अनेकांना आवडणारा हा मोफत प्रोग्राम आहे. त्याचं नाव PicPick. आपल्याकडे तो नसेल तर आपणही तो जरूर डाऊनलोड करून वापरून पहा.
PicPick ह्या दुव्यावर डाऊनलोडींगसाठी उपलब्ध आहे.
PicPick हा मुख्यत्वे स्क्रीन कॅप्चर प्रोग्राम आहे. पण स्क्रीन कॅप्चरच्या सोयीबरोबर त्यात इतरही अवजारे आहेत. त्यातलं एक अवजार म्हणजे
फूटपट्टी किंवा रूलर. PICPICK चा खालील मेनू पहाः
बाणाने त्यातली काही अवजारे दाखवली आहेत. पट्टी ही तिथे पिक्झेल रूलर म्हणून दाखवली असली तरी तुम्ही ती सेंटीमीटर वा इंच मोजण्यासाठी वापरू शकता. त्यासाठी पिक्झेल रूलर टूल उघडा. तुम्हाला त्यातून पट्टी बाहेर आलेली दिसेल. त्यावर राईट क्लीक करा, व त्यातील UNITS वर खाली बाणाने दाखविल्याप्रमाणे क्लीक करा.
पहा तुमची पट्टी इंच, पिक्झेल वा सेंटीमीटर अशा कोणत्याही मापाने तुमच्या मॉनिटरवरील कोणताही भाग मापू शकते. आता ह्या पट्टीचा वापर करून तुम्हाला मॉनिटरचे DPI सेटींग मोजता येईल.
PICPICK तुम्ही SCREEN CAPTURE म्हणूनही वापरलात तरी अतिशय उपयुक्त आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा