तुमच्या ज्या मित्रमंडळींना ही क्लुप्ती माहीत नाही त्यांना sanganak.info वर जाऊन त्याची माहिती घ्यायला सांगा. किंवा तुमच्या फेसबुक पानावर ह्या पोस्टची लिंक तुमच्या मित्र परिवारासाठी अवश्य द्या.
कल्पवृक्ष म्हणजे असं झाड की ज्याच्या खाली जावं आणि मनात येईल ते मागावं.
मागता क्षणी ते तुमच्या समोर हजर होतं. कल्पवृक्षाचं हे वैशिष्ट्य गुगल च्या
वैशिष्ट्याशी खूपच मिळतं जुळतं आहे. फक्त गुगल तुम्हाला ज्या विषयी माहिती हवी
त्या माहितीचे स्त्रोत मागता क्षणी समोर हजर करतो. त्यामुळे गुगल हा माहितीचा
कल्पवृक्षच. अशा त्या कल्पवृक्ष गुगलची कथा, त्या कथेचे टप्पे, त्यातील पात्रे,
घटना, चढ-उतार याची माहिती कुठे आहे हे गुगलला विचारलं तर? म्हणजे समजा Google story हे दोन शब्द इंग्रजीत
गुगल केले तर? 0.46 सेकंदात (म्हणजे
अर्ध्याहून कमी सेकंदात) 973,000,000 (म्हणजे सुमारे एक अब्ज) माहितीचे स्त्रोत
तुमच्या समोर हजर होतात. पण हे झालं इंग्रजीचं. मराठीचं काय?
मराठी शब्दांचा सर्च गुगलवर करण्यासंबंधी एक गंमतीचा प्रयोग मुद्दाम करून
पहा. नेहमीच्या इंग्रजी गुगल पानावर गुगल कथा हे दोन शब्द देवनागरीत (युनिकोड) टाईप करून पहा. दिनांक 10 नोव्हेंबर 2012 रोजी खाली दाखविल्याप्रमाणे 0.27
सेकंदात 37,600 सर्च रिझल्टस गुगल ने दिले.
आता खाली दाखविल्याप्रमाणे गुगल मराठी निवडा.
गुगलच्या मराठी पानावर पुन्हा देवनागरीत गुगल कथा हे दोन शब्द टाईप
करा आणि शोधा. काय दिसतं?
खालील चित्रात पहाः
मराठी पानावर 0.26
सेकंदात 38,500 रिझल्टस गुगलने दिले.
आता नीट लक्षात घ्या. इंगजी पानावर आपण जेव्हा गुगल कथा ह्या दोन
देवनागरी शब्दांचा सर्च केला तेव्हा 37,600 रिझल्टस मिळाले. तेच गुगल कथा हे
शब्द आपण गुगलच्या मराठी पानावर शोधले तर 38,500 रिझल्टस मिळाले. म्हणजे एकूण
मुळातच 900 रिझल्टस मराठी पानावर जास्त मिळाले. पण हा फरक तेवढ्यावरच थांबत नाही.
इंग्रजी पानावर आपण जेव्हा देवनागरी शब्द शोधतो तेव्हा त्यांच्या सर्च
रिझल्टसमध्ये हिंदी आणि मराठी ह्या दोन्ही भाषा समाविष्ट होतात. त्यातही तुलनेने
त्यात हिंदी रिझल्टस अग्रक्रमाने आलेले आढळतात. म्हणजे 900 रिझल्टस मुळातच कमी,
त्यात पुन्हा हिंदी रिझल्टस अग्रक्रमाने अशी स्थिती दिसते. पण जेव्हा मराठी गुगल
पानावर आपण शोध घेतो तेव्हा आपल्याला शुद्ध मराठी रिझल्टस मिळतात, तेही जास्त. (आपल्या गुगल कथा च्या उदाहरणात 900 रिझल्टस जास्त मिळाले).
तात्पर्य आपल्याला मराठी शब्द शोधायचे असतील तर महत्त्वाची टीप ही की गुगल
मराठीवर जा. तिथे जाऊन मराठी शोधा. काकणभर सर्च लाभ जास्त पदरात पडेल. तुमच्या
ज्या मित्रमंडळींना ही क्लुप्ती माहीत नाही त्यांना sanganak.info वर जाऊन त्याची माहिती
घ्यायला सांगा. किंवा तुमच्या फेसबुक पानावर ह्या पोस्टची लिंक तुमच्या मित्र
परिवारासाठी अवश्य द्या.
आडीयाची कल्पना आहे
उत्तर द्याहटवाWellcome back सर,244 दिवसानंतर तुम्ही परत आलात याचा मला खुप आनंद होतोय. मी कल्पवृक्ष 'गुगल' ची कथा नियमीत तुमच्या बॉग वर वाचत होतो.पण अचानक तुम्ही ही कथा थांबवली,त्यामुळे मी खुप बेचेन झालो. मला गूगल कथा वाचायचीच होती त्यामुळे मी "गूगलःयांनी जग बदलल" हे अतुल कहाते लिखित पुस्तक घरी आणल. पुस्तक तस चांगल आहे पण त्यात गुगलचा प्रवास सविस्तर दिला नाही आणि त्यात तुमच्या प्रकारच्या लेखनाची रोमांचकता नाही.........म्हणूनच सर please गूगलची कथा तुमच्या वेबसाईट वर परत एकदा सुरू करा. आशा आहे माझी विनंती तुम्ही विचारात घ्याल आणि तुम्हाला "दिवाळीच्या हार्दीक शुभेच्च्या."
उत्तर द्याहटवासर नमस्कार, गुगल मराठी सर्च: एक नवी क्लुप्ती हा लेख वाचला, परंतु ८ मार्च २०१२ ते १० नोव्हेंबर २०१२ या प्रदिर्घ कालावधी नंतर आपला लेख वाचायला मिळाला याचा आनंद होतोय. मी कल्पवृक्ष 'गुगल' ची कथा नियमीत तुमच्या ब्लॉगवर वाचत होतो. पण अचानक तुम्ही ही कथा थांबवली सर कृपया गूगलची कथा तुमच्या वेबसाईट वर परत एकदा सुरू करावी हि विनंती तुम्ही विचारात घ्याल अशी आशा आहे. पुन्हा एकदा स्वागत.
उत्तर द्याहटवाSir, plez tumchi Google chi katha continue kara tumchya ekach site var asha prakarchi ranjak mahiti uplabdha ahe ...... mi mobile varun blog lihila ahe manun marathi madhe type karu shaklo nahi tyastathi shama asavi
उत्तर द्याहटवाSir,plez continue goggles story i was weighting ... from 7 months
उत्तर द्याहटवाKhup chan............
उत्तर द्याहटवानमस्कार सर मी पहिल्यांदाच या ब्लॉगवर लिहितोय गुगल मराठी सर्च: एक नवी क्लुप्ती हा लेख वाचला. फार आनंद झाला आपण जी माहिती पूरवता त्या बद्दल धन्यवाद-
उत्तर द्याहटवा