क्रेग सिल्व्हरस्टीन.. गुगलमध्ये त्याचं पद फार मोठं होतं. 'डायरेक्टर, टेक्नॉलॉजी'. 1998 ते फेब्रुवारी 2012 हा सुमारे 14 वर्षांचा प्रदीर्घ काळ त्याने गुगलमध्ये काढला. ताजी बातमी म्हणजे 10 फेब्रुवारी 2012 पासून त्याने गुगल कंपनी सोडली. राजीनामा देऊन तो बाहेर पडला...
खास बातम्या लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
खास बातम्या लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
१० मार्च, २०१२
२२ फेब्रु, २०१२
बिलंदर डॉटकॉमची थरारक कहाणी (भाग-5)
![]() |
| स्वतःच्या कार्टुनबरोबर कीम डॉटकॉम.. |
कीमचं आयुष्य हे आता फक्त एक हॅकर म्हणून उरलेलं नव्हतं. हेराफेरी करणारा एक बीझनेसमन म्हणूनही त्याची ख्याती हळूहळू पसरू लागलेली होती. ह्या ख्यातीत तो स्वतःही भर घालत असे. 2001 मध्ये इंग्लंडमधल्या ‘गार्डियन’ ह्या सुप्रसिद्ध दैनिकाला मुलाखत देताना त्याने सांगितले की सिटीबँकेच्या सिस्टममध्ये घुसखोरी करून त्याने 20 दशलक्ष डॉलर्स काढून ते ग्रीनपीस ह्या सामाजिक संस्थेच्या बँक अकाउंटमध्ये जमा केले.
१३ फेब्रु, २०१२
बिलंदर डॉटकॉमची थरारक कहाणी (भाग-4)
कीम श्मिट म्हणजे फार मोठा गुंतवणूकदार अशी प्रतिमा आयती तयार होतीच. कीमनी letsbuyit.com मध्ये 3,75,000 युरोची गुंतवणूक केली. त्याच्या घोषणा मिडियात आल्या. कीमने मग मुलाखती दिल्या. “ही कंपनी मोठा धंदा आणि मोठा नफा मिळवणार असल्याचं” निवेदन कीमने पत्रकारांपुढे केलं. पुढे असंही सांगितलं की लवकरच तो आणखी 5 कोटी युरो letsbuyit.com मध्ये गुंतवणार आहे. बापरे, 5 कोटी युरो? म्हणजे 327 कोटी रूपये? काही जणांच्या मते ही घोषणा केली तेव्हा कीमच्या खिशात म्हणे दहा युरो सुद्धा नव्हते..
६ फेब्रु, २०१२
बिलंदर डॉटकॉमची थरारक कहाणी (भाग-3)
![]() |
| फेब्रुवारी 2012 चा पहिला आठवडा संपत आला तरी अजून जामिन नाही. |
३० जाने, २०१२
बिलंदर डॉटकॉमची थरारक कहाणी (भाग-2)
आपण पाहिलं की कीम डॉटकॉम ह्या हॅकरच्या न्युझीलंडमधील हवेलीवर दोन हेलीकॉप्टर्स उतरली आणि त्यातून एकूण 76 पोलीस कमांडो उड्या टाकत त्याला पकडण्यासाठी सरसावले. हवेलीचे इलेक्ट्रॉनिक लॉकचे दरवाजे तोडत पोलीस आत शिरले. पोलीसांना हवेलीच्या आतला भाग हा एक भुलभुलैय्याच वाटला. बंद होणारे इलेक्ट्रॉनिक दरवाजे आणि एका आत एक भपकेबाज दालनं.
पोलीस कमांडो हातातल्या मशिनगन्स सरकवत एक एक दालन काबीज करीत होते. तर, आत कीम डॉटकॉम इकडून तिकडे सरकत होता. सहजासहजी हातात येत नव्हता. कुटुंबिय, स्टाफ, त्याचे पाहुणे आणि मित्र पोलीसांच्या ताब्यात आले होते. पण कीम डॉटकॉम दृष्टीपथात येत नव्हता.

बिलंदर डॉटकॉमची थरारक कहाणी (भाग-1)
2012 चा पहिला जानेवारी महिना नुकताच संपला. पण, ह्या वर्षातील सर्वांत वेधक घटनांपैकी एक ह्या महिन्यांत घडली आहे. ही ताजी बातमी आहे गेल्या शनिवारची म्हणजे 21 जानेवारी 2012 ची.
21 जानेवारी, वेळ सकाळी साडेसहा पावणेसातची. स्थळ न्युझीलंडमधला ऑकलंड हा अत्यंत निसर्गरम्य परिसर. ऑकलंडमध्ये डिसेंबर ते फेब्रुवारी हा उन्हाळ्याचा काळ. पण तापमान असतं जास्तीत जास्त 23 डिग्री सेल्सियस. म्हणजे उन्हाळा नव्हेच, सुखद हिवाळाच बारा महिने. अशा वातावरणात एखादा हिल स्टेशनसारखा हिरवागार परिसर डोळ्यासमोर आणा. ऑकलंड तसं आहे. अशा ऑकलंडमध्ये संपूर्ण न्युझीलंड देशातली सर्वांत आलिशान अशी हवेली आहे. राजवाड्यालाही लाजवील अशी. माणसांचा राहण्याचा कारपेट एरियाच 25,000 चौरस फुटांचा. आजूबाजूला सुंदर, विस्तीर्ण, हिरवं-पोपटी लॉन, त्यावर अनेक कारंजी, सर्वत्र सुंदर वनराई. असा एकूण सुमारे 26 लाख स्क्वेअर फुटांचा (म्हणजे 60 एकरांचा) ऐसपैस परिसर. अशा त्या हवेलीचे

१२ ऑक्टो, २०११
स्टीव्ह जॉब्स वर एक तासाची डॉक्युमेंटरी 'डिस्कव्हरी चॅनेल' वर पहा..
"iGenius: How Steve Jobs Changed The World"
वरील शीर्षकाची एक तासाची नवी कोरी डॉक्युमेंटरी फिल्म 'डिस्कव्हरी चॅनेल' तर्फे तातडीने तयार करण्यांत आली असून ती येत्या रविवारी म्हणजे 16 ऑक्टोबर 2011 रोजी रात्री 8.00 वाजता पहायला मिळणार आहे. 16 ऑक्टोबर (रविवार) रात्री 8.00 ही वेळ अमेरिकन डिस्कव्हरी चॅनेलची असून ती ह्या डॉक्युमेंटरी फिल्मच्या प्रिमियर शोची मूळ तारीख आणि वेळ आहे. तेथील प्रक्षेपण संपल्यानंतर जगातील एकूण 210 देशांतील डिस्कव्हरी चॅनेल्सवर देखील ती दाखविण्यांत येणार असल्याची माहिती 'डिस्कव्हरी चॅनेल' ने दिली आहे.
अमेरिकेतील 16 ऑक्टोबरची रात्री 8.00 ते 9.00 ही एक तासांची वेळ म्हणजे भारतात 17 ऑक्टोबरच्या भल्या सकाळची 5.30 ते 6.30 ची वेळ. ह्या नंतर डिस्कव्हरी इंडियावर भारतीय वेळेनुसार
७ ऑक्टो, २०११
स्टीव्ह जॉब्सः एक शापित यक्ष
जी अॅपल कंपनी आपण एका गॅरेजमध्ये चालू केली, जिला उभं करण्यासाठी आपण घाम गाळला, जिचे आपण आज चेअरमन आणि सर्वेसर्वा आहोत तीच अॅपल कंपनी आपल्याला पुढल्या दीड पावणेदोन वर्षांत चक्क काढून टाकेल हे मात्र स्टीव्हच्या स्वप्नातही नव्हतं. पण खुद्द स्टीव्हला स्वतःलाच आपल्या आयुष्यातील चढउतार इतके टोकाचे असतील असं बहुधा वाटलं नसावं. पण तसं घडलं...
८ मे, २०११
काच फोडली डोक्यावर, खापर फुटलं फेसबुक वर....
रूथ रेमिरेझ उर्फ टुटी, शिकागो शहरात राहणारी 26 वर्षीय तरूणी. डोकं गरम. रात्री लेग रूम नावाच्या क्लबात गेली. तिथं तिचा दुसऱ्या एकीशी राडा झाला. रूथ एकदम रूथलेस झाली. तिनं हात उचलला. तो उचललेला हात त्या दुसरीनं झटकून खाली केला. रूथच ती. डबल रूथलेस झाली. गेली आणि कुठून तरी एक काच उचलून आणली. घातली ती काच त्या दुसरीच्या डोक्यात. दुसरीची हालत खराब. 32 टाके पडले तिच्या डोक्यात. मग रूथ कशाला तिथे थांबते. ती सटकली. . पुढे?
१४ मार्च, २०११
जपानमधील भीषण दृश्ये, गुगलने टिपलेली. अंगावर शहारे आणणारी..
जपानला कधी मानवी संहाराने हादरवले, तर कधी निसर्गाने त्याचा लावलेला संसार विस्कटून टाकला. देशालाही नशीबाचे फेरे चुकत नाहीत हेच खरं.
आपण वृत्तपत्रात बातम्या वाचतो, रंगीत फोटोही पाहतो. टीव्हीवरचे वृत्तांतही कधी आपल्या रिमोटच्या लहरीतून पाहता आले तर तेही पाहतो. पण सामान्यतः घरात पेपर आणि टीव्ही असूनही खरी स्थिती आपल्याला माहीत नसते.
गुगलने जपानला पाठवलेल्या मदतीच्या बातम्या तुम्ही वाचल्या असतील. पण गुगलने आपल्या उपग्रहाच्या माध्यमातून टिपलेला विध्वंसापूर्वीचा जपान

१० मार्च, २०११
मायक्रोसॉफ्टही घाईत...14 मार्चला इंटरनेट एक्स्प्लोअरर 9 येतोय..
पण थांबा, तुमच्या संगणकावर WINDOWS XP असेल तर तुम्हाला नवा कोरा इंटरनेट एक्स्प्लोअरर 9 लावता येणार नाही. कारण तो WINDOWS XP सपोर्ट करीत नाही.
तुम्हाला त्यासाठी WINDOWS VISTA अथवा WINDOWS 7 तुमच्या संगणकावर लावावं लागेल.
नवे IE9 हे HTML 5 ने युक्त आहे. शिवाय नवे जावास्क्रीप्ट इंजिन (JSCRIPT) ची साथ त्याला असणार आहे. ह्या इंजिनचे नाव आहे CHAKRA.
गेल्या महिन्यात 10 फेब्रुवारी रोजी मायक्रोसॉफ्टने IE9 चा रिलीज कँडिडेट इंटरनेटवर सादर केला होता. आता 15 मार्चला येतेय ती अंतिम आवृत्ती, तुमच्या आमच्या सर्वांसाठी.
पण, आता विंडोज 7 कडे गेल्याशिवाय गत्यंतर नाही. कारण IE9 आणि HTML5 चा लाभ घ्यायचा असेल तर दुसरा मार्ग नाही. FACEBOOK, TWITTER वापरत असाल, YOU TUBE चे फॅन असाल तरी तुम्हाला लवकरच WINDOWS 7 चा आधार घ्यावा लागणार आहे.
फायरफॉक्स 4 आला...डाऊनलोडींगसाठी उपलब्ध झाला..
शेवटी वाट पहात असलेला फायरफॉक्स 4 आला. कालच 9 मार्च रोजी तो डाऊनलोडींगसाठी उपलब्ध झाला आहे. ज्यांना डाऊनलोड करायचा आहे त्यांनी ह्या दुव्यावर जावे. Firefox 4 RC मधल्या RC चा अर्थ आहे Release Candidate. ही आवृत्ती मुख्यत्वे जगभरच्या प्रोग्रामर्ससाठी आहे. त्यांनी चाचणी घेऊन सुचना कराव्यात अशी मोझीला कॉर्पोरेशन (फायरफॉक्सचे निर्माते) यांची अपेक्षा आहे. पण आपण प्रोग्रामर नसलो म्हणून काय झालं. आपल्याला हा रिलीज कँडिडेट वापरण्याचा हक्क आहे.
ह्या नव्या व्हर्जनची वैशिष्ट्ये ह्या दुव्यावर उपलब्ध आहेत.
फायरफॉक्स 4 मध्ये खूप सुधारणा (huge performance enhancements हे फायरफॉक्सचे दाव्यातले शब्द आहेत) केल्या आहेत असं मोझीलाचं म्हणणं आहे. HTML 5 ने ही आवृत्ती युक्त असल्याने इंटरनेटवरील व्हिडिओ उत्तम प्रकारे दिसतील असा त्यांचा आत्मविश्वास आहे.

५ मार्च, २०११
टर्कीत (तुर्कस्थान) ब्लॉगस्पॉट वर बंदी
कथा कुणाची व्यथा कुणा असा प्रकार 2 मार्चला तुर्कस्थानात घडला आहे.
फुटबॉलच्या सामन्यांमुळे ब्लॉगस्पॉट.कॉम वर बंदी आली आहे. झालं असं की तुर्कस्थानात डिजिटर्क नावाची सॅटेलाईट टीव्ही कंपनी आहे. त्यांच्याकडे तेथील स्पॉर टोटो सुपर लीग फुटबॉल सामन्यांच्या वृत्तप्रसारणाचे हक्क होते. पण तुर्कस्थानातील 6,00,000 (अबब..) ब्लॉगर्सपैकी अनेकांनी आपल्या ब्लॉगवर ते वृत्तांत देण्यास सुरूवात केल्याने डिजिटर्क कंपनी अडचणीत आली. परिणामी दाद मागण्यासाठी ते न्यायालयात गेले. न्यायालयाने मग थेट ब्लॉगस्पॉट.कॉम वरच बंदी आणली. त्यामुळे तुर्कस्थानातील सर्वच विषयांवरचे ब्लॉग बंद झाले आहेत. ब्लॉगस्पॉट.कॉम हे गुगलच्या मालकीचे आहे. गुगलच्या प्रवक्त्याने पत्रकारांशी बोलताना अशी बंदी आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
ह्या संदर्भातील BBC ने दिलेली बातमी ह्या दुव्यावर वाचा.

लिबियात इंटरनेट सुविधा बंद
![]() |
| Libya Telecom and Technology चे ltt.ly हे संकेतस्थळ आज 5 मार्च रोजी उपलब्ध नाही. |
गेला महिनाभर लिबियात आंदोलनांनी जोर धरल्यानंतर लिबियातील इंटरनेटचा वापर प्रचंड वाढल्याचे गुगलने प्रसिद्ध केलेल्या आंकडेवारीत दिसून आले होते. लोक फार मोठ्या प्रमाणावर आपल्या डिजिटल कॅमेऱ्यांनी तसेच मोबाईल फोनच्या कॅमेऱ्यांनी आंदोलनाची क्षणचित्रे टिपत होते, व ती युट्युबवर प्रकाशित करीत होते. ह्या कारणाने लिबिया आणि मुहम्मर गडाफी यांच्या विरोधात एक आंतरराष्ट्रीय मत तयार होऊ लागले होते. कदाचित, त्याचा अंदाज आल्यानेच लिबियातील इंटरनेट सेवा पूर्णपणे थांबविण्याचा निर्णय गडाफी कुटुंबाने घेतला असावा असा अंदाज व्यक्त करण्यांत येतो.
३ मार्च, २०११
अहो, चिमुकली इसापनीती 100 वर्षांची झाली...
राम गणेश गडकरी यांची एकच प्याला पासून राजसन्यास पर्यंतची नाटके माहित नाहीत असा मराठी माणूस मिळणे नाही. गडकरी ऐन तारूण्यात वयाच्या 34 व्या वर्षी गेले. पण तेवढ्या अल्पायुष्यातही त्यांनी महाराष्ट्रासाठी प्रचंड साहित्य संपदा निर्माण केली.
मंगल देशा ! पवित्र देशा ! महाराष्ट्र देशा ।
प्रणाम घ्यावा माझा हा, श्रीमहाराष्ट्र देशा ॥
हे त्यांचे गीत महाराष्ट्राला आजही स्फुर्ती देत असते..
पण, गडकऱ्यांनी खास लहान मुलांसाठी लिखाण केले, आणि त्याचे एक पुस्तकही प्रकाशित झाले होते ही गोष्ट आज अनेकांना (अगदी मराठीच्या कितीतरी प्राध्यापकांनाही) ठाऊक नाही. ह्या पुस्तकाचे नाव, चिमुकली इसापनीती. गडकऱ्यांनी, परवडत नसतानाही, स्वखर्चाने ती प्रकाशित केली. हे पुस्तक फक्त 10 पानांचे आहे. त्यात इसापच्या जोडाक्षरविरहित लिहीलेल्या दहा गोष्टी आहेत.
ह्या दहा पानी पुस्तकाला गडकऱ्यांनी आवर्जुन प्रस्तावना लिहीली आहे. प्रस्तावनेच्या खाली तारीख आहेः 29/12/1910. म्हणजे 29 डिसेंबर 2010 रोजी चिमुकली इसापनीती ह्या पुस्तकाला 100 वर्षे पुर्ण झाली.
चिमुकली इसापनीतीच्या प्रस्तावनेत गडकरी काय लिहीतात पहाः

"... कोणाच्याही मदतीवाचून मुलांस हे पुस्तक वाचता येईल असा तर्क आहे. साध्या अक्षर ओळखीचा काळ तुलनात्मक दृष्टया थोडाच असल्यामुळे फक्त दहाच गोष्टी घेतल्या आहेत. वाचन सुलभ होण्यासाठी मुद्दाम मोठया टाईपाचा उपयोग केला आहे. चित्रेसुध्दा हवी होती; पण ते पडले जरा खर्चाचे काम. सुदैवाने पुढे मागे या पुस्तकाची दुसरी आवृत्ती निघण्याचा सुयोग आलाच तर पाहता येईल..."
वरील लाल अक्षरांत दिलेले गडकऱ्यांचे 1910 सालचे शब्द नीट वाचा. गडकऱ्यांना चिमुकली इसापनीती मध्ये चित्रेसुध्दा हवी होती; पण चित्रे देणे त्यावेळी गडकऱ्यांना परवडणारे नव्हते. गडकरी म्हणतात, ते पडले जरा खर्चाचे काम. सुदैवाने पुढे मागे या पुस्तकाची दुसरी आवृत्ती निघण्याचा सुयोग आलाच तर पाहता येईल.
गडकऱ्यांच्या दुर्दैवाने दुसऱ्या आवृत्तीचा सुयोग कधीच आला नाही. त्यामुळे चिमुकली इसापनीती पुढली 100 वर्षे चित्रांविनाच राहिली. पण गडकऱ्यांचे चित्रांचे ते स्वप्न चिमुकली इसापनीती 100 वर्षांची होता होता पूर्ण झाले. तो दिवस म्हणजे 25 डिसेंबर 2010. ह्या दिवशी ठाणे येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रकाशन कट्ट्यावर प्रा. उषा तांबे यांच्या हस्ते www.ramganeshgadkari.com ह्या संकेतस्थळाचे प्रकाशन झाले. ह्या संकेतस्थळावर गडकऱ्यांचे समग्र साहित्य मोफत उपलब्ध आहे. समग्र साहित्यामध्ये अर्थातच ती चिमुकली इसापनीतीही उपलब्ध आहे. संकेतस्थळावर चिमुकली इसापनीती प्रकाशित करताना प्रकाशक संगणक प्रकाशन यांनी त्या दहा गोष्टींना रंगीत चित्रांची जोड दिली. महाराष्ट्राच्या शेक्सपियरचे 100 वर्षांपूर्वीचे स्वप्न अशा प्रकारे पूर्ण झाले. मराठी साहित्य संमेलनाच्या प्रकाशन कट्ट्यावर हे स्वप्न पूर्ण झाले ही वृत्तपत्रांसाठी फार मोठी बातमी होती. पण दुर्दैवाने ही बातमी मराठी वृत्तपत्रांनीही दिली नाही. आज संगणक डॉट इन्फो वरून ती बातमी जगापुढे येत आहे.
दुसरे दुर्दैव म्हणजे 2010 हे वर्ष जसे महाराष्ट्र राज्याचे सुवर्णमहोत्सवी वर्ष होते तसे ते गडकऱ्यांचे 125 वे जयंती वर्षही होते. गडकऱ्यांचा जन्म 24 मे 1885 चा. पण ज्या महाराष्ट्राला गडकऱ्यांनी गीतातून वंदन केले त्याला त्याची आठवण त्या सुवर्ण महोत्सवी वर्षभरात कधीच आली नाही. त्या वर्षात ramganeshgadkari.com इंटरनेटवर आले एवढेच एक समाधान.
ज्यांना चिमुकली इसापनीती आणि ती प्रस्तावना पूर्ण वाचायची आहे त्यांचेसाठी ती ह्या दुव्यावर उपलब्ध आहे.
राष्ट्रपतींची खास गाडी
![]() |
| आपल्या राष्ट्रपतींचा आलिशान प्रवास. प्रेसिडेन्शियल सलून मधील एक कोपरा. |
राजधानी एक्सप्रेसपासून ते पॅलेस ऑन व्हील्सपर्यंत आणि फ्लाईंग राणीपासून ते डेक्कन क्वीनपर्यंत अनेक रेल्वे गाड्या आपण ऐकल्या आहेत. त्यांना इतिहास वगैरे असू शकतो असं कधी आपल्या मनात आलेलं नसतं. पण एक खास ऐतिहासिक म्हणावी अशी गाडी मात्र आपण फारशी ऐकलेली नाही. ती गाडी म्हणजे 'प्रेसिडेन्शियल सलून' अर्थात फक्त भारताच्या राष्ट्रपतींची आणि फक्त त्यांच्यासाठीच सदैव राखीव असलेली गाडी. ही गाडी फक्त दोन डब्यांची आहे. १९५६ साली बांधण्यात आलेले हे आलिशान डबे नवी दिल्ली स्टेशनात कायम उभे असतात. ह्या दोन डब्यांमध्ये राष्ट्रपतींची बेडरूम, लाँजरूम, व्हिजिटर्स रूम, कॉन्फरन्स रूम असा लवाजमा एकीकडे आहे. दुसरीकडे राष्ट्रपतींचे सचिव व इतर कर्मचारी यांचेसाठी काही केबीन्स आहेत. हे दोन्ही डबे सागाच्या फर्निचरने तसेच रेशमी पडद्यांनी सजवण्यांत आले आहेत. 'प्रेसिडेन्शियल सलून' ची परंपरा फार जुनी आहे. १९ व्या व २० व्या शतकात भारताच्या इंग्रज व्हाईसरॉयने त्याचा उपयोग केला होता. १९२७ पर्यंत इंग्रजांची भारतीय राजधानी कलकत्ता येथे असल्याने हा 'प्रेसिडेन्शियल सलून' कलकत्त्यात उभा असे. १९२७ मध्ये इंग्रजांनी राजधानी दिल्लीत हलवल्यानंतर तो दिल्ली येथे आणण्यात आला. अत्यंत आलिशान अशा ह्या गाडीत पर्शियन गालिचे वगैरे वैभवी सजावट होती. ही गाडी वातानुकूलित नव्हती, पण आत गारवा कायम रहावा यासाठी त्यात खास पद्धतीचे पडदे लावण्यांत आले होते. गाडीत चोवीस तास गरम व थंड पाण्याची सोय करण्यांत आली होती. ही गाडी स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी १९५० साली प्रथमच वापरली. त्यानंतर आलेल्या राष्ट्रपतींनीही त्याचा वापर केला. राष्ट्रपतींची मुदत संपल्यानंतर त्या गाडीतून त्यांना त्यांच्या गावापर्यंत सोडण्याचा एक प्रघात त्यानंतर पडला. ह्या प्रघातानुसार गाडी वापरणारे शेवटचे राष्ट्रपती म्हणजे डॉ. संजीव रेड्डी. त्यांनी १९७७ साली राष्ट्रपती भवनाचा निरोप घेताना ही गाडी वापरली. त्यानंतरच्या काळात सुरक्षेच्या कारणास्तव ही गाडी राष्ट्रपतींनी वापरली नाही. १९७७ ते २००३ ह्या २६ वर्षांच्या काळात ही गाडी नुसती उभी होती. नुसती उभी असली तरी तिची निगा उत्तम प्रकारे सांभाळण्याची पद्धत आहे. आपले मागील राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनी ही गाडी हरनौत ते पटणा ह्या ६० किलोमीटरच्या प्रवासासाठी वापरली. त्यासाठी ह्या गाडीच्या सजावटीचे खास नूतनीकरण करण्यांत आले होते. त्याचाच एक भाग म्हणून गाडीत प्रगत तंत्रज्ञानाने व उपग्रह यंत्रणेने युक्त अशी आधुनिक संपर्क साधनेही डॉ. कलाम यांच्यासाठी बसविण्यांत आली होती. त्यानंतर मात्र आता गेली सुमारे ५ वर्षे 'प्रेसिडेन्शियल सलून' नवी दिल्लीत शांतपणे उभे आहे. नव्या राष्ट्रपती महाराष्ट्राच्या प्रतिभाताई पाटील ह्या 'प्रेसिडेन्शियल सलून' मध्ये कधी बसतील का हे पहायचं.
