२० फेब्रु, २०११

Parental software - एक कौटुंबिक गरज

Parental Filter ह्या नावाचं मोफत आणि माझ्या मते उत्तम असं सॉफ्टवेअर तुमच्यासाठी इंटरनेटवर उपलब्ध आहे.http://www.ecommsec.com/pf/PfSetup30.exeह्या लिंकवर क्लीक केलत की Parental Filter चा डाऊनलोड सुरू होईल. केवळ २.१ एम.बी. आकाराचं हे डाऊनलोड आहे. त्यामुळे ते पटकन डाऊनलोड होतं. डाऊनलोड पूर्ण झाल्यानंतर इन्स्टॉल करा. इन्स्टॉलेशन नंतर तुमच्या पुढे खालील स्क्रीन येईल.


त्यातील वरच्या बाजूस असलेल्या उजवीकडील लाल आयतावर (Banlist Off) वर क्लीक करा. म्हणजे तो चौकोन हिरवा होईल आणि Banlist On होईल. याचा अर्थ तुमचं Parental Filter चालू झालं. Pornography किंवा अश्लील प्रकारच्या वेबसाईटस उघडायचा प्रयत्न झाल्यास त्या उघडणार नाहीत. Page can not be displayedअसा संदेश मिळेल.
Parental Filter ने हजारो पोर्न व तत्सम साईटसची यादी केली आहे, आणि त्यांचा समावेश Banlist मध्ये केला आहे. दरमहा त्यात नवनव्या साईटसची भर पडत असते. त्यामुळे तुम्ही Banlist महिन्यातून एकदा जरूर अपडेट करा.
आता, शेवटची पण सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे पासवर्डची. तुम्ही लावलेलं Parental Filter कुणीही काढू नये यासाठी पासवर्डची व्यवस्था आहे. पासवर्ड लावण्यासाठी खाली दाखवलेल्या खुणेवर क्लीक करा.

आता समोर आलेल्या खालील विंडोमध्ये तुमचा पासवर्ड द्या.

हा प्रोग्राम बर्‍यापैकी लोकप्रिय आहे. पण तो फार मोठ्या प्रमाणावर साईटस बॅन करतो अशी टीका काही जण करतात. ज्या अर्थी तो लोकप्रिय आहे, त्याअर्थी आपण टीकाकारांकडे दुर्लक्ष करावे हेच बरे.

जीमेल आणि ऑनलाईन सिक्युरिटी

जीमेल वापरून ईमेल पाठवणारे आजकाल दहापैकी आठ इतके बहुसंख्येने दिसतात. जीमेलवर आपले अनेक पासवर्डस येऊन पडत असतात. कितीतरी गोपनीय किंवा व्यक्तीगत माहिती वा डेटा आपल्या ईमेलमधून जात-येत असतो. असा हा महत्वाचा जीमेल पत्ता कितपत सुरक्षित असतो? कुणी एखादा हॅकर आपली जीमेल हॅक करू शकतो का? आपल्या ईमेल जेव्हा जीमेलवरून जात येत असतात त्या ऑनलाईन प्रवासात मध्येच कुणी त्या टॅप करू शकेल का? हे प्रश्न आपण फारसे विचारात घेत नसतो.
ह्या पार्श्वभूमीवर आपण बॅंकांचं उदाहरण घेऊ. आजकाल बँकांच्या वेबसाईट आणि ऑनलाईन बँकींग सेवा सर्वत्र उपलब्ध झाली आहे.आपल्या अकाऊंटमधून पैसे काढणे, ट्रान्सफर करणे, अकाऊंटमधले पैसे वापरून ऑनलाईन खरेदी करणे हे आता दैनंदिन जीवनाचा भाग होऊन गेलय. अशा वेळी आपल्या बँक अकाऊंटचा पासवर्ड आणि एकूणच व्यवहार सुरक्षित रहावा यासाठी बँकांच्या वेबसाईटस विशेष ऑनलाईन सुरक्षा आपल्या अकाऊंटला देत असतात. हे नीट समजण्यासाठी आपण ICICI Bank च्या वेबसाईटचं उदाहरण घेऊ. तुम्ही तुमच्या इंटरनेट ब्राऊझरमध्ये http://icicibank.com असं टाईप करून एंटर बटण दाबलत तर तुम्ही बँकेच्या वेबसाईटवर जाता. तुमच्या ब्राऊझरमध्ये त्यावेळी खालीलप्रमाणे साईटचा पत्ता दिसत असतो.



आता तुम्ही बँकेच्या वेबसाईटवर लॉगिन करण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी सर्वात वर डावीकडे दिसणार्‍या लॉगिन विभागाकडे या.



तुम्ही जेव्हा लॉगिनच्या Personal किंवा Corporate वा तत्सम लिंकवर क्लीक करता तेव्हा तुमच्यासमोर लॉगिन नेम व पासवर्ड टाईप करावयाचे पान येते. इथून तुम्ही तुमचं अकाऊंट उघडणार असता. हे पान अतिशय सुरक्षित ठेवण्याची काळजी सर्वच बँकांप्रमाणे ICICI Bank ने देखील घेतली आहे. ह्या पानाचा तुमच्या ब्राऊझरवर असलेला पत्ता पहा. खालीलप्रमाणे दिसत आहे.



जेव्हा तुम्ही साधी साईट उघडलीत तेव्हा त्या पत्त्यात केवळ http अशी सुरूवात होती. जेव्हा तुम्ही लॉगिन व पासवर्डच्या पानावर गेलात त्यावेळी त्या पानाचा पत्ताhttp ऐवजी https ने सुरू होणारा होता. म्हणजेच लॉगिन-पासवर्डचे पान येताच http मध्ये s ची भर पडली आहे. हा s असतो विशेष सिक्युरिटीचा. ह्या पानावर जे टाईप होईल व जे व्यवहार होतील ते सारे विशेष सुरक्षित राहतील असा त्याचा अर्थ. आजकाल व्हीआयपींना झेड सिक्युरिटी दिली जाते. Https चा अर्थ तुमच्या पानाला अशी एक प्रकारची ऑनलाईन झेड सिक्युरिटी मिळालेली आहे.
आता आपल्या जीमेलकडे वळू. तुमच्या जीमेलवर लॉगिन करा. लॉगिन केल्यावर तुमच्या ब्राऊझरच्या पत्त्यात काय दिसते आहे? जर http असेल तर तुमचा लॉगिन आणि तुमच्या मेलना https ची विशेष सिक्युरिटी उपलब्ध नाही. त्यातही जर तुम्ही wi-fi झोन मध्ये असाल वा wi-fi इंटरनेट वापरत असाल तर तुमच्या झोनमधला इतर कोणी तुमचा ईमेल पत्ता तुमच्या नकळत पाहू शकतो. पॅरालल टेलिफोन लाईनवर टेलिफोनवरचं बोलणं ऐकणं असतं ना तसाच काहीसा हा प्रकार असतो. मात्र तुमचा लॉगिन https प्रकाराने युक्त असेल तर तुम्ही काळजी करण्याची गरज नसते. कारण तुमच्या ईमेलला वा त्या पानावरच्या ऑनलाईन व्यवहाराला विशेष सुरक्षा असते.
तुम्ही तुमची जीमेल उघडलीत. पत्ता पाहिलात. तो http प्रकारचा आहे का? असेल तर तो बदलून तुम्ही https करून तुमची ईमेल विशेष सुरक्षा कवचाच्या आत ठेवायल हवी. आता जीमेलने अशा सुरक्षेची सोय तुमच्या-आमच्यासाठी केली आहे. पण ती तुम्ही अक्टीव्हेट करायला हवी. जोपर्यंत तुम्ही ती अक्टीव्हेट करीत नाही,तोपर्यंत तुमचा पत्ता http चाच राहणार. अक्टीव्हेट करणं हे अगदी सोपं आहे. त्यासाठी प्रथम तुमच्या जीमेलवर लॉगिन करा. मग Settings वर क्लीक करा. सेटींग पानाच्या तळाशी पहा दोन पर्याय दिलेले आहेत. एक आहे - Always use https. दुसरा आहे - Don't always use https. खालील चित्रात दाखविल्याप्रमाणे तुमच्या जीमेलवर कोणताही पर्याय निवडलेला नाही.



जीमेलने खरं तर स्वतःच न विचारता https पर्याय निवडायला (by Default) हवा होता. पण त्यांनी तसे केलेले नाही. त्यामुळे आपण तो निवडणे भाग आहे. माऊसने क्लीक करून तो पर्याय निवडून घ्या. मग खालीलप्रमाणे चित्र दिसेल.



आता हे सेटींग सेव्ह करा आणि त्या पानावरून बाहेर पडा. आता पुन्हा लॉगिन करून पहा. तुम्हाला https चा लॉगिन पत्ता मिळालेला दिसेल. याचा अर्थ आता तुमची जीमेल विशेष सुरक्षा कवचाखाली आली आहे. इतरांना ती पासवर्डशिवाय ऑनलाईन हॅक करणं आता अगदी अशक्यप्राय आहे.
ही सुविधा जीमेलने अगदी अलिकडे देऊ केली आहे. त्यामुळे आपल्यापैकी १० तल्या ९ जणांना त्याची माहिती नसण्याची शक्यता आहे. तुमच्या सर्व मित्रांना आपण याची माहिती त्वरित द्या. आपली आणि आपल्या सर्वांची जीमेल सुरक्षित करणं महत्वाचं आहे. त्यासाठी इथे दिलेली टीप प्रत्येकाला सांगणं हे आपण कर्तव्य म्हणून करायला हवं.

उपयुक्त Unlocker..

आपल्याला संगणकावरील एखादी फाईल काढून टाकायची असते. आपण ती Delete करण्याचा प्रयत्न करीत असतो आणि आपल्याला यश येत नसतं. खाली दाखवल्याप्रमाणे काहीतरी विचित्र संदेश संगणक देत असतो आणि ती फाईल पुन्हा पुन्हा प्रयत्न करूनही डिलीट होत नसते. ते संदेश साधारणतः असेः

Cannot delete file: Access is denied

There has been a sharing violation.

The source or destination file may be in use.

The file is in use by another program or user.

Make sure the disk is not full or write-protected and that the file is not currently in use.

ह्यापैकी एखादा वा तत्सम संदेश पाहून आपल्याला आश्चर्य वाटत असतं की मला जी फाईल डिलीट करायची आहे ती ना मी कुठे उघडली आहे, ना ती कोणत्याही प्रोग्रामसाठी वापरात आहे. असं असूनही ' The file is in use by another program or user' हा संदेश का येतोय. चक्रावल्यामुळे पुढे आपल्याला यामागे एखाद्या व्हायरसचा किंवा स्पायवेअरचा तर हात नसेल ना असा संशयही येऊ लागतो.
ह्या परिस्थितीतून सुटण्यासाठी अत्यंत उपयुक्त सॉफ्टवेअर म्हणजे Unlocker. सध्या त्याचे १.८. ८ हे व्हर्जन उपलब्ध आहे. हा प्रोग्राम अधिकृतरित्या मोफत म्हणजेFreeware आहे. तो डाऊनलोड करण्यासाठी हा घ्या पत्ताः
http://www.filehippo.com/download_unlocker/
खूप जणांना ती सापडत नाही. त्यामुळे खालील चित्रात ती नेमकी बाणाने दाखवली आहे.)



आपला पेन ड्राईव्ह बाहेर काढतानाही बरेच वेळा पेन ड्राईव्ह मधल्या काही फाईल्स वापरात असल्याने तो काढणं Safe नाही
अशा प्रकारचे संदेशही वारंवार येत असतात. त्यातला एक संदेश खालील विंडोत दाखवला आहे.



अशा वेळी पेन ड्राईव्हच्या रूट फोल्डरवर वा ड्राईव्ह लेटरवर राईट क्लीक करून Unlocker ला त्या फाईल्स मोकळ्या करायला सांगितल्यास आपली समस्या सुटते.राईटक्लीक करण्याचा Unlocker चा नेमका मेनू आयटेम खाली दाखवला आहे. 



वर जो Unlocker डाऊनलोडचा पत्ता दिला आहे तो पाहिल्यावर ही साईट फ्रान्समधील आहे हे तुमच्या लक्षात येईल. आपल्या मदतीसाठी सारं संगणकीय जग कसं प्रयत्नशील असतं त्याचच हे एक उदाहरण.

मजेदार फोटोस्केचर



वर दिला आहे तो आहे वाघाचा मूळ फोटो.
फोटोस्केचर हे मोफत उपलब्ध असलेले सॉफ्टवेअर (फ्रीवेअर) वापरून
काही क्षणांत तयार केलेली दोन कृष्ण-धवल रेखाचित्रे खाली दिली आहेत.


हे फोटोस्केचर डाऊनलोडींगसाठी उपलब्ध आहे http://www.fotosketcher.com/ ह्या वेबसाईटवर. यात पेन्सिल स्केच, पेन व इन्क स्केच, कलर स्केचेस अशा एकूण चार प्रकारात स्केचेस करता येतात. वापरायला आणि समजायला खूप सोपं, आणि त्या मानाने सुंदर स्केचेस अगदी कमी वेळात तयार करणारं
हे फ्रीवेअर अनेक ठिकाणी ५ स्टार मिळून लोकप्रिय झालं आहे.
ज्यांच्याकडे फोटोशॉपसारखे कमर्शियल सॉफ्टवेअर नाही,
किंवा ते वापरणं अवघड जातं अशांना हे छोटेखानी स्केच टूल नक्कीच आवडेल.
फोटोस्केचरची ही खालील विंडो पहा.


त्यावरून हे सॉफ्टवेअर काय आहे हे तुमच्या सहज लक्षात येईल.
तुम्हाला हवा तो फोटो उघडा, मग फक्त त्या विंडोतले स्लायडर मागे पुढे करा
की झालं तुमचं स्केच तयार. फारच सोपं,
म्हंटलं तर लहान मुलांसाठी,
म्हंटलं तर नुकतेच संगणकावर बसू लागलेल्या मोठ्यांसाठी.

न फुटणारं भिंग..

बारीक टाईप वाचणं हा काही वेळा कामाचा तर काही वेळा नेहमीच्या वाचनाचा भाग असतो. बरेच ज्येष्ठ नागरिक अशा वेळी बहिर्गोल भिंग घेऊन वाचन करताना दिसतात. संगणकाच्या स्क्रीनवरचं बारीक अक्षरही असं बहिर्गोल भिंग घेऊन वाचणं शक्य आहे का? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे, 'होय शक्य आहे. त्यासाठी एक डिजिटल बहिर्गोल भिंग तुम्हाला मिळू शकतं.



वरील चित्रात दाखविल्याप्रमाणे हे भिंग तुमच्या स्क्रीनवर अशा स्टाईलमध्ये येतं. डिजिटल असल्याने ते अर्थातच हाताने फिरवावं लागत नाही. माऊसच्या क्लीकमध्ये धरून ते हवं तिथे सरकवता येतं. बारीक टाईप वाचण्यासाठी बरीच मंडळी त्याचा उपयोग सध्या करीत आहेत. तुम्हालाही प्रयत्न करून पहायला हरकत नाही. हे भिंग म्हणजे एक मोफत प्रोग्राम किंवा फ्रीवेअर आहे. http://www.4neurons.com/other/Magnifying_Glass/ ह्या साईटवरून तुम्ही हे भिंग डाऊनलोड करून घेऊ शकता. हे भिंग वापरणं हा सवयीचा भाग आहे. सुरूवातीस ते वापरणं किचकट वाटू शकतं. नंतर मग ते वापरण्याचीच सवय होऊन बसणही अशक्य नाही.

हे भिंग मोफत मिळतं. ते फुटत नाही. हरवत नाही. कोणी ते आपल्याकडे मागू शकत नाही. एक गंमत म्हणून ते (म्हणजे माऊस) लहान मुलांच्या हातात द्यायलाही हरकत नाही. उपयुक्तता आणि मनोरंजन एकाच वेळी साधणारं हे भिंग आहे

१९४६ सालचा ENIAC संगणक

जगप्रसिद्ध ENIAC संगणक १९४६ च्या फेब्रुवारी महिन्यात तयार झाला. त्याने १००० चौरस फूटांची जागा व्यापली होती. आजच्या नॅनो तंत्रज्ञानाच्या काळात एवढ्या प्रचंड आकाराचा संगणक ऐकल्यावर कुणाला हंसूही येईल. १९४३ ते १९४६ असं सुमारे तीन वर्ष हा संगणक उभारण्याचं आणि बांधण्याचं काम चाललं होतं. एका सेकंदाला ५००० OPERATIONS करण्याची क्षमता ENIAC मध्ये होती. आज हा ५००० चा आकडा ऐकला तरी हंसू फुटतं. पण त्या काळात तो आकडा फार मोठा वाटणाराच होता. खरं तर १९४५ च्या सुमारास जे संगणक वा त्या सदृश्य यंत्रे उपलब्ध होती त्यापेक्षा ENIAC ची क्षमता १००० पटींनी (अबब..) जास्त होती. त्यामुळेच ENIAC चं मोठच कौतुक होतं.
ENIAC उभारण्याचं काम जॉन मॉक्ली (John Mouchley) आणि जे प्रेस्पर इकर्ट यांनी केलं. ते दोघेही ENIAC प्रकल्पाचे प्रमुख (Director) होते.

भारतातील शहरांचे वा विविध ठिकाणांचे अक्षांश व रेखांश कुठे मिळतील?

ह्या साठी http://www.indiapress.org/horoscope/ ह्या साईटवर जा. ह्या पानावर तळाशी पहा खालील चित्रात दाखविल्याप्रमाणे A to Z पर्यंत लिंक्स आहेत. तुम्हाला मिरज शहराचे अक्षांश रेखांश हवे आहेत. ते अद्याक्षरावर क्लीक केल्यानंतर मिळतील. तसेच तुमच्या बोरिवलीचे अक्षांश रेखांश अर्थातच वर क्लीक केल्यावर उपलब्ध होतील. 

भारताबाहेरील स्थळांचे अक्षांश रेखांश दाखविणार्‍या वेबसाईटस तर
 फारच मोठ्या प्रमाणावर आहेत. त्याची माहिती www.earthtools.org ह्या लिंकवर मिळू शकेल.