६ मे, २०११

अशीही एक WTO - World Toilet Organisation

हा WTO चा ऑफिशियल मोनोग्राम आहे.

स्वतःचा उल्लेख WTO असा करणारी ही वर्ल्ड टॉयलेट ऑर्गनायझेशन आहे सिंगापूरमध्ये. ना नफा तत्त्वावर चालणारी ही संस्था 2001 मध्ये स्थापन झाली, तेव्हा तिचे सदस्य होते फक्त 15. आज 2011 मध्ये जगभरच्या 58 देशांत मिळून त्यांचे 235 सदस्य आहेत..ह्या WTO चे कार्यही लक्षणीय आहे. 19 नोव्हेंबर हा दिवस ते जागतिक टॉयलेट दिवस म्हणून साजरा करतात. (भन्नाट माहिती..)


ज्ञान आणि विधायक कार्य यांच्या सीमा न संपणाऱ्या असतात. आता ह्या World Toilet Organisation चच उदाहरण घ्या. त्यांचं संकेतस्थळ आहे www.worldtoilet.org. मला माहित आहे की कितीही घाईत असलात तरी तुम्ही निदान एक कटाक्ष तरी त्यावर टाकणारच. आपल्याकडे विशेषतः महानगरपालिका वा तत्सम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका असल्या की उमेदवार हमखास गरिबांच्या वस्तीत शौचालये बांधण्याचं आश्वासन देत असतो.
स्वतःचा उल्लेख WTO असा करणारी ही वर्ल्ड टॉयलेट ऑर्गनायझेशन आहे सिंगापूरमध्ये. ना नफा तत्त्वावर चालणारी ही संस्था 2001 मध्ये स्थापन झाली, तेव्हा तिचे सदस्य होते फक्त 15. आज 2011 मध्ये जगभरच्या 58 देशांत मिळून त्यांचे 235 सदस्य आहेत.
ह्या WTO चे कार्यही लक्षणीय आहे. 19 नोव्हेंबर हा दिवस ते जागतिक टॉयलेट दिवस म्हणून साजरा करतात. 2005 मध्ये त्यांनी जगातलं पहिलं वर्ल्ड टॉयलेट कॉलेज काढलं. त्यात टॉयलेटच्या डिझाईनपासून ते स्वच्छता व्यवस्थापनापर्यंत अनेक विषय शिकविले जातात.
जॅक सिम ह्या 24 वर्षीय तरूणाने सिंगापूरमध्ये 2001 मध्ये  WTO ची स्थापना केली. 1998 मध्ये त्याने सिंगापूर रेस्टरूम असोसिएशनची स्थापना केली होती. 2006 मध्ये जर्मनीने त्याला तशा प्रकारची संस्था स्थापन करण्याकरिता बर्लिन येथे निमंत्रित केले. अमेरिकन रेस्टरूम असोसिएशनचाही तो संस्थापक सदस्य आहे. आजपर्यंत भारत, इंडोनेशिया, कंबोडिया, बांगला देश वगैरे देशांतील टॉयलेटससाठी WTO ने मदत केली आहे, किंवा मिळवून दिली आहे. 2008 मध्ये  टाईम मॅगझीनने त्याला हिरोज ऑफ दि एनव्हायरोनमेंट असा किताब देऊन जॅक सिमचा गौरव केला. आता 2011 मध्ये WTO ने स्वतःचं नियतकालिक सुरू केलं आहे. त्याचं नाव आहे The Toilet Paper. फेसबुक आणि ट्विटरवरही WTO आहे. त्यांचे 1600 हून अधिक सदस्यही आहेत. 2008 मध्ये नॅशनल जॉग्राफिक चॅनेलने WTO वर चक्क एक तासाची फिल्म दाखवली.
भारतानेही WTO ला चांगला प्रतिसाद दिला. 2007 मध्ये नवी दिल्लीत WTO चे वर्ल्ड टॉयलेट समिट आयोजिण्यांत आले होते. त्याला भारत सरकारने मदत आणि मान्यता दोन्ही दिली. आपले त्या वेळचे राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनी त्याचे उदघाटनही केले होते.
WTO चे संकेतस्थळही पाहण्यासारखे आहे. टॉयलेट विषयक सविस्तर माहिती व लिंक्स तिथे दिल्या आहेत. टॉयलेट ह्या विषयावरील एकूण 17 प्रकाशने (PDF FILES) तिथे डाऊनलोडींगसाठी उपलब्ध करण्यांत आली आहेत. असो.
आपण टॉयलेट हा विषय किती क्षुल्लक समजतो! पण जगात काय चाललय याचा आपल्याला पत्ताच नसतो. म्हणतात नं, 'केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे'. टॉयलेटचा विषयही त्याला अपवाद नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा