१२ जून, २०११

भारतात आजही 11.5% युजर्स इंटरनेट एक्स्प्लोअरर 6 वापरतात..

मायक्रोसॉफ्टचा इंटरनेट एक्स्प्लोअरर 6.0 हा ब्राऊझर ऑगस्ट 2001 मध्ये आला.  त्याला आता जवळ जवळ 10 वर्षे झाली. आजमितीस इंटरनेट एक्स्प्लोअररची 9.0 ही आवृत्ती ताजी आहे. 2001 मध्ये 6.0 ही आवृत्ती आल्यानंतर पुढे 2006 मध्ये 7.0, 2009 मध्ये 8.0, मार्च 2011 मध्ये 9.0 आणि
एप्रिल 2011 मध्ये 10.0 (विंडोज 7.0 साठीची चांचणी आवृत्ती) अशी इंटरनेट एक्स्प्लोअररची सुधारित वाटचाल राहिली.
मायक्रोसॉफ्टने http://www.theie6countdown.com ह्या नावाची एक स्वतंत्र वेबसाईट प्रकाशित केली आहे. त्यांना इंटरनेट एक्स्प्लोअररची 6.0 ही आवृत्ती बंद करायची आहे. पण जगातले लाखो लोक ती जुनी 6.0 आवृत्ती आजही वापरतात हे मायक्रोसॉफ्टचं दुःख आहे.
http://www.theie6countdown.com ह्या वेबसाईटवर त्यांनी दिलेल्या अधिकृत आकडेवारीत मे 2011 मध्ये भारतातल्या एकूण इंटरनेट युजर्सपैकी 11.50% युजर्स 6.0 ही आवृत्ती वापरतात असं म्हंटलं आहे. पुढे त्यांनी सर्वांना आवाहन केलं आहे की तुम्ही ही 6.0 जुनी आवृत्ती वापरू नका. इतरांनाही ती वापरण्यापासून परावृत्त करा.
गंमत म्हणजे चीनमधील 33.9 टक्के युजर्स आजही 6.0 ही जुनी आवृत्ती वापरीत आहेत. ही जुनी आवृत्ती वापरणाऱ्या जगातील एकूण युजर्सपैकी 50 टक्के लोक हे चीनमधले आहेत.
जगातील लोकांना जागरूक करा आणि 6.0 च्या पुढील आवृत्ती वापरण्यासाठी त्यांचे मन वळवा यासाठी मायक्रोसॉफ्ट आता प्रयत्न करीत आहे.
आपण नेहमी पुढल्या नव्या ताज्या आवृत्तीकडे लक्ष ठेवून असतो. पण जगात सर्वत्र आपण गृहित धरतो तशी स्थिती असतेच असं नाही, इतकाच बोध यातून निघतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा