Ghost Mumbai म्हंटलं की १५ लाखापेक्षा अधिक भुतं गुगल दाखवतो. |
इंटरनेटवर Ghost टाईप करून आपण गुगलवर शोधलं तर दहा कोटींपेक्षा अधिक संदर्भ मिळतात. Ghost India म्हंटलं की दोन कोटींपेक्षा अधिक संदर्भ असल्याचं दिसतं. Ghost Mumbai म्हंटलं की १५ लाखापेक्षा अधिक भुतं गुगल दाखवतो. घोस्ट पुणे तीन लाख आहेत. दिल्लीत हाच आकडा अठरा लाखांच्या आसपास आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष राहतात त्या व्हाईट हाऊस पासून गावागावातल्या पडिक घर आणि बंगल्यापर्यंत सगळीकडे भुतं असल्याची चर्चा इंटरनेटवर दिसते. त्या दृष्टीने इंटरनेट हा भुतांचा आजपर्यंतचा सगळ्यात मोठा ज्ञानकोश असावा.
इंटरनेटवरील विकीपेडिया हा जगातल्या माणसांनी श्रमदान करून तयार केलेला ज्ञानकोश. त्यावरही भुतांच्या माहितीची रेलचेल दिसते. जगभरात भुतांनी पछाडलेल्या ज्या जागा आहेत त्यात ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कंबोडिया, डेन्मार्कपासून ते भारत, जपान, इंडोनेशिया, मलेशिया, फिलीपाईन्स, तैवान, युक्रेन वगैरे सगळे देश आहेत. अमेरिकेत तर प्रत्येक राज्यात अशी भुतांची वस्ती आहे.
युद्धस्य कथा रम्यः म्हणतात. खरं तर युद्धाच्या कथांपेक्षाही लोकांना भुतांच्या कथा अधिक रम्य वाटतात.
अंधश्रद्धा दूर करणारी मंडळी आयुष्यभर भुतांची भिती घालवण्याचं कार्य करीत असतात. पण त्यांना न जुमानता, भुतं जगभर अमर आहेत हेच खरं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा