१४ जून, २०११

काय फरक पडतो?

  यातला ज्ञानाचा मुद्दा सोडा, मनोरंजनासाठी जरी ह्या संकेतस्थळावर जाऊन मुशाफिरी केलीत तरी फरक पडेल. अनुभव घेऊन पहा.

“मला वाटलं..” आणि “काय फरक पडतो?” हे दोन शब्दप्रयोग आपल्या बोलण्यात नेहमीच येतात. “मला वाटलं..” मध्ये हमखास काहीतरी चूक वा गैरसमज झालेला असतो. आयुष्यात आपण इतक्या चुका ह्या “मला वाटलं …” नावाच्या खात्यात टाकलेल्या असतात की त्याचा हिशोब अशक्य असतो. आता हेच पहा नं की एव्हाना तुम्हाला वाटलं असेल की मी “काय वाटलं” किंवा “मला वाटलं” हा विषय आजच्या पोस्टसाठी घेतोय बहुधा. आपल्या वाटण्याचा स्पीड बघा किती असतो!
तर मंडळी, तुम्हाला वाटलं तसं नाही. आज मी बोलतोय ते ‘फरक’ पडण्याबद्दल. हा फरक आपल्याला काय फरक पडतो याबद्दलचा नसून आपल्या रोजच्या आयुष्यातल्या अनेक गोष्टींबद्दलचा आहे. उदाहरणार्थ, आपण एससीडी टीव्ही आणि एलईडी टीव्ही बद्दल आजकाल बोलतो, ऐकतो. काय फरक आहे LCD आणि LED मध्ये? एक महाशय पीजे करीत म्हणाले, “एकात सी आहे, आणि दुसऱ्यात त्या जागी ई आहे. एवढाच फरक”. विनोद करून झाल्यानंतर मग त्यांनी कबूल केलं की नक्की आणि नेमका काय ते नीट माहीत नाही. मी त्या पीजेवाल्या गृहस्थांना www.differencebetween.net नावाचं संकेतस्थळ सांगितलं. ते घरी गेले. त्यांच्या घरी त्यांचा मुलगा इंटरनेट वापरतो. त्याच्या खनपटीला बसले. त्याला हे डिफ्रंसबिटवीन.नेट नावाचं संकेतस्थळ उघडायला सांगितलं. त्यात त्यांना LED आणि LCD टीव्हीत काय नेमका फरक असतो ते नक्की आणि नीट समजलं. तुम्हीही ह्या संकेतस्थळावर अवश्य जाऊन पहा.
आता ही यादी पहा. अंटीसेप्टीक आणि डिसइनफेक्टंट मध्ये नेमका फरक काय? किंवा, फुटबॉलच्या खेळात रग्बी आणि सॉकर, किंवा, रग्बी आणि फुटबॉल यात फरक काय? ही यादी मी पुढे आणखी वाढवत नेतोय तसं तुमच्या लक्षात येतय की आपण हे नेहमी वाचतो, किंवा डोळ्याखालून घालतो खरं. पण त्यातला नेमका फरक आपल्याला आयुष्यभर कळत नाही. ज्ञान आणि अज्ञान यांच्यातलं आपल्या मनातलं धुकं हे नेमकं असं असतं. हे धुकं दूर करून ज्ञान स्वच्छ केलं की मनाला छान वाटतं. ते ज्ञान वापरणं, न वापरणं हा आणखी वेगळाच भाग.
आता नाच म्हणजे डान्सचच घ्या. रॉक, डिस्को, पॉप यांत नेमका फरक काय? किंवा व्यवहाराचं बोलायचं तर इन्कम टॅक्स घ्या. इन्कम टॅक्स मधला टॅक्स आणि एक्साईज ड्युटी मधली ड्युटी यांच्यात नेमका काय फरक? वगैरे वगैरे. 

ही बघा ह्या साईटवरील काही लेखांची यादी. 

यातला ज्ञानाचा मुद्दा सोडा, मनोरंजनासाठी जरी ह्या संकेतस्थळावर जाऊन मुशाफिरी केलीत तरी फरक पडेल. अनुभव घेऊन पहा.

२ टिप्पण्या:

  1. kautukaspad karya aahe aaple. pan jyana marathit offline type karayache aahe, likhan karavayache aahe tyana phonetic software milel ka (free of charge) va to majhya windows7 32bit var upayukt aahe ka ?

    उत्तर द्याहटवा
  2. खालील वेब पत्त्यावर उपलब्ध झालेले मायक्रोसॉफ्टचे ILIT Tool (Desktop Edition)तुमच्या संगणकावर लावले की ऑफलाईन टायपिंगची सोय होते. हे टूल डाऊनलोड करून इन्स्टॉल करावे लागते. त्याची माहितीही खालील पत्त्यावरच मिळेलः
    http://specials.msn.co.in/ilit/MarathiPreInstall.aspx
    विंडोज 7 वरही ते वापरता येते.

    उत्तर द्याहटवा