११ मार्च, २०११

तुमच्या मॉनिटरचा डिस्प्ले किती DPI चा?

सतत आपल्या डोळ्यासमोर असतो तो मॉनिटर. त्या मॉनिटरवर जे काही दिसतं ते DPI ह्या मापानुसार दिसतं. DPI म्हणजे Dots per inch हे संगणक क्षेत्रात रमलेल्यांना एव्हाना माहीत आहेच. तर, आपल्या मॉनिटरच्या प्रत्येक चौरस इंचात किती dots आहेत हे तुम्हाला माहीत आहे का? जर माहित नसेल, तर ते मोजण्याची सोय ऑनलाईन उपलब्ध आहे.
त्यासाठी http://auctionrepair.com/pixels.html ह्या साईटवर जा. त्या पानावर थोडे खाली या. पहा पुढील आकृती दिसेल. 
ह्या साईटवरील ती लाल पट्टी लांबीला किती आहे हे तुमच्या पट्टीने वा टेपने मोजा. जी लांबी असेल, म्हणजे उदाहरणार्थ 3.5 इंच असेल तर तुमचा मॉनिटर 85 DPI सेटींगवर आत्ता आहे. जर लांबी फक्त 3 इंच असेल तर DPI 100 चा म्हणजे अधिक चांगला आहे. पण जर लांबी जास्त म्हणजे 5 इंच असेल तर DPI 60 चा फक्त म्हणजे कमी आहे. थोडक्यात, लाल पट्टीची लांबी जेवढी जास्त तेवढा मॉनिटर कमी DPI चा. 
कमी DPI सेटींगचे मॉनिटर तुलनेने अस्पष्ट चित्र दाखवतात. त्यामुळे फोटो वगैरे शार्प दिसत नाहीत. गेम्स खेळतानाही हा फरक जाणवतो. 
तुमच्या मॉनिटरचे DPI सेटींग मोजण्याची ही युक्ती तुमच्या मित्रमंडळींना आवर्जुन सांगा. आवश्यक तर तुमच्या मॉनिटरचे DPI सेटींग वाढवता येईल का याचीही चाचपणी करा. 
अरे हो, लांबी मोजायला तुम्ही घरात वा ऑफिसात पट्टी किंवा टेप शोधत असाल. मिळाली तर उत्तम. पण जागेवर नाही सापडली तर ऑनलाईन पट्टी तुमच्याक़डे असेल तर ती वापरा. ऑनलाईन पट्टी तुमच्या संगणकावर लावलेली नसेल तर पुढल्या पोस्टमध्ये त्याचीही युक्ती दिली आहे. ती वाचून ती पट्टीही मिळवा. हे सगळंच मोफत आहे. त्यामुळे कसंलच टेंशन नाही. हवं ते फक्त नीट अटेंशन. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा