PDFESCAPE वेब अॅपचा आतला भाग असा आहे. एक तीन पानी पीडीएफ फाईल तिथे उघडली. त्यातील पहिल्या पानावर एक स्टीकी नोट टाकली. ती वरील चित्रात दिसत आहे. |
PDFESCAPE सध्या वापरण्यासाठी उपलब्ध आहे. मात्र अजुनीही त्याचा विकास चालू आहे. सध्या ते बीटा म्हणजे चांचणी आवृत्ती म्हणून इंटरनेटवर आलं आहे. तुम्हाला अपेक्षित असलेली प्रत्येक गोष्ट ह्या पीडीएफ एडिटर मध्ये आज नाही हे खरं असलं तरी ज्या सोयी आज उपलब्ध आहेत त्या अतिशय उपयुक्त आहेत.
PDFESCAPE मध्ये तुम्ही काय करू शकताः1) तुमच्या पीडीएफ फाईलमधील कोणताही भाग (अक्षरे, शब्द, चित्र वगैरे) तुम्ही पांढरा करू शकता. आपण कागदावर व्हाईट फ्लुईड लावून करेक्शन करतो, तसलाच हा प्रकार.
2) पांढऱ्या केलेल्या भागावर तुम्ही हवा तो शब्द टाईप करू शकता. म्हणजेच तुम्ही अंतिमतः टेक्स्ट एडिटींग करू शकता. मात्र थेट शब्दावर टेक्स्ट कर्सर आणून एडिटींगची सोय अजून आलेली दिसत नाही.
3) तुमच्या पीडीएफ फाईलमध्ये तुमची कॉमेंट म्हणून तुम्ही एखादी यलो स्टीकी नोट लावून त्यावर शेरा देऊ शकता. ही सोय कार्यालयांसाठी फारच चांगली आहे.
4) पीडीएफ पानावर एखादे वा अनेक चित्रे (फोटो वगैरे ग्राफीकही) टाकू शकता.
5) कोणत्याही शब्दाला वा चित्राला हायपरलिंक देऊ शकता.
6) पीडीएफ मधला एखादा फॉर्म भरू शकता. किंवा एखादा फॉर्म तयार करू शकता.
7) हे बदल करता करता ते सेव्हही करू शकता.
8) पीडीएफ पाने उभी आडवी (रोटेट लेफ्ट/राईट) करू शकता. पाने डिलीट करू शकता. पानांची जागा आतल्या आत बदलू शकता.
9) युनिकोड मराठीची सोय आहे. मी मराठी मजकूर जोडाक्षरांसहित टाईप करू शकलो.
10) पीडीएफ रीडर म्हणून म्हणजे केवळ पीडीएफ फाईल वाचनासाठीही PDFESCAPE वापरता येईल.
ह्या साऱ्या सोयी मोफत उपलब्ध आहेत.
काही लक्षात ठेवण्याजोग्या गोष्टी अशाः
1) काही मर्यादा आहेत. उदाहरणार्थ पीडीएफ फाईल 50 पानांच्या पेक्षा अधिक असेल तर ती उघडता येत नाही.
2) क्रोम ब्राऊझर मध्ये हे वेब अॅप वापरू नका. ते फक्त इंटरनेट एक्स्प्लोअरर वा फायरफॉक्स मध्ये वापरा. क्रोममध्ये अनेक बग्ज दिसून येतात.
3) असा अन्य पीडीएफ एडिटर (वेब अॅप) इंटरनेटवर उपलब्ध असल्याचे माझ्या माहितीत नाही. आपणास माहित असल्यास वाचकांनी कृपया कॉमेंटद्वारा ती माहिती द्यावी.
राहुलने गावातल्या सायबरकॅफेत बसून PDFESCAPE वापरून ऑफिसची पीडीएफ फाईल एडिट करून पाठवली. एक चांगलं वेब अॅप म्हणून त्याची माहिती मला ईमेल करून कळवली. मी ती तुमच्याशी शेअर केली. तुम्हीही PDFESCAPE वापरून पहा. अनुभव मला कॉमेंटस देऊन जरूर कळवा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा