जामिन मिळाल्यानंतरची मुद्रा.. |
वाचकहो, गेल्या बुधवारी म्हणजे 22 फेब्रुवारी 2012 रोजी न्युझीलंड न्यायालयाने त्याला जामिन दिला. कीम डॉटकॉम आता पुन्हा आपल्या हवेलीत पोहोचला आहे. जामिन देताना कोर्टाने दोन अटी कीम डॉटकॉमला घातल्या आहेत. एक, त्याने त्याचं विमान वापरायचं नाही. दुसरी, त्याने इंटरनेट वापरायचं नाही. “ज्याने आपलं आडनाव बदलून ‘डॉटकॉम’ असं घेतलं त्याने इंटरनेट वापरायचं नाही” असा विनोद नियतीने केला आहे.
कीम डॉटकॉम ह्या हॅकरची कथा गेले चार आठवडे आपण इथे संगणक डॉट इन्फोवर वाचतो आहोत. त्याला 21 जानेवारी 2012 रोजी अटक झाली, आणि महिनाभरात दोन वेळा न्युझीलंडच्या न्यायालयाने त्याला जामिन नाकारला. पण वाचकहो, गेल्या बुधवारी म्हणजे 22 फेब्रुवारी 2012 रोजी न्युझीलंड न्यायालयाने त्याला जामिन दिला. कीम डॉटकॉम आता पुन्हा आपल्या हवेलीत पोहोचला आहे. जामिन देताना कोर्टाने दोन अटी कीम डॉटकॉमला घातल्या आहेत. एक, त्याने त्याचं विमान वापरायचं नाही. दुसरी, त्याने इंटरनेट वापरायचं नाही. “ज्याने आपलं आडनाव बदलून ‘डॉटकॉम’ असं घेतलं त्याने इंटरनेट वापरायचं नाही” असा विनोद नियतीने केला आहे.
डॉटकॉमला अटक करण्याचा खरा इरादा होता तो अमेरिकन गुन्हे अन्वेषण विभागाचा म्हणजे ‘एफबीआय’ चा. त्यांना कोणत्या गुन्ह्यांसाठी कीम हवा आहे? ह्या प्रश्नाच्या उत्तराशी थेट संबंधित आहे ती कीम डॉटकॉमची megaupload.com ही वेबसाईट. ही वेबसाईट आता एफबीआय ने बंद केली आहे. एफबीआयचा तसा फतवाच आज त्या संकेतस्थळावर आपण आज गेलो तर वाचायला मिळतो. जगभरच्या लोकांना त्यांची सॉफ्टवेअर, गाणी, किंवा सिनेमे वगैरे मोफत अपलोड करून तेथे साठविण्याची सोय megaupload.com देत असे. जगातले करोडो लोक ह्या मोफत सेवेचा लाभ घेत असत. मोफत सेवा देऊन कीम पैसा कसा मिळवित असे असा प्रश्न मनात येणं स्वाभाविक आहे. पण त्याचं उत्तरही सोपं आहे. ह्या वेबसाईटवरची मोफत सोय वापरायची तर काही मर्यादा असत. उदाहरणार्थ डाऊनलोड वा अपलोड करण्यासाठी काही मिनिटे थांबावं लागे. डाऊनलोडचा वेगही कमी असे. पण विशिष्ट रक्कम भरून प्रिमियम मेंबरशीप घेतली की वेगही वाढे आणि मर्यादाही दूर होत. त्यामुळे पैसे भरणारेही जगात लाखोंच्या संख्येने असत. तो पैसा अर्थातच कीम डॉटकॉमच्या तिजोरीत जमा होई. megaupload.com वर लोक चोरीची सॉफ्टवेअर, गाणी, चित्रपट, पुस्तके वगैरे अपलोड करतात आणि तिथून ती जगभर पसरतात याला कीम डॉटकॉम जबाबदार आहे असा मुख्य आरोप अमेरिकेने त्याच्यावर ठेवला आहे. यामुळे 500 दशलक्ष डॉलर्सचे म्हणजे सुमारे 2500 कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे असा त्यांचा दावा आहे. -----------------------------------------------------------
न्युझीलंडच्या किनाऱ्यावर 25 कोटीचे फटाके उडवून
कीम डॉटकॉमने नव्या वर्षाचे स्वागत केले
त्याचा हा यु ट्युब व्हिडिओ.
कीम डॉटकॉमने नव्या वर्षाचे स्वागत केले
त्याचा हा यु ट्युब व्हिडिओ.
its always interesting to read hackers story. As same you written in your book about Kevin Mitnick.
उत्तर द्याहटवाReally nice !
केविन मिटनीक ह्या हॅकरबद्दल मी ऐकून आहे. त्याची कथा संगणक डॉट इन्फो वर देता येईल का? माझ्यासारखेच त्या बद्दल curiosity असणारे बरेच आहेत.
उत्तर द्याहटवाकेविन मिटनीक हा हॅकींगच्या इतिहासातला सर्वांत मोठा म्हणता येईल असा हॅकर. तो अनेक वर्षे फरारी होता आणि एफबीआय त्याचा शोध घेत होती. तो एफबीआयला सापडला नसता, पण शीमोमुरा नावाच्या संगणक तज्ज्ञाच्या वाटेला तो गेला आणि मग शीमोमुराने त्याची खोड मोडायचं ठरवलं. शीमोमुरा आणि एफबीआय एकत्र आले आणि केविन मिटनीकचा ठावठिकाणा त्यांनी तंत्रज्ञानाचा उपयोग करूनच शोधला. ती कथा जबरदस्त आहे. माझ्या संगणक जगत ह्या पुस्तकात ती आहे.
उत्तर द्याहटवासर,
उत्तर द्याहटवाखुपच छान साइट आहे, माझ्यासारख्या मराठी संगणकवेड्यासाठी फारच सोईचे साइट आहे. संगणकाविषयीची कित्येक मनोरंजनात्मक माहिती या एकाच साइटवरुन मिऴतो.
धन्यवाद सर.....
अभिप्रायाबद्दल आभारी आहे.
उत्तर द्याहटवाThanks sir, very good article and I have ur book Sanganak jagat. Everything is awesome.
उत्तर द्याहटवाअतिउत्तम साईट आहे सर्वांना फायदाच होईल एकदा अवश्य भेट दयावी
उत्तर द्याहटवाफारच छान मराठी माणसासाठी उत्तम
उत्तर द्याहटवाMadhav Sir Namaskar
उत्तर द्याहटवाTumcha Dnyanala Maza Salam
RAUT PRAMOD