२० फेब्रु, २०११

माहिती तंत्रज्ञान कायदा २०००

भारताचा माहिती तंत्रज्ञान कायदा १७ ऑक्टोबर २००० पासून अंमलात आला. मूळ कायद्याच्या मसुद्यात संसदेने काही महत्वाच्या सुधारणा २००८ साली केल्या. सदर सुधारणांसाठी माहिती तंत्रज्ञान सचिव ब्रिजेशकुमार यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती जानेवारी २००५ मध्ये नेमण्यांत आली.त्यात नॅस्कॉमचे तात्कालिन अध्यक्ष किरण कर्णिक यांच्यासारखे ह्या क्षेत्रातील सदस्य होते.  ह्या समितीने ज्या सुधारणा सुचवल्या त्या नेमक्या कोणत्या, आणि त्या कशासाठी सुचविण्यांत आल्या याबाबत समितीने ऑगस्ट २००५ मध्ये संपूर्ण अभ्यास अहवाल माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला सुपुर्द केला. तो एकूण ५८ पानांचा आहे. ह्या क्षेत्रातील अभ्यासक तसेच विद्यार्थी यांचेसाठी संदर्भ म्हणून तो अत्यंत उपयुक्त आहे.
२००८ मध्ये संसदेने ह्या दुरूस्त्यांना मान्यता दिल्यानंतर ५ फेब्रुवारी २००९ रोजी राष्ट्रपतींनी सुधारित कायद्याला मान्यता दिली. त्यानंतर २७ ऑक्टोबर २००९ पासून सुधारितमाहिती तंत्रज्ञान कायदा २००८ अंमलात आला. सुधारित कायदा ह्या लिंकवर वाचन व डाऊनलोडींगसाठी उपलब्ध आहे

dll फाईल्सचे मूळ कसे शोधावे?

नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ शोधू नये म्हणतात. कारण ते कितीही शोधलं तरी मिळणार नाही. आता नदी आणि ऋषीचं कुळ यापेक्षा आपल्या संगणकातल्या फाईल्स काय वेगळ्या आहेतहजारो प्रकारच्या dll फाईल्स. Dynamic Link Libraries म्हणजे dll. जवळ जवळ प्रत्येक प्रोग्राममध्ये dll फाईल असणारच.प्रोग्राममध्येच कशालाएखादी dll म्हणजे चक्क व्हायरस किंवा एखादे स्पायवेअर सुद्धा असू शकते. आपला संगणक भरपूर सॉफ्टवेअरनी भरला असेल तर त्यात काही हजार dll फाईल्स असू शकतात. आता हे झालं फक्त dll फाईल्सबद्दल. इतरही हजारो प्रकारच्या फाईल्स आपल्या संगणकात वेगवेगळ्या डाऊनलोडसमधून येत-जात असतात. काही वेळा एखाद्या फाईलबद्दल आपल्याला संशय असतो. पण त्यात काही वावगं असेल वा नसेल याची खात्रीही नसते. मग प्रश्न येतो की त्या फाईलचं मूळ शोधायचं कसं. शोधायचं कुठे?
मी अशा वेळी File Adviser ची मदत घेतो. ज्या फाईलचं मूळ शोधायचं असेल त्या फाईलच्या नावावर 'विंडोज एक्स्प्लोअररमध्ये मी राईट क्लीक करतो. राईट क्लीक केल्यावर येणार्‍या ड्रॉप डाऊन मेनूमध्ये मला File Advisor हे शब्द दिसतात. त्यावर मी क्लीक करतो. खालील चित्रात मी कुठे क्लीक करतो हे दिसेल.
समजा Windows फोल्डरमधील sprof32.dll ह्या फाईलचं मूळ मला शोधायचं आहे. मी त्यासाठी खाली दाखवल्याप्रमाणे sprof32.dll ह्या फाईलवर राईट क्लीककरतो.

वर दाखवल्याप्रमाणे राईट क्लीक करताच माझ्यापुढे
 www.fileadviser.com ही साईट उघडते आणि मला sprof32.dll ह्या फाईलबदद्लची माहिती देते. कशी ती खालील चित्रात पहा-

मला लॉगिन करायला सांगितले जाते. माझ्याकडे 
Login Name आणि Password आहे. कारण www.fileadviser.com वर मी रजिस्टर केलेले आहे. मी लॉगिन करतो. मग माझ्यासमोर त्या फाईलची अधिक माहिती येते.

वरील माहिती मला हे जाणण्यासाठी पुरेशी असते की ही फाईल
 sprof32.dll म्हणजे व्हायरस नव्हे.
File Adviser कोणती माहिती देतो याबद्दल www.fileadviser.com काय म्हणतो ते खाली पहाः
What is FileAdviser?
Bit9 FileAdviser is a comprehensive catalog of executables, drivers, and patches found in commercial Windows® applications and software packages. Malware and other unwanted software that affects Windows computers is also indexed. As the largest and the most accurate database of its kind, FileAdviser enables you to submit a file name or hash and get the following information:
  • Original name and size of the file
  • Publisher that created the file
  • Products in which the file appears
  • Sources of distribution
  • Likelihood that the file poses a threat
  • And more!
Discover what the unknown files on your computer actually are.
टीपः ही क्लृप्ती तुमच्या राईट क्लीक मध्ये येण्यासाठी तुम्हाला http://www.fileadviser.com/ वर जावं लागेल. तेथून FileAdvisor Desktop Utility डाऊनलोड करून घ्यावी लागेल. ती तुमच्या संगणकावर इन्स्टॉल करावी लागेल. त्यानंतर मग ही सुविधा तुम्ही वापरू शकाल

महाराष्ट्राचे गॅझेटियर्सः वेबवरील एक अमूल्य संदर्भ ठेवा

विठ्ठलाचे भक्त दामाजीपंतांनी गोरगरिबांसाठी धान्याची कोठारे खुली करून टाकली आणि भुकेल्या गरिबांनी दोन्ही हातांनी हवे तेवढे धान्य आपल्या झोळीत भरून घ्यायला सुरूवात केलीदामाजीपंतांनी धान्याची कोठारे खुली केलीआणि इंटरनेटने ज्ञानाची कोठारे खुली केलीजे ज्ञान पुस्तकांच्या कोठारांमध्ये बंदिस्त होते ते इंटरनेटने तुमच्या आमच्या घरापर्यंत अनिर्बंधपणे पोहोचवलेती प्रक्रिया आजही चालू आहेआणि पुढेही चालू राहणार आहेज्ञानाचं असच एक कोठार म्हणजे महाराष्ट्र राज्याचे गॅझेटियर्स.

महाराष्ट्र राज्य सरकारचे गॅझेटआणि गॅझेटियर्स ' असे दोन वेगळे उपक्रम आहेतइंग्रजी शब्दकोशातही हे दोन वेगळे शब्द आहेत. Gazette ह्या शब्दाचा अर्थ ऑक्सफर्ड शब्दकोशात a journal or newspaper, especially the official journal of an organization or institution असा दिलेला आहे.ब्रिटीशांनी Gazette ह्या शब्दाचा वापर क्रियापद म्हणूनही रूढ केलासरकारची अधिकृत धोरणे व वेळोवेळी होणारे शासकीय निर्णय यांची नियमित माहिती देणारे नियतकालिक म्हणून ब्रिटीशांनी Gazette हा शब्द प्रथम ब्रिटनमध्ये रूजवलापुढे दीडशे वर्षे राज्य करताना भारतात आणि भारताच्या विविध राज्यांमध्ये 'Gazette म्हणजे सरकारी निर्णयांची नोंद व माहिती अधिकृतपणे देणारे नियतकालिक हा अर्थ ब्रिटीशांनीच दिलातो आजही रूढ आहे.

Gazetteer हा शब्द गॅझेटपेक्षा थोडा वेगळा आहेऑक्सफर्ड शब्दकोशाने त्याचा अर्थ a geographical index or dictionary असा दिला आहेअशी भौगोलिक सूची वा शब्दकोश मुख्यत्वे पत्रकारांसाठी उपलब्ध करण्याचा संदर्भही ऑक्सफर्डने नोंदवला आहे. इटालियन भाषेतही मूळ gazzettiere असा शब्द आहेआणि त्याचा अर्थही ऑक्सफर्डने वर दिलेल्या अर्थासारखाच आहेकँम्ब्रिज शब्दकोशात गॅझेटियरचा अर्थ 'a book or part of a book that contains a list of names of places, usually with some additional information' असा दिला आहेआपल्या महाराष्ट्र राज्याचे गॅझेटियर्स हे कँम्ब्रिज शब्दकोशाने दिलेल्या अर्थाच्या खूपच जवळचे आहेत.

महाराष्ट्र राज्याचा भूगोल म्हंटला की पहिला शब्द पुढे येतो तो म्हणजे जिल्हाखेरीज विदर्भमराठवाडाखानदेशपश्चिम महाराष्ट्रकोकण अशीही प्रादेशिक पार्श्वभूमी दिसते.महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्याची आपली म्हणावी अशी संस्कृती आहेसंस्कृती हा शब्द आभाळाएवढा मोठात्याखाली सर्वच बाबी येतातजमिनीपासून वृक्षराईपर्यंतमाणसांच्या जातीजमातींपासून ते सण-उत्सव रूढींपर्यंतशेती आणि पिकांपासून ते जंगलांपर्यंतआणि डोंगर-दर्‍यांपासून ते नद्यांपर्यंतनकाशांपासून ते तालुके आणि गावांपर्यंत सगळच त्यात येतंह्या सार्‍यांची ऐतिहासिक पार्श्वभूमीही त्यात अंतर्भूत असतेमहाराष्ट्र राज्य सरकारच्या गॅझेटियर विभागाने जी जिल्हा गॅझेटियर्स पुस्तक रूपाने प्रकाशित केली आहेत त्यात हे सारं आहेथोडक्यातमहाराष्ट्राच्या एखाद्या जिल्ह्याचा ज्ञानकोश तुम्हाला संदर्भासाठी किंवा अभ्यासासाठी हवा असेल तर गॅझेटियरला कोणताही पर्याय नाही.

महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या गॅझेटियरची खरी सुरूवात केली ती ब्रिटीशांनीभारतातील पोस्ट खातेतार सेवा वगैरे सुविधा ह्या ब्रिटीशांची देणगी म्हणून मानल्या जातातगॅझेटियर देखील ब्रिटीशांचीच देणगी आहे१८८० साली खानदेश चे गॅझेटियर प्रकाशित झाले.

.१८७४ साली ब्रिटीशांनी महाराष्ट्राच्या गॅझेटियरचे काम सुरू केले अशी माहिती महाराष्ट्र गॅझेटियर विभागाने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर दिली आहेअधिक माहितीwww.maharashtra.gov.in/english/gazetteer ह्या पत्त्यावर उपलब्ध आहे१८८० साली खानदेशाचे गॅझेटियर ब्रिटीशांनी प्रकाशित केलेनोव्हेंबर १८८२ मध्ये ठाणे जिल्हा गॅझेटियर भाग १भाग २ व भाग ३ असे तीन भागात प्रकाशित झालेठाणे जिल्ह्याची एवढी बारीक सारीक माहिती अन्यत्र कुठेही मिळणार नाहीउदाहरणच घ्यायचं तर आपण त्या काळच्या म्हणजे १८८० सालच्या पोस्ट ऑफिसेसचं घेऊत्या संदर्भातील ही काही मनोरंजक माहिती पहाः ठाणे हे पुण्याच्या पोस्टल डिव्हीजनचा भाग होतेकुर्ला ते बेलापूर आणि उरणकर्जतमाथेरान ते वांद्रे हा भाग ठाणे जिल्ह्यात येत होताचपण त्याच बरोबर तारापूर आणि उंबरगाव (आता गुजरात मध्ये)देखील ठाणे जिल्ह्यात येत असेमाथेरान येथील पोस्ट ऑफिस तेव्हाही होतेपावसाळ्यात ते बंद असेपावसाळ्यात येणारी पत्रे कर्जत पोस्टातील दोन पोस्टमन तेव्हा माथेरानला नेऊन देत असतह्या पोस्टमनचा तेव्हाचा पगार महिन्याला रू./- ते रू.१०/- (अक्षरी रूपये आठ ते रूपये दहा फक्तएवढा होताठाण्याला पोस्टाचे जे मुख्य वितरण कार्यालय होते त्याचे प्रमुख पोस्टमास्तर यांचा मासिक पगार रू.१००/- होतापनवेलउरण आणि बेलापूरचे टपाल मुंबईहून जलमार्गाने (फेरी स्टीमर्सने) पाठवले जात असेपोस्टाची ही जशी बारीक सारीक माहिती आहेतशीच माहिती जंगलांची,रस्त्यांचीबंदरांचीउद्योगधंद्यांचीखनिजांचीजाती-धर्मांचीआरोग्य सेवेचीन्यायालयांचीजमिन-महसूलाचीलोकसंख्येचीगावागावांची वगैरे आहे१८८० साली चेंबूर गावाची लोकसंख्या १५९१ होतीतर भांडुप गावाची लोकसंख्या ८८४ होती हे वाचलं की मनोरंजन होतं.

ब्रिटीशांनी १८७४ ते १९१३ ह्या काळात वेगवेगळ्या जिल्ह्यांची गॅझेटियर्स पुस्तकरूपाने प्रकाशित करण्याचा सपाटा लावलावर्धामुंबईरत्नागिरीनाशिकसातारासोलापूरपुणे,अहमदनगरकोल्हापूरबुलढाणाभंडारानागपूरअमरावतीअकोलायवतमाळऔरंगाबाद ह्या जिल्ह्यांच्या गॅझेटियर्सचा त्यात समावेश आहे. राज्य करताना लागणारी महत्वाची माहिती ह्या गॅझेटियर्समधून त्यांना आणि इंग्लंडहून येणार्‍या त्यांच्या नव्या अधिकार्‍यांना तयार मिळत असेब्रिटीशांनी गॅझेटियर्सचा वापर केला तो मुख्यत्वे असाही सारी जुनी गॅझेटियर्स आज www.maharashtra.gov.in/english/gazetteer ह्या वेबसाईटवर वाचण्यासाठी मोफत उपलब्ध आहेत.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात १९५४ च्या सुमारास राज्य सरकारने गॅझेटियरकडे पुन्हा लक्ष दिले१९५४ मध्ये पुणे जिल्हा अद्यावत माहितीसह गॅझेटियर स्वरूपात ग्रंथ रूपाने उपलब्ध झालाब्रिटीशांचं जुन्या माहितीचं गॅझेटियर आणि आपल्या सरकारचं नव्या माहितीचं (पण साधारणतः त्याच सविस्तर ढाच्याची माहितीगॅझेटियर यातून खूपच मोलाची माहिती विद्यार्थीअभ्यासकसंशोधक आणि जिज्ञासूंना उपलब्ध झाली१९५४ ते आजतागायत गॅझेटियरचं हे काम सतत चालू आहेब्रिटीशांनी केवळ इंग्रजी भाषेतून गॅझेटियर्स प्रकाशित केलीमात्रस्वातंत्र्य काळानंतर आपल्या राज्य सरकारांनी मराठी भाषेतूनही गॅझेटियर्स प्रकाशित केली आहेतराज्य सरकारने ह्या संदर्भ ग्रंथांना विशेष महत्व दिलंत्यासाठी एक स्वतंत्र संचालनालय स्थापन केलं ही समाधानाची बाब म्हणायला हवीपुण्यासह जवळ जवळ सर्वच जिल्ह्यांचे नवे जिल्हा गॅझेटियर्स आज पुस्तक व ईबुक रूपाने उपलब्ध झाले आहेतवर दिलेल्या वेबसाईटवरही ते संदर्भासाठी मोफत उपलब्ध आहेतगेल्या काही वर्षांत काही नवे जिल्हे जन्माला आलेकाहींची पुनर्रचना झालीहे बदल आणि सातत्याने उपलब्ध होणारी नवी माहिती यांचा वेग प्रचंड आहेमाहितीच्या त्या वेगाशी जुळवून नवनव्या व सुधारित गॅझेटियर्सची निर्मिती करणे हे एक प्रचंड आव्हान आहेखेरीज हे सारे ज्ञान माहिती तंत्रज्ञानाने उपलब्ध केलेल्या सुविधा वापरून जगासाठी उपलब्ध करणे हे आणखी वेगळे आव्हान आहेगॅझेटियर विभागाने जिल्हा गॅझेटियर्सच्या ईबुक्सच्या सीडीज उपलब्ध केल्या आहेतवेबवर अस्तित्व निर्माण केले आहेत्यामुळेच माहितीच्या त्या खजिन्यात किती दम आहे हे जनसामान्यांपर्यंत पोहोचू लागले आहेजिल्हा गॅझेटियर्स प्रमाणेच महाराष्ट्र राज्यासंबंधी विविध वस्तुनिष्ठ माहिती देणारे इतरही अनेक ग्रंथ गॅझेटियर विभागाने प्रकाशित केले आहेतसंदर्भासाठी त्यांची उपयुक्तता अपरिमित आहे यात शंकाच नाही.

ज्यांना ह्या संबंधी अधिक माहिती हवी आहे त्यांनी डॉअरूणचंद्र पाठककार्यकारी संपादक व सचिवमहाराष्ट्र राज्य गॅझेटियर (दर्शनिकाविभाग२७बरजोरजी भरूचा मार्गफोर्ट,मुंबई ४०००२३ यांचेशी संपर्क साधावात्यांचा दूरध्वनी क्रमांक आहे २२६७८७७९.

डोमेन नेमचा आणखी एक गंमतीदार किस्सा..


डोमेन नेम अर्थात वेबसाईटचे नाव. जसे ednyan.com किंवा google.com वगैरे वगैरे.गेल्या वीस वर्षात लाखो डोमेन्स नोंदले गेल्याने, क्वचित एखादा अपवाद वगळता आता एका शब्दाचे डोमेन नेम उपलब्धच नाही. त्यामुळे दोन वा तीन शब्द जोडून आपल्याला हवं तसं डोमेन नेम नोंदविण्याची स्पर्धा सध्या चालू आहे. त्यातून पोट धरधरून हंसविणारे किस्से घडतात. तसाच हा एक घडलेला किस्सा...
डॉक्टर.कॉम बुक आहे. कॉलडॉक्टर.कॉम पण बुक आहे. डॉक्टरकॉल.कॉम सुद्धा उपलब्ध नाही. मग मंडळी आणखी एक शब्द जोडू पाहतात.दिडॉक्टरकॉल.कॉम करून ते डोमेन नेम मिळतय का ते बघतात. ह्या पद्धतीत कुठेही कॉमा म्हणजे स्वल्पविराम वापरता येत नाही. त्यामुळे शब्द एकमेकांना जोडून येतात आणि वाचताना ते कोणीही कुठेही तोडू शकतो. समजा thedoctorcall.com असेल तर th edoctor call किंवा thedoc torc all असंही कोणी वाचू शकतो.
आता गंमत कशी होते पहा. वैद्यक क्षेत्रातील वेगवेगळे थेरॅपिस्ट शोधून देणारी एक साईट आहे. पण त्यांना हवं असलेलं Therapist.com हे डोमेन नेम उपलब्ध नाही. म्हणून शेवटीtherapist finder असं सोपं नाव दोन शब्द जोडून त्यांनी घेतलं. therapistfinder.com अशी वेबसाईट आजही इंटरनेटवर उपलब्ध आहे. पण डोमेन नेम वाचणारांनी ते the rapist finder असं वाचलं की बोंब. अर्थाचा अनर्थ आणि लाखाचे बारा हजार.
आता खरोखरीच therapistfinder.com ही साईट उघडा. पहा त्यावरची ही हेडींग्जः
Tis The Season to Be Stressed - TherapistFinder.com Offers Tips to Holiday Happiness. (???)
Depression Screening Now Recommended for All Teens, Not Just Those Who Appear at Risk. (!!!)
Do You or a Friend Need Help Urgently?
Family Problems Come in All Shapes and Sizes (अबब, काय हे...)
अहो, हा काल्पनिक विनोद नाही. खरंच therapistfinder.com उघडून वाचून बघा. खात्री केल्याशिवाय हंसू नका. वुई आर सिरीयस..ओके?

डोमेन नेम आणि धमाल...

एक एक धमाल...
गेम्स एकमेकांना पाठवणं हे काही नवं नाही. एखादा मित्र एखादा गेम डाऊनलोड करतो आणि तो आपल्या मित्राला पाठवतो. तो मित्र त्या बदल्यात त्याला दुसरा गेम पाठवतो. गेम्स अशा प्रकारे एक्सचेंज करणारे मित्र खूप असतात. त्यामुळे त्यांनी ठरवलं की अशा प्रकारे गेम्स एक्सचेंज करणार्‍या मित्रांना एकत्र आणणारी वेबसाईट तयार करायची. त्यासाठी त्यांनी www.gamesexchange.com हे डोमेन नेम बुक करायचं ठरवलं. त्यातून भयानक धमाल झाली. ती अशीः वाचणारे सरळ वाचत नाहीत. डोमेन नेम्स मध्ये स्वल्पविराम टाकण्याची सोय नसल्याने शब्द कुठे तोडावेत याला काही ताळ तंत्रच नाही. आता ही गेम्स एक्स्चेंज करणारी साईट. लोकांना वाटू लागलं game sex change डॉट कॉम. लोकांचा काही नेम नाही हेच ह्या डोमेन नेम वरून दिसून येतं. बाकी काही नाही..

अल्झायमर आणि स्मृतिदोषाची उपयुक्त माहिती देणारी अप्रतिम साईट

स्मृती ह्या माणसाला प्राणवायूइतक्याच महत्वाच्या असतात हे अल्झायमरचा एखादा रोगी पाहिला की कळतं. जे जे जगलो आणि ज्यांच्या बरोबर आयुष्य जगलो ते सारं एका रोगाच्या नावाखाली सारं पुसून जातं. माणूस आपल्या पत्नीलामुलांना ओळखू शकत नाही. त्यांनाच विचारतो की आपण कोणतुम्हाला कोण हवय. किंवा त्याला त्याचं स्वतःचच नाव-गाव पत्ता आठवत नाही. हे सारं भयानक आहे. अल्झायमर हा रोग कर्करोगाप्रमाणे माणसाला ठार मारत नाही. पण जिवंतपणीचं एक वेगळच मरण अनुभवायला लावतो. ही साईट त्या अल्झायमर रोगाची माहिती देणारी एक उत्तम साईट. अल्झायमरची लक्षणंत्यावरचे उपचार,त्यातले धोकेलोकांचे अनुभव वगैरे खूपच मौलिक माहिती ही साईट देते. भरपूर आकृत्याछायाचित्रेतक्ते यामुळे तिची उपयुक्तता अमर्याद आहे. 

How to clean any thing - साफ सफाईचा उपयुक्त कोश

साईटच्या नावातच सगळं आलेलं आहे. पण नुसतं असं म्हणून आपल्याला त्याची कल्पना येणार नाही. कारण धुलाई कशी करावी हे सांगणारी साईट सुद्धा किती मोठी असू शकते हे ही साईट पाहिल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. फळं आणि पालेभाज्या कशा धुवाव्यात इथपासून ते कुत्र्याला आंघोळ कशी घालावी इथपर्यंत अक्षरशः शेकडो गोष्टींच्या धुलाईचे कानमंत्र इथे मिळतात. एक अप्रतिम साईट आहे एवढच म्हणतो. अवश्य पहा.