२० फेब्रु, २०११

भारताची राज्यघटना, अधिकृतपणे डाऊनलोडींगसाठी उपलब्ध

http://india.gov.in/govt/constitutions_of_india.php

Googleplex चा योगायोग

) Google हा शब्द इंग्रजी Googol ह्या शब्दावरून घेतला आहे.

) Googol म्हणजे १ ह्या आकड्यावर शंभर शुन्ये ठेवली असता येणारी संख्या. A cardinal number represented as 1 followed by 100 zeros (ten raised to the power of a hundred). माहितीचा प्रचंड स्त्रोत सांगण्यासाठीच मूळ Googol वरून Google असे नामकरण गुगलचे संस्थापक सर्जी ब्रिन आणि लॅरी पेज यांनी केले.
) Google कंपनीच्या मुख्य कार्यालयाच्या आवाराचे नाव ठेवताना Google आणि Complex ह्या दोन इंग्रजी शब्दांचा संयोग करून ते Googleplex असे ठेवण्यांत आले.


) Googolplex (स्पेलींग नीट पहा) हाही एक स्वतंत्र इंग्रजी शब्द आहेत्याचा अर्थ आहे १ ह्या आकड्यावर एक Googol शुन्य ठेवल्यानंतर येणारी संख्या. A cardinal number represented as 1 followed by a googol of zeros (ten raised to the power of a googol)

) Googleplex (अगदी तेच स्पेलिंग) शब्द पहिल्यांदा वापरात आला तो १९७७ सालीतेव्हा गुगलचे संस्थापक सर्जी ब्रिन आणि लॅरी पेज हे बोबडं बोलण्याच्या वयातले म्हणजे फक्त तीन साडेतीन वर्षांचे होते. Googleplex हे नाव बीबीसी रेडिओवर प्रसारित झालेल्या एका जगप्रसिद्ध मालिकेत १९७७ साली आलंती जगप्रसिद्ध रेडिओ मालिका म्हणजे डग्लस अडॅम्स लिखित The Hitchhiker's Guide to the Galaxy.

) The Hitchhiker's Guide to the Galaxy मध्ये जो अत्यंत शक्तीमान असा काँप्युटर दाखवला गेला आहे त्या काँप्युटरच्या भल्या मोठ्या नावाची अद्याक्षरेGOOGLEPLEX अशीच होती (होय अगदी तेच स्पेलींग)

) Hitchhiker's Guide मधला शक्तीमान संगणक GOOGLEPLEX आणि आजचे सर्वांत शक्तीमान सर्च इंजिन गुगलचे मुख्यालय आवार म्हणजेहीGOOGLEPLEX. दोन्हींचा संबंध शक्तीमान संगणकांशी आणि दोन्हींचे स्पेलींगही तंतोतंत सारखे असावे हा एक मोठाच योगायोग.

आणखी एक योगायोगाची गोष्ट म्हणजे google हा शब्द आता अधिकृतपणे क्रियापद म्हणून इंग्रजी शब्दकोशांनी स्वीकारला आहे. Googol आणि Googolplex हे दोन्ही इंग्रजी शब्दकोशातले शब्द आहेतआता Googleplex हे गुगलच्या मुख्य कार्यालय आवाराचे नावही इंग्रजी शब्दकोशात जाणार का? ह्या विषयी काही माहिती सापडत नाही.

ता.क. ९) अगदी ताजा योगायोग - गुगलचे एक संस्थापक मालक
 सर्जी ब्रिन हे म्हणे लवकरच पर्यटनासाठी अंतराळात जाणार आहेत. त्यासाठी त्यांनी  (११ जून २००८ रोजी) सुमारे २२ कोटी (५ दशलक्ष डॉलर्स ) रूपये भरून अंतराळयान बुक करून ठेवलेही आहे. सविस्तर व अधिकृत बातमीसाठी इथे क्लीक करासर्जी ब्रिनना गॅलक्सीत (अंतराळात) जावसं वाटलं याचं कारणही Googleplex आणि Hitchhikers Galaxy ह्या योगायोगात लपलं असेल कात्याचीही माहिती कुठे सापडत नाही.

वेलगुगलमध्ये शोधून पहायला हवी

वेबसाईटवरील रजिस्ट्रेशनसाठी एक युक्ती

एखाद्या साईटवर आपल्याला तात्पुरतं आणि बहुधा एकदाच जायचं असतं. तिथे पुन्हा पुन्हा जाण्याची आपल्याला गरजही लागणार नसते. पण जेएकदाच किंवा तात्पुरतं जाणं असतं त्यामागे रजिस्ट्रेशन करण्याची कटकट असते. आत जाऊन माहिती हवी असेल तर तो फॉर्म भरणंनावनवा पासवर्डनवं लॉगिन नेमईमेल असं सगळं (भले खोटं का असेना) द्यायचंमग ते तुम्हाला मेल पाठवणार. ती तुम्ही पहायची. त्यातली लिंक क्लीक करायची. अशा प्रकारे तुमचा ईमेल पत्ता 'verify' झाल्यावर मग तुम्हाला आत प्रवेश मिळणार. त्यामुळे ही वेबसाईटवरील रजिस्ट्रेशनची बरेच जणांना व्यर्थ कटकट वाटते. शिवाय जो ईमेल अड्रेस देऊ त्यावर स्पॅम म्हणजे कचरा मेल येण्याची शक्यताही खूप असते. यावर एका ऑस्ट्रेलियन माणसानं शक्कल काढली. त्याचं नाव माहित नाही. म्हणजे त्यानंच ते उघड केलेलं नाही. आता जो माणूस काहीतरी शक्कल काढतोआणि आपलं नाव गुप्त ठेवतो याचा अर्थ त्यात ती शक्कल सरळ नसणार हे आलच.
तुम्हाला जास्त बुचकळ्यात न ठेवता मी प्रथम त्या माणसाची शक्कल सांगतो. त्याने एक वेबसाईट तयार केली आहे. तिचं नाव http://www.bugmenot.com/ ह्या वेबसाईटवर त्याने आख्या जगासाठी विविध लोकप्रिय साईटसचे तयार (रेडी टू युज) लॉगिन आणि पासवर्डस ठेवले आहेत. त्यात न्युयॉर्क टाईम्स, IMDB, Youtube, washingtonpost, yahoo, adobe.com, वगैरे सारख्या किती साईटस असाव्यात? 'वायर्डह्या जगप्रसिद्ध नियतकालिकातील वृत्तानुसार १४000 साईटसचे लॉगिन आणि पासवर्डस तिथे उपलब्ध आहेत. आपण एक उदाहरण घेऊ म्हणजे हा मुद्दा आणखी स्पष्ट होईल. समजा तुम्हाला www.washingtonpost.com ह्या वॉशिंग्टनपोस्ट दैनिकाच्या साईटवर जाऊन ताजी बातमी पहायची आहे. तरत्यासाठी तिथे गेल्यावर रजिस्ट्रेशन करावं लागेल. मगच तुम्हाला साईटमध्ये मुक्त भटकंती करता येईल. त्या संदर्भात माहिती देणारी त्या साईटची ही विंडो पहाः

तुम्ही जर रजिस्टर केलत तर तुम्हाला काय काय मिळू शकेल याची यादी त्या
 विंडोत आहे. अशा रजिस्ट्रेशनला कंटाळणारी मंडळी ह्या http://www.bugmenot.com/वर जातात. तिथून तयार मिळणारा लॉगिन नेम आणि पासवर्ड उचलतात. तो वापरतात आणि त्या साईटमध्ये (रजिस्ट्रेशन न करताही) मुक्त संचार करतात. वेळ आणि कटकट वाचवण्याची ही टीप PC Mag सारख्या बड्याबड्या नियतकालिकांनी आणि about.com सारख्या मोठ्या साईटसनी प्रसिद्ध केली आहे. हा पासवर्ड त्या साईटवर कसा खुल्लम खुल्ला दिला जातो ते खालील चित्रावरून दिसेल. खालील चित्रात adobe.com चे लॉगिन आणि पासवर्ड दिले आहेत.

या मागे 
bugmenot चीही स्वतःची एक बाजू आणि तत्वज्ञान आहे. ते काय म्हणतात पहाः
Why not just register?
  • It's a breach of privacy.
  • Sites don't have a great track record with the whole spam thing.
  • It's contrary to the fundamental spirit of the net. Just ask Google.
  • It's pointless due to the significant percentage of users who enter fake demographic details anyway.
  • It's a waste of time.
  • It's annoying as hell.
  • Imagine if every site required registration to access content.
ही साईट असे मुद्दे घेऊन लढते. आजची वस्तुस्थिती ही आहे की bugmenot.com वर जाणारांची गर्दी सतत वाढतेच आहे. जी मंडळी रजिस्टर करतात त्यापैकीच काही जण bugmenot ला त्यांचा लॉगिन आणि पासवर्ड इतरांनी वापरावा ह्या हेतूने देत असतात. कारण सरळ आहेत्या लॉगिन आणि पासवर्डचा त्यांना काहीही उपयोग नसतो. तो सांभाळत बसण्यापेक्षा रजिस्ट्रेशन प्रक्रियेवर राग काढण्यासाठी ते आपला पासवर्ड bugmenot च्या साईटवर जाऊन देऊन टाकतात. असे पासवर्ड जमा करण्यासाठी bugmenot ने एका खास पानावर तशी सोय करून ठेवली आहे. असो.
जाता जाता सांगतो की नुकतेच मला तिथे आपल्या 'Indiatimes' चे तयार लॉगिन आणि पासवर्डही दिसले. म्हणजे कायतर आपल्याकडेही ह्या क्लृप्तीचा वापर करणारे कमी संख्येने नसावेत.
दुसरी युक्ती
bugmenot.com ने आणखी एक युक्तीही दिली आहे. ती तर अफलातूनच आहे. त्यांनी तुमच्यासाठी One time use ईमेल अड्रेस ची सोय केली आहे. म्हणजेएखाद्या साईटने तुम्हाला रजिस्ट्रेशन करायला सांगितलं आणि तुमचा ईमेल पत्ता ते व्हेरीफाय करणार असले तर त्यासाठी काहीही म्हणजेrubbish@bugmenot.com असा ईमेल पत्ता द्यायचा. ह्या अशा कोणत्याही पत्त्यावरच्या ईमेलवर आलेला प्रतिसाद तुम्हाला २४ तासपर्यंत bugmenot च्या साईटवर बघण्याची सोय त्यांनी केली आहे. थोडक्यात कायतर हा जमाना 'युज अन थ्रोचा आहे. त्यात आता ईमेलचीही भर पडली आहे. दुसरंबाय द वेहा 'युज अन थ्रोईमेल पत्ता मिळवण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागत नाही हे स्पष्ट करतो. गंमतच आहे की नाही. काय काय स्पष्ट करावं लागतं बघा.
आणखी एक युक्ती
http://www.gishpuppy.com/

ही साईट डिस्पोजेबल वेब ईमेल पत्ता तुम्हाला अधिकृतपणे देते. ह्या साईटवर जायचं. रजिस्टर करायचं. ईमेल अड्रेस - उदाहरणार्थ abcd@gishpuppy.com असा काहीतरी घ्यायचा. यातलं वैशिष्ट्य म्हणजे ह्या पत्त्यावर तुम्हाला ज्या ज्या ईमेल येतील त्या आपोआप तुमच्या सध्याच्या ईमेलवर पाठवल्या जातील. म्हणजे तुमचा नेहमीचा ईमेल पत्ता गुप्त राहतो आणि अर्थातच त्यामुळे स्पॅमचा धोका रहात नाही. पण समजा तुमचा हा नवा gishpuppy चा ईमेल स्पॅमला सापडला,आणि त्यावर कचरा ईमेल येऊ लागल्या तरतो कचराही तुमच्या त्या गुप्त ईमेलवर येऊन नाही का पडणारअसे प्रश्न तुम्ही नक्कीच विचारणार. असं जर होऊ लागलं तर तुम्ही तो gishpuppy चा पत्ताच निकालात काढून टाकायचा. त्याजागी मग दुसरा घ्यायचा. gishpuppy च्या ईमेलची युक्ती बर्‍याच जणांना आवडते.त्याचं आणखी एक कारण म्हणजे Firefox आणि Internet Explorer साठी एक प्लगिन gishpuppy देतो. हा प्लगिन लावला की तुमच्या ब्राऊजरवर असताना तुमच्या माऊसच्या राईट क्लीकला Gish it नावाची एक कमांड मिळते. ज्या साईटवर रजिस्ट्रेशन करायचं असेल त्या पानावर Gish it क्लीक करायचं. म्हणजे तुम्हाला तिथल्या तिथे एक नवा gishpuppy ईमेल पत्ता दिला जातो. तो तुम्ही फक्त त्या रजिस्ट्रेशनसाठी वापरायचा. काम झालं की बाद करायचा. Gishpuppy आणिbugmenot यांच्यात फरक इतकाच की Gishpuppy ची सेवा जगभर रितसर मान्यताप्राप्त आहेतर bugmenot ला मात्र अजून नीतीवाद्यांची रितसर मान्यता अजून मिळालेली नाही. अर्थातमान्यतेची वाट पहात बसणारं आजचं जग नाही. त्यामुळेच Gishpuppy काय किंवा bugmenot कायदोन्हीही सारखीचकिंबहुना bugmenotकाकणभर जरा जास्तच लोकप्रिय आहे

गजराचं घड्याळ ऑनलाईन आणि ऑफलाईन

http://www.kukuklok.com/ ही म्हंटलं तर एक वेबसाईट आहेपण खर्‍या अर्थाने ती फक्त एक गजराचं घड्याळ आहे. हे गजराचं घड्याळ तुमची इंटरनेट लाईन चालू असताना आणि मुख्य म्हणजे चालू नसतानाही चालतं. रात्री झोपताना तुम्ही गजर लावलात आणि मध्यरात्री कधीतरी इंटरनेट कनेक्शन बंद झालं तरीkukuklok चा गजर वेळच्या वेळी होतो. 
हे गजराचं घड्याळ वापरायला सोपं आहे. आपल्याला हवा तो वेळ सेट करायचा आणि नंतर SET ALARM वर क्लीक करायचं. हे डिजिटल घड्याळ असल्याने कोणत्याही मिनिटापर्यंत आपल्याला गजर लावता येतो. गजराचे एकूण चार आवाज कूकूक्लॉक ने दिले आहेत. पहिला आहे कोंबड्याची भली मोठी बांग. दुसराघड्याळाचा नेहमीचा कीर्रर्रर्र करून वाजणारा आवाजतिसरा इलेक्ट्रॉनिक गजराचा आवाज आणि चौथा गिटार ह्या वाद्याचा आवाज. आपल्याला हवा तो आवाज निवडून आपण गजर लावू शकतो. ह्या घड्याळाला साईटवाल्यांनी Swiss Made असं म्हंटलं आहे. ते काहे समजायला त्यांनी मार्ग ठेवलेला नाही. पण त्याने काही बिघडत नाही कारण अपनेको आम खाने से मतलब आहे. गजर बरोबर होणं महत्वाचं. 
खास टीपः ही साईट केवळ एका पानाची आहे. हे पान तुमच्या ब्राऊझरच्या File मेनूमध्ये जाऊन आणि नंतर Save as.. वर क्लीक करून html (Complete) फाईल म्हणून सेव्ह करा. हे पान सेव्ह करताना त्याबरोबर Online Alarm Clock_files नावाचं एक फोल्डर आपोआप सेव्ह होतं. त्या फोल्डरमध्ये जा. तिथे klok नावाची फ्लॅश फाईल मिळेल. ही फाईल फक्त ७८ के.बी. इतकी छोटी आहे. ही फाईल म्हणजेच ते अलार्म क्लॉक आहे. त्या फाईलवर डबलक्लीक केलं की ते गजराचं घड्याळ उघडतं. इंटरनेट असो वा नसो. गजर लावता येतोझालेला गजर थांबवता येतो. हवी ती वेळ आणि हवा तो आवाज अर्थातच निवडता येतो. फक्त ७८ के.बी. च्या एका फाईलमध्ये एवढं सगळं साठू शकलं याचं श्रेय आजच्या प्रगत फ्लॅश टेक्नॉलॉजीला. त्या फोल्डरमधल्या इतर (जावास्क्रीप्ट वगैरे) फाईल्सचा त्या घड्याळाला तसा काहीच उपयोग नाही. हव्या तर त्या डिलीट करून टाका. हे गजराचं घड्याळ कोणालाही ईमेलने पाठवता येणं शक्य आहे. प्रत्यक्ष प्रयोग करून पहा

भविष्यातील सुर्योदय, सुर्यास्त तसेच चंद्रोदयाच्या वेळा कुठे मिळतील?

पूर्वी ह्या वेळा सामान्यतः पंचांगांमध्ये पाहिल्या जायच्या. आता आपल्याला इंटरनेट सहज उपलब्ध झाले आहे व त्या मानाने पंचांग दुर्मिळ झाले आहे. यातून हा प्रश्न आला आहे. ह्या वेळा पाहण्यासाठी अनेक वेबसाईटस असल्या तरी मीwww.timeanddate.com वरील http://timeanddate.com/worldclock/sunrise.html ही लिंक नेहमी वापरतो. भारतातील अनेक महत्वाच्या शहरांतील सुर्योदयसुर्यास्तचंद्रोदय व चंद्रास्ताच्या वेळा इथे पहायला मिळतात. महाराष्ट्रातील मुंबई व पुणेह्या शहरांचे हे तपशील इथे उपलब्ध करण्यांत आले आहेत. त्यात कोणत्याही दिवशीचे सुर्योदयसुर्यास्तचंद्रोदय व चंद्रास्ताच्या वेळा आपल्याला मोफत पहायला मिळतात. आपल्याला साधे रजिस्ट्रेशन देखील करायला सांगितले जात नाही हा भाग महत्वाचा आहे. इतर साईटसवर जेथे हा तपशील मिळू शकतो तेथे हमखास आपल्याला रजिस्ट्रेशनची कटकट सहन करावीलागते.
 

पूर्वीचा ब्लॉग - sanganaktoday.blogspot.com वर आलेले अभिप्राय


आजही हा अभिप्राय खालील दुव्यावर उपलब्ध आहेः
http://marathi.webdunia.com/newsworld/currentaffairs/blogscorner/0709/28/1070928004_1.htm


अथांग 'संगणक जगत'
- अभिनय कुलकर्णी

माधव शिरवळकर हे नाव मराठी वाचकाला विशेषतः तंत्रज्ञानविषयक वाचकाला नवे नाही. गेल्या अनेक वर्षांपासून विविध वर्तमानपत्रात त्यांचे लिखाण येते आहे. लोकसत्तात गाजलेल्या संगणक जगत या सदराचे लेखक ते हेच. याशिवाय समग्र राम गणेश गडकरी हे मराठीतील पहिले ई- बुकही त्यांनी प्रकाशित केले. त्यानंतर केशवसुत, लक्ष्मीबाई टिळकांचे आत्मचरित्र स्मृतिचित्रे यासह सुमारे पन्नास मराठी, इंग्रजी ई बुक्सची निर्मिती केली आहे.
तर अशा या शिरवळकरांचा ब्लॉग म्हणजे संगणकावर काम करणार्‍यांचा मार्गदर्शक आणि जालावर भटकंती करणार्‍यांसाठीचा पथदर्शक आहे. हे मार्गदर्शक आणि पथदर्शक वगैरे जड शब्द का वापरले असा प्रश्न तुम्हाला कदाचित पडला असेल. पण या ब्लॉगला तुम्ही भेट दिली तर याचा अनुभव तुम्हालाही आल्याशिवाय रहाणार नाही. हा ब्लॉग म्हणजे संगणकाविषयीचा एनसायक्लोपिडीया किंवा आन्सर.कॉम आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
संगणकविषयक कोणताही प्रश्न तुम्हाला पडलेला असो या ब्लॉगद्वारे शिरवळकरांना तो विचारल्यास तुम्हाला त्याचे उत्तर मिळेल. Tiff, JPG, GIF यांचा लॉंगफॉर्म म्हणजे काय पासून ते Blue Ray Disk म्हणजे नेमकं काय किंवा तुमच्या संगणकात येणारा प्रॉब्लेम असो किंवा एखाद्या संगणकीय जगतातील संज्ञेविषयी तुमच्या मनात दाटलेलं कुतूहल असो,अशा कोणत्याही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला येथे मिळू शकतात. या प्रश्नांची उत्तरे देऊनच शिरवळकर थांबत नाही तर उत्तरासंदर्भात अधिक माहिती देणार्‍या संकेतस्थळांचा दुवाही ते देतात. त्यामुळे तेथे जाऊनही आपल्याला ती माहिती मिळू शकते. शिवाय आगामी काळासाठी आपल्याकडे अशा संकेतस्थळांची बॅंकही तयार होते. माहिती शेअर करण्याचा हा त्यांचा दृष्टिकोन अतिशय चांगला आहे.
शिरवळकरांच्या ब्लॉगचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते जालावरचे अस्सल भटके आहेत. त्यांच्या या भटकंतीत त्यांना अनेक माहितीपूर्ण संकेतस्थळं सापडतात. आठवड्याची सात संकेतस्थळं म्हणून ते त्याची संक्षिप्त माहिती देतात. ते शिफारस करतात त्या संकेतस्थळांचे विषयही वैविध्यपूर्ण असतात. त्यामुळे आपल्या माहितीच्या कक्षाही चांगल्याच रूंदावरतात. उदाहरणेच सांगायची झाली तर व्होडका कसा बनवावा, त्याचा इतिहास, सॅंडविच शब्द कसा आला, त्याचा इतिहासा, वृत्तपत्रांचा इतिहास दर्शविणारी साईट,मोफत छायाचित्रे डाऊनलोड करण्याची सुविधा कुठे आहे, रूग्ण व त्याच्या नातेवाईकांना विविध चाचण्यांबद्दल माहिती कुठून मिळेल अशा अक्षरशः शेकडो संकेतस्थळांविषयीची माहिती त्यांनी दिली आहे. माहितीचा हा पूर उर धपापून टाकणारा आहे.
याशिवाय कुठे काय आहे आणि कुणासाठी ते उपयुक्त आहे याची शिफारसही ते करतात. त्यामुळे आपल्या आवडीच्या विषयांसंदर्भात किंवा आपल्याशी संबंधित विषयाचे संकेतस्थळ पाहता येते. त्याचे दुवेही ते देतात. अनेक संकेतस्थळांवर मोफत सॉफ्टवेअर असतात. त्याविषयीही ते माहिती पुरवतात. किंवा एखादी फॉंट पुरविणार्‍या संकेतस्थळाचीही ते शिफारस करतात. थोडक्यात जालावर भटकंती करताना कवडीही न खर्चता मोफत अनेक बाबी मिळतात तेही या ब्लॉगवर गेल्यानंतर कळते.
शिरवळकरांच्या ब्लॉगचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते संगणकविषयक अनेक युक्त्या आणि क्लृप्त्या सांगतात. रोजचे काम करताना त्या अतिशय उपयुक्त ठरतात. उदाहरणार्थ तुम्हाला ई मेलमधून मोठी फाईल पाठवायची आहे. पण सामान्यपणे ई मेलमधून फाईल पाठविण्याची क्षमता दहा एमबी असते. पण त्यापेक्षा मोठी फाईल पाठवायची तर काय करावे लागेल?शिरवळकरांच्या ब्लॉगवर त्याचे उत्तर आहे.
असा हा माहितीच्या कक्षा रूंदावणारा ब्लॉग. जालावर भटकंती करताना या ब्लॉगवर भेट दिल्यानंतर बाहेर पडताना नक्कीच समृद्ध झाल्याचा अनुभव येतो. त्यामुळे अस्सल नेटकर या ब्लॉगला टाळून पुढे जात नाहीत. मग शिरवळकरांना भेटताय ना?
ब्लॉगचे नाव - संगणक जगत अर्थात Madhav Shirvalkar's info

ब्लॉगर- माधव शिरवळकर, मुंबई

URL - http://sanganaktoday.blogspot.com

---------------------------------------------------------
Shirvalkarji,
After visiting your blog right now i have secured my gmail account as per the guidelines you have illustrated.Thanks a lot.
Earlier i had given u a mail after reading ur article in Loksatta (11 may) regarding Marathi Font.I have already registered with www.ildc.in seeking free CD of Marathi fonts from Govt.of India.
Kindly visit my blog at drairker.blogspot.com Thanks
Deepak Gajanan Rairker
Chandrapur (9424718209)
 

-------------------------------------------------------------------------------------------------------------

मी स्वःता संगणक तंत्रज्ञ असलो तरी ह्याच्यापासुन लाखो मैल दुर होतो. जेव्हा मी तुमचे चर्चगेटच्या चर्चासत्रात भाषण ऐकले, तेव्हापासुन इंटरनेटवर मराठीसाठी माझेही योगदान असावे म्हणुन कामाला लागलो आहे. धन्यवाद

महेंद्र राजगुडे ( मो. ९९३०९९९५६३ ) 
----------------------------------------------------------------------------------------------------------

आपला दै.लोकसत्ता मधील "मराठी फॉण्ट मिळवावा" हा लेख अत्यंत माहितीपूर्ण व मराठी भाषेचा वापर ई-मेल, इंटरनेटमध्ये वाढण्यास निश्चितच पूरक ठरेल यात शंकाच नाही. या लेखामुळेच माझा पाहिला मराठीतील ई-मेल आपणास पाठविण्यात अत्यंत आनंद होत आहे.
आपला ब्लॉगही ही ज्ञानवर्धक व उपयुक्त असून आपणास पुढील कार्यासाठी शुभेच्छा!
अतुल हजारे
पैठण 
--------------------------------------------------------------------------------------------------------
काय बोलु शब्दच सापडत नाहीत..
अतीशय माहीतीपुर्ण ब्लॉग आहे तुमचा, खुप आवडला
अशीच माहीती भविष्यात मिळेल अशी अपेक्षा...

मी एक पु.ल. प्रेमी आहे.. माझा हा ब्लॉग जरा नजरेखालून घालावा ही विनंती-
http://cooldeepak.blogspot.com



-----------------------------------------------------------------------------------------------------

I am Satish Sathe, working as Prof. of Civil Engineering in Govt. College of Engineering, Pune alias COEP. I regularly read your articles in Loksatta 'Sanganak Jagat'. Your articles were informative as well as precise and interesting. Though decided I could not retain all of your articals and now really feel sorry for them. Though I know your articles appeared in 2001, Is there any possiblity of having copy of your articals from you Or have you brought them in a bok form. I realize that your articles would be certainly of immense help for my students.
I would sincerely appriciate a line of reply from you and if possible information about how I can get your all the articles published in Loksatta in 2001.
With warm and respectful regards,
Yours sincerely
Satish Sathe
Department of Civil Engineering, COEP
25507062 (D)
9423582026 (M)


------------------------------------------------------------------------------------------------------

 आपल्या sanganaktoday.blogspot.com या ब्लॉगवरील युनिकोड मराठी फॉन्टसृ बद्दलचा लेख वाचला.त्याप्रमाणे मी www.ildc.gov.com या संकेतस्थळावरुन युनिकोड मराठी फॉन्टसृ आणि Gist-OT-Typing Tool Download करुन सांगितलेल्या माहितीप्रमाणे प्रस्थापित करुन हा मेल टाईप केला आणि खूप आनंद झाला.याबद्दल आपले आभार.
 मला आपल्या ब्लॉगवरील टीप्स आणि ट्रीक्स वाचायला खूप आवडतात.माहिती अतिशय महत्तवपूर्ण आहे.मागील काही दिवसापूर्वी मी सर्व माहिती वाचून प्रिंट करुन ठेवली होती.परंतु आता मात्र मला आपला ब्लॉग वाचता येत नाही.कारण तिथे लॉग इन आय डी व पासवर्ड द्यावा लागतो.त्या ठिकाणी मी माझा गुगल आय.डी व पासवर्ड देऊन पाहिला.परंतु मला आमंत्रण नसल्याचा संदेश येतो.
 तरी मला आपला ब्लॉग वाचण्यासाठी आमंत्रित यादी मध्ये घ्यावे ही विनंती.
 याबद्दल सविस्तर इ मेल दृवारे सांगितल्यास मी आपला खूप आभारी राहीन.
माझा ई मेल आय डी swswayal195 @gmail.com असा आहे.
                                                                                                                                        वायाळ श्रीहरी साहेबराव, लातूर
                                                                                                                                      swswayal195 @gmail.com


---------------------------------------------------------------------------------------------------------------

आपले मराठी ब्लॉग वरील लिखाण वाचनात आले. आपला मराठी फाँटस वरील अभ्यास गाढा आहे. आपले मार्गदर्शन सुद्धा खूपच चांगले आहे.
हे लिखाण वाचताना आपल्या ब्लॉगला (http://www.sanganaktoday.blogspot.com हा संगणकविषयक मराठी ब्लॉग) भेट देण्याची ईछा आहे. पण त्या साठी आपली परवानगी लागते आहे. आपण ती द्याल, अशी आशा आहे.
त्या मागे माहिती मिळवणे हाच उद्देश आहे. मराठी टायपिंग शिकणे हा अजून एक उद्देश.
आपला विश्वासू , सचिन वर्तक     ( मी पुणे इथे एका इंग्रजी दैनिकात, उत्पादन विभागात नोकरी करत आहे ).
 mesava@gmail.com
---------------------------------------------------------------------------------------------------------------
आपला ब्लॉग वाचला. माहितीपूर्ण व ललित शैलीत सोप्या भाषेत संगणकावर आपण
फारच छान लिहित असतात. माहिती तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी मराठी व अन्य
भारतीय भाषेत असे लेख अत्यंत उपयोगी आहेत. आपणांस शुभेच्छा. मी
बी.एस.एन.एल. अहमदनगर येथे राजभाषा अधिकारी पदावर कार्यरत आहे. आमचे
पूर्वज संत महिपति महाराज बहुभाषिक बहुश्रुत कवि होते.
ग्रामजोशी,कुलकर्णी होते. त्यांच्या आशीर्वादाने मी भाषेचे कार्य चालवित
आहे. सद्या पुणे विद्यापीठात सूचना प्रौद्योगिकी के संदर्भ में हिंदी का
विकास एवं संप्रेक्षण विषयात संशोधन करीत आहे. प्रबंध पूर्ण होत आलेला
आहे. कृपया मला या विषयात काही संपर्क, लिंक, ब्लॉग आदि माहिती कळवणे. मी
आपला आभारी राहील.

आपला

विजय प्रभाकर कांबले

राजभाषा अधिकारी, बी.एस.एन.एल., टेलिफोन भवन, मुख्य डाक घराजवळ, अहमदनगर-४१४००१

मो- ९४२२७२६४००

http://viprakamble.blogspot.com
htttp://www.groups.google.com/group/rajbhasha




-----------------------------------------------------------------------------------------------------------

संगणकावरील मराठी आणि युनिकोड (तंत्र आणि मंत्र)


संगणकावरील मराठी आणि युनिकोड (तंत्र आणि मंत्र)

काही निवडक अभिप्राय


ःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःः

खालील अभिप्राय महाराष्ट्र सरकारच्या www.mahanews.gov.in ह्या संकेतस्थळावर खालील पत्त्यावर देखील वाचता येईल.

http://mahanews.gov.in/content/articleshow.aspx?id=H090AAtXQUNhpGou1m|ldjMHwr9pzG2kQFVhM1K1VZBgF9gJyMIEWQ==




युनिकोडचा मूलमंत्र

मंगळवार, २८ सप्टेंबर, २०१०

महाराष्ट्राच्या उज्ज्वल संस्कृतीचा मान्यवरांनी करुन दिलेला परिचय. यात रविवारी खाद्यसंस्कृती, सोमवारी पद्म पुरस्कार शुभांगी मांडे, मंगळवारी लोककला डॉ.प्रकाश खांडगे, बुधवारी वाचावी अशी पुस्तके प्रकाश अकोलकर / नंदिनी आत्मसिध्द, गुरुवारी संतपरंपरा डॉ.यू.म.पठाण, शुक्रवारी सण-उत्सव ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर आणि शनिवारी गड-किल्ले प्रमोद मांडे यांचा अनमोल ठेवा.
संगणक आजच्या जगात अपरिहार्य बनला आहे. आज संगणकावरच बरेच काम केले जाते. लेखनाच्या क्षेत्रातही त्याचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. भारतीय भाषांमधून संगणकावर लेखन करता येते आणि त्यातली सोय खूप महत्त्वाची आहे. पण संगणकासाठी वेगवेगळे फॉण्ट वापरले जात असल्याने विशिष्ट फॉण्ट संगणकावर नसल्यास मजकूर वाचता येत नाही. युनिकोडने ही उणीव भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे. पण युनिकोडबद्दल नीट माहिती उपलब्ध नसल्यामुळे त्याचा वापर मराठीच्या क्षेत्रात म्हणावा तेवढा होताना दिसत नाही. आधीपासून उपलब्ध असणाऱ्या फॉण्ट्सची सवय आणि सराव झाल्यामुळे युनिकोडकडे वळायला बरेचजण नाराज असतात. मात्र युनिकोडकडे दुर्लक्ष करणे आपल्याला परवडणारे नाही, कारण संगणकाच्या संदर्भात युनिकोड आता अपरिहार्य बनला आहे. युनिकोडमुळे आपण संगणकावर मराठीत सहजरीत्या काम करू शकतो आणि स्वतःच्या भाषेत आणि लिपीत थेट संगणकावर लिहू शकतो.
युनिकोड म्हणजे काय आणि त्याचे नेमके स्वरूप व महत्त्व काय आहे, याची माहिती अत्यंत सोप्या शब्दामध्ये सांगणारे ‘युनिकोड (तंत्र आणि मंत्र)’ हे माधव शिरवळकर यांचे पुस्तक युनिकोडची एक समग्र ओळख वाचकांसमोर घेऊन येते. नवी मुंबईतील ‘संगणक प्रकाशना’ने ते प्रसिद्ध केले आहे. संगणकासंबंधी सामान्य वाचकाला सुलभ भाषेत माहिती करून देणारे लेखन श्री. शिरवळकर वेळोवेळी करत आले आहेत. प्रस्तुत पुस्तकातही अगदी सोप्या शब्दांमध्ये त्यांनी युनिकोडची माहिती विशद केली आहे. संगणकावर मराठीतून काम करण्यासाठी, ईमेल किंवा अनेक सोशल नेटवर्किंग साईट्सवर मराठीचा वापर करून संवाद साधण्यासाठी अशा अनेक गोष्टींसाठी युनिकोड उपयुक्त आहे. म्हणूनच त्याबद्दल व्यवस्थित माहिती असणे आवश्यक बनते. यादृष्टीने सदर पुस्तक खूपच चांगले मार्गदर्शन करू शकेल.
अगदी संगणकाचा वापर नवखेपणाने करणाऱ्यालाही समजेल अशा पद्धतीने पुस्तकाची रचना लेखकाने केली आहे. युनिकोडपूर्व परिस्थिती, युनिकोडची पार्श्वभूमी, संगणक आणि इंटरनेटवर वापरल्या जाणाऱ्या अक्षरतंत्राचा तपशीलवार मागोवा अशा पद्धतीने युनिकोडपर्यंतची वाटचाल यात देण्यात आली आहे. इंग्रजीत फॉण्टचा प्रश्न उद्‍भवत नाही तीच स्थिती मराठी व इतर भारतीय भाषांमध्येही शक्य करण्यासाठी युनिकोडला पर्याय नाही, हे सांगतानाच युनिकोडमध्येही अजून सुधारणा करता येऊ शकतात हेही मांडले आहे. युनिकोडचा इतिहास व पार्श्वभूमी, अक्षरांना कोड देण्यामागची कारणमीमांसा, भारतीय भाषांसाठी युनिकोड वापराच्या संदर्भात करण्यात आलेले प्रयत्न आणि अशा प्रमाणित कोडची असलेली गरज याबद्दलचे लेखकाचे विवेचन पटण्यासारखे आहे. युनिकोडपुढे आजही चिनी-जपानी आणि कोरियन यासारख्या चित्रलिप्यांचे आव्हान खडे आहेच. पण भारतीय भाषा आणि त्यातही देवनागरी लिपी यासंदर्भातील त्रुटी भरून काढण्याचा प्रयत्न युनिकोडने केला आहे. मराठीतून लिहिताना सुरुवातीला ‘तऱ्हा’ या शब्दासाठी – हा असा डॅश वापरावा लागत होता, आता ऱ्हा नीटपणे लिहिता येतो. किंवा अॅ हे अक्षर लिहिता येत नव्हते, ते आता मराठी इंडिक इनपुटचा वापर करून लिहिता येते. अशा अनेक खास मराठी पद्धती युनिकोडमध्ये सामावून घेण्यात आल्या आहेत. मुख्य म्हणजे, युनिकोडमधील लिहिलेला मजकूर कोणत्याही संगणकावर वाचता येणे शक्य आहे आणि युनिकोडला सरकारने मान्यता दिली असल्याने त्याच्या प्रसारार्थ तो आपल्या संगणकावर मोफत बसवता येतो. पण युनिकोड मोफत उपलब्ध आहे ही गोष्ट सर्वसामान्यांपर्यंत पोचलेली नाही.
युनिकोड संगणकावर कसा उतरवायचा, एक्सपीवर उतरवण्यासाठी काय करायचे, व्हिस्टासाठी काय करायचे इ. माहिती आकृत्यांसह पुस्तकात असल्याने, युनिकोड हवा असल्यास काय तरावे याचा वस्तुपाठच हे पुस्तक देऊ करते. प्रत्येक पायरी आणि तिचे चित्र पुस्तकात दिले असल्याने, कुठेही घोटाळा न होता युनिकोड बसवणे आणि तो वापरणे या गोष्टी सोप्या होऊन जातात. त्याशिवाय, फोनेटिक कीबोर्ड, इन्स्क्रिप्ट, मंगल फॉण्ट याबद्दलची माहितीही हे पुस्तक तपशिलात देते. गूगल आणि युनिकोड, मायक्रोसॉफ्ट आणि युनिकोड अशा प्रकरणांमधून या संकेतस्थळांवर युनिकोडचा वापर कसा करावा याची माहिती आहे. तसेच, जुन्या मराठी फॉण्ट्सचे रूपांतर करण्याची सुविधा मोफत उपलब्ध करून देणाऱ्या परिवर्तन या सॉफ्टवेअरबद्दलही एक स्वतंत्र प्रकरण पुस्तकात देण्यात आले आहे. युनिकोडचा भविष्यकाळ कसा असेल याबाबतचे विवेचनही लेखकाने केले आहे. रोमनमधून इंग्रजी अक्षरांच्या माध्यमातून मराठी लिहिण्यापेक्षा थेट देवनागरीतून मराठी लिहिणे नक्कीच आनंद देऊन जाणारे आहे आणि खऱ्या अर्थाने मराठी भाषा जगवण्याचा तो एक उत्तम मार्ग आहे.
मराठी आणि युनिकोड या संदर्भात महाराष्ट्र सरकारने आजवर काहीसे दुर्लक्ष केले असेही लेखकाचे म्हणणे आहे. यापुढील सुवर्ण महोत्सवी वर्षात युनिकोड आणि मराठी यांच्या संदर्भात अधिक कृतिशील राहण्याचे सूतोवाच करण्यात आले आहे ही स्वागतार्ह गोष्ट आहे. युनिकोडमधले दोष आणि त्रुटी याबद्दलही श्री. शिरवळकर यांनी लिहिले आहे. एकदोन विरामचिन्हे सोडता इतरांसाठी ‘शिफ्ट- आल्ट’ करून इंग्रजीत शिरावे लागते ही एक मोठीच त्रुटी आहे. अशा काही उणिवा दूर करण्याचे प्रयत्न यापुढे नक्कीच होतील अशी आशा आहे. तरीही, तोवर न थांबता, आज आहे त्या स्थितीतील युनिकोडचा स्वीकार केला तरी संगणकावर काम करणे किती सोपे व सुविधाजनक आहे हे असा वापर सुरू केल्याविना कळणार नाही.
माधव शिरवळकर यांनी भाषा आणि लिपी यांच्या संदर्भातही तांत्रिक माहितीही या पुस्तकात दिली आहे. या विषयात अधिक खोलात जाऊ इच्छिणाऱ्यांनाही हे पुस्तक मार्गदर्शक ठरू शकेल. तसेच संगणकाचा वापर नव्याने करू लागलेल्यांनाही या पुस्तकाची मदत मिळू शकेल.

- नंदिनी आत्मसिध्द


----------------------------------------------------------------------


प्रस्तुत वृत्त ईसकाळ मध्ये प्रकाशित झाले. ईसकाळ च्या खालील दुव्यावरही ते वाचता येईल.

http://72.78.249.126/esakal/20100626/4988200814448362507.htm


नवे मराठी मंत्रालय 'युनिकोड'कडे लक्ष केंद्रित करणार
सकाळ वृत्तसेवा
Saturday, June 26, 2010 AT 11:45 PM (IST)
मुंबई - महाराष्ट्र जागतिक 'युनिकोड कन्सोर्शियम'चे सदस्यत्व घेण्याविषयी आवश्‍यक ती पावले उचलील, असे आश्‍वासन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या अमेरिकाभेटीत मराठी संगणक व्यावसायिकांना दिले. मागील आठवड्यात मुख्यमंत्री अमेरिका दौऱ्यावर असताना लॉस एंजेलिस येथे अमेरिकेतील मराठी भाषकसंगणक व्यावसायिक व अभियंत्यांची त्यांनी भेट घेतली होती.
या भेटीत मराठी भाषेच्या संगणकीय विकासासाठी अमेरिकेतील मराठी संगणक व्यावसायिकांचे योगदान सदैव महाराष्ट्राला मिळत राहील, असे संगणकतज्ज्ञ वैभव पुराणिक आणि आशिष महाबळ यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. मुख्यमंत्र्यांनी तेथील मराठी संगणक व्यावसायिकांचे सर्व मुद्दे लक्षपूर्वक ऐकले. या वेळी माधव शिरवळकर यांचे "संगणकीय मराठी व युनिकोड तंत्र आणि मंत्र' हे पुस्तक अमेरिकन मराठी मंडळींच्या वतीने मुख्यमंत्र्यांना भेट देण्यात आले.

-------------------------------------------------------------

प्रस्तुत अभिप्राय खालील दुव्यावर देखील वाचता येईलः



युनिकोड : नवी लेखननीती

     या आधी एक पोस्ट लिहिली होती ज्यात 'वर्ड' आणि 'युनिकोड' एकमेकांना अनुकूल असल्याचा उल्लेख होता.
     संगणकावर मराठी लिहिण्यासाठी युनिकोड ही एक नवी पध्दत आहे. 'नवी' हा शब्द तसा चुकीचा आहे. पध्दत अस्तित्वात होतीच पण अनेकांना माहीत नव्हती. हळूहळू युनिकोडबद्दल लोकांमध्ये जागृती होत आहे कारण शासनस्तरावर या प्रणालीचा विचार झालेला आहे. तथापि, अजूनही अनेकजण 'फोनेटिक' प्रकारचा कीबोर्ड वापरुनच मराठी टायपिंगची झटापट करत असतात. 'युनिकोड' साठी निराळ्या प्रकारचा कीबोर्ड आवश्यक असतो. एकदा तो पाठ झाला की, काम फत्ते होते.  
     'युनिकोड' या विषयावर सर्वांगीण माहिती असेलेले एकही पुस्तक बाजारात नव्हते. ही कमतरता माधव शिरवळकर यांच्या पुस्तकांने पूर्ण केलेली आहे. पुस्तकाचे नावच 'युनिकोड-तंत्र आणि मंत्र ' आहे. 
     ज्यांना युनिकोड नावाची नवी लेखननीती समजून घ्यायची आहे अशांसाठी आणि जे आधीपासूनच संगणकावरील मराठी लेखनाचे शिलेदार आहेत त्यांच्यासाठीही हे पुस्तक खास आहे. 'मौलिक' हा शब्दही थिटा आहे. युनिकोडचा इतिहास आणि त्याचा सध्या विविध ठिकाणी होत असलेला वापर विस्तृतपणे विशद केलेला आहे. नमुन्यादाखल अनुक्रमणिकेतील काही प्रकरणांचा उल्लेख जरी केला तरी संगणकातील किड्यांचे डोळ चमकतील - भारतीय भाषा आणि युनिकोड, विंडोज आणि युनिकोड, गूगल आणि युनिकोड...!
    नवी मुंबईतील संगणक प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
    मराठी फॉंटच्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा मार्ग हे पुस्तक निःसंशयपणे दाखवू शकते.

-----------------------------------------------------------