साईटच्या नावातच सगळं आलेलं आहे. पण नुसतं असं म्हणून आपल्याला त्याची कल्पना येणार नाही. कारण धुलाई कशी करावी हे सांगणारी साईट सुद्धा किती मोठी असू शकते हे ही साईट पाहिल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. फळं आणि पालेभाज्या कशा धुवाव्यात इथपासून ते कुत्र्याला आंघोळ कशी घालावी इथपर्यंत अक्षरशः शेकडो गोष्टींच्या धुलाईचे कानमंत्र इथे मिळतात. एक अप्रतिम साईट आहे एवढच म्हणतो. अवश्य पहा.
२० फेब्रु, २०११
भारतासह जगभरच्या सर्व टेलिफोन डिरेक्टरीज एकत्र देणारी साईट.
हा जगभरच्या टेलिफोन डिरेक्टरीजचा संग्रह. अफगाणिस्तानपासून ते झिंबाब्वेपर्यंत शेकडो देशांतील हजारो शहरांच्या (गावेही त्यात आलीच) ऑनलाईन टेलिफोन डिरेक्टरीजच्या लिंक्स त्यात उपलब्ध केलेल्या आहेत. कुठलाही देश असो आणि त्यातला कुठलाही प्रदेश, राज्य, शहर वा गाव असो त्यांची डिरेक्टरी इथे सापडते. आपल्या एमटीएनएलच्या मुंबई वा दिल्लीच्या डिरेक्टरीसह महाराष्ट्र, गुजरात, अगदी राजस्थान, उत्तर प्रदेशांतील गावागावांतील दूरध्वनी इथे शोधणं शक्य आहे. इजिप्त असो की इस्त्रायल आणि जपान असो की ब्राझील Find anyone anywhere in the world हे ह्या साईटचे अधिकृत ब्रीदवाक्य आहे. ही सेवा अर्थातच मोफत आहे. संदर्भाच्या दृष्टीने एक ठळक आणि महत्वाची वेबसाईट म्हणून मी त्याकडे पाहतो.
कागदी नोटांचं म्युझियम - एका ज्येष्ठ नागरिकाची वैशिष्ट्यपूर्ण साईट
जगभरातील भारतासह जवळजवळ सर्व देशांतील कागदी नोटांचे हे म्युझियमच आहे म्हणाना. ही साईट तयार केलीय एका माणसाने. त्याचं नाव टॉम चाओ. तो वंशाने चिनी आणि नागरिकत्वाने अमेरिकन आहे. साईटची माहिती देण्याऐवजी सुरूवातीला मी ह्या टॉम चाओबद्दल सांगतोय त्याला तसच कारण आहे. टॉम हा सेवानिवृत्त माणूस आहे. अमेरिकन नेव्हीमध्ये त्याने ३४ वर्षे इलेक्ट्रॉनिक इंजिनीयर म्हणून नोकरी केली आणि तो रिटायर झाला. रिटायर होईपर्यंत कुठलीही वेबसाईट त्याच्या डोक्यात नव्हती. जगभरातील नोटा जमवणंही त्याच्या डोक्यात नव्हतं. तो रिटायर झाला आणि वेळ घालवण्यासाठी काहीतरी छंद हवा म्हणून तो नोटा जमविण्याच्या छंदाकडे वळला. कुठे नोटांचा लीलाव असला की त्याचं त्याकडे लक्ष असे. कुठे जुन्या नोटा विकणारे विक्रेते किंवा इतर कुणी दिसले की तो तिथे जाई. ह्या नोटा जमवून त्या स्कॅन करून तो संग्रह त्याने आपल्याच नावाच्या म्हणजे टॉमचाओ.कॉम नावाच्या साईटवर त्याने ठेवला. हे सगळं केवळ वेळ जावा म्हणूनत्याने आनंदाने केलं. टॉमला दोन मुले आहेत. ती दोघेही अमेरिकेतच पण टॉमपासून लांब राहतात. एक मुलगा सॉफ्टवेअर इंजिनीयर आहे तो बोस्टनला, तर दुसरा कॉस्मेटिक सर्जन आहे तो बेवर्ली हिल भागात राहतो. स्वतः टॉम आणि त्याची बायको कनक्टीकटमध्ये राहतात. रिटायर झाल्यानंतर टॉमने चलनात नसलेल्या ५० नोटांचा एक संग्रह विकत घेतला. त्या त्याच्याकडल्या पहिल्या नोटा. नंतर हा संग्रह वाढत गेला. आज त्याच्या ह्या वेबसाईटवर ९९५ म्हणजे जवळजवळ हजारभर पानं आहेत. ३६०० चित्रे आहेत. त्याच्याकडल्या नोटांमध्ये टॉमच्या दृष्टीने ज्या टॉप ट्वेंटी आहेत त्यात चीनमध्ये १३६८ साली चलनात असलेली नोट आहे. खेरीज आयर्लंड (१८७०), सेनेगल (१९१७), तिबेट (१९२६), वेस्ट इंडिज (१९०५), अंटिग्वा (१९३८), अमेरिका (१८९९), झांजिबार (१९२०) वगैरेंचा समावेश आहे. भारताची १९३८ सालची ब्रिटनच्या राजाचा फोटो असलेली खाली दाखवलेली नोटही टॉमच्या संग्रहात आहे..

सेवानिवृत्त झाल्यानंतर एक माणूस काय करू शकतो हे पाहण्यासाठी सुद्धा ही साईट पहायला हवी. अगदी फुरसतीने..
सेवानिवृत्त झाल्यानंतर एक माणूस काय करू शकतो हे पाहण्यासाठी सुद्धा ही साईट पहायला हवी. अगदी फुरसतीने..
अंधश्रद्धांचा पाढा वाचणारी मनोरंजक साईट
अंधश्रद्धांची लांबलचक आणि अत्यंत मनोरंजक यादी. मोराचं पिस घरात लावणं म्हणे अशुभ असतं, तर हंसाचं पिस नवर्याच्या उशीत लावल्यास तो पत्नीशी एकनिष्ठ राहतो, वगैरे वगैरे. धमाल आहे.
मजा म्हणून ह्या साईटवर एक कटाक्ष टाकाच...
गरूड पुराणाचे इंग्रजी भाषांतर इथे वाचायला मिळेल..
गरूड पुराणाचे इंग्रजी भाषांतर. ह्या पुराणात मृत्यूनंतरच्या स्थितीबद्दलची चर्चा आहे. श्रद्धाळू हिंदू धर्मीयांमध्ये मृत्यूनंतर विविध क्रिया कर्म केली जातात. त्याला गरूडपुराणाची पार्श्वभूमी आहे. हा विष्णू पुराणाचा एक भागआहे. यात विष्णू आणि गरूड यांची मानवाच्या मृत्यूबद्दलची चर्चा आहे. हा पुरातन ग्रंथ सोळा प्रकरणांचा आहे.प्रकरण एक ते सात नरकासंबंधीची चर्चा आहे. आठ ते तेरा मध्ये मृत्यूनंतरची क्रियाकर्मे आहेत. चौदाव्या प्रकरणात स्वर्गाची माहिती आहे. तर, पंधरा आणि सोळा ही प्रकरणे योग आणि मुक्तीबद्दल आहेत.
गणिताची कोष्टके इथे डाऊनलोड करा..
गणित विषयाशी संबंधित आहात? मग खालील लिंक्स खास तुमच्यासाठी आहेत..
This site is a place for students and educators to quickly access mathematical formulas. The tables will be organized by topics:
This site is a place for students and educators to quickly access mathematical formulas. The tables will be organized by topics:
A Multiplication Table
The First 1000 Prime Numbers
The Prime Factorization of the First 1000 Integers
Math for the Toolbox. SAE to Metric Conversion.
A Table of the Common Logarithm.
Some Important Constants
Bernoulli and Euler's numbers
Algebraic Identities
Units of Conversion
Binomial Coefficients and Formulas
Trigonometric Identities
A Trigonometric Table
Derivatives
Integrals
Indefinite Integrals
- With "ax+b"
- With Square Root of "ax+b"
- With "ax+b" and "px+q"
- With Square Root of "ax+b" and "px+q"
- With Square Root of "ax+b" and Square Root of "px+q"
- With "x2+a2 "
- With "x2-a2"
- With "a2-x2"
- With Square Root of "x2+a2"
- With Square Root of "x2-a2"
- With Square Root of "a2-x2"
- With "a x2 + b x + c"
- With Square Root of "a x2 + b x + c"
- With "x3+a3"
- With "x4+a4" or "x4-a4"
- With "xn+an" or "xn-an"
Integrals with Trigonometric Functions
Integrals with Exponential and Logarithmic Functions
Integrals with Hyperbolic Functions
- Integrals with "Hyperbolic-Sin"
- Integrals with "Hyperbolic-Cos"
- Integrals with "Hyperbolic-Sin" and "Hyperbolic-Cos"
- Integrals with "Hyperbolic-Tan"
- Integrals with "Hyperbolic-Cot"
- Integrals with "Hyperbolic-Sec"
- Integrals with "Hyperbolic-Csc"
- Integrals with Inverse Hyperbolic Trigonometric Functions
Definite Integrals
Laplace Transforms
First and Second Order Differential Equations
पहिले नाव कोणाचे? पॅकार्ड की हॅवलेट?
सन १९३९
![]() |
| एच.पी. कंपनीचे पहिले उत्पादन |
हॅवलेट पॅकार्ड (HP) कंपनीची स्थापना १ जानेवारी १९३९ रविवार रोजी झाली.
डेव्हिड पॅकार्ड आणि बिल हॅवलेट ह्या दोघांनी पालो अल्टो (कॅलिफोर्निया, अमेरिका) येथे एका गॅरेजमध्ये कंपनीची स्थापना केली.दोघांच्या नावाने कंपनी ठेवायची हे ठरले. पण, पहिले नाव कोणाचे?
पॅकार्ड की हॅवलेट? हा प्रश्न होता. दोघांनी त्याचा निर्णय घेतला नाणे फेकून. त्या नाणेफेकीने ठरविले की पहिले नाव हॅवलेट, नंतर पॅकार्ड.
ज्या गॅरेजमध्ये कंपनीची स्थापना झाली त्या जागेत लग्नापूर्वी बिल हॅवलेट रहायला होते. पहिल्या मजल्यावर डेव्हिड पॅकार्ड पत्नीसह रहात, तर त्यावर दुसर्या मजल्यावर त्यांचा घरमालक रहात असे.
ह्या गॅरेजचे छायाचित्र ह्या लिंकवर उपलब्ध आहे. ह्या गॅरेजला सिलीकॉन व्हॅली चे जन्मस्थळ मानले जाते. त्यासाठी ह्या गॅरेजचे रितसर जतन एक स्मारक म्हणून करण्यांत आले आहे. ह्या जतन केलेल्या गॅरेजच्या बाहेर डेव्हीड हेवलेट व बिल पॅकार्ड यांचे घेतलेले छायाचित्र आपण ह्या लिंकवर पाहू शकाल.
कंपनीचे पहिले उत्पादन होते एचपी 200 ए ऑडिओ ऑसिलेटर. ह्या उत्पादनाचे छायाचित्र ह्या लिंकवर पहा.
१९४० सालचा वॉल्ट डिस्ने पिक्चर्सचा चित्रपट Fantasia मध्ये साऊंड इफेक्टससाठी एचपी २०० बी ऑडिओ ऑसिलेटरचे आठ नग विकत घेतले.
आज आपण एचपी लेझर प्रिंटर्स सर्रास वापरतो. पण त्या कंपनीची सुरूवात १९३९ साली एका गॅरेजात झाली हे अतिशय प्रेरणादायी आहे.
ह्या गॅरेजचे छायाचित्र ह्या लिंकवर उपलब्ध आहे. ह्या गॅरेजला सिलीकॉन व्हॅली चे जन्मस्थळ मानले जाते. त्यासाठी ह्या गॅरेजचे रितसर जतन एक स्मारक म्हणून करण्यांत आले आहे. ह्या जतन केलेल्या गॅरेजच्या बाहेर डेव्हीड हेवलेट व बिल पॅकार्ड यांचे घेतलेले छायाचित्र आपण ह्या लिंकवर पाहू शकाल.
कंपनीचे पहिले उत्पादन होते एचपी 200 ए ऑडिओ ऑसिलेटर. ह्या उत्पादनाचे छायाचित्र ह्या लिंकवर पहा.
१९४० सालचा वॉल्ट डिस्ने पिक्चर्सचा चित्रपट Fantasia मध्ये साऊंड इफेक्टससाठी एचपी २०० बी ऑडिओ ऑसिलेटरचे आठ नग विकत घेतले.
आज आपण एचपी लेझर प्रिंटर्स सर्रास वापरतो. पण त्या कंपनीची सुरूवात १९३९ साली एका गॅरेजात झाली हे अतिशय प्रेरणादायी आहे.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)