(अधिक माहितीसाठी ह्याच ब्लॉगवरील हा दुवा पहा)
२१ फेब्रु, २०११
विचित्र सत्य
बातम्या आणि गंभीर विषयांसाठी वर्तमानपत्र वाचायचं आणि मनोरंजनासाठी मासिकं किंवा पुस्तकं वाचायची अशी साधारणतः आपली परंपरा. तशी ही परंपरा जगभरच आहे. पण बातम्या ह्याही मनोरंजनाचा विषय होऊ शकतात हे सिद्ध करणारं एक सदर ऑस्ट्रेलियाच्या सिडनी मॉर्निंग हेराल्ड ह्या जगप्रसिद्ध दैनिकात नेहमी प्रकाशित होत असतं. त्या सदराचं नाव आहे स्ट्रेंज बट ट्रू. म्हणजे विचित्र पण सत्य.
आता एक एक बातम्या पहा. केनियामधला एक अतरंग कैदी. त्याला तुरूंगात मोबाईल फोन न्यायचा होता. तुरूंगात तो न्यायला अर्थातच बंदी होती. त्याने काय शक्कल लढवावी?त्याने एका प्लास्टीकच्या पिशवीत मोबाईल पॅक केला, आणि तो तोंडावाटे गिळला. तो अर्थातच तिथून जठरात गेला असणार. असल्या ह्या क्लुप्त्या कधी कोणाला पचतात का सांगा? त्या कैद्याच्या तपासणीत तो मोबाईल त्याच्या पोटात, मोठ्या आतड्यात गेलेला दिसला. एक्स रे मशिनमध्ये मोबाईल दिसल्यानंतर अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. डॉक्टर म्हणे म्हणाले की हा मोबाईल त्याच्या पोटात जवळ जवळ एक महिनाभर होता. ही बातमी मूळात वाचायची असेल तर त्यासाठी सिडनी मॉर्निंग हेराल्डच्या वेब साईटचा पत्ता आहे:www.smu.com.au/strange
तुम्ही ह्या साईटवर जाऊन इतरही बातम्या जरूर वाचा. त्या वाचून दिवसभरातला थकवा अक्षरशः दूर पळतो. आपल्या दुर्मुखल्या चेहेऱ्यावर कधी हसू आलं हे आपलं आपल्यालाच कळत नाही. आता ही आणखी एक बातमी पहा. ह्या बातम्या ११ जानेवारी २०११ च्या आहेत. दररोज त्या बदलत असतात. सिडनी मॉर्निंग हेराल्ड च्या छापिल अंकात त्या छापल्या जातात. पण इंटरनेटच्या जागतिक सोयीमुळे आपल्याला त्या वाचायला मिळतात. अमेरिकेतल्या ओहीओ प्राणी संग्रहालयातला १८ वर्षे वयाचा अजगर हा म्हणे पिंजऱ्यात पाळला गेलेला आणि जगातला सर्वाधिक दीर्घायुषी असलेला होता. त्याची लांबी सुमारे ७.५ मीटर म्हणजे २२ फूट होती. त्याचं वजन १३६ किलो होतं. दिसायला तो टेलिफोनच्या खांबाएवढा जाड होता. आता यातली बातमी म्हणजे ह्या अजगराचं नाव फ्लफी, आणि हा फ्लफी नुकताच स्वर्गवासी झाला. मृत्युचे कारण म्हणजे त्याच्या पोटात ट्युमर झाला.
आता ही चीनमधली बातमी पहा. चीनमध्ये बिजिंगला ट्रॅफिक जाम झाला. वाहनांची जी लाईन त्यामुळे लागली ती शंभर किलोमीटरपर्यंत लांब होती. म्हणजे थोडफार आपल्या पुणे - ठाणे अंतराएवढी. आता यात मध्ये जे लोणावळ्याला किंवा तळेगावला अडकलेले असतील त्या चिनी भाईंचं काय झालं असेल असा विचार मनात येऊन आपण हंसतोच थोडं तरी.
तर असं हे स्ट्रेंज बट ट्रू. सिडनीचं हे दैनिक विश्वासार्ह बातम्यांसाठी प्रसिद्ध आहे. उगाचच पुड्या सोडण्याची त्यांची ख्याती नाही. त्यामुळे धम्माल बातम्या वाचण्यासाठी ह्या संकेतस्थळावर नेहमीच गर्दी होताना दिसते. मला माहित आहे की त्या गर्दीत लवकरच तुम्हीही जाऊन मान वर करणार आहात. धम्माल बातम्या वाचण्यासाठी. कुठे मिळतात हो आजकाल अशा धम्माल बातम्या? दररोज त्याच त्या भ्रष्टाचाराच्या बातम्या वाचून वाचून आपण पकलेले आहोत. तर तेवढाच हा विरंगुळा. स्ट्रेंज बट ट्रू चा.

२० फेब्रु, २०११
Googleplex चा योगायोग
१) Google हा शब्द इंग्रजी Googol ह्या शब्दावरून घेतला आहे.
२) Googol म्हणजे १ ह्या आकड्यावर शंभर शुन्ये ठेवली असता येणारी संख्या. A cardinal number represented as 1 followed by 100 zeros (ten raised to the power of a hundred). माहितीचा प्रचंड स्त्रोत सांगण्यासाठीच मूळ Googol वरून Google असे नामकरण गुगलचे संस्थापक सर्जी ब्रिन आणि लॅरी पेज यांनी केले.
३) Google कंपनीच्या मुख्य कार्यालयाच्या आवाराचे नाव ठेवताना Google आणि Complex ह्या दोन इंग्रजी शब्दांचा संयोग करून ते Googleplex असे ठेवण्यांत आले.
४) Googolplex (स्पेलींग नीट पहा) हाही एक स्वतंत्र इंग्रजी शब्द आहे. त्याचा अर्थ आहे १ ह्या आकड्यावर एक Googol शुन्य ठेवल्यानंतर येणारी संख्या. A cardinal number represented as 1 followed by a googol of zeros (ten raised to the power of a googol)
५) Googleplex (अगदी तेच स्पेलिंग) शब्द पहिल्यांदा वापरात आला तो १९७७ साली. तेव्हा गुगलचे संस्थापक सर्जी ब्रिन आणि लॅरी पेज हे बोबडं बोलण्याच्या वयातले म्हणजे फक्त तीन साडेतीन वर्षांचे होते. Googleplex हे नाव बीबीसी रेडिओवर प्रसारित झालेल्या एका जगप्रसिद्ध मालिकेत १९७७ साली आलं. ती जगप्रसिद्ध रेडिओ मालिका म्हणजे डग्लस अडॅम्स लिखित The Hitchhiker's Guide to the Galaxy.
६) The Hitchhiker's Guide to the Galaxy मध्ये जो अत्यंत शक्तीमान असा काँप्युटर दाखवला गेला आहे त्या काँप्युटरच्या भल्या मोठ्या नावाची अद्याक्षरेGOOGLEPLEX अशीच होती (होय अगदी तेच स्पेलींग)
७) Hitchhiker's Guide मधला शक्तीमान संगणक GOOGLEPLEX आणि आजचे सर्वांत शक्तीमान सर्च इंजिन गुगलचे मुख्यालय आवार म्हणजेहीGOOGLEPLEX. दोन्हींचा संबंध शक्तीमान संगणकांशी आणि दोन्हींचे स्पेलींगही तंतोतंत सारखे असावे हा एक मोठाच योगायोग.
८) आणखी एक योगायोगाची गोष्ट म्हणजे google हा शब्द आता अधिकृतपणे क्रियापद म्हणून इंग्रजी शब्दकोशांनी स्वीकारला आहे. Googol आणि Googolplex हे दोन्ही इंग्रजी शब्दकोशातले शब्द आहेत. आता Googleplex हे गुगलच्या मुख्य कार्यालय आवाराचे नावही इंग्रजी शब्दकोशात जाणार का? ह्या विषयी काही माहिती सापडत नाही.
ता.क. ९) अगदी ताजा योगायोग - गुगलचे एक संस्थापक मालक सर्जी ब्रिन हे म्हणे लवकरच पर्यटनासाठी अंतराळात जाणार आहेत. त्यासाठी त्यांनी (११ जून २००८ रोजी) सुमारे २२ कोटी (५ दशलक्ष डॉलर्स ) रूपये भरून अंतराळयान बुक करून ठेवलेही आहे. सविस्तर व अधिकृत बातमीसाठी इथे क्लीक करा. सर्जी ब्रिनना गॅलक्सीत (अंतराळात) जावसं वाटलं याचं कारणही Googleplex आणि Hitchhikers Galaxy ह्या योगायोगात लपलं असेल का? त्याचीही माहिती कुठे सापडत नाही.
वेल, गुगलमध्ये शोधून पहायला हवी
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)