क्रेग सिल्व्हरस्टीन.. गुगलमध्ये त्याचं पद फार मोठं होतं. 'डायरेक्टर, टेक्नॉलॉजी'. 1998 ते फेब्रुवारी 2012 हा सुमारे 14 वर्षांचा प्रदीर्घ काळ त्याने गुगलमध्ये काढला. ताजी बातमी म्हणजे 10 फेब्रुवारी 2012 पासून त्याने गुगल कंपनी सोडली. राजीनामा देऊन तो बाहेर पडला...
हॅटस ऑफ टू क्रेग सिल्व्हरस्टीन !
क्रेग सिल्व्हरस्टीनला ‘संगणक डॉट इन्फो’चा सलाम!!
तुम्हाला आठवला का हा क्रेग सिल्व्हरस्टीन कोण ते? अहो तोच, स्टॅनफोर्डमध्ये गुगलच्या लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन यांच्याबरोबर जो पीएच.डी. करत होता, आणि नंतर ज्याने पीएच.डी. सोडून दिली तोच क्रेग सिल्व्हरस्टीन. आपले दोस्त सर्जी लॅरी यांनी गॅरेजमध्ये सुरू केलेल्या गुगल कंपनीला मदत करण्यासाठी एम्प्लॉयी नंबर एक म्हणून कमी पगारावर दाखल झालेला तोच क्रेग सिल्व्हरस्टीन. पगाराऐवजी त्यावेळी म्हणजे 1998 साली कंगाल अवस्थेतल्या गुगल कंपनीचे शेअर्स चालतील म्हणून सांगणारा तोच हा क्रेग सिल्व्हरस्टीन. गुगलमध्ये त्याचं पद फार मोठं होतं. डायरेक्टर, टेक्नॉलॉजी. 1998 ते फेब्रुवारी 2012 हा सुमारे 14 वर्षांचा प्रदीर्घ काळ त्याने गुगलमध्ये काढला. त्यातली 1998 ते 2004 ही गुगलची महत्त्वाची वर्षे त्याने डायरेक्टर, टेक्नॉलॉजी हे पद भुषवलं.
ताजी बातमी म्हणजे 10 फेब्रुवारी 2012 पासून त्याने गुगल कंपनी सोडली. राजीनामा देऊन तो बाहेर पडला.
ही ताजी बातमी ऐकल्यावर कोणीही पुढले प्रश्न विचारणारच – पहिला प्रश्न, त्याने का राजीनामा दिला? त्याचं काही कुणाशी वाजलं का? आपल्याला कमी पैसा मिळतोय असं वाटून त्याने कंपनी सोडली का? तो गुगल सोडून कुठे चाललाय? त्याला दुसरं कोणी आणखी आकर्षक पगार वगैरे देऊन बोलावलं किंवा फोडलं का? आपल्या अनंत शंका कुशंका असतात.
पण मंडळी, दोन पाच लाख जास्त मिळताहेत म्हणून दुसऱ्या नोकरीत जाणं यात मोठं काय आहे? किंवा, डायरेक्टर, टेक्नॉलॉजी पेक्षा मोठं पद मिळालं म्हणून सोडली तर त्यातही ‘हॅटस ऑफ’ म्हणावं असं काय आहे? हे तर जिकडे तिकडे घडतच असतं.
क्रेग सिल्व्हरस्टीनला ‘हॅटस ऑफ’ केलं याला कारण तसच आहे. क्रेगने 32,000 माणसं काम करत असलेल्या गुगलमधून राजीनामा दिला आणि तो गेला एका 35 माणसांच्या कंपनीत. त्याचं पदही साधंच. साधा प्रोग्रामर. होय, गुगलचा डायरेक्टर, टेक्नॉलॉजी असलेल्या क्रेगने साधा प्रोग्रामर म्हणून नोकरी पत्करली आहे. कुठे???
सलमान खानच्या खान अॅकेडमीमध्ये !!
तिथे गुगलच्या एक टक्का तरी पगार मिळाला असेल का त्याला? बहुधा नाही. गुगलमध्ये ज्या सोयी सुविधा होत्या त्यातल्या पाव टक्का तरी खान अॅकेडमीमध्ये असतील का? अजिबात नाही, शक्यच नाही. खान अकेडमी ही एक स्टार्ट अप कंपनी आहे. 1998 मध्ये गुगल होती तशी. काही जण म्हणतात की उलट क्रेग सिल्व्हरस्टीननेच काही (म्हणजे मोठीच) देणगी खान अॅकेडमीला दिली असेल. क्रेग सिल्व्हरस्टीन आपली संपत्ती किती ते सांगत नाही. पण तज्ज्ञांच्या मते ती 800 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 4000 कोटी रूपये) इतकी तरी निश्चितच आहे. आता इतका पैसा असलेला चाळीशीतला माणूस कशाला मरायला एका नव्या स्टार्ट अप कंपनीत जाईल. तिथून त्याला किती पगार मिळणार?
खान अॅकेडमीचा सलमान खान आपल्या मुलाबरोबर |
मंडळी, आपण जसजसा हा विचार करत पुढे पुढे जातो ना तस तसा आपल्याला क्रेग सिल्व्हरस्टीनला सलाम करावासा वाटत जातो. त्याला सॅल्युट करून आपल्याला एक वेगळच अनामिक समाधान मिळतं. खान अॅकेडमी कसली कंपनी आहे? जगातल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत ट्युटोरियल्स देणारी (विकणारी नव्हे) ती कंपनी. खरं तर एक सामाजिक संस्थाच म्हणायला हवी. क्रेग तिकडे गेला. तिथे त्याने डायरेक्टर वगैरे पद मागितलं असतं तर बहुधा त्याला सलमान खान नाही अजिबातच म्हणाला नसता. पण तिथे तो साध्या प्रोग्रामरच्या पदावर गेला. म्हणजे तिकडे जाऊन तो प्रोग्रामिंगचे काबाडकष्ट करायला गेला. क्रेगमध्ये ही जी सामाजिक भावना आहे त्याला ‘संगणक डॉट इन्फो’ ने कुर्निसात केला. वाचकहो, तुम्हालाही त्याला ‘हॅटस ऑफ’ करावसं वाटल्याशिवाय राहणार नाही.
बाय द वे, नुकतच क्रेग सिल्व्हरस्टीनचं लग्नही ठरलं आहे. गुगलमधली नोकरी सोडल्यावर त्याला मुलगी देणारा हा कोण मूर्ख बाप? असा मराठी मध्यमवर्गीय विचार मनात आला असेल तर काढून टाका. क्रेगने म्हणे तिला (तिचं नाव मेरी) फ्रान्समध्ये आयफेल टॉवरवर प्रपोज केलं. आपण त्याचं अभिनंदन करू. लग्न ठरल्याबद्दलही, आणि खान अकेडमीमध्ये नवा जॉब घेतल्याबद्दलही.
[काही वाचकांना, कदाचित, ‘खान अॅकेडमी’ हे काय प्रकरण आहे हे माहीत नसेल. त्यांनी असाही एक सलमान खान (भाग 1) आणि (भाग 2) आणि (भाग 3) ह्या दुव्यांवर जाऊन सविस्तर माहिती जरूर जरूर घ्यावी. हे भागही 1,2,3 असे क्रमानेच वाचावेत. ते वाचल्यानंतर क्रेग सिल्व्हरस्टीनच्या मनाचा मोठेपणा किंवा त्याग समजणं शक्य होईल.]
‘खान अॅकेडमी’ हि कथा तरून मुलांना खुप काही शिकवणारी आहे, या ब्लॉग ला joint असणारयानीं प्रथम ति कथा वाचावी......... सरांमुळे मला "Khan Academy" माहीत पडली...... कळल्याबरोबर लगेच मी www.khanacademy.org ला भेट दिली तिथे असलेले Free Educational Video Tutorial पाहून मी चाटच पडलो !!....."Statistics" चा "Advance Probability" हा "Chapter" मला "college" आणि "Class" मध्ये शिकवुन सुध्दा कळाला नव्हता....मला वाटल आपल डोक "Probability" शी जुळवुन घेत नसाव....पण सरांकडुन खान अॅकेडमी च कळल्यावर तिथले video मी Download केले आणि त्या video मुळे मला खुप फायदा झाला........... Hats of Salman Khan....
उत्तर द्याहटवामाझी मुलगी दहावीत होती. मला या साईटविषयी आधी कळले असते तर खूप उपयोगी पडले असते. तरी पुढील वर्षी मी तिचा अभ्यास यावरूनच करून घेईन.
उत्तर द्याहटवाThanks for information, Sir.
khan Academy विषयी वाचून मी ती साईट पाहिली. फारच उपयोगी आहे.
उत्तर द्याहटवाsir apale next google var posting kadhi honar ahet plz reply
उत्तर द्याहटवाFirst of all Hats Off to creg silverstin.
उत्तर द्याहटवाAnd thanks to you for giving such a useful link.
sir hi mahiti khupach anamol ahe..
उत्तर द्याहटवाHats off to craig silverstin and Have a deep love and proud for salman khan
nice concept and work done by Mr. Khan which shares knowledge with other peoples , great thank to Mr. s.Khan and sanganak.info
उत्तर द्याहटवा