आभारः माझा वर्गमित्र प्रविण कुलकर्णी अशा गंमतीदार लिंक्स वर्षभर पाठवत असतो. त्यातलीच ही एक लिंक. |
इंटरनेटवर काही गंमतीचे क्षण शोधता येतात.
आता उदाहरणार्थ मला एक वेब पेज माहीत आहे. हे पान तुमच्या स्क्रीनवर अवतरू लागलं की तुम्हाला जे दृश्य दिसतं त्याने तुमच्या गालावरची खळी हलते. तुमचा शीणलेला मेंदू मनापासून हंसू लागतो. हे कसं घडतं? कोणताही विनोद नाही. शब्द नाहीत. कोणाचाही चेहेरा नाही. कसलही कार्टून नाही. तरी पण तुम्ही हंसता, गंमत वाटते म्हणून सुखावता.
असं काय घडतं?
ते पान अवतरताच तुमच्या स्क्रीनवर सर्वात वरच्या डावीकडील कोपऱ्यातून शे दीडशे माणसं धावत येतात. ह्या माणसांना चेहेरे नाहीत. नुसत्या सावलीवजा चिमुकल्या नग्न आकृत्या. जिवंत माणसांच्या. ही माणसं तुमच्या स्क्रीनवर धावत येऊन काय करतात?
भरपूर प्रशिक्षण घेतल्याप्रमाणे ते आपापल्या जागी जाऊन गोल करतात. काही जण त्या गोलात थांबतात आणि घड्याळाचे काटे होतात. काही जण मिळून तास काटा बनवतात. काही मिनिट आणि काही सेकंद काटा असल्याने धावत राहतात. हो आणि ते असं बनलेलं माणसांचं घड्याळ वेळ मात्र बरोबर दाखवतं.
तुम्ही त्या घड्याळाकडे पहात राहिलात तर सेकंद काटा तुमच्यासमोर फिरत राहतो. एक मिनिट संपून साठ सेकंदांची पळापळीची राऊंड संपली की आतली माणसं गॅसचे रंगबिरंगी फुगे सोडून एक मिनिट गेल्याचा आनंद सुद्धा व्यक्त करतात.
असं हे घड्याळ काही क्षण पाहिलं आणि एक दोनदा ते रंगीत फुगे सुटून आभाळात निघून गेले की आपण सुखावतो, आणि आपल्या पुढल्या कामाला लागतो.
बघा प्रयोग करून.. ते वेब पेज, आय मीन ती लिंक हवीय ना, ही घ्याः
http://lovedbdb.com/nudemenClock/index2.html
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा