२२ फेब्रु, २०१२

बिलंदर डॉटकॉमची थरारक कहाणी (भाग-5)

स्वतःच्या कार्टुनबरोबर कीम डॉटकॉम..
 कीमचं आयुष्य हे आता फक्त एक हॅकर म्हणून उरलेलं नव्हतं. हेराफेरी करणारा एक बीझनेसमन म्हणूनही त्याची ख्याती हळूहळू पसरू लागलेली होती. ह्या ख्यातीत तो स्वतःही भर घालत असे. 2001 मध्ये इंग्लंडमधल्या ‘गार्डियन’ ह्या सुप्रसिद्ध दैनिकाला मुलाखत देताना त्याने सांगितले की सिटीबँकेच्या सिस्टममध्ये घुसखोरी करून त्याने 20 दशलक्ष डॉलर्स काढून ते ग्रीनपीस ह्या सामाजिक संस्थेच्या बँक अकाउंटमध्ये जमा केले.

१३ फेब्रु, २०१२

बिलंदर डॉटकॉमची थरारक कहाणी (भाग-4)

कीम श्मिट म्हणजे फार मोठा गुंतवणूकदार अशी प्रतिमा आयती तयार होतीच. कीमनी letsbuyit.com मध्ये 3,75,000 युरोची गुंतवणूक केली. त्याच्या घोषणा मिडियात आल्या. कीमने मग मुलाखती दिल्या. “ही कंपनी मोठा धंदा आणि मोठा नफा मिळवणार असल्याचं” निवेदन कीमने पत्रकारांपुढे केलं. पुढे असंही सांगितलं की लवकरच तो आणखी 5 कोटी युरो letsbuyit.com मध्ये गुंतवणार आहे. बापरे, 5 कोटी युरो? म्हणजे 327 कोटी रूपये? काही जणांच्या मते ही घोषणा केली तेव्हा कीमच्या खिशात म्हणे दहा युरो सुद्धा नव्हते..

६ फेब्रु, २०१२

बिलंदर डॉटकॉमची थरारक कहाणी (भाग-3)

फेब्रुवारी 2012 चा पहिला आठवडा संपत आला तरी
 अजून जामिन नाही. 
 टेलीफोन लाईन आणि मॉडेमच्या सहाय्याने शहरातल्या इतर काँप्युटर्सशी संपर्क साधण्याचा झपाटा मग सुरू झाला. हॅकर बनण्याची बीजं त्यात होती. टेलीफोन कंपन्यांच्या संगणकात बिले कमी करण्यासाठी शिरायचं तर त्यांची सॉफ्टवेअर सुरक्षा तोडावी लागे. कीम त्याच पद्धतीने दुसऱ्या संगणकांमध्ये व नेटवर्क्समध्ये शिरू लागला. आता हॅकर म्हणूनही तो पक्का तयार झाला होता. हॅकींगसाठी त्याने टोपणनावही घेतलं – किंबल.  

३० जाने, २०१२

बिलंदर डॉटकॉमची थरारक कहाणी (भाग-2)

 आपण पाहिलं की कीम डॉटकॉम ह्या हॅकरच्या न्युझीलंडमधील हवेलीवर दोन हेलीकॉप्टर्स उतरली आणि त्यातून एकूण 76 पोलीस कमांडो उड्या टाकत त्याला पकडण्यासाठी सरसावले. हवेलीचे इलेक्ट्रॉनिक लॉकचे दरवाजे तोडत पोलीस आत शिरले. पोलीसांना हवेलीच्या आतला भाग हा एक भुलभुलैय्याच वाटला. बंद होणारे इलेक्ट्रॉनिक दरवाजे आणि एका आत एक भपकेबाज दालनं.
पोलीस कमांडो हातातल्या मशिनगन्स सरकवत एक एक दालन काबीज करीत होते. तर, आत कीम डॉटकॉम इकडून तिकडे सरकत होता. सहजासहजी हातात येत नव्हता. कुटुंबिय, स्टाफ, त्याचे पाहुणे आणि मित्र पोलीसांच्या ताब्यात आले होते. पण कीम डॉटकॉम दृष्टीपथात येत नव्हता.

बिलंदर डॉटकॉमची थरारक कहाणी (भाग-1)

2012 चा पहिला जानेवारी महिना नुकताच संपला. पण, ह्या वर्षातील सर्वांत वेधक घटनांपैकी एक ह्या महिन्यांत घडली आहे. ही ताजी बातमी आहे गेल्या शनिवारची म्हणजे 21 जानेवारी 2012 ची.
21 जानेवारी, वेळ सकाळी साडेसहा पावणेसातची. स्थळ न्युझीलंडमधला ऑकलंड हा अत्यंत निसर्गरम्य परिसर. ऑकलंडमध्ये डिसेंबर ते फेब्रुवारी हा उन्हाळ्याचा काळ. पण तापमान असतं जास्तीत जास्त 23 डिग्री सेल्सियस. म्हणजे उन्हाळा नव्हेच, सुखद हिवाळाच बारा महिने. अशा वातावरणात एखादा हिल स्टेशनसारखा हिरवागार परिसर डोळ्यासमोर आणा. ऑकलंड तसं आहे. अशा ऑकलंडमध्ये संपूर्ण न्युझीलंड देशातली सर्वांत आलिशान अशी हवेली आहे. राजवाड्यालाही लाजवील अशी. माणसांचा राहण्याचा कारपेट एरियाच 25,000 चौरस फुटांचा. आजूबाजूला सुंदर, विस्तीर्ण, हिरवं-पोपटी लॉन, त्यावर अनेक कारंजी, सर्वत्र सुंदर वनराई. असा एकूण सुमारे 26 लाख स्क्वेअर फुटांचा (म्हणजे 60 एकरांचा) ऐसपैस परिसर. अशा त्या हवेलीचे

१२ डिसें, २०११

मराठी विकीपेडिया आणि विश्वकोश

मराठी विकीपेडिया आणि विश्वकोश ह्या विषयावरचा माझा लेख दिनांक 11 डिसेंबर 2011 च्या महाराष्ट्र टाईम्स (रविवार पुरवणी) अंकात प्रसिद्ध झाला आहे. त्याची लिंक खाली दिली आहे.

http://www.maharashtratimes.indiatimes.com/articleshow/msid-11062192,prtpage-1.cms

१५ ऑक्टो, २०११

सर्वांसाठी उपयुक्त आणि अप्रतिम मोफत 'पेपर रेटर'

इंग्रजी लेखन शाळेत जे चिकटतं ते पुढे सुटत नाही. नोकरी व्यवसायातही पत्रं, ईमेल, मेमो, रिमार्कस लिहीणं हे चालतच राहतं. फक्त भर पडते ती आणखी घाईची, आणि त्यातून झालेल्या चुकांची. अशा सर्व स्थितींमध्ये Paper Rater हे उत्तम आणि मोफत असलेलं वेब अॅप आपल्याला एखाद्या आपल्या विश्वासू सहकाऱ्यासारखं कामी येतं..