUnitConv वा ESBCalc डाऊनलोड करायचा आहे त्यांनी इंटरनेटवर http://www.esbconsult.com/esbcalc/esbunitconv.htm ह्या पत्त्यावर जावं आणि ही अवजारे मिळवावीत.
बाय द वे, लिखाणात किती शब्द आत्तापर्यंत झाले हे मोजण्याची सोय आजकालच्या वर्डप्रोसेसर्स मध्ये सर्रास असतेच. बोलण्यातले शब्द मोजण्याइतके मात्र आपले विज्ञान अजून प्रगत व्हायचे आहे. पण लेटस बी होपफूल.

उपयुक्त अल्फाबेटायझर
ज्या घरात टीव्ही आहे त्या घरात इंटरनेटचं कनेक्शनही असणार अशा टप्प्यापर्यंत आपण पोहोचतो आहोत. रेल्वेचं रिझर्व्हेशन असो की नोकरीचा अर्ज इमेलने पाठवायचा असो, किंवा बॅंकेतून पैसे दुसर्या खात्यात ट्रान्सफर करायचे असोत किंवा बॅंकेच्या व्यवहारांचे स्टेटमेंट घ्यायचे असो, इंटरनेटला आता पर्याय राहिलेला नाही. बीएसएनएल किंवा एमटीएनएल सारख्या सरकारी कंपन्यांनी देखील गावागावात, आणि मुख्य म्हणजे स्वस्त दरात वेगवान इंटरनेटचे ब्रॉडबँड कनेक्शन पोहोचवण्यामध्ये आघाडी घेतली आहे. महिन्याला टीव्ही चॅनलसाठी जेवढे पैसे भरावे लागतात त्याहीपेक्षा कमी दराची इंटरनेट कनेक्शन्स मिळू लागल्याने इंटरनेट तळातल्या माणसापर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया अपेक्षेपेक्षा झपाट्याने चालू आहे. महाराष्ट्रातलं कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र किंवा कोणत्याही कानाकोपर्यातलं विकासाच्या टप्प्यात आलेलं गाव घेतलं तर तिथे मोबाईल फोनचा सीग्नल मिळतो. ज्या मोबाईल फोनवर सीग्नल असतो त्यावर इंटरनेटही जोडलं जाऊ शकतं. मोबाईल फोन आणि इंटरनेटच्या ह्या नात्यामुळे इंटरनेटबद्दलची जागरूकता आपल्या खेडेगावांपर्यंतही पोहोचली आहे. गावातल्या एसटी स्टँडच्या शेजारी सहजपणे एखादी सायबर कॅफेची पाटी दिसते हा त्याचाच एक भाग.
गाव म्हंटलं की वीजेचं लोड शेडींग आणि डिजिटल डिव्हाईडचा विषय हे खास चर्चेचे विषय. वीज नसेल तर तुमचं इंटरनेट चालायचं कसं? किंवा, इंटरनेट लाख पोचलं हो, पण आमच्या अंगठाबहादूरांना ते कसं कळायचं आणि त्यांना ते कुणी शिकवायचं? वगैरे प्रश्न स्वाभाविकच उपस्थित होतात. मोबाईल फोनवरचा एसएमएस वाचता यावा म्हणून तरी शिकायला हवं हे नव्या पिढीला कळतं. नोकरीचा कॉल पोस्टापेक्षा ईमेलवरून पटकन मिळतो म्हणून तरी ते तंत्र आपल्याला माहित असायला हवं हे तरूणाईने आता स्वीकारलं आहे. शासकीय कार्यालयापासून ते औषधाच्या साध्या दुकानापर्यंत कुठेही माणूस नेमायचा झाला तर त्याला इंटरनेटचं तंत्र माहीत असायला हवं याला आता महत्व प्राप्त झालं आहे. सात बाराच्या उतार्यापासून ते शासनाचा जीआर शोधण्यासाठीही इंटरनेटची सेवा आता जीवनावश्यक भाग बनते आहे.
एकीकडे अशा इंटरनेटवर आधारलेल्या सुविधा वाढत आहेत आणि दुसरीकडे इंटरनेटवर शेकड्याच्या संख्येने अत्यंत उपयुक्त अशी वेब अॅप्स उपलब्ध होत आहेत. यातली शेकडो वेब अॅप्स किंवा वेब अप्लीकेशन्स मोफत उपलब्ध आहेत. घर असो की एखादी संस्था, खाजगी उद्योग असो की मोठे शासकीय कार्यालय ही वेब अप्लीकेशन्स वेळ वाचवण्यासाठी आणि कार्यक्षमता वाढण्यासाठी उपयुक्त ठरत आहेत. एखादे नाविन्यपूर्ण, फारसे माहित नसलेले व कमालीचे वेब अप्लीकेशन कुठे आढळले की एंटर सदरासाठी मला तो विषय खुणावतो. असंच एक अत्यंत गुणी आणि मोफत उपलब्ध असणारं वेब अप्लीकेशन किंवा वेब अॅप म्हणजे अल्फाबेटायझर. ते उपलब्ध आहे http://alphabetizer.flap.tv/ ह्या पत्त्यावर.
अल्फाबेटायझर ह्या नावातच खरं तर त्याचा उपयोग आलेला आहे. एखादी मोठी यादी आपल्याला अकारविल्हे लावायची असेल तर ते कितीतरी जिकीरीचं काम. कित्येकदा त्यासाठी काही तास खर्ची पडतात, आणि तेवढा वेळ देऊनही त्यात काही चुका राहून जाण्याची शक्यता असते. आपण एक उदाहरण घेऊ. एका शाळेत पाचशे मुले आहेत. ह्या मुलांची नावे हजेरीपटात काही विशिष्ट क्रमाने नाहीत. नावे असोत की आडनावे पण त्यातलं काहीही अकारविल्हे नाही. त्यामुळे एखादा मुलगा शोधायचा झाला तर प्रत्येक नावावरून बोट फिरवत जाऊन आणि पानांमागे पाने उलटून ते विशिष्ट नाव शोधणं हे क्रमप्राप्त होतं. ही सारी पाचशे नावं अकारविल्हे लावायची तर संगणकाची मदत निश्चितच होऊ शकते. सर्वांना माहीत असलेल्या एक्सेल प्रोग्राममध्ये सर्व नावे टाईप केली तर एका क्षणात त्याची अल्फाबेटीकल किंवा अकारविल्हे यादी आपल्याला मिळू शकते. पण त्यासाठी एक्सेलची माहिती असणारी व्यक्ती उपलब्ध हवी. तशी उपलब्धता नसेल तर हे अल्फाबेटायझर नावाचं वेब अप्लीकेशन हमखास मदतीला येतं.
वेब अप्लीकेशनचं वैशिष्ट्य म्हणजे कोणतंही डाऊनलोड करण्याची आवश्यकता नाही. कसलही इन्स्टॉलेशन किंवा किचकट सेटींग/कन्फीगरेशन वगैरेंची गरज नाही. फक्त इंटरनेट चालू करायचं, त्या विशिष्ट वेब साईटवर जायचं आणि आपलं काम सुरू करायचं. आता अल्फाबेटायझरचच पहा. त्या वेब साईटवर गेलात की समोर एक तळहाताएवढा कोरा भाग दिसतो. ह्या कोर्या भागात आपल्याला हवी ती यादी टाईप करीत जायचं. तुम्ही मुद्दाम तो प्रयोग करा. आपल्याच घरातल्या दहा जणांची नावे त्यात टाईप करा. प्रत्येक नाव टाईप झालं की एंटर बटण दाबणं आवश्यक. नावं टाईप झाली की नंतर ALPHABETIZE ह्या बटणावर फक्त क्लीक करायचं. काही क्षणांत ती सर्व नावं अकारविल्हे म्हणजे इंग्रजी ए ते झेड ह्या क्रमाने लावून आपल्या पुढे येतात. आपल्या प्रिंटरवर आपण त्याची प्रिंट देखील घेऊ शकतो. हा झाला अल्फाबेटायझरचा मुलभूत उपयोग. पण त्याच बरोबर अल्फाबेटायझर आणखीही बरीच मदत आपल्याला करू शकतो. उदाहरणार्थ सर्व नावांच्या मागे क्रमांक टाकणं, नावांपुढे स्वल्पविराम किंवा एखादा विशिष्ट शब्द टाकणं वगैरे. अल्फाबेटायझर जशी अकारविल्हे यादी लावतो तशी ती उलट्या क्रमानेही लावू शकतो. उलटा क्रम म्हणजे अर्थातच झेड पासून ते ए पर्यंतची उलट्या क्रमाची यादी.
अल्फाबेटायझर हा खरं तर इंग्रजीसाठी आहे. पण मी सहज त्याची मराठीसाठी चाचणी घेतली. युनिकोड मराठी फाँटमध्ये त्यात मराठी नावे टाईप करून पाहिलं आणि आश्चर्याचा सुखद धक्का बसला. मराठी नावेही अ क ख ग घ ह्या क्रमाने अल्फाबेटाईज म्हणजे अकारविल्हे होऊ शकतात असं आढळलं. अपवाद दिसला तो क्ष आणि ज्ञ चा. क्ष म्हणजे त्याच्या दृष्टीने क+श होतो. ज्ञ म्हणजे ज+न होतो. त्यामुळे त्याचे शब्द एकत्र होऊन अनुक्रमे क आणि ज च्या जागी येतात. हे वेगळे आलेले शब्द आपण मॅन्युअली क्ष आणि ज्ञ च्या ठिकाणी टाकले तर काम चोख होऊ शकतं. त्यामुळे, एखाद्या पुस्तकातल्या किंवा कोशातल्या विविध प्रकरणांची, उपप्रकरणांची वगैरे अकारविल्हे सूची करायची असेल तर अल्फाबेटायझर अतिशय मोलाची मदत त्यासाठी करू शकेल.
अल्फाबेटायझर जसं 'अकारविल्हेवाटी' साठी उपयुक्त आहे, तसंच दुसरं
http://felix-cat.com/tools/wordcount/ ह्या पत्त्यावरील वेब अप्लीकेशन शब्द मोजण्यासाठी उपलब्ध आहे. खरं तर वर्ड किंवा ओपन ऑफिस सारख्या सॉफ्टवेअरमध्ये शब्द मोजण्याची व्यवस्था आहे. पण अचानक वा हे प्रोग्राम्स उपलब्ध नसताना केवळ इंटरनेटच्या उपयोगाने एखाद्या लिखाणातील शब्द मोजायचे झाले तर ह्या वेब अप्लीकेशनचा चांगला उपयोग होतो. ही दोन शब्दांशी संबंधित वेब अॅप्स आपण बुकमार्क करून ठेवायला काहीच हरकत नाही. अडीअडचणीतील त्यांची उपयुक्तता खरचं अपरिमित आहे.

आवाज की दुनिया
आवाज हा आपल्या आयुष्यातला एक नैसर्गिक भाग आहे. हवा आणि प्राणवायू आपण नाकाने जसा सहज आणि नकळत घेत असतो तसच आवाजाचही आहे. सकाळचा दिवस सुरू होताना तो गजराचा कर्कश्श आवाज. तिथून झोप झटकून जागं व्हावं तर पहाटेची पक्षांची मंजूळ किलबिल. दिवस सुरू होताच आवाज जे आपल्या कानाला चिकटतात ते अगदी मध्यरात्र झाली तरी रातकिड्यांचे किर्रर्र आवाज चालूच असतात. आज हा आवाजाचा विषय मुद्दाम काढण्याचं कारण म्हणजे आपलं मल्टीमिडिया तंत्रज्ञानाचं विश्व. मल्टीमिडिया ह्या शब्दाचा पाया मूळातच आवाजाच्या आधारावर उभा आहे. आवाज नाही तर मल्टीमिडिया व्यर्थ आहे.
अगदी आपल्या साध्या पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनचं उदाहरण घ्या. आवाजाशिवाय तुम्हाला तुमच्या स्लाईडस किंवा एखादं प्रेझेंटेशन दाखवता येणार नाही असं नाही. पण जर ते प्रेझेंटेशन म्युझिक ट्रॅकने युक्त असेल किंवा त्यात काही योग्य असे साऊंड इफेक्टस असतील तर प्रेझेंटेशन अधिक प्रभावी होतं. पॉवरपॉईंटच्याच जोडीने दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर फ्लॅश मुव्हीजचं देता येईल. अडोबी कंपनीचं फ्लॅश हे सॉफ्टवेअर आज अतिशय लोकप्रिय आहे. वेबसाईटस सुरू होताना आपण जो इंट्रो बघतो त्यातले बहुसंख्य इंट्रोज हे फ्लॅशमध्ये केलेले असतात. ह्या इंट्रोजसाठी देखील विविध प्रकारचे आवाज वा साऊंड इफेक्टस वापरले जातात. अनीमेशनसाठी देखील फ्लॅश तंत्राचा वापर करण्यांत येतो. एक साधं आणि छोटं उदाहरण सांगतो. एक विदूषक उड्या मारत येतो आणि एका घराचा दरवाजा ठोठावतो. तो दरवाजा किरकिरत आपोआप उघडला जातो. विदूषक दारातून आत जाताच एक कुत्रा त्याच्या अंगावर भुंकत झेपावतो. आता हे सारं दृश्य फ्लॅश तंत्राने साधी चित्रे वापरून तयार करता येतं. मात्र अशा फ्लॅश मुव्हीसाठी विविध आवाजांची गरज लागते. विदूषक जेव्हा उड्या मारत असतो तेव्हा त्या उड्यांना साजेसा साऊंड इफेक्ट हवा. दरवाजा ठोठावण्याचा आवाज हवा. पुढे दरवाजाचं किरकिरत उघडणं. मग कुत्र्याचं भुंकणं. हे सारे आवाज मिळतील तेव्हा आपला फ्लॅश मुव्ही तयार होणार. हे आवाज मिळवण्यासाठी म्हणजे डाऊनलोड करण्यासाठी मग आपण गुगलवर जातो. तिथे आवाज मोफत डाऊनलोड करू देणारी साईट शोधू लागतो. हे शोधणं खूप वेळ खातं. आपल्या संयमाचा अंतही कधीकधी पहातं.
आवाज शोधण्यासाठी गुगलवर जाणं म्हणजे एखाद्या मोठ्या सुपरमार्केटमध्ये सुई शोधायला जाण्यासारखं आहे. सुपर मार्केटमध्ये सगळेच विभाग असतात. कपड्यांपासून भांड्यांपर्यंत आणि धान्यापासून ते टीव्ही-फ्रीजसारख्या इलेक्ट्रॉनिक यंत्रांपर्यंत सारं काही तिथं दिसतं. आपल्याला ते नको असतं. आपल्याला हवी आहे फक्त सुई. अशा वेळी आपल्याला विविध प्रकारच्या फक्त सुया उपलब्ध करून देणारं एखादं मार्केट मिळालं तर? गुगलवर एखादा आवाज किंवा साऊंड इफेक्ट शोधायचा म्हणजे जर सुपर मार्केट पालथं घालणं असेल, तर मग फक्त आवाज शोधून देणारं गुगलइतकं कार्यक्षम असं एखादं स्पेशलाईज्ड सर्च इंजिन आज अस्तित्वात आहे का? असा प्रश्न एव्हाना तुमच्या मनात स्वाभाविकच तयार झाला असेल. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे - होय. फक्त साऊंडस व साऊंड इफेक्टस शोधून देणारं एक स्पेशलाईज्ड सर्च इंजिन आज इंटरनेटवर अस्तित्वात आहे. तेथे तुम्ही हवा तो आवाज शोधू शकता. तो ऐकू शकता. योग्य वाटला तर तो डाऊनलोड करून घेऊ शकता. नंतर अर्थातच तुमच्या पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनसाठी किंवा फ्लॅश मुव्हीसाठी वापरूही शकता. त्या स्पेशलाईज्ड सर्च इंजिनच्या साईटचा पत्ता आहे www.findsounds.com
Findsounds.com म्हणते की त्यांच्या साईटवर दर महिन्याला २० लाख साऊंड सर्च होत असतात. एकूण अडीच लाख व्यक्ती हे वीस लाख आवाज शोधत असतात. ही साईट तशी अगदी साधी आणि सरळ आहे. गुगलसारखी सर्च करण्याची एक लांबी चौकट त्यात मधोमध आहे. तिथे आपल्याला हवा तो शब्द वा सर्च कीवर्डस तिथे फक्त टाईप करायचे आणि एंटर बटण दाबायचं किंवा Search बटणावर क्लीक करायचं. अशा प्रकारे एंटर दाबण्यापूर्वी किंवा Search वर क्लीक करण्यापूर्वी हवं तर काही विशिष्ट पर्याय अर्थात ऑप्शन्स हवं तर आपण निवडू शकतो. म्हणजे समजा तुम्हाला फक्त mp3 फाईल हवी असेल तर केवळ तोच पर्याय तुम्ही निवडू शकता. अशा वेळी तुमच्यासमोर फक्त mp3 च्या लिंक्सच फक्त येतील. Findsounds.com चार प्रकारच्या साऊंड फाईल्स तुम्हाला शोधून देते. एक mp3, दुसरं wav, तिसरं au आणि चौथा प्रकार aiff. यापैकी mp3 आणि wav ह्या साऊंड फाईल्स आज विशेषत्वाने वापरल्या जातात.
गुगलप्रमाणे सर्च करण्याची ही जशी सोय आहे, तशी त्याच्या जोडीला विशिष्ट प्रकारचे आवाज शोधण्यासाठी वर्गीकरणाची सोयही findsounds.com ने केली आहे. त्यासाठी www.findsounds.com/types ह्या लिंकवर तुम्ही जायला हवं. तिथले हे प्रकार पहाः Animals, Birds, Holidays, Household, Insects, Mayhem, Miscellaneous, Musical Instruments, Nature, Noise makers, Office, People, Sports and Recreation, TV and Movies, Vehicles. हे झाले मुख्य प्रकार. आता त्या प्रत्येक मुख्य प्रकारात एक भली मोठी यादी दिलेली आहे. कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज हवा म्हंटल्यावर तुम्ही Animals मध्ये जाऊन Dog वर क्लीक करणार हे ओघानं आलच. तिथे आज कुत्र्याचे आवाज देणार्या एकूण २०० आवाजांच्या फाईल्स डाऊनलोडीगसाठी उपलब्ध आहेत. एक लक्षात घ्या की हे आवाज किंवा ह्या साऊंड फाईल्स findsounds.com ने संपूर्ण वेब धुंडाळून तुम्हाला शोधून दिल्या आहेत. म्हणजे त्यांनी फक्त सर्च इंजिनचं काम केलं आहे. ह्या फाईल्स अर्थातच वेगवेगळ्या वेबसाईटवरील आहेत.
आपलं वरचं उदाहरण घेऊन आपण पुढे जाऊ. विदूषक उड्या मारत येतो आहे. त्याच्या उड्यांसाठी आपल्याला योग्य तो साऊंड इफेक्ट हवा आहे. तर त्यासाठी People वर क्लीक करून नंतर Footsteps वर क्लीक करा. पहा, १०६ प्रकारची पावलं आपल्यापुढे आवाज करण्यासाठी सिद्ध आहेत. ह्याच पद्धतीने दरवाजा ठोठावण्याचा आवाज शोधायचा तर सरळ door knock हे शब्द टाईप करून एंटर दाबा. २०० प्रकारचे ठोठावण्याचे आवाज मिळतील. थोडक्यात ज्यांना अनीमेशन्स तयार करायची आहेत, किंवा आपल्याच ईमेलमधून एक गंमतीदार आवाज कुणाला पाठवायचा आहे अशांसाठी findsounds.com हे एक वरदानच आहे.
अशा प्रकारची specialised म्हणता येतील अशी शेकडो सर्च इंजिन्स आज इंटरनेटवर उपलब्ध आहेत. ती माहित असतील तर आपला वेळ तर वाचतोच, पण ती पाहता पाहता काही नव्या कल्पनाही डोक्यात येऊ लागतात. एखादी गोष्ट सापडली वा दिसली की मग त्याचा वापर कसा करता येईल याकडे मानवी मन झेपावू लागतं. ही अगदी नैसर्गिक म्हणावी अशीच प्रक्रिया आहे. Findsounds.com ची दखल न्युयॉर्क टाईम्स पासून ते पीसी वर्ल्ड पर्यंत सर्वांनी घेतलेली आहे. आवाजासाठी एक उत्तम वेबसाईट असा गौरव ह्या साईटच्या वाट्याला आलेला आहे. पीसी वर्ल्ड ने आपल्या Best of the web ह्या सदरात त्याचा समावेश केला आहे. न्युयॉर्क टाईम्सने त्याला Impressive Technology म्हणून गौरवलं आहे. याहूने त्याला Incredibly Useful असं म्हंटलं आहे.
असच आणखी एक आवाजी सर्च इंजिन म्हणजे www.soundsnap.com. ही वेबसाईटही findsounds.com सारखी असली तरी इथला फरक म्हणजे जगभरचे लोक इथे वेगवेगळे आवाज अपलोड करत असतात. इथेही सर्च आहे आणि इथेही टाईप्स आहेत. हे दुसरं आवाजी सर्च इंजिन मी मुद्दाम देत आहे ते अशासाठी की कधी findsounds.com वर तुम्हाला हवा तो आवाज सापडला नाही, तर हा पर्याय चाचपडून पहायला हरकत नाही.
ह्या टप्प्यापर्यंत आपण आलो आणि हवा तो आवाज मिळविण्यासाठी findsounds.com किंवा soundsnap.com वापरण्याची नोंद आपण घेतली. संगणकावरील आवाजाच्या बाबतीत वेगवेगळ्या प्रक्रिया करण्याची वेळ खूपदा येते. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याकडे wav फाईल असते, आणि आपल्याला त्याची mp3 करायची असते. आपल्याला कुणीतरी au किंवा aiff प्रकारची साऊंड फाईल पाठवतं, आणि आपल्याकडे ती उघडत नसते. आपल्याला मिळालेली आवाजाची फाईल मोठी किंवा लांबीने अधिक असते. ती लहान करून हवी असते. उदाहरण घेऊन सांगतो. समजा तुमच्याकडे एका पाठोपाठ एक अशी दहा पावले टाकण्याच्या आवाजाची फाईल आहे. तुम्हाला दहा पावलं नको आहेत. फक्त एकाच पावलाचा आवाज तुम्हाला हवा आहे. अशा वेळी दहा पैकी एक पाऊल कापून घेण्याची म्हणजचे Audio Editing ची सोय तुम्हाला हवी असते. ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी मी Audacity ह्या अधिकृतपणे मोफत असणार्या ओपन सोर्स सॉफ्टवेअरची शिफारस करीन. Audacity बद्दलची अधिक माहिती आणि तो प्रोग्राम डाऊनलोड करण्यासाठी http://audacity.sourceforge.net/ ह्या वेब लिंक वर जा. आवाज की दुनिया वर राज्य करण्याची ताकद Audacity मध्ये कितपत आहे याची चाहूल तुम्हाला त्या लिंकवरच लागेल.

सुमोपेंटः ऑनलाईन फोटोशॉप काऊंटर
अॅडोबी फोटोशॉप हे अजस्त्र ताकद असलेलं सॉफ्टवेअर आहे. त्याच्या भजनी तुम्ही एकदा लागलात की शिकता भुई थोडी होते. किंवा, फोटोशॉप शिकता शिकता पुरेवाट होते. ज्यांनी फोटोशॉप ह्या विषयावर हजारभर पानांची पुस्तके इंग्रजीत लिहीली आहेत असे अमेरिकन लेखकही आम्ही अजूनही फोटोशॉपचे विद्यार्थी आहोत, असं प्रस्तावनेत आवर्जुन लिहीतात. फोटोशी संबंधित काहीही काम निघालं की संबंधिताला आवर्जुन आठवण होते ती फोटोशॉप नामक सॉफ्टवेअरचीच. खरं तर फोटोशॉप मधला 'शॉप' हा शब्द कमालीच्या विनयाने आलेला आहे. ते शॉप म्हणजे दुकान नव्हेच, ते एक अतिप्रचंड सुपर मार्केट किंवा खरं तर तो फोटो मेगा मॉलचा प्रचंड असा कॉम्प्लेक्स आहे. आज तुम्ही फोटोशॉपची नवीन आवृत्ती म्हणजे सीएस-४ विकत घ्यायला गेलात तर त्याची अधिकृत किंमत आहे ६९९ डॉलर्स म्हणजे अदमासे ३४,००० रूपये. एवढी मोठी रक्कम टाकून फोटोशॉपची लायसन्स्ड कॉपी विकत घेणारे हे फोटो क्षेत्रातले पक्के व्यावसायिक किंवा मोठ्या संस्थाच असू शकतात. थोडक्यात, फोटो सॉफ्टवेअरच्या जगतातलं फोटोशॉप हे एक फाईव्ह स्टार हॉटेल आहे. फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जाऊन साधा चहा घ्यायचा म्हंटला तरी दीड-दोनशे रूपये मोजायची तयारी असावी लागते. ज्यांची अशी तयारी नसते ते फाईव्ह स्टार हॉटेलच्या नादी न लागता एखाद्या फास्ट फूड काऊंटरवर जाऊन आठ-दहा रूपयांत आपली चहाची तलफ भागवतात. असच एक फोटोशॉपसदृश्य फास्ट टूल काऊंटर म्हणजे इंटरनेटवरचं सुमोपेंट.
सुमोपेंट ह्या आपल्या मुख्य विषयाकडे वळण्यापूर्वी आपण नजर टाकूया अॅडोबी फोटोशॉपच्या गेल्या १८ वर्षांच्या वाटचालीकडे.. १९९० च्या फेब्रुवारीमध्ये फोटोशॉपची पहिली आवृत्ती म्हणजे व्हर्जन १.० आलं होतं. पुढे लगेचच काही महिन्यांनी २.० ही आवृत्ती आली. १९९४ साली ३.०, १९९६ साली ४.०, १९९८ साली ५.०, १९९९ मध्ये सुधारित ५.५, २००० मध्ये ६.०, २००१ मध्ये ७.० अशा वेगाने फोटोशॉप घोडदौड करत राहिलं. त्याची लोकप्रियता वाढत गेली. पुढे २००३ साली फोटोशॉप सीएस (म्हणजे ८.०), २००५ मध्ये सीएस२ (म्हणजे ९.०), २००७ मध्ये सीएस३ (म्हणजे १०.०) आणि २००८ सप्टेंबरमध्ये म्हणजे दोन महिन्यांपूर्वी सीएस४ (म्हणजे ११.०) ही सध्या ताजी असलेली फोटोशॉपची आवृत्ती आली. ज्यांनी २००७ साली म्हणजे सुमारे वर्षभरापूर्वी फोटोशॉपची सीएस३ ही तेव्हा नवीकोरी असणारी आवृत्ती अदमासे २०,००० रूपयांना अधिकृतपणे विकत घेतली होती, त्यांना आता सीएस४ चा अपग्रेड घेण्यासाठी सुमारे ९००० रूपये आणखी मोजावे लागतील.
वरच्या परिच्छेदात फोटोशॉपचा इतिहास भूगोल अशासाठी सांगितला की फोटोशॉपचा विकसित होण्याचा वेग प्रचंड आहे. जवळ जवळ दरवर्षी एक नवी आवृत्ती फोटोशॉपवाले आपल्यासमोर ठेवतायत. नवी आवृत्ती म्हणजे काहीतरी नवं त्यात असणार हे ओघानच आलं. ते नवं हवं असेल तर त्याची किंमत मोजणं हेही ओघानच आलं. ज्यांना ही किंमत मोजणं अवघड किंवा अशक्य आहे त्यांचेसाठी फोटोशॉपसारखं अधिकृतपणे मोफत उपलब्ध असणारं सॉफ्टवेअर म्हणजे गिंप. त्याची ताजी आवृत्ती म्हणजे २.६. फोटोशॉपच्या अकरा आवृत्त्यांपुढे गिंपच्या तीन आवृत्त्या हा वेग धीमा आहे हे खरच. गिंपला काही जण गरिबाचं फोटोशॉप असंही म्हणतात. ओपन सोर्स व अधिकृतपणे मोफत उपलब्ध असलेलं गिंप www.gimp.org ह्या साईटवरून तुम्हाला डाऊनलोड करता येईल. गिंप फोटोशॉपच्या जवळ येण्याचा आणि स्पर्धा करण्याचा प्रयत्न करतय हेही खरं, पण फोटोशॉपचा वेग महाप्रचंड आहे. तो मान्य करायलाच हवा.
आपला आजचा मुख्य विषय म्हणजे सुमोपेंट. त्या विषयाच्या नमनाला फोटोशॉपसंबंधी घडाभर तेल ओतावं लागलं याला तसच कारण आहे. एक म्हणजे सुमोपेंट हे इंटरनेटवर अगदी अलिकडे उपलब्ध झालेलं मिनी फोटोशॉप म्हणता येईल असं ऑनलाईन टूल आहे. सुमोपेंट हे तुमच्या संगणकावर इन्स्टॉल करावं लागत नाही. ते इंटरनेटवर तयारच उपलब्ध असतं. तुम्ही इंटरनेटवर www.sumopaint.com/app ह्या साईटवर गेलात की तुमच्या पुढे हे मिनी फोटोशॉप दत्त म्हणून उभं राहतं. ते अधिकृतरित्या मोफत आहे. त्यामुळे किंमत किती आणि दरवर्षी ती किती वाढणार याची कसलीच चर्चा उद्भवत नाही. भविष्यकाळातही सुमोपेंट विनामूल्यच राहणार असल्याची अधिकृत घोषणा त्यांनी केली आहे. त्यामुळे सुमोपेंट अतिशय वेगाने लोकप्रिय होत चाललं आहे. सुमोपेंट इंटरनेटवर थेट उघडत असलं तरी बर्यापैकी फास्ट आहे. त्यात तुम्ही तुमच्या हार्ड डिस्कवरील इमेज किंवा फोटो उघडू शकता. तुमचा फोटो क्रॉप करणं, तो लहान-मोठा, उभा-आडवा (रोटेट), उलटा सुलटा (फ्लीप) करणं, लेयर्समध्ये काम करणं, शार्पन, ब्लर, एम्बॉस, ग्लो करणं हे सारं त्यात आहेच. पण अनेकविध फिल्टर्सही त्यात उपलब्ध आहेत. फोटोशॉपसारखी तीस पेक्षा अधिक टूल्स त्यात दिली आहेत. विविध ब्रशेस, इफेक्टसची जोड त्यांना आहे. बेव्हेल, ग्रॅडीयंट, शॅडोजची व्यवस्था त्यात आहे. सिलेक्शन टेक्नीक्स, फेदर इफेक्ट, अल्फा लेयर, ब्राईटनेस, काँट्रास्ट, ह्यू, सॅच्युरेशन हे सगळंही त्यात आहे. मुख्य म्हणजे वर म्हंटल्याप्रमाणे हे सगळं मिळविण्यासाठी तुम्हाला करायचं काहीच नसतं. तुम्ही फक्त सुमोपेंट डॉट कॉम /अॅप ह्या साईटवर जायचं. इतकच.
ज्या देशात लिनक्स ही ऑपरेटींग सिस्टम तयार झाली त्या फिनलंड ह्या देशात हा सुमोपेंट तयार झाला आहे. सध्या त्याची ०.८ ही बाल्यावस्थेतील आवृत्ती नेटवर आहे. डिसेंबर २००८ अखेरीपर्यंत १.० ह्या पूर्ण आवृत्तीत तो प्रवेश करील अशी अपेक्षा आहे. फोटोशॉपमध्ये असलेल्या अनेक गोष्टी आज सुमोपेंट मध्ये नाहीत हे खरं आहे. पण ज्या पद्धतीने सुमोपेंट विकसित होतो आहे, तो पाहता त्याच्या पुढल्या आवृत्त्या फोटोशॉपच्या जवळ जवळ जात राहतील असं निश्चितपणे वाटतं. सुमोपेंट मध्ये तुमच्या फोटोवर काम करून झालं की त्या कामासकट तुमचा फोटो तुमच्या हार्ड डिस्कवर तुम्हाला सेव्हही करता येतो. किंवा, हवं तर सुमोपेंटच्या साईटवरच तो सेव्ह करून ठेवण्याची सोयही आहे. एवढं सारं असून फोटोशॉपच्या तुलनेत सुमोपेंट वापरायला फार सोपा आहे. लहान मुलांना ह्या साईटवर सोडलत तर काही काळात ती त्यात एवढी रमून जातात की निरर्थक गेम्सकडे त्यांचे लक्षही जात नाही असा अनुभव आहे.
सुमोपेंटसारख्या दुसर्या साईटस म्हणजे www.picnik.com आणि www.fotoflexer.com. ह्यातील पिकनिक डॉट कॉम गेली काही वर्षे नेटवर आहे. त्यामुळे ती चांगली विकसितही आहे आणि सुमोपेंटच्या तुलनेत थोरल्या भावासारखी आहे. पण तरीही ह्या मोफत उपलब्ध असणार्या तिन्ही साईटसमध्ये मला प्रभावित करते ती सुमोपेंट.
मुद्दा अगदी सरळ आहे. सुमोपेंट विनामूल्य आहे. तो इन्स्टॉल करावा लागत नाही. असं असूनही तो खूप काही देतो. तो मनोरंजनही करतो. तुमच्या फोटोवर काम करण्याचं कामही तो करतो. तुमची हार्ड डिस्कची जागाही तो मागत नाही. तुमची मेमरीही तो खात नाही. वेगाने चालतो. इंटरनेट अॅप्स आता वयात येत चालली आहेत याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे सुमोपेंट. भविष्यकाळात विंडोज किंवा लिनक्ससारखी संपूर्ण ऑपरेटींग सिस्टम, संपूर्ण एम.एस. ऑफिससारखा सूट आणि आपल्याला संगणकावर लागणारं सगळच इंटरनेटवर तयार मिळणार आहे असे संकेत ह्या सार्यातून मिळत आहेत. एकूणच संगणक जगतातील तंत्रज्ञानाचा वेग क्षणाक्षणाला वाढत चालला आहे, यात शंका नाही.

नेक्सस फाईल
कोरिया हा आशिया खंडातला आकाराने तसा लहानसाच देश. सॉफ्टवेअरच्या विश्वात कोरियाचं योगदान मर्यादितच मानलं जातं. पण ह्या देशातल्या जुंगहून नोह् ह्या तरूणाने तयार केलेली नेक्सक फाईल आणि नेक्सस फाँट ही दोन सॉफ्टवेअर मला नेहमीच प्रभावित करतात. जुंगहून नोह् हा शिक्षणाने आणि व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनीयर. दोन वर्षे कोरियाच्या सैन्यात आणि दोन वर्षे सॅमसंग कंपनीच्या सॉफ्टवेअर डिव्हीजनमध्ये काम केलेला जुंगहूनचा सध्याचा व्यवसाय काय? हा प्रश्न घेऊन आपण त्याची अधिकृत xiles.net ही वेबसाईट पाहिली तर Now - ? इतकच वाचायला मिळतं. एप्रिल २००७ पर्यंत जुंगहून सॅमसंग कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनीयर म्हणून काम करीत होता. पण नंतर काय, त्याच उत्तर म्हणजे केवळ एक प्रश्नचिन्ह.
जुंगहून सध्या तो करीत असलेल्या कामाचं वर्णन जर केवळ एका प्रश्नचिन्हात आटपून टाकीत असेल तर ते प्रश्नचिन्ह नीट तपासून पहावं लागतं. कारण सरळ आहे जुंगहून ने तयार केलेल्या Nexusfile ह्या सॉफ्टवेअरचं पाचवं व्हर्जन जून २००८ मध्ये बाहेर आलं. पुढे लगोलग नेक्ससफाँट ह्या त्याच्याच सॉफ्टवेअरचं दुसरं व्हर्जन जुलै २००८ मध्ये त्याने जगासमोर टाकलं. ऑगस्ट २००८ मध्ये, म्हणजे पुढच्याच महिन्यात जुंगहूनने नेक्ससफाईल चं आणखी सुधारित म्हणजे 5.02 हे व्हर्जन उपलब्ध केलं. जुंगहूनच्या Now - ? चा अर्थ हा असा आहे.
नेक्ससफाईल म्हणजे आपला विंडोज फाईल मॅनेजर असतो तसा फाईल मॅनेजर आहे. पण तो साधा फाईल मॅनेजर नाही. तो अतिशय बुद्धीमान, सक्रिय आणि उत्साही असा फाईल मॅनेजर आहे. म्हणजे नेमकं काय? नेमकं सांगायचं तर नेक्ससफाईल हा जुंगहूनचा फाईल मॅनेजर मायक्रोसॉफ्टच्या फाईल मॅनेजरपेक्षा कितीतरी स्मार्ट म्हणावा अशा प्रकारचा फाईल मॅनेजर आहे. अजूनही आपल्याला म्हणजे नेमकं काय हे लक्षात आलेलं नाही. नेक्ससफाईलची वैशिष्ट्ये एक एक करून उलगडून दाखवायची तर चार दोन लेखांचा पसारा मांडावा लागेल. पण थोडक्यात सांगायचं तर ही काही वैशिष्ट्ये पहाः एक, नेक्ससफाईलला दोन फाईल पेन्ज म्हणजे रकाने आहेत. एकाच वेळी सी ड्राईव्ह आणि ई ड्राईव्ह त्यात तुम्ही उघडू शकता. सी ड्राईव्हमधल्या एखाद्या डिरेक्टरीतील एखादी फाईल तुम्ही ई ड्राईव्हमधल्या डिरेक्टरीत कॉपी किंवा मुव्ह करू शकता. विंडोज फाईल मॅनेजर मध्ये ही सोय नाही. एकाच नेटवर्कवरील दोन वेगवेगळ्या संगणकांमध्ये अशा प्रकारची फाईल्सची हलवाहलव करणे यासाठीही नेक्ससफाईल उपयुक्त ठरते.
आपण जेव्हा फाईल मॅनेजर उघडतो तेव्हा एक भली मोठी यादी आपल्यासमोर येते. ही यादी बघून बघून 'तेच ते आणि तेच ते' आपल्या डोळ्यासमोर उभं ठाकत असतं. नेक्ससफाईल मध्ये ही यादी बहुरंगात येते. डिरेक्टरीज किंवा फोल्डर्स हो लाल रंगात दिसतात. Exe फाईल हिरव्या रंगात एकत्र दिसतात. Pdf फाईल्स निळ्या रंगात, ह्या सर्व रंगांना काळ्या रंगाची पार्श्वभूमी असल्याने फाईल मॅनेजर पाहताना होतो तसा त्रास नेक्ससफाईल पाहताना होत नाही. थोडक्यात, उत्तम मांडणी, उत्तम व्यवस्था असलेला नेक्ससफाईल आहे.
आज तरी नेक्ससफाईल जगाला मोफत उपलब्ध आहे. उद्या जुंगहून नोह् ने ठरवलं आणि एखाद्या मोठ्या कंपनीने हे सॉफ्टवेअर टेकओव्हर केलं तर मात्र काही हजार रूपये किंमतीचा शिक्का त्यावर बसल्याशिवाय राहणार नाही. मात्र, काही हजार रूपये किंमत मोजून नेक्ससफाईल विकत घेऊन वापरायला जगातले लाखो लोक तयार झाल्याशिवाय राहणार नाहीत हेही तेवढच खरं आहे. नेक्ससफाईल मध्ये तुम्ही एखादी भली मोठी फाईल म्हणजे उदाहरणार्थ ४० एम.बी. आकाराची फाईल तिचे प्रत्येकी आठ एम.बी. आकाराचे पाच तुकडे करून ते वेगवेगळ्या पाच इमेलना अटॅच करून पाठवू शकता. तसंच दहा टेक्स्ट फाईल एकमेकांना जोडून त्याची एक फाईल तयार करू शकता. स्प्लीट आणि जॉईन ची सुविधा घेण्यासाठी आपल्याला एरवी आणखी एखादं वेगळं सॉफ्टवेअर वापरावं लागतं. पण नेक्ससफाईलने ते फाईल मॅनेजरमध्येच उपलब्ध केलं आहे. आपल्या नेहमीच्या फाईल मॅनेजर मध्ये उपलब्ध नसलेल्या अशा अनेक सोयी नेक्ससफाईलमध्ये उपलब्ध आहेत. त्या प्रत्यक्ष पाहूनच त्याचे खरे मोल जाणता येईल. नेक्ससफाईल चा गौरव कितीतरी फ्रीवेअर फाईल्स वेबसाईटसनी पंचतारांकित सॉफ्टवेअर म्हणून केला आहे. पंचतारांकित सेवा मोफत मिळत असेल तर जुन्या धर्मशाळेत कोण कशाला थांबेल हे तर अगदी सरळ आहे. जुनी धर्मशाळा सोडायची की नाही हा भाग पुढचा. मोफतच्या पंचतारांकित दालनात डोकावून बघायला आज काहीच हरकत नाही, हे मात्र खरं.
जुंगहून नोह् चं नेक्ससफाईल सारखचं आणखी एक अतिशय उपयुक्त सॉफ्टवेअर म्हणजे नेक्ससफाँट. तुमच्या संगणकावर एखादा नवा फाँट लावण्यासाठी किंवा नको असलेला फाँट काढून टाकण्यासाठी नेक्ससफाँट खूप कामास येतो. आपल्याकडे असलेल्या फाँटची लिस्ट त्यातील फाँटच्या नमुन्यासह आणि मुख्य म्हणजे आपल्याला हव्या त्या शब्दांमध्ये तयार करून त्याची प्रिंट नेक्ससफाँटमध्ये घेता येते. डिटीपी ऑपरेटर्स आणि डिझायनर्सना नेहमी अँटी अलायझिंग प्रकारचे फाँटस लागतात. त्याची सोय नेक्ससफाँट मध्ये आहे. फाँटलिस्ट किंवा आपल्याकडील फाँटची यादी एक चित्र (म्हणजे जेपीजी किंवा तत्सम ग्राफीक फाईलच्या स्वरूपात) म्हणूनही तिथे सेव्ह करता येते. थोडक्यात, नेक्ससफाँट हा एक उत्तम फाँटव्युवर आहे. तोही प्रत्यक्ष डाऊनलोड करून वापरून पहायला हवा.
नेक्ससफाईल आणि नेक्ससफाँट हे दोन्ही प्रोग्राम्स मोफत डाऊनलोडींगसाठी www.xiles.net ह्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. ह्या दोन्ही प्रोग्राम्समध्ये युनिकोड सपोर्ट आहे. त्यामुळे मराठी वा अन्य भाषांतील अक्षरेही तिथे व्यवस्थित दिसतात. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे नेक्ससफाईल आणि नेक्ससफाँट यांचं इन्स्टॉलेशन अत्यंत सोप आणि सुरक्षित आहे. ह्या दोन्ही फ्रीवेअर्स किंवा मोफत सॉफ्टवेअर्सची शिफारस मला करावीशी वाटते.

पेन ड्राईव्हमधील तिजोरी
पेन ड्राईव्ह उर्फ युएसबी ड्राईव्ह उर्फ युएसबी स्टीक या सदर्भातला हा लेख आहे हे शीर्षकावरून तुमच्या लक्षात आलेलं आहे. जे तुमच्या लक्षात आलय ते अगदी बरोबर आहे. पेन ड्राईव्हच्या संदर्भातलाच हा लेख आहे. ज्या शीर्षकावरून तुम्ही हे ताडलत त्यातले पेन ड्राईव्ह हे शब्द तुम्हाला दिसले आणि तुम्ही तुमचा अंदाज बांधलात. तुमचा तो अंदाज बरोबर जरी असला तरी तो अर्धा अंदाज आहे. कारण शीर्षकात पुढे 'तिजोरी' हा शब्द आहे. पेन ड्राईव्हमधील तिजोरी म्हणजे नेमकं काय याचा अंदाज तुम्हाला आलेला नाही. तो यावा यासाठी मी एक साधं रोजच्या जीवनातलं उदाहरण घेतो.
कल्पना करा, आपण घरातून बाहेर जायला निघालेलो आहोत. घराला कुलूपही लावून झालेलं आहे. आता त्या कुलूपाची चावी आपण आपल्या विश्वासू शेजार्यांकडे देतो, आणि निश्चिंत मनाने बाहेर पडतो. शेजार्यावर आपला विश्वास असतो. पण एक लक्षात घ्यायला हवं की शेजार्यावर कितीही विश्वास असला तरी आपल्या कपाटातील तिजोरीची चावी आपण शेजार्याला देत नाही. आपल्या तिजोरीत नेमकं काय ठेवलय याची माहितीही, शेजारी कितीही विश्वासू असला तरी, आपण त्याला देत नसतो. हे सगळं स्वाभाविक असतं. मुख्य दरवाजाची चावी लावून शेजारी आपलं घर उघडू शकतो याची कल्पना आपल्याला असते. आपल्या अनुपस्थितीत त्याने तशा पद्धतीने घर उघडलं तरी आपली त्याला तशी हरकत नसते. पण आपल्या घराची तिजोरी आणि त्यातल्या चीजवस्तू ही आपली खाजगी आणि अतिशय गुप्त अशी बाब असते. ती चावी आपण कुणालाच देत नसतो.
रोजच्या जीवनातलं हे उदाहरण बाजूला ठेवून आपण आपल्या पेन ड्राईव्हकडे वळू. पेन ड्राईव्ह म्हणजे काय हे 'एंटर' च्या वाचकांना समजावून सांगण्याची आवश्यकता नाही. ह्याच सदरात आपण 'ज्याची त्याची मास्टर की' नावाचा लेख वाचला होता. त्यात मी पेन ड्राईव्हचा वापर किती सोपा झाला आहे, किती परवडण्याजोगा आहे आणि प्रत्येकाला तो किती आवश्यक झाला आहे हे लिहीलं होतं. त्यामुळे तो भाग टाळून आपण आपल्या पेन ड्राईव्हकडे वळू. पेन ड्राईव्ह आणि आपलं घर याची तुलना करून पहा. पेन ड्राईव्ह हा सुद्धा आपल्या घरासारखाच असतो. पूर्णतः आपला स्वतःचा, स्वतःपुरता आणि ज्याच्यात आपल्याला पूर्ण प्रायव्हसी अपेक्षित असते अशी ती जागा (स्पेस) असते. घरातही स्पेस असते, आणि पेन ड्राईव्हमध्येही स्पेस असते. घरात आपलं चालतं. पेन ड्राईव्हमध्ये काय ठेवायचं, काय काढायचं याबद्दलही आपलं चालत असतं. ह्या निकषांवर आपलं घर आणि आपला पेन ड्राईव्ह यांच्यात चांगलच साम्य आहे.
आपल्या पेन ड्राईव्हमध्ये कशाकशाचा म्हणून भरणा नसतो? मित्र-मैत्रिणीच्या पर्सनल फोटोंपासून ते आपल्या वेगवेगळ्या पासवर्डपर्यंत आपण त्यात भरलेलं असतं. आपल्या आठ, दहा ईमेलचे पत्ते, आपल्या दोन चार क्रेडिट कार्डांचे एटीएम पिन नंबर्स, बॅंकेच्या लॉगिनचा तपशील, हिशोब, महत्वाची पत्रे वगैरे वगैरे सगळा जोखमीचा डेटा आपल्या पेन ड्राईव्हमध्ये साठवून ठेवणारी मंडळी मला माहीत आहेत. काही जण तर आपली रोजनिशी लिहून ती पेन ड्राईव्हमधल्या डायरी नावाच्या फोल्डरमध्ये दैनंदिन स्तरावर साठवत असतात. हा सारा डेटा दुसर्या कोणाच्याही हातात पडू नये असं आपल्याला वाटणं हे अगदी स्वाभाविक असतं. अतिशय खाजगी आणि अतिशय व्यक्तीगत असा तो माहिती-ऐवज असतो. असं असताना अचानक आपला पेन ड्राईव्ह दुसर्या कोणाच्या तरी हातात देण्याची वेळ आपल्यावर कधी तरी येते. अशा वेळी आपली गडबड उडते. पेन ड्राईव्हमध्ये तो व्यक्तीगत डेटा असतो. दुसर्याच्या हातात तो द्यावा, तर आपल्याला अडचणीचं वाटत असतं. वेळ तर आणीबाणीची असते. घाईचीही असते. वेळ नसतो. मग अशा वेळी आपण मधला मार्ग शोधतो. आपला पेन ड्राईव्ह आपण दुसर्याच्या हातात देण्यापूर्वी त्यातला तो व्यक्तीगत डेटा प्रथम डिलीट करतो. डिलीट झाल्याची खात्री करतो, मग निर्धास्त मनाने पेन ड्राईव्ह आपल्या मित्राच्या, नातेवाईकाच्या, किंवा सहकार्याच्या किंवा बॉसच्या हातात देतो. साधारणतः हीच मंडळी अशी असतात की ज्यांच्या आग्रहाला बळी पडण्यावाचून आपल्याला गत्यंतर नसतं.
आता पहा, आपलं घर आणि आपला पेन ड्राईव्ह याच्यातला फरक. आपल्या घराची चावी शेजार्याकडे ठेवताना आपण निर्धास्त असतो. कारण आपल्याला माहीत असतं की शेजार्याने घर उघडलं तरी त्याला आपली तिजोरी उघडता येणार नाहीये. त्या तिजोरीत काय आहे हे त्याला कधीच समजणार नाहीये. पण पेन ड्राईव्हमध्ये तशी तिजोरी कुठे असते? सगळच उघडं असतं. ज्याच्या हातात पेन ड्राईव्ह असतो तो त्यातलं काहीही पाहू शकतो. अशा परिस्थितीत काय करायचं? किती वेळा आपला व्यक्तीगत डेटा त्यात कॉपी करायचा, किती वेळा डिलीट करायचा? ह्या परिस्थितीवर काही उपाय नाही का? घरात जशी बंद तिजोरी असते, तशी काहीतरी पण पूर्णतः खात्रीची सोय आपल्या पेन ड्राईव्हमध्ये करता येणार नाही का?
मंडळी, घरातल्या तिजारीइतकीच किंबहुना त्यापेक्षा उत्तम सोय आपल्याला आपल्या पेन ड्राईव्हमध्ये करता येते. आपला व्यक्तीगत डेटा त्यात ठेवून आपण आपला पेन ड्राईव्ह निर्धास्तपणे कुणाच्याही हातात देऊ शकतो. आपला पेन ड्राईव्ह त्याने ' कोना कोना छान मारून ' पाहिला तरी आपल्या तिजोरीत काय आहे हे त्याला दिसूही शकत नाही, आणि कळूही शकत नाही. खरं तर आपली ती तिजोरीच मूळात अदृश्य असते. जर तिजोरीच दिसत नसेल तर त्यात आत काय आहे हे कळण्याची कसलीही सुतराम शक्यता मूळातच नाही. अगदी एखादा काँप्युटर एक्सपर्ट जरी येऊन बसला किंवा एखाद्या हॅकरच्या हातात तुमचा पेन ड्राईव्ह सापडला तरी त्यालाही दुसरा जन्म घेतल्याशिवाय ती तिजोरी फोडून आतला ऐवज पाहता येणार नाही.
पेन ड्राईव्हमध्ये तिजोरीची ही जी संकल्पना मी सांगतो आहे, तिचे नाव आहे ' रोहोस मिनी ड्राईव्ह ' . संकल्पना साधी सोपी आहे. तुमच्या पेन ड्राईव्हमध्येच एक स्वतंत्र ड्राईव्ह गुप्तपणे जन्माला घातला जातो. ह्या ड्राईव्हमध्ये तुम्हाला हव्या त्या पद्धतीने फोल्डर्स व फाईल्स ठेवता येतात. ही सारी फोल्डर्स व फाईल्स AES 256 bit key length पद्धतीने एन्क्रीप्ट करून साठवली जातात. म्हणजेच तुम्ही त्यात फोटो साठवला असला किंवा एखादी व्हिडिओ क्लीप त्यात ठेवली असली तरी ती सांकेतिक भाषेत गोंधळ घालून ठेवलेल्या माहितीसारखी भासते. ती वाचणं हे हॅकर सोडा ब्रम्हदेवालाही शक्य होणारं नसतं. आता बघा, तुमचा पेन ड्राईव्ह जेव्हा तुम्ही तुमच्या किंवा कोणाच्याही संगणकाच्या युएसबी ड्राईव्हमध्ये सरकवता तेव्हा तुम्हाला काहीतरी G किंवा H वगैरे अद्याक्षराचा नवा ड्राईव्ह विंडोज एक्स्प्लोअरर मध्ये दिसू लागतो. माझ्या संगणकात मी माझा पेन ड्राईव्ह लावला की H ड्राईव्ह अवतरतो. ह्याच ड्राईव्हमध्ये आपल्या पेन ड्राईव्हमधील फोल्डर्स आणि फाईल्स असतात. मी माझ्या पेन ड्राईव्हमध्ये रोहोस मिनी ड्राईव्ह ची सोय केली आहे. रोहोस मिनी ड्राईव्ह म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एक प्रकारची तिजोरीच (तीही एन्क्रीप्शनची सोय असलेली) आहे. माझ्या H ड्राईव्हमध्ये इतर सर्व फोल्डर्स व फाईल्स दिसतात. त्या कोणालाही दिसतात. पण रोहोस मिनी ड्राईव्ह मधील फोल्डर्स व फाईल्स मात्र दिसत नाहीत. त्या ऐवजी Rohos नावाची एक Exe फाईल दिसते. ह्या फाईलवर क्लीक केल्यानंतर ती तुमचा पासवर्ड मागते. तो पासवर्ड दिल्याशिवाय माझ्या माहितीची तिजोरी मूळातच उघडत नाही. त्यामुळे तिजोरीतला माझा तो डेटा सुरक्षित राहतो. इतरांच्या हातात पेन ड्राईव्ह देऊनही मला डेटा सेफ्टी ची भिती नसते.
हा रोहोस मिनी ड्राईव्ह लावणं अतिशय सोपं आहे. लहान मुलांनाही तो सहजपणे लावता येईल इतका सोपा. त्याची पद्धत सांगतो. प्रथम http://www.rohos.com/rohos_mini.exe ह्या लिंकवरून रोहोस मिनी ड्राईव्ह डाऊनलोड करून घ्या. तो तुमच्या संगणकावर इन्स्टॉल करा. तुमच्या संगणकावर Windows XP किंवा Windows Vista असणं मात्र आवश्यक आहे. रोहोस मिनी ड्राईव्ह पूर्णपणे मोफत उपलब्ध आहे. त्यात तुम्ही १ जीबीपर्यंतचा डेटा एन्क्रीप्ट करून गुप्त ड्राईव्हमध्ये साठवू शकता. रोहोसचे वैशिष्ट्य हे की एक पेन ड्राईव्ह असून तुमच्या एक्स्प्लोअररमध्ये दोन ड्राईव्हज दिसतात. माझ्या बाबतीत एक ड्राईव्ह H असतो तर दुसरा ड्राईव्ह R असतो. H मधला डेटा सर्वांसाठी खुला असतो. R ड्राईव्ह पासवर्ड टाईप केल्याशिवाय मूळातच दिसत नाही. पासवर्ड टाईप केला की मात्र एक्स्प्लोअरर तो दाखवू लागतो. पासवर्ड आपल्याला हवा तेव्हा बदलता येतो. गुप्त ड्राईव्हमध्ये फोल्डर्स वा फाईल्स घालता येतात, काढता येतात. एन्क्रीप्शनची प्रक्रिया त्यात आपोआप होते, आपल्याला त्यासाठी काहीही करावं लागत नाही. ही सारी माहिती www.rohos.com ह्या साईटवर तुम्हाला पहायला मिळेल.
थोडक्यात काय, तर यापुढे काळजी करू नका. आपलं घर काय, किंवा पेन ड्राईव्ह काय चावी विश्वासू शेजार्याच्या हातात द्यायला हरकत नाही. तिजोरी मात्र नीट बंद करून ठेवा. त्याची चावी कोणाच्याही हातात पडणार नाही याची काळजी घ्या. तिजोरीत हवा तो ऐवज ठेवा. नंतर मग मात्र निर्धास्त राहण्याची सवय करून घ्यायला हवी. निर्धास्त कसं रहायचं हे शिकवणारे ब्लॉग्ज आणि ट्युटोरियल्सही इंटरनेटवर उपलब्ध आहेत. तेव्हा काळजी नसावी.

२० फेब्रु, २०११
Recycle Bin मधून डिलीट झालेल्या फाईल्स परत मिळू शकतात का?
Recycle Bin मधून फाईल्स डिलीट झाल्या तर त्या परत मिळवता येत नाहीत अशी बर्याच जणांची समजूत असते. Recycle Binही Windows ची एक डिरेक्टरी आहे. डिलीट केलेल्या फाईल्स इथे आणल्या जातात. जेव्हा आपण Recycle Bin मोकळी म्हणजेEmpty करतो तेव्हा त्या Windows मधून काढून टाकल्या जातात. मात्र त्यांची मुळे संगणकावर अस्तित्वात असतात. ज्यावेळी ह्या मुळांवर दुसर्या फाईल्स चढतात तेव्हा ती मुळे नाहीशी होतात. त्यानंतर मात्र फाईल्स परत मिळू शकणं अतिशय दुरापास्त किंवा जवळजवळ अशक्य असतं.Recycle Bin मधूनही गेलेल्या तुमच्या फाईल्स परत मिळविण्यासाठी Undelete Plus नावाचा मोफत उपलब्ध असणारा प्रोग्राम तुम्ही वापरायला हवा. http://www.undelete-plus.com/ ह्या साईटवरून तुम्ही तो डिलीट करू शकता.
फाईल डिलीट करताना File is in use by some application असा संदेश येतो तेव्हा काय करावे?
व्हायरस, स्पायवेअर वा अन्य कारणामुळे हे होऊ शकतं. सर्वांना ही समस्या कधी ना कधी भेडसावलेली असते. प्रथंम त्यामागे स्पायवेअर वा व्हायरसचे कर्तृत्व तर नाही ना हे अगोदर तपासून पहा. ते नाही याची खात्री झाली तर http://www.dr-hoiby.com/WhoLockMe/ ह्या लिंकवर जा. तेथे Who lock me नावाचे २३ के साईजचे एक टूल (Freeware) आहे. ते वापरून तुम्हाला तुमची समस्या सोडवता येईल.
Parental software - एक कौटुंबिक गरज
Parental Filter ह्या नावाचं मोफत आणि माझ्या मते उत्तम असं सॉफ्टवेअर तुमच्यासाठी इंटरनेटवर उपलब्ध आहे.http://www.ecommsec.com/pf/PfSetup30.exeह्या लिंकवर क्लीक केलत की Parental Filter चा डाऊनलोड सुरू होईल. केवळ २.१ एम.बी. आकाराचं हे डाऊनलोड आहे. त्यामुळे ते पटकन डाऊनलोड होतं. डाऊनलोड पूर्ण झाल्यानंतर इन्स्टॉल करा. इन्स्टॉलेशन नंतर तुमच्या पुढे खालील स्क्रीन येईल.

त्यातील वरच्या बाजूस असलेल्या उजवीकडील लाल आयतावर (Banlist Off) वर क्लीक करा. म्हणजे तो चौकोन हिरवा होईल आणि Banlist On होईल. याचा अर्थ तुमचं Parental Filter चालू झालं. Pornography किंवा अश्लील प्रकारच्या वेबसाईटस उघडायचा प्रयत्न झाल्यास त्या उघडणार नाहीत. Page can not be displayedअसा संदेश मिळेल.
Parental Filter ने हजारो पोर्न व तत्सम साईटसची यादी केली आहे, आणि त्यांचा समावेश Banlist मध्ये केला आहे. दरमहा त्यात नवनव्या साईटसची भर पडत असते. त्यामुळे तुम्ही Banlist महिन्यातून एकदा जरूर अपडेट करा.
आता, शेवटची पण सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे पासवर्डची. तुम्ही लावलेलं Parental Filter कुणीही काढू नये यासाठी पासवर्डची व्यवस्था आहे. पासवर्ड लावण्यासाठी खाली दाखवलेल्या खुणेवर क्लीक करा.

आता समोर आलेल्या खालील विंडोमध्ये तुमचा पासवर्ड द्या.
हा प्रोग्राम बर्यापैकी लोकप्रिय आहे. पण तो फार मोठ्या प्रमाणावर साईटस बॅन करतो अशी टीका काही जण करतात. ज्या अर्थी तो लोकप्रिय आहे, त्याअर्थी आपण टीकाकारांकडे दुर्लक्ष करावे हेच बरे.
उपयुक्त Unlocker..
आपल्याला संगणकावरील एखादी फाईल काढून टाकायची असते. आपण ती Delete करण्याचा प्रयत्न करीत असतो आणि आपल्याला यश येत नसतं. खाली दाखवल्याप्रमाणे काहीतरी विचित्र संदेश संगणक देत असतो आणि ती फाईल पुन्हा पुन्हा प्रयत्न करूनही डिलीट होत नसते. ते संदेश साधारणतः असेः
ह्यापैकी एखादा वा तत्सम संदेश पाहून आपल्याला आश्चर्य वाटत असतं की मला जी फाईल डिलीट करायची आहे ती ना मी कुठे उघडली आहे, ना ती कोणत्याही प्रोग्रामसाठी वापरात आहे. असं असूनही ' The file is in use by another program or user' हा संदेश का येतोय. चक्रावल्यामुळे पुढे आपल्याला यामागे एखाद्या व्हायरसचा किंवा स्पायवेअरचा तर हात नसेल ना असा संशयही येऊ लागतो.
ह्या परिस्थितीतून सुटण्यासाठी अत्यंत उपयुक्त सॉफ्टवेअर म्हणजे Unlocker. सध्या त्याचे १.८. ८ हे व्हर्जन उपलब्ध आहे. हा प्रोग्राम अधिकृतरित्या मोफत म्हणजेFreeware आहे. तो डाऊनलोड करण्यासाठी हा घ्या पत्ताः
http://www.filehippo.com/download_unlocker/

आपला पेन ड्राईव्ह बाहेर काढतानाही बरेच वेळा पेन ड्राईव्ह मधल्या काही फाईल्स वापरात असल्याने तो काढणं Safe नाही
अशा प्रकारचे संदेशही वारंवार येत असतात. त्यातला एक संदेश खालील विंडोत दाखवला आहे.

अशा वेळी पेन ड्राईव्हच्या रूट फोल्डरवर वा ड्राईव्ह लेटरवर राईट क्लीक करून Unlocker ला त्या फाईल्स मोकळ्या करायला सांगितल्यास आपली समस्या सुटते.राईटक्लीक करण्याचा Unlocker चा नेमका मेनू आयटेम खाली दाखवला आहे.

वर जो Unlocker डाऊनलोडचा पत्ता दिला आहे तो पाहिल्यावर ही साईट फ्रान्समधील आहे हे तुमच्या लक्षात येईल. आपल्या मदतीसाठी सारं संगणकीय जग कसं प्रयत्नशील असतं त्याचच हे एक उदाहरण.
Cannot delete file: Access is denied
There has been a sharing violation.
The source or destination file may be in use.
The file is in use by another program or user.
Make sure the disk is not full or write-protected and that the file is not currently in use.
ह्यापैकी एखादा वा तत्सम संदेश पाहून आपल्याला आश्चर्य वाटत असतं की मला जी फाईल डिलीट करायची आहे ती ना मी कुठे उघडली आहे, ना ती कोणत्याही प्रोग्रामसाठी वापरात आहे. असं असूनही ' The file is in use by another program or user' हा संदेश का येतोय. चक्रावल्यामुळे पुढे आपल्याला यामागे एखाद्या व्हायरसचा किंवा स्पायवेअरचा तर हात नसेल ना असा संशयही येऊ लागतो.
ह्या परिस्थितीतून सुटण्यासाठी अत्यंत उपयुक्त सॉफ्टवेअर म्हणजे Unlocker. सध्या त्याचे १.८. ८ हे व्हर्जन उपलब्ध आहे. हा प्रोग्राम अधिकृतरित्या मोफत म्हणजेFreeware आहे. तो डाऊनलोड करण्यासाठी हा घ्या पत्ताः
http://www.filehippo.com/download_unlocker/
खूप जणांना ती सापडत नाही. त्यामुळे खालील चित्रात ती नेमकी बाणाने दाखवली आहे.)
आपला पेन ड्राईव्ह बाहेर काढतानाही बरेच वेळा पेन ड्राईव्ह मधल्या काही फाईल्स वापरात असल्याने तो काढणं Safe नाही
अशा प्रकारचे संदेशही वारंवार येत असतात. त्यातला एक संदेश खालील विंडोत दाखवला आहे.
अशा वेळी पेन ड्राईव्हच्या रूट फोल्डरवर वा ड्राईव्ह लेटरवर राईट क्लीक करून Unlocker ला त्या फाईल्स मोकळ्या करायला सांगितल्यास आपली समस्या सुटते.राईटक्लीक करण्याचा Unlocker चा नेमका मेनू आयटेम खाली दाखवला आहे.
वर जो Unlocker डाऊनलोडचा पत्ता दिला आहे तो पाहिल्यावर ही साईट फ्रान्समधील आहे हे तुमच्या लक्षात येईल. आपल्या मदतीसाठी सारं संगणकीय जग कसं प्रयत्नशील असतं त्याचच हे एक उदाहरण.
मजेदार फोटोस्केचर
वर दिला आहे तो आहे वाघाचा मूळ फोटो.
फोटोस्केचर हे मोफत उपलब्ध असलेले सॉफ्टवेअर (फ्रीवेअर) वापरून
काही क्षणांत तयार केलेली दोन कृष्ण-धवल रेखाचित्रे खाली दिली आहेत.

हे फोटोस्केचर डाऊनलोडींगसाठी उपलब्ध आहे http://www.fotosketcher.com/ ह्या वेबसाईटवर. यात पेन्सिल स्केच, पेन व इन्क स्केच, कलर स्केचेस अशा एकूण चार प्रकारात स्केचेस करता येतात. वापरायला आणि समजायला खूप सोपं, आणि त्या मानाने सुंदर स्केचेस अगदी कमी वेळात तयार करणारं
हे फ्रीवेअर अनेक ठिकाणी ५ स्टार मिळून लोकप्रिय झालं आहे.
ज्यांच्याकडे फोटोशॉपसारखे कमर्शियल सॉफ्टवेअर नाही,
किंवा ते वापरणं अवघड जातं अशांना हे छोटेखानी स्केच टूल नक्कीच आवडेल.
फोटोस्केचरची ही खालील विंडो पहा.

त्यावरून हे सॉफ्टवेअर काय आहे हे तुमच्या सहज लक्षात येईल.
तुम्हाला हवा तो फोटो उघडा, मग फक्त त्या विंडोतले स्लायडर मागे पुढे करा
की झालं तुमचं स्केच तयार. फारच सोपं,
म्हंटलं तर लहान मुलांसाठी,
म्हंटलं तर नुकतेच संगणकावर बसू लागलेल्या मोठ्यांसाठी.

न फुटणारं भिंग..
बारीक टाईप वाचणं हा काही वेळा कामाचा तर काही वेळा नेहमीच्या वाचनाचा भाग असतो. बरेच ज्येष्ठ नागरिक अशा वेळी बहिर्गोल भिंग घेऊन वाचन करताना दिसतात. संगणकाच्या स्क्रीनवरचं बारीक अक्षरही असं बहिर्गोल भिंग घेऊन वाचणं शक्य आहे का? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे, 'होय शक्य आहे. त्यासाठी एक डिजिटल बहिर्गोल भिंग तुम्हाला मिळू शकतं.

वरील चित्रात दाखविल्याप्रमाणे हे भिंग तुमच्या स्क्रीनवर अशा स्टाईलमध्ये येतं. डिजिटल असल्याने ते अर्थातच हाताने फिरवावं लागत नाही. माऊसच्या क्लीकमध्ये धरून ते हवं तिथे सरकवता येतं. बारीक टाईप वाचण्यासाठी बरीच मंडळी त्याचा उपयोग सध्या करीत आहेत. तुम्हालाही प्रयत्न करून पहायला हरकत नाही. हे भिंग म्हणजे एक मोफत प्रोग्राम किंवा फ्रीवेअर आहे. http://www.4neurons.com/other/Magnifying_Glass/ ह्या साईटवरून तुम्ही हे भिंग डाऊनलोड करून घेऊ शकता. हे भिंग वापरणं हा सवयीचा भाग आहे. सुरूवातीस ते वापरणं किचकट वाटू शकतं. नंतर मग ते वापरण्याचीच सवय होऊन बसणही अशक्य नाही.
हे भिंग मोफत मिळतं. ते फुटत नाही. हरवत नाही. कोणी ते आपल्याकडे मागू शकत नाही. एक गंमत म्हणून ते (म्हणजे माऊस) लहान मुलांच्या हातात द्यायलाही हरकत नाही. उपयुक्तता आणि मनोरंजन एकाच वेळी साधणारं हे भिंग आहे

गजराचं घड्याळ ऑनलाईन आणि ऑफलाईन
हे गजराचं घड्याळ वापरायला सोपं आहे. आपल्याला हवा तो वेळ सेट करायचा आणि नंतर SET ALARM वर क्लीक करायचं. हे डिजिटल घड्याळ असल्याने कोणत्याही मिनिटापर्यंत आपल्याला गजर लावता येतो. गजराचे एकूण चार आवाज कूकूक्लॉक ने दिले आहेत. पहिला आहे कोंबड्याची भली मोठी बांग. दुसराघड्याळाचा नेहमीचा कीर्रर्रर्र करून वाजणारा आवाज, तिसरा इलेक्ट्रॉनिक गजराचा आवाज आणि चौथा गिटार ह्या वाद्याचा आवाज. आपल्याला हवा तो आवाज निवडून आपण गजर लावू शकतो. ह्या घड्याळाला साईटवाल्यांनी Swiss Made असं म्हंटलं आहे. ते का, हे समजायला त्यांनी मार्ग ठेवलेला नाही. पण त्याने काही बिघडत नाही कारण अपनेको आम खाने से मतलब आहे. गजर बरोबर होणं महत्वाचं.
खास टीपः ही साईट केवळ एका पानाची आहे. हे पान तुमच्या ब्राऊझरच्या File मेनूमध्ये जाऊन आणि नंतर Save as.. वर क्लीक करून html (Complete) फाईल म्हणून सेव्ह करा. हे पान सेव्ह करताना त्याबरोबर Online Alarm Clock_files नावाचं एक फोल्डर आपोआप सेव्ह होतं. त्या फोल्डरमध्ये जा. तिथे klok नावाची फ्लॅश फाईल मिळेल. ही फाईल फक्त ७८ के.बी. इतकी छोटी आहे. ही फाईल म्हणजेच ते अलार्म क्लॉक आहे. त्या फाईलवर डबलक्लीक केलं की ते गजराचं घड्याळ उघडतं. इंटरनेट असो वा नसो. गजर लावता येतो, झालेला गजर थांबवता येतो. हवी ती वेळ आणि हवा तो आवाज अर्थातच निवडता येतो. फक्त ७८ के.बी. च्या एका फाईलमध्ये एवढं सगळं साठू शकलं याचं श्रेय आजच्या प्रगत फ्लॅश टेक्नॉलॉजीला. त्या फोल्डरमधल्या इतर (जावास्क्रीप्ट वगैरे) फाईल्सचा त्या घड्याळाला तसा काहीच उपयोग नाही. हव्या तर त्या डिलीट करून टाका. हे गजराचं घड्याळ कोणालाही ईमेलने पाठवता येणं शक्य आहे. प्रत्यक्ष प्रयोग करून पहा
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)